
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील माणिकगड किल्ला हा गोंड साम्राज्याचा ‘माणिक’ समजला जातो. ऐतिहासिक उल्लेखानुसार नागवंशीय राजा महिन्दू योन यांनी ९व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती केली होती. त्यांचे राज्य १२व्या शतकापर्यंत टिकले. या किल्ल्याच्या पायथ्याशी साधारणतः त्याच कालावधीतील प्राचीन हेमाडपंती विष्णूमंदिर आहे. जिवती तालुक्यात असलेल्या अनेक मंदिरांपैकी हे एकमेव प्राचीन मंदिर समजले जाते. परिसरातील हजारो भाविकांचे ते श्रद्धास्थान असून भाविकांसोबतच माणिकगड किल्ल्यामुळे शेकडो पर्यटकही दररोज या मंदिराला भेट देतात.
गडचांदूरकडून जिवतीकडे जाताना एक मोठा घाट पार केल्यावर माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते. येथे वनविभागाची चौकी असून तेथून उजवीकडे माणिकगड किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे, तर डावीकडून खालच्या बाजूला प्राचीन विष्णू मंदिर आहे. चौकीपासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे १५० पायऱ्या उतरून जावे लागते. मंदिराच्या प्रांगणात गेल्यावर ते डोंगर उतारावरती वसले असल्याचे जाणवते. या मंदिराची बांधणी काळ्या पाषाणांची व हेमाडपंती रचनेची आहे.
आजूबाजूला असलेले घनदाट जंगल व त्याच्या मध्यभागी स्थित या मंदिराला शिखर व भिंती नाहीत. तरीही हे मंदिर चौथऱ्यावर (पाया) व स्तंभांवरील कलाकुसरींमुळे वैशिष्ट्यपूर्ण भासते.
एका डोंगर उतारावर असलेल्या सपाट भागात हे मंदिर स्थित आहे. त्यामुळे मंदिराचा परिसर जास्त मोठा नाही. मागच्या बाजूला डोंगर कडा, तर तिन्ही बाजूने तटभिंती आहेत. मंदिरासमोरील बाजूस खोल दरी आहे. तटभिंतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रथम मंदिराच्या शेजारी असणाऱ्या कुंडाचे दर्शन होते. सुमारे ८ ते १० फूट खोल असलेल्या या मोठ्या कुंडाच्या आतमध्ये साधारणतः ५ फूट बाय ५ फूट आकाराचे आणखी एक लहान कुंड आहे. या कुंडात वर्षभर पाणी असते. तो कधीही आटत नाही. या परिसरातील अनेक भाविक या कुंडातील पाणी तीर्थ म्हणून घेऊन जात असतात. या लहान कुंडातील पाणी हा येथील एकमेव पाण्याचा स्रोत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत मात्र मोठे कुंड पूर्ण पाण्याने भरलेले असल्यामुळे त्यात खाली असलेले लहान कुंड दिसत नाही.
कुंडाच्या वरील भागात जमिनीपासून सुमारे ४ फूट उंचीवर असणाऱ्या मोठ्या चौथऱ्यावर हे मंदिर उभे आहे. या चौथऱ्यावरील ५ आडव्या थरांवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम आहे. त्यामधील पहिल्या ४ थरांवर विविध फुले, नक्षीकाम असून ५ व्या थरावर अनेक मैथुन शिल्पे कोरलेली आहेत. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला पूर्वेकडून व उत्तरेकडून अशी २ प्रवेशद्वारे आहेत. मंदिराचा सभामंडप मोठा असून त्यात २१ नक्षीदार दगडी स्तंभ आहेत. या स्तंभांवर छत असून त्यावर इतर मंदिरांना असते तसे शिखर वा कळस नाही. स्तंभांची खालची बाजू चौकोनी, तर मधल्या भागात विविध
शिल्पांकन आहे. स्तंभांच्या वरील बाजूस भारवाहक यक्षप्रतिमा कोरलेल्या आहेत. उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळील स्तंभांच्या खालच्या बाजूला अनेक देवीदेवतांची शिल्पे कोरलेली आहेत. या स्तंभांना बाहेरच्या बाजूने जोडणाऱ्या भिंती नसल्यामुळे हा सभामंडप पूर्ण मोकळा आहे.
सभामंडपाच्या मध्यभागी २ गर्भगृह आहेत. त्यापैकी एकात शेषशाही श्रीविष्णूंची सुमारे ५ फूट लांबीची मूर्ती आहे. या मूर्तीच्या वर ब्रह्मदेव व दशावतार कोरलेले आहेत. दुसऱ्या गर्भगृहात शिवपिंडी आहे. या दोन्ही गर्भगृहांची दारे पूर्वेकडे असल्यामुळे सकाळच्या वेळी सूर्यकिरणे थेट गाभाऱ्यात पडतात. मंदिराच्या आवारात अनेक प्राचीन मूर्ती व विविध शिल्पे आहेत. येथील स्तंभांवर व त्यावरील असलेल्या शिल्पांवर रंगकाम केल्यामुळे त्यांचे सौंदर्य आणखीन खुलून दिसते. दरवर्षी मार्गशीर्ष अमावस्येला येथे सप्ताह असतो. यावेळी शेकडो भाविक उपस्थित असतात. मंदिराच्या आजूबाजूला कमी जागा असल्यामुळे या मंदिराच्या दक्षिणेकडे असलेल्या टेकडीवरील मोकळ्या जागेत सप्ताहातील विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. हा सर्व परिसर वनविभागाच्या अखत्यारित असल्यामुळे व येथील परिसरात जंगली प्राण्यांचा वावर असल्यामुळे सायंकाळी वा रात्री या मंदिरात प्रवेश दिला जात नाही.
या मंदिरापासून जवळच माणिकगड किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून ५०७ मीटर उंचीवर असलेला हा किल्ला सुमारे ७५ एकर जागेवर वसलेला आहे. वनविभागाच्या चौकीतून शुल्क आकारून येथे प्रवेश दिला जातो. महाराष्ट्र सरकारतर्फे या किल्ल्याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आला असल्यामुळे येथे पर्यटकांसाठी अनेक सोयी–सुविधा करण्यात आल्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीची पुनर्बांधणी करण्यात आली असून अनेक ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी रेलिंग लावण्यात आले आहे.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम असून हत्तीवर आरूढ झालेला सिंह हे गोंड सत्तेचे राजचिन्ह, विविध व्याल, नागशिल्प व इतरही अनेक शिल्पांचे अंकन आहे. दरवाजाच्या चौकटीवर गणेशमूर्ती आहे. याशिवाय किल्ल्यात तोफ, बुरुज, बुरुजांवर असलेल्या विविध मूर्ती, तळघर, पाताळ विहीर, राणी महल, राणी तलाव हे पाहता येतात. सोबतच जैवविविधतेने नटलेली विपुल वनसंपदा येथे अनुभवता येते.

चंद्रपुर जिले की जिवती तहसील का माणिकगड किला गोंड साम्राज्य का ‘माणिक’ माना जाता है। ऐतिहासिक उल्लेखों के अनुसार नागवंशी राजा महिंदु योन ने 9वीं शताब्दी में इस किले का निर्माण किया था। उनका राज्य 12वीं शताब्दी तक चला। इस किले की तलहटी में लगभग उसी काल का प्राचीन हेमाडपंती विष्णु मंदिर स्थित है। जिवती तहसील में स्थित अनेक मंदिरों में यह एकमात्र प्राचीन मंदिर माना जाता है। यह मंदिर हजारों श्रद्धालुओं का आस्था-स्थल है। माणिकगड किले के कारण यहाँ प्रतिदिन सैकड़ों पर्यटक भी आते हैं।
गडचांदूर से जिवती की ओर जाते समय एक बड़ा घाट पार करना पड़ता है। इसके पश्चात माणिकगड किले की तलहटी तक पहुँचा जा सकता है। यहाँ वन विभाग की चौकी है। चौकी से दाईं ओर माणिकगड किले पर जाने का मार्ग है। बाईं ओर नीचे प्राचीन विष्णु मंदिर स्थित है। चौकी से मंदिर तक पहुँचने के लिए लगभग 150 सीढ़ियाँ उतरनी पड़ती हैं। मंदिर के प्रांगण में पहुँचने पर यह पहाड़ की ढलान पर बसा हुआ दिखाई देता है। इस मंदिर का निर्माण काले पत्थरों से हेमाडपंती शैली में हुआ है। आसपास घना जंगल है। इसके बीच स्थित यह मंदिर बिना शिखर और दीवारों के है।
फिर भी मंदिर अपने ऊँचे चबूतरे तथा स्तंभों पर की गई मनोहर कलाकारी के कारण विशेष रूप से आकर्षक प्रतीत होता है।
मंदिर पहाड़ी की समतल सतह पर बना है। इस कारण इसका परिसर बहुत बड़ा नहीं है। इसके तीनों ओर प्राचीर है। मंदिर के सम्मुख गहरी खाई है। प्राचीर के प्रवेशद्वार से अंदर जाने पर सबसे पहले मंदिर के पास स्थित कुंड दिखाई देता है। यह बड़ा कुंड लगभग 8 से 10 पद गहरा है। इसके भीतर लगभग 5 पद गुणा 5 पद का एक छोटा कुंड भी बना हुआ है। इस छोटे कुंड में निरंतर पानी भरा रहता है। यह कभी नहीं सूखता। यहाँ आने वाले श्रद्धालु इस पानी को तीर्थ मानकर अपने साथ ले जाते हैं। यह छोटा कुंड यहाँ का एकमात्र जलस्रोत है। वर्षा ऋतु में बड़ा कुंड भर जाने से छोटा कुंड दिखाई नहीं देता।
कुंड के ऊपर भूमि से लगभग 4 पद ऊँचाई पर बने बड़े चबूतरे पर यह मंदिर खड़ा है। चबूतरे की पाँच क्षैतिज परतों पर उत्कृष्ट नक्काशी की गई है। पहली चार परतों पर विभिन्न फूल और नक्काशी है। पाँचवीं परत पर अनेक मैथुन शिल्प उकेरे गए हैं। यह मंदिर पूर्वाभिमुख है। इसमें पूर्व तथा उत्तर दिशा से दो प्रवेशद्वार हैं।
इसका सभामंडप बड़ा है। इसमें पाषाण के 21 नक्काशीदार स्तंभ हैं। इन स्तंभों पर छत टिकी है। इसके ऊपर अन्य मंदिरों की तरह शिखर या कलश नहीं है। स्तंभों का निचला हिस्सा चौकोर है। मध्य भाग पर विभिन्न शिल्पांकन है। इसके ऊपरी भाग पर भार वहन करती यक्ष-मूर्तियाँ उकेरी गई हैं। उत्तरी प्रवेशद्वार के पास वाले स्तंभों के नीचे अनेक देवी-देवताओं की मूर्तियाँ अंकित हैं। इन स्तंभों को बाहर से जोड़ने वाली दीवारें नहीं हैं। इस कारण सभामंडप पूरी तरह खुला है।
सभामंडप के मध्य में दो गर्भगृह हैं। इनमें से एक में शेषशायी भगवान विष्णु की लगभग 5 पद लंबी पाषाण मूर्ति है। इस मूर्ति के ऊपर ब्रह्मदेव और दशावतार अंकित हैं। दूसरे गर्भगृह में शिवलिंग है। दोनों गर्भगृहों के द्वार पूर्व दिशा में हैं। सुबह के समय सूर्य की किरणें सीधे गर्भगृह में पड़ती हैं। मंदिर के परिसर में अनेक प्राचीन मूर्तियाँ और विविध शिल्प बिखरे हुए हैं। स्तंभों और उन पर बने शिल्पों पर रंग किया गया है। इससे उनका सौंदर्य और निखर उठता है। हर साल मार्गशीर्ष अमावस्या को यहाँ साप्ताहिक धार्मिक कार्यक्रम का आयोजन होता है। इसमें सैकड़ों श्रद्धालु शामिल होते हैं। मंदिर के आसपास जगह कम है।
इस कारण यह धार्मिक कार्यक्रम दक्षिण की ओर स्थित पहाड़ी की खुली जगह पर आयोजित किया जाता है। यह पूरा परिसर वन विभाग के अधिकार में है। यहाँ जंगली जानवरों का विचरण रहता है। इसलिए सायंकाल या रात को मंदिर में प्रवेश नहीं दिया जाता।
मंदिर के पास ही माणिकगड किला है। समुद्रतल से 507 मीटर ऊँचाई पर स्थित यह किला लगभग 75 एकड़ क्षेत्र में फैला हुआ है। वन विभाग की चौकी से शुल्क लेकर यहाँ प्रवेश दिया जाता है। महाराष्ट्र सरकार ने इसे पर्यटन क्षेत्र की श्रेणी में सम्मिलित किया है। यहाँ पर्यटकों के लिए अनेक सुविधाएँ उपलब्ध कराई गई हैं। किले की प्राचीर का पुनर्निर्माण किया गया है। कई जगह पर्यटकों की सुरक्षा हेतु लोहे के कठघरे लगाए गए हैं।
किले के प्रवेशद्वार पर दोनों ओर विशेष नक्काशी की गई है। इसमें हाथी पर सवार सिंह अंकित है। यह गोंड सत्ता का राजचिह्न है। यहाँ विभिन्न व्याल, नागशिल्प और कई अन्य आकृतियाँ अंकित हैं। दरवाजे की चौखट पर गणेशमूर्ति है। किले के भीतर तोप, बुर्ज और बुर्जों पर स्थित विभिन्न मूर्तियाँ देखी जा सकती हैं। यहाँ तहखाने, पाताल कुआँ, रानी महल और रानी तालाब भी स्थित हैं। साथ ही यहाँ जैवविविधता से भरपूर समृद्ध वनसंपदा का अनुभव भी होता है।