
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असले तरी या शहराला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे. महाबळेश्वरमध्ये महादेवाला समर्पित असलेले श्री क्षेत्र महाबळेश्वर हे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार हे मंदिर १२१५ साली बांधले गेले होते. मंदिराचे वैशिष्ट्य असे की ६ जानेवारी १६६५ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईसाहेब जिजाबाई यांची या मंदिरात सुवर्णतुला करून ते सोने गरिबांना दान दिले होते. याच वेळी वयोवृद्ध असलेले महाराजांचे राजनैतिक सल्लागार सोनोपंत डबीर यांचीही येथे सुवर्णतुला करण्यात आली होती.
महाबळेश्वर मंदिराला लागून पंचगंगा मंदिर आहे. कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री आणि सावित्री या पाच नद्यांचा येथे उगम होतो. यासंदर्भात आख्यायिका अशी की आज जेथे महाबळेश्वराचे मंदिर आहे त्या परिसरात ब्रह्मदेवाने एक यज्ञ केला होता. साजशृंगारासाठी वेळ लागल्याने या यज्ञाच्या समारोपासाठी ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री वेळेवर येऊ शकली नाही.
मुहूर्त टळून जाऊ नये म्हणून ब्रह्मदेवाने दुसरी पत्नी गायत्रीला घेऊन समारोपाचा विधी पार पाडला. तेवढ्यात सावित्री तिथे आली आणि आपल्याशिवाय सुरू असलेले यज्ञकर्म पाहून ती संतप्त झाली. त्याच क्षणी तिने ब्रह्मा, विष्णू व महेश या तिघांना तुम्ही नदी व्हाल, असा शाप दिला. त्यानंतर तसाच शाप विष्णूने सावित्रीला दिला व तू अधोगतीकडे जाशील, असे सांगितले. ब्रह्मदेवाने कोयना, विष्णूने कृष्णा, महादेवाने वेण्णा आणि गायत्रीने सरस्वती अशी नदी रूपे घेतली. या सर्व नद्या पूर्ववाहिनी बनल्या; परंतु सावित्री मात्र विष्णूच्या शापामुळे कड्यावरून उडी टाकून (अधोगती) पश्चिमेकडे कोकणातून वाहू लागली. या सर्व नद्यांचा उगम महाबळेश्वर येथून झाल्यामुळे हे स्थान पंचगंगा मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले.
स्कंद पुराणामधील सह्याद्री खंडातील उल्लेखानुसार, या परिसरात देवांनी यज्ञ सुरू केला; परंतु महाबळ व अतिबळ या राक्षसांनी त्यात वारंवार अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. सर्व देवांच्या विनंतीवरून विष्णूने अतिबळ राक्षसाचा वध केला; परंतु इच्छामरण असलेल्या महाबळाचा वध करणे विष्णूला शक्य झाले नाही.
त्यावेळी देवांनी आदिशक्ती महामायेचे स्तवन करून तिची मदत मागितली. आदिशक्तीने महाबळावर आपली मोहिनी टाकली व त्याला देवांकडे आणले. या मोहिनीच्या प्रभावाखाली असल्यामुळे महाबळाने देवांनाच वर मागण्यास सांगितले. त्यावेळी देवांनी त्याचा मृत्यू होईल, असा वर मागितला. महाबळाने नाईलाजाने देवांना तो वर दिला; परंतु मी येथे पर्वतरूपाने वास्तव्य करेन, त्यावर ब्रह्मा–विष्णू–महेश यांनीही वास्तव्य करावे, असा त्याने देवांकडे वर मागितला. देवांनी त्याची इच्छा मान्य करून विष्णूने अतिबळेश्वर, ब्रह्माने कोटेश्वर आणि महादेवांनी महाबळेश्वर नावाने येथे वास्तव्य केले.
ऐतिहासिक नोंदींनुसार, श्रीक्षेत्र महाबळेश्वराचे मंदिर हे देवगिरीच्या सिंघणराजाने बांधलेले आहे, तर येथील पंचगंगा मंदिर हे चंद्रराव मोरे यांच्या घराण्याने बांधले आहे. असे सांगितले जाते की शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधानंतर त्यांच्या तंबूचे कळस कापून आणून या मंदिरांना अर्पण केले होते. या मंदिराजवळ १६४४ साली समर्थ रामदासांनी हनुमान मंदिराची स्थापना केली व मठ बांधला. या मठामध्ये रामदास स्वामींचे दुर्मिळ असे धोतर नेसलेले चित्र आहे.
श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर हे आताच्या जुन्हा महाबळेश्वरमध्ये आहे. संपूर्ण दगडी बांधणीतील हे मंदिर पिरॅमिडप्रमाणे भासते. दक्षिणेकडील मंदिरांप्रमाणे असणारी ही मंदिर शैली महाराष्ट्रात क्वचितच दिसते. पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिराला पश्चिम, उत्तर व दक्षिण या दिशांना तीन प्रवेशद्वारे आहेत. पश्चिमेकडे असलेल्या प्रवेशद्वारावर या मंदिराचा जीर्णोद्धार १९५१ साली केल्याची नोंद आहे. प्रशस्त सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. संपूर्ण मंदिराचे बांधकाम दगडामध्ये केलेले असून भाविकांना दर्शन घेणे सोयीचे जावे यासाठी सभामंडपात स्टीलचे रेलिंग लावण्यात आले आहे. सभामंडपात श्री कालभैरवाची मूर्ती व गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर अंतराळात भलामोठा प्राचीन अखंड दगडात कोरलेला नंदी आहे. गर्भगृहात सुमारे सहा फूट लांबीचे रुद्राक्षाच्या आकाराचे खडबडीत असे स्वयंभू शिवलिंग आहे. त्यामुळे या शिवपिंडीला महालिंग असेही म्हटले जाते.
महाबळेश्वर मंदिरापासून पूर्वेकडे खालच्या बाजूला कृष्णामाई मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याला दोन्ही बाजूने प्रत्येकी चार व समोरील बाजूस तीन ओवऱ्या आहेत. या मंदिरातील सर्व खांबांवर सारखेच नक्षीकाम आहे. मंदिरासमोर पायऱ्या असलेले चौकोनी कुंड आहे. त्यामध्ये मंदिराकडील गोमुखातून कायम पाणी पडत असते. असे सांगितले जाते की पंचगंगा मंदिरातील कृष्णा नदीचे पाणी या गोमुखातून येथील कुंडात पडते. या मंदिराच्या आतील बाजूस वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत. त्यामध्ये कालियामर्दन, बाळकृष्ण त्याच्या सवंगड्यांसोबत खेळतानाची शिल्पे पाहायला मिळतात. मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी असलेल्या खोलगट भागात आयताकृती शाळुंका असलेले शिवलिंग आहे. त्याच्या लिंगाचा भाग हा डमरूच्या आकाराचा आहे. त्यावर खालच्या बाजूला फणा काढलेले ५२ नाग आहेत, तर मध्यभागी ४८ मण्यांच्या तीन रुद्राक्ष माळा आहेत.
महाबळेश्वर मंदिरात महाशिवरात्र व नवरात्रोत्सव असे दोन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. सकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना दर्शन घेता येते. दररोज सकाळी ८ वाजता आणि सायंकाळी ८.३० वाजता महाबळेश्वराची आरती होते. महाबळेश्वरासोबतच येथील अतिबळेश्वराचे मंदिरही ८०० वर्षे प्राचीन असून यामध्ये विष्णूस्वरूप लिंग आहे. याच परिसरात असलेल्या काडसिद्धेश्वर आश्रमात दुपारी १२ ते २ या वेळेत येथे आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो.

सतारा जिले का महाबलेश्वर स्थान शीतल जलवायु वाले पर्यटन केंद्र के रूप में प्रसिद्ध है। इस नगर का ऐतिहासिक तथा धार्मिक दृष्टि से भी अत्यंत महत्त्व है। महाबलेश्वर में भगवान महादेव को समर्पित प्राचीन ‘श्री क्षेत्र महाबलेश्वर मंदिर’ विख्यात है। ऐतिहासिक साक्ष्यों के आधार पर यह मंदिर तेरहवीं शताब्दी (सन् 1215) की रचना है। मंदिर की एक विशेषता यह है कि 6 जनवरी 1665 को छत्रपति शिवाजी महाराज ने अपनी माता राजमाता जीजाबाई की इस मंदिर में सुवर्ण तुला कराई थी। उन्होंने वह सारा सोना निर्धन जनों को दान में दे दिया था। उसी अवसर पर प्रमुख राजनैतिक सलाहकार सोनोपंत डबीर की भी यहाँ सुवर्ण तुला की गई थी।
महाबलेश्वर मंदिर के सम्मुख ही पंचगंगा मंदिर स्थित है। यहाँ कृष्णा, वेन्ना, कोयना, गायत्री और सावित्री—इन पाँच नदियों का उद्गम होता है। इससे संबंधित कथा यह है कि जहाँ आज महाबलेश्वर मंदिर स्थित है, उसी क्षेत्र में ब्रह्मदेव ने यज्ञ किया था। श्रृंगार में विलंब होने के कारण उनकी पत्नी सावित्री यज्ञ के समापन हेतु समय पर नहीं पहुँच सकीं।
शुभ मुहूर्त न निकल जाए, इसलिए ब्रह्मदेव ने दूसरी पत्नी गायत्री के साथ यज्ञ संपन्न किया। तभी वहाँ पहुँची सावित्री ने अपने बिना आरंभ किए गए यज्ञकर्म को देखा। उन्होंने क्रोधित होकर ब्रह्मा, विष्णु और महेश को शाप दिया कि वे नदी बन जाएँ। तदुपरांत विष्णु ने भी सावित्री को शाप दिया कि वह अधोगति को प्राप्त होगी।
ब्रह्मा ने कोयना, विष्णु ने कृष्णा, महादेव ने वेन्ना और गायत्री ने सावित्री के रूप में नदी का स्वरूप धारण किया। ये सभी नदियाँ पूर्व की ओर प्रवाहित हुईं। किंतु सावित्री, विष्णु के शाप के कारण कगार से कूदकर पश्चिम दिशा में कोंकण मार्ग से प्रवाहित होने लगीं। इन पाँचों नदियों का उद्गम महाबलेश्वर से होने के कारण यह स्थान पंचगंगा मंदिर कहलाया।
स्कंदपुराण के सह्याद्रिखंड में वर्णन मिलता है कि इस क्षेत्र में देवगणों ने यज्ञ आरंभ किया था। किंतु महाबल और अतिबल नामक राक्षस बार-बार उसमें विघ्न डालने लगे। देवताओं की प्रार्थना पर विष्णु ने अतिबल का वध किया।
परंतु इच्छा-मृत्यु प्राप्त महाबल का वध विष्णु के लिए संभव नहीं हुआ। तब देवताओं ने आदिशक्ति महामाया की आराधना कर सहायता माँगी। आदिशक्ति ने मोहिनी रूप धारण कर महाबल को आकर्षित किया और उसे देवताओं के समक्ष ले आईं। मोहिनी के प्रभाव में आने पर महाबल ने देवताओं से वरदान माँगने को कहा। देवताओं ने उसके वध का वरदान माँगा। विवश होकर महाबल ने वह वरदान दिया। परंतु उसने यह निवेदन किया कि वह यहाँ पर्वत रूप में निवास करे और ब्रह्मा, विष्णु, महेश—तीनों देव भी यहाँ वास करें। देवताओं ने उसकी इच्छा स्वीकार की। विष्णु ने अतिबलेश्वर, ब्रह्मा ने कोटेश्वर तथा महादेव ने महाबलेश्वर नाम से यहाँ निवास किया।
ऐतिहासिक उल्लेखों के अनुसार श्री क्षेत्र महाबलेश्वर मंदिर देवगिरी के सिंघणराज द्वारा निर्मित है। पंचगंगा मंदिर का निर्माण चंद्रराव मोरे के घराने ने कराया था। यह भी कहा जाता है कि छत्रपति शिवाजी महाराज ने अफजल खान के वध के पश्चात उसके तंबू का कलश काटकर इस मंदिर में अर्पित किया था। इसी मंदिर के समीप सन् 1644 में समर्थ रामदास स्वामी ने हनुमान मंदिर की स्थापना की और मठ का निर्माण कराया। इस मठ में रामदास स्वामी का दुर्लभ चित्र आज भी सुरक्षित है,
जिसमें वे धोती पहने हुए हैं।
श्री क्षेत्र महाबलेश्वर मंदिर वर्तमान पुराना महाबलेश्वर में स्थित है। पूर्णतः पत्थर से बना यह मंदिर पिरामिड के आकार का प्रतीत होता है। दक्षिण भारत की मंदिर शैली में निर्मित यह रचना महाराष्ट्र में दुर्लभ है। पश्चिमाभिमुख इस मंदिर में पश्चिम, उत्तर और दक्षिण दिशाओं में प्रवेश द्वार हैं। पश्चिम द्वार पर सन् 1951 में हुए जीर्णोद्धार का उल्लेख अंकित है। मंदिर में विशाल सभामंडप, अंतराल और गर्भगृह हैं। संपूर्ण मंदिर पत्थरों से निर्मित है। श्रद्धालुओं की सुविधा हेतु सभामंडप में स्टील की रेलिंग लगाई गई है। सभामंडप में श्री कालभैरव की मूर्ति है। गर्भगृह के द्वार के सम्मुख अंतराल में एक ही विशाल पाषाण से निर्मित नंदी स्थापित है। गर्भगृह में लगभग छह पद लंबा, रुद्राक्ष के आकार का, खुरदुरा स्वयंभू शिवलिंग है। इसे महालिंग भी कहा जाता है।
महाबलेश्वर मंदिर से पूर्व की ओर निचले भाग में कृष्णामाई मंदिर स्थित है। यह मंदिर पूर्वाभिमुख है। इसके दोनों ओर चार-चार बरामदे और सामने तीन खुले मंडप हैं। मंदिर के सभी स्तंभों पर एकसमान नक्काशी की गई है। मंदिर के सम्मुख सीढ़ियों सहित एक चौकोर कुंड है। इसमें मंदिर के गोमुख से निरंतर जल प्रवाहित होता है। कहा जाता है कि पंचगंगा मंदिर से कृष्णा नदी का जल इस गोमुख के माध्यम से इस कुंड में आता है। मंदिर के भीतर विशिष्ट शिल्पकला देखी जा सकती है। यहाँ कालियामर्दन और बालकृष्ण का सखाओं के साथ खेलना आदि दृश्य अंकित हैं। गर्भगृह के मध्य भाग में स्थित गहराई पर आयताकार आधार सहित शिवलिंग स्थापित है। इस शिवलिंग का स्वरूप डमरू के आकार का है। इसके निचले हिस्से पर 52 नागों के फन और मध्य भाग में 48 मणियों की तीन रुद्राक्ष मालाएँ उत्कीर्ण हैं।
महाबलेश्वर मंदिर में महाशिवरात्रि और नवरात्रोत्सव—ये दो उत्सव भव्य रूप से मनाये जाते हैं। प्रतिदिन प्रातः 5 बजे से रात्रि 9 बजे तक श्रद्धालुओं के लिए दर्शन खुले रहते हैं। प्रतिदिन प्रातः 8 बजे और सायंकाल 8:30 बजे महाबलेश्वर की आरती होती है। महाबलेश्वर के साथ ही समीप स्थित अतिबलेश्वर मंदिर लगभग 800 वर्ष प्राचीन है। इसमें विष्णु स्वरूप शिवलिंग विराजित है। उसी परिसर में स्थित काडसिद्धेश्वर आश्रम में दोपहर 12 से 2 बजे के मध्य आने वाले श्रद्धालुओं को महाप्रसाद दिया जाता है।