
चिमूर तालुक्यातील भिसी हे गाव येथील भोसलेकालीन प्राचीन महादेव मंदिर व विठ्ठल–रुख्मिणी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. एकाच आवारात ही दोन्ही मंदिरे असून येथील महादेव मंदिरात रंगपंचमीपासून भरणारी ७ दिवसांची यात्रा ही चिमूरमधील मोठ्या यात्रांपैकी एक आहे. या यात्रेचे वैशिष्ट्य असे की अनेक दानशूर भाविक या यात्रेच्या वेळी देणगी व अन्नधान्य इतके देतात की या उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना जेवण देऊनही त्यातील अर्ध्याहून अधिक धान्य शिल्लक राहते. या मंदिराचे येथील महत्त्व व भाविकांची असलेली श्रद्धा लक्षात घेऊन राज्य सरकारतर्फे २०२३ मध्ये मंदिर परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला होता.
भिसी येथील विठ्ठल–रखुमाई देवस्थानाच्या अंतर्गत ही २ मंदिरे येतात. या परिसरात हे मंदिर ‘उघडाउघडी’चे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या २ मोठ्या मंदिरांशिवाय येथे श्रीविष्णू, श्रीहनुमान, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत तुकडोजी व गरुड यांची मंदिरे आहेत
. येथील महादेव मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून जमिनीपासून सुमारे ४ फूट उंचीवर असलेल्या जोत्यावर हे मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या सुरुवातीच्या भागात ४ दगडी स्तंभ असून तेथून सभामंडपात जाण्यासाठी ५ पायऱ्या आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ नृसिंह, सूर्य, विष्णू व इतर प्रतिमा कोरलेल्या आहेत. या सभामंडपात ६ स्तंभ असून त्याच्या वरील भागात भारवाहक यक्षमूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडप मोकळा असून याला बाहेरील बाजूने भिंती नाहीत.
अंतराळाचे प्रवेशद्वार हे कमानीयुक्त असून द्वारपट्टीवरील दोन्ही बाजूस द्वारपालांची शिल्पे, तर वरील बाजूस कोरीव काम आहे. अंतराळात नंदी व गर्भगृहात प्राचीन शिवपिंडी आहे. या शिवपिंडीसमोरील बाजूस श्रीगणेशाची मूर्ती व इतर २ परिवार देवतेच्या मूर्ती आहेत. असे सांगितले जाते की येथील शिवपिंडीवर कुणीतरी कुऱ्हाडीने घाव घातला होता. त्याचे व्रण या शिवपिंडीवर दिसतात.
मंदिराच्या बाह्य भिंतींवर अनेक शिल्पांचे अंकन केलेले आहे. यापैकी १० तोंडे व २० हात असलेल्या रावणाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.
तसेच राम–रावण युद्ध करीत आहेत, असे शिल्प असून त्यातही रावण १० तोंडांचा, २० हातांचा दाखविला आहे. याशिवाय २ घोड्यांच्या रथात २ माणसे व सारथी असे शिल्पांकन आहे. मंदिराच्या गर्भगृहावर उंच शिखर असून त्याची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. महादेव मंदिरात रंगपंचमीपासून ७ दिवसांचा मोठा उत्सव असतो. यावेळी येथे यात्रा भरते. या उत्सवाच्या वेळी भंडारा (महाप्रसाद, जेवण) असतो. नवसपूर्तीनिमित्त अनेक भाविक या भंडाऱ्यासाठी अन्नदान करतात. याशिवाय अनेक दानशूर भाविक देणगी व धान्य देतात. येथे जमा होणाऱ्या धान्याचे प्रमाण इतके असते की भंडारा होऊनही अर्ध्याहून अधिक धान्य उरते. मंदिर समितीतर्फे त्या धान्याची नंतर विक्री करण्यात येते. भोसले काळात मालगुजारी असलेल्या या गावातील गांधी घराण्याकडून दररोज या मंदिरात नैवेद्य येते, असे सांगितले जाते. महादेव मंदिराला लागून विठ्ठल–रुख्मिणीचे मंदिर आहे.
या मंदिरासमोर असलेल्या देवळीमध्ये (छोटे मंदिर) मांडी घालून बसलेली वैशिष्ट्यपूर्ण गरुड देवतेची मूर्ती आहे.
विठ्ठल–रुख्मिणी मंदिराचा सभामंडपही मोकळा असून गर्भगृहात एका चौथऱ्यावरील मखरात विठ्ठल व रुख्मिणी यांच्या काळ्या पाषाणातील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्तींना पाठशिळा असून त्यावर कोरीव काम आहे. डोक्यावर चांदीचे मुकुट, चांदीचे डोळे, गळ्यात विविध अलंकार व सुंदर वस्त्रे यामुळे या मूर्ती खुलून दिसतात. असे सांगितले जाते की हे विठ्ठल मंदिर ३०० वर्षांपूर्वी एका कासाराने बांधले आहे. मंदिराच्या बाजूला गजानन महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या मोठ्या मूर्ती असलेले गर्भगृह आहेत. दरवर्षी या मंदिरात एकनाथी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहाच्या उद्यापनाला सुमारे ५० हजार भाविक उपस्थित असतात. या सर्वांना मंदिर समितीतर्फे महाप्रसाद दिला जातो.
आवारात एका लहानशा मंदिरात संतोषी मातेची मूर्ती आहे. बाजूला भवानी मातेची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की पूर्वी येथे भवानी मातेचे मंदिर होते, पण तेथील मूर्ती भिवापूरच्या भीमादेवी मंदिरात नेण्यात आली. त्यामुळे भवानी मातेची नवीन मूर्ती तयार करून ती संतोषी माता मंदिरात स्थापित करण्यात आली आहे.

चिमूर तहसील के भिसी ग्राम में स्थित, यह प्राचीन भोसलेकालीन महादेव मंदिर एवं विट्ठल-रुक्मिणी मंदिर दोनों ही अत्यंत प्रसिद्ध हैं। यह दोनों मंदिर एक ही प्रांगण में स्थित हैं। महादेव मंदिर में रंगपंचमी से आरंभ होने वाली सात दिवसीय यात्रा को चिमूर क्षेत्र की प्रमुख यात्राओं में से एक माना जाता है। इस यात्रा की यह विशेषता है कि अनेक दानदाता भक्त यात्रा के दौरान इतनी प्रचुर मात्रा में धनराशि और अन्न-धान्य का दान करते हैं कि सभी श्रद्धालुओं को भोजन कराने के उपरांत भी आधे से अधिक अन्न शेष रह जाता है। मंदिर के महत्व और भक्तों की अगाध श्रद्धा को ध्यान में रखते हुए, राज्य सरकार ने वर्ष २०२३ में मंदिर परिसर के विकास हेतु एक बड़ी धनराशि स्वीकृत की थी।
इन दो प्रमुख मंदिरों के अतिरिक्त यहाँ श्रीविष्णु, श्रीहनुमान, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज तथा गरुड़ के मंदिर भी स्थापित हैं। महादेव मंदिर की वास्तुकला अद्वितीय है। यह मंदिर भूमि से लगभग ४ फुट ऊँचे चबूतरे पर निर्मित है। मंदिर के मुख्य भागों में सभामंडप, अंतराल एवं गर्भगृह सम्मिलित हैं।
सभामंडप के प्रारंभिक भाग में ४ पाषाण स्तंभ हैं और यहाँ से सभामंडप तक जाने के लिए ५ सीढ़ियाँ बनी हुई हैं। सभामंडप के प्रवेशद्वार के समीप नृसिंह, सूर्य, विष्णु तथा अन्य देवताओं की प्रतिमाएँ उकेरी गई हैं। सभामंडप में ६ स्तंभ हैं, जिनके शिखर पर भारवाहक यक्ष की मूर्तियाँ स्थापित हैं। यह सभामंडप खुला है और इसकी कोई बाहरी दीवारें नहीं हैं।
अंतराल का प्रवेशद्वार अत्यंत सुंदर एवं कलात्मक है। द्वारपट्टी के दोनों ओर द्वारपालों की प्रतिमाएँ हैं तथा इसके ऊपरी भाग पर उत्कृष्ट नक्काशी की गई है। अंतराल में नंदी विराजमान हैं और गर्भगृह में प्राचीन शिवलिंग स्थापित है। शिवलिंग के सम्मुख श्रीगणेश की एक प्रतिमा तथा दो कुलदेवताओं की प्रतिमाएँ हैं। ऐसी मान्यता है कि पूर्व में इस शिवलिंग पर किसी ने कुल्हाड़ी से प्रहार किया था, जिसके चिन्ह आज भी दिखाई देते हैं। मंदिर की बाह्य दीवारों पर अनेक शिल्प अंकित हैं, जिनमें दशमुखी (१० सिर) एवं बीस भुजाओं (२० हाथ) वाले रावण का शिल्प विशेष रूप से आकर्षक है। इसके अतिरिक्त, राम-रावण युद्ध को दर्शाता एक शिल्प भी है, जिसमें रावण को पुनः दशमुखी एवं बीस भुजाओं से युक्त दिखाया गया है। मंदिर में दो घोड़ों द्वारा खींचे जा रहे रथ का एक शिल्प भी है, जिसमें दो व्यक्ति एवं एक सारथी विराजमान हैं। गर्भगृह के ऊपर एक ऊँचा शिखर है, जिसकी संरचना भी विशिष्ट है।
महादेव मंदिर में रंगपंचमी से सात दिवसीय भव्य उत्सव का आयोजन होता है। इस अवसर पर यात्रा एवं भंडारे (महाप्रसाद) का आयोजन किया जाता है। मनोकामना पूर्ति हेतु अनेक भक्त अन्नदान करते हैं। कई दानदाता अन्न के अतिरिक्त अन्य सामग्री एवं धन का भी दान करते हैं। एकत्रित अन्न से इतने बड़े स्तर पर भंडारा आयोजित होता है कि उसके उपरांत भी आधा अन्न शेष बच जाता है। बाद में मंदिर समिति उस शेष अन्न का विक्रय कर देती है। भोसले काल में इस ग्राम के गांधी परिवार द्वारा मंदिर में प्रतिदिन नैवेद्य (भोग) अर्पित किया जाता था।
महादेव मंदिर के समीप ही विट्ठल-रुक्मिणी का मंदिर स्थित है। इस मंदिर परिसर में एक छोटे देवालय के भीतर विराजमान गरुड़ की एक विशेष प्रतिमा है। विठ्ठल-रुक्मिणी मंदिर का सभामंडप खुला है। गर्भगृह में एक अलंकृत मखर (सिंहासन) में विठ्ठल और रुक्मिणी की काले पाषाण की मनमोहक प्रतिमाएँ स्थापित हैं। इन दोनों प्रतिमाओं की पृष्ठभूमि में सुंदर नक्काशी है। प्रतिमाओं के शीश पर रजत मुकुट, रजत नेत्र, गले में विविध आभूषण एवं सुंदर वस्त्र उनकी दिव्यता को और भी बढ़ा देते हैं। ऐसी मान्यता है कि इस विठ्ठल मंदिर का निर्माण लगभग ३०० वर्ष पूर्व एक कासार व्यवसायी द्वारा कराया गया था। मंदिर के समीप ही गजानन महाराज तथा संत एकनाथ, संत तुकाराम एवं संत ज्ञानेश्वर की भव्य प्रतिमाएँ भी स्थापित हैं। यहाँ प्रतिवर्ष एकनाथी भागवत सप्ताह का आयोजन होता है, जिसमें लगभग ५०,००० श्रद्धालु सम्मिलित होते हैं। इस अवसर पर सभी श्रद्धालुओं के लिए मंदिर समिति द्वारा महाप्रसाद की व्यवस्था की जाती है।
प्रांगण में बने एक छोटे से मंदिर में संतोषी माता की प्रतिमा है। पास ही भवानी माता की प्रतिमा भी विराजमान है। पहले यहाँ भवानी माता का मंदिर था, परंतु उनकी उस प्रतिमा को भिवापुर स्थित भीमादेवी मंदिर में स्थानांतरित कर दिया गया। इसके बाद, भवानी माता की एक नई प्रतिमा बनवाकर उसे संतोषी माता मंदिर में स्थापित किया गया।