सोमेश्वर मंदिर / रामलिंग मंदिर
गुरसाळे, ता. खटाव, जि. सातारा
खटाव तालुक्यातील भूषणगडापासून जवळ असलेले गुरसाळे हे येथे असणाऱ्या पाच ज्योतिर्लिंगांमुळे प्रसिद्ध आहे. सोमेश्वर, गुप्तलिंग, रामलिंग, भावलिंग व शिवलिंग अशी त्यांची नावे आहेत. यापैकी सोमेश्वर व रामलिंग ही मंदिरे वैशिष्ट्यपूर्ण व मोठी असून इतर मंदिरे लहान आहेत. याशिवाय या मंदिरांच्या परिसरात पन्नासहून अधिक विरगळी व या मंदिरांवर शेकडो शिल्पे आहेत. या मंदिरांची रचना, स्थापत्यकला, काही जुन्या बांधकामांचे अवशेष यांच्या अभ्यासावरून या गावाला चालुक्य आणि शिलाहार काळापासूनचा इतिहास असल्याचे सांगितले जाते.
या परिसरातील पाच ठिकाणांपैकी मुख्य ठिकाण आहे हेमाडपंती रचनेचे सोमेश्वराचे मंदिर. एक मीटर उंच चौथऱ्यावर असलेल्या या प्राचीन मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार झालेला आहे. त्यामुळे त्याच्या मूळ वास्तूमध्ये काहीसा फरक पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. या मंदिराला दोन सभामंडप आहेत. त्यापैकी बाहेरील सभामंडप नंतर बांधल्याचे जाणवते. सभामंडपाच्या दर्शनी बाजूस संत तुकाराम महाराज व समर्थ रामदास स्वामी यांचे पुतळे आहेत. या सभामंडपात एक दगडी नंदी असून त्याला पितळी पत्र्याने मढविले आहे. येथील दुसरा सभामंडप भरीव दगडातील असून त्याची रचना अर्धगोलाकार आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर कोरीवकाम आहे. गर्भगृहातील शिवपिंडी मोठी व वैशिष्ट्यपूर्ण असून तिची उंची एक मीटर इतकी आहे. शिवपिंडीच्या मागील बाजूस महादेवाची पितळेची मूर्ती आहे. येथील अर्धगोलाकार सभामंडपाखाली एक भुयार असून त्याच्या लहान छिद्रातून भुयारात असलेली शिवपिंडी दिसते, त्याला गुप्तलिंग असे म्हणतात. सोमेश्वर मंदिराखाली असणाऱ्या या गुप्तलिंगाची सोमेश्वराबरोबरच रोज पूजा केली जाते. गावातील पाचपैकी सोमेश्वर मंदिरात दोन ज्योतिर्लिंग आहेत.
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी सोमेश्वराची मोठी यात्रा भरते. सोमेश्वराची मूर्ती मंदिराच्या आवारात पालखीत ठेवली जाते. तिची विधिवत पूजा केली जाते. संध्याकाळी मंदिरात खिरीचा प्रसाद बनवला जातो.
संपूर्ण गावात प्रसाद वाटला जातो. त्यानंतर गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात येते. दुसरा सोहळा महाशिवरात्रीच्या आधी षष्ठीपासून सुरू होतो. ज्या भाविकांनी नवस केले आहेत, त्याच्याकडून देवाला शेले, पागोटे व पगड्या अर्पण केल्या जातात. माघ अमावस्येच्या तिसऱ्या दिवशी सोमेश्वराचा रथोत्सव असतो. यावेळी सोमेश्वराची पंचधातूची मूर्ती १६ खांबी रथात ठेवली जाते व सोमेश्वराची मोठी मिरवणूक निघते.
गावातील दुसरे महत्त्वाचे मंदिर आहे रामेश्वराचे. हे मंदिर गावाच्या एका बाजूला असून साधारणतः ते १३व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. मंदिरासमोर चौकोनी आकाराची एक विहीर असून तिची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या समोरील बाजूस असलेल्या प्रवेशद्वारातून विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. यातील आठ ते दहा पायऱ्यांवर विहिरीच्या
चारही बाजूला फिरता येईल असा कठडा आहे. या कठड्याच्या वरील बाजूच्या भिंतीवर बारा कोनाडे असून त्यांभोवती कोरीव काम केलेले आहे. या कोनाड्यांत आज मूर्ती नसल्या तरी त्यापैकी एका कोनाड्यात असलेली भैरवाची मूर्ती आजही चांगल्या अवस्थेत आहे.
रामेश्वर मंदिरावर अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे व नक्षीकाम आहे. सभामंडपाच्या बाहेरच्या बाजूला अनेक मैथुन शिल्पे आहेत. सभामंडपाच्या आतील खांबांवर कोरीव नक्षीकाम केलेले दिसते. या सभामंडपाच्या उजव्या बाजूला शेषशाही विष्णूची सुंदर मूर्ती आहे. यामध्ये विष्णूला चार हात असून पायाजवळ गरुड व नाभीतून निघालेल्या कमळात ब्रह्मदेव विराजमान आहेत. गाभाऱ्यामध्ये एक शिवलिंग आहे. गावातील पाच स्थानांपैकी रामेश्वराचे हे तिसरे महत्त्वाचे स्थान आहे.
चौथे महत्त्वाचे ठिकाण आहे भावलिंग. गावाजवळील एका टेकडीवर हे स्थान आहे. येथे शंकराची अंदाजे सात मीटर उंचीची मूर्ती आहे. गळ्यात रुद्राक्षांची माळ, उजव्या हातात त्रिशूळ व डावा हात आशीर्वाद मुद्रेत ती आहे. मूर्तीच्या पायाजवळ लहानसे मंदिर आहे. दुरूनही हे ठिकाण नजरेस पडते. या मंदिराच्या गाभाऱ्यात एक मोठा दगड आहे. या दगडाबद्दल आख्यायिका अशी की अनेक वर्षांपूर्वी गाईच्या खुरामध्ये अडकलेला एक दगड या ठिकाणी तिच्या पायामधून पडला. त्यानंतर त्या दगडाचा आकार वाढू लागला. त्या दगडाची वाढ थांबविण्यासाठी येथील शंकराची मूर्तीची त्यावर स्थापना करण्यात आली. त्यामुळे तो दगड उंचीने वाढणे थांबले; परंतु आडवा वाढू लागला.
येथील पाचवे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे या गावातील शिवलिंग मंदिर. हे मंदिर गावापासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या जागेवर आहे. या मंदिरात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवलीलामृताचे वाचन आणि महाशिवरात्रीच्या दिवशी पारायणे होतात. पूर्वापार प्रथेनुसार श्रावणातील चौथ्या सोमवारी सोमेश्वराची पालखी या मंदिरापर्यंत येते. येथील शिवलिंगाला अभिषेक करण्यात येतो. खिरीच्या प्रसादाचा भाविकांना भंडारा देण्यात येतो. मग ही पालखी सोमेश्वर मंदिराकडे परत जाते.
उपयुक्त माहिती:
- खटावपासून २२ किमी, तर साताऱ्यापासून ५२ किमी अंतरावर
- खटावपासून गुरसाळे येथे येण्यासाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Someshwar Temple / Ramling Temple
Gursale, Taluka Khatav, District Satara
Gursale, located near Bhushangad in Khatav Taluka, is famous for the five Jyotirlingas situated here. Their names are Someshwar, Guptaling, Ramling, Bhawaling, and Shivling. Among these, the Someshwar and Ramling temples are distinct and large, while the other temples are smaller. Furthermore, there are more than fifty hero stones (Virgals) in the vicinity of these temples, and hundreds of sculptures adorn them. Based on the study of the layout, architecture, and remnants of some ancient structures of these temples, it is said that this village has a history dating back to the Chalukya and Shilahar eras.
Among the five sites in this area, the main one is the Someshwara Temple, built in the Hemadpanti architectural style. This ancient temple, situated on a platform one meter high, has undergone several renovations. Consequently, villagers state that there have been some changes to its original structure. The temple features two assembly halls (sabhamandapas). It is evident that the outer assembly hall was constructed at a later period. On the front side of this assembly hall stand the statues of Saint Tukaram Maharaj and Samartha Ramdas Swami. In this hall, there is a stone Nandi covered with brass plating. The second assembly hall here is made of solid stone and has a hemispherical design. There is intricate carving on the door frame of the sanctum sanctorum (garbhagriha). The Shiva Linga inside the sanctum is large and unique, standing one meter in height. Behind the Shiva Linga is a brass idol of Lord Mahadeva. Beneath the hemispherical assembly hall, there is an underground chamber; through a small opening, the Shiva Linga located within the chamber is visible, which is known as Guptalinga. This Guptalinga, situated beneath the Someshwara Temple, is worshipped daily along with Lord Someshwara. Out of the five sites in the village, the Someshwara Temple houses two Jyotirlingas.
On the first Monday of the month of Shravan, a grand fair of Someshwar is held. The idol of Someshwar is placed in a palanquin within the temple premises. It is worshipped with due rituals. In the evening, Kheer Prasad is prepared in the temple.
Prasad is distributed throughout the village. Following this, a palanquin procession is taken out through the village. The second ceremony begins from Shashthi, before Mahashivratri. Devotees who have made vows offer shawls, turbans, and headgear to the deity. On the third day of Magh Amavasya, the Someshwar Rathotsav takes place. During this time, the Panchadhatu idol of Someshwar is placed in a sixteen-pillared chariot, and a grand procession of Someshwar is carried out.
The second important temple in the village is that of Rameshwar. This temple is situated on one side of the village and is said to date back to approximately the thirteenth century. In front of the temple, there is a square-shaped well with a unique architectural design. From the entrance located on the front side of the temple, there are steps to descend into the well. On eight to ten of these steps, the well’s
There is a railing around all four sides that allows for circumambulation. On the upper wall of this railing, there are twelve niches, which are surrounded by intricate carvings. Although there are no idols in these niches today, the idol of Bhairava, which was once in one of these niches, remains in good condition even now.
The Rameshwara Temple features numerous distinctive sculptures and intricate carvings. On the exterior of the assembly hall, there are various erotic sculptures. The pillars inside the assembly hall display beautifully carved designs. To the right of this assembly hall stands a magnificent idol of Sheshashayi Vishnu. In this depiction, Lord Vishnu has four arms, with Garuda near His feet and Lord Brahma seated on a lotus emerging from His navel. Inside the sanctum sanctorum, there is a Shiva Linga. Among the five significant sites in the village, this Rameshwara temple is the third most important.
The fourth significant site is Bhavling. This sacred place is situated on a hill near the village. Here stands an approximately seven-meter-tall idol of Lord Shiva. The deity is depicted wearing a garland of Rudraksha beads around the neck, holding a Trishula in the right hand, while the left hand is raised in a gesture of blessing. A small temple is located near the feet of the idol. This site is visible even from a distance. Inside the sanctum sanctorum of this temple, there is a large stone. Regarding this stone, there is a legend that many years ago, a stone stuck in a cow’s hoof fell at this spot. Subsequently, the stone began to grow in size. To halt the growth of the stone, the idol of Lord Shiva was installed upon it. As a result, the stone stopped growing in height, but it began to expand horizontally.
The fifth Jyotirlinga here is the Shivling temple located in this village. This temple is situated in an open space at some distance from the village. In this temple, the reading of Shivalilamrut takes place every Monday during the month of Shravan, and recitations are held on the day of Mahashivratri. According to long-standing tradition, the palanquin of Someshwar arrives at this temple on the fourth Monday of Shravan. An abhishek is performed on the Shivling here. A feast of Kheer prasad is served to the devotees. Then, this palanquin returns to the Someshwar temple.
Useful Information:
- At a distance of 22 km from Khatav and 52 km from Satara
- ST bus facility is available to reach Gursale from Khatav.
- Private vehicles can go directly up to the temple.
- Accommodation and breakfast facilities are not available in the vicinity.
सोमेश्वर मंदिर / रामलिंग मंदिर
गुरसाळे, ता. खटाव, जि. सातारा
खटाव तहसील के भूषणगढ़ के निकट स्थित गुरसाळे यहाँ मौजूद पाँच ज्योतिर्लिंगों के कारण प्रसिद्ध है। इनके नाम सोमेश्वर, गुप्तलिंग, रामलिंग, भावलिंग और शिवलिंग हैं। इनमें से सोमेश्वर और रामलिंग मंदिर विशिष्ट और विशाल हैं, जबकि अन्य मंदिर छोटे हैं। इसके अलावा, इन मंदिरों के परिसर में पचास से अधिक वीरगल (वीर-स्तंभ) और इन मंदिरों पर सैकड़ों शिल्प मौजूद हैं। इन मंदिरों की संरचना, स्थापत्य कला और कुछ पुराने निर्माणों के अवशेषों के अध्ययन से पता चलता है कि इस गाँव का इतिहास चालुक्य और शिलाहार काल से है।
इस परिसर के पाँच स्थानों में से मुख्य स्थान हेमाडपंती शैली का सोमेश्वर मंदिर है। एक मीटर ऊँचे चबूतरे पर स्थित इस प्राचीन मंदिर का कई बार जीर्णोद्धार हुआ है। इसलिए ग्रामीण बताते हैं कि इसके मूल स्वरूप में कुछ बदलाव आए हैं। इस मंदिर में दो सभामंडप हैं। इनमें से बाहरी सभामंडप बाद में बनाया गया प्रतीत होता है। सभामंडप के सामने संत तुकाराम महाराज और समर्थ रामदास स्वामी की प्रतिमाएँ हैं। इस सभामंडप में एक पत्थर का नंदी है, जिसे पीतल की परत से मढ़ा गया है। यहाँ का दूसरा सभामंडप ठोस पत्थरों से बना है और इसकी संरचना अर्धगोलाकार है। गर्भगृह के द्वार पर नक्काशी की गई है। गर्भगृह में स्थित शिवपिंडी बड़ी और विशिष्ट है, जिसकी ऊँचाई एक मीटर है। शिवपिंडी के पीछे महादेव की पीतल की मूर्ति है। यहाँ के अर्धगोलाकार सभामंडप के नीचे एक तहखाना है और उसके एक छोटे छिद्र से तहखाने में स्थित शिवपिंडी दिखाई देती है, जिसे गुप्तलिंग कहा जाता है। सोमेश्वर मंदिर के नीचे स्थित इस गुप्तलिंग की सोमेश्वर के साथ ही प्रतिदिन पूजा की जाती है। गाँव के पाँच स्थानों में से सोमेश्वर मंदिर में दो ज्योतिर्लिंग हैं।
श्रावण मास के पहले सोमवार को सोमेश्वर की बड़ी यात्रा निकलती है। सोमेश्वर की मूर्ति को मंदिर के प्रांगण में पालकी में रखा जाता है। उनकी विधिवत पूजा की जाती है। संध्याकाल में मंदिर में खीर का प्रसाद बनाया जाता है।
पूरे गाँव में प्रसाद वितरित किया जाता है। उसके बाद गाँव में पालकी का जुलूस निकाला जाता है। दूसरा उत्सव महाशिवरात्रि से पहले षष्ठी से शुरू होता है। जिन भक्तों ने मन्नतें मांगी हैं, वे भगवान को शॉल, पागड़ी और साफ़े अर्पित करते हैं। माघ अमावस्या के तीसरे दिन सोमेश्वर का रथोत्सव होता है। इस समय सोमेश्वर की पंचधातु की मूर्ति को १६ खंभों वाले रथ में रखा जाता है और सोमेश्वर की भव्य शोभायात्रा निकलती है।
गाँव का दूसरा महत्वपूर्ण मंदिर रामेश्वर का है। यह मंदिर गाँव के एक छोर पर है और बताया जाता है कि यह लगभग १३वीं शताब्दी का है। मंदिर के सामने चौकोर आकार का एक कुआँ है और इसकी संरचना विशिष्ट है। मंदिर के सामने के प्रवेश द्वार से कुएँ में उतरने के लिए सीढ़ियाँ हैं। इनमें से आठ से दस सीढ़ियों पर कुएँ के
चारों ओर घूमने के लिए एक कठघरा है। इस कठघरे के ऊपरी हिस्से की दीवार पर बारह कोष्ठक (आले) हैं और उनके चारों ओर नक्काशी की गई है। यद्यपि इन कोष्ठकों में अब मूर्तियाँ नहीं हैं, फिर भी उनमें से एक कोष्ठक में स्थित भैरव की मूर्ति आज भी अच्छी स्थिति में है।
रामेश्वर मंदिर पर कई विशिष्ट शिल्प और नक्काशी है। सभामंडप के बाहरी हिस्से में कई मैथुन शिल्प हैं। सभामंडप के अंदरूनी खंभों पर नक्काशीदार काम दिखाई देता है। इस सभामंडप के दाईं ओर शेषशायी विष्णु की सुंदर मूर्ति है। इसमें विष्णु के चार हाथ हैं, पैरों के पास गरुड़ हैं और नाभि से निकले कमल में ब्रह्माजी विराजमान हैं। गर्भगृह में एक शिवलिंग है। गाँव के पाँच स्थानों में से रामेश्वर का यह तीसरा महत्वपूर्ण स्थान है।
चौथा महत्वपूर्ण स्थान भावलिंग है। गाँव के पास एक पहाड़ी पर यह स्थान स्थित है। यहाँ शंकर की लगभग सात मीटर ऊँची मूर्ति है। गले में रुद्राक्ष की माला, दाहिने हाथ में त्रिशूल और बायाँ हाथ आशीर्वाद मुद्रा में है। मूर्ति के पैरों के पास एक छोटा सा मंदिर है। दूर से भी यह स्थान दिखाई देता है। इस मंदिर के गर्भगृह में एक बड़ा पत्थर है। इस पत्थर के बारे में किंवदंती है कि कई साल पहले गाय के खुर में फँसा एक पत्थर यहाँ उसके पैरों से गिर गया था। उसके बाद उस पत्थर का आकार बढ़ने लगा। उस पत्थर की वृद्धि को रोकने के लिए यहाँ शंकर की मूर्ति की स्थापना की गई। इससे उस पत्थर की ऊँचाई में बढ़ना तो रुक गया, लेकिन वह चौड़ाई में बढ़ने लगा।
यहाँ का पाँचवाँ ज्योतिर्लिंग इस गाँव का शिवलिंग मंदिर है। यह मंदिर गाँव से कुछ दूरी पर एक खुले मैदान में है। इस मंदिर में श्रावण के प्रत्येक सोमवार को शिवलीलामृत का पाठ और महाशिवरात्रि के दिन पारायण होते हैं। पुरानी परंपरा के अनुसार, श्रावण के चौथे सोमवार को सोमेश्वर की पालकी इस मंदिर तक आती है। यहाँ के शिवलिंग का अभिषेक किया जाता है। खीर के प्रसाद का भक्तों के लिए भंडारा आयोजित किया जाता है। फिर यह पालकी सोमेश्वर मंदिर की ओर लौट जाती है।
उपयोगी जानकारी:
- खटाव से २२ किमी, जबकि सातारा से ५२ किमी की दूरी पर
- खटाव से गुरसाळे आने के लिए एसटी बस की सुविधा
- निजी वाहन सीधे मंदिर तक जा सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा नहीं है
સોમેશ્વર મંદિર / રામલિંગ મંદિર
ગુરસાળે, તા. ખટાવ, જિ. સાતારા
ખટાઉ તાલુકામાં ભૂષણગઢની નજીક આવેલું ગુરસાળે ગામ ત્યાં આવેલા પાંચ જ્યોતિર્લિંગોને કારણે પ્રસિદ્ધ છે. સોમેશ્વર, ગુપ્તલિંગ, રામલિંગ, ભાવલિંગ અને શિવલિંગ એવા તેમના નામ છે. આ પૈકી સોમેશ્વર અને રામલિંગનાં મંદિરો વિશિષ્ટ અને મોટાં છે, જ્યારે અન્ય મંદિરો નાનાં છે. આ ઉપરાંત, આ મંદિરોના પરિસરમાં પચાસથી વધુ વીરગળો અને આ મંદિરો પર સેંકડો શિલ્પો આવેલાં છે. આ મંદિરોની રચના, સ્થાપત્યકલા અને કેટલાક જૂના બાંધકામોના અવશેષોના અભ્યાસ પરથી એવું કહેવાય છે કે આ ગામનો ઇતિહાસ ચાલુક્ય અને શિલાહાર કાળથી છે.
આ વિસ્તારના પાંચ સ્થળો પૈકી મુખ્ય સ્થળ હેમાડપંથી રચનાનું સોમેશ્વરનું મંદિર છે. એક મીટર ઊંચા ઓટલા પર આવેલા આ પ્રાચીન મંદિરનો અનેકવાર જીર્ણોદ્ધાર થયેલો છે. તેથી તેના મૂળ સ્થાપત્યમાં કંઈક ફેરફાર થયાનું ગ્રામજનો જણાવે છે. આ મંદિરને બે સભામંડપ છે. જેમાંથી બહારનો સભામંડપ પાછળથી બાંધવામાં આવ્યો હોય તેમ જણાય છે. સભામંડપના અગ્રભાગે સંત તુકારામ મહારાજ અને સમર્થ રામદાસ સ્વામીની પ્રતિમાઓ છે. આ સભામંડપમાં એક પથ્થરનો નંદી છે અને તેને પિત્તળના પતરાથી મઢવામાં આવ્યો છે. અહીંનો બીજો સભામંડપ નક્કર પથ્થરનો છે અને તેની રચના અર્ધગોળાકાર છે. ગર્ભગૃહના દ્વારપટ પર કોતરણીકામ છે. ગર્ભગૃહમાં રહેલી શિવપિંડી મોટી અને વિશિષ્ટ છે અને તેની ઊંચાઈ એક મીટર જેટલી છે. શિવપિંડીની પાછળના ભાગે મહાદેવની પિત્તળની મૂર્તિ છે. અહીંના અર્ધગોળાકાર સભામંડપની નીચે એક ભોંયરું છે અને તેના નાના છિદ્રમાંથી ભોંયરામાં રહેલી શિવપિંડી દેખાય છે, તેને ગુપ્તલિંગ કહેવામાં આવે છે. સોમેશ્વર મંદિરની નીચે રહેલા આ ગુપ્તલિંગની સોમેશ્વરની સાથે જ દરરોજ પૂજા કરવામાં આવે છે. ગામના પાંચ પૈકી સોમેશ્વર મંદિરમાં બે જ્યોતિર્લિંગ છે.
શ્રાવણ મહિનાના પ્રથમ સોમવારે સોમેશ્વરની ભવ્ય યાત્રા ભરાય છે. સોમેશ્વરની મૂર્તિને મંદિરના પરિસરમાં પાલખીમાં બિરાજમાન કરવામાં આવે છે. તેમની વિધિવત પૂજા કરવામાં આવે છે. સાંજે મંદિરમાં ખીરનો પ્રસાદ બનાવવામાં આવે છે.
સમગ્ર ગામમાં પ્રસાદ વહેંચવામાં આવે છે. ત્યારબાદ ગામમાંથી પાલખીની શોભાયાત્રા કાઢવામાં આવે છે. બીજો ઉત્સવ મહાશિવરાત્રીના પહેલાં ષષ્ઠીથી શરૂ થાય છે. જે ભાવિકોએ માનતા માની હોય, તેમના દ્વારા દેવને શાલ, પાઘડી અને સાફા અર્પણ કરવામાં આવે છે. માઘ અમાસના ત્રીજા દિવસે સોમેશ્વરનો રથોત્સવ હોય છે. આ સમયે સોમેશ્વરની પંચધાતુની મૂર્તિ ૧૬ થાંભલાવાળા રથમાં રાખવામાં આવે છે અને સોમેશ્વરની ભવ્ય શોભાયાત્રા નીકળે છે.
ગામનું બીજું મહત્વનું મંદિર રામેશ્વરનું છે. આ મંદિર ગામની એક બાજુએ આવેલું છે અને તે આશરે ૧૩મી સદીનું હોવાનું માનવામાં આવે છે. મંદિરની સામે ચોરસ આકારની એક વાવ છે અને તેની રચના વિશિષ્ટ છે. મંદિરની સામેની બાજુએ આવેલા પ્રવેશદ્વારમાંથી વાવમાં ઉતરવા માટે પગથિયાં છે. આમાંના આઠ થી દસ પગથિયાં પર વાવના
ચારેય બાજુ ફરી શકાય તેવો કઠેડો છે. આ કઠેડાની ઉપરની બાજુની દીવાલ પર બાર કોતરણીવાળા ખાંચા છે અને તેની આસપાસ નકશીકામ કરેલું છે. આ ખાંચાઓમાં અત્યારે મૂર્તિઓ ન હોવા છતાં, તેમાંથી એક ખાંચામાં રહેલી ભૈરવની મૂર્તિ આજે પણ સારી સ્થિતિમાં છે.
રામેશ્વર મંદિર પર અનેક વિશિષ્ટ શિલ્પો અને નકશીકામ છે. સભામંડપની બહારની બાજુએ અનેક મૈથુન શિલ્પો છે. સભામંડપના અંદરના સ્તંભો પર કોતરણી કરેલું નકશીકામ જોવા મળે છે. આ સભામંડપની જમણી બાજુએ શેષશાયી વિષ્ણુની સુંદર મૂર્તિ છે. જેમાં વિષ્ણુને ચાર હાથ છે અને પગ પાસે ગરુડ તથા નાભિમાંથી નીકળેલા કમળમાં બ્રહ્મદેવ બિરાજમાન છે. ગર્ભગૃહમાં એક શિવલિંગ છે. ગામના પાંચ સ્થાનો પૈકી રામેશ્વરનું આ ત્રીજું મહત્વનું સ્થાન છે.
ચોથું મહત્વનું સ્થળ ભાવલિંગ છે. ગામની નજીક એક ટેકરી પર આ સ્થાન આવેલું છે. અહીં શંકર ભગવાનની આશરે ૭ મીટર ઊંચી મૂર્તિ છે. ગળામાં રુદ્રાક્ષની માળા, જમણા હાથમાં ત્રિશૂળ અને ડાબો હાથ આશીર્વાદની મુદ્રામાં છે. મૂર્તિના પગ પાસે એક નાનું મંદિર છે. દૂરથી પણ આ સ્થળ નજરે પડે છે. આ મંદિરના ગર્ભગૃહમાં એક મોટો પથ્થર છે. આ પથ્થર વિશે એવી દંતકથા છે કે ઘણા વર્ષો પહેલા ગાયના ખરીમાં ફસાયેલો એક પથ્થર આ જગ્યાએ તેના પગમાંથી પડ્યો હતો. ત્યારબાદ તે પથ્થરનું કદ વધવા લાગ્યું. તે પથ્થરની વૃદ્ધિ અટકાવવા માટે અહીં શંકર ભગવાનની મૂર્તિની સ્થાપના કરવામાં આવી. તેના કારણે તે પથ્થરનું ઊંચાઈમાં વધવાનું બંધ થયું; પરંતુ તે આડો વધવા લાગ્યો.
અહીં પાંચમું જ્યોતિર્લિંગ છે, જે આ ગામનું શિવલિંગ મંદિર છે. આ મંદિર ગામથી થોડે દૂર આવેલી ખુલ્લી જગ્યામાં સ્થિત છે. આ મંદિરમાં શ્રાવણ મહિનાના દરેક સોમવારે શિવલીલામૃતનું પઠન અને મહાશિવરાત્રિના દિવસે પારાયણ થાય છે. પ્રાચીન પરંપરા મુજબ શ્રાવણના ચોથા સોમવારે સોમેશ્વરની પાલખી આ મંદિર સુધી આવે છે. અહીંના શિવલિંગનો અભિષેક કરવામાં આવે છે. ભક્તોને ખીરના પ્રસાદનો ભંડારો આપવામાં આવે છે. ત્યારબાદ આ પાલખી સોમેશ્વર મંદિર તરફ પરત ફરે છે.
ઉપયોગી માહિતી:
- ખટાઉથી ૨૨ કિમી, તો સતારાથી ૫૨ કિમીના અંતરે
- ખટાઉથી ગુરસાળે આવવા માટે એસ.ટી. (GSRTC) ની સુવિધા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિર સુધી જઈ શકે છે.
- પરિસરમાં રહેવા તથા નાસ્તાની સુવિધા ઉપલબ્ધ નથી.
சோமேஸ்வரர் கோயில் / ராமலிங்கர் கோயில்
குர்சாலே, தாலுகா: கட்டாவ், மாவட்டம்: சதாரா
கட்டாவ் தாலுகாவில் உள்ள பூஷண்கடிற்கு அருகில் அமைந்துள்ள குர்சாலே கிராமம், இங்குள்ள ஐந்து ஜோதிர்லிங்கங்களால் புகழ்பெற்றது. அவை சோமேஸ்வரர், குப்தலிங்கர், ராமலிங்கர், பாவலிங்கர் மற்றும் சிவலிங்கர் என்று அழைக்கப்படுகின்றன. இவற்றில் சோமேஸ்வரர் மற்றும் ராமலிங்கர் கோயில்கள் தனித்துவமானவை மற்றும் பெரியவை, மற்ற கோயில்கள் சிறியவை. மேலும், இக்கோயில் வளாகத்தில் ஐம்பதிற்கும் மேற்பட்ட வீரக்கற்கள் மற்றும் நூற்றுக்கணக்கான சிற்பங்கள் உள்ளன. இந்த கோயில்களின் அமைப்பு, கட்டடக்கலை மற்றும் சில பழைய கட்டுமானங்களின் எச்சங்களை ஆராயும்போது, இந்த கிராமத்திற்கு சாளுக்கியர் மற்றும் சிலாஹாரர் காலத்திலிருந்தே வரலாறு இருப்பது தெரியவருகிறது.
இப்பகுதியிலுள்ள ஐந்து இடங்களில் முதன்மையானது ஹேமாட்பந்தி பாணியில் கட்டப்பட்ட சோமேஸ்வரர் கோயில். ஒரு மீட்டர் உயரமான மேடையில் அமைந்துள்ள இந்த பழமையான கோயில் பலமுறை புனரமைக்கப்பட்டுள்ளது. இதனால் அதன் மூல அமைப்பில் சில மாற்றங்கள் ஏற்பட்டுள்ளதாக கிராம மக்கள் கூறுகின்றனர். இந்தக் கோயிலில் இரண்டு சபாமண்டபங்கள் உள்ளன. அவற்றில் வெளிப்புற சபாமண்டபம் பிற்காலத்தில் கட்டப்பட்டதாகத் தெரிகிறது. சபாமண்டபத்தின் முன்புறத்தில் சந்த் துக்காராம் மகாராஜ் மற்றும் சமர்த் ராமதாஸ் சுவாமிகளின் சிலைகள் உள்ளன. இந்த சபாமண்டபத்தில் ஒரு கல் நந்தி உள்ளது, அது பித்தளைத் தகடுகளால் மூடப்பட்டுள்ளது. இங்குள்ள இரண்டாவது சபாமண்டபம் உறுதியான கற்களால் ஆனது மற்றும் அதன் அமைப்பு அரைவட்ட வடிவில் உள்ளது. கருவறையின் நுழைவு வாயிலில் செதுக்கப்பட்ட வேலைப்பாடுகள் உள்ளன. கருவறையில் உள்ள சிவலிங்கம் பெரியது மற்றும் தனித்துவமானது, அதன் உயரம் ஒரு மீட்டர் ஆகும். சிவலிங்கத்திற்குப் பின்னால் மகாதேவரின் பித்தளை சிலை உள்ளது. இங்குள்ள அரைவட்ட சபாமண்டபத்தின் அடியில் ஒரு சுரங்கப்பாதை உள்ளது, அதன் சிறிய துளை வழியாக உள்ளே இருக்கும் சிவலிங்கம் தெரிகிறது, இது குப்தலிங்கம் என்று அழைக்கப்படுகிறது. சோமேஸ்வரர் கோயிலுக்கு அடியில் உள்ள இந்த குப்தலிங்கத்திற்கு சோமேஸ்வரருடன் தினமும் பூஜை செய்யப்படுகிறது. கிராமத்தில் உள்ள ஐந்து இடங்களில் சோமேஸ்வரர் கோயிலில் இரண்டு ஜோதிர்லிங்கங்கள் உள்ளன.
சிராவண மாதத்தின் முதல் திங்கட்கிழமை சோமேஸ்வரருக்குப் பெரிய திருவிழா நடைபெறுகிறது. சோமேஸ்வரரின் சிலை கோயில் வளாகத்தில் பல்லக்கில் வைக்கப்படுகிறது. அதற்கு முறைப்படி பூஜை செய்யப்படுகிறது. மாலையில் கோயிலில் பாயசம் பிரசாதமாகத் தயாரிக்கப்படுகிறது.
கிராமம் முழுவதும் பிரசாதம் விநியோகிக்கப்படுகிறது. அதன்பிறகு கிராமத்தில் பல்லக்கு ஊர்வலம் நடைபெறுகிறது. இரண்டாவது விழா மகாசிவராத்திரிக்கு முந்தைய சஷ்டி திதியிலிருந்து தொடங்குகிறது. நேர்த்திக்கடன் செலுத்திய பக்தர்கள் இறைவனுக்குத் துணிகள், தலைப்பாகைகள் மற்றும் அங்கவஸ்திரங்களைச் சமர்ப்பிக்கின்றனர். மாக் அமாவாசையின் மூன்றாவது நாளில் சோமேஸ்வரரின் தேரோட்டம் நடைபெறுகிறது. அப்போது சோமேஸ்வரரின் பஞ்சலோக சிலை ௧௬ தூண் கொண்ட தேரில் வைக்கப்பட்டு, சோமேஸ்வரரின் பிரம்மாண்ட ஊர்வலம் நடைபெறுகிறது.
கிராமத்தின் மற்றொரு முக்கியமான கோயில் ராமலிங்கர் கோயில். இது கிராமத்தின் ஒரு பக்கத்தில் உள்ளது மற்றும் இது சுமார் ௧௩-ஆம் நூற்றாண்டைச் சேர்ந்தது என்று கூறப்படுகிறது. கோயிலுக்கு முன்னால் சதுர வடிவிலான ஒரு கிணறு உள்ளது, அதன் அமைப்பு தனித்துவமானது. கோயிலின் முன்புறத்தில் உள்ள நுழைவாயிலிலிருந்து கிணற்றுக்குள் இறங்கப் படிகள் உள்ளன. இதில் எட்டு முதல் பத்து படிகள் வரை கிணற்றின்
நான்கு பக்கங்களிலும் சுற்றி வரக்கூடிய நடைபாதை உள்ளது. இந்த நடைபாதையின் மேல் சுவரில் பன்னிரண்டு மாடங்கள் உள்ளன, அவற்றைச் சுற்றி செதுக்கப்பட்ட வேலைப்பாடுகள் உள்ளன. இந்த மாடங்களில் இன்று சிலைகள் இல்லையென்றாலும், அவற்றில் ஒன்றில் உள்ள பைரவர் சிலை இன்றும் நல்ல நிலையில் உள்ளது.
ராமலிங்கர் கோயிலில் பல தனித்துவமான சிற்பங்கள் மற்றும் வேலைப்பாடுகள் உள்ளன. சபாமண்டபத்தின் வெளிப்புறத்தில் பல புணர்ச்சி சிற்பங்கள் உள்ளன. சபாமண்டபத்தின் உட்புறத் தூண்களில் செதுக்கப்பட்ட வேலைப்பாடுகளைக் காணலாம். இந்த சபாமண்டபத்தின் வலது பக்கத்தில் சேஷசயன விஷ்ணுவின் அழகான சிலை உள்ளது. இதில் விஷ்ணு நான்கு கைகளுடன் உள்ளார், பாதங்களுக்கு அருகில் கருடனும், உந்தியில் இருந்து வெளிப்படும் தாமரையில் பிரம்மதேவரும் வீற்றிருக்கின்றனர். கருவறையில் ஒரு சிவலிங்கம் உள்ளது. கிராமத்தின் ஐந்து இடங்களில் இது மூன்றாவது முக்கியமான இடமாகும்.
நான்காவது முக்கியமான இடம் பாவலிங்கம். கிராமத்திற்கு அருகிலுள்ள ஒரு குன்றின் மீது இந்த இடம் உள்ளது. இங்கு சுமார் ஏழு மீட்டர் உயரமுள்ள சிவபெருமானின் சிலை உள்ளது. கழுத்தில் ருத்ராட்ச மாலை, வலது கையில் திரிசூலம் மற்றும் இடது கை ஆசி வழங்கும் முத்திரையில் உள்ளது. சிலையின் பாதங்களுக்கு அருகில் சிறிய கோயில் உள்ளது. தொலைவில் இருந்தும் இந்த இடம் கண்ணுக்குத் தெரியும். இந்த கோயிலின் கருவறையில் ஒரு பெரிய கல் உள்ளது. இந்தக் கல்லைப் பற்றிய ஐதீகம் என்னவென்றால், பல ஆண்டுகளுக்கு முன்பு பசுவின் குளம்பில் சிக்கிய ஒரு கல் இந்த இடத்தில் அதன் காலிலிருந்து விழுந்தது. அதன்பிறகு அந்தக் கல்லின் அளவு வளரத் தொடங்கியது. அந்தக் கல்லின் வளர்ச்சியைத் தடுக்க, இங்குள்ள சிவபெருமானின் சிலை அதன் மீது நிறுவப்பட்டது. இதனால் அந்தக் கல் உயரத்தில் வளர்வது நின்றது; ஆனால் அகலத்தில் வளரத் தொடங்கியது.
இங்குள்ள ஐந்தாவது ஜோதிர்லிங்கம் கிராமத்தில் உள்ள சிவலிங்கர் கோயில் ஆகும். இந்த கோயில் கிராமத்திலிருந்து சிறிது தொலைவில் உள்ள திறந்த வெளியில் உள்ளது. இந்த கோயிலில் சிராவண மாதத்தின் ஒவ்வொரு திங்கட்கிழமையும் சிவலீலாமிர்தம் வாசிப்பதும், மகாசிவராத்திரி அன்று பாராயணங்களும் நடைபெறுகின்றன. பாரம்பரிய வழக்கப்படி, சிராவண மாதத்தின் நான்காவது திங்கட்கிழமை சோமேஸ்வரரின் பல்லக்கு இந்த கோயிலுக்கு வருகிறது. இங்குள்ள சிவலிங்கத்திற்கு அபிஷேகம் செய்யப்படுகிறது. பாயசப் பிரசாதம் பக்தர்களுக்கு அன்னதானமாக வழங்கப்படுகிறது. பின்னர் இந்த பல்லக்கு சோமேஸ்வரர் கோயிலுக்குத் திரும்புகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- கட்டாவிலிருந்து ௨௨ கி.மீ, சதாராவிலிருந்து ௫௨ கி.மீ தொலைவில்
- கட்டாவிலிருந்து குர்சாலே வருவதற்கு அரசுப் பேருந்து வசதி உண்டு
- தனியார் வாகனங்கள் நேரடியாகக் கோயில் வரை செல்லலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவு உண்பதற்கும் வசதிகள் இல்லை
సోమేశ్వర ఆలయం / రామలింగ ఆలయం
గుర్సాళే, తా. ఖటావ్, జి. సతారా
ఖటావ్ తాలూకాలోని భూషణగఢ్కు సమీపంలో ఉన్న గుర్సాళే, ఇక్కడ ఉన్న ఐదు జ్యోతిర్లింగాల వల్ల ప్రసిద్ధి చెందింది. సోమేశ్వర, గుప్తలింగ, రామలింగ, భావలింగ మరియు శివలింగ అని వీటి పేర్లు. వీటిలో సోమేశ్వర మరియు రామలింగ ఆలయాలు విశిష్టమైనవి మరియు పెద్దవి, మిగిలిన ఆలయాలు చిన్నవి. ఇవే కాకుండా, ఈ ఆలయాల పరిసరాల్లో ౫౦ కంటే ఎక్కువ వీరగళ్లు మరియు ఈ ఆలయాలపై వందలాది శిల్పాలు ఉన్నాయి. ఈ ఆలయాల నిర్మాణం, వాస్తుశిల్పం మరియు కొన్ని పాత కట్టడాల అవశేషాల అధ్యయనం ద్వారా, ఈ గ్రామానికి చాళుక్య మరియు శిలాహార కాలం నాటి చరిత్ర ఉందని చెబుతారు.
ఈ ప్రాంతంలోని ఐదు ప్రదేశాలలో ప్రధానమైనది హేమాడపంతి నిర్మాణ శైలిలో ఉన్న సోమేశ్వర ఆలయం. ఒక మీటరు ఎత్తైన వేదికపై ఉన్న ఈ ప్రాచీన ఆలయం అనేకసార్లు జీర్ణోద్ధరణకు గురైంది. అందువల్ల దాని అసలు నిర్మాణంలో కొంత మార్పు వచ్చిందని గ్రామస్థులు చెబుతారు. ఈ ఆలయానికి రెండు సభామండపాలు ఉన్నాయి. వాటిలో వెలుపలి సభామండపం తర్వాత నిర్మించినట్లుగా కనిపిస్తుంది. సభామండపం ముందు భాగంలో సంత్ తుకారాం మహారాజ్ మరియు సమర్థ రామదాస్ స్వామి విగ్రహాలు ఉన్నాయి. ఈ సభామండపంలో ఒక రాతి నంది ఉంది, దీనికి ఇత్తడి రేకును తొడిగారు. ఇక్కడి రెండవ సభామండపం గట్టి రాతితో నిర్మించబడింది మరియు దాని నిర్మాణం అర్ధగోళాకారంలో ఉంది. గర్భాలయం ద్వారబంధంపై చెక్కడాలు ఉన్నాయి. గర్భాలయంలోని శివలింగం పెద్దది మరియు విశిష్టమైనది, దీని ఎత్తు ఒక మీటరు ఉంటుంది. శివలింగం వెనుక భాగంలో మహాదేవుని ఇత్తడి విగ్రహం ఉంది. ఇక్కడి అర్ధగోళాకార సభామండపం కింద ఒక భూగర్భ గది ఉంది, దాని చిన్న రంధ్రం ద్వారా లోపల ఉన్న శివలింగం కనిపిస్తుంది, దీనినే గుప్తలింగం అని పిలుస్తారు. సోమేశ్వర ఆలయం కింద ఉన్న ఈ గుప్తలింగానికి సోమేశ్వరునితో పాటు ప్రతిరోజూ పూజలు చేస్తారు. గ్రామంలోని ఐదు ప్రదేశాలలో సోమేశ్వర ఆలయంలోనే రెండు జ్యోతిర్లింగాలు ఉన్నాయి.
శ్రావణ మాసంలోని మొదటి సోమవారం నాడు సోమేశ్వరుని పెద్ద జాతర జరుగుతుంది. సోమేశ్వరుని విగ్రహాన్ని ఆలయ ప్రాంగణంలోని పల్లకీలో ఉంచుతారు. దానికి విధియుక్తంగా పూజలు చేస్తారు. సాయంత్రం ఆలయంలో పాయసం ప్రసాదాన్ని తయారు చేస్తారు.
మొత్తం గ్రామంలో ప్రసాదాన్ని పంపిణీ చేస్తారు. ఆ తర్వాత గ్రామంలో పల్లకీ ఊరేగింపు నిర్వహిస్తారు. రెండవ వేడుక మహాశివరాత్రికి ముందు షష్ఠి నుండి ప్రారంభమవుతుంది. మొక్కులు తీర్చుకున్న భక్తులు దేవునికి శాలువాలు, తలపాగాలు మరియు పాగాను సమర్పిస్తారు. మాఘ అమావాస్యకు మూడవ రోజున సోమేశ్వరుని రథోత్సవం జరుగుతుంది. ఈ సమయంలో సోమేశ్వరుని పంచలోహ విగ్రహాన్ని ౧౬ చక్రాల రథంలో ఉంచి సోమేశ్వరుని పెద్ద ఊరేగింపు నిర్వహిస్తారు.
గ్రామంలోని రెండవ ముఖ్యమైన ఆలయం రామేశ్వరాలయం. ఈ ఆలయం గ్రామానికి ఒక వైపున ఉంది మరియు ఇది సుమారు ౧౩వ శతాబ్దానికి చెందినదని చెబుతారు. ఆలయం ముందు చతురస్రాకారపు బావి ఉంది మరియు దాని నిర్మాణం విశిష్టమైనది. ఆలయానికి ముందు భాగంలో ఉన్న ప్రవేశ ద్వారం నుండి బావిలోకి దిగడానికి మెట్లు ఉన్నాయి. వీటిలో ఎనిమిది నుండి పది మెట్లపై బావికి
నాలుగు వైపులా తిరగడానికి వీలుగా కంచె ఉంది. ఈ కంచె పైభాగంలోని గోడపై పన్నెండు గూళ్లు ఉన్నాయి మరియు వాటి చుట్టూ చెక్కడాలు ఉన్నాయి. ఈ గూళ్లలో నేడు విగ్రహాలు లేకపోయినా, వాటిలో ఒక గూటిలో ఉన్న భైరవ విగ్రహం నేటికీ మంచి స్థితిలో ఉంది.
రామేశ్వరాలయంపై అనేక విశిష్టమైన శిల్పాలు మరియు నగిషీలు ఉన్నాయి. సభామండపం వెలుపలి భాగంలో అనేక మైథున శిల్పాలు ఉన్నాయి. సభామండపం లోపలి స్తంభాలపై చెక్కిన నగిషీలు కనిపిస్తాయి. ఈ సభామండపానికి కుడి వైపున శేషశాయి విష్ణువు యొక్క అందమైన విగ్రహం ఉంది. ఇందులో విష్ణువుకు నాలుగు చేతులు ఉన్నాయి, పాదాల వద్ద గరుత్మంతుడు మరియు నాభి నుండి వచ్చిన పద్మంలో బ్రహ్మదేవుడు కొలువై ఉన్నారు. గర్భాలయంలో ఒక శివలింగం ఉంది. గ్రామంలోని ఐదు స్థానాల్లో రామేశ్వరాలయం మూడవ ముఖ్యమైన స్థానం.
నాలుగవ ముఖ్యమైన ప్రదేశం భావలింగం. గ్రామానికి సమీపంలోని ఒక కొండపై ఈ స్థానం ఉంది. ఇక్కడ శంకరుని సుమారు ఏడు మీటర్ల ఎత్తైన విగ్రహం ఉంది. మెడలో రుద్రాక్ష మాల, కుడి చేతిలో త్రిశూలం మరియు ఎడమ చేయి ఆశీర్వాద ముద్రలో ఉంది. విగ్రహం పాదాల వద్ద చిన్న ఆలయం ఉంది. దూరం నుండి కూడా ఈ ప్రదేశం కనిపిస్తుంది. ఈ ఆలయ గర్భాలయంలో ఒక పెద్ద రాయి ఉంది. ఈ రాయి గురించి కథనం ఏమిటంటే, అనేక సంవత్సరాల క్రితం ఆవు గిట్టలో ఇరుక్కున్న ఒక రాయి ఈ ప్రదేశంలో దాని పాదాల నుండి పడిపోయింది. ఆ తర్వాత ఆ రాయి పరిమాణం పెరగడం ప్రారంభమైంది. ఆ రాయి పెరుగుదలను ఆపడానికి ఇక్కడి శంకరుని విగ్రహాన్ని దానిపై ప్రతిష్టించారు. దానివల్ల ఆ రాయి ఎత్తు పెరగడం ఆగిపోయింది; కానీ అడ్డంగా పెరగడం ప్రారంభమైంది.
ఇక్కడి ఐదవ జ్యోతిర్లింగం అంటే ఈ గ్రామంలోని శివలింగ ఆలయం. ఈ ఆలయం గ్రామానికి కొంత దూరంలో ఉన్న ఖాళీ ప్రదేశంలో ఉంది. ఈ ఆలయంలో శ్రావణంలోని ప్రతి సోమవారం శివలీలామృత పారాయణం మరియు మహాశివరాత్రి రోజున పారాయణాలు జరుగుతాయి. పూర్వపు ఆచారం ప్రకారం శ్రావణంలోని నాలుగవ సోమవారం సోమేశ్వరుని పల్లకీ ఈ ఆలయానికి వస్తుంది. ఇక్కడి శివలింగానికి అభిషేకం చేస్తారు. పాయసం ప్రసాదాన్ని భక్తులకు భండారంగా (అన్నదానం) ఇస్తారు. ఆ తర్వాత ఈ పల్లకీ సోమేశ్వర ఆలయానికి తిరిగి వెళ్తుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- ఖటావ్ నుండి ౨౨ కి.మీ, సతారా నుండి ౫౨ కి.మీ దూరంలో
- ఖటావ్ నుండి గుర్సాళేకు రావడానికి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు నేరుగా ఆలయం వరకు వెళ్లగలవు
- పరిసరాల్లో బస మరియు అల్పాహార సౌకర్యం లేదు
സോമേശ്വര ക്ഷേത്രം / രാമലിംഗ ക്ഷേത്രം
ഗുർസാലെ, താലൂക്ക് ഖടാവ്, ജില്ല സത്താറ
ഖടാവ് താലൂക്കിലെ ഭൂഷണഗഡിന് സമീപമുള്ള ഗുർസാലെ ഗ്രാമം ഇവിടെയുള്ള അഞ്ച് ജ്യോതിർലിംഗങ്ങളുടെ പേരിൽ പ്രശസ്തമാണ്. സോമേശ്വരൻ, ഗുപ്തലിംഗൻ, രാമലിംഗൻ, ഭാവലിംഗൻ, ശിവലിംഗൻ എന്നിങ്ങനെയാണ് ഇവയുടെ നാമങ്ങൾ. ഇതിൽ സോമേശ്വര, രാമലിംഗ ക്ഷേത്രങ്ങൾ വലുതും സവിശേഷതകൾ നിറഞ്ഞതുമാണ്, മറ്റ് ക്ഷേത്രങ്ങൾ ചെറുതുമാണ്. കൂടാതെ, ഈ ക്ഷേത്രപരിസരത്ത് അൻപതിലധികം വീരക്കല്ലുകളും ഈ ക്ഷേത്രങ്ങളിൽ നൂറുകണക്കിന് ശില്പങ്ങളുമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രങ്ങളുടെ ഘടന, വാസ്തുവിദ്യ, ചില പഴയ നിർമ്മിതികളുടെ അവശിഷ്ടങ്ങൾ എന്നിവയിൽ നിന്നുള്ള പഠനങ്ങൾ സൂചിപ്പിക്കുന്നത് ഈ ഗ്രാമത്തിന് ചാലൂക്യ, ശിലാഹാര കാലഘട്ടം മുതൽക്കേ ചരിത്രമുണ്ടെന്നാണ്.
ഈ പ്രദേശത്തെ അഞ്ച് സ്ഥലങ്ങളിൽ പ്രധാനപ്പെട്ടത് ഹേമാഡ്പന്തി ശൈലിയിലുള്ള സോമേശ്വര ക്ഷേത്രമാണ്. ഒരു മീറ്റർ ഉയരമുള്ള തറയിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ പുരാതന ക്ഷേത്രം പലതവണ പുനരുദ്ധരിച്ചിട്ടുണ്ട്. അതിനാൽ ഇതിന്റെ മൂലരൂപത്തിൽ ചില മാറ്റങ്ങൾ വന്നിട്ടുണ്ടെന്ന് ഗ്രാമവാസികൾ പറയുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിന് രണ്ട് സഭാമണ്ഡപങ്ങളുണ്ട്. അതിൽ പുറത്തെ സഭാമണ്ഡപം പിന്നീട് നിർമ്മിച്ചതാണെന്ന് തോന്നുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുൻവശത്ത് സന്ത് തുക്കാറാം മഹാരാജിന്റെയും സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമിയുടെയും പ്രതിമകളുണ്ട്. ഈ സഭാമണ്ഡപത്തിൽ പിച്ചള തകിട് പൊതിഞ്ഞ ഒരു കൽ നന്ദിയുണ്ട്. ഇവിടുത്തെ രണ്ടാമത്തെ സഭാമണ്ഡപം ഉറപ്പുള്ള കല്ലുകൊണ്ട് നിർമ്മിച്ചതും അർദ്ധവൃത്താകൃതിയിലുള്ളതുമാണ്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ കവാടത്തിൽ കൊത്തുപണികളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിലെ ശിവലിംഗം വലുതും സവിശേഷവുമാണ്, ഇതിന് ഒരു മീറ്റർ ഉയരമുണ്ട്. ശിവലിംഗത്തിന് പിന്നിൽ മഹാദേവന്റെ പിച്ചള വിഗ്രഹമുണ്ട്. ഇവിടുത്തെ അർദ്ധവൃത്താകൃതിയിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിന് താഴെ ഒരു ഭൂഗർഭ അറയുണ്ട്, അതിലെ ചെറിയ ദ്വാരത്തിലൂടെ നോക്കിയാൽ ഉള്ളിലുള്ള ശിവലിംഗം കാണാം, ഇതിനെ ഗുപ്തലിംഗം എന്ന് വിളിക്കുന്നു. സോമേശ്വര ക്ഷേത്രത്തിന് താഴെയുള്ള ഈ ഗുപ്തലിംഗത്തിന് സോമേശ്വരനോടൊപ്പം ദിവസവും പൂജ നടത്താറുണ്ട്. ഗ്രാമത്തിലെ അഞ്ചെണ്ണത്തിൽ സോമേശ്വര ക്ഷേത്രത്തിൽ രണ്ട് ജ്യോതിർലിംഗങ്ങളുണ്ട്.
ശ്രാവണ മാസത്തിലെ ആദ്യ തിങ്കളാഴ്ച സോമേശ്വരന്റെ വലിയ ഉത്സവം നടക്കുന്നു. സോമേശ്വരന്റെ വിഗ്രഹം ക്ഷേത്രപരിസരത്ത് പല്ലക്കിൽ എഴുന്നള്ളിക്കുന്നു. വിധിപ്രകാരം പൂജകൾ നടത്തുന്നു. വൈകുന്നേരം ക്ഷേത്രത്തിൽ പായസ പ്രസാദം തയ്യാറാക്കുന്നു.
ഗ്രാമം മുഴുവൻ പ്രസാദം വിതരണം ചെയ്യുന്നു. അതിനുശേഷം ഗ്രാമത്തിലൂടെ പല്ലക്ക് ഘോഷയാത്ര നടക്കുന്നു. രണ്ടാമത്തെ ഉത്സവം മഹാശിവരാത്രിക്ക് മുൻപുള്ള ഷഷ്ഠി മുതൽ ആരംഭിക്കുന്നു. നേർച്ച നേർന്ന ഭക്തർ ദൈവത്തിന് ഷേല, പാഗോട്ടി, തലപ്പാവുകൾ എന്നിവ സമർപ്പിക്കുന്നു. മാഘ അമാവാസി കഴിഞ്ഞ് മൂന്നാം ദിവസം സോമേശ്വരന്റെ രഥോത്സവം നടക്കുന്നു. ഈ സമയം സോമേശ്വരന്റെ പഞ്ചലോഹ വിഗ്രഹം ൧൬ കാലുകളുള്ള രഥത്തിൽ വെച്ച് സോമേശ്വരന്റെ വലിയ ഘോഷയാത്ര നടക്കുന്നു.
ഗ്രാമത്തിലെ രണ്ടാമത്തെ പ്രധാന ക്ഷേത്രം രാമേശ്വര ക്ഷേത്രമാണ്. ഇത് ഗ്രാമത്തിന്റെ ഒരു വശത്തായി സ്ഥിതി ചെയ്യുന്നു, ഏകദേശം ൧൩-ാം നൂറ്റാണ്ടിലേതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ചതുരാകൃതിയിലുള്ള ഒരു കിണറുണ്ട്, ഇതിന്റെ നിർമ്മാണം സവിശേഷമാണ്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മുൻവശത്തുള്ള പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ കിണറ്റിലേക്ക് ഇറങ്ങാൻ പടികളുണ്ട്. ഇതിലെ എട്ട് മുതൽ പത്ത് വരെ പടികളിൽ കിണറിന്റെ
നാല് വശങ്ങളിലും നടക്കാൻ കഴിയുന്ന രീതിയിൽ ഒരു കൈവരിയുണ്ട്. ഈ കൈവരിയുടെ മുകൾഭാഗത്തുള്ള ഭിത്തിയിൽ പന്ത്രണ്ട് മാളികകളുണ്ട്, അവയ്ക്ക് ചുറ്റും കൊത്തുപണികൾ ചെയ്തിട്ടുണ്ട്. ഈ മാളികകളിൽ ഇന്ന് വിഗ്രഹങ്ങൾ ഇല്ലെങ്കിലും, അതിലൊന്നിലുണ്ടായിരുന്ന ഭൈരവ വിഗ്രഹം ഇന്നും നല്ല അവസ്ഥയിലുണ്ട്.
രാമേശ്വര ക്ഷേത്രത്തിൽ നിരവധി സവിശേഷമായ ശില്പങ്ങളും കൊത്തുപണികളുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന് പുറത്ത് നിരവധി മൈഥുന ശില്പങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിനകത്തെ തൂണുകളിൽ കൊത്തുപണികൾ കാണാം. ഈ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ വലതുവശത്ത് ശേഷശായി വിഷ്ണുവിന്റെ മനോഹരമായ വിഗ്രഹമുണ്ട്. ഇതിൽ വിഷ്ണുവിന് നാല് കൈകളുണ്ട്, പാദത്തിനടുത്ത് ഗരുഡനും നാഭിയിൽ നിന്ന് പുറപ്പെട്ട താമരയിൽ ബ്രഹ്മാവും ഉപവിഷ്ടരാണ്. ഗർഭഗൃഹത്തിൽ ഒരു ശിവലിംഗമുണ്ട്. ഗ്രാമത്തിലെ അഞ്ച് സ്ഥാനങ്ങളിൽ രാമേശ്വരത്തിന്റേത് മൂന്നാമത്തെ പ്രധാന സ്ഥാനമാണ്.
നാലാമത്തെ പ്രധാന സ്ഥലം ഭാവലിംഗമാണ്. ഗ്രാമത്തിന് സമീപമുള്ള ഒരു കുന്നിൻ മുകളിലാണ് ഈ സ്ഥലം. ഇവിടെ ഏകദേശം ഏഴ് മീറ്റർ ഉയരമുള്ള ശങ്കരന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്. കഴുത്തിൽ രുദ്രാക്ഷമാലയും, വലതുകൈയിൽ ത്രിശൂലവും, ഇടതുകൈ അനുഗ്രഹ മുദ്രയിലുമാണ്. വിഗ്രഹത്തിന്റെ പാദത്തിനടുത്ത് ചെറിയൊരു ക്ഷേത്രമുണ്ട്. ദൂരെ നിന്ന് പോലും ഈ സ്ഥലം കാണാം. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹത്തിൽ ഒരു വലിയ കല്ലുണ്ട്. ഈ കല്ലിനെക്കുറിച്ച് ഐതിഹ്യമിതാണ്: വർഷങ്ങൾക്ക് മുൻപ് പശുവിന്റെ കുളമ്പിൽ കുടുങ്ങിയ ഒരു കല്ല് ഇവിടെ വെച്ച് അതിന്റെ കാലിൽ നിന്ന് താഴെ വീണു. പിന്നീട് ആ കല്ലിന്റെ വലിപ്പം കൂടാൻ തുടങ്ങി. ആ കല്ലിന്റെ വളർച്ച തടയാൻ വേണ്ടി ഇവിടുത്തെ ശങ്കരന്റെ വിഗ്രഹം അതിനു മുകളിൽ പ്രതിഷ്ഠിച്ചു. അതിനാൽ ആ കല്ലിന്റെ ഉയരം കൂടുന്നത് നിന്നെങ്കിലും, അത് വശങ്ങളിലേക്ക് വളരാൻ തുടങ്ങി.
ഇവിടുത്തെ അഞ്ചാമത്തെ ജ്യോതിർലിംഗം ഈ ഗ്രാമത്തിലെ ശിവലിംഗ ക്ഷേത്രമാണ്. ഈ ക്ഷേത്രം ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് അല്പം അകലെയായി തുറസ്സായ സ്ഥലത്താണ്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ശ്രാവണ മാസത്തിലെ എല്ലാ തിങ്കളാഴ്ചയും ശിവലീലാമൃത പാരായണവും മഹാശിവരാത്രി ദിനത്തിൽ പ്രത്യേക പൂജകളും നടക്കുന്നു. പാരമ്പര്യമനുസരിച്ച് ശ്രാവണത്തിലെ നാലാമത്തെ തിങ്കളാഴ്ച സോമേശ്വരന്റെ പല്ലക്ക് ഈ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് വരുന്നു. ഇവിടുത്തെ ശിവലിംഗത്തിന് അഭിഷേകം നടത്തുന്നു. പായസ പ്രസാദം ഭക്തർക്ക് ഭണ്ഡാരമായി നൽകുന്നു. പിന്നീട് ഈ പല്ലക്ക് സോമേശ്വര ക്ഷേത്രത്തിലേക്ക് മടങ്ങുന്നു.
ഉപയുക്തമായ വിവരങ്ങൾ:
- ഖടാവിൽ നിന്ന് ൨൨ കി.മീ, സത്താറയിൽ നിന്ന് ൫൨ കി.മീ അകലെ
- ഖടാവിൽ നിന്ന് ഗുർസാലെയിലേക്ക് എത്താൻ എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന് തൊട്ടടുത്ത് വരെ പോകാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
ಸೋಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ / ರಾಮಲಿಂಗ ದೇವಾಲಯ
ಗುರಸಾಳೆ, ತಾ. ಖಟಾವ್, ಜಿ. ಸತಾರಾ
ಖಟಾವ್ ತಾಲೂಕಿನ ಭೂಷಣಗಡದ ಸಮೀಪವಿರುವ ಗುರಸಾಳೆ ಗ್ರಾಮವು ಇಲ್ಲಿರುವ ಐದು ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಗಳಿಂದಾಗಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಸೋಮೇಶ್ವರ, ಗುಪ್ತಲಿಂಗ, ರಾಮಲಿಂಗ, ಭಾವಲಿಂಗ ಮತ್ತು ಶಿವಲಿಂಗ ಎಂಬುದು ಅವುಗಳ ಹೆಸರುಗಳು. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಸೋಮೇಶ್ವರ ಮತ್ತು ರಾಮಲಿಂಗ ದೇವಾಲಯಗಳು ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣ ಹಾಗೂ ದೊಡ್ಡದಾಗಿದ್ದು, ಉಳಿದ ದೇವಾಲಯಗಳು ಚಿಕ್ಕದಾಗಿವೆ. ಇದಲ್ಲದೆ, ಈ ದೇವಾಲಯಗಳ ಆವರಣದಲ್ಲಿ ೫೦ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ವೀರಗಲ್ಲುಗಳು ಮತ್ತು ಈ ದೇವಾಲಯಗಳ ಮೇಲೆ ನೂರಾರು ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಈ ದೇವಾಲಯಗಳ ರಚನೆ, ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಮತ್ತು ಕೆಲವು ಹಳೆಯ ನಿರ್ಮಾಣಗಳ ಅವಶೇಷಗಳ ಅಧ್ಯಯನದಿಂದ, ಈ ಗ್ರಾಮವು ಚಾಲುಕ್ಯ ಮತ್ತು ಶಿಲಾಹಾರರ ಕಾಲದಿಂದಲೂ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಹೊಂದಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಈ ಪ್ರದೇಶದ ಐದು ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ಶೈಲಿಯ ಸೋಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ. ಒಂದು ಮೀಟರ್ ಎತ್ತರದ ಜಗಲಿಯ ಮೇಲೆ ಇರುವ ಈ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯವು ಅನೇಕ ಬಾರಿ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರಗೊಂಡಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅದರ ಮೂಲ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಬದಲಾವಣೆಯಾಗಿದೆ ಎಂದು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಎರಡು ಸಭಾಮಂಟಪಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಹೊರಗಿನ ಸಭಾಮಂಟಪವನ್ನು ನಂತರ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಸಂತ ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳ ಪ್ರತಿಮೆಗಳಿವೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ನಂದಿಯಿದ್ದು, ಅದನ್ನು ಹಿತ್ತಾಳೆಯ ತಗಡಿನಿಂದ ಮುಚ್ಚಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಎರಡನೇ ಸಭಾಮಂಟಪವು ದೃಢವಾದ ಕಲ್ಲಿನಿಂದ ಕೂಡಿದ್ದು, ಅದರ ರಚನೆಯು ಅರ್ಧಗೋಲಾಕಾರವಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ದ್ವಾರಬಂಧದ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆಯ ಕೆಲಸವಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿರುವ ಶಿವಲಿಂಗವು ದೊಡ್ಡದಾಗಿದ್ದು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿದೆ ಮತ್ತು ಅದರ ಎತ್ತರ ಒಂದು ಮೀಟರ್ನಷ್ಟಿದೆ. ಶಿವಲಿಂಗದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಮಹಾದೇವನ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಅರ್ಧಗೋಲಾಕಾರದ ಸಭಾಮಂಟಪದ ಕೆಳಗೆ ಒಂದು ಸುರಂಗವಿದ್ದು, ಅದರ ಸಣ್ಣ ರಂಧ್ರದ ಮೂಲಕ ಸುರಂಗದಲ್ಲಿರುವ ಶಿವಲಿಂಗವು ಕಾಣಿಸುತ್ತದೆ, ಅದನ್ನು ಗುಪ್ತಲಿಂಗ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಸೋಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಕೆಳಗೆ ಇರುವ ಈ ಗುಪ್ತಲಿಂಗಕ್ಕೆ ಸೋಮೇಶ್ವರನೊಂದಿಗೆ ಪ್ರತಿದಿನ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಗ್ರಾಮದ ಐದು ಸ್ಥಳಗಳ ಪೈಕಿ ಸೋಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಎರಡು ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಗಳಿವೆ.
ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಮೊದಲ ಸೋಮವಾರದಂದು ಸೋಮೇಶ್ವರನ ಭವ್ಯ ಜಾತ್ರೆಯು ನಡೆಯುತ್ತದೆ. ಸೋಮೇಶ್ವರನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ಇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ವಿಧಿಬದ್ಧವಾಗಿ ಪೂಜೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸಂಜೆ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಪಾಯಸದ ಪ್ರಸಾದವನ್ನು ತಯಾರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಸಂಪೂರ್ಣ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರಸಾದವನ್ನು ವಿತರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ತದನಂತರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ನಡೆಸಲಾಗುತ್ತದೆ. ಎರಡನೇ ಉತ್ಸವವು ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ಮುನ್ನದ ಷಷ್ಠಿಯಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ಹರಕೆ ಹೊತ್ತ ಭಕ್ತರು ದೇವರಿಗೆ ಶಲ್ಯ, ಪೇಟ ಮತ್ತು ಪಾಘಡಿಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ. ಮಾಘ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯ ಮೂರನೇ ದಿನದಂದು ಸೋಮೇಶ್ವರನ ರಥೋತ್ಸವವಿರುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸೋಮೇಶ್ವರನ ಪಂಚಲೋಹದ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ೧೬ ಕಂಬಗಳ ರಥದಲ್ಲಿ ಇರಿಸಿ ಸೋಮೇಶ್ವರನ ಭವ್ಯ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ನಡೆಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಗ್ರಾಮದ ಮತ್ತೊಂದು ಪ್ರಮುಖ ದೇವಾಲಯವೆಂದರೆ ರಾಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ. ಈ ದೇವಾಲಯವು ಗ್ರಾಮದ ಒಂದು ಬದಿಯಲ್ಲಿದ್ದು, ಇದು ಸುಮಾರು ೧೩ನೇ ಶತಮಾನಕ್ಕೆ ಸೇರಿದ್ದೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ಚೌಕಾಕಾರದ ಬಾವಿಯಿದ್ದು, ಅದರ ರಚನೆಯು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಬಾವಿಗೆ ಇಳಿಯಲು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಇದರಲ್ಲಿ ಎಂಟರಿಂದ ಹತ್ತು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಮೇಲೆ ಬಾವಿಯ
ನಾಲ್ಕು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಸುತ್ತಾಡಲು ಅನುಕೂಲವಾಗುವಂತೆ ಕಟಾಂಜನವಿದೆ. ಈ ಕಟಾಂಜನದ ಮೇಲ್ಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಹನ್ನೆರಡು ಗೂಡುಗಳಿದ್ದು, ಅವುಗಳ ಸುತ್ತಲೂ ಕೆತ್ತನೆಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ ಗೂಡುಗಳಲ್ಲಿ ಇಂದು ಮೂರ್ತಿಗಳಿಲ್ಲದಿದ್ದರೂ, ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದರಲ್ಲಿರುವ ಭೈರವನ ಮೂರ್ತಿಯು ಇಂದಿಗೂ ಉತ್ತಮ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದೆ.
ರಾಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವು ಅನೇಕ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣ ಶಿಲ್ಪಗಳು ಮತ್ತು ಕೆತ್ತನೆಗಳನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಮೈಥುನ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಒಳಗಿನ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಸುಂದರವಾದ ಕೆತ್ತನೆಗಳನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಈ ಸಭಾಮಂಟಪದ ಬಲಬದಿಯಲ್ಲಿ ಶೇಷಶಾಯಿ ವಿಷ್ಣುವಿನ ಸುಂದರ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ವಿಷ್ಣುವಿಗೆ ನಾಲ್ಕು ಕೈಗಳಿದ್ದು, ಪಾದದ ಬಳಿ ಗರುಡ ಮತ್ತು ನಾಭಿಯಿಂದ ಹೊರಬಂದ ಕಮಲದಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮದೇವರು ವಿರಾಜಮಾನರಾಗಿದ್ದಾರೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಗ್ರಾಮದ ಐದು ಸ್ಥಾನಗಳಲ್ಲಿ ರಾಮೇಶ್ವರದ ಈ ಸ್ಥಾನವು ಮೂರನೇ ಪ್ರಮುಖ ಸ್ಥಾನವಾಗಿದೆ.
ನಾಲ್ಕನೇ ಪ್ರಮುಖ ಸ್ಥಳವೆಂದರೆ ಭಾವಲಿಂಗ. ಗ್ರಾಮದ ಸಮೀಪವಿರುವ ಒಂದು ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಈ ಸ್ಥಳವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಶಿವನ ಸುಮಾರು ೭ ಮೀಟರ್ ಎತ್ತರದ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಕುತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾಲೆ, ಬಲಗೈಯಲ್ಲಿ ತ್ರಿಶೂಲ ಮತ್ತು ಎಡಗೈ ಆಶೀರ್ವಾದ ಮುದ್ರೆಯಲ್ಲಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಪಾದದ ಬಳಿ ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯವಿದೆ. ದೂರದಿಂದಲೂ ಈ ಸ್ಥಳವು ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲಿದೆ. ಈ ಕಲ್ಲಿನ ಬಗ್ಗೆ ದಂತಕಥೆಯೇನೆಂದರೆ, ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಹಸುವಿನ ಗೊರಸಿನಲ್ಲಿ ಸಿಲುಕಿದ್ದ ಕಲ್ಲೊಂದು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅದರ ಕಾಲಿನಿಂದ ಕೆಳಗೆ ಬಿತ್ತು. ತದನಂತರ ಆ ಕಲ್ಲಿನ ಗಾತ್ರವು ಬೆಳೆಯತೊಡಗಿತು. ಆ ಕಲ್ಲಿನ ಬೆಳವಣಿಗೆಯನ್ನು ತಡೆಯಲು ಇಲ್ಲಿ ಶಿವನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಅದರ ಮೇಲೆ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು. ಇದರಿಂದ ಆ ಕಲ್ಲು ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಬೆಳೆಯುವುದು ನಿಂತಿತು; ಆದರೆ ಅಡ್ಡಲಾಗಿ ಬೆಳೆಯತೊಡಗಿತು.
ಇಲ್ಲಿನ ಐದನೇ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗವೆಂದರೆ ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಶಿವಲಿಂಗ ದೇವಾಲಯ. ಈ ದೇವಾಲಯವು ಗ್ರಾಮದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿರುವ ವಿಶಾಲವಾದ ಬಯಲಿನಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರದಂದು ಶಿವಲೀಲಾಮೃತದ ಪಠಣ ಮತ್ತು ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ದಿನದಂದು ಪಾರಾಯಣಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಪೂರ್ವಪಾರ ಸಂಪ್ರದಾಯದಂತೆ ಶ್ರಾವಣದ ನಾಲ್ಕನೇ ಸೋಮವಾರದಂದು ಸೋಮೇಶ್ವರನ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯು ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಬರುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ಶಿವಲಿಂಗಕ್ಕೆ ಅಭಿಷೇಕವನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಖೀರಿನ ಪ್ರಸಾದದ ಭಂಡಾರವನ್ನು (ಅನ್ನದಾನ) ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ನಂತರ ಈ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯು ಸೋಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಕಡೆಗೆ ಮರಳುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಖಟಾವ್ನಿಂದ ೨೨ ಕಿ.ಮೀ, ಹಾಗೂ ಸತಾರಾದಿಂದ ೫೨ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಖಟಾವದಿಂದ ಗುರಸಾಳೆಗೆ ಬರಲು ಎಸ್ಟಿ (GSRTC) ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ.
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ದೇವಸ್ಥಾನದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು.
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ.
সোমেশ্বর মন্দির / রামলিঙ্গ মন্দির
গুরসালে, তালুকা খটাউ, জেলা সাতারা
খটাউ তালুকের ভূষণগড় থেকে কাছে অবস্থিত গুরসালে এখানে থাকা পাঁচটি জ্যোতির্লিঙ্গের জন্য বিখ্যাত। সোমেশ্বর, গুপ্তলিঙ্গ, রামলিঙ্গ, ভাবলিঙ্গ ও শিবলিঙ্গ হলো এদের নাম। এর মধ্যে সোমেশ্বর ও রামলিঙ্গ মন্দিরগুলি বৈশিষ্ট্যপূর্ণ ও বড় এবং অন্যান্য মন্দিরগুলি ছোট। এ ছাড়াও এই মন্দিরগুলির আশেপাশে পঞ্চাশেরও বেশি বীরগলি (স্মৃতিফলক) এবং এই মন্দিরগুলিতে শত শত ভাস্কর্য রয়েছে। এই মন্দিরগুলির গঠন, স্থাপত্যকলা এবং কিছু পুরনো নির্মাণের ধ্বংসাবশেষের অধ্যয়নের ভিত্তিতে বলা হয় যে, এই গ্রামের ইতিহাস চালুক্য ও শিলাহার কাল থেকে চলে আসছে।
এই এলাকার পাঁচটি স্থানের মধ্যে প্রধান স্থানটি হলো হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীর সোমেশ্বর মন্দির। এক মিটার উঁচু বেদির ওপর অবস্থিত এই প্রাচীন মন্দিরটির বহুবার সংস্কার করা হয়েছে। সেই কারণে এর মূল স্থাপত্যে কিছুটা পরিবর্তন এসেছে বলে গ্রামবাসীরা জানান। এই মন্দিরে দুটি সভামণ্ডপ রয়েছে। তার মধ্যে বাইরের সভামণ্ডপটি পরে নির্মাণ করা হয়েছে বলে মনে হয়। সভামণ্ডপের সামনের দিকে সন্ত তুকারাম মহারাজ ও সমর্থ রামদাস স্বামীর মূর্তি রয়েছে। এই সভামণ্ডপে একটি পাথরের নন্দী রয়েছে এবং তাকে পিতলের পাত দিয়ে মোড়ানো হয়েছে। এখানকার দ্বিতীয় সভামণ্ডপটি নিরেট পাথরের তৈরি এবং এর গঠন অর্ধগোলাকার। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারে খোদাই করা কাজ রয়েছে। গর্ভগৃহের শিবলিঙ্গটি বড় ও বৈশিষ্ট্যপূর্ণ এবং এর উচ্চতা এক মিটার। শিবলিঙ্গের পিছনের দিকে মহাদেবের পিতলের মূর্তি রয়েছে। এখানকার অর্ধগোলাকার সভামণ্ডপের নিচে একটি ভূগর্ভস্থ কক্ষ রয়েছে এবং তার একটি ছোট ছিদ্র দিয়ে ভূগর্ভস্থ কক্ষের শিবলিঙ্গটি দেখা যায়, যাকে গুপ্তলিঙ্গ বলা হয়। সোমেশ্বর মন্দিরের নিচে অবস্থিত এই গুপ্তলিঙ্গের সোমেশ্বরের সাথেই প্রতিদিন পূজা করা হয়। গ্রামের পাঁচটি স্থানের মধ্যে সোমেশ্বর মন্দিরে দুটি জ্যোতির্লিঙ্গ রয়েছে।
শ্রাবণ মাসের প্রথম সোমবারে সোমেশ্বরের বিশাল যাত্রা অনুষ্ঠিত হয়। সোমেশ্বরের মূর্তি মন্দিরের প্রাঙ্গণে পালকিতে রাখা হয়। সেখানে শাস্ত্রীয় বিধি মেনে তাঁর পূজা করা হয়। সন্ধ্যায় মন্দিরে ক্ষীরের প্রসাদ তৈরি করা হয়।
সমগ্র গ্রামে প্রসাদ বিতরণ করা হয়। এরপর গ্রাম থেকে পালকির শোভাযাত্রা বের করা হয়। দ্বিতীয় উৎসবটি মহাশিবরাত্রির আগে ষষ্ঠী তিথি থেকে শুরু হয়। যে ভক্তরা মানত করেছিলেন, তাঁদের পক্ষ থেকে দেবতাকে শেলা, পাগড়ি ও উষ্ণীষ অর্পণ করা হয়। মাঘ অমাবস্যার তৃতীয় দিনে সোমেশ্বরের রথোৎসব অনুষ্ঠিত হয়। এই সময়ে সোমেশ্বরের পঞ্চধাতুর মূর্তি ১৬টি স্তম্ভবিশিষ্ট রথে স্থাপন করা হয় এবং সোমেশ্বরের এক বিশাল শোভাযাত্রা বের হয়।
গ্রামের দ্বিতীয় গুরুত্বপূর্ণ মন্দিরটি হলো রামেশ্বরের। এই মন্দিরটি গ্রামের এক প্রান্তে অবস্থিত এবং এটি আনুমানিক ১৩শ শতাব্দীর বলে মনে করা হয়। মন্দিরের সামনে একটি চতুষ্কোণ আকৃতির কূপ রয়েছে, যার গঠনশৈলী অত্যন্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ। মন্দিরের সামনের দিকে থাকা প্রবেশপথ দিয়ে কূপে নামার জন্য সিঁড়ি রয়েছে। এর আট থেকে দশটি সিঁড়িতে কূপের
চারিদিকে ঘুরে বেড়ানো যায় এমন একটি রেলিং বা বেষ্টনী রয়েছে। এই বেষ্টনীর উপরের দিকের দেওয়ালে বারোটি কুলুঙ্গি আছে এবং সেগুলির চারপাশে খোদাই করা কাজ রয়েছে। যদিও বর্তমানে এই কুলুঙ্গিগুলিতে কোনো মূর্তি নেই, তবুও সেগুলির মধ্যে একটিতে থাকা ভৈরব মূর্তিটি আজও ভালো অবস্থায় রয়েছে।
রামেশ্বর মন্দিরে অনেক বৈশিষ্ট্যপূর্ণ ভাস্কর্য ও নকশার কাজ রয়েছে। সভামণ্ডপের বাইরের দিকে অনেক মৈথুন ভাস্কর্য আছে। সভামণ্ডপের ভিতরের স্তম্ভগুলিতে খোদাই করা নকশার কাজ দেখা যায়। এই সভামণ্ডপের ডানদিকে শেষশায়ী বিষ্ণুর একটি সুন্দর মূর্তি রয়েছে। এতে বিষ্ণুর চারটি হাত রয়েছে এবং পায়ের কাছে গরুড় ও নাভি থেকে নির্গত পদ্মে ব্রহ্মা বিরাজমান। গর্ভগৃহে একটি শিবলিঙ্গ রয়েছে। গ্রামের পাঁচটি স্থানের মধ্যে রামেশ্বরের এই স্থানটি তৃতীয় গুরুত্বপূর্ণ স্থান।
চতুর্থ গুরুত্বপূর্ণ স্থানটি হলো ভাবলিঙ্গ। গ্রামের নিকটবর্তী একটি পাহাড়ের ওপর এই স্থানটি অবস্থিত। এখানে শিবের প্রায় ৭ মিটার উচ্চতার একটি মূর্তি রয়েছে। গলায় রুদ্রাক্ষের মালা, ডান হাতে ত্রিশূল এবং বাম হাত আশীর্বাদ মুদ্রায় রয়েছে। মূর্তির পায়ের কাছে একটি ছোট মন্দির আছে। দূর থেকেও এই স্থানটি নজরে পড়ে। এই মন্দিরের গর্ভগৃহে একটি বড় পাথর রয়েছে। এই পাথরটি সম্পর্কে জনশ্রুতি এই যে, বহু বছর আগে একটি গরুর খুরে আটকে থাকা একটি পাথর এই স্থানে তার পা থেকে পড়ে গিয়েছিল। তারপর সেই পাথরের আকার বাড়তে শুরু করে। সেই পাথরের বৃদ্ধি থামানোর জন্য এখানে শিবের মূর্তি স্থাপন করা হয়। ফলে সেই পাথরটির উচ্চতায় বৃদ্ধি পাওয়া বন্ধ হয়ে যায়; কিন্তু সেটি আড়াআড়িভাবে বাড়তে থাকে।
এখানকার পঞ্চম জ্যোতির্লিঙ্গ হলো এই গ্রামের শিবলিঙ্গ মন্দির। এই মন্দিরটি গ্রাম থেকে কিছুটা দূরে এক খোলা জায়গায় অবস্থিত। এই মন্দিরে শ্রাবণ মাসের প্রতি সোমবার শিবলীলামৃত পাঠ এবং মহাশিবরাত্রির দিন পারায়ণ অনুষ্ঠিত হয়। প্রাচীন প্রথা অনুযায়ী শ্রাবণ মাসের চতুর্থ সোমবার সোমেশ্বরের পালকি এই মন্দির পর্যন্ত আসে। এখানকার শিবলিঙ্গে অভিষেক করা হয়। ভক্তদের খীরের প্রসাদ ভাণ্ডারা হিসেবে বিতরণ করা হয়। এরপর এই পালকি সোমেশ্বর মন্দিরের দিকে ফিরে যায়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- খটাউ থেকে ২২ কিমি, এবং সাতারা থেকে ৫২ কিমি দূরত্বে
- খটাউ থেকে গুরসালে আসার জন্য এসটি (ST) বাস পরিষেবা উপলব্ধ।
- ব্যক্তিগত যানবাহন সরাসরি মন্দির পর্যন্ত যেতে পারে।
- এই চত্বরে থাকা ও জলখাবারের কোনো ব্যবস্থা নেই।
ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ / ਰਾਮਲਿੰਗ ਮੰਦਰ
ਗੁਰਸਾਲੇ, ਤਾਲੁਕਾ ਖਟਾਵ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਤਾਰਾ
ਖਟਾਵ ਤਹਿਸੀਲ ਵਿੱਚ ਭੂਸ਼ਣਗੜ੍ਹ ਦੇ ਨੇੜੇ ਸਥਿਤ ਗੁਰਸਾਲੇ ਇੱਥੇ ਮੌਜੂਦ ਪੰਜ ਜੋਤਿਰਲਿੰਗਾਂ ਕਰਕੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਦੇ ਨਾਮ ਸੋਮੇਸ਼ਵਰ, ਗੁਪਤਲਿੰਗ, ਰਾਮਲਿੰਗ, ਭਾਵਲਿੰਗ ਅਤੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਅਤੇ ਰਾਮਲਿੰਗ ਮੰਦਰ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਅਤੇ ਵੱਡੇ ਹਨ, ਜਦਕਿ ਬਾਕੀ ਮੰਦਰ ਛੋਟੇ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ, ਇਨ੍ਹਾਂ ਮੰਦਰਾਂ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਪੰਜਾਹ ਤੋਂ ਵੱਧ ਵੀਰਗਲ (ਯਾਦਗਾਰੀ ਪੱਥਰ) ਹਨ ਅਤੇ ਇਨ੍ਹਾਂ ਮੰਦਰਾਂ ਉੱਤੇ ਸੈਂਕੜੇ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਮੰਦਰਾਂ ਦੀ ਬਣਤਰ, ਵਾਸਤੂਕਲਾ ਅਤੇ ਕੁਝ ਪੁਰਾਣੇ ਨਿਰਮਾਣਾਂ ਦੇ ਅਵਸ਼ੇਸ਼ਾਂ ਦੇ ਅਧਿਐਨ ਤੋਂ ਪਤਾ ਲੱਗਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਪਿੰਡ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਚਾਲੁਕਯ ਅਤੇ ਸ਼ਿਲਾਹਾਰ ਕਾਲ ਤੋਂ ਚੱਲਿਆ ਆ ਰਿਹਾ ਹੈ।
ਇਸ ਖੇਤਰ ਦੇ ਪੰਜ ਸਥਾਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਮੁੱਖ ਸਥਾਨ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਬਣਤਰ ਵਾਲਾ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਇੱਕ ਮੀਟਰ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਦਾ ਕਈ ਵਾਰ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਦੱਸਦੇ ਹਨ ਕਿ ਇਸ ਦੀ ਮੂਲ ਇਮਾਰਤ ਵਿੱਚ ਕੁਝ ਤਬਦੀਲੀ ਆਈ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦੋ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਹਨ। ਉਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਬਾਹਰੀ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਪ੍ਰਤੀਤ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਸੰਤ ਤੁਕਾਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਅਤੇ ਸਮਰੱਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਦੇ ਬੁੱਤ ਹਨ। ਇਸ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਇੱਕ ਪੱਥਰ ਦਾ ਨੰਦੀ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਨੂੰ ਪਿੱਤਲ ਦੀ ਪੱਤਰੀ ਨਾਲ ਮੜ੍ਹਿਆ ਗਿਆ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਦੂਜਾ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਠੋਸ ਪੱਥਰ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਦੀ ਬਣਤਰ ਅਰਧ-ਗੋਲਾਕਾਰ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੀ ਚੌਖਟ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵ-ਪਿੰਡੀ ਵੱਡੀ ਅਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਦੀ ਉਚਾਈ ਇੱਕ ਮੀਟਰ ਹੈ। ਸ਼ਿਵ-ਪਿੰਡੀ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਪਿੱਤਲ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਅਰਧ-ਗੋਲਾਕਾਰ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੇ ਹੇਠਾਂ ਇੱਕ ਭੋਰ (ਤਹਿਖਾਨਾ) ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਦੇ ਛੋਟੇ ਜਿਹੇ ਛੇਕ ਵਿੱਚੋਂ ਭੋਰ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਸ਼ਿਵ-ਪਿੰਡੀ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ, ਜਿਸ ਨੂੰ ਗੁਪਤਲਿੰਗ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਦੇ ਹੇਠਾਂ ਸਥਿਤ ਇਸ ਗੁਪਤਲਿੰਗ ਦੀ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਰੋਜ਼ਾਨਾ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਪਿੰਡ ਦੇ ਪੰਜਾਂ ਸਥਾਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦੋ ਜੋਤਿਰਲਿੰਗ ਹਨ।
ਸਾਵਣ ਮਹੀਨੇ ਦੇ ਪਹਿਲੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਦੀ ਵੱਡੀ ਯਾਤਰਾ (ਮੇਲਾ) ਭਰਦੀ ਹੈ। ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪਾਲਕੀ ਵਿੱਚ ਰੱਖਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸਦੀ ਵਿਧੀਵਤ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਖੀਰ ਦਾ ਪ੍ਰਸਾਦ ਬਣਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਸਾਰੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਪ੍ਰਸਾਦ ਵੰਡਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਪਿੰਡ ਵਿੱਚੋਂ ਪਾਲਕੀ ਦੀ ਸ਼ੋਭਾ ਯਾਤਰਾ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਦੂਜਾ ਸਮਾਗਮ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਛਠੀ ਤੋਂ ਸ਼ੁਰੂ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਜਿਨ੍ਹਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੇ ਸੁੱਖਣਾ ਸੁੱਖੀਆਂ ਹਨ, ਉਨ੍ਹਾਂ ਵੱਲੋਂ ਭਗਵਾਨ ਨੂੰ ਸ਼ਾਲ, ਪੱਗਾਂ ਅਤੇ ਸਾਫੇ ਭੇਟ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮਾਘ ਮੱਸਿਆ ਦੇ ਤੀਜੇ ਦਿਨ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਦਾ ਰਥ ਉਤਸਵ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਦੀ ਪੰਚਧਾਤੂ ਦੀ ਮੂਰਤੀ ੧੬ ਖੰਭਿਆਂ ਵਾਲੇ ਰੱਥ ਵਿੱਚ ਰੱਖੀ ਜਾਂਦੀ ਹੈ ਅਤੇ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਦੀ ਵਿਸ਼ਾਲ ਸ਼ੋਭਾ ਯਾਤਰਾ ਨਿਕਲਦੀ ਹੈ।
ਪਿੰਡ ਦਾ ਦੂਜਾ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਮੰਦਰ ਰਾਮੇਸ਼ਵਰ ਦਾ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਰ ਪਿੰਡ ਦੇ ਇੱਕ ਪਾਸੇ ਸਥਿਤ ਹੈ ਅਤੇ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਲਗਭਗ ੧੩ਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਚੌਰਸ ਆਕਾਰ ਦਾ ਖੂਹ ਹੈ ਅਤੇ ਇਸਦੀ ਬਣਤਰ ਬਹੁਤ ਵਿਲੱਖਣ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਖੂਹ ਵਿੱਚ ਉਤਰਨ ਲਈ ਪੌੜੀਆਂ ਬਣੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਅੱਠ ਤੋਂ ਦਸ ਪੌੜੀਆਂ ਉੱਤੇ ਖੂਹ ਦੀ
ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਘੁੰਮਣ ਲਈ ਇੱਕ ਜੰਗਲਾ (ਕਠੜਾ) ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇਸ ਜੰਗਲੇ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਦੀ ਕੰਧ ਉੱਤੇ ਬਾਰਾਂ ਖ਼ਾਨੇ (ਕੋਨਾਡੇ) ਹਨ ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਦਾ ਕੰਮ ਕੀਤਾ ਹੋਇਆ ਹੈ। ਭਾਵੇਂ ਅੱਜ ਇਹਨਾਂ ਖ਼ਾਨਿਆਂ ਵਿੱਚ ਮੂਰਤੀਆਂ ਨਹੀਂ ਹਨ, ਪਰ ਉਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਖ਼ਾਨੇ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਭੈਰਵ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅੱਜ ਵੀ ਚੰਗੀ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਹੈ।
ਰਾਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਉੱਤੇ ਕਈ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਸ਼ਿਲਪਕਲਾਵਾਂ ਅਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਬਾਹਰੀ ਪਾਸੇ ਕਈ ਮੈਥੁਨ ਸ਼ਿਲਪ ਮੌਜੂਦ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਅੰਦਰਲੇ ਖੰਭਿਆਂ ਉੱਤੇ ਬਾਰੀਕ ਨੱਕਾਸ਼ੀ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸ਼ੇਸ਼ਸ਼ਾਹੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੀ ਸੁੰਦਰ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੇ ਚਾਰ ਹੱਥ ਹਨ ਅਤੇ ਪੈਰਾਂ ਕੋਲ ਗਰੁੜ ਅਤੇ ਨਾਭੀ ਵਿੱਚੋਂ ਨਿਕਲੇ ਕਮਲ ਵਿੱਚ ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹਨ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਪਿੰਡ ਦੇ ਪੰਜ ਸਥਾਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਰਾਮੇਸ਼ਵਰ ਦਾ ਇਹ ਤੀਜਾ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਸਥਾਨ ਹੈ।
ਚੌਥਾ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਸਥਾਨ ਭਾਵਲਿੰਗ ਹੈ। ਇਹ ਸਥਾਨ ਪਿੰਡ ਦੇ ਨੇੜੇ ਇੱਕ ਪਹਾੜੀ ਉੱਤੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਇੱਥੇ ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਦੀ ਲਗਭਗ ੭ ਮੀਟਰ ਉੱਚੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਗਲੇ ਵਿੱਚ ਰੁਦਰਾਕਸ਼ ਦੀ ਮਾਲਾ ਹੈ, ਸੱਜੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਹੈ ਅਤੇ ਖੱਬਾ ਹੱਥ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਦੀ ਮੁਦਰਾ ਵਿੱਚ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਚਰਨਾਂ ਨੇੜੇ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਹ ਸਥਾਨ ਦੂਰੋਂ ਹੀ ਨਜ਼ਰ ਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵੱਡਾ ਪੱਥਰ ਹੈ। ਇਸ ਪੱਥਰ ਬਾਰੇ ਇਹ ਕਥਾ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹੈ ਕਿ ਕਈ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਇੱਕ ਗਾਂ ਦੇ ਖੁਰ ਵਿੱਚ ਫਸਿਆ ਹੋਇਆ ਪੱਥਰ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਉਸਦੇ ਪੈਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਡਿੱਗ ਪਿਆ ਸੀ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਸ ਪੱਥਰ ਦਾ ਆਕਾਰ ਵਧਣ ਲੱਗਾ। ਉਸ ਪੱਥਰ ਦੇ ਵਾਧੇ ਨੂੰ ਰੋਕਣ ਲਈ ਇੱਥੇ ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀ ਗਈ। ਇਸ ਕਾਰਨ ਉਸ ਪੱਥਰ ਦਾ ਉਚਾਈ ਵਿੱਚ ਵਧਣਾ ਤਾਂ ਰੁਕ ਗਿਆ, ਪਰ ਉਹ ਚੌੜਾਈ ਵਿੱਚ ਵਧਣ ਲੱਗਾ।
ਇੱਥੇ ਪੰਜਵਾਂ ਜੋਤਿਰਲਿੰਗ ਇਸ ਪਿੰਡ ਦਾ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਰ ਪਿੰਡ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਇੱਕ ਖੁੱਲ੍ਹੀ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸਾਵਣ ਦੇ ਹਰ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਸ਼ਿਵਲੀਲਾਮ੍ਰਿਤ ਦਾ ਪਾਠ ਅਤੇ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦੇ ਦਿਨ ਪਾਰਾਇਣ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਪੁਰਾਣੀ ਪ੍ਰਥਾ ਅਨੁਸਾਰ ਸਾਵਣ ਦੇ ਚੌਥੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਦੀ ਪਾਲਕੀ ਇਸ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆਉਂਦੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦਾ ਅਭਿਸ਼ੇਕ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਖੀਰ ਦਾ ਪ੍ਰਸ਼ਾਦ ਭੰਡਾਰੇ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਦਿੱਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਫਿਰ ਇਹ ਪਾਲਕੀ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਵੱਲ ਵਾਪਸ ਚਲੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਖਟਾਓ ਤੋਂ ੨੨ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਸਤਾਰਾ ਤੋਂ ੫੨ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਖਟਾਵ ਤੋਂ ਗੁਰਸਾਲੇ ਆਉਣ ਲਈ ਐਸ.ਟੀ. (GSRTC) ਦੀ ਸਹੂਲਤ।
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ।
- ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਉਪਲਬਧ ਨਹੀਂ ਹੈ।
मंदिरे
Temples
मंदिर
-
मेणेश्वर मंदिर / विष्णू मंदिर मेणवली, ता. वाई, जि. सातारा
अधिक माहितीMeneshwar Temple / Vishnu Temple Menavli, Tal. Wai, Dist. Satara
View Detailsमेणेश्वर मंदिर / विष्णु मंदिर मेणवली, तह. वाई, जि. सातारा
विवरण देखें -
कृष्णामाई मंदिर प्रिती संगम, कराड, ता. कराड, जि. सातारा
अधिक माहितीKrishnamai Temple Priti Sangam, Karad, Tal. Karad, Dist. Satara
View Detailsकृष्णामाई मंदिर प्रीति संगम, कराड, ता. कराड, जि. सातारा
विवरण देखें -
जानाई देवी राजाळे, ता. फलटण, जि. फलटण
अधिक माहितीJanai Devi Rajale, Ta. Phaltan, Dist. Phaltan
View Detailsजानाई देवी राजाळे, ता. फलटण, जि. फलटण
विवरण देखें

