साखरगडनिवासिनी मंदिर

किन्हई-साखरगड, ता. कोरेगाव, जि. सातारा

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात `किन्हईगाव आहे. या गावाच्या पूर्वेकडे असलेल्या साखरगड डोंगरावरील अंबाबाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. या प्राचीन मंदिराचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन संवर्धानाचे काम केल्यामुळे जागतिक स्तरावर त्याची दखल घेण्यात आली असून २०१४ मध्येयुनेस्कोकडून (UNESCO) या मंदिराचा ‘Cultural Heritage Conservation Award’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला महाराष्ट्र सरकारनेही तीर्थक्षेत्राचादर्जा दिला आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध येथे यमाई देवीचे जागृत स्थान आहे. किन्हईजवळ हिवरे नावाचे एक गाव आहे. पूर्वी तेथे त्र्यंबकपंत कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ राहत असत. ते रोज घोड्यावरून औंध येथील यमाई देवीच्या दर्शनाला जात असत. हा क्रम त्यांनी १२ वर्षे पाळला. त्यानंतर यमाई देवीने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले. श्री. कुलकर्णी यांच्या पत्नी गर्भवती होत्या घऱी बाळंतपण करू शकणारे कोणीही नव्हते. त्यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना औंधास जाण्याची विनंती केली; परंतु १२ वर्षे चुकविलेले देवीचे दर्शन कसे चुकविणार यासाठी ते औंधास गेले देवीस सांगितले की मी आता १५ दिवस येथेच थांबणार आहे. माझ्या पत्नीच्या बाळंतपणाची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवत आहे. त्यानंतर ते औंध येथेच १५ दिवस राहिले.

१५ दिवसांनंतर घरी आल्यावर त्यांनी पाहिले की पत्नीचे बाळंतपण सुखरूप झाले होते. याबाबत पत्नीकडे विचारणा केली असता तिने सांगितले की तुमच्या लांबच्या नात्यातील बहिणीने बाळंतपण केले सर्व घरातील कामेही तीच पाहत होती. पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे धुंणीभांडी करण्यासाठी नदीवर गेलेल्या त्या बहिणीला पाहण्यासाठी ते नदीवर गेले असता तेथे भांडी होती, पण कोणतीही व्यक्ती नव्हती. कुलकर्णी यांच्या लक्षात आले की बहिणीच्या रूपात येऊन देवीनेच पत्नीचे बाळंतपण केले. दुसऱ्या दिवशी कुलकर्णी औंध येथे गेले देवीला दर्शन देण्यास विनंती केलीदेवीने प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिले वर मागण्यास सांगितले. त्यावर आपल्यासोबत येऊन देवीने आपल्या घरच्या देव्हाऱ्यात वास्तव्य करावे, असा वर त्यांनी मागितला. देवीने तथास्तु म्हटले; परंतु रस्त्यातून जाताना मागे पाहण्याची अट घातली.

साखरगडाच्या पायथ्याशी आल्यावर देवीच्या पैंजणांचा आवाज ऐकू आल्याने आपसूकच कुलकर्णी यांनी मागे पाहिले देवी त्याच ठिकाणी अदृश्य झाली. ज्या ठिकाणी देवी गुप्त झाली तेथे एक शिळा प्रगट झाली. तेथे आजही देवीची शिळा असून त्याला घाटजाई मंदिर, असे संबोधले जाते. त्यानंतर त्र्यंबकपंतांना देवीने सांगितले की अट मोडल्यामुळे आता घरी येणे शक्य नाही, पण आजूबाजूच्या डोंगरात जेथे वनगाय स्वतःहून वासराशिवाय दुधाच्या धारा सोडेल, तेथे माझे वास्तव्य आहे, असे समजून माझी पूजा कर. त्याप्रमाणे साखरगडावर वनगायीने दुधाच्या धारा सोडल्या, तेथे देवीचा स्वयंभू तांदळा होता. त्यानंतर औंधच्या पंतप्रतिनिधी घराण्यातील राजांनी येथे मंदिर बांधले.

साखरगडावर देवीचे स्थान असल्यामुळे ही देवी साखरगडनिवासिनी म्हणून प्रसिद्ध आहे. किन्हई गावापासून दोन किमी अंतरावर हे मंदिर आहे. येथे येण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग हा टेकडीच्या पायथ्यापासून २५० पायऱ्यांचा, तर दुसरा मार्ग हा थेट गडापर्यंत जाणारा डांबरी रस्त्याचा. या मार्गाने आल्यास घाट लागण्याच्या आधी घाटजाई देवीचे मंदिर लागते. तेथील शिलालेखात १७३६ ते १७४६ या दरम्यान औंधचे राजे रामचंद्र पंतप्रतिनिधी यांनी अंबाबाई मंदिराची उभारणी केली, अशी नोंद आहे. अंबाबाई मंदिर हेमाडपंती शैलीतील असून त्याला संपूर्ण तटबंदी आहे. तटबंदी तीन फूट रुंदीची, घडीव काळ्या पाषाणात बांधलेली असून त्यावर वीटकाम आहे. सहा बुरुज असलेल्या तटबंदीतील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. या नगारखान्याच्या हिंदू शैलीतील कमानीवर बहामनी शैलीतील मिनार आहेत. चुन्यातील नाजूक कलाकुसर नगारखान्याच्या सौंदर्यात भर घालतात. प्रवेशद्वारातून मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला काळ्या पाषाणामध्ये एक मीटर उंचीची देवीची मूर्ती दिसते. मंदिर परिसरात असलेल्या उंच दगडी दीपमाळा दख्खनच्या पठारावरील काळ्या दगडांत बांधलेल्या आहेत. या दीपमाळांवर दिवे ठेवण्यासाठी दगडात ऐटदार मोर कोरलेले आहेत. मंदिर दगडी बांधकामात असून त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण कळस हा वीट चुन्याचा वापर करून बांधण्यात आला आहे. क्रमाक्रमाने उंच जाणाऱ्या कळसाला मध्येच मिनारांची जोड दिलेली आहे. कळसावर अनेक देवीदेवतांची शिल्पे असून त्यामध्ये गणेश, दुर्गा, विष्णू आदी देवतांची अनेक रूपे आहेत. या मंदिरापुढे असलेला सभामंडप पेशवेकाळात बांधलेला आहे. मात्र तो लाकडाचा आहे. यामध्ये १९३३३४ साली काढलेली काही चित्रे (पेंटिंग्ज्) लावलेली आहेत. मूळ मंदिरामध्ये या मंडपाला जोडलेला आणखी एक (पहिला) मंडप आहे. याला तीनही बाजूला दरवाजे आहेत. गर्भगृह मात्र पूर्णपणे बंदिस्त आहे. गर्भगृहात अंबाबाई देवीची मूर्ती असून मुकुट, विविध अलंकार ल्यालेली वस्त्रे परिधान केलेली देवीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण भासते.

त्र्यंबकपंत कुलकर्णी यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन औंधच्या यमाई देवीने येथे अंबाबाईच्या रूपाने वास्तव्य केले आहे. त्याचे स्मरण म्हणून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला (त्रिपुरारी पौर्णिमा) औंधच्या अंबाबाईची पालखी साखरगडाच्या पायथ्याशी येते. त्याचवेळी साखरगडनिवासिनी अंबाबाईची पालखी यमाई देवीच्या भेटीसाठी पायथ्यापर्यंत जाते. हा भेट सोहळा येथे मोठ्या उत्साहाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होतो. कार्तिक महिन्यात औंधची यमाई देवी येथे मुक्कामाला असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. देवीचे येथील स्थान जागृत असल्याचे मानले जाते, त्यामुळे दररोज येथे शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.

डोंगरावर अहोरात्र वाहणारा वारा, ऊन, पाऊस यामुळे मंदिराची हानी होत होती. त्यावेळी मंदिर समितीच्या परवानगीने किन्हईकर कुलकर्णी भावंडांनी आपल्या कुलदेवतेसाठी मंदिराचे शास्त्रशुद्ध जतनसंवर्धनाचे काम हाती घेतले ते पारही पाडले. मूळ शैलीला धरून केलेल्या या जतनसंवर्धनाच्या कामाची दखल थेटयुनेस्कोने घेऊन २०१४ ला ‘Cultural Heritage Conservation Award’ हा पुरस्कार दिला होता. आपला वारसा मूळ स्वरूपात पुढील पिढीकडे सुपूर्द करण्याचे महत्त्व जाणून, त्याबद्दल समाजात जनजागृती व्हावी, या हेतूने अशा पुरस्कारांचे युनेस्कोकडून वितरण करण्यात येते. त्यावेळी नऊ देशांतील तज्ज्ञांकडून आंतरराष्ट्रीय निकषांनुसार मंदिराची पाहणी करून या पुरस्कारासाठी साखरगडनिवासिनी मंदिराची निवड करण्यात आली होती.

उपयुक्त माहिती:

  • सातारा शहरापासून २१ किमी अंतरावर
  • सातारा, कोरेगाव येथून किन्हईसाठी एसटीची सेवा
  • खासगी वाहने थेट साखरगडाच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही

साखरगडनिवासिनी मंदिर

किन्हई-साखरगड, तह. कोरेगांव, जि. सातारा

सातारा जिले की कोरेगांव तहसील में स्थित किन्हई गाँव की पूर्व दिशा में साखरगड पहाड़ी पर अंबाबाई देवी का प्रसिद्ध मंदिर है। इस प्राचीन मंदिर का संरक्षण और संवर्धन शास्त्रोक्त रीति से किया गया। इसी कारण इसे विश्व स्तर पर मान्यता प्राप्त हुई। साल 2014 में इस मंदिर को ‘यूनेस्को’ (UNESCO) द्वारा Cultural Heritage Conservation Award देकर सम्मानित किया गया। हजारों श्रद्धालुओं के श्रद्धास्थान इस मंदिर को महाराष्ट्र सरकार ने तीर्थक्षेत्र की ‘ख’ श्रेणी प्रदान की है।

मंदिर की एक प्रचलित कथा है। सातारा जिले की खटाव तहसील में स्थित औंध में यमाई देवी का जागृत स्थान है। किन्हई के समीप हिवरे गाँव में पहले त्र्यंबकपंत कुलकर्णी नामक एक भक्त रहते थे। वे हर दिन घोड़े पर सवार होकर औंध जाते थे और यमाई देवी के दर्शन करते थे। यह क्रम उन्होंने पूरे 12 साल तक निभाया। देवी ने उनकी भक्ति की परीक्षा लेने का निश्चय किया। उस समय कुलकर्णी जी की पत्नी गर्भवती थीं। घर में प्रसव में सहायता करने वाला कोई नहीं था। इसलिए पत्नी ने उनसे उस दिन औंध न जाने की विनती की। परंतु 12 साल की अविचल भक्ति को अधूरा छोड़ना उन्हें उचित न लगा। इसलिए वे औंध चले गए। उन्होंने देवी से कहा, “मैं अब 15 दिन यहीं रुकूँगा। मेरी पत्नी के प्रसव का उत्तरदायित्व मैं आपको सौंपता हूँ।”
15 दिन बाद जब वे घर लौटे, तो देखा कि पत्नी का प्रसव सुरक्षित रूप से हो चुका है। पूछने पर पत्नी ने बताया कि आपकी दूर की बहन आई थी। उसी ने प्रसव कराया और घर का सारा काम संभाला। यह सुनकर कुलकर्णी जी नदी किनारे उस बहन को देखने गए। वहाँ केवल बर्तन थे और कोई व्यक्ति नहीं था। उन्हें समझ आया कि देवी ने बहन का रूप धारण कर पत्नी की सेवा की थी। अगले ही दिन वे औंध गए और देवी से पुनः दर्शन की विनती की। देवी ने प्रसन्न होकर उन्हें दर्शन दिए और वरदान माँगने को कहा। कुलकर्णी जी ने निवेदन किया, “आप मेरे घर आकर मेरे पूजाघर में वास करें।” देवी ने सहमति दी, पर कहा, “रास्ते में पीछे मुड़कर मत देखना।”
साखरगड की तराई में पहुँचते ही जब कुलकर्णी जी को पायलों की आवाज सुनाई देना बंद हुई, तो वे सहज ही पीछे मुड़ गए। उसी क्षण देवी लुप्त हो गईं। जिस स्थान पर वे लुप्त हुईं, वहाँ एक शिला प्रकट हुई। आज वहाँ घाटजाई मंदिर स्थित है। देवी ने सपने में उन्हें कहा, “अब मैं घर नहीं आ सकती। जिस स्थान पर वनगाय बछड़े के बिना स्वयं दूध की धारा प्रवाहित करेगी, वहीं मेरा वास समझकर पूजा करना।” उसी के अनुसार साखरगड पर जहाँ वनगाय ने दूध की धारा छोड़ी, वहीं देवी का स्वयंभू पाषाण प्रकट हुआ। इसके बाद औंध के प्रतिनिधि शासकों ने वहाँ मंदिर का निर्माण करवाया।
साखरगड पर निवास होने से देवी साखरगडनिवासिनी के नाम से प्रसिद्ध हैं। यह मंदिर किन्हई गाँव से लगभग 2 किमी दूर स्थित है। यहाँ पहुँचने के दो मार्ग हैं। एक मार्ग पहाड़ी की तराई से 250 सीढ़ियों वाला है। दूसरा मार्ग सीधे किले तक जाने वाली पक्की सड़क का है। इस सड़क मार्ग पर घाट के आरंभ से पहले घाटजाई देवी का मंदिर आता है। वहाँ के शिलालेख में उल्लेख है कि 1736 से 1746 के बीच औंध के राजा रामचंद्र पंतप्रतिनिधि ने अंबाबाई मंदिर का निर्माण करवाया था।
अंबाबाई मंदिर हेमाडपंती शैली में निर्मित है। इसके चारों ओर तीन पद चौड़ी तराशे हुए काले पत्थर की चहारदीवारी है। इस पर ईंटों का काम किया गया है। इस चहारदीवारी में छह बुर्ज हैं और प्रवेशद्वार पर नौबतखाना स्थित है। नौबतखाने की हिंदू शैली की मेहराबों पर बहमनी शैली की मीनारें हैं। चूने की बारीक कलाकारी नौबतखाने की शोभा बढ़ाती है। प्रवेशद्वार से भीतर जाने पर बाईं ओर काले पाषाण की लगभग एक मीटर ऊँची देवी की मूर्ति है। मंदिर परिसर में बनी ऊँची दीपमालाएँ दक्कन के पठार के काले पत्थर से निर्मित हैं। इन पर मोर की आकृतियाँ तराशी गई हैं।
मंदिर का निर्माण पत्थर का है। इसका विशिष्ट शिखर ईंट और चूने से बनाया गया है। क्रमशः ऊँचाई की ओर बढ़ते इस शिखर में बीच-बीच में मीनारें जोड़ी गई हैं। शिखर पर गणेश, दुर्गा और विष्णु जैसे देवी-देवताओं की अनेक मूर्तियाँ उकेरी गई हैं। मंदिर के सम्मुख स्थित सभामंडप पेशवाकालीन है। यह लकड़ी का बना है। इसमें 1933–34 में बने कुछ चित्र लगाए गए हैं। मूल मंदिर से जुड़ा एक और प्रथम मंडप है। इसके तीनों ओर दरवाजे हैं। गर्भगृह पूर्णतः बंद है। इसमें मुकुट, आभूषणों और वस्त्रों से सुशोभित अंबाबाई देवी की मूर्ति विराजमान है।
त्र्यंबकपंत कुलकर्णी की भक्ति से प्रसन्न होकर औंध की यमाई देवी ने यहाँ अंबाबाई के रूप में निवास किया। इसी स्मृति में हर साल कार्तिक पूर्णिमा (त्रिपुरारी पूर्णिमा) को औंध की अंबाबाई की पालकी साखरगड की तराई तक आती है। उसी समय साखरगडनिवासिनी अंबाबाई की पालकी यमाई देवी से मिलने तराई तक जाती है। यह मिलन समारोह अत्यंत उत्साहपूर्वक और हजारों श्रद्धालुओं की उपस्थिति में संपन्न होता है। कार्तिक महीने में औंध की यमाई देवी यहाँ निवास करती हैं, ऐसी श्रद्धालुओं की श्रद्धा है। यह स्थान अत्यंत जागृत माना जाता है। यहाँ हर दिन सैकड़ों श्रद्धालु दर्शन के लिए आते हैं।
पहाड़ी पर तेज हवा, धूप और वर्षा के कारण मंदिर को क्षति पहुँचना स्वाभाविक था। तब मंदिर समिति की अनुमति से किन्हईकर कुलकर्णी भाइयों ने अपनी कुलदेवी के इस मंदिर का संरक्षण-संवर्धन कार्य शास्त्रोक्त रीति से पूर्ण किया। उन्होंने मूल स्थापत्य शैली को यथावत रखा। इस कार्य की सराहना यूनेस्को ने की और साल 2014 में Cultural Heritage Conservation Award प्रदान किया। अपनी सांस्कृतिक धरोहर को मूल स्वरूप में आने वाली पीढ़ियों तक पहुँचाने के महत्व को समझाने के उद्देश्य से यह पुरस्कार दिया गया था। नौ देशों के विशेषज्ञों ने अंतरराष्ट्रीय मापदंडों के अनुसार इस मंदिर का निरीक्षण कर इसका चयन किया।

मुख्य विशेषताएँ

  • सातारा शहर से दूरी: 21 किमी
  • सातारा और कोरेगांव से किन्हई के लिए राज्य परिवहन सेवा उपलब्ध है।
  • निजी वाहन सीधे साखरगड के वाहनतल तक जा सकते हैं।
  • परिसर में भक्तनिवास और जलपान की सुविधा उपलब्ध नहीं है।
Back To Home