महाकाली देवी मंदिर

आडिवरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी

करवीर निवासिनी म्हणजेच कोल्हापूरच्या महालक्ष्मीइतकेच महत्त्व असलेले आडिवरे गावचे महाकाली मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवीकडे केलेली प्रार्थना थेट कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या चरणी रुजू होते, अशी मान्यता आहे. असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराज राजापूर येथे आले असताना ते आडिवरे येथील महाकालीच्या दर्शनाला आले होते. जागृत नवसाला पावणाऱ्या येथील महाकाली देवीचा वार्षिक नवरात्रोत्सव आणि होलिकोत्सव तालुक्यातील सर्वांत मोठा उत्सव मानला जातो.

महाकाली मंदिराची अख्यायिका अशी की आडिवरेपासून काही अंतरावर असलेल्या वेत्ये या समुद्रकिनाऱ्यावरील गावात भंडारी समाजातील लोकांचे वास्तव्य होते. सुमारे ८०० वर्षांपूर्वी येथील काही लोक मासेमारीसाठी समुद्रात गेले असताना त्यांच्या जाळ्यात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन मूर्ती आल्या. सुरुवातीला त्यांनी त्या मूर्ती किनाऱ्याजवळ असणाऱ्या खडकातील गुहेत ठेवल्या. सर्व ग्रामस्थांनी या तीनही मूर्ती पालखीत ठेवल्या आणि पूर्ण गावात मिरवणूक काढली. आडिवरे गाव हे मोठे असून यात १२ वाड्या आहेत. या सर्व ठिकाणी ही मिरवणूक नेण्यात आली. ठिकठिकाणी देवीचा कौल घेऊन येथे तुझी प्राणप्रतिष्ठा करावी का, असे विचारण्यात आले. पण देवीने वाडा पेठ येथील बाजारपेठेत आता जिथे मंदिर आहे, तिथे थांबण्याचा कौल दिला. त्याप्रमाणे या देवींची येथे स्थापना करण्यात आली.

महाकाली मंदिर कौलारू असून मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर भासतो. मंदिर परिसराला तटबंदी असून त्यातील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. श्री महाकाली मंदिरासह येथील प्रांगणात महासरस्वती, महालक्ष्मी, रवळनाथ आणि नगरेश्वर यांचे पंचायतन आहे. महाकाली, महासरस्वती महालक्ष्मी या तीन भगिनी एकत्र असल्यामुळेच हे मंदिर विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. नगरेश्वर ही येथील आद्य देवता मानली जाते. देवस्थानात आल्यानंतर प्रथम नगरेश्वराचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. नगरेश्वर मंदिरातील शिवपिंडी ही स्वयंभू असून पिंडीच्या मागे पार्वती मातेची मूर्ती आहे. नगरेश्वर मंदिराच्या वायव्य कोपऱ्यात एक वारुळ असून ते या मंदिराच्या छताइतके उंच आहेअसे सांगितले जाते की या वारुळात नागराज राहतो. हा नागराज साक्षात्कारी असून सर्पासंदर्भातील भय निवारण्यासाठी त्याची पूजा केली जाते. दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी ग्रामस्थांकडून येथे नागाची पूजा केली जाते.

या पंचायतनातील दुसरी देवता श्रीमहालक्ष्मी आहे. श्रीनगरेश्वरानंतर महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. असे सांगितले जाते की महालक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ११ व्या शतकात आद्य शंकराचार्यांनी केलेली आहे. आद्य शंकराचार्यांनी जैन मतांचे खंडण करून श्री महालक्ष्मीची स्थापना केली, त्यामुळे महालक्ष्मी मूर्तीच्या शेजारी उजव्या बाजूला जैन ब्राह्मण हा जैनांचा देवही आहे. दोन ते अडीच फूट उंचीची महालक्ष्मीची मूर्ती ही अखंड काळ्या पाषाणातून कोरलेली आहे. चतुर्भुज मूर्तीच्या मागच्या डाव्या उजव्या हातामध्ये शंख गदा आहे, तर पुढच्या उजव्या डाव्या हातामध्ये मोदक कमळ आहे. येथील मंदिर समूहाबाबत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही निर्णयाची बैठक ही पूर्वापार महालक्ष्मी मंदिरातच घेण्याची पद्धत आहे. श्री रवळनाथ ही येथील तिसरी देवता असून हा भैरवाचा अवतार समजला जातो.

श्री महाकाली ही येथील चौथी प्रमुख देवता असून हिच्या नावावरून देवस्थान प्रसिद्ध आहे. सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप प्रशस्त असून सणउत्सव काळातील कार्यक्रम महिलांना विनाअडथळा पाहता यावेत यासाठी वरच्या बाजूला सज्जा केलेला आहे. सभामंडपाच्या छतावर दशावतार आणि चार बाजूला कमळे कोरलेली आहेत. या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामी यांनी भेट दिल्याची आठवण म्हणून त्यांच्या प्रतिमा येथे लावण्यात आल्या आहेत. अंतराळ गर्भगृह काहीसे उंचावर आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपाल असून ते लाकडी आहेत. याशिवाय उजव्या बाजूच्या खांबामध्ये गणेशाची मूर्ती कोरलेली आहे.

गर्भगृहातील महाकालीची मूर्ती दक्षिणाभिमुख असल्यामुळे तिचे विशेष महत्त्व आहे. अखंड काळ्या पाषाणातून कोरलेली ही मूर्ती दीड ते दोन फूट उंचीची आहे. तिने मस्तकावर पंचमुखी शेष धारण केलेला आहे. तिच्या मागच्या डाव्या उजव्या हातामध्ये डमरू आणि त्रिशूळ, तर पुढच्या उजव्या डाव्या हातामध्ये खड्ग आणि पंचपात्र आहे. मंदिराच्या गर्भगृहात देवी महाकाली हिच्या डाव्या बाजूला योगेश्वरी देवी आहे. देवी योगेश्वरीचीही स्थापना महालक्ष्मीप्रमाणे आद्य शंकराचार्यांनी केल्याचे सांगितले जाते. हिला येथे जुगाईदेवी असेही म्हणतात. या पंचायतनातील पाचवी देवता ही महासरस्वती असून ती उत्तराभिमुख आहे. ती काळ्या पाषाणातून कोरलेली आहेहंसावर आरूढ अशी ही चतुर्भुज मूर्ती आहे. तिच्या मागच्या डाव्या उजव्या हातामध्ये पुस्तक आणि खड्ग आहे, तर पुढच्या उजव्या हातात पंचपात्र डाव्या हातात नाग आहे.

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत महाकाली देवीचा नवरात्रोत्सव साजरा होतो. यावेळी येथे मोठी यात्रा भरते. या कालावधीत देवीला सोन्याचा मुकुट, नाकात मोती, मंगळसूत्र, सोन्याचा कमरपट्टा, पुतळ्या धार्मिक महत्त्वासोबतच अनेक ऐतिहासिक संदर्भही या मंदिराशी जोडलेले आहेत. यानुसार असे सांगितले जाते की १९४२ च्या चलेजाव आंदोलनावेळी देशावरील स्वातंत्र्यसैनिकांनी या देवीला कौल लावून इंग्रजांचा खजिना लुटला होता. याशिवाय चीन युद्धाच्यावेळी देवस्थानतर्फे भारत सरकारला मदत म्हणून देवस्थानात जमा असलेले सोने देण्यात आले होते. अशा विविध अलंकारांनी सजवण्यात येते. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक विधी पार पडतात. सूर्यास्ताच्या वेळी धूपारती होते. रात्री देवीपुढे पुराण कथन, कीर्तनप्रवचन गायन होते. नंतर शृंगारलेल्या पालखीतून श्रींची मिरवणूक काढली जाते, तेव्हा निरनिराळ्या १३ ठिकाणी आरती करण्यात येते. याशिवाय प्रत्येक पौर्णिमा अमावस्येला देवींच्या मूर्तीना नारळाचे दूध तेल लावून स्नान घातले जाते. भाविकांसाठी येथे मंदिर समितीतर्फे भक्त निवासाची सुविधा करण्यात आली असून त्यात २४ सुसज्ज खोल्या आहेत. (भक्त निवास संपर्क : ०२३५३ २२६३६७)

धार्मिक महत्त्वासोबतच अनेक ऐतिहासिक संदर्भही या मंदिराशी जोडलेले आहेत. यानुसार असे सांगितले जाते की १९४२ च्या चलेजाव आंदोलनावेळी देशावरील स्वातंत्र्यसैनिकांनी या देवीला कौल लावून इंग्रजांचा खजिना लुटला होता. याशिवाय चीन युद्धाच्यावेळी देवस्थानतर्फे भारत सरकारला मदत म्हणून देवस्थानात जमा असलेले सोने देण्यात आले होते.

उपयुक्त माहिती:

  • राजापूरपासून २८ किमी, तर रत्नागिरीपासून ३८ किमी अंतरावर
  • रत्नागिरी, राजापूर, दापोली येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा उपलब्ध
  • संपर्क : मंदिर कार्यालय : ०२३५३ २२६३६६
Back To Home