वरद गणेश मंदिर समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर,

ता. जि. छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर शहरातील समर्थनगर येथील वरद गणेश मंदिरातील गणेश हा शहरातील मानाच्या गणपतींपैकी एक आहे. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या मंदिरातील गणेशाची इच्छापूर्ती करणारा देव, अशी ख्याती आहे. त्यामुळे शहरातील अनेक नागरिक या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतरच दैनंदिन व्यवहारास सुरुवात करतात. या मंदिरात सात फेरे घेऊन दाम्पत्य जीवनाची सुरुवात केल्यास उभयतांना आयुष्यभर सुखसमृद्धी प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

सुमारे ५५ वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये (पूर्वीचे नाव औरंगाबाद) समर्थनगर परिसरात पहिली वसाहत स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर स्थानिकांनी या परिसरात गणेश मंदिर असावे, यासाठी लोकसहभागातून निधी जमवून १९७१ मध्ये हे मंदिर उभारले. वेदमूर्ती विष्णुपंत निधोनकर गुरुजी यांच्या हस्ते या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. ही मूर्ती जयपूरमधून आणण्यात आलेली आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे प्रशस्त स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्वी हे मंदिर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ होते. कालौघात जसजसे शहर वाढत गेले, तसतसे हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागात आले. मध्यवर्ती बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावरच हे मंदिर असल्याने स्थानिकांसह मराठवाड्यातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.

समर्थनगर येथील एका चौकामध्ये वरद गणेशाचे दुमजली मंदिर आहे. दर्शनी भागातील भिंतींवर कमानीसदृश्य खिडक्यांभोवती आकर्षक नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराजवळ वरच्या भागात दोन्ही बाजूंना गजराजाच्या मूर्ती कोरण्यात आल्या असून खालील बाजूला असलेल्या देवड्यांमध्ये मयुरांची शिल्पे आहेत. या भव्य अशा प्रवेशद्वाराजवळील बारा संगमरवरी पायऱ्या चढल्यावर प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या उजवीकडे प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे डावीकडे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचा सभामंडप आहे.

गर्भगृहासमोर हातात मोदक घेतलेल्या मूषकाची पंचधातूची मोठी मूर्ती आहे. गर्भगृहातील वज्रपीठावर, वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम असलेल्या सुवर्णजडीत सिंहासनावर, गणेशाची शुभ्र संगमरवरी मूर्ती आहे. या चतुर्भुज मूर्तीच्या एका हातात पाश, दुसऱ्यात अंकुश, तिसरा हात वरद मुद्रेत तर चौथ्या हातात मोदक आहे. गणेशाच्या मस्तकी रत्नजडित सुवर्ण मुकुट मागच्या बाजूला प्रभावळ आहे. गणेशमूर्तीच्या पायाजवळ याच गणेशाची प्रतिकृती असलेली छोटी धातूची मूर्ती आहे. अभिषेक इतर पूजाविधीसाठी या मूर्तीचा वापर केला जातो

२०२१ मध्ये झालेल्या मंदिराच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त या गणेशासाठी सुवर्णजडित सिंहासन बनवण्यात आले. या सागवानी सिंहासनाला ४० किलो चांदी आणि दीड किलो सोन्याने मढविलेले आहे. गर्भगृहाच्या समोरील बाजूला सभामंडपाच्याही पुढे असलेल्या सांस्कृतिक व्यासपीठावर अष्टविनायकांच्या प्रतिकृती आहेत

येथे दररोज मूर्तीला अभिषेक केला जातो. तसेच सकाळी सायंकाळी आरती होते. मंगळवारी, संकष्टी चतुर्थी तसेच विनायक चतुर्थीला येथे भाविकांची मोठी असते. संकष्टी चतुर्थी, विनायकी चतुर्थीला येथे सहस्त्रावर्तने होतात. येथे अक्षय पूजा, चिरंतन पूजा, गणेश याग, गणेश जयंती, अधिक मास, कीर्तन सप्ताह, गजानन विजय पारायण वरद व्याख्यानमाला असे धार्मिक उपक्रम केले जातात. सामाजिक उपक्रमांमध्ये आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, योगासन वर्ग, गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दत्तक योजना, अन्नछत्र, गणेशोत्सवादरम्यान महिलांसाठी रांगोळी, गायन, मोदक बनवणे सामान्य ज्ञान स्पर्धा यांचा समावेश असतो. दररोज सकाळी .३० ते दुपारी सायंकाळी ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरातील वरद गणेशाचे दर्शन घेता येते.

वरद गणेशाच्या साक्षीने सात फेरे घेतल्यास उभयतांना आयुष्यभर सुखसमृद्धीचा लाभ होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे मंदिराच्या कार्यालयात विवाह करण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. त्यामुळे दीड ते दोन वर्षे आधी नोंदणी केल्यावर विवाहासाठी कार्यालयाची तारीख मिळते. वरद गणेश मंदिर विश्वस्त मंडळातर्फे येथे वधूवर सूचक मंडळ चालवण्यात येते. वर्षातून दोन ते तीन वेळा वधूवर मेळावेही होतात

वरद गणेश मंदिराच्या मागच्या बाजूला श्रीराम मंदिर उभारण्यात आले आहे. या दोन्ही मंदिरांना जोडण्यासाठी वरद गणेश मंदिराच्या सभामंडपापासून रामसेतू बांधण्यात आला आहे. या सेतूची लांबी २५ फूट, रुंदी १० फूट जमिनीपासूनची उंची २० फूट इतकी आहे.

उपयुक्त माहिती

  • शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी समर्थनगर येथे मंदिर
  • मध्यवर्ती बसस्थानकापासून पायी १० मिनिटांच्या अंतरावर
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • राज्याच्या अनेक जिल्ह्यांतून छत्रपती संभाजीनगरसाठी एसटीची सेवा
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८२७५५ ८३११२
  • वेबसाईट : www.varadganeshmandir.in
  • ईमेल : shrivaradganeshsabha@gmail.com
Back To Home