सिद्धेश्वर मंदिर 

देवाडा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर

स्वातंत्र्यपूर्व काळात हैद्राबाद संस्थानचा भाग असलेला राजुरा तालुका १९५९ मध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याचा भाग बनला. ऐतिहासिक नोंदींनुसार प्राचीन काळापासून राजुरा हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. त्यामुळे येथे अनेक प्राचीन वास्तू आहेत. राजुरा शहरात १२व्या शतकातील भव्य सोमेश्वर मंदिर आहे. साधारणतः त्याच कालावधीतील देवाडा येथील सिद्धेश्वर मंदिर येथील १२ हेमाडपंती मंदिरांचा समूह प्रसिद्ध आहे. सिद्धेश्वर मंदिर हे विदर्भासह तेलंगणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून येथील मंदिर समूहाच्या जीर्णोद्धारासाठी नूतनीकरणासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे २०२३ मध्ये १५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

महाराष्ट्र तेलंगणाच्या सीमेवर असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या तालुक्याचे शेवटचे गाव असलेल्या देवाडा परिसरात सिद्धेश्वर मंदिर आहे. असे सांगितले जाते की येथे पूर्वी १२ मंदिरांचा समूह होता; परंतु कालौघात त्यातील अनेक मंदिरे भग्न झाली असून केवळ एकच सिद्धेश्वर मंदिर शाबूत आहे. या मंदिराच्या आजूबाजूला अनेक मंदिरांचे भग्न अवशेष आहेत. या अवशेषांवरून ही मंदिरे १२व्या किंवा १३व्या शतकातील असावीत, असा अभ्यासकांचा दावा आहे. निसर्गसमृद्ध वातावरणात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या ठिकाणी शिवरात्री श्रावणात मोठे उत्सव होतात. त्यावेळी मराठवाडा विदर्भासह तेलंगणातूनही लाखो भाविक उपस्थित असतात.

राजुराआसिफाबाद मार्गावर देवाडा गाव असून तेथून किमी अंतरावर सिद्धेश्वर मंदिर आहे. हा मंदिर समूह बाळाघाटाच्या उतरणीवर आहे. येथील सर्व मंदिरे हेमाडपंती रचनेची असली तरी त्यांच्या स्तंभांवर भिंतींवर फारसे कोरीवकाम आढळत नाही. या परिसरात अनेक विरगळी हात जोडलेल्या अवस्थेतील दगडी मूर्ती पाहायला मिळतात. पश्चिमाभिमुख असलेल्या सिद्धेश्वर मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी आहे. या मूळ मंदिरासमोर आणखी एक सभामंडप नंतर बांधलेला असून त्यावर पत्र्याची शेड आहे. त्यात एक प्राचीन शेंदूरचर्चित गणेशमूर्ती असून या मूर्तीच्या रचनेवरून ती वाकाटककालीन असावी, असे सांगितले जातेगणेश मूर्तीच्या बाजूला १२ शिवपिंडी आहेत. या प्रत्येक शिवपिंडींच्या वर अभिषेक पात्र असून त्यांतून सतत या पिंडींवर जलाभिषेक होत असतो. कदाचित येथील भग्न झालेल्या देवालयातील या शिवपिंडी येथे एकत्र ठेवण्यात आल्या असाव्यात.

या सभामंडपातून मुख्य मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अनेक प्राचीन मूर्ती ठेवलेल्या दिसतात. त्याही मूर्ती इतर मंदिरांमधील आहेत, असे सांगितले जाते. सभामंडपाच्या मध्यभागी नंदी असून अंतराळात गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर काही शिल्पांचे अंकन आहे. त्यामध्ये एक पद्मासनात बसलेला पुरुष दुसरे स्त्रीशिल्प आहे. गर्भगृहाच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहातील शिवपिंडी पूर्व दक्षिण यांच्यामध्ये ईशान्य दिशेला आहे. या प्राचीन शिवपिंडीवर पितळी पत्र्याचे आवरण आहे. मंदिराच्या शेजारी समोरच्या बाजूला मंदिरे भग्नावस्थेत असून मंदिरे पूर्णतः जमीनदोस्त झालेली आहेत. त्यामुळे या सर्व परिसरात मंदिरांचे मोठेमोठे पाषाण, विरगळी सर्वत्र विखुरलेले दिसतात.

येथील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अगदी ५० ते ६० वर्षांपूर्वी येथील सर्वच्या सर्व म्हणजे १२ मंदिरे अगदी सुस्थितीत होती. १९६० च्या सुमारास राजुराबल्लारपूर मार्गासाठी वर्धा नदीवर पूल बांधण्यात आला. त्यावेळी ठेकेदाराकडून या मंदिर परिसरातील दगडांचा वापर करण्यात आला. त्यामुळे येथील काही मंदिरे पडली काही भग्न झाली. तेव्हापासून या परिसराचे वैभव संपुष्टात आले असले तरी भाविकांची श्रद्धा मात्र कणभरही कमी झालेली नाही, हे येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येवरून जाणवते.

सिद्धेश्वर मंदिराच्या मागे कुंड असून त्यात बाराही महिने पाणी असते. मार्गशीर्ष महिन्यातील दर शनिवारी सोमवारी हजारो भाविक या परिसरात जेवण करून त्याचा नैवेद्य सिद्धेश्वराला दाखवितात. पूर्वीपासून ही प्रथा येथे असून आताही ती पाळली जाते. या भागात राहणारी तेलंगणातील तेलगू मंडळी येथे रविवारी जास्त संख्येने येतात. श्रावणात शिवरात्रीला हा परिसर भाविकांनी गजबजून जातो.

२०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाकडून सिद्धेश्वर मंदिर परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले त्यासंबंधीचा आराखडा प्रस्ताव २०२३ मध्ये सरकारकडे सादर करण्यात आला. त्यानुसार येथे येणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या मंदिर समूहाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी २०२३ मध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे निधी देण्यात आला. फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्य सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून भूमिपूजन करून येथील कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या तीर्थक्षेत्राचादर्जात समावेश होणार आहे. त्यामुळे पुढील काळात हे स्थान तीर्थक्षेत्रासोबतच महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणूनही विकसित होऊ शकेल.

या मंदिरापासून साधारणतः किमी अंतरावर येथील डोंगरावर भीवसेन देवस्थान आहे. गोंड समाजाचे ते श्रद्धास्थान आहे. येथे नवसपूर्तीनंतर मातीचे घोडे देवाला वाहण्याची प्रथा आहे. वेळेवर पाऊस पडला नाही वा इतर काही अडचणी असल्यास गोंड भाविकांकडून या देवाला बळी दिले जातात.

उपयुक्त माहिती:

  • राजुरापासून १८ किमी, चंद्रपूरपासून ४४ किमी अंतरावर
  • राजुरापासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही

सिद्धेश्वर मंदिर

देवाडा, तह. राजुरा, जि. चंद्रपूर

स्वतंत्रता पूर्व काल में हैदराबाद रियासत का भाग रही राजुरा तहसील को वर्ष १९५९ में महाराष्ट्र के चंद्रपुर जिले में सम्मिलित किया गया। ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार प्राचीन काल से ही राजुरा एक व्यापारिक केंद्र रहा है। यहाँ कई प्राचीन स्थापत्य शैलियाँ विद्यमान हैं। राजुरा शहर में १२वीं सदी का भव्य सोमेश्वर मंदिर है। लगभग उसी काल का देवाडा में स्थित सिद्धेश्वर मंदिर और १२ हेमाडपंती मंदिरों का समूह भी प्रसिद्ध है। सिद्धेश्वर मंदिर विदर्भ और तेलंगाना के लाखों श्रद्धालुओं का प्रमुख आस्था केंद्र है। इस मंदिर समूह के जीर्णोद्धार और नवीनीकरण के लिए महाराष्ट्र सरकार ने वर्ष २०२३ में १५ करोड़ रुपये की निधि स्वीकृत की।

महाराष्ट्र और तेलंगाना की सीमा पर स्थित चंद्रपुर जिले की राजुरा तहसील के अंतिम गाँव देवाडा में सिद्धेश्वर मंदिर है। कहा जाता है कि यहाँ पहले १२ मंदिरों का समूह था। समय के साथ कई मंदिर खंडित हो गए। अब केवल सिद्धेश्वर मंदिर ही सुरक्षित बचा है। मंदिर के समीप अनेक मंदिरों के भग्नावशेष देखे जा सकते हैं। ये १२वीं या १३वीं सदी के माने जाते हैं। प्राकृतिक सौंदर्य से परिपूर्ण और पहाड़ की तलहटी में स्थित इस स्थान पर शिवरात्रि और श्रावण मास में बड़े उत्सव आयोजित होते हैं। इनमें मराठवाड़ा, विदर्भ और तेलंगाना से लाखों श्रद्धालु आते हैं।

राजुरा-आसिफाबाद मार्ग पर देवाडा गाँव से लगभग २ किमी दूर यह मंदिर समूह बालाघाट की ढलान पर स्थित है। सभी मंदिर हेमाडपंती शैली में हैं। इनके स्तंभों और दीवारों पर नक्काशी का कार्य बहुत कम है। आसपास कई वीर-शिलाएँ और हाथ जोड़कर बैठी पाषाण की मूर्तियाँ हैं। पश्चिमाभिमुख सिद्धेश्वर मंदिर की संरचना सभामंडप, अंतराल और गर्भगृह की है। मूल मंदिर के सम्मुख एक और सभामंडप बाद में बनाया गया है। इसकी छत पर टीन शेड है। इसमें एक प्राचीन सिंदूर लेपित गणेश मूर्ति है। यह वाकाटक काल की मानी जाती है। गणेश मूर्ति के समीप १२ शिवलिंग स्थापित हैं। इन पर निरंतर जलाभिषेक होता है। संभवतः ये शिवलिंग पुराने खंडित मंदिरों से यहाँ लाए गए हों।

सभामंडप से मुख्य मंदिर में प्रवेश करते समय द्वार के दोनों ओर कई प्राचीन मूर्तियाँ रखी हैं। ये अन्य मंदिरों की हैं। सभामंडप के मध्य में नंदी स्थित हैं। अंतराल में गर्भगृह की द्वारशाखा पर कुछ शिल्प उत्कीर्ण हैं। इनमें एक पद्मासन में बैठा पुरुष और एक स्त्री-शिल्प है। गर्भगृह के ललाटबिंब पर गणेश मूर्ति है। गर्भगृह में शिवलिंग पूर्व और दक्षिण दिशाओं के बीच ईशान कोण में स्थित है। प्राचीन शिवलिंग पर पीतल का आवरण चढ़ाया गया है। मंदिर के समीप और सम्मुख चार मंदिर जर्जर अवस्था में हैं। सात मंदिर पूरी तरह धँस चुके हैं। पूरे क्षेत्र में बड़े-बड़े पाषाण और वीर-शिलाएँ बिखरी हुई हैं।

स्थानीय लोगों के अनुसार लगभग ५०–६० साल पहले यहाँ के सभी १२ मंदिर अच्छी स्थिति में थे। १९६० के आसपास राजुरा-बल्लारपुर मार्ग के लिए वर्धा नदी पर पुल का निर्माण हुआ। उस समय ठेकेदार ने मंदिर परिसर के पत्थरों का प्रयोग किया। इस कारण कई मंदिर गिर गए या खंडित हो गए। तब से इस परिसर का वैभव कम हो गया। परंतु श्रद्धालुओं की श्रद्धा कम नहीं हुई।

सिद्धेश्वर मंदिर के पीछे कुंड है। इसमें निरंतर जल रहता है। मार्गशीर्ष मास में हर शनिवार और सोमवार हजारों श्रद्धालु यहाँ भोजन करते हैं। वे उसका भोग सिद्धेश्वर को अर्पित करते हैं। यह प्रथा आज भी जारी है। यहाँ तेलंगाना से आने वाले तेलुगु समुदाय के लोग विशेष रूप से रविवार को आते हैं। श्रावण और शिवरात्रि में मंदिर परिसर श्रद्धालुओं से भरा रहता है।

वर्ष २०२२ में महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग ने सिद्धेश्वर मंदिर परिसर का सर्वेक्षण किया। वर्ष २०२३ में राज्य सरकार को प्रस्ताव सौंपा गया। फरवरी २०२४ में भूमिपूजन कर जीर्णोद्धार का कार्य शुरू हुआ। राज्य सरकार के अनुसार यह तीर्थस्थल ‘ब’ श्रेणी में सम्मिलित किया गया है। भविष्य में यह धार्मिक तीर्थस्थल और पर्यटन केंद्र दोनों के रूप में विकसित हो सकेगा।

सिद्धेश्वर मंदिर से लगभग १ किमी दूर पर्वत पर भीवसेन देवस्थान है। यह गोंड समाज का आस्था केंद्र है। यहाँ मन्नत पूरी होने के बाद मिट्टी के घोड़े देवता को अर्पित किए जाते हैं। यदि वर्षा समय पर नहीं होती या अन्य बाधाएँ आती हैं, तो गोंड श्रद्धालु यहाँ बलि देते हैं।

प्रमुख विशेषताएँ

  • राजुरा से १८ किमी, चंद्रपुर से ४४ किमी दूरी
  • राजुरा से बस सुविधा उपलब्ध
  • निजी वाहन सीधे मंदिर तक पहुँच सकते हैं
  • परिसर में भक्तनिवास और भोजन की सुविधा नहीं है
Back To Home