वाईजवळील मेणवली हे गाव पेशव्यांच्या साडेतीन शहाण्यांपैकी एक असलेले बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस यांनी वसविले होते. पेशवाईतील हिशेब सांभाळणारे नानासाहेब हे पेशव्यांचे अत्यंत विश्वासू होते. या ठिकाणी त्यांनी कृष्णा नदीच्या तीरावर चंद्रकोरीच्या आकाराचा घाट बांधून त्याशेजारी घंटा मंदिर, मेणेश्वर मंदिर, विष्णू मंदिर व स्वतःसाठी भव्य वाडा बांधला होता. नानासाहेबांच्या या वाड्यासाठी मेणवली गाव ओळखले जात असले तरी त्यांनी बांधलेली येथील मेणेश्वर व विष्णू मंदिर ही भाविकांची श्रद्धास्थाने आहेत.
वाईपासून साधारणतः ३ किमी अंतरावर मेणवली गाव आहे. वाई तालुक्यातील या गावाला ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. औंधचे भगवान त्र्यंबक पंतप्रतिनिधी आणि साताऱ्याचे रघुनाथ घनश्याम मंत्री यांच्याकडून नाना फडणवीस यांना १७६८ मध्ये कृष्णेकाठची ही जमीन देणगी स्वरूपात मिळाली होती. या जमिनीवर नाना फडणवीस यांनी मेणवली हे छोटेसे व टुमदार गाव वसविले. त्यानंतर कृष्णा नदीवर चिरेबंदी दगडांचा वापर करून स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना ठरू शकेल, असा घाट बांधला. या घाटावर मेणेश्वर मंदिर व विष्णू मंदिर ही दोन मंदिरे पेशवेकालीन बांधकामाची साक्ष देत आजही सुस्थितीत उभी आहेत.
कृष्णेच्या तीरावरील मेणेश्वर मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे या मंदिरासमोर असणारी ६५० किलो वजनाची पंचधातूची घंटा. मराठ्यांच्या वसईवरील विजयाची साक्ष देणाऱ्या या घंटेवर जिजस आणि मेरी यांची चित्रे कोरलेली असून १७०७ हा अंक त्यावर नमूद केलेला आहे. नानासाहेबांनी मेणेश्वर मंदिरासमोर या घंटेसाठी खास मंदिर बांधले होते. अशा प्रकारचे मंदिर महराष्ट्रात दुर्मिळ आहे. आजही या घंटा मंदिरात ही भव्य घंटा पाहता येते.
घंटा मंदिरासमोर संपूर्ण दगडात बांधलेल्या मेणेश्वर मंदिराची रचना ही हेमाडपंती असून घंटा मंदिरापासून काहीशा उंचावर असलेल्या या मंदिराच्या चौथऱ्यावर जाण्यासाठी पाच ते सहा पायऱ्या आहेत. नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप व गाभारा अशी या मंदिराची रचना आहे. या मंदिराचे वेगळेपण असे की सभामंडपापासून १२ ते १४ फूट खाली या मंदिराचा गाभारा आहे. सभामंडपातून खाली उतरण्यासाठी निमुळती पायरी वाट असून येथील पायऱ्या या सुमारे दीड ते पावणेदोन फूट उंचीच्या आहेत. अंधारी व निमुळती वाट व जास्त उंचीच्या पायऱ्यांमुळे या गाभाऱ्यात जपून उतरावे लागते. गाभाऱ्यात असलेल्या शिवपिंडीमध्ये मध्यभागी एक खड्डा असून त्यात पाणी असते. पावसाळ्याच्या दिवसांत जेव्हा कृष्णा नदीला जास्त पाणी असते तेव्हा येथील गाभाऱ्यातील शिवपिंडीही पाण्याखाली असते.
मेणेश्वर मंदिरातून बाहेर पडल्यावर वरच्या बाजूला विष्णू मंदिर आहे. येथून नदीच्या घाटावरील काही पायऱ्या वर चढून गेल्यानंतर विष्णू मंदिराच्या आवारात प्रवेश होतो. या मंदिराची बाह्य रचना, शिखराची रचना ही मेणेश्वर मंदिराप्रमाणेच आहे. मेणेश्वर मंदिर हे दिवसभर भाविकांना दर्शनासाठी खुले असते पण विष्णू मंदिरात मात्र सकाळच्या वेळेतच भाविकांना जाता येते. त्यानंतर दिवसभर ते बंद असते.
घंटा मंदिर, मेणेश्वर मंदिर व विष्णू मंदिर याशिवाय मेणवली गावाचे आकर्षण आहे ते म्हणजे कृष्णा नदीवरील चंद्रकोरीच्या आकाराचा घाट व त्याशेजारी असणारा नाना फडणवीस यांचा प्रशस्त वाडा. हा वाडा सुमारे दीड एकर जागेवर आहे. पूर्णपणे लाकडी बांधकाम व पेशवेकालीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेला हा दुमजली वाडा १७७० पासून आजही ऊन, वारा व पावसाचा मारा झेलत भक्कम स्थितीत उभा आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, पेशव्यांचा राज्यकारभार पुण्यातून चालत असल्याने नानासाहेबांचे वास्तव्य या वाड्यामध्ये खूपच कमी दिवस होते. या वाड्यात नानासाहेबांचा दिवाणखाना, त्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तू व अनेक वैशिष्ट्यपूर्ण भित्तीचित्रे पाहायला मिळतात. वाड्याच्या प्रांगणात असलेला गोरक्ष चिंचेचा प्रचंड मोठा वृक्ष लक्ष वेधून घेतो. या वाड्यामध्ये अनेक हिंदी व मराठी चित्रपटांचे चित्रीकरण होत असते.
वाई के समीप स्थित मेणवली गाँव को नाना फड़नवीस ने बसाया था। उनका पूरा नाम बालाजी जनार्दन भानु था। वे पेशवाओं के ‘साढ़े तीन बुद्धिमानों’ में से एक थे। पेशवा के दरबार में कार्यरत चार विद्वानों को उनकी असाधारण बुद्धिमत्ता के कारण इस नाम से जाना जाता था। नाना फड़नवीस पेशवाओं का लेखा-जोखा संभालते थे। वे उनके अत्यंत विश्वासपात्र माने जाते थे। उन्होंने इस स्थान पर कृष्णा नदी के तट पर अर्धचंद्राकार घाट का निर्माण करवाया। इसके निकट उन्होंने घंटा मंदिर, मेणेश्वर मंदिर और विष्णु मंदिर बनवाए। उन्होंने अपने लिए एक भव्य हवेली भी बनवाई थी। नाना फड़नवीस द्वारा निर्मित मेणेश्वर और विष्णु मंदिर आज भी श्रद्धालुओं के लिए महत्वपूर्ण स्थल हैं।
मेणवली गाँव वाई से लगभग ३ किलोमीटर दूर स्थित है। वाई तहसील के इस गाँव का ऐतिहासिक और धार्मिक दृष्टि से विशेष महत्व है। औंध के भगवान त्र्यंबक पंतप्रतिनिधि और सातारा के रघुनाथ घनश्याम मंत्री ने १७६८ में नाना फड़नवीस को कृष्णा नदी के तट पर यह भूमि दान में दी थी। इसी भूमि पर नाना फड़नवीस ने मेणवली गाँव बसाया। उन्होंने तराशे हुए पत्थरों से एक घाट का निर्माण करवाया।
इस घाट पर स्थित मेणेश्वर मंदिर और विष्णु मंदिर पेशवाकालीन स्थापत्य के उत्कृष्ट उदाहरण हैं। ये मंदिर आज भी अच्छी स्थिति में हैं।
कृष्णा नदी के तट पर मेणवली (वाई) में स्थित श्री मेणेश्वर मंदिर का मुख्य आकर्षण यहाँ का विशाल ऐतिहासिक घंटा है। लगभग ६५० किलोग्राम भार वाला यह भव्य घंटा पंचधातु से निर्मित है। यह घंटा मराठा साम्राज्य की वसई विजय का प्रतीक है। इस घंटे पर जीसस और मेरी के चित्र उकेरे गए हैं। इस पर वर्ष १७०७ अंकित है। नानासाहेब ने मेणेश्वर मंदिर के सम्मुख इस घंटे के लिए एक विशेष मंदिर भी बनवाया था। महाराष्ट्र में इस प्रकार का मंदिर दुर्लभ है। आज भी इस मंदिर में यह भव्य घंटा देखा जा सकता है।
घंटा मंदिर के सम्मुख स्थित मेणेश्वर मंदिर हेमाडपंती शैली में निर्मित है। यह मंदिर घंटा मंदिर से थोड़ी ऊँचाई पर स्थित है। इसके चबूतरे तक पहुँचने के लिए पाँच-छह सीढ़ियाँ हैं। मंदिर की संरचना में नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप और गर्भगृह शामिल हैं। विशेष बात यह है कि सभामंडप से गर्भगृह १२–१४ फीट नीचे स्थित है। सभामंडप से नीचे उतरने का मार्ग संकरा और ऊँचा है। गर्भगृह में स्थित शिवलिंग के मध्य में एक गड्ढा है। इसमें सदैव जल भरा रहता है। वर्षा के दिनों में जब कृष्णा नदी का जलस्तर बढ़ता है, तब शिवलिंग भी जलमग्न हो जाता है।
मेणेश्वर मंदिर से बाहर निकलकर ऊपरी भाग में विष्णु मंदिर स्थित है। यहाँ से घाट की कुछ सीढ़ियाँ चढ़कर विष्णु मंदिर के परिसर में प्रवेश होता है। इस मंदिर की बाहरी संरचना और शिखर मेणेश्वर मंदिर के समान ही हैं। मेणेश्वर मंदिर दिनभर श्रद्धालुओं के लिए खुला रहता है। इसके विपरीत विष्णु मंदिर केवल प्रातःकाल में दर्शन के लिए खुलता है। शेष समय यह मंदिर बंद रहता है।
घंटा मंदिर, मेणेश्वर मंदिर और विष्णु मंदिर के अतिरिक्त मेणवली गाँव का मुख्य आकर्षण कृष्णा नदी पर स्थित अर्धचंद्राकार घाट है। इसके पास ही नाना फड़नवीस की विशाल हवेली स्थित है। यह हवेली लगभग डेढ़ एकड़ क्षेत्र में फैली हुई है। यह पूर्ण रूप से लकड़ी से बनी है। यह पेशवाकालीन स्थापत्य कला का मनोहर उदाहरण है। यह दो मंजिला हवेली वर्ष १७७० से आज भी निरंतर धूप, वायु और वर्षा को झेल रही है।
ऐतिहासिक दस्तावेजों के अनुसार पेशवाओं का शासन पुणे से होने के कारण नानासाहेब का यहाँ निवास बहुत कम था। इस हवेली में नानासाहेब की बैठक, दैनिक उपयोग की वस्तुएँ और कई भित्तिचित्र आज भी देखे जा सकते हैं। हवेली के प्रांगण में स्थित विशाल गोरख इमली का वृक्ष भी ध्यान आकर्षित करता है। इस हवेली में कई हिंदी और मराठी फिल्मों का चित्रांकन भी होता है।