महादेव मंदिर /अपूर्ण शिवालय 

बाबू पेठ, चंद्रपूर, ता. जि. चंद्रपूर

चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात असलेली दोन महादेवांची स्थाने प्रसिद्ध आहेत. त्यातील एक स्थान हे जागृत महादेव मंदिर, तर याच मंदिरापासून जवळ असलेल्या दुसऱ्या स्थानाचीअपूर्ण शिवालयअशी ओळख आहे. त्यातील जागृत महादेव मंदिर हे भोसलेकालीन आहे. या मंदिरात शिवपिंडीशिवाय असलेली अष्टभुजा गणेश मूर्ती आणि तीन पायांची वामन मूर्ती हे येथील आकर्षण आहे. अपूर्ण शिवालयामध्ये सतराव्या शतकातील विविध देवतांच्या १५ अतिभव्य अशा दगडी मूर्ती आहेत.

भोसलेकालीन महाराणी हिराई यांचे दिवाण बापूजी वैद्य यांनी चंद्रपूरमधील बाबुपेठ परिसरात १७०४ ते १७१९ या कालावधीत संपूर्ण दगडात हेमाडपंथी रचनेचे महादेवाचे मंदिर बांधले. तेव्हापासून हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरातील हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचा आकार हा शंखाप्रमाणे आहे. मंदिरासमोर एका मोठ्या चौथऱ्यावर सुमारे १५ फूट उंचीचा गरुड खांब असून त्यावर दशावताराच्या प्रतिमा आहेत. मुखमंडप, सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मुखमंडपात विशेष नक्षीकाम नसले तरी मंदिराच्या भिंतींमधील कोष्टकांमध्ये अग्निदेव, यम, नैऋत्य देवता, वरुण, नाग, अन्नपूर्णा माता, श्रीगणेश, वायू देवता, कुबेर, ईशान्य इंद्र यांच्या प्राचीन मूर्ती आहेत.

सभामंडपाच्या मध्यभागी नंदीची मूर्ती तर गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या कोष्टकांपैकी एकामध्ये अष्टभुजा गणेश, तर दुसऱ्या कोष्टकात पायांची वामन मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेशमूर्तीऐवजी कीर्तिमुख कोरलेले आहे, हेही येथील वेगळेपण आहे. सभामंडपाला वरून अष्टकोनी आकार दिला आहे. गर्भगृहात अखंड काळ्या पाषाणातील शिवपिंडी असून गाभाऱ्यातील भिंतींमधील कोष्टकांमध्येही काही मूर्ती आहेत. या मंदिराच्या गर्भगृहातील विशिष्ट रचनेमुळे येथे केलेला शंखध्वनी ओंकार जपाचा प्रतिध्वनी ऐकू येतो. महादेव मंदिराच्या शेजारीच श्रीगणेशाचे मंदिर आहे.

दरवर्षी महाशिवरात्री श्रावणी सोमवारी होणाऱ्या उत्सवांबरोबरच येथे बैलपोळा उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या मंदिराची विशिष्ट रचना तेथील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती यांमुळे सरकारकडून ते संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहेया मंदिरावर असलेली भाविकांची श्रद्धा दर्शनासाठी दिवसेंदिवस वाढणाऱ्या भाविकांच्या संख्येचा विचार करून महाराष्ट्र सरकारतर्फे येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांसाठी परिसराच्या विकासासाठी या मंदिराला मार्च २०२४ मध्ये ,५८,००,०००/- (एक कोटी अठ्ठावन्न लाख) रुपयांचा निधी दिला आहे.

बाबू पेठेतील या महादेव मंदिरापासून पायी १० मिनिटांच्या अंतरावर राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागे एक अपूर्ण शिवालय आहे. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे येथील अतिभव्य दशमुखी दुर्गेची मूर्ती. तब्बल २६ फूट लांब, १८ फूट रुंद फूट जाडीची ही मूर्ती आहे. तिला १० तोंडे, १० हात आणि १० पाय आहेत. येथील मूर्तींमधील ही सर्वांत मोठी मूर्ती असून ती जमिनीवरच ठेवलेली आहे. याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग त्यासमोरील भव्य नंदी, श्रीविष्णूंचा मत्स्यावतार, महिषासुरमर्दिनी, कूर्मावतार, हत्ती, श्रीगणेश, मारुती, कालभैरव, महादेव, दिगंबर शिव, गरुड, द्वारपाल अशा एकूण १५ मूर्ती आहेत. या सर्व मूर्ती ४०० वर्षांपूर्वीच्या आहेत. येथील दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिकृती नागपूर येथील संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आहे.

ऐतिहासिक नोंदींनुसार, १७ व्या शतकात राजा धुंड्या रामशाहच्या काळात शिवभक्त असलेले धनिक रायप्पा कोमटी यांना येथे श्रीशंकराचे भव्य मंदिर उभारायचे होते. त्यासाठी त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण अशी भव्य दगडी शिवपिंडी तयार केली. या शिवपिंडीसमोर नंदीची भव्य मूर्तीही आहे. याशिवाय मंदिरात ठेवण्यासाठी वर उल्लेख केल्याप्रमाणे इतर मूर्ती देशातील विविध कारागिरांना येथे आणून त्यांच्याकडून करवून घेतल्या. या सर्व मूर्ती तयार झाल्यानंतर मंदिर बांधण्याचा त्यांचा मानस होता; परंतु त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे येथे होणारे भव्य शिवालय हे अपूर्णच राहिले. तेव्हापासून या क्षेत्रालाअपूर्ण शिवालयअसे म्हटले जाते. रायप्पा यांच्यानंतर पुढे मंदिराची जबाबदारी कोणीही स्वीकारल्याने या मूर्ती शेकडो वर्षे दुर्लक्षित राहिल्या. सध्या या सर्व मूर्ती येथील परिसर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे; परंतु भाविक पर्यटकांना येथे जाऊन या प्राचीन मूर्ती पाहता येतात.

उपयुक्त माहिती:

  • चंद्रपूर बस स्थानकापासून किमी अंतरावर
  • जिल्ह्याचे ठिकाण असल्याने राज्यातील अनेक भागांतून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिर परिसरात जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home