
वाई तालुक्यात बगाडाच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आसलेले बावधन हे गाव ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनदृष्ट्या विशेष महत्त्वाचे मानले जाते. साताऱ्याच्या छत्रपती घराण्यातील राजाराम भोसले यांच्या जहागिरीचे हे गाव होते. येथील सोनजाई डोंगरावर असलेले सोनजाई देवीचे मंदिर व त्याच्या पायथ्याशी असलेले काळभैरवनाथांचे मंदिर ही दोन्ही मंदिरे येथील भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. याशिवाय बावधन हे गाव येथील काळुबाई मंदिर, बौद्ध लेणी व भीमाचे खोरे यांसाठी प्रसिद्ध आहे. भाविक भक्तांसोबतच येथे पर्यटकही मोठ्या संख्येने येतात.
वाईच्या दक्षिणेकडे सह्याद्री पर्वत रांगेत असलेले बावधन हे शहरवजा गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रसिद्ध आहे. पूर्वी या संपूर्ण गावाभोवती तटबंदी होती; परंतु आता शहरीकरण झाल्यामुळे तटबंदी नाहीशी झाली असली तरी आजही त्या तटबंदीचे दोन दरवाजे अस्तित्वात आहेत. बावधन गावाला लागून असलेल्या सोनजाई डोंगराच्या पायथ्याशी काळभैरवनाथांचे प्राचीन मंदिर आहे.
तेथून काही अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र सोनजाई–काळुबाई देवस्थानाच्या कमानीपासून सोनजाई मंदिराकडे जाण्यासाठी तीव्र चढाव आणि नागमोडी वळणाचा घाट मार्ग आहे. दुचाकी अथवा लहान मोटारी या मार्गाने आणखी एक किमी अंतरापर्यंत पुढे जाऊ शकतात. त्यापुढे मात्र वाहनांना बंदी असून तेथून सुमारे दीड किमी अंतर पायी जावे लागते.
येथून काही अंतर पुढे गेल्यावर एक दगडात कोरलेली गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. त्यापुढे लागणाऱ्या मोठ्या तलावाजवळ सोनजाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगरावर समोरासमोर एका डोंगरावर सोनजाई देवीचे, तर त्याच उंचीवर समोर असलेल्या दुसऱ्या डोंगरावर मांढरगडावरील काळूबाई देवीचे मंदिर आहे. सोनजाई देवीचे मंदिर हे समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंचीवर आहे. डोंगरकड्यावर आल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारातून १० ते १२ पायऱ्या उतरून मंदिरात प्रवेश होतो. मुख्य मंदिराच्या केवळ गर्भगृहावर कळस असून मंदिराचा इतर भाग हा कौलारू आहे. गर्भगृहात सोनजाई मातेची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या संपूर्ण मूर्तीला चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. त्यावर विविध अलंकार व साडी परिधान केली जात असल्याने मूर्तीचे सौंदर्य खुलून दिसते.
मंदिराच्या गर्भगृहाच्या शेजारीच एक लहानसे कुंड आहे. या कुंडात बाराही महिने पाणी असते. ते पाणी येथे पिण्यासाठी वापरले जाते. याशिवाय येथे भाविकांना निवासासाठी व पूजाविधी करण्यासाठी ओवऱ्या, होम हवन करण्यासाठी अनेक हवनकुंड असलेले मंडप आदी सुविधा आहेत. सोनजाई मंदिराचा परिसर हा साधारणतः वीस एकर आहे.
फार वर्षांपूर्वीपासून सोनजाई देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. यावेळी अनेक धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येते. या नऊ दिवसांत दररोज पहाटे चार वाजता काकडा आरती, पाच वाजता पूजा आरती, सकाळी ६ ते ९ पर्यंत सप्तशती पठण व हवन, सकाळी १० ते १२.३० पर्यंत भागवत कथा, दुपारी १२.३० ते ४ पर्यंत भोजन व विश्रांती, दुपारी ४ ते ६ कीर्तन व संध्या आरती, रात्री ९ ते १० वाजता देवीचा जागर करण्यात येतो. या कालावधीत येथे येणाऱ्या हजारो भाविकांना मंदिर समितीतर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.
सोनजाई माता मंदिरापासून १०० मीटर अंतरावर काळूबाई मातेचे मंदिर आहे.
काळूबाई मंदिराच्या मागील बाजूस मोठे पठार (Table Land) आहे. या संपूर्ण परिसरावर निसर्गाची मुक्तहस्ते उधळण दिसते. येथून वाई तालुक्याचा काही भाग, पांडवगड व केंजळगड हे किल्ले, नागेवाडी व धोम धरण, मांढर देवीचा डोंगर हा सर्व परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. या पठाराला लागून प्रसिद्ध भीमाचे खोरे आहे. भीमाच्या खोऱ्याची आख्यायिका अशी की कृष्णा नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलून बावधनवरून पुढे जावी यासाठी ती नदी दक्षिण वाहिनी करण्याचा भीमाने निश्चय केला होता. मात्र, हे काम कोंबडा आरवायच्या आत पूर्ण झाले पाहिजे, अशी अट काळूबाई देवीने भीमाला घातली होती. त्यानुसार भीमाने एकच खोरे मारले आणि कोंबडा आरवला. त्यामुळे भीमाचा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही. ज्या ठिकाणी भीमाने खोरे मारले असे सांगितले जाते तेथे मोठी दरी तयार झालेली आहे.
सोनजाई डोंगराच्या पायथ्यापासून काहीसे उंचावर असलेल्या काळभैरवनाथाचे मंदिर हे प्राचीन असून या मंदिरापर्यंत जाण्यासाठी जुना दगडी पायरी मार्ग आहे. या मंदिराची समुद्र सपाटीपासून उंची साधारणतः २४९० फूट तर पायथ्यापासून सुमारे २४६ फूट आहे. हे मंदिर डोंगराच्या कपारीत आहे.
या गावात भैरवनाथाचे प्राचीन मंदिर आहे. त्याचे बांधकाम दगडाचे असून शिखर विटांचे आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथांची मुख्य मूर्ती व त्या सोबतच हनुमानाची मूर्ती, शिवपिंडी आहे.
काळभैरवनाथ मंदिराची आख्यायिका अशी की येथील ठोंबरे नावाचा एक धनगर समाजातील भाविक, भैरवनाथांचे दर्शन घेण्यासाठी दररोज सोनई येथे जात असे. वृद्धत्वामुळे आता दररोजचा प्रवास झेपेनासा झाला.
त्यामुळे भैरवनाथांनी स्वप्नदृष्टांत देऊन मीच तुझ्यासोबत तुझ्या गावी येईन, असे सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी त्या भाविकासोबत भैरवनाथ या सोनजाई डोंगरापर्यंत आले आणि तेथे ते गुप्त झाले. ते ज्या ठिकाणी गुप्त झाले, त्या ठिकाणी आजचे हे मंदिर आहे. भैरवनाथाची यात्रा फाल्गुन कृष्ण पंचमीला असते. ती बगाड यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे.
या यात्रेत गाड्यावर एक बगाड ठेवून त्याची मिरवणूक काढली जाते. येथील बगाड पाहण्यासाठी व भैरवनाथांच्या दर्शनासाठी यावेळी हजारो भाविक येथे उपस्थित असतात.

वाई तहसील का बावधन ग्राम बगाड मेले के लिए प्रसिद्ध है। यह एक विशेष मेला है। इसमें बैलों की छह जोड़ियों की सहायता से लकड़ी का भारी रथ खींचा जाता है। जिनकी मनोकामना पूर्ण हुई है, वे इस लकड़ी पर लटकते हैं। यह ग्राम ऐतिहासिक, धार्मिक और पर्यटन की दृष्टि से प्रमुख महत्त्व रखता है। सतारा के छत्रपति घराने के राजाराम भोंसले की यह जागीर रही है। ग्राम के सोनजाई पर्वत पर स्थित सोनजाई देवी का मंदिर और उसकी तलहटी में स्थित कालभैरवनाथ का मंदिर श्रद्धालुओं के श्रद्धास्थल हैं। इसके अतिरिक्त बावधन ग्राम अपने कालूबाई मंदिर, बौद्ध गुफाओं और भीम की घाटी के लिए भी प्रसिद्ध है। श्रद्धालुओं के साथ-साथ यहाँ बड़ी संख्या में पर्यटक भी आते हैं।
वाई के दक्षिण में सह्याद्री पर्वत श्रेणियों में स्थित बावधन एक नगर जैसा ग्राम है। यह छत्रपति शिवाजी महाराज के काल से प्रसिद्ध रहा है। पहले यह पूरा ग्राम प्राचीर से सुरक्षित था। अब शहरीकरण के कारण वह नष्ट हो चुकी है। फिर भी प्राचीर के दो द्वार आज भी अस्तित्व में हैं।
बावधन ग्राम से सटे सोनजाई पर्वत की तलहटी में कालभैरवनाथ का प्राचीन मंदिर स्थित है। वहीं से कुछ दूरी पर श्री क्षेत्र सोनजाई-कालूबाई देवस्थान के प्रवेश-द्वार से सोनजाई मंदिर तक जाने के लिए तीव्र चढ़ाई वाला घुमावदार मार्ग है। दोपहिया वाहन या छोटी मोटर गाड़ियाँ इस मार्ग से लगभग एक किलोमीटर तक जा सकती हैं। इसके आगे वाहनों का प्रवेश वर्जित है। वहाँ से लगभग डेढ़ किलोमीटर की दूरी पैदल तय करनी पड़ती है।
थोड़ा आगे बढ़ने पर एक ही पाषाण में तराशी गई गणपति की मूर्ति दिखाई देती है। उसके आगे बड़े तालाब के समीप सोनजाई देवी का प्राचीन मंदिर है। सह्याद्री की ऊँची पहाड़ियों में एक शिखर पर सोनजाई देवी का मंदिर और ठीक उसी ऊँचाई पर दूसरी पहाड़ी पर मांढरगढ़ का कालूबाई देवी मंदिर स्थित है। सोनजाई देवी का मंदिर समुद्र तल से लगभग 3000 पद की ऊँचाई पर है। पहाड़ी की चोटी पर पहुँचने के बाद मुख्य प्रवेशद्वार से 10–12 सीढ़ियाँ उतरकर मंदिर में प्रवेश होता है। मुख्य मंदिर में केवल गर्भगृह पर शिखर है। अन्य भाग खपरैल का बना है। गर्भगृह में सोनजाई माता की मूर्ति प्रतिष्ठित है। संपूर्ण मूर्ति पर चांदी की परत है। उन्हें विभिन्न आभूषण और साड़ी पहनाई जाती है। इससे मूर्ति का सौंदर्य और निखर उठता है।
मंदिर के गर्भगृह के समीप ही एक छोटा सा कुंड है। इसमें निरंतर जल रहता है। यही जल यहाँ पीने के लिए उपयोग में लाया जाता है। इसके अतिरिक्त श्रद्धालुओं के ठहरने के लिए भक्तनिवास और पूजाविधि के लिए चबूतरे उपलब्ध हैं। हवन करने के लिए अनेक हवनकुंडयुक्त मंडप आदि सुविधाएँ उपलब्ध हैं। सोनजाई मंदिर परिसर लगभग बीस एकड़ में विस्तृत है।
प्राचीन काल से सोनजाई देवी का नवरात्रोत्सव बड़े उत्साह से मनाया जाता है। इस अवधि में अनेक धार्मिक विधियों का आयोजन किया जाता है। नौ दिनों के इस उत्सव में प्रतिदिन का कार्यक्रम इस प्रकार है: प्रातः चार बजे काकड़ा आरती, पाँच बजे पूजा आरती, प्रातः छह से नौ बजे तक सप्तशती पाठ एवं हवन, प्रातः दस से दोपहर साढ़े बारह बजे तक भागवत कथा, दोपहर साढ़े बारह से चार बजे तक भोजन एवं विश्राम, दोपहर चार से छह बजे तक कीर्तन एवं सायंकाल की आरती तथा रात्रि नौ से दस बजे तक देवी का जागरण किया जाता है। इस अवधि में आने वाले हजारों श्रद्धालुओं को मंदिर समिति की ओर से महाप्रसाद वितरित किया जाता है।
सोनजाई माता मंदिर से लगभग 100 मीटर की दूरी पर कालूबाई माता का मंदिर है। इस मंदिर के पीछे एक विशाल पठार है। इस संपूर्ण क्षेत्र में प्रकृति द्वारा बिखेरी गई मनोहर छटा देखने को मिलती है। यहाँ से वाई तहसील का कुछ भाग, पांडवगढ़ और केंजलगढ़ दुर्ग, नागेवाड़ी, धोम बाँध और मांढरदेवी पर्वत का संपूर्ण दृश्य दिखाई देता है। इस पठार के निकट ही प्रसिद्ध ‘भीम की घाटी’ स्थित है। इसकी कथा यह है कि कृष्णा नदी के प्राकृतिक प्रवाह को बदलकर बावधन की ओर ले जाने के लिए भीम ने उसे दक्षिणगामी करने का निश्चय किया था। किंतु कालूबाई देवी ने शर्त रखी कि यह कार्य मुर्गे की बाँग से पूर्व पूर्ण होना चाहिए। भीम ने एक ही प्रहार में घाटी काटना आरंभ किया। तभी मुर्गे ने बाँग दे दी। इस कारण भीम का संकल्प अधूरा रह गया। जिस स्थान पर भीम ने प्रहार किया था, वहाँ आज यह गहरी घाटी स्थित है।
सोनजाई पर्वत की तलहटी से कुछ ऊपर स्थित कालभैरवनाथ का मंदिर अत्यंत प्राचीन है। इस मंदिर तक पहुँचने के लिए पत्थर की प्राचीन सीढ़ियों का मार्ग है। यह मंदिर समुद्र तल से लगभग 2490 पद की ऊँचाई पर तथा तलहटी से लगभग 246 पद ऊपर स्थित है। यह मंदिर पहाड़ी की कंदरा में स्थित है।
ग्राम में स्थित कालभैरवनाथ का यह प्राचीन मंदिर पाषाण निर्मित है। इसका शिखर ईंटों से बना है। गर्भगृह में कालभैरवनाथ की मुख्य मूर्ति के साथ हनुमान जी की मूर्ति और शिवलिंग भी प्रतिष्ठित हैं।
इस मंदिर की कथा के अनुसार यहाँ के ठोंबरे नामक धनगर समाज के एक भक्त प्रतिदिन भैरवनाथ के दर्शन के लिए सोनई जाया करते थे। वृद्धावस्था में यह यात्रा कठिन हो गई।
तब भैरवनाथ ने उन्हें स्वप्न में दर्शन देकर कहा, “मैं स्वयं तुम्हारे साथ तुम्हारे ग्राम आऊँगा।”
अगले दिन वे भक्त के साथ सोनजाई पर्वत तक आए और वहीं अदृश्य हो गए। जिस स्थान पर वे अदृश्य हुए, वहाँ आज यह मंदिर स्थित है।भैरवनाथ का मेला फाल्गुन कृष्ण पंचमी को आयोजित होता है।
इसे ‘बगाड मेला’ कहा जाता है। इस मेले में रथ पर एक बगाड रखकर शोभायात्रा निकाली जाती है। इस अवसर पर भैरवनाथ के दर्शन और बगाड देखने के लिए हजारों श्रद्धालु यहाँ एकत्रित होते हैं।