
विदर्भातील प्राचीन देवालयांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील मार्कण्डेय मंदिराला ‘चक्रवर्ती’, तर चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील बालाजी मंदिराला ‘सम्राट’ अशी उपमा दिली जाते. गांधीजींची ‘चलेजाव’ची चळवळ याच चिमूरमधून सुरू झाली होती. त्यामुळे विदर्भातील चिमूर हे ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. चिमूरमध्ये १२ व्या व १३ व्या शतकातील अनेक मंदिरे आहेत. यामध्ये चिमूर तालक्यातील नेरी येथील प्राचीन महादेव मंदिर व त्याच्यापासून काही अंतरावर असलेले पार्वती माता मंदिर हे या तालुक्याचे वैभव मानले जाते.
नेरी हे गाव चिमूर तालुक्यातील चिमूर–नवरगाव मार्गावर आहे. येथील जुनी नेरी भागात असलेल्या १२व्या शतकातील महादेव मंदिराचे वर्णन हेन्री कझिन्स (Henry Cousens) यांनी आपल्या लिखाणात केलेले आहे. हेन्री हे २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतीय पुरातत्त्व विभागात कार्य करणारे एक ब्रिटिश शास्त्रज्ञ होते. त्यात त्यांनी या मंदिराच्या स्थापत्यशैलीचे विवेचन केले आहे. या मंदिराची शैली हेमाडपंती असली तरी त्यावर चालुक्यकालीन स्थापत्यशैलीचा प्रभाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पूर्वाभिमूख असणाऱ्या या मंदिराची रचना मूखमंडप, अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे.
चिमूर तालुक्यातील महादवाडी येथील प्राचीन शिवमंदिर आणि हे मंदिर यामधील स्थापत्यरचनेत साम्य आहे.
मंदिराच्या मुखमंडपात ४ दगडी स्तंभ आहेत. सभामंडपामध्ये १६ स्तंभ असून त्यापैक ४ स्तंभ हे मध्यभागी तर उर्वरित १२ स्तंभ बाजुच्या भागात आहेत. या स्तंभांवर चारही बाजुने वरपर्यंत अनेक शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. सभामंडपाच्या उजवीकडे आणि डावीकडे आणखी २ उपमंडप आहेत. या दोन्ही उपमंडपांतून बाहेर जाण्यासाठी मार्ग आहेत. येथील सभामंडप व उपमंडपांमध्ये अर्धभिंती असून त्यावर ओटे आहेत. सभामंडपातून अंतराळाकडे जाताना अंतराळाच्या प्रवेशद्वारावर नंदी असून अंतराळाच्या दोन्ही बाजुच्या भिंतींमध्ये देवकोष्टके आहेत.
येथील गर्भगृह अंतराळापासून काहीसे खोलवर आहे व त्यात जाण्यासाठी ३ पायऱ्या उतराव्या लागतात. गर्भगृहात शिवपिंडी आहे. शिवपिंडीमागील देवकोष्टकात अन्नपूर्णा माता व त्याच्या बाजुला श्रीगणेश व नागशिल्प यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या शिखराचा नंतरच्या काळात जिर्णोद्धार करण्यात आला आहे.
असे सांगितले जाते की पूर्वी या शिखरामध्ये एक खोली होती व तेथे बसून साधू वा ऋषी तपसाधना करीत असत.
मंदिराचा मुखमंडप आणि अर्धमंडपांच्या बाह्य भिंतींवर ब्रह्मदेव, विष्णू अवतार, वामन, शीवप्रतिमा, अर्जूनाचे लक्षवेध, नटराज, नृत्यगणेश, सरस्वती, पार्वती, गरुड, हनुमान, मुरलीधर, भैरव, महिषासूर मर्दिनी, चामुंडा, अनेक देवी–देवता, विविध अप्सरा, विणावादक, बासरीवादक, मृदुंगवादक, सूरसुंदरी, मल्लयुद्धाचा प्रसंग, आई व मूल आणि काही मैथून शिल्पे अशी शेकडो शिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पांमुळे या मंदिराचा बाह्यांग वैशिष्ट्यपूर्ण भासतो. सध्या हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून पुरातत्व विभागाकडून मंदिराभोवती तारेचे कुंपण केलेले आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत या मंदिरात जाऊन भाविकांना दर्शन घेता येते.
या मंदिरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर पार्वती मातेचे मंदिर आहे.
आज जेथे मंदिर आहे त्याच ठिकाणी खोदकाम करताना पार्वती मातेची मूर्ती जमिनीत सापडली होती. त्या जागेवर १९६५ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते पार्वती मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व त्याच्या बाजुने मंदिर बांधण्यात आले.
मंदिराच्या गर्भगृहात असलेली पार्वती मातेची मूर्ती काळ्या पाषाणाची असून तिची उंची २ फूट ४ इंच व रुंदी १ फूट ३ इंच इतकी आहे.
चतुर्भुज असलेल्या या मूर्तीच्या वरील दोन हातांपैकी एकात कमळामधे शिवलिंग व दुसऱ्या हातात गणपतीची प्रतिमा आहे. खालील दोन हातांमध्ये अक्षमाळा व कमंडलू आहेत.
डोक्यावर मुकुट, कानात कुंडले व मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे. या मूर्तीच्या पायापाशी ३ सेविका व डावीकडील पायाजवळ बसलेला सिंह आहे. सिंहाच्या वरील भागात मोरावर आरूढ कार्तिक स्वामी कोरलेले आहेत.
ही मूर्तीही १२व्या शतकातील असावी, असे सांगितले जाते. या पार्वती मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

चंद्रपुर शहर के बाबूपेठ क्षेत्र में महादेव के दो स्थान प्रसिद्ध हैं। इनमें से एक स्थान जागृत महादेव मंदिर है। इसके पास स्थित दूसरे स्थान को ‘अपूर्ण शिवालय’ के नाम से जाना जाता है। इनमें जागृत महादेव मंदिर भोसलेकालीन है। इस मंदिर में शिवलिंग के साथ अष्टभुजा गणेश की पाषाण मूर्ति और त्रिपाद वामन पाषाण मूर्ति विशेष आकर्षण हैं। अपूर्ण शिवालय में सत्रहवीं शताब्दी की विभिन्न देवताओं की १५ भव्य पाषाण मूर्तियाँ हैं।
भोसलेकालीन महारानी हिराई के दीवान बापूजी वैद्य ने चंद्रपुर के बाबूपेठ क्षेत्र में सन् १७०४ से १७१९ के बीच संपूर्ण पाषाण से हेमाडपंती शैली का महादेव मंदिर निर्मित कराया। तभी से यह स्थान जागृत देवस्थान के रूप में प्रसिद्ध है। यह मंदिर क्षेत्र के हजारों श्रद्धालुओं का आस्था-केंद्र है। इस मंदिर की संरचना शंख के आकार की है। मंदिर के सम्मुख एक विशाल चबूतरे पर लगभग १५ पद ऊँचा गरुड़ स्तंभ है। इस स्तंभ पर दशावतार की पाषाण मूर्तियाँ उत्कीर्ण हैं। मंदिर की संरचना में मुखमंडप, सभामंडप और गर्भगृह हैं। मुखमंडप में विशेष नक्काशी नहीं है। मंदिर की दीवारों में निर्मित देवकोष्टकों में अग्निदेव, यम, नैऋत्य देवता, वरुण, नाग,
अन्नपूर्णा माता, श्रीगणेश, वायुदेवता, कुबेर, ईशान्य व इंद्र की प्राचीन पाषाण मूर्तियाँ हैं।
सभामंडप के मध्य में नंदी की पाषाण मूर्ति है। गर्भगृह के द्वार की दोनों ओर बने देवकोष्टकों में एक ओर अष्टभुजा गणेश की पाषाण मूर्ति है। दूसरी ओर त्रिपाद वामन पाषाण मूर्ति है। गर्भगृह के प्रवेशद्वार के ललाटबिंब पर गणेश की पाषाण मूर्ति के स्थान पर कीर्तिमुख उत्कीर्ण है। यह यहाँ की विशेषता है। सभामंडप ऊपर से अष्टकोणीय आकार का है। गर्भगृह में अखंड काले पाषाण का शिवलिंग स्थापित है। गर्भगृह की दीवारों के देवकोष्टकों में भी कुछ पाषाण मूर्तियाँ हैं। गर्भगृह की विशेष संरचना के कारण यहाँ किया गया शंखनाद और ओमकार जाप का स्वर गूँजता है। महादेव मंदिर के पास ही श्रीगणेश का मंदिर भी है।
हर साल महाशिवरात्रि और श्रावण सोमवार के पर्वों के साथ-साथ यहाँ बैलपोला उत्सव भी बड़े पैमाने पर मनाया जाता है। इस मंदिर की विशिष्ट संरचना और अनोखी पाषाण मूर्तियों के कारण इसे सरकार ने संरक्षित स्मारक घोषित किया है।
श्रद्धालुओं की बढ़ती संख्या और दर्शन हेतु आने वाले श्रद्धालुओं की सुविधा को ध्यान में रखते हुए महाराष्ट्र सरकार ने मार्च २०२४ में इस मंदिर के परिसर विकास हेतु कार्य आरंभ किया है। सरकार ने श्रद्धालुओं की सुविधाओं के लिए १,५८,००,००० रुपये (एक करोड़ अठ्ठावन लाख रुपये) की निधि प्रदान की है।
बाबूपेठ के इस महादेव मंदिर से पैदल १० मिनट की दूरी पर, राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज के पीछे अपूर्ण शिवालय स्थित है। यहाँ की विशेषता विशाल दशमुखी दुर्गा की पाषाण मूर्ति है। यह पाषाण मूर्ति २६ पद लंबी, १८ पद चौड़ी और ३ पद मोटी है। इसमें १० चेहरे, १० हाथ और १० पैर हैं। यह यहाँ की सबसे बड़ी पाषाण मूर्ति है। इसे भूमि पर ही स्थापित किया गया है। इसके अलावा यहाँ विशिष्ट शिवलिंग व उसके सम्मुख भव्य पाषाण नंदी, श्रीविष्णु का मत्स्यावतार, महिषासुरमर्दिनी, कूर्मावतार, हाथी, श्रीगणेश, हनुमान, कालभैरव, महादेव, दिगंबर शिव, गरुड़ और द्वारपाल सहित कुल १५ पाषाण मूर्तियाँ हैं। ये सभी पाषाण मूर्तियाँ लगभग ४०० साल पुरानी हैं। यहाँ की दुर्गादेवी की पाषाण मूर्ति की प्रतिकृति नागपुर संग्रहालय में सुरक्षित रखी गई है।
ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार, १७वीं शताब्दी में राजा धुंड्या रामशाह के काल में शिवभक्त धनाढ्य रायप्पा कोमटी ने यहाँ श्रीशंकर का भव्य मंदिर बनाने की योजना बनाई थी।
इसके लिए उन्होंने विशाल शिवलिंग और उसके सम्मुख नंदी की भव्य पाषाण मूर्ति बनवाई। साथ ही मंदिर में स्थापित करने हेतु अन्य पाषाण मूर्तियाँ देश के विभिन्न भागों से शिल्पकारों को बुलाकर उनसे बनवाई गईं।
इन सभी पाषाण मूर्तियों के तैयार होने के बाद भव्य मंदिर बनाने का उनका विचार था। परंतु उनके असामयिक निधन से यह शिवालय अधूरा ही रह गया।
तभी से इस स्थान को ‘अपूर्ण शिवालय’ कहा जाने लगा। रायप्पा के निधन के बाद किसी ने मंदिर की जिम्मेदारी नहीं ली। इससे ये पाषाण मूर्तियाँ सदियों तक उपेक्षित रहीं। वर्तमान में यह संपूर्ण स्थल और पाषाण मूर्तियाँ पुरातत्त्व विभाग के अधीन हैं। श्रद्धालु और पर्यटक यहाँ आकर इन प्राचीन पाषाण मूर्तियों का दर्शन कर सकते हैं।