
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेला व त्यांचे समाधी स्थान असलेला सातारा जिल्ह्यातील सज्जनगड हा किल्ला प्रसिद्ध आहे. विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात असलेला हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये जिंकून घेतला व रामदास स्वामींनी या किल्ल्यावर वास्तव्य करावे, अशी विनंती केली. आधी पायथ्याशी असलेल्या परळी गावावरून परळीगड असे नाव असलेल्या या गडाचे समर्थांच्या वास्तव्यानंतर छत्रपतींनी सज्जनगड असे नामकरण केले.
सातारा शहराच्या वायव्येकडे सज्जनगड किल्ला आहे. हा परिसर पूर्वी अश्वलायन ऋषींची तपोभूमी असल्याने या गडाचे प्राचीन नाव अश्वलायन गड असे होते. ११व्या शतकात शिलाहार राजाने या किल्ल्याची बांधणी केली आणि पायथ्याशी असणाऱ्या परळी गावामुळे याला परळीगड हे नाव दिले.
१३५८ ते १३७५ या काळात चौथ्या बहामनी राजाच्या ताब्यात हा किल्ला होता. विजापूरचा आदिलशहा बहामनी राज्याचा वारसदार असल्यामुळे काही काळ हा किल्ला आदिलशहाकडे होता. त्याच्या कार्यकाळात याला ‘नवरसतारा’ असे नाव दिले गेले होते. २ एप्रिल १६७३ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला.
या किल्ल्यात अधूनमधून समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य असे. वाढत्या वयामुळे समर्थांनी कायमस्वरूपी या किल्ल्यात वास्तव्य करावे, अशी विनंती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना केली. समर्थांच्या होकारानंतर १७७६ मध्ये येथील किल्लेदार जिजोजी काटकर यास पत्र लिहून समर्थांची चोख व्यवस्था ठेवण्याची आज्ञा केली. समर्थ येथे वास्तव्यास आल्यानंतर या किल्ल्याचे नाव बदलून सज्जनगड असे करण्यात आले. सहा वर्षांच्या वास्तव्याने हा गड पावन करून समर्थांनी २२ जानेवारी १६८२ या दिवशी सज्जनगडावर आपला देह ठेवला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ छत्रपती संभाजी महाराजांनी येथे श्रीराम मंदिर व समर्थ समाधी मंदिर बांधले होते.
समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर सज्जनगड किल्ला आहे. किल्ल्याच्या सर्व बाजूंनी दरी असून पायथ्याशी काही गावे आहेत. यापैकी गजवडी गावातून सज्जनगडाच्या पायथ्यापर्यंत डांबरी रस्ता आहे. तेथून गडावर पोचण्यासाठी सुमारे २५० पायऱ्या आहेत. गजवडी येथून सज्जनगडावर जाणारी जुनी पायवाटही आहे. पायरी मार्गावर प्रथम एक कामधेनू मंदिर आणि त्यासमोर एक हनुमान मंदिर आहे.
पायथ्यापासून १३० पायऱ्या चढून आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार लागते. उंच आणि रेखीव बुरुजांमधील या महाद्वारापासून आणखी ५० पायऱ्या चढल्यावर आणखी एक दरवाजा आहे. त्याला ‘समर्थ महाद्वार’ असे नाव आहे. महाद्वारे रात्री ९ ते सकाळी ५ यादरम्यान बंद असतात.
समर्थ महाद्वारातून पुढे आल्यावर गडाच्या माथ्यावर प्रवेश होतो. डाव्या बाजूला असलेल्या घोडाळे तलावाशेजारी गडाच्या एका टोकाला आंग्लाई देवीचे मंदिर आहे. ऐतिहासिक नोंदींप्रमाणे या मंदिरातील देवीची स्थापना समर्थांनी केलेली आहे. ही मूर्ती समर्थांना अंगापूर येथील एका डोहात सापडली होती. या डोहामध्ये त्यांना श्रीराम आणि आंग्लाई देवी या दोन मूर्ती सापडल्या होत्या. त्यापैकी श्रीरामाची मूर्ती त्यांनी चाफळमध्ये आणि आंग्लाई देवी मूर्तीची सज्जनगडावर स्थापना केली. देवीची ही मूर्ती सुबक व अखंड काळ्या पाषाणातील आहे.
आंग्लाई देवी मंदिरापासून पुन्हा पायऱ्यांच्या मुख्य वाटेवरून पुढे गेल्यानंतर डाव्या पेठेतील मारुती मंदिर (पूर्वी येथे पेठ असावी) आहे.
असे सांगितले जाते की समर्थ गडावर राहण्यासाठी आले त्याआधीपासून हे मंदिर आहे. मंदिरातील मारुतीच्या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की या मारुतीचे तोंड उघडे आहे. मारुती मंदिराच्या मागच्या बाजूला पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाणारे ‘सोनेरे तळे‘ आहे. या तलावामध्ये उत्तर बाजूस काही प्राचीन गुंफा आहेत. तलावातील पाण्याची पातळी कमी असल्यास त्या दिसतात. सज्जनगडाचा संपूर्ण माथा हा शंखाच्या आकाराचा आहे.
पेठेतील मारुती मंदिराच्या बाजूला समर्थांचे शिष्य श्रीधर स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेली श्रीधर कुटी आहे. श्रीधर स्वामींचे शिष्यगण व श्रीसमर्थ सेवा मंडळाच्या सदस्यांनी १९५१ साली या कुटीचे बांधकाम केले होते. या कुटीमध्ये समर्थ रामदास स्वामी व श्रीधर स्वामी यांच्या पादुकांचे मंदिर आहे. श्रीधर कुटीतील या पादुकांची दररोज सकाळी ६ ते ७.३० या वेळेत अभिषेक पूजा होते. त्यानंतर आरती झाल्यावर तीर्थप्रसादाचे वाटप होते. १९५० पासून मंदिरात होणारी उपासना २००१ पासून सायंकाळी ६ ते ७.१५ या वेळेत श्रीधर कुटीत होते. या उपासनेनंतर आरती होऊन आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो.
गडावरील मुख्य वास्तू म्हणजे येथील श्रीराम मंदिर आणि समर्थांची समाधी.
श्रीराम मंदिरातील श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती तंजावरमधील अरणीकर नावाच्या अंध कारागिराकडून बनवून घेऊन व्यंकोजीराजे यांनी समर्थांना भेट दिल्या होत्या. या मूर्तींसोबतच रामदास स्वामींची एक छोटी मूर्ती येथे आहे. श्रीराम मंदिरातील गर्भगृहाच्या तळघरात समर्थांची समाधी आहे. ही समाधी काळ्या पाषाणाची व आयताकृती असून त्यावर असलेल्या पितळी मेघडंबरीवर कोरीवकाम आहे. असे सांगितले जाते की या समाधीच्या जागेवर पूर्वी खड्डा होता. तेथे समर्थ रामदास स्वामींच्या पार्थिवावार शिष्य उद्धव स्वामींनी अग्निसंस्कार केल्यावर दुसऱ्या दिवशी या जागेवर ही दगडी समाधी प्रगट झाली. त्यामुळे ही समाधी स्वयंभू मानली जाते. समाधी मंदिरात दिवे लावण्यासाठी १०८ कोनाडे आहेत.
श्रीराम मंदिराच्या उजव्या बाजूला उंच जोत्यावर समर्थांचे शेजघर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांच्या वास्तव्यासाठी बांधून दिलेला हाच तो मठ. या मठामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याठिकाणी आता त्यांच्या नित्य वापरातील वस्तू ठेवलेल्या आहेत.
त्यात शिवाजी महाराजांनी समर्थांना दिलेला पितळी खूर असलेला पलंग असून या त्यावर समर्थांचे शिष्य व तंजावरचे मठाधीपती मेरुस्वामी यांनी समर्थांना पाहून काढलेले चित्र आहे. समर्थांच्या शस्त्रांमध्ये शिवाजी महाराजांनी दिलेली कुबडीतील गुप्ती, एक नक्षीदार कुबडी, वेताची काठी आणि सोटा या वस्तू आहेत. याशिवाय समर्थांच्या नित्य वापरातील पिण्याच्या पाण्याचा लोटा, पानाचा डबा व पिकदाणी आहेत. उरमोडी धरणातून समर्थ रामदासांसाठी त्यांचे शिष्य कल्याणस्वामी ज्या हंड्यांमधून पाणी आणत ते तांब्याचे हंडेही येथे आहेत. मुख्य मंदिरासमोर असलेल्या अशोकवनात समर्थांच्या शिष्या अक्कास्वामी यांचे वृंदावन आहे. रामदास स्वामींनी देह ठेवल्यानंतर सज्जनगडावरील मठ व मंदिरांची व्यवस्था या अक्कास्वामींनी २९ वर्षे सांभाळली होती.
मंदिर प्रांगणातून गडाच्या पश्चिम बाजूला असलेल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर उजवीकडे गडाच्या अगदी टोकावर एका चौथऱ्यावर हनुमान मूर्ती आहे. येथून पुढे धाब्याचा मारुती मंदिर आहे. या मारुती मंदिराची उभारणी समर्थांनीच केलेली आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या शत्रूचे धाबे दणाणून सोडणारा म्हणून याचे नामकरण समर्थांनी धाब्याचा मारुती असे केले होते.
गडावर भाविकांच्या सोयीसाठी भक्तधाम व कल्याण स्मृती या दोन बहुमजली भक्त निवास इमारती बांधण्यात आल्या आहेत. यामध्ये गडावर निवास करणाऱ्या भाविकांसाठी मोफत राहण्याची सुविधा आहे. समर्थ सेवा मंडळातर्फे १९६० पासून येथे सुरू असणारे अन्नदान २००१ पासून भक्त निवासाच्या प्रशस्त सभामंडपात केले जाते. यामध्ये भाविकांना सकाळी चहा व नाश्ता, दुपारी व रात्री महाप्रसादाची सोय असते. दरवर्षी दासनवमी उत्सवामध्ये प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसांत भक्त निवासाच्या सभामंडपात मनाचे श्लोक व दासबोधाचे पारायण केले जाते.

बीजापुर के आदिलशाह के अधिकार में रहे इस किले को छत्रपति शिवाजी महाराज ने वर्ष 1673 में जीता। उन्होंने समर्थ रामदास स्वामी से अनुरोध किया कि वे इस किले पर निवास करें। पूर्व में तलहटी में स्थित परली गाँव के कारण इस किले का नाम परलीगढ़ था। समर्थ के निवास के पश्चात छत्रपति शिवाजी महाराज ने इसका नाम “सज्जनगढ़” रखा। यह किला समर्थ रामदास स्वामी के निवास और समाधि से पुनीत होने के कारण संपूर्ण सातारा जिले में प्रसिद्ध है।
सातारा नगर की उत्तर-पश्चिम (वायव्य) दिशा में सज्जनगढ़ किला स्थित है। यह स्थान पूर्वकाल में अश्वलायन ऋषि की तपोभूमि था। इसी कारण प्राचीनकाल में इसे “अश्वलायनगढ़” नाम से जाना जाता था। 11वीं शताब्दी में शिलाहार राजा ने इस किले का निर्माण किया था। तलहटी पर बसे परली गाँव के कारण इसे “परलीगढ़” नाम दिया गया। वर्ष 1358 से 1375 के काल में यह किला चतुर्थ बहमनी राजा के अधीन था। बीजापुर का आदिलशाह बहमनी राज्य का उत्तराधिकारी था। इस कारण कुछ समय तक यह किला आदिलशाह के अधीन भी रहा। उसके शासनकाल में इस किले को “नवरसतारा” नाम दिया गया था। 2 अप्रैल 1673 को छत्रपति शिवाजी महाराज ने यह किला जीत लिया।
समर्थ रामदास स्वामी का इस किले पर समय-समय पर निवास होता था। उनकी वृद्धावस्था में छत्रपति शिवाजी महाराज ने उनसे निवेदन किया कि वे स्थायी रूप से यहीं निवास करें। समर्थ की स्वीकृति के बाद वर्ष 1676 में किलेदार जिजोजी काटकर को पत्र लिखा गया। इसमें समर्थ की समुचित व्यवस्था करने का आदेश दिया गया था। समर्थ के आगमन के बाद इस किले का नाम परिवर्तित कर “सज्जनगढ़” रखा गया। छह वर्ष के निवास से इस किले को पवित्र कर समर्थ रामदास स्वामी ने 22 जनवरी 1682 को यहीं देहत्याग किया। उनकी स्मृति में छत्रपति संभाजी महाराज ने यहाँ श्रीराम मंदिर तथा समर्थ समाधि मंदिर का निर्माण कराया।
समुद्रतल से लगभग 3000 पद की ऊँचाई पर यह सज्जनगढ़ किला स्थित है। किले के चारों ओर गहरी घाटियाँ हैं। इसकी तलहटी पर कुछ गाँव बसे हैं। इनमें से गजवाड़ी गाँव से सज्जनगढ़ की तलहटी तक कोलतार मार्ग जाता है। वहाँ से किले पर पहुँचने के लिए लगभग 250 सीढ़ियाँ चढ़नी पड़ती हैं। गजवाड़ी से किले पर जाने का एक प्राचीन मार्ग भी है। सीढ़ीमार्ग पर पहले कामधेनु मंदिर और उसके सम्मुख हनुमान मंदिर है। तलहटी से 130 सीढ़ियाँ चढ़ने के बाद “छत्रपति शिवाजी महाराज महाद्वार” आता है। ऊँचे और सुडौल बुर्जों के बीच बने इस द्वार से 50 और सीढ़ियाँ चढ़ने पर “समर्थ महाद्वार” मिलता है। दोनों महाद्वार रात्रि 9 बजे से प्रातः 5 बजे तक बंद रहते हैं।
समर्थ महाद्वार से आगे आने पर किले के शिखर पर प्रवेश होता है। बाईं ओर घोडाल तालाब के समीप किले के छोर पर आंग्लाई देवी का मंदिर है। ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार इस मंदिर में स्थापित देवी की मूर्ति समर्थ द्वारा स्थापित की गई थी। यह मूर्ति उन्हें अंगापुर के एक जलाशय में प्राप्त हुई थी। उसी जलाशय में उन्हें श्रीराम और आंग्लाई देवी की दो मूर्तियाँ मिली थीं। उनमें से श्रीराम की मूर्ति उन्होंने चाफल में और आंग्लाई देवी की मूर्ति सज्जनगढ़ में प्रतिष्ठित की। देवी की यह मूर्ति सुडौल है और अखंड काले पाषाण से निर्मित है।
आंग्लाई देवी मंदिर से आगे मुख्य सीढ़ीमार्ग पर बढ़ने पर बाईं ओर पेठ का मारुति मंदिर आता है। कहा जाता है कि यह मंदिर समर्थ के आगमन से पहले से यहाँ विद्यमान था। इस मारुति की मूर्ति का विशेष लक्षण यह है कि इसका मुख खुला है। मारुति मंदिर के पीछे पेयजल हेतु “सोनेरे तालाब” है। इस तालाब के उत्तर भाग में कुछ प्राचीन गुफाएँ हैं। ये गुफाएँ जलस्तर कम होने पर दिखाई देती हैं। सज्जनगढ़ का संपूर्ण शीर्षभाग शंख के आकार का है।
पेठ के मारुति मंदिर के समीप समर्थ के शिष्य श्रीधर स्वामी के निवास से पुनीत “श्रीधर कुटी” है। श्रीधर स्वामी के श्रद्धालुगण और श्रीसमर्थ सेवा मंडल के सदस्यों ने सन् 1951 में इस कुटी का निर्माण किया। यहाँ समर्थ रामदास स्वामी और श्रीधर स्वामी की पादुकाओं का मंदिर है। श्रीधर कुटी में इन पादुकाओं का अभिषेक-पूजन प्रतिदिन प्रातः 6 से 7:30 बजे तक होता है। उसके पश्चात आरती और तीर्थप्रसाद वितरण किया जाता है। सन् 1950 से मंदिर में चल रही उपासना सन् 2001 से सायंकाल 6 से 7:15 बजे तक श्रीधर कुटी में होने लगी। इस उपासना के बाद आरती होती है और आए हुए श्रद्धालुओं को महाप्रसाद दिया जाता है।
श्रीराम मंदिर और समर्थ की समाधि इस किले के मुख्य स्थान हैं। श्रीराम मंदिर में विराजमान श्रीराम, लक्ष्मण, सीता और हनुमान की मूर्तियाँ तंजावर के अरणीकर नामक एक दृष्टिहीन शिल्पी द्वारा निर्मित की गई थीं। इन्हें व्यंकोजीराजे ने समर्थ को भेंटस्वरूप दिया था। इन मूर्तियों के साथ रामदास स्वामी की एक छोटी मूर्ति भी यहाँ स्थापित है। श्रीराम मंदिर के गर्भगृह के तल में समर्थ की समाधि है।
यह समाधि काले पाषाण की आयताकार है। उस पर स्थित पीतल की मेघडंबरी पर मनोहर नक्काशी की गई है। कहा जाता है कि जहाँ यह समाधि है वहाँ पूर्व में एक गड्ढा था। जब समर्थ रामदास स्वामी के पार्थिव का उनके शिष्य उद्धव स्वामी ने अग्निसंस्कार किया तो अगले दिन उसी स्थान पर यह पाषाण की समाधि प्रकट हुई। इसलिए इसे स्वयंभू समाधि माना जाता है। समाधि मंदिर में दीप प्रज्वलन हेतु 108 देवकोष्टक बने हैं।
श्रीराम मंदिर की बाईं ओर ऊँचे चबूतरे पर समर्थ का शयनागार है। छत्रपति शिवाजी महाराज ने समर्थ के निवास हेतु यह मठ बनवाया था। इसी मठ में उन्होंने अंतिम श्वास लिया। यहाँ अब उनके दैनिक उपयोग की वस्तुएँ सुरक्षित रखी गई हैं। इनमें शिवाजी महाराज द्वारा समर्थ को दिया गया पीतल के खुरों वाला पलंग शामिल है। उस पर उनके शिष्य और तंजावर के मठाधिपति मेरुस्वामी द्वारा बनाया गया समर्थ का चित्र लगा है। इसके अतिरिक्त समर्थ के शस्त्रों में शिवाजी महाराज द्वारा दी गई कुबड़ी में गुप्ती, नक्काशीदार कुबड़ी, बेंत की छड़ी और सोटा भी यहाँ रखे हैं।
साथ ही समर्थ के दैनिक उपयोग के पात्र जैसे पेयजल का लोटा, पान का डिब्बा और पिकदानी भी सुरक्षित हैं। उरमोडी बांध से समर्थ रामदास स्वामी के लिए उनके शिष्य कल्याणस्वामी जिन तांबे के पात्रों से पानी लाते थे वे भी यहाँ रखे हैं। मुख्य मंदिर के सम्मुख स्थित अशोकवन में समर्थ की शिष्या अक्कास्वामी की वृंदावन समाधि है। रामदास स्वामी के देहत्याग के पश्चात सज्जनगढ़ के मठ और मंदिरों की व्यवस्था अक्कास्वामी ने 29 वर्षों तक संभाली।
मंदिर प्रांगण से किले की पश्चिम दिशा में बने द्वार से बाहर निकलने पर दायीं ओर किले के छोर पर एक चबूतरे पर हनुमान की मूर्ति है। इसके आगे “धाब्या मारुति” मंदिर है जिसकी स्थापना समर्थ ने ही की थी। पश्चिम से आने वाले शत्रुओं में भय उत्पन्न करने वाला होने के कारण समर्थ ने इसका नाम “धाब्या मारुति” रखा था।
किले पर श्रद्धालुओं की सुविधा के लिए “भक्तधाम” और “कल्याण स्मृति” नामक दो बहुमंजिला भक्तनिवास इमारतें बनाई गई हैं। इनमें श्रद्धालुओं के लिए निःशुल्क निवास की व्यवस्था है। समर्थ सेवा मंडल की ओर से सन् 1960 से प्रारंभ हुआ अन्नदान सन् 2001 से भक्तनिवास के विशाल सभामंडप में किया जाता है। इसमें श्रद्धालुओं को प्रातः चाय और जलपान तथा दोपहर और रात्रि में महाप्रसाद की व्यवस्था होती है। हर साल दासनवमी उत्सव में प्रतिपदा से नवमी तक नौ दिनों में भक्तनिवास के सभामंडप में “मनाचे श्लोक” और “दासबोध” का पारायण किया जाता है।