रामदेगी देवस्थान

रामदेगी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वनक्षेत्रात, निमढेला सफारी गेटपासून किमी अंतरावर घनदाट जंगलात, डोंगराच्या मध्यभागी नदीकाठावर रामदेगी देवस्थान स्थित आहे. गोंडी भाषेतदिघीम्हणजे आराम शीण घालविण्याचे रम्य ठिकाण! श्रीरामांनी दक्षिणेकडे जाताना या ठिकाणी विश्रांती घेतली होती म्हणून या क्षेत्राचे नावरामदिघीअसे पडले. त्यानंतर अपभ्रंश होऊनरामदेगीम्हणून ते प्रचलित झाले. जंगल परिसर असल्यामुळे निमढेला सफारी गेटवर प्रत्येक भाविकाची नोंद करून या मंदिरात जाण्यासाठी त्यांना पुढे सोडले जाते.

पूर्वीच्या काळी दंडकारण्याचा भाग असलेल्या या परिसरात ७०० ते ८०० वर्षांपूर्वी वस्ती होती, असे सांगितले जाते. त्याच काळात घनदाट जंगलात ७० ते ८० फूट उंच टेकडीवर हे हेमाडपंती रचनेचे मंदिर बांधण्यात आले आहे. ८०० वर्षांपूर्वी विदर्भावर यादवांचे साम्राज्य होते. त्या काळात या परिसरात अनेक मंदिरे बांधली गेली. विदर्भात हेमाडपंती रचनेची १५० ते २०० मंदिरे असल्याचे सांगितले जाते. या सर्वांमध्ये रामदेगी देवस्थानाचे विशेष महत्त्व आहे. सुप्रसिद्ध इतिहासकार अण्णाजी जयरामजी यांच्या मते, महाकवी कालिदास यांनीमेघदूतया महाकाव्याची रचना याच क्षेत्रात केली असावी.

या मंदिराची आख्यायिका अशी की या परिसरात ताडोबासुर नावाचा राक्षस राहत होता. त्याच्या नावावरूनच हे जंगल ताडोबाचे जंगल म्हणून पूर्वीपासून ओळखले जात असे. त्यावेळी तेथे जमुनाबाई नावाची एक भिल्ल स्त्री राहत असे. ती रामाची परमभक्त होती. तिला ताडोबासुर सतत त्रास देत असे; परंतु ती शूर होती. ती कधीही ताडोबासुराच्या हाताला लागली नाही. ती या घनदाट जंगलातून घोड्यावरून प्रवास करत असे. एकदा ताडोबासुराने तिचा पाठलाग सुरू केला. अनेक डोंगर दऱ्या पार करून ती रामदेगी परिसरात आली असताना ताडोबासुर आपल्याला आता पकडणार याची जाणीव होताच तिने श्रीरामांचा धावा करीत जोरदार किंकाळी फोडली घोड्यावरून स्वतःला खोल दरीत झोकून दिले. तेव्हा ती रामदेगी मंदिराजवळ असलेल्या कुंडातील पाण्यात पडल्याने तिचा जीव वाचला. तिची किंकाळी ऐकून श्रीरामांनी बाण सोडून ताडोबासुराचा वध केला. रामदेगी देवस्थान परिसरातच या जमुनामातेचे लहानसे समाधीमंदिर असून त्यामध्ये घोड्यावर स्वार जमनामातेची मूर्ती आहे. या मूर्तीची स्थापना १७२० मध्ये केल्याची नोंद येथे आहे.

पायथ्यापासून सुमारे १०० पायऱ्या चढून रामदेगी मंदिरात जाता येते. डोंगर कड्यावर असल्यामुळे मंदिराचा परिसर आटोपशीर असा आहे. मंदिराच्या समोरील बाजूस मारुतीचे लहानसे मंदिर असून त्यातील मूर्ती मात्र फूट उंचीची आहे. मुख्य मंदिराच्या सभामंडपात १६ दगडी स्तंभ असून सभामंडपाच्या तिन्ही बाजूला अर्धभिंती आहेत. सर्व बाजूंनी डोंगर मध्यभागी हे मंदिर असल्यामुळे एखाद्या बशीमध्ये कप असावा, असे येथील दृश्य भासते. लालसर, गुलाबी वालुकामय पाषाणात या मंदिराची बांधणी करण्यात आली आहे. सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. (ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हा दगड तयार झाला नंतरच्या काळात तो मंदिरे, महाल, राजवाडे, स्मारके स्तंभ बांधण्यासाठी वापरात येऊ लागला.)

या मंदिरावर जास्त शिल्पांकन नसले तरी सभामंडपातील सर्व स्तंभांवर वरील बाजूस भारवाहक यक्षप्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. सभामंडपात अंतराळात नंदीच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर वरच्या बाजूस नक्षीकाम ललाटबिंबावर गणेश प्रतिमा आहे. गर्भगृहात एक वैशिष्ट्यपूर्ण दगडी शिवपिंडी त्यासमोरील बाजूस फूट उंचीचे पितळी शिवलिंग त्यावर महादेवांचा मुखवटा आहे. शिवपिंडीसमोरील भिंतींमध्ये असलेल्या खोबणीत श्रीगणेश नागदेवता यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या शिखरावर आमलक कळस आहे.

मंदिराच्या मागच्या बाजूने उंच डोंगरावरून पडणाऱ्या धबधब्यामुळे येथे पाण्याचे मोठे कुंड तयार झाले आहे. त्याला सीताकुंड म्हटले जाते. मंदिराशिवाय या परिसरात संघारामगिरी हे बुद्धविहार आहे. येथे बुद्ध चरित्रातील अनेक प्रसंगांच्या प्रतिमा आहेत. दरवर्षी येथे ३० ३१ जानेवारीला यात्रा भरते. या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी दलित पीडितांना आवाज दिला होता, असा इतिहास आहे. याशिवाय या परिसरात ४० ते ५० माणसे बसू शकतील, अशा आकाराच्या गुंफा आहेत. त्यांना भीमनाचापरा असे म्हटले जाते. या गुंफा भीम अर्जुनाने निर्माण केल्याचे सांगितले जाते. रामदेगी देवस्थानात मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक सोमवारी यात्रा भरते. त्यावेळी हजारो भाविक येथे दर्शनाला येतात.

मंदिराच्या पायथ्याशी भाविकांच्या सुविधेसाठी धर्मशाळा बांधण्यात आली आहे. याच परिसरात श्रीराम राधाकृष्ण मंदिरे आहेत. परिसरात वाहनतळ पूजा साहित्याची विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. येथे येणारे भाविक पर्यटक येथील स्थानिक महिलांकडून चुलीवर बनविण्यात येणाऱ्या पिठलंभाकरीचा आवर्जून आस्वाद घेतात. महाराष्ट्र सरकारनेही या ठिकाणाला पर्यटनाचा दर्जा दिला असून वेळोवेळी सरकारतर्फे या परिसराच्या विकासासाठी निधी दिला जातो.

उपयुक्त माहिती:

  • चिमूरपासून २८ किमी, तर वरोरापासून ३४ किमी अंतरावर
  • येथे येण्यासाठी एसटीची सुविधा नाही
  • खासगी वाहनाने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाता येते 
  • परिसरात न्याहरीची सुविधा आहे

रामदेगी देवस्थान

रामदेगी, तह. चिमूर, जि. चंद्रपुर

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प के वन क्षेत्र में, निमढेला सफारी गेट से २ किलोमीटर की दूरी पर, घने जंगल और नदी के किनारे, एक पहाड़ी के मध्य में रामदेगी देवस्थान स्थित है। गोंडी भाषा में ‘दिघी’ का अर्थ ‘आराम और विश्राम का रमणीय स्थल’ होता है। ऐसी मान्यता है कि श्रीराम दक्षिण दिशा की ओर जाते समय इसी स्थान पर विश्राम के लिए रुके थे, इसलिए इस स्थान को ‘रामदिघी’ कहा गया, जो कालांतर में अपभ्रंश होकर ‘रामदेगी’ हो गया। यह क्षेत्र वन विभाग के अंतर्गत होने के कारण निमढेला सफारी गेट पर प्रत्येक श्रद्धालु का पंजीकरण किया जाता है तथा उन्हें मंदिर तक पहुँचाने की व्यवस्था भी उपलब्ध है।
प्राचीन काल में यह क्षेत्र दंडकारण्य का एक भाग था और लगभग ७००-८०० वर्ष पूर्व यहाँ एक बस्ती हुआ करती थी। उसी समय घने जंगल में ७०-८० फुट ऊँची पहाड़ी पर हेमाडपंती शैली में इस मंदिर का निर्माण किया गया। लगभग ८०० वर्ष पूर्व विदर्भ में यादवों का साम्राज्य था और उनके शासनकाल में इस क्षेत्र में कई मंदिरों का निर्माण हुआ। विदर्भ में हेमाडपंती शैली के लगभग १५०-२०० मंदिर हैं, जिनमें रामदेगी देवस्थान एक विशेष महत्व रखता है। प्रसिद्ध इतिहासकार अण्णाजी जयरामजी के अनुसार, यह संभव है कि महाकवि कालिदास ने अपने महाकाव्य ‘मेघदूत’ की रचना इसी क्षेत्र में की हो।
मंदिर से जुड़ी पौराणिक कथा के अनुसार, इस क्षेत्र में ताडोबासुर नामक एक राक्षस का वास था। पूर्व में इस जंगल को ‘ताडोबा का जंगल’ भी कहा जाता था। उस समय यहाँ जमुनाबाई नामक एक भील महिला रहती थी, जो भगवान राम की परमभक्त थी। ताडोबासुर उसे प्रताड़ित करता था, किंतु वह साहसी थी और कभी उसके हाथ नहीं आई। एक बार जब ताडोबासुर ने उसका पीछा किया, तो उससे बचने के लिए वह कई पहाड़ और खाइयाँ पार करती हुई रामदेगी क्षेत्र में पहुँची। जब उसे लगा कि ताडोबासुर अब उसे पकड़ लेगा, तो उसने श्रीराम का आवाहन किया और अपने घोड़े सहित एक गहरी खाई में छलाँग लगा दी। वह रामदेगी मंदिर के निकट स्थित एक कुंड में गिरी, जिससे उसके प्राण बच गए। उसकी पुकार सुनकर श्रीराम ने ताडोबासुर का वध किया। रामदेगी परिसर में ही जमुनाबाई का एक छोटा समाधि मंदिर है, जिसमें घोड़े पर सवार जमुनाबाई की प्रतिमा स्थापित है। यह प्रतिमा सन् १७२० में स्थापित की गई थी।
मंदिर तक पहुँचने के लिए लगभग १०० सीढ़ियाँ चढ़नी पड़ती हैं। पहाड़ी के किनारे स्थित होने के कारण मंदिर का परिसर छोटा है। मंदिर के सामने हनुमान जी का एक छोटा मंदिर है, जिसमें स्थापित प्रतिमा ५ फुट ऊँची है। मुख्य मंदिर के सभामंडप में पत्थर के १६ स्तंभ हैं और तीनों ओर अर्ध-दीवारें हैं। चारों ओर से पहाड़ों से घिरे होने और मध्य में मंदिर स्थित होने के कारण यह दृश्य किसी विशाल तश्तरी जैसा प्रतीत होता है। मंदिर का निर्माण लाल और गुलाबी बलुआ पत्थर से किया गया है। मंदिर की संरचना में सभामंडप, अंतराल और गर्भगृह शामिल हैं। (ज्वालामुखी के उद्गार से निर्मित यह पत्थर बाद में मंदिरों, महलों, राजमहलों, स्मारकों और स्तंभों के निर्माण के लिए उपयोग में लाया गया।)
मंदिर पर अधिक शिल्पकला नहीं है, किंतु सभामंडप के सभी स्तंभों के ऊपर भारवाहक यक्ष प्रतिमाएँ उकेरी गई हैं। सभामंडप और अंतराल में नंदी की प्रतिमा है। गर्भगृह की द्वारपट्टी के ऊपरी भाग में नक्काशी का कार्य है और ललाटबिंब पर गणेश जी की प्रतिमा है। गर्भगृह में एक विशेष पत्थर का शिवलिंग और उसके सामने ४ फुट ऊँचा पीतल का एक अन्य शिवलिंग स्थापित है, जिसके ऊपर महादेव का मुखौटा रखा गया है। शिवलिंग के निकट की दीवारों में श्रीगणेश और नागदेवता की प्रतिमाएँ हैं। मंदिर के शिखर पर आमलक (कलश के नीचे का गोलाकार पत्थर) और कलश सुशोभित हैं।
मंदिर के पीछे स्थित ऊँची पहाड़ी से गिरने वाले झरने से एक विशाल कुंड का निर्माण हुआ है, जिसे ‘सीताकुंड’ कहा जाता है। मंदिर के अतिरिक्त, इस क्षेत्र में संघारामगिरी नामक एक बुद्ध विहार भी है। जिसमें बुद्ध के जीवन के कई प्रसंगों को दर्शाती प्रतिमाएँ हैं। यहाँ प्रत्येक वर्ष ३० और ३१ जनवरी को एक यात्रा का आयोजन किया जाता है। कहा जाता है कि इसी अवसर पर बाबासाहेब आंबेडकर ने दलितों और पीड़ितों के अधिकारों के लिए अपनी आवाज बुलंद की थी। इसके अतिरिक्त, इस क्षेत्र में दो ऐसी गुफाएँ हैं, जिनमें ४०-५० लोग एक साथ बैठ सकते हैं; इन्हें ‘भीमनाचापरा’ कहा जाता है। माना जाता है कि इन गुफाओं का निर्माण भीम और अर्जुन ने किया था।
रामदेगी देवस्थान में मार्गशीर्ष माह के प्रत्येक सोमवार को यात्रा का आयोजन होता है, जिसमें हजारों श्रद्धालु दर्शन के लिए आते हैं। मंदिर की तलहटी में श्रद्धालुओं की सुविधा के लिए एक धर्मशाला बनाई गई है। इसी परिसर में श्रीराम और राधा-कृष्ण के मंदिर भी हैं। परिसर में वाहनतल और पूजा सामग्री बेचने वाली अनेक दुकानें हैं। यहाँ आने वाले श्रद्धालु और पर्यटक, स्थानीय महिलाओं द्वारा चूल्हे पर बनाए जाने वाले पारंपरिक भोजन ‘पिठलं-भाकरी’ (बेसन की सब्जी और रोटी) का आनंद लेते हैं। महाराष्ट्र सरकार ने इस स्थान को एक पर्यटन स्थल घोषित किया है और इसके विकास के लिए समय-समय पर निधि प्रदान की जाती है।

उपयोगी जानकारी:

  • चिमूर से २८ किमी तथा वरोरा से ३४ किलोमीटर की दूरी पर स्थित।
  • चिमूर से राज्य परिवहन बस सेवा उपलब्ध है।
  • निजी वाहन मंदिर के वाहनतल तक जा सकते हैं।
  • परिसर में जलपान की सुविधा उपलब्ध है।
Back To Home