श्रीहरी बालाजी मंदिर
चिमूर शहर, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
विदर्भातील प्राचीन देवालयांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील मार्कण्डेय मंदिराला ‘चक्रवर्ती’, तर चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील बालाजी मंदिराला ‘सम्राट’ ही उपमा दिली जाते. चिमूरमधील बालाजी मंदिरातील मूर्ती ही तिरुपती येथील प्रसिद्ध बालाजी मंदिरातील मूर्तीसारखीच आहे. या स्थानाला ‘श्रीहरी बालाजी’ असेही म्हटले जाते. संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर येथील ‘घोडायात्रे‘साठी प्रसिद्ध असून या यात्रेला सुमारे २५० वर्षांची परंपरा आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की येथील शेतकरी भिकुजी पाटील यांना या स्थानावर जनावरांसाठी गोठा बांधायचा होता. त्यासाठी त्यांनी येथे खोदकाम सुरू केले. काम सुरू असताना एका ठिकाणी कुदळ धातूला लागल्यासारखा आवाज आला. त्यांनी तेथील माती बाजूला केली असता तेथे एक मूर्ती असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हळूवारपणे मूर्ती मातीतून काढली व स्वच्छ केली. ती बालाजीची मूर्ती होती. याच ठिकाणी त्यांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
ऐतिहासिक नोंदींनुसार, १७५७ साली पेशव्यांचे दिवाण दिवाकर पुरुषोत्तम ऊर्फ देवाजीपंत चोरघडे यांच्या विनंतीवरून जानोजी भोसले यांनी येथे बालाजी मंदिर उभारण्यासाठी २०० एकर जमीन दिली.
तसेच मंदिराच्या खर्चासाठी १६१२ रुपयांचे वार्षिक उत्पन्न लावून दिले. २०० एकर जागेपैकी ६० एकरावर पाण्यासाठी तलाव बांधण्यात आला. मराठ्यांच्या इतिहासात नावारूपाला आलेल्या साडेतीन शहाण्यांपैकी चिमूरचे देवाजीपंत चोरघोडे एक होत. याच चोरघोडे यांनी चिमूरच्या श्रीहरी बालाजीच्या घोडायात्रेची सुरुवात केली.
विविधतेने नटलेला विदर्भ हा नैसर्गिक, धार्मिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची चिमूर ही कर्मभूमी. येथे असलेले बालाजी मंदिर महाराष्ट्राचे तिरुपती म्हणून प्रसिद्ध आहे. तिरुपतीच्या बालाजीला बोललेला नवस येथे फेडलेला चालतो, पण या बालाजीला केलेला नवस तिरुपतीला फेडले जात नाहीत, ते येथेच फेडावे लागतात, अशी मान्यता आहे. तटबंदीयुक्त प्रासाद असलेल्या मंदिराला उंच प्रवेशद्वार असून त्यावर कोरीवकाम आहे. येथील लाकडी सभामंडपात १२ स्तंभ आहेत. त्यावर हत्ती, वाघ असे प्राणी कोरलेले आहेत. त्यापुढे ४ दगडी खांब असलेला अजून एक सभामंडप आहे.
मंदिरातील बालाजीची काळ्या पाषाणातील मूर्ती १००० ते १२०० वर्षे प्राचीन असावी, असे सांगितले जाते. या मूर्तीस ‘सनक सदानंद’ असे म्हटले जाते. मूर्तीच्या दोन्ही बाजूला सिद्ध पुरुषांच्या पद्मासनातील प्रतिमा आहेत. देवाजीपंत चोरघडे यांच्या प्रयत्नाने इ.स. १७७२ साली मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. या मंदिरातील बालाजीची म्हणजेच विष्णूची मुख्य मूर्ती काळ्या गंडकी पाषाणात कोरलेली आहे. मूर्तीच्या मुखावरील भाव शांत आहेत. ही मूर्ती ४ फूट ७ इंच उंचीची असून तिच्यावर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ असून पाठशिळा २.५ फूट रुंदीची आहे. पाठशिळेवर मत्स्यापासून ते कल्कीपर्यंतचे दशावतार कोरलेले अत्यंत स्पष्टपणे दिसतात. छातीवर श्रीवत्स चिन्ह, डोक्यावर मुकुट, कर्णभूषण, जानवे, उदरबंध, नेसलेले वस्त्र, शेला, वैजंयतीमाळा या मूर्तीवर कोरलेल्या आहेत. शरीरावरील वस्त्राच्या निऱ्याही प्रमाणबद्ध आहेत. जिल्ह्यातील अनेकांचे बालाजी हे कुलदैवत आहे.
मंदिराच्या आवारात गरुड खांब असून त्याशेजारी काही समाध्या आहेत. माघ शुद्ध पंचमीला निघणारी येथील ‘घोडा यात्रा’ प्रसिद्ध आहे. १५ दिवस चालणाऱ्या या यात्रेचे नाव ‘श्री बालाजीची अश्वारूढ यात्रा‘ असे असले तरी ती ‘घोडा यात्रा’
म्हणूनच प्रसिद्ध आहे. चिमूरमधील एका कारागिराने एकसंध लाकडाच्या ओंडक्यातून तयार केलेल्या घोड्यावरून ही यात्रा निघते. हा घोडा सजवून रथात ठेवण्यात येतो आणि त्यावर स्वारमुद्रेत असलेल्या बालाजीची काष्ठप्रतिमा ठेवली जाते व शहरभर रथाची मिरवणूक काढली जाते. या यात्रेत मोठ्या प्रमाणात गुरांची खरेदी–विक्री होते. घोडा यात्रा हे येथील प्रमुख आकर्षण आहे. चिमूरमधील ही घोडायात्रा महाराष्ट्रासह मध्य भारतातील भाविकांसाठी पर्वणी असते. रात्री १२ वाजता ही यात्रा सुरू होते. रथ ओढण्यासाठी धोतर, शर्ट आणि फेटा किंवा टोपी असा पोशाख परिधान केलेले शेकडो भाविक असतात. रथाच्या समोर दिंड्या, नृत्य, लेझीम खेळणारी पथके आपल्या कला सादर करतात.
यावेळी शहरातील रस्त्यांवर रांगोळ्या काढल्या जातात. मिरवणूक मार्गावर दिव्यांची रोषणाई, फुलांची सजावट व पताका लावल्या जातात. पहाटेपर्यंत ही मिरवणूक चालते.
मंदिर समितीतर्फे मंदिराच्या आवारात भव्य भक्त निवास बांधण्यात आले असून आवारात उपाहारगृहाची सुविधा आहे. सकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना मंदिरात श्रीहरी बालाजींचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती:
- चिमूर बसस्थानकापासून १ किमी, तर चंद्रपूरपासून ५० किमी अंतरावर
- चंद्रपूरमधील अनेक तालुक्यांतून चिमूरसाठी एसटी सेवा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- निवास व न्याहरीसाठी देवस्थानतर्फे सुविधा
Shrihari Balaji Temple
Chimur City, Taluka Chimur, District Chandrapur
Among the ancient temples of Vidarbha, the Markandeya Temple in Gadchiroli district is titled ‘Chakravarti’, while the Balaji Temple in Chimur, Chandrapur district, is known as ‘Samrat’. The idol in the Chimur Balaji Temple is identical to the one in the famous Balaji Temple at Tirupati. This sacred site is also referred to as ‘Shrihari Balaji’. A place of deep faith for devotees across Vidarbha and Central India, this temple is renowned for its ‘Ghoda Yatra’ (Horse Procession), a tradition spanning approximately 250 years.
The legend of the temple states that a local farmer, Bhikuji Patil, intended to build a cowshed for his cattle on this site. While digging, his pickaxe struck something with a metallic sound. Upon clearing the soil, he discovered an idol. He gently unearthed and cleaned it, revealing it to be an idol of Balaji. He consecrated the idol at this very spot.
According to historical records, in the year 1757, at the request of the Peshwas’ Diwan, Diwakar Purushottam alias Devajipant Chorghade, Janoji Bhosale granted 200 acres of land for the construction of the Balaji Temple.
Additionally, an annual income of 1612 rupees was allocated for the temple’s expenses. Out of the 200 acres, 60 acres were used to construct a pond for water. Devajipant Chorghade of Chimur was one of the ‘three and a half wise men’ (Sade-teen Shahane) who rose to prominence in Maratha history. It was he who initiated the Shrihari Balaji Ghoda Yatra in Chimur.
Vidarbha, adorned with diversity, is rich in natural, religious, and cultural heritage. Chimur is the workplace of Rashtrasant Tukdoji Maharaj. The Balaji Temple here is famous as the ‘Tirupati of Maharashtra’. It is believed that vows made to the Balaji of Tirupati can be fulfilled here, but vows made to this Balaji cannot be fulfilled at Tirupati; they must be fulfilled here. The temple, featuring a fortified palace structure, has a tall entrance gate with intricate carvings. The wooden assembly hall (Sabhamandap) contains 12 pillars carved with figures of elephants, tigers, and other animals. Beyond this lies another assembly hall supported by 4 stone pillars.
It is said that the black stone idol of Balaji in the temple is 1000 to 1200 years old. This idol is referred to as ‘Sanak Sadanand’. On both sides of the idol are images of Siddha Purushas in Padmasana. Through the efforts of Devajipant Chorghade, the temple construction was completed in the year 1772. The main idol of Balaji, or Vishnu, is carved from black Gandaki stone. The expression on the face of the idol is serene. The idol is 4 feet 7 inches tall and features exquisite carvings. Behind the idol is a halo (Prabhaval), and the back slab is 2.5 feet wide. The Dashavatara, from Matsya to Kalki, are clearly carved on this back slab. The idol is adorned with the Shrivatsa symbol on the chest, a crown on the head, ear ornaments, a sacred thread (Janve), an abdominal band, traditional garments, a shawl, and the Vaijayanti garland. The pleats of the garments on the body are also perfectly proportioned. For many in the district, Balaji is their family deity (Kuldaivat).
In the temple courtyard stands a Garuda pillar, near which are several Samadhis. The ‘Ghoda Yatra’ held on Magh Shuddha Panchami is famous. Although this 15-day festival is named ‘Shri Balaji’s Ashvarudha Yatra’, it is popularly known as the ‘Ghoda Yatra’.
The procession features a horse carved from a single log of wood by a local artisan from Chimur. This horse is decorated and placed on a chariot, upon which a wooden image of Balaji in a riding posture is seated, and the chariot is taken in a procession throughout the city. A large-scale trade of cattle takes place during this festival. The Ghoda Yatra is the main attraction here. This festival is a grand occasion for devotees from Maharashtra and Central India. The procession begins at 12 midnight. Hundreds of devotees, dressed in dhoti, shirt, and a turban or cap, pull the chariot. In front of the chariot, Dindi groups, dancers, and Lezim troupes perform their arts.
During this time, Rangolis are drawn on the city streets. The procession route is decorated with lights, flowers, and buntings. The procession continues until dawn.
The temple committee has constructed a grand Bhakta Niwas (pilgrim lodging) within the temple premises, and there is a canteen facility available. Devotees can have the darshan of Shrihari Balaji from 5 AM to 9 PM.
Useful Information:
- 1 km from Chimur Bus Stand and 50 km from Chandrapur
- ST bus services available to Chimur from many talukas in Chandrapur
- Private vehicles can reach the temple parking lot
- Accommodation and breakfast facilities provided by the temple trust
श्रीहरि बालाजी मंदिर
चिमूर शहर, तह. चिमूर, जि. चंद्रपुर
विदर्भ के प्राचीन देवालयों में गड़चिरोली जिले का मार्कंडेय मंदिर ‘चक्रवर्ती’ कहलाता है। चंद्रपुर जिले के चिमूर स्थित बालाजी मंदिर को ‘सम्राट’ की उपमा दी जाती है। चिमूर के बालाजी मंदिर की मूर्ति प्रसिद्ध तिरुपति स्थित बालाजी मंदिर की मूर्ति से मिलती-जुलती है। इस स्थान को ‘श्रीहरि बालाजी’ भी कहा जाता है। संपूर्ण विदर्भ और मध्य भारत के श्रद्धालुओं का यह प्रमुख श्रद्धास्थान है। यह स्थान अपने ‘अश्वमेले’ के लिए प्रसिद्ध है। इसकी परंपरा लगभग २५० वर्ष पुरानी है।
किंवदंती के अनुसार यहाँ के कृषक भिकुजी पाटील को इस स्थान पर अपनी पशुशाला बनानी थी। खुदाई करते समय उनकी कुदाल के किसी धातु से टकराने जैसी ध्वनि आई। मिट्टी हटाने पर उन्हें एक मूर्ति दिखाई दी। उन्होंने धीरे-धीरे मूर्ति को बाहर निकालकर साफ किया। वह बालाजी की मूर्ति निकली। इसी स्थान पर उनकी स्थापना की गई।
ऐतिहासिक विवरण के अनुसार १७५७ में पेशवा के दीवान दिवाकर पुरुषोत्तम उर्फ देवाजीपंत चोरघडे ने एक आग्रह किया था। उनके आग्रह पर जानोजी भोसले ने यहाँ मंदिर निर्माण हेतु २०० एकड़ भूमि दान दी। मंदिर के खर्च के लिए १६१२ रुपये का सालाना अनुदान भी दिया गया। २०० एकड़ में से ६० एकड़ भूमि पर सरोवर बनाया गया। मराठा इतिहास में प्रसिद्ध ‘साढ़े तीन विद्वानों’ में से एक देवाजीपंत चोरघडे थे। उन्होंने ही चिमूर में श्रीहरि बालाजी के ‘अश्वमेले’ की शुरुआत की।
चिमूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की कर्मभूमि है। यहाँ का बालाजी मंदिर ‘महाराष्ट्र का तिरुपति’ कहलाता है। तिरुपति बालाजी से किए गए संकल्प यहाँ पूरे किए जा सकते हैं। ऐसी मान्यता है कि यहाँ किए गए संकल्प तिरुपति में पूरे नहीं किए जा सकते।
प्राचीर युक्त इस मंदिर का भव्य प्रवेशद्वार नक्काशीदार सजावट से सुशोभित है। काष्ठ निर्मित सभामंडप में १२ स्तंभ हैं। इन पर हाथी और बाघ जैसे पशुओं की नक्काशी की गई है। इसके आगे चार पत्थर के स्तंभों वाला एक और सभामंडप है।
मंदिर में स्थापित काले पाषाण की बालाजी मूर्ति लगभग १०००–१२०० वर्ष पुरानी मानी जाती है। इसे ‘सनक सदानंद’ कहा जाता है। मूर्ति के दोनों ओर पद्मासनस्थ सिद्ध पुरुषों की आकृतियाँ हैं। देवाजीपंत चोरघडे के प्रयासों से ईस्वी सन् १७७२ में मंदिर निर्माण पूर्ण हुआ।
यह मुख्य विष्णु मूर्ति काले गंडकी पाषाण से निर्मित है। मूर्ति की ऊँचाई ४ पद ७ इंच है। इसके पीछे का प्रभामंडल और २.५ पद चौड़ी पीठशिला दर्शनीय है। इस पर मत्स्य से कल्कि तक के दशावतार की स्पष्ट नक्काशी है। मूर्ति पर मुकुट, कर्णाभूषण, यज्ञोपवीत, उदरबंध, कटिबंध और वैजयंतीमाला आदि के मनोहर शिल्पांकन हैं। वस्त्रों की नक्काशी अत्यंत सुसंगत है। चंद्रपुर जिले के अनेक लोगों के कुलदेवता यही बालाजी हैं।
मंदिर परिसर में गरुड़ स्तंभ स्थित है। इसके समीप कुछ समाधियाँ स्थित हैं। माघ शुद्ध पंचमी को निकलने वाला ‘अश्वमेला’ अत्यंत प्रसिद्ध है। यह मेला १५ दिनों तक चलता है। यद्यपि इसका नाम ‘श्री बालाजी का अश्वारूढ़ मेला’ है। तथापि इसे ‘अश्वमेला’ ही कहा जाता है। चिमूर के एक शिल्पकार ने एक ही लकड़ी के तने से अश्व बनाया था। इसे सजाकर रथ में रखा जाता है। उस पर सवार मुद्रा में बालाजी की मूर्ति स्थापित की जाती है। रथ की शोभायात्रा नगर में निकलती है।
इस मेले में भारी संख्या में पशुओं का क्रय-विक्रय भी होता है। रात १२ बजे शुरू होने वाली इस शोभायात्रा में सैकड़ों श्रद्धालु सम्मिलित होते हैं। वे धोती, कुर्ता और साफ़ा या टोपी पहनकर रथ खींचते हैं। भजन मंडलियाँ, नृत्य और लेझिम दल अपनी कला प्रस्तुत करते हैं। मार्ग पर रंगोलियाँ, रोशनी, पुष्प सजावट और पताकाएँ होती हैं। शोभायात्रा प्रातः काल तक चलती है। मंदिर समिति ने परिसर में भव्य भक्तनिवास और जलपानगृह की व्यवस्था की है। सुबह ५ से रात ९ बजे तक दर्शन की सुविधा उपलब्ध है।
प्रमुख विशेषताएँ
- चिमूर बस स्टैंड से १ किमी और चंद्रपुर से ५० किमी की दूरी है।
- चंद्रपुर जिले की अनेक तहसीलों से चिमूर हेतु राज्य परिवहन बस सेवा उपलब्ध है।
- निजी वाहन मंदिर के वाहनतल तक जा सकते हैं।
- निवास और जलपान की सुविधा देवस्थान द्वारा उपलब्ध है।
શ્રીહરિ બાલાજી મંદિર
ચિમૂર શહેર, તા. ચિમૂર, જિ. ચંદ્રપુર
વિદર્ભના પ્રાચીન દેવાલયોમાં ગડચિરોલી જિલ્લાના માર્કંડેય મંદિરને ‘ચક્રવર્તી’, તો ચંદ્રપુર જિલ્લાના ચિમૂર સ્થિત બાલાજી મંદિરને ‘સમ્રાટ’ની ઉપમા આપવામાં આવે છે. ચિમૂરના બાલાજી મંદિરમાં બિરાજમાન મૂર્તિ તિરુપતિના પ્રસિદ્ધ બાલાજી મંદિરની મૂર્તિ જેવી જ છે. આ સ્થાનને ‘શ્રીહરિ બાલાજી’ તરીકે પણ ઓળખવામાં આવે છે. સમગ્ર વિદર્ભ અને મધ્ય ભારતના ભાવિકોનું શ્રદ્ધાસ્થાન રહેલું આ મંદિર અહીંની ‘ઘોડા યાત્રા’ માટે પ્રસિદ્ધ છે અને આ યાત્રાની આશરે ૨૫૦ વર્ષ જૂની પરંપરા છે.
મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે, અહીંના ખેડૂત ભિકુજી પાટીલને આ સ્થાન પર પશુઓ માટે ગમાણ બાંધવી હતી. તે માટે તેમણે અહીં ખોદકામ શરૂ કર્યું. કામ ચાલુ હતું ત્યારે એક જગ્યાએ પાવડો ધાતુ સાથે અથડાયો હોય તેવો અવાજ આવ્યો. તેમણે ત્યાંની માટી દૂર કરી ત્યારે તેમને ત્યાં એક મૂર્તિ હોવાનું જણાયું. તેમણે હળવેકથી મૂર્તિ માટીમાંથી બહાર કાઢી અને સ્વચ્છ કરી. તે બાલાજીની મૂર્તિ હતી. આ જ સ્થળે તેમણે આ મૂર્તિની પ્રતિષ્ઠા કરી.
ઐતિહાસિક નોંધો અનુસાર, ઈ.સ. ૧૭૫૭માં પેશવાના દીવાન દિવાકર પુરુષોત્તમ ઉર્ફે દેવાજીપંત ચોરઘડેની વિનંતી પરથી જાનોજી ભોંસલેએ અહીં બાલાજી મંદિર બનાવવા માટે ૨૦૦ એકર જમીન આપી હતી.
તેમજ મંદિરના ખર્ચ માટે ૧૬૧૨ રૂપિયાની વાર્ષિક આવકની વ્યવસ્થા કરી આપી હતી. ૨૦૦ એકર જમીનમાંથી ૬૦ એકરમાં પાણી માટે તળાવ બાંધવામાં આવ્યું હતું. મરાઠા ઈતિહાસમાં નામના મેળવનાર સાડા ત્રણ શાણાઓ પૈકી ચિમૂરના દેવાજીપંત ચોરઘડે એક હતા. આ ચોરઘડેએ જ ચિમૂરની શ્રીહરિ બાલાજીની ઘોડા યાત્રાની શરૂઆત કરી હતી.
વિવિધતાથી નટેલું વિદર્ભ પ્રાકૃતિક, ધાર્મિક તેમજ સાંસ્કૃતિક દ્રષ્ટિએ સમૃદ્ધ છે. રાષ્ટ્રસંત તુકડોજી મહારાજની કર્મભૂમિ ચિમૂર છે. અહીંનું બાલાજી મંદિર મહારાષ્ટ્રના તિરુપતિ તરીકે પ્રસિદ્ધ છે. તિરુપતિના બાલાજીને બોલેલી માનતા અહીં પૂરી કરી શકાય છે, પરંતુ આ બાલાજીને કરેલી માનતા તિરુપતિમાં પૂરી કરી શકાતી નથી, તે અહીં જ પૂરી કરવી પડે છે, એવી માન્યતા છે. કિલ્લેબંધી ધરાવતા આ મંદિરને ઊંચો પ્રવેશદ્વાર છે અને તેના પર કોતરણીકામ છે. અહીંના લાકડાના સભામંડપમાં ૧૨ સ્તંભ છે. તેના પર હાથી, વાઘ જેવા પ્રાણીઓ કોતરેલા છે. તેની આગળ ૪ પથ્થરના થાંભલા ધરાવતો વધુ એક સભામંડપ છે.
મંદિરમાં બાલાજીની કાળા પાષાણની મૂર્તિ ૧૦૦૦ થી ૧૨૦૦ વર્ષ પ્રાચીન હોવાનું કહેવાય છે. આ મૂર્તિને ‘સનક સદાનંદ’ કહેવામાં આવે છે. મૂર્તિની બંને બાજુએ સિદ્ધ પુરુષોની પદ્માસનસ્થ પ્રતિમાઓ છે. દેવાજીપંત ચોરઘડેના પ્રયત્નોથી ઈ.સ. ૧૭૭૨માં મંદિરનું બાંધકામ પૂર્ણ થયું. આ મંદિરમાં બાલાજીની એટલે કે વિષ્ણુની મુખ્ય મૂર્તિ કાળા ગંડકી પાષાણમાં કોતરેલી છે. મૂર્તિના મુખ પરના ભાવ શાંત છે. આ મૂર્તિ ૪ ફૂટ ૭ ઈંચ ઊંચી છે અને તેના પર વિશિષ્ટ કોતરણીકામ છે. મૂર્તિની પાછળ પ્રભાવળ છે અને પાછળની શિલા ૨.૫ ફૂટ પહોળી છે. પાછળની શિલા પર મત્સ્યથી લઈને કલ્કિ સુધીના દશાવતાર ખૂબ જ સ્પષ્ટપણે કોતરેલા જોવા મળે છે. છાતી પર શ્રીવત્સ ચિહ્ન, માથા પર મુકુટ, કર્ણભૂષણ, જનોઈ, ઉદરબંધ, પહેરેલું વસ્ત્ર, ખેસ, વૈજયંતીમાળા મૂર્તિ પર કોતરેલા છે. શરીર પરના વસ્ત્રની ઘડીઓ પણ પ્રમાણબદ્ધ છે. જિલ્લાના અનેક લોકોના બાલાજી કુળદેવતા છે.
મંદિરના પરિસરમાં ગરુડ સ્તંભ છે અને તેની બાજુમાં કેટલીક સમાધિઓ છે. માઘ શુદ્ધ પંચમીએ નીકળતી અહીંની ‘ઘોડા યાત્રા’ પ્રસિદ્ધ છે. ૧૫ દિવસ ચાલતી આ યાત્રાનું નામ ‘શ્રી બાલાજીની અશ્વારૂઢ યાત્રા’ હોવા છતાં તે ‘ઘોડા યાત્રા’
તરીકે જ પ્રસિદ્ધ છે. ચિમૂરના એક કારીગરે એકસંધ લાકડાના ટુકડામાંથી તૈયાર કરેલા ઘોડા પર આ યાત્રા નીકળે છે. આ ઘોડાને શણગારીને રથમાં રાખવામાં આવે છે અને તેના પર અશ્વારૂઢ મુદ્રામાં રહેલી બાલાજીની કાષ્ઠ પ્રતિમા મૂકવામાં આવે છે અને શહેરભરમાં રથની શોભાયાત્રા કાઢવામાં આવે છે. આ યાત્રામાં મોટા પાયે પશુઓની લે-વેચ થાય છે. ઘોડા યાત્રા અહીંનું મુખ્ય આકર્ષણ છે. ચિમૂરની આ ઘોડા યાત્રા મહારાષ્ટ્ર સહિત મધ્ય ભારતના ભાવિકો માટે ઉત્સવ સમાન હોય છે. રાત્રે ૧૨ વાગ્યે આ યાત્રા શરૂ થાય છે. રથ ખેંચવા માટે ધોતી, શર્ટ અને ફેંટો અથવા ટોપી પહેરેલા સેંકડો ભાવિકો હોય છે. રથની આગળ દિંડી, નૃત્ય, લેઝીમ રમતી ટુકડીઓ પોતાની કલા રજૂ કરે છે.
આ સમયે શહેરના રસ્તાઓ પર રંગોળીઓ પૂરવામાં આવે છે. શોભાયાત્રાના માર્ગ પર રોશની, ફૂલોની સજાવટ અને પતાકાઓ લગાવવામાં આવે છે. પરોઢ સુધી આ શોભાયાત્રા ચાલે છે.
મંદિર સમિતિ દ્વારા મંદિરના પરિસરમાં ભવ્ય ભક્ત નિવાસ બાંધવામાં આવ્યો છે અને પરિસરમાં ભોજનાલયની સુવિધા છે. સવારે ૫ થી રાત્રે ૯ વાગ્યા સુધી ભાવિકો મંદિરમાં શ્રીહરિ બાલાજીના દર્શન કરી શકે છે.
ઉપયોગી માહિતી:
- ચિમૂર બસ સ્ટેન્ડથી ૧ કિમી, તો ચંદ્રપુરથી ૫૦ કિમી અંતરે
- ચંદ્રપુરના અનેક તાલુકાઓમાંથી ચિમૂર માટે એસટી સેવા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી જઈ શકે છે
- રહેવા અને જમવા માટે દેવસ્થાન તરફથી સુવિધા
ஸ்ரீஹரி பாலாஜி கோயில்
சிமூர் நகரம், தாலுகா சிமூர், மாவட்டம் சந்திரபூர்
விதர்பாவின் பழமையான ஆலயங்களில், கட்கிரோலி மாவட்டத்தில் உள்ள மார்க்கண்டேயர் கோயிலுக்கு ‘சக்ரவர்த்தி’ என்றும், சந்திரபூர் மாவட்டத்தில் உள்ள சிமூர் பாலாஜி கோயிலுக்கு ‘சாம்ராட்’ என்றும் சிறப்புப் பெயர் வழங்கப்படுகிறது. சிமூர் பாலாஜி கோயிலில் உள்ள திருவுருவம், திருப்பதியில் உள்ள புகழ்பெற்ற பாலாஜி கோயிலின் திருவுருவத்தைப் போன்றே உள்ளது. இந்தத் தலம் ‘ஸ்ரீஹரி பாலாஜி’ என்றும் அழைக்கப்படுகிறது. முழு விதர்பா மற்றும் மத்திய இந்திய பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய இடமான இக்கோயில், இங்கு நடைபெறும் ‘கோடா யாத்திரை’க்கு (குதிரை ஊர்வலம்) மிகவும் புகழ்பெற்றது. இந்த யாத்திரை சுமார் ௨௫௦ ஆண்டுகால பாரம்பரியத்தைக் கொண்டது.
இக்கோயிலின் தலபுராணத்தின்படி, இங்குள்ள விவசாயியான பிகுஜி பாட்டீல் என்பவர், கால்நடைகளுக்காக ஒரு கொட்டகை கட்ட இந்த இடத்தில் தோண்டும் பணியைத் தொடங்கினார். பணி நடைபெற்றுக்கொண்டிருந்தபோது, ஒரு இடத்தில் மண்வெட்டி ஏதோ உலோகத்தின் மீது பட்டது போன்ற சத்தம் கேட்டது. அவர் அங்கிருந்த மண்ணை அகற்றியபோது, அங்கு ஒரு திருவுருவம் இருப்பதைக் கண்டார். அவர் மெதுவாக அந்தத் திருவுருவத்தை மண்ணிலிருந்து எடுத்துச் சுத்தம் செய்தார். அது பாலாஜியின் திருவுருவம். அதே இடத்தில் அவர் அந்தத் திருவுருவத்தைப் பிரதிஷ்டை செய்தார்.
வரலாற்று ஆவணங்களின்படி, கி.பி. ௧௭௫௭-ஆம் ஆண்டு, பேஷ்வாக்களின் திவான் திவாகர் புருஷோத்தம் என்கிற தேவாஜிபந்த் சோர்கடேவின் வேண்டுகோளின்படி, ஜானோஜி போஸ்லே என்பவர் இங்கு பாலாஜி கோயில் கட்டுவதற்காக ௨௦௦ ஏக்கர் நிலத்தை வழங்கினார்.
மேலும், கோயிலின் செலவுகளுக்காக ஆண்டுக்கு ௧௬௧௨ ரூபாய் வருமானம் கிடைக்க வழிவகை செய்தார். ௨௦௦ ஏக்கர் நிலத்தில் ௬௦ ஏக்கர் பரப்பளவில் நீருக்காக ஒரு குளம் வெட்டப்பட்டது. மராட்டிய வரலாற்றில் புகழ்பெற்ற ‘சடாதீன் ஷஹானே’ (மூன்றரை அறிஞர்கள்) என்று அழைக்கப்படுபவர்களில் சிமூரின் தேவாஜிபந்த் சோர்கடேவும் ஒருவர். இவரே சிமூர் ஸ்ரீஹரி பாலாஜியின் கோடா யாத்திரையைத் தொடங்கி வைத்தார்.
பன்முகத்தன்மை கொண்ட விதர்பா, இயற்கை, ஆன்மீகம் மற்றும் கலாச்சார ரீதியாக மிகவும் செழுமையானது. ராஷ்ட்ரசந்த் துக்டோஜி மகாராஜின் கர்மபூமி சிமூர் ஆகும். இங்குள்ள பாலாஜி கோயில் ‘மகாராஷ்டிராவின் திருப்பதி’ என்று அழைக்கப்படுகிறது. திருப்பதி பாலாஜிக்கு வேண்டிக்கொண்ட நேர்த்திக்கடன்களை இங்கு நிறைவேற்றலாம், ஆனால் இந்த பாலாஜிக்கு வேண்டிக்கொண்ட நேர்த்திக்கடன்களை திருப்பதியில் நிறைவேற்ற முடியாது, அவற்றை இங்குதான் நிறைவேற்ற வேண்டும் என்பது ஐதீகம். மதில்களுடன் கூடிய இக்கோயிலின் நுழைவு வாயில் உயரமாக இருப்பதோடு, அதில் நுணுக்கமான வேலைப்பாடுகளும் உள்ளன. இங்குள்ள மரத்தாலான சபா மண்டபத்தில் ௧௨ தூண்கள் உள்ளன. அவற்றில் யானை, புலி போன்ற விலங்குகள் செதுக்கப்பட்டுள்ளன. அதற்கு முன்னால் ௪ கல் தூண்களைக் கொண்ட மற்றொரு சபா மண்டபம் உள்ளது.
கோயிலில் உள்ள பாலாஜி திருவுருவம் கருங்கல்லால் ஆனது, இது ௧௦௦௦ முதல் ௧௨௦௦ ஆண்டுகள் பழமையானது என்று கூறப்படுகிறது. இந்தத் திருவுருவம் ‘சனக் சதானந்தர்’ என்று அழைக்கப்படுகிறது. திருவுருவத்தின் இருபுறமும் சித்த புருஷர்களின் பத்மாசனத்திலான சிலைகள் உள்ளன. தேவாஜிபந்த் சோர்கடேவின் முயற்சியால் கி.பி. ௧௭௭௨-ஆம் ஆண்டு கோயிலின் கட்டுமானப் பணிகள் நிறைவடைந்தன. இக்கோயிலின் பாலாஜி அதாவது விஷ்ணுவின் முதன்மைத் திருவுருவம் கருப்பு கண்டகி கல்லில் செதுக்கப்பட்டுள்ளது. திருவுருவத்தின் முகத்தில் அமைதியான பாவம் வெளிப்படுகிறது. இந்தத் திருவுருவம் ௪ அடி ௭ அங்குல உயரம் கொண்டது, இதில் தனித்துவமான வேலைப்பாடுகள் உள்ளன. திருவுருவத்தின் பின்புறம் பிரபாவளி உள்ளது மற்றும் பின்புறக் கல் ௨.௫ அடி அகலம் கொண்டது. பின்புறக் கல்லில் மத்ஸ்யாவதாரம் முதல் கல்கி அவதாரம் வரையிலான தசாவதாரங்கள் மிகத் தெளிவாகத் தெரிகின்றன. மார்பில் ஸ்ரீவத்ஸ சின்னம், தலையில் கிரீடம், காதணிகள், பூணூல், உதரபந்தம், அணிந்திருக்கும் ஆடை, மேலாடை, வைஜயந்தி மாலை ஆகியவை திருவுருவத்தில் செதுக்கப்பட்டுள்ளன. உடலில் உள்ள ஆடையின் மடிப்புகளும் விகிதாச்சாரத்துடன் உள்ளன. மாவட்டத்திலுள்ள பலருக்கு பாலாஜி குலதெய்வமாக உள்ளார்.
கோயில் வளாகத்தில் கருட கம்பம் மற்றும் அதற்கு அருகில் சில சமாதிகள் உள்ளன. மாக் சுத்த பஞ்சமி அன்று நடைபெறும் ‘கோடா யாத்திரை’ மிகவும் புகழ்பெற்றது. ௧௫ நாட்கள் நடைபெறும் இந்த யாத்திரையின் பெயர் ‘ஸ்ரீ பாலாஜியின் அஸ்வாரூட யாத்திரை’ என்றாலும், இது ‘கோடா யாத்திரை’
என்றே பிரபலமாக அறியப்படுகிறது. சிமூரைச் சேர்ந்த ஒரு கைவினைஞர் ஒரே மரக்கட்டையில் செதுக்கிய குதிரையின் மீது இந்த யாத்திரை நடைபெறுகிறது. இந்தக் குதிரையை அலங்கரித்து தேரில் வைத்து, அதன் மீது குதிரை மீது அமர்ந்த நிலையில் உள்ள பாலாஜியின் மரத்தாலான திருவுருவத்தை வைத்து நகரம் முழுவதும் தேரோட்டம் நடத்தப்படுகிறது. இந்த யாத்திரையின்போது கால்நடைகள் பெருமளவில் வாங்கப்படுகின்றன. கோடா யாத்திரை இங்குள்ள முக்கிய ஈர்ப்பாகும். சிமூரின் இந்த கோடா யாத்திரை மகாராஷ்டிரா மற்றும் மத்திய இந்திய பக்தர்களுக்கு ஒரு திருவிழாவாகும். இரவு ௧௨ மணிக்கு இந்த யாத்திரை தொடங்குகிறது. தேரை இழுக்க வேட்டி, சட்டை மற்றும் தலைப்பாகை அல்லது தொப்பி அணிந்த நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் பங்கேற்கின்றனர். தேருக்கு முன்னால் திண்டி, நடனம், லேசிம் குழுவினர் தங்கள் கலைத்திறனை வெளிப்படுத்துகின்றனர்.
இந்த நேரத்தில் நகர வீதிகளில் கோலங்கள் இடப்படுகின்றன. ஊர்வலம் செல்லும் பாதையில் மின்விளக்கு அலங்காரம், மலர் அலங்காரம் மற்றும் தோரணங்கள் கட்டப்படுகின்றன. விடியற்காலை வரை இந்த ஊர்வலம் நடைபெறுகிறது.
கோயில் நிர்வாகத்தின் சார்பில் கோயில் வளாகத்தில் பிரம்மாண்டமான பக்தர் தங்கும் விடுதி கட்டப்பட்டுள்ளது, மேலும் வளாகத்தில் உணவக வசதியும் உள்ளது. காலை ௫ மணி முதல் இரவு ௯ மணி வரை பக்தர்கள் கோயிலில் ஸ்ரீஹரி பாலாஜியைத் தரிசிக்கலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- சிமூர் பேருந்து நிலையத்திலிருந்து ௧ கி.மீ, சந்திரபூரிலிருந்து ௫௦ கி.மீ தொலைவில்
- சந்திரபூரின் பல தாலுகாக்களிலிருந்து சிமூருக்கு அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வாகன நிறுத்துமிடம் வரை செல்லலாம்
- தங்குவதற்கும் உணவிற்கும் தேவஸ்தானத்தின் சார்பில் வசதி உள்ளது
శ్రీహరి బాలాజీ దేవాలయం
చిమూర్ నగరం, తాలూకా చిమూర్, జిల్లా చంద్రపూర్
విదర్భలోని ప్రాచీన దేవాలయాలలో, గడ్చిరోలి జిల్లాలోని మార్కండేయ దేవాలయం ‘చక్రవర్తి’గా పిలువబడగా, చంద్రపూర్ జిల్లాలోని చిమూర్ బాలాజీ దేవాలయం ‘సామ్రాట్’గా ప్రసిద్ధి చెందింది. చిమూర్ బాలాజీ దేవాలయంలోని విగ్రహం తిరుపతిలోని ప్రసిద్ధ బాలాజీ దేవాలయంలోని విగ్రహాన్ని పోలి ఉంటుంది. ఈ పవిత్ర క్షేత్రాన్ని ‘శ్రీహరి బాలాజీ’ అని కూడా పిలుస్తారు. విదర్భ మరియు మధ్య భారతదేశం అంతటా భక్తులకు ఎంతో నమ్మకమైన ఈ దేవాలయం, సుమారు ౨౫౦ ఏళ్ల చరిత్ర కలిగిన ‘ఘోడ యాత్ర’ (గుర్రపు ఊరేగింపు)కు ప్రసిద్ధి చెందింది.
ఈ దేవాలయ పురాణం ప్రకారం, భికూజీ పాటిల్ అనే స్థానిక రైతు తన పశువుల కోసం ఈ ప్రదేశంలో ఒక కొట్టాన్ని నిర్మించాలని అనుకున్నాడు. తవ్వుతున్నప్పుడు, అతని పార ఏదో లోహపు వస్తువుకు తగిలి శబ్దం వచ్చింది. మట్టిని తొలగించగా, అతనికి ఒక విగ్రహం కనిపించింది. అతను దానిని జాగ్రత్తగా బయటకు తీసి శుభ్రం చేయగా, అది బాలాజీ విగ్రహమని తేలింది. అతను ఆ విగ్రహాన్ని అదే ప్రదేశంలో ప్రతిష్టించాడు.
చారిత్రక రికార్డుల ప్రకారం, క్రీస్తుశకం ౧౭౫౭వ సంవత్సరంలో, పీష్వాల దివాన్ దివాకర్ పురుషోత్తం అలియాస్ దేవాజీపంత్ చోర్ఘడే అభ్యర్థన మేరకు, జానోజీ భోంస్లే బాలాజీ దేవాలయ నిర్మాణానికి ౨౦౦ ఎకరాల భూమిని మంజూరు చేశారు.
అదనంగా, దేవాలయ ఖర్చుల కోసం ఏటా ౧౬౧౨ రూపాయల ఆదాయాన్ని కేటాయించారు. ఆ ౨౦౦ ఎకరాలలో, ౬౦ ఎకరాలను నీటి కోసం ఒక చెరువును నిర్మించడానికి ఉపయోగించారు. చిమూర్కు చెందిన దేవాజీపంత్ చోర్ఘడే మరాఠా చరిత్రలో ప్రాముఖ్యత పొందిన ‘సాడే-తీన్ షహానే’ (ముగ్గురున్నర మేధావులు)లో ఒకరు. చిమూర్లో శ్రీహరి బాలాజీ ఘోడ యాత్రను ప్రారంభించింది ఆయనే.
వైవిధ్యంతో అలరారుతున్న విదర్భ ప్రాంతం సహజ, ఆధ్యాత్మిక మరియు సాంస్కృతిక వారసత్వంతో సుసంపన్నమైనది. చిమూర్ రాష్ట్రసంత్ తుక్డోజీ మహారాజ్ యొక్క కర్మభూమి. ఇక్కడ ఉన్న బాలాజీ ఆలయం ‘మహారాష్ట్ర తిరుపతి’గా ప్రసిద్ధి చెందింది. తిరుపతి బాలాజీకి చేసిన మొక్కులను ఇక్కడ తీర్చుకోవచ్చని, కానీ ఈ బాలాజీకి చేసిన మొక్కులను తిరుపతిలో తీర్చుకోలేమని, వాటిని ఇక్కడే తీర్చుకోవాలని భక్తుల నమ్మకం. కోట వంటి రాజభవన నిర్మాణ శైలిని కలిగి ఉన్న ఈ ఆలయానికి సున్నితమైన చెక్కడాలతో కూడిన ఎత్తైన ప్రవేశ ద్వారం ఉంది. చెక్కతో చేసిన సభామండపంలో ఏనుగులు, పులులు మరియు ఇతర జంతువుల బొమ్మలతో చెక్కబడిన ౧౨ స్తంభాలు ఉన్నాయి. దీని వెనుక ౪ రాతి స్తంభాలతో నిర్మితమైన మరో సభామండపం ఉంది.
ఆలయంలోని బాలాజీ నల్లరాతి విగ్రహం ౧౦౦౦ నుండి ౧౨౦౦ ఏళ్ల నాటిదని చెబుతారు. ఈ విగ్రహాన్ని ‘సనక్ సదానంద్’ అని పిలుస్తారు. విగ్రహానికి ఇరువైపులా పద్మాసనంలో ఉన్న సిద్ధ పురుషుల చిత్రాలు ఉన్నాయి. దేవాజీపంత్ చోర్ఘడే కృషితో, ౧౭౭౨వ సంవత్సరంలో ఆలయ నిర్మాణం పూర్తయింది. బాలాజీ లేదా విష్ణువు యొక్క ప్రధాన విగ్రహం నల్లని గండకి శిలతో చెక్కబడింది. విగ్రహ ముఖంలో ప్రశాంతమైన భావాలు కనిపిస్తాయి. ఈ విగ్రహం ౪ అడుగుల ౭ అంగుళాల ఎత్తు కలిగి, అద్భుతమైన శిల్పకళతో అలరారుతోంది. విగ్రహం వెనుక ప్రభావలయం ఉంది మరియు వెనుక ఉన్న పలక ౨.౫ అడుగుల వెడల్పు కలిగి ఉంటుంది. మత్స్యావతారం నుండి కల్కి అవతారం వరకు దశావతారాలు ఈ వెనుక పలకపై స్పష్టంగా చెక్కబడి ఉన్నాయి. విగ్రహం వక్షస్థలంపై శ్రీవత్స చిహ్నం, తలపై కిరీటం, కర్ణాభరణాలు, జంధ్యం, ఉదర బంధం, సాంప్రదాయ వస్త్రాలు, శాలువా మరియు వైజయంతి మాలలతో అలంకరించబడి ఉంటుంది. శరీర భాగంలోని వస్త్రాల మడతలు కూడా సంపూర్ణమైన నిష్పత్తిలో ఉన్నాయి. జిల్లాలోని చాలా మందికి బాలాజీ వారి కులదైవం.
దేవాలయ ప్రాంగణంలో ఒక గరుడ స్తంభం ఉంది, దాని సమీపంలో అనేక సమాధులు ఉన్నాయి. మాఘ శుద్ధ పంచమి నాడు నిర్వహించే ‘ఘోడ యాత్ర’ ఎంతో ప్రసిద్ధి చెందినది. ౧౫ రోజుల పాటు జరిగే ఈ ఉత్సవాన్ని ‘శ్రీ బాలాజీ అశ్వారూఢ యాత్ర’ అని పిలిచినప్పటికీ, ఇది ‘ఘోడ యాత్ర’గా ప్రాచుర్యం పొందింది.
ఈ ఊరేగింపులో చిమూర్ ప్రాంతానికి చెందిన ఒక స్థానిక కళాకారుడు ఒకే చెక్క మొద్దుతో చెక్కిన గుర్రం ఉంటుంది. ఈ గుర్రాన్ని అలంకరించి ఒక రథంపై ఉంచుతారు, దానిపై అశ్వారూఢ భంగిమలో ఉన్న బాలాజీ చెక్క విగ్రహాన్ని ప్రతిష్ఠించి, రథాన్ని నగరం అంతటా ఊరేగింపుగా తీసుకెళ్తారు. ఈ ఉత్సవ సమయంలో పశువుల భారీ సంత జరుగుతుంది. ఘోడ యాత్ర ఇక్కడ ప్రధాన ఆకర్షణ. మహారాష్ట్ర మరియు మధ్య భారతదేశం నుండి వచ్చే భక్తులకు ఈ పండుగ ఒక గొప్ప వేడుక. ఊరేగింపు అర్ధరాత్రి ౧౨ గంటలకు ప్రారంభమవుతుంది. ధోవతి, చొక్కా, తలపాగా లేదా టోపీ ధరించిన వందలాది మంది భక్తులు రథాన్ని లాగుతారు. రథం ముందు దిండి బృందాలు, నృత్యకారులు మరియు లేజిమ్ బృందాలు తమ కళలను ప్రదర్శిస్తారు.
ఈ సమయంలో నగర వీధుల్లో ముగ్గులు వేస్తారు. ఊరేగింపు మార్గాన్ని విద్యుత్ దీపాలు, పూలు మరియు తోరణాలతో అలంకరిస్తారు. ఊరేగింపు తెల్లవారుజాము వరకు కొనసాగుతుంది.
దేవాలయ కమిటీ ఆలయ ప్రాంగణంలో ఒక గొప్ప భక్త నివాసాన్ని నిర్మించింది మరియు అక్కడ క్యాంటీన్ సౌకర్యం కూడా అందుబాటులో ఉంది. భక్తులు ఉదయం ౫ గంటల నుండి రాత్రి ౯ గంటల వరకు శ్రీహరి బాలాజీని దర్శించుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- చిమూర్ బస్ స్టాండ్ నుండి ౧ కి.మీ మరియు చంద్రపూర్ నుండి ౫౦ కి.మీ దూరంలో ఉంది
- చంద్రపూర్ లోని అనేక తాలూకాల నుండి చిమూర్ కు GSRTC బస్సు సేవలు అందుబాటులో ఉన్నాయి
- ప్రైవేట్ వాహనాలు దేవాలయ పార్కింగ్ స్థలం వరకు చేరుకోవచ్చు
- దేవాలయ ట్రస్ట్ ద్వారా వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యాలు కల్పించబడ్డాయి
ശ്രീഹരി ബാലാജി മന്ദിരം
ചിമൂർ നഗരം, താലൂക്ക് ചിമൂർ, ജില്ല ചന്ദ്രപുരം
വിദർഭയിലെ പുരാതന ദേവാലയങ്ങളിൽ ഗഡ്ചിരോളി ജില്ലയിലെ മാർക്കണ്ഡേയ മന്ദിരത്തെ ‘ചക്രവർത്തി’ എന്നും, ചന്ദ്രപുരം ജില്ലയിലെ ചിമൂറിലുള്ള ബാലാജി മന്ദിരത്തെ ‘സാമ്രാട്ട്’ എന്നും വിശേഷിപ്പിക്കുന്നു. ചിമൂറിലെ ബാലാജി മന്ദിരത്തിലെ വിഗ്രഹം തിരുപ്പതിയിലെ പ്രശസ്തമായ ബാലാജി മന്ദിരത്തിലെ വിഗ്രഹത്തിന് സമാനമാണ്. ഈ സ്ഥാനത്തെ ‘ശ്രീഹരി ബാലാജി’ എന്നും വിളിക്കുന്നു. മുഴുവൻ വിദർഭയിലെയും മധ്യ ഇന്ത്യയിലെയും ഭക്തരുടെ ശ്രദ്ധാകേന്ദ്രമായ ഈ മന്ദിരം ഇവിടുത്തെ ‘ഘോഡായാത്ര’യ്ക്ക് (കുതിരയാത്ര) പ്രശസ്തമാണ്. ഈ യാത്രയ്ക്ക് ഏകദേശം ൨൫൦ വർഷത്തെ പാരമ്പര്യമുണ്ട്.
ഇവിടുത്തെ കർഷകനായ ഭിക്കുജി പാട്ടീൽ ഈ സ്ഥലത്ത് മൃഗങ്ങൾക്കായി ഒരു തൊഴുത്ത് നിർമ്മിക്കാൻ ആഗ്രഹിച്ചു എന്നതാണ് ഈ മന്ദിരത്തിന്റെ ഐതിഹ്യം. അതിനായി അദ്ദേഹം ഇവിടെ കുഴിക്കാൻ തുടങ്ങി. ജോലി നടക്കുന്നതിനിടയിൽ ഒരു സ്ഥലത്ത് മൺവെട്ടി ലോഹത്തിൽ തട്ടിയതുപോലെയുള്ള ശബ്ദം കേട്ടു. അദ്ദേഹം അവിടുത്തെ മണ്ണ് നീക്കിയപ്പോൾ അവിടെ ഒരു വിഗ്രഹം ഉണ്ടെന്ന് മനസ്സിലാക്കി. അദ്ദേഹം വളരെ ശ്രദ്ധയോടെ വിഗ്രഹം മണ്ണിൽ നിന്ന് പുറത്തെടുത്ത് വൃത്തിയാക്കി. അത് ബാലാജിയുടെ വിഗ്രഹമായിരുന്നു. ഇതേ സ്ഥലത്ത് അദ്ദേഹം ഈ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചു.
ചരിത്രരേഖകൾ പ്രകാരം, ൧൭൫൭-ൽ പേഷ്വകളുടെ ദിവാൻ ദിവാകർ പുരുഷോത്തം അഥവാ ദേവാജിപന്ത് ചോർഘഡെയുടെ അഭ്യർത്ഥന മാനിച്ചും ജാനോജി ഭോസ്ലെ ഇവിടെ ബാലാജി മന്ദിരം നിർമ്മിക്കുന്നതിനായി ൨൦൦ ഏക്കർ ഭൂമി നൽകി.
കൂടാതെ മന്ദിരത്തിന്റെ ചെലവുകൾക്കായി ൧൬൧൨ രൂപയുടെ വാർഷിക വരുമാനവും ഏർപ്പെടുത്തി. ൨൦൦ ഏക്കർ സ്ഥലത്തിൽ ൬൦ ഏക്കറിൽ വെള്ളത്തിനായി ഒരു തടാകം നിർമ്മിച്ചു. മറാഠാ ചരിത്രത്തിൽ പ്രശസ്തരായ ‘സാഡേതീൻ ശഹാനേ’ (മൂന്നര ബുദ്ധിജീവികൾ) എന്നറിയപ്പെടുന്നവരിൽ ഒരാളാണ് ചിമൂറിലെ ദേവാജിപന്ത് ചോർഘഡെ. ഇദ്ദേഹം തന്നെയാണ് ചിമൂറിലെ ശ്രീഹരി ബാലാജിയുടെ ഘോഡായാത്ര ആരംഭിച്ചത്.
വൈവിധ്യങ്ങൾ നിറഞ്ഞ വിദർഭ പ്രകൃതിപരമായും, മതപരമായും, സാംസ്കാരികമായും സമ്പന്നമാണ്. രാഷ്ട്രസന്ത് തുക്ഡോജി മഹാരാജിന്റെ കർമ്മഭൂമിയാണ് ചിമൂർ. ഇവിടെയുള്ള ബാലാജി മന്ദിരം മഹാരാഷ്ട്രയുടെ തിരുപ്പതി എന്നറിയപ്പെടുന്നു. തിരുപ്പതി ബാലാജിയിൽ നേർച്ച നേർന്നാൽ അത് ഇവിടെ വന്ന് നിറവേറ്റാം, എന്നാൽ ഈ ബാലാജിയിൽ നേരുന്ന നേർച്ചകൾ തിരുപ്പതിയിൽ പോയി നിറവേറ്റാൻ കഴിയില്ല, അവ ഇവിടെത്തന്നെ നിറവേറ്റണം എന്നാണ് വിശ്വാസം. മതിൽക്കെട്ടുകളുള്ള ഈ മന്ദിരത്തിന് ഉയരമുള്ള പ്രവേശന കവാടമുണ്ട്, അതിൽ കൊത്തുപണികൾ ചെയ്തിരിക്കുന്നു. ഇവിടുത്തെ തടികൊണ്ടുള്ള സഭാമണ്ഡപത്തിൽ ൧൨ തൂണുകളുണ്ട്. അതിൽ ആന, കടുവ തുടങ്ങിയ മൃഗങ്ങളെ കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്നു. അതിനു മുന്നിലായി ൪ കൽത്തൂണുകളുള്ള മറ്റൊരു സഭാമണ്ഡപവുമുണ്ട്.
മന്ദിരത്തിലെ ബാലാജിയുടെ കരിങ്കൽ വിഗ്രഹം ൧൦൦൦ മുതൽ ൧൨൦൦ വർഷം വരെ പഴക്കമുള്ളതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ വിഗ്രഹത്തെ ‘സനക് സദാനന്ദ്’ എന്ന് വിളിക്കുന്നു. വിഗ്രഹത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും പത്മാസനത്തിലിരിക്കുന്ന സിദ്ധപുരുഷന്മാരുടെ പ്രതിമകളുണ്ട്. ദേവാജിപന്ത് ചോർഘഡെയുടെ പരിശ്രമത്താൽ ക്രിസ്താബ്ദം ൧൭൭൨-ൽ മന്ദിരത്തിന്റെ നിർമ്മാണം പൂർത്തിയായി. ഈ മന്ദിരത്തിലെ ബാലാജിയുടെ അഥവാ വിഷ്ണുവിന്റെ പ്രധാന വിഗ്രഹം കറുത്ത ഗണ്ഡകി ശിലയിൽ കൊത്തിയെടുത്തതാണ്. വിഗ്രഹത്തിന്റെ മുഖഭാവം ശാന്തമാണ്. ഈ വിഗ്രഹത്തിന് ൪ അടി ൭ ഇഞ്ച് ഉയരമുണ്ട്, അതിൽ സവിശേഷമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് പിന്നിൽ പ്രഭാവലയമുണ്ട്, പുറകിലെ ശിലയ്ക്ക് ൨.൫ അടി വീതിയുണ്ട്. പുറകിലെ ശിലയിൽ മത്സ്യം മുതൽ കൽക്കി വരെയുള്ള ദശാവതാരങ്ങൾ വളരെ വ്യക്തമായി കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്നത് കാണാം. നെഞ്ചിൽ ശ്രീവത്സ ചിഹ്നം, തലയിൽ കിരീടം, കർണ്ണാഭരണങ്ങൾ, പൂണൂൽ, ഉദരബന്ധം, വസ്ത്രം, ശാല, വൈജയന്തിമാല എന്നിവ വിഗ്രഹത്തിൽ കൊത്തിയിട്ടുണ്ട്. ശരീരത്തിലെ വസ്ത്രത്തിന്റെ ചുളിവുകൾ പോലും കൃത്യമായ അനുപാതത്തിലാണ്. ജില്ലയിലെ പലരുടെയും കുലദൈവമാണ് ബാലാജി.
മന്ദിരത്തിന്റെ അങ്കണത്തിൽ ഗരുഡ സ്തംഭവും അതിനു സമീപം ചില സമാധികളും ഉണ്ട്. മാഘ ശുദ്ധ പഞ്ചമി നാളിൽ നടക്കുന്ന ഇവിടുത്തെ ‘ഘോഡായാത്ര’ പ്രശസ്തമാണ്. ൧൫ ദിവസം നീണ്ടുനിൽക്കുന്ന ഈ യാത്രയുടെ പേര് ‘ശ്രീ ബാലാജിയുടെ അശ്വാരൂഢ യാത്ര’ എന്നാണെങ്കിലും ഇത് ‘ഘോഡായാത്ര’
എന്ന് തന്നെയാണ് പ്രശസ്തം. ചിമൂറിലെ ഒരു ശില്പി ഒരൊറ്റ തടിയിൽ നിർമ്മിച്ച കുതിരപ്പുറത്താണ് ഈ യാത്ര നടക്കുന്നത്. ഈ കുതിരയെ അലങ്കരിച്ച് രഥത്തിൽ വെക്കുന്നു, അതിനു മുകളിൽ കുതിരപ്പുറത്തിരിക്കുന്ന ബാലാജിയുടെ തടിയിലുള്ള പ്രതിമ വെച്ച് നഗരത്തിലുടനീളം രഥഘോഷയാത്ര നടത്തുന്നു. ഈ യാത്രയിൽ വലിയ തോതിൽ കന്നുകാലി കച്ചവടം നടക്കുന്നു. ഘോഡായാത്രയാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന ആകർഷണം. ചിമൂറിലെ ഈ ഘോഡായാത്ര മഹാരാഷ്ട്രയിലെയും മധ്യ ഇന്ത്യയിലെയും ഭക്തർക്ക് ഒരു വലിയ ഉത്സവമാണ്. രാത്രി ൧൨ മണിക്ക് ഈ യാത്ര ആരംഭിക്കുന്നു. രഥം വലിക്കാനായി ധോത്തി, ഷർട്ട്, തലപ്പാവ് അല്ലെങ്കിൽ തൊപ്പി ധരിച്ച നൂറുകണക്കിന് ഭക്തർ ഉണ്ടാകും. രഥത്തിന് മുന്നിൽ ദിണ്ടികൾ, നൃത്തം, ലേസിം കളിക്കുന്ന സംഘങ്ങൾ എന്നിവ തങ്ങളുടെ കലകൾ അവതരിപ്പിക്കുന്നു.
ഈ സമയത്ത് നഗരത്തിലെ തെരുവുകളിൽ രംഗോലികൾ വരയ്ക്കുന്നു. ഘോഷയാത്ര കടന്നുപോകുന്ന വഴിയിൽ ദീപാലങ്കാരങ്ങളും പൂക്കളും തോരണങ്ങളും കൊണ്ട് അലങ്കരിക്കുന്നു. പുലർച്ചെ വരെ ഈ ഘോഷയാത്ര തുടരുന്നു.
മന്ദിര സമിതിയുടെ നേതൃത്വത്തിൽ മന്ദിര അങ്കണത്തിൽ വലിയ ഭക്ത നിവാസ് നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്, കൂടാതെ അങ്കണത്തിൽ ഭക്ഷണശാലയുടെ സൗകര്യവുമുണ്ട്. രാവിലെ ൫ മുതൽ രാത്രി ൯ വരെ ഭക്തർക്ക് മന്ദിരത്തിൽ ശ്രീഹരി ബാലാജിയെ ദർശിക്കാവുന്നതാണ്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ചിമൂർ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൧ കി.മീ, ചന്ദ്രപുരത്ത് നിന്ന് ൫൦ കി.മീ അകലെ
- ചന്ദ്രപുരിലെ പല താലൂക്കുകളിൽ നിന്നും ചിമൂറിലേക്ക് എസ്ടി ബസ് സേവനം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് മന്ദിരത്തിന്റെ പാർക്കിംഗ് സ്ഥലം വരെ പോകാം
- താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി ദേവസ്ഥാനത്തിന്റെ സൗകര്യം
ಶ್ರೀಹರಿ ಬಾಲಾಜಿ ಮಂದಿರ
ಚಿಮೂರು ನಗರ, ತಾ. ಚಿಮೂರು, ಜಿ. ಚಂದ್ರಪುರ
ವಿದರ್ಭದ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಗಡಚಿರೋಲಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಮಂದಿರವನ್ನು ‘ಚಕ್ರವರ್ತಿ’ ಎಂದು, ಹಾಗೂ ಚಂದ್ರಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಚಿಮೂರಿನ ಬಾಲಾಜಿ ಮಂದಿರವನ್ನು ‘ಸಮ್ರಾಟ್’ ಎಂಬ ಉಪಮೆಯಿಂದ ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಚಿಮೂರಿನ ಬಾಲಾಜಿ ಮಂದಿರದ ಮೂರ್ತಿಯು ತಿರುಪತಿಯ ಪ್ರಸಿದ್ಧ ಬಾಲಾಜಿ ಮಂದಿರದ ಮೂರ್ತಿಯಂತೆಯೇ ಇದೆ. ಈ ಸ್ಥಾನವನ್ನು ‘ಶ್ರೀಹರಿ ಬಾಲಾಜಿ’ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಸಂಪೂರ್ಣ ವಿದರ್ಭ ಮತ್ತು ಮಧ್ಯ ಭಾರತದ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿರುವ ಈ ಮಂದಿರವು ಇಲ್ಲಿನ ‘ಘೋಡಾಯಾತ್ರೆ’ಗಾಗಿ (ಕುದುರೆ ಜಾತ್ರೆ) ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದ್ದು, ಈ ಯಾತ್ರೆಗೆ ಸುಮಾರು ೨೫೦ ವರ್ಷಗಳ ಪರಂಪರೆಯಿದೆ.
ಮಂದಿರದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಇಲ್ಲಿನ ರೈತ ಭಿಕುಜಿ ಪಾಟೀಲರು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಜಾನುವಾರುಗಳಿಗಾಗಿ ಕೊಟ್ಟಿಗೆಯನ್ನು ಕಟ್ಟಲು ಬಯಸಿದ್ದರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಅಗೆಯುವ ಕೆಲಸವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ಕೆಲಸ ನಡೆಯುತ್ತಿರುವಾಗ ಒಂದು ಕಡೆ ಗುದ್ದಲಿ ಲೋಹಕ್ಕೆ ತಾಗಿದಂತಹ ಶಬ್ದ ಕೇಳಿಸಿತು. ಅವರು ಅಲ್ಲಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಸರಿಸಿದಾಗ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಮೂರ್ತಿ ಇರುವುದನ್ನು ಗಮನಿಸಿದರು. ಅವರು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ನಿಧಾನವಾಗಿ ಹೊರತೆಗೆದು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಿದರು. ಅದು ಬಾಲಾಜಿಯ ಮೂರ್ತಿಯಾಗಿತ್ತು. ಇದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅವರು ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದರು.
ಐತಿಹಾಸಿಕ ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ೧೭೫೭ರಲ್ಲಿ ಪೇಶ್ವೆಗಳ ದಿವಾನ ದಿವಾಕರ ಪುರುಷೋತ್ತಮ ಅಲಿಯಾಸ್ ದೇವಾಜೀಪಂತ ಚೋರ್ಘಡೆ ಅವರ ಕೋರಿಕೆಯ ಮೇರೆಗೆ ಜಾನೋಜಿ ಭೋಸಲೆ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಬಾಲಾಜಿ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲು ೨೦೦ ಎಕರೆ ಭೂಮಿಯನ್ನು ನೀಡಿದರು.
ಅಲ್ಲದೆ, ಮಂದಿರದ ಖರ್ಚಿಗಾಗಿ ೧೬೧೨ ರೂಪಾಯಿಗಳ ವಾರ್ಷಿಕ ಆದಾಯವನ್ನು ನಿಗದಿಪಡಿಸಿದರು. ೨೦೦ ಎಕರೆ ಜಾಗದ ಪೈಕಿ ೬೦ ಎಕರೆಯಲ್ಲಿ ನೀರಿಗಾಗಿ ಕೆರೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ಮರಾಠರ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧರಾದ ಸಾಡೇತೀನ್ ಶಹಾಣ್ಯರಲ್ಲಿ (ಮೂರುವರೆ ಜಾಣರಲ್ಲಿ) ಚಿಮೂರಿನ ದೇವಾಜೀಪಂತ ಚೋರ್ಘಡೆ ಒಬ್ಬರಾಗಿದ್ದರು. ಇವರೇ ಚಿಮೂರಿನ ಶ್ರೀಹರಿ ಬಾಲಾಜಿಯ ಘೋಡಾಯಾತ್ರೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು.
ವೈವಿಧ್ಯಮಯ ವಿದರ್ಭವು ನೈಸರ್ಗಿಕ, ಧಾರ್ಮಿಕ ಹಾಗೂ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸಮೃದ್ಧವಾಗಿದೆ. ರಾಷ್ಟ್ರಸಂತ ತುುಕಡೋಜಿ ಮಹಾರಾಜರ ಕರ್ಮಭೂಮಿ ಚಿಮೂರು. ಇಲ್ಲಿರುವ ಬಾಲಾಜಿ ಮಂದಿರವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ತಿರುಪತಿ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ತಿರುಪತಿಯ ಬಾಲಾಜಿಗೆ ಬೇಡಿದ ಹರಕೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ತೀರಿಸಬಹುದು, ಆದರೆ ಈ ಬಾಲಾಜಿಗೆ ಬೇಡಿದ ಹರಕೆಯನ್ನು ತಿರುಪತಿಯಲ್ಲಿ ತೀರಿಸಲಾಗುವುದಿಲ್ಲ, ಅವುಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿಯೇ ತೀರಿಸಬೇಕು ಎಂಬ ನಂಬಿಕೆಯಿದೆ. ಕೋಟೆಯ ಗೋಡೆಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಈ ಮಂದಿರವು ಎತ್ತರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವನ್ನು ಹೊಂದಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆ ಕೆಲಸಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ಮರದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ೧೨ ಕಂಬಗಳಿವೆ. ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಆನೆ, ಹುಲಿ ಮುಂತಾದ ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಅದರ ಮುಂದೆ ೪ ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಮತ್ತೊಂದು ಸಭಾಮಂಟಪವಿದೆ.
ಮಂದಿರದ ಬಾಲಾಜಿಯ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯು ೧೦೦೦ ದಿಂದ ೧೨೦೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಪ್ರಾಚೀನವಾದುದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ‘ಸನಕ ಸದಾನಂದ’ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಮೂರ್ತಿಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸಿದ್ಧ ಪುರುಷರ ಪದ್ಮಾಸನದಲ್ಲಿರುವ ಪ್ರತಿಮೆಗಳಿವೆ. ದೇವಾಜೀಪಂತ ಚೋರ್ಘಡೆ ಅವರ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಕ್ರಿ.ಶ. ೧೭೭೨ರಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಯ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿತು. ಈ ಮಂದಿರದ ಬಾಲಾಜಿಯ ಅಂದರೆ ವಿಷ್ಣುವಿನ ಮುಖ್ಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಕಪ್ಪು ಗಂಡಕಿ ಶಿಲೆಯಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಮುಖದ ಭಾವವು ಶಾಂತವಾಗಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯು ೪ ಅಡಿ ೭ ಇಂಚು ಎತ್ತರವಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಕೆತ್ತನೆ ಕೆಲಸವಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂದೆ ಪ್ರಭಾವಳಿ ಇದ್ದು, ಬೆನ್ನಿನ ಶಿಲೆಯು ೨.೫ ಅಡಿ ಅಗಲವಿದೆ. ಬೆನ್ನಿನ ಶಿಲೆಯ ಮೇಲೆ ಮತ್ಸ್ಯದಿಂದ ಕಲ್ಕಿಯವರೆಗಿನ ದಶಾವತಾರಗಳನ್ನು ಅತ್ಯಂತ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಎದೆಯ ಮೇಲೆ ಶ್ರೀವತ್ಸ ಚಿಹ್ನೆ, ತಲೆಯ ಮೇಲೆ ಕಿರೀಟ, ಕರ್ಣಭೂಷಣ, ಜನಿವಾರ, ಉದರಬಂಧ, ಧರಿಸಿದ ವಸ್ತ್ರ, ಶೇಲಾ, ವೈಜಯಂತಿ ಮಾಲೆಗಳನ್ನು ಮೂರ್ತಿಯ ಮೇಲೆ ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ದೇಹದ ಮೇಲಿನ ವಸ್ತ್ರದ ಮಡಿಕೆಗಳು ಕೂಡ ಪ್ರಮಾಣಬದ್ಧವಾಗಿವೆ. ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕರ ಕುಲದೈವವೇ ಬಾಲಾಜಿ.
ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಗರುಡ ಕಂಬವಿದ್ದು, ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಸಮಾಧಿಗಳಿವೆ. ಮಾಘ ಶುದ್ಧ ಪಂಚಮಿಯಂದು ನಡೆಯುವ ಇಲ್ಲಿನ ‘ಘೋಡಾ ಯಾತ್ರೆ’ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ೧೫ ದಿನಗಳ ಕಾಲ ನಡೆಯುವ ಈ ಯಾತ್ರೆಯ ಹೆಸರು ‘ಶ್ರೀ ಬಾಲಾಜಿಯ ಅಶ್ವಾರೂಢ ಯಾತ್ರೆ’ ಎಂದಿದ್ದರೂ, ಇದು ‘ಘೋಡಾ ಯಾತ್ರೆ’
ಎಂದೇ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಚಿಮೂರಿನ ಒಬ್ಬ ಕುಶಲಕರ್ಮಿ ಒಂದೇ ಮರದ ದಿಮ್ಮಿಯಿಂದ ತಯಾರಿಸಿದ ಕುದುರೆಯ ಮೇಲೆ ಈ ಯಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಕುದುರೆಯನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿ ರಥದಲ್ಲಿ ಇಡಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಅಶ್ವಾರೂಢ ಮುದ್ರೆಯಲ್ಲಿರುವ ಬಾಲಾಜಿಯ ಮರದ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಇರಿಸಿ ನಗರದಾದ್ಯಂತ ರಥದ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ನಡೆಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಜಾನುವಾರುಗಳ ಖರೀದಿ-ಮಾರಾಟ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಘೋಡಾ ಯಾತ್ರೆಯು ಇಲ್ಲಿನ ಪ್ರಮುಖ ಆಕರ್ಷಣೆಯಾಗಿದೆ. ಚಿಮೂರಿನ ಈ ಘೋಡಾ ಯಾತ್ರೆಯು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸೇರಿದಂತೆ ಮಧ್ಯ ಭಾರತದ ಭಕ್ತರಿಗೆ ಹಬ್ಬದಂತಿರುತ್ತದೆ. ರಾತ್ರಿ ೧೨ ಗಂಟೆಗೆ ಈ ಯಾತ್ರೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ರಥವನ್ನು ಎಳೆಯಲು ಧೋತಿ, ಶರ್ಟ್ ಮತ್ತು ಪೇಟ ಅಥವಾ ಟೋಪಿ ಧರಿಸಿದ ನೂರಾರು ಭಕ್ತರಿರುತ್ತಾರೆ. ರಥದ ಮುಂದೆ ದಿಂಡಿ, ನೃತ್ಯ, ಲೇಜಿಮ್ ತಂಡಗಳು ತಮ್ಮ ಕಲೆಗಳನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸುತ್ತವೆ.
ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಗರದ ರಸ್ತೆಗಳಲ್ಲಿ ರಂಗೋಲಿಗಳನ್ನು ಬಿಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮೆರವಣಿಗೆಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ದೀಪಾಲಂಕಾರ, ಹೂವಿನ ಅಲಂಕಾರ ಮತ್ತು ಬಾವುಟಗಳನ್ನು ಹಾಕಲಾಗುತ್ತದೆ. ಮುಂಜಾನೆಯವರೆಗೆ ಈ ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಯುತ್ತದೆ.
ಮಂದಿರ ಸಮಿತಿಯಿಂದ ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಭವ್ಯವಾದ ಭಕ್ತ ನಿವಾಸವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದ್ದು, ಆವರಣದಲ್ಲಿ ಉಪಾಹಾರ ಗೃಹದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ೫ ರಿಂದ ರಾತ್ರಿ ೯ ರವರೆಗೆ ಭಕ್ತರು ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಶ್ರೀಹರಿ ಬಾಲಾಜಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಚಿಮೂರು ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೧ ಕಿ.ಮೀ, ಚಂದ್ರಪುರದಿಂದ ೫೦ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಚಂದ್ರಪುರದ ಅನೇಕ ತಾಲೂಕುಗಳಿಂದ ಚಿಮೂರಿಗೆ ಎಸ್ಟಿ ಸೇವೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ದೇವಸ್ಥಾನದ ವತಿಯಿಂದ ಸೌಲಭ್ಯ
শ্রীহরি বালাজি মন্দির
চিমুর শহর, তালুক চিমুর, জেলা চন্দ্রপুর
বিদর্ভের প্রাচীন দেবালয়গুলোর মধ্যে গড়চিরোলি জেলার মার্কণ্ডেয় মন্দিরকে ‘চক্রবর্তী’ এবং চন্দ্রপুর জেলার চিমুরের বালাজি মন্দিরকে ‘সম্রাট’ উপমায় ভূষিত করা হয়। চিমুরের বালাজি মন্দিরের মূর্তিটি তিরুপতির বিখ্যাত বালাজি মন্দিরের মূর্তির মতোই। এই স্থানটিকে ‘শ্রীহরি বালাজি’ বলেও ডাকা হয়। সমগ্র বিদর্ভ এবং মধ্য ভারতের ভক্তদের শ্রদ্ধার কেন্দ্রবিন্দু এই মন্দিরটি এখানকার ‘ঘোড়া যাত্রা’র জন্য বিখ্যাত এবং এই যাত্রার প্রায় ২৫০ বছরের ঐতিহ্য রয়েছে।
মন্দিরের কিংবদন্তি অনুযায়ী, এখানকার কৃষক ভিকুজি পাতিল এই স্থানে গবাদি পশুর জন্য একটি গোয়ালঘর তৈরি করতে চেয়েছিলেন। সেই উদ্দেশ্যে তিনি এখানে খননকাজ শুরু করেন। কাজ চলাকালীন এক জায়গায় কুড়ুল ধাতুর গায়ে লাগার মতো শব্দ হয়। তিনি সেখানকার মাটি সরিয়ে ফেললে একটি মূর্তি দেখতে পান। তিনি অত্যন্ত সাবধানে মূর্তিটি মাটি থেকে বের করে পরিষ্কার করেন। সেটি ছিল বালাজির মূর্তি। এই স্থানেই তিনি মূর্তিটি প্রতিষ্ঠা করেন।
ঐতিহাসিক নথি অনুযায়ী, ১৭৫৭ সালে পেশোয়াদের দেওয়ান দিবাকর পুরুষোত্তম ওরফে দেওয়াজিপন্ত চোরঘড়ের অনুরোধে জানোজি ভোঁসলে এখানে বালাজি মন্দির নির্মাণের জন্য ২০০ একর জমি দান করেন।
এছাড়াও মন্দিরের খরচের জন্য ১৬১২ টাকার বার্ষিক আয়ের ব্যবস্থা করে দেওয়া হয়। ২০০ একর জায়গার মধ্যে ৬০ একর জমিতে জলের জন্য একটি পুকুর খনন করা হয়। মারাঠা ইতিহাসের বিখ্যাত ‘সাড়ে তিন শানিয়া’র (বুদ্ধিমান ব্যক্তি) মধ্যে চিমুরের দেওয়াজিপন্ত চোরঘড়ে অন্যতম। এই চোরঘড়েই চিমুরের শ্রীহরি বালাজির ঘোড়া যাত্রার সূচনা করেছিলেন।
বৈচিত্র্যময় বিদর্ভ প্রাকৃতিক, ধর্মীয় এবং সাংস্কৃতিকভাবে সমৃদ্ধ। রাষ্ট্রসন্ত তুকড়োজি মহারাজের কর্মভূমি হলো চিমুর। এখানকার বালাজি মন্দির মহারাষ্ট্রের তিরুপতি হিসেবে পরিচিত। প্রচলিত বিশ্বাস অনুযায়ী, তিরুপতির বালাজির কাছে করা মানত এখানে পূরণ করা যায়, কিন্তু এই বালাজির কাছে করা মানত তিরুপতিতে পূরণ করা হয় না, তা এখানেই পূরণ করতে হয়। প্রাচীরবেষ্টিত এই মন্দিরের প্রবেশদ্বারটি সুউচ্চ এবং তাতে চমৎকার খোদাইয়ের কাজ রয়েছে। এখানকার কাঠের সভামণ্ডপে ১২টি স্তম্ভ আছে। তাতে হাতি, বাঘের মতো প্রাণীর প্রতিকৃতি খোদাই করা হয়েছে। তার সামনে ৪টি পাথরের স্তম্ভযুক্ত আরও একটি সভামণ্ডপ রয়েছে।
মন্দিরের বালাজির কালো পাথরের মূর্তিটি ১০০০ থেকে ১২০০ বছরের প্রাচীন বলে মনে করা হয়। এই মূর্তিকে ‘সনক সদানন্দ’ বলা হয়। মূর্তির দুই পাশে সিদ্ধ পুরুষদের পদ্মাসনস্থ প্রতিচ্ছবি রয়েছে। দেওয়াজিপন্ত চোরঘড়ের প্রচেষ্টায় ১৭৭২ সালে মন্দিরের নির্মাণকাজ সম্পন্ন হয়। এই মন্দিরের বালাজি অর্থাৎ বিষ্ণুর মূল মূর্তিটি কালো গণ্ডকী পাথরে খোদাই করা। মূর্তির মুখের ভাব অত্যন্ত শান্ত। এই মূর্তিটি ৪ ফুট ৭ ইঞ্চি উঁচু এবং এতে বৈশিষ্ট্যপূর্ণ খোদাইয়ের কাজ রয়েছে। মূর্তির পেছনে প্রভামণ্ডল রয়েছে এবং পেছনের পাথরের ফলকটি ২.৫ ফুট চওড়া। সেই ফলকে মৎস্য থেকে কল্কি পর্যন্ত দশাবতার অত্যন্ত স্পষ্টভাবে খোদাই করা আছে। বুকের ওপর শ্রীবৎসের চিহ্ন, মাথায় মুকুট, কর্ণভূষণ, যজ্ঞোপবীত, উদরবন্ধ, পরিহিত বস্ত্র, শেলা এবং বৈজয়ন্তী মালা মূর্তিতে খোদাই করা হয়েছে। শরীরের বস্ত্রের ভাঁজগুলোও সুসামঞ্জস্যপূর্ণ। জেলার অনেকের কাছেই বালাজি কুলদেবতা।
মন্দিরের প্রাঙ্গণে গরুড় স্তম্ভ রয়েছে এবং তার পাশে কিছু সমাধি আছে। মাঘ শুদ্ধ পঞ্চমীতে এখানকার বিখ্যাত ‘ঘোড়া যাত্রা’ অনুষ্ঠিত হয়। ১৫ দিন ধরে চলা এই যাত্রার নাম ‘শ্রী বালাজির অশ্বারূঢ় যাত্রা’ হলেও এটি ‘ঘোড়া যাত্রা’
নামেই বেশি পরিচিত। চিমুরের এক কারিগরের তৈরি আস্ত কাঠের গুঁড়ি থেকে খোদাই করা ঘোড়ার ওপর এই যাত্রা বের হয়। এই ঘোড়াটিকে সাজিয়ে রথে রাখা হয় এবং তার ওপর অশ্বারূঢ় মুদ্রায় থাকা বালাজির কাঠের প্রতিমা স্থাপন করে শহরজুড়ে রথযাত্রা বের করা হয়। এই যাত্রায় প্রচুর গবাদি পশুর কেনাবেচা হয়। ঘোড়া যাত্রা এখানকার প্রধান আকর্ষণ। চিমুরের এই ঘোড়া যাত্রা মহারাষ্ট্রসহ মধ্য ভারতের ভক্তদের জন্য একটি বড় উৎসব। রাত ১২টায় এই যাত্রা শুরু হয়। রথ টানার জন্য ধুতি, শার্ট এবং ফেটা বা টুপি পরিহিত শত শত ভক্ত উপস্থিত থাকেন। রথের সামনে দিণ্ডি, নৃত্য এবং লেজিম দল তাদের শিল্পকলা প্রদর্শন করে।
এসময় শহরের রাস্তায় আলপনা দেওয়া হয়। মিছিলের পথে আলোকসজ্জা, ফুলের সাজসজ্জা ও পতাকা লাগানো হয়। ভোর পর্যন্ত এই মিছিল চলে।
মন্দির কমিটির পক্ষ থেকে প্রাঙ্গণে বিশাল ভক্ত নিবাস তৈরি করা হয়েছে এবং সেখানে জলখাবারের ব্যবস্থাও রয়েছে। সকাল ৫টা থেকে রাত ৯টা পর্যন্ত ভক্তরা মন্দিরে শ্রীহরি বালাজির দর্শন পেতে পারেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- চিমুর বাস স্ট্যান্ড থেকে ১ কিমি এবং চন্দ্রপুর থেকে ৫০ কিমি দূরত্বে
- চন্দ্রপুরের বিভিন্ন তালুক থেকে চিমুরের জন্য এসটি পরিষেবা উপলব্ধ
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত যেতে পারে
- দেবস্থানের পক্ষ থেকে থাকা ও খাওয়ার সুবিধা রয়েছে
ਸ੍ਰੀਹਰੀ ਬਾਲਾਜੀ ਮੰਦਿਰ
ਚਿਮੂਰ ਸ਼ਹਿਰ, ਤਾ. ਚਿਮੂਰ, ਜ਼ਿ. ਚੰਦਰਪੁਰ
ਵਿਦਰਭ ਦੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਦੇਵਾਲਿਆਂ ਵਿੱਚ ਗਡਚਿਰੋਲੀ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਮਾਰਕੰਡੇਯ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ‘ਚੱਕਰਵਰਤੀ’, ਜਦਕਿ ਚੰਦਰਪੁਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਚਿਮੂਰ ਸਥਿਤ ਬਾਲਾਜੀ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ‘ਸਮਰਾਟ’ ਦੀ ਉਪਮਾ ਦਿੱਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਚਿਮੂਰ ਦੇ ਬਾਲਾਜੀ ਮੰਦਿਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਤਿਰੂਪਤੀ ਦੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਬਾਲਾਜੀ ਮੰਦਿਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵਰਗੀ ਹੀ ਹੈ। ਇਸ ਸਥਾਨ ਨੂੰ ‘ਸ੍ਰੀਹਰੀ ਬਾਲਾਜੀ’ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਮੁੱਚੇ ਵਿਦਰਭ ਅਤੇ ਮੱਧ ਭਾਰਤ ਦੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਇਹ ਮੰਦਿਰ ਇੱਥੋਂ ਦੀ ‘ਘੋੜਾ ਯਾਤਰਾ’ ਲਈ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਯਾਤਰਾ ਦੀ ਲਗਭਗ ੨੫੦ ਸਾਲਾਂ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੀ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ ਇੱਥੋਂ ਦੇ ਕਿਸਾਨ ਭਿਕੂਜੀ ਪਾਟਿਲ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਪਸ਼ੂਆਂ ਲਈ ਗੋਹਾਲਾ ਬਣਾਉਣਾ ਚਾਹੁੰਦੇ ਸਨ। ਉਸ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇੱਥੇ ਖੁਦਾਈ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ। ਕੰਮ ਚੱਲਦੇ ਸਮੇਂ ਇੱਕ ਥਾਂ ‘ਤੇ ਕਹੀ ਦੇ ਧਾਤੂ ਨਾਲ ਟਕਰਾਉਣ ਵਰਗੀ ਆਵਾਜ਼ ਆਈ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਉੱਥੋਂ ਦੀ ਮਿੱਟੀ ਹਟਾਈ ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਉੱਥੇ ਇੱਕ ਮੂਰਤੀ ਹੋਣ ਦਾ ਪਤਾ ਲੱਗਿਆ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਹੌਲੀ-ਹੌਲੀ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਮਿੱਟੀ ਵਿੱਚੋਂ ਕੱਢਿਆ ਅਤੇ ਸਾਫ਼ ਕੀਤਾ। ਉਹ ਬਾਲਾਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸੀ। ਇਸੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ।
ਇਤਿਹਾਸਕ ਰਿਕਾਰਡਾਂ ਅਨੁਸਾਰ, ੧੭੫੭ ਵਿੱਚ ਪੇਸ਼ਵਿਆਂ ਦੇ ਦੀਵਾਨ ਦਿਵਾਕਰ ਪੁਰਸ਼ੋਤਮ ਉਰਫ਼ ਦੇਵਾਜੀਪੰਤ ਚੋਰਘੜੇ ਦੀ ਬੇਨਤੀ ‘ਤੇ ਜਾਨੋਜੀ ਭੌਂਸਲੇ ਨੇ ਇੱਥੇ ਬਾਲਾਜੀ ਮੰਦਿਰ ਬਣਾਉਣ ਲਈ ੨੦੦ ਏਕੜ ਜ਼ਮੀਨ ਦਿੱਤੀ।
ਨਾਲ ਹੀ ਮੰਦਿਰ ਦੇ ਖਰਚੇ ਲਈ ੧੬੧੨ ਰੁਪਏ ਦੀ ਸਾਲਾਨਾ ਆਮਦਨ ਨਿਰਧਾਰਤ ਕੀਤੀ। ੨੦੦ ਏਕੜ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚੋਂ ੬੦ ਏਕੜ ਵਿੱਚ ਪਾਣੀ ਲਈ ਤਲਾਅ ਬਣਾਇਆ ਗਿਆ। ਮਰਾਠਿਆਂ ਦੇ ਇਤਿਹਾਸ ਵਿੱਚ ਨਾਮਣਾ ਖੱਟਣ ਵਾਲੇ ਸਾਢੇ ਤਿੰਨ ਸਿਆਣਿਆਂ ਵਿੱਚੋਂ ਚਿਮੂਰ ਦੇ ਦੇਵਾਜੀਪੰਤ ਚੋਰਘੜੇ ਇੱਕ ਸਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਚੋਰਘੜੇ ਨੇ ਹੀ ਚਿਮੂਰ ਦੀ ਸ੍ਰੀਹਰੀ ਬਾਲਾਜੀ ਦੀ ਘੋੜਾ ਯਾਤਰਾ ਦੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਕੀਤੀ।
ਵਿਭਿੰਨਤਾ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਵਿਦਰਭ ਕੁਦਰਤੀ, ਧਾਰਮਿਕ ਅਤੇ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਪੱਖੋਂ ਅਮੀਰ ਹੈ। ਰਾਸ਼ਟਰ ਸੰਤ ਤੁਕਡੋਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਚਿਮੂਰ ਕਰਮਭੂਮੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਸਥਿਤ ਬਾਲਾਜੀ ਮੰਦਿਰ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਤਿਰੂਪਤੀ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਤਿਰੂਪਤੀ ਦੇ ਬਾਲਾਜੀ ਨੂੰ ਮੰਨੀ ਗਈ ਸੁੱਖ ਇੱਥੇ ਪੂਰੀ ਕੀਤੀ ਜਾ ਸਕਦੀ ਹੈ, ਪਰ ਇਸ ਬਾਲਾਜੀ ਨੂੰ ਮੰਨੀ ਗਈ ਸੁੱਖ ਤਿਰੂਪਤੀ ਵਿੱਚ ਪੂਰੀ ਨਹੀਂ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ, ਉਹ ਇੱਥੇ ਹੀ ਪੂਰੀ ਕਰਨੀ ਪੈਂਦੀ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਮਾਨਤਾ ਹੈ। ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਵਾਲੇ ਮਹਿਲ ਵਰਗੇ ਮੰਦਿਰ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਚਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਲੱਕੜ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ੧੨ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਹਾਥੀ, ਬਾਘ ਵਰਗੇ ਜਾਨਵਰ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ੪ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਵਾਲਾ ਇੱਕ ਹੋਰ ਸਭਾਮੰਡਪ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਬਾਲਾਜੀ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ੧੦੦੦ ਤੋਂ ੧੨੦੦ ਸਾਲ ਪੁਰਾਣੀ ਦੱਸੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ‘ਸਨਕ ਸਦਾਨੰਦ’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਸਿੱਧ ਪੁਰਸ਼ਾਂ ਦੀਆਂ ਪਦਮਾਸਣ ਵਿੱਚ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ ਹਨ। ਦੇਵਾਜੀਪੰਤ ਚੋਰਘੜੇ ਦੇ ਯਤਨਾਂ ਨਾਲ ਈ.ਸ. ੧੭੭੨ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਪੂਰਾ ਹੋਇਆ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਬਾਲਾਜੀ ਦੀ ਯਾਨੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੀ ਮੁੱਖ ਮੂਰਤੀ ਕਾਲੇ ਗੰਡਕੀ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਚਿਹਰੇ ਦੇ ਭਾਵ ਸ਼ਾਂਤ ਹਨ। ਇਹ ਮੂਰਤੀ ੪ ਫੁੱਟ ੭ ਇੰਚ ਉੱਚੀ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ‘ਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਪ੍ਰਭਾਮੰਡਲ ਹੈ ਅਤੇ ਪਿੱਠ ਦਾ ਪੱਥਰ ੨.੫ ਫੁੱਟ ਚੌੜਾ ਹੈ। ਪਿੱਠ ਦੇ ਪੱਥਰ ‘ਤੇ ਮੱਤਸਿਆ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਕਲਕੀ ਤੱਕ ਦੇ ਦਸ਼ਾਵਤਾਰ ਬਹੁਤ ਸਪੱਸ਼ਟ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਛਾਤੀ ‘ਤੇ ਸ੍ਰੀਵਤਸ ਚਿੰਨ੍ਹ, ਸਿਰ ‘ਤੇ ਮੁਕਟ, ਕੰਨਾਂ ਦੇ ਗਹਿਣੇ, ਜਨੇਊ, ਉਦਰਬੰਧ, ਪਹਿਨੇ ਹੋਏ ਵਸਤਰ, ਸ਼ਾਲ, ਵੈਜਯੰਤੀ ਮਾਲਾ ਇਸ ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਸਰੀਰ ‘ਤੇ ਵਸਤਰਾਂ ਦੀਆਂ ਤਹਿਆਂ ਵੀ ਅਨੁਪਾਤਕ ਹਨ। ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਲੋਕਾਂ ਦੇ ਬਾਲਾਜੀ ਕੁਲਦੇਵਤਾ ਹਨ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਗਰੁੜ ਥੰਮ੍ਹ ਹੈ ਅਤੇ ਉਸਦੇ ਨੇੜੇ ਕੁਝ ਸਮਾਧੀਆਂ ਹਨ। ਮਾਘ ਸ਼ੁਕਲ ਪੰਚਮੀ ਨੂੰ ਨਿਕਲਣ ਵਾਲੀ ਇੱਥੋਂ ਦੀ ‘ਘੋੜਾ ਯਾਤਰਾ’ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ੧੫ ਦਿਨ ਚੱਲਣ ਵਾਲੀ ਇਸ ਯਾਤਰਾ ਦਾ ਨਾਮ ‘ਸ੍ਰੀ ਬਾਲਾਜੀ ਦੀ ਅਸ਼ਵਾਰੂਢ ਯਾਤਰਾ’ ਹੋਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ ਇਹ ‘ਘੋੜਾ ਯਾਤਰਾ’
ਵਜੋਂ ਹੀ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਚਿਮੂਰ ਦੇ ਇੱਕ ਕਾਰੀਗਰ ਦੁਆਰਾ ਇੱਕੋ ਲੱਕੜ ਦੇ ਲੱਠੇ ਤੋਂ ਤਿਆਰ ਕੀਤੇ ਗਏ ਘੋੜੇ ‘ਤੇ ਇਹ ਯਾਤਰਾ ਨਿਕਲਦੀ ਹੈ। ਇਸ ਘੋੜੇ ਨੂੰ ਸਜਾ ਕੇ ਰੱਥ ਵਿੱਚ ਰੱਖਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਸਵਾਰੀ ਦੀ ਮੁਦਰਾ ਵਿੱਚ ਬਾਲਾਜੀ ਦੀ ਲੱਕੜ ਦੀ ਪ੍ਰਤਿਮਾ ਰੱਖੀ ਜਾਂਦੀ ਹੈ ਅਤੇ ਪੂਰੇ ਸ਼ਹਿਰ ਵਿੱਚ ਰੱਥ ਦੀ ਸ਼ੋਭਾ ਯਾਤਰਾ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਯਾਤਰਾ ਵਿੱਚ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਪਸ਼ੂਆਂ ਦੀ ਖਰੀਦੋ-ਫਰੋਖਤ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਘੋੜਾ ਯਾਤਰਾ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਆਕਰਸ਼ਣ ਹੈ। ਚਿਮੂਰ ਦੀ ਇਹ ਘੋੜਾ ਯਾਤਰਾ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਸਮੇਤ ਮੱਧ ਭਾਰਤ ਦੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਇੱਕ ਤਿਉਹਾਰ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਰਾਤ ੧੨ ਵਜੇ ਇਹ ਯਾਤਰਾ ਸ਼ੁਰੂ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਰੱਥ ਖਿੱਚਣ ਲਈ ਧੋਤੀ, ਕਮੀਜ਼ ਅਤੇ ਪੱਗ ਜਾਂ ਟੋਪੀ ਪਹਿਨੇ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਰੱਥ ਦੇ ਅੱਗੇ ਡਿੰਡੀਆਂ, ਨਾਚ, ਲੇਜ਼ੀਮ ਖੇਡਣ ਵਾਲੀਆਂ ਟੀਮਾਂ ਆਪਣੀ ਕਲਾ ਪੇਸ਼ ਕਰਦੀਆਂ ਹਨ।
ਇਸ ਸਮੇਂ ਸ਼ਹਿਰ ਦੀਆਂ ਸੜਕਾਂ ‘ਤੇ ਰੰਗੋਲੀਆਂ ਬਣਾਈਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਜਲੂਸ ਦੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਰੌਸ਼ਨੀ, ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਸਜਾਵਟ ਅਤੇ ਝੰਡੀਆਂ ਲਗਾਈਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਸਵੇਰ ਤੱਕ ਇਹ ਜਲੂਸ ਚੱਲਦਾ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਕਮੇਟੀ ਵੱਲੋਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸ਼ਾਨਦਾਰ ਭਗਤ ਨਿਵਾਸ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ ਅਤੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ। ਸਵੇਰੇ ੫ ਤੋਂ ਰਾਤ ੯ ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸ੍ਰੀਹਰੀ ਬਾਲਾਜੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਚਿਮੂਰ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੧ ਕਿਮੀ, ਜਦਕਿ ਚੰਦਰਪੁਰ ਤੋਂ ੫੦ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਚੰਦਰਪੁਰ ਦੇ ਕਈ ਤਾਲੁਕਿਆਂ ਤੋਂ ਚਿਮੂਰ ਲਈ ਐਸਟੀ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਦੇਵਸਥਾਨ ਵੱਲੋਂ ਸਹੂਲਤ
मंदिरे
Temples
मंदिर
-
रामदेगी देवस्थान रामदेगी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
अधिक माहितीRamdegi Devsthan Ramdegi, Ta. Chimur, Dist. Chandrapur
View Detailsरामदेगी देवस्थान रामदेगी, तह. चिमूर, जि. चंद्रपुर
विवरण देखें -
महादेव मंदिर / विठ्ठल मंदिर भिसी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
अधिक माहितीMahadev Temple / Vitthal Temple Bhisi, Ta. Chimur, Dist. Chandrapur
View Detailsमहादेव मंदिर / विठ्ठल मंदिर भिसी, तह. चिमूर, जि. चंद्रपुर
विवरण देखें -
झोपलेला मारुती / ६३ फुटी उभा मारुती अजयपूर / चिचपल्ली, मूलरोड, ता. जि. चंद्रपूर
अधिक माहितीZopalela Maruti / 63 Futi Ubga Maruti Ajaypur / Chichpalli, Mulrod, Ta. Dist. Chandrapur
View Detailsशयनस्थ हनुमान (सोया हुआ मारुति) एवं ६३ फुट ऊँचा खड़ा हनुमान अजयपुर / चिचपल्ली, मूल रोड, जि. चंद्रपुर
विवरण देखें

