महादेव मंदिर / विठ्ठल मंदिर

भिसी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर

चिमूर तालुक्यातील भिसी हे गाव येथील भोसलेकालीन प्राचीन महादेव मंदिर विठ्ठलरुख्मिणी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. एकाच आवारात ही दोन्ही मंदिरे असून येथील महादेव मंदिरात रंगपंचमीपासून भरणारी दिवसांची यात्रा ही चिमूरमधील मोठ्या यात्रांपैकी एक आहे. या यात्रेचे वैशिष्ट्य असे की अनेक दानशूर भाविक या यात्रेच्या वेळी देणगी अन्नधान्य इतके देतात की या उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना जेवण देऊनही त्यातील अर्ध्याहून अधिक धान्य शिल्लक राहते. या मंदिराचे येथील महत्त्व भाविकांची असलेली श्रद्धा लक्षात घेऊन राज्य सरकारतर्फे २०२३ मध्ये मंदिर परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला होता.

भिसी येथील विठ्ठलरखुमाई देवस्थानाच्या अंतर्गत ही मंदिरे येतात. या परिसरात हे मंदिरउघडाउघडीचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या मोठ्या मंदिरांशिवाय येथे श्रीविष्णू, श्रीहनुमान, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत तुकडोजी गरुड यांची मंदिरे आहेत. येथील महादेव मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून जमिनीपासून सुमारे फूट उंचीवर असलेल्या जोत्यावर हे मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या सुरुवातीच्या भागात दगडी स्तंभ असून तेथून सभामंडपात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ नृसिंह, सूर्य, विष्णू इतर प्रतिमा कोरलेल्या आहेत. या सभामंडपात स्तंभ असून त्याच्या वरील भागात भारवाहक यक्षमूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडप मोकळा असून याला बाहेरील बाजूने भिंती नाहीत.

अंतराळाचे प्रवेशद्वार हे कमानीयुक्त असून द्वारपट्टीवरील दोन्ही बाजूस द्वारपालांची शिल्पे, तर वरील बाजूस कोरीव काम आहे. अंतराळात नंदी गर्भगृहात प्राचीन शिवपिंडी आहे. या शिवपिंडीसमोरील बाजूस श्रीगणेशाची मूर्ती इतर परिवार देवतेच्या मूर्ती आहेत. असे सांगितले जाते की येथील शिवपिंडीवर कुणीतरी कुऱ्हाडीने घाव घातला होता. त्याचे व्रण या शिवपिंडीवर दिसतात.

मंदिराच्या बाह्य भिंतींवर अनेक शिल्पांचे अंकन केलेले आहे. यापैकी १० तोंडे २० हात असलेल्या रावणाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तसेच रामरावण युद्ध करीत आहेत, असे शिल्प असून त्यातही रावण १० तोंडांचा, २० हातांचा दाखविला आहे. याशिवाय घोड्यांच्या रथात माणसे सारथी असे शिल्पांकन आहे. मंदिराच्या गर्भगृहावर उंच शिखर असून त्याची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. महादेव मंदिरात रंगपंचमीपासून दिवसांचा मोठा उत्सव असतो. यावेळी येथे यात्रा भरते. या उत्सवाच्या वेळी भंडारा (महाप्रसाद, जेवण) असतो. नवसपूर्तीनिमित्त अनेक भाविक या भंडाऱ्यासाठी अन्नदान करतात. याशिवाय अनेक दानशूर भाविक देणगी धान्य देतात. येथे जमा होणाऱ्या धान्याचे प्रमाण इतके असते की भंडारा होऊनही अर्ध्याहून अधिक धान्य उरते. मंदिर समितीतर्फे त्या धान्याची नंतर विक्री करण्यात येते. भोसले काळात मालगुजारी असलेल्या या गावातील गांधी घराण्याकडून दररोज या मंदिरात नैवेद्य येते, असे सांगितले जाते. महादेव मंदिराला लागून विठ्ठलरुख्मिणीचे मंदिर आहे.

या मंदिरासमोर असलेल्या देवळीमध्ये (छोटे मंदिर) मांडी घालून बसलेली वैशिष्ट्यपूर्ण गरुड देवतेची मूर्ती आहे. विठ्ठलरुख्मिणी मंदिराचा सभामंडपही मोकळा असून गर्भगृहात एका चौथऱ्यावरील मखरात विठ्ठल रुख्मिणी यांच्या काळ्या पाषाणातील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्तींना पाठशिळा असून त्यावर कोरीव काम आहे. डोक्यावर चांदीचे मुकुट, चांदीचे डोळे, गळ्यात विविध अलंकार सुंदर वस्त्रे यामुळे या मूर्ती खुलून दिसतात. असे सांगितले जाते की हे विठ्ठल मंदिर ३०० वर्षांपूर्वी एका कासाराने बांधले आहे. मंदिराच्या बाजूला गजानन महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या मोठ्या मूर्ती असलेले गर्भगृह आहेत. दरवर्षी या मंदिरात एकनाथी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहाच्या उद्यापनाला सुमारे ५० हजार भाविक उपस्थित असतात. या सर्वांना मंदिर समितीतर्फे महाप्रसाद दिला जातो.

आवारात एका लहानशा मंदिरात संतोषी मातेची मूर्ती आहे. बाजूला भवानी मातेची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की पूर्वी येथे भवानी मातेचे मंदिर होते, पण तेथील मूर्ती भिवापूरच्या भीमादेवी मंदिरात नेण्यात आली. त्यामुळे भवानी मातेची नवीन मूर्ती तयार करून ती संतोषी माता मंदिरात स्थापित करण्यात आली आहे.

उपयुक्त माहिती:

  • चिमूरपासून १७ किमी, तर चंद्रपूरपासून १२९ किमी अंतरावर
  • चिमूरपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात न्याहरीची सुविधा आहे; परंतु निवासाची नाही

महादेव मंदिर / विठ्ठल मंदिर

भिसी, तह. चिमूर, जि. चंद्रपूर

चिमूर तहसील के भिसी गाँव में स्थित यह प्राचीन भोसलेकालीन महादेव मंदिर और विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दोनों ही प्रसिद्ध हैं। ये दोनों मंदिर एक ही प्रांगण में निर्मित हैं। महादेव मंदिर में रंगपंचमी से प्रारंभ होने वाला सात दिवसीय मेला चिमूर के प्रमुख मेलों में से एक माना जाता है। इस मेले की विशेषता यह है कि कई दानी श्रद्धालु मेले के दौरान इतनी दान राशि और अन्न-धान्य देते हैं कि यात्रियों को भोजन कराने के पश्चात भी आधे से अधिक अन्न शेष रह जाता है। मंदिर के महत्व और श्रद्धालुओं की श्रद्धा को ध्यान में रखते हुए राज्य सरकार ने 2023 में मंदिर परिसर के विकास हेतु बड़ी राशि स्वीकृत की थी।

इन दोनों बड़े मंदिरों के अतिरिक्त यहाँ श्रीविष्णु, श्रीहनुमान, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, राष्ट्रसंत तुकडोजी और गरुड़ मंदिर भी स्थित हैं। महादेव मंदिर की संरचना विशिष्ट है। यह भूमि से लगभग 4 पद ऊँचे चबूतरे पर बना है। मंदिर में सभामंडप, अंतराल और गर्भगृह सम्मिलित हैं। सभामंडप के आरंभिक भाग में चार पत्थर के स्तंभ हैं। यहाँ से सभामंडप में प्रवेश करने के लिए पाँच सीढ़ियाँ बनी हैं। सभामंडप के प्रवेश द्वार के निकट नृसिंह, सूर्य, विष्णु और अन्य देवताओं की मूर्तियाँ उत्कीर्ण की गई हैं। सभामंडप में छह स्तंभ हैं। इनके ऊपर भारवाहक यक्ष (भार वहन करने वाला यक्ष – एक पौराणिक प्राणी) की मूर्तियाँ हैं। सभामंडप खुला है और इसकी बाहरी भित्तियाँ नहीं हैं।

अंतराल का प्रवेश द्वार मनोहर और कलात्मक है। द्वारपट्टी के दोनों ओर द्वारपाल की मूर्तियाँ हैं और ऊपरी भाग पर नक्काशी का कार्य किया गया है। अंतराल में नंदी की मूर्ति है और गर्भगृह में प्राचीन शिवलिंग स्थापित है। शिवलिंग के सम्मुख श्रीगणेश की मूर्ति और दो कुलदेवताओं की मूर्तियाँ हैं। ऐसा बताया जाता है कि शिवलिंग पर पूर्व में किसी ने कुल्हाड़ी से प्रहार किया था। उसके चिह्न आज भी स्पष्ट दिखाई देते हैं।

मंदिर की बाहरी भित्तियों पर अनेक शिल्प उत्कीर्ण हैं। इनमें दस सिर और बीस हाथों वाली रावण की मूर्ति विशेष रूप से आकर्षक है। इसके अतिरिक्त श्रीराम और रावण के युद्ध का शिल्प भी है। इसमें भी रावण को दस सिर और बीस हाथों वाला दर्शाया गया है। मंदिर में दो अश्वों के रथ पर सवार दो व्यक्तियों और सारथी का शिल्प भी विद्यमान है। गर्भगृह पर ऊँचा शिखर है और उसकी संरचना अत्यंत विशिष्ट है।

महादेव मंदिर में रंगपंचमी से सात दिवसीय बड़ा उत्सव आयोजित होता है। इस कालखंड में मेला और भंडारा (महाप्रसाद) आयोजित किया जाता है। मनोकामना पूर्ति हेतु कई श्रद्धालु अन्नदान करते हैं। अनेक दानी श्रद्धालु अन्य दान और धान्य भी अर्पित करते हैं। एकत्रित अन्न से इतना विशाल भंडारा तैयार होता है कि उसके उपरांत भी आधा अन्न शेष बच जाता है। मंदिर समिति बाद में उस अन्न का विक्रय करती है। भोसले शासनकाल में इस गाँव के गांधी परिवार से प्रतिदिन मंदिर में भोग आता था।

महादेव मंदिर के समीप विठ्ठल-रुक्मिणी का मंदिर है। इस परिसर के एक लघु मंदिर में विराजमान विशिष्ट गरुड़ मूर्ति है। विठ्ठल-रुक्मिणी मंदिर का सभामंडप खुला है। गर्भगृह के मखर में विठ्ठल और रुक्मिणी की विशिष्ट श्याम पाषाण की मूर्तियाँ हैं। इन दोनों मूर्तियों के पृष्ठभाग में नक्काशी का कार्य है। मस्तक पर रजत मुकुट, रजत नेत्र, कंठ में विभिन्न आभूषण और मनोहर वस्त्र मूर्तियों को और भी आकर्षक बनाते हैं। यह बताया जाता है कि इस विठ्ठल मंदिर का निर्माण 300 वर्ष पूर्व एक कासार ने करवाया था। मंदिर के निकट गजानन महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम और संत ज्ञानेश्वर की बड़ी मूर्तियाँ भी स्थापित हैं। हर साल यहाँ एकनाथी भागवत सप्ताह का आयोजन होता है।

इसमें लगभग 50,000 श्रद्धालु सम्मिलित होते हैं। सभी श्रद्धालुओं को मंदिर समिति द्वारा महाप्रसाद वितरित किया जाता है।

प्रांगण के एक लघु मंदिर में संतोषी माता की मूर्ति है। समीप ही भवानी माता की मूर्ति भी स्थित है। पूर्व में यहाँ भवानी माता का मंदिर था, परंतु उनकी मूर्ति भिवापुर के भीमादेवी मंदिर ले जाई गई।

पश्चात भवानी माता की नवीन मूर्ति निर्मित कर उसे संतोषी माता मंदिर में स्थापित किया गया।

प्रमुख विशेषताएँ

  • चिमूर से 17 कि.मी. और चंद्रपूर से 129 कि.मी. की दूरी पर स्थित।
  • चिमूर से बस सेवा की सुविधा उपलब्ध है।
  • निजी वाहन मंदिर तक जा सकते हैं।
  • परिसर में जलपान की सुविधा उपलब्ध है, किंतु आवास की नहीं।
Back To Home