टेकडीवरचा महादेव / विठ्ठल मंदिर 

नागभीड, ता. नागभीड, जि. चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुका उच्च दर्जाच्या रेशीम कोष उत्पादनासाठी विदर्भात प्रसिद्ध आहे. या रेशमी धाग्याला जगभरातून मागणी असते. घोडाझरी सात बहिणींचे डोंगर ही प्रसिद्ध पर्यटनस्थळेही याच तालुक्यात आहेत. या नागभीड शहरातील शिवटेकडीवर स्थित जागृत प्राचीन शिव मंदिर, तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले प्राचीन विठ्ठल मंदिर ही येथील भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवटेकडीवर भरणारी यात्रा नागभीडमधील सर्वात मोठी यात्रा असते, तर विठ्ठल मंदिरात महिनाभर साजरा होणारा कार्तिक महोत्सव वारकरी भाविकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.

नागभीड शहरापासून किमी अंतरावर एका टेकडीवर महादेवांचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरामुळे ही टेकडी शिवटेकडी म्हणून प्रसिद्ध आहे. पायथ्याशी मारुतीचे मंदिर असून तेथून टेकडीवरील मंदिरात जाण्यासाठी सुमारे २०० पायऱ्या आहेत. हे प्राचीन तीर्थक्षेत्र भाविकांसाठी श्रद्धास्थान, तर पर्यटकांसाठी पर्यटनक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. पायथ्याशी असलेल्या कमानीतून काही पायऱ्या चढून वर आल्यानंतर येथे एका मोठ्या चौथऱ्यावर २५ ते ३० फूट उंचीची भव्य अशी बैठी महादेवांची मूर्ती आहे. ध्यान अवस्थेत बसलेल्या या मूर्तीच्या बाजूला उंच त्रिशूळ, तर दोन्ही बाजूला वेटोळे घातलेल्या नागांची मोठी शिल्पे आहेत. ज्या आसनावर महादेवांची मूर्ती आहे त्या आसनाखाली १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आली आहे. या मूर्तीसमोर मोठ्या चौथऱ्यावर नंदीची भव्य मूर्ती आहे. या दोन्ही मूर्ती नागभीडमधील आकर्षण असून उंचावर असल्यामुळे नागभीड शहराच्या अनेक भागांतून या मूर्तींचे दर्शन होते. या मूर्तींजवळून संपूर्ण नागभीड शहराचे विहंगम दृश्य दिसते.

महादेवाच्या मूर्तीपासून काही पायऱ्या चढून गेल्यावर तेथे नवग्रहांचे मंदिर आहे. छोटेखानी असलेल्या या मंदिरात नवग्रहांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. नवग्रह मंदिराच्या शेजारी एका उंच चौथऱ्यावर शनिदेवांचे स्थान आहे. या स्थानापासून सुमारे १०० पायऱ्या चढल्यावर प्राचीन महादेव मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. टेकडीवर असल्यामुळे या मंदिर परिसरात फारशी मोकळी जागा नाही. सर्व बाजूने खुला असलेला लहानसा ओटा, त्यानंतर सभामंडप गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. येथील ओटा नंतरच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी बांधल्याचे जाणवतेओट्याच्या मध्यभागी नंदी आहे. जमिनीपासून फूट उंचावर असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात समोरील बाजूस दगडी खांब आहेत. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर नक्षीकाम दोन्ही बाजूला द्वारस्तंभ आहेत. गर्भगृहात शिवपिंडी त्यामागे सुमारे फूट उंचीचे दुसरे स्वयंभू शिवलिंग आहे. गर्भगृहावर लहानसे शिखर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार १७०० च्या सुमारास केल्याची नोंद आहे. या टेकडीवर तलाव असून त्यालापांडव तलावअसे म्हटले जाते. त्यामुळे या टेकडीवर पांडवांचे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. त्यावेळी येथे लाकडी नंदीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते त्यात हजारो भाविक सहभागी होतात.

शिवटेकडीवरील महादेव मंदिरापासून किमी अंतरावर असलेले विठ्ठलरुख्मिणीचे मंदिर प्रसिद्ध असून येथील वारकरी संप्रदाय भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. १९०२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची नोंद असली तरी ते भोसलेकालीन मंदिर असावे, असे सांगितले जाते. मंदिरातील विठ्ठल रुख्मिणीच्या मूर्ती मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. १९०२ पासून या मंदिरात सुरू झालेले आषाढी कार्तिकी उत्सव आजही सुरू आहेत.

नागभीड शहराच्या मध्यवर्ती दाटीवाटीच्या भागात हे दुमजली मंदिर आहे. २००५ मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहेहे मंदिर एखाद्या इमारतीसारखे भासते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर वरच्या मजल्यावर विठ्ठलरुख्मिणीसह अनेक संतांच्या प्रतिमा लावल्या आहेत. सभामंडप, अंतराळ गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वर आतील बाजूस पोटमाळा असून तेथे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम संत गोरा कुंभार यांची वैशिष्ट्यपूर्ण अशी सुमारे ते फूट उंचीची शिल्पे आहेत. सभामंडपात अनेक देवदेवता संतांच्या प्रतिमा आहेत. अंतराळात नक्षीदार कमानी असून त्यापुढे गर्भगृह आहे. गर्भगृहातील षटकोनी संगमरवरी चौथऱ्यावरील नक्षीदार मखरामध्ये विठ्ठलरुख्मिणीच्या मूर्ती असून विठ्ठलाची मूर्ती . फूट, तर रुख्मिणीची मूर्ती ही फूट उंचीची आहे. विठ्ठलरुख्मिणीच्या मूर्तींवर चांदीचा मुकुट, छत्र, कानात कर्णकुंडले अंगावर विविध अलंकार आहेत.

या मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर प्रशस्त सभामंडप असून उत्सवाच्या वेळी येथे कार्यक्रम होतात. याशिवाय मंदिराच्या समोरील बाजूस रस्त्याच्या पलीकडे दुमजलीविठ्ठल भवनबांधण्यात आले आहे. तेथेही उत्सवकाळात भाविकांना राहण्याची सोय होते. येथे आषाढी कार्तिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. आषाढीपेक्षा कार्तिक महिन्यात होणारा उत्सव विशेष असून तो महिनाभर चालतो. यावेळी दररोज पहाटे काकड आरती होते. पौर्णिमेच्या रात्री देवाच्या रथाची मिरवणूक निघते ती मध्यरात्रीपर्यंत चालते. दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होते. याशिवाय दर बुधवारी मंदिरात भजन होते.

येथे असलेली पर्यटनस्थळे तीर्थक्षेत्रांव्यतिरिक्त संपूर्ण भारतासह जगभरात प्रसिद्ध असलेलाएचएमटी कोलमहा तांदळाचा वाण नागभीडची देणगी आहे. नागभीडमधील दादाजी खोब्रागडे या कृषी संशोधकांनी १९८३ मध्ये तांदळाचे एक नवीन वाण विकसित केले. हे वाण येथील भीमराव शिंदे या शेतकऱ्याने आपल्या एकरांत वापरल्यावर त्याला पहिल्याच वर्षी ९० क्विंटल पीक आले. दादाजींच्या या संशोधनाची तेव्हा जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने दखल घेतली होती. त्याकाळात एचएमटी कंपनीची घड्याळे प्रसिद्ध होती, म्हणून दादाजींनी या वाणालाएचएमटीनाव दिले.

उपयुक्त माहिती:

  • नागभीड बस स्थानकापासून किमी, तर चंद्रपूरपासून १०८ किमी अंतरावर
  • चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागांतून नागभीडसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या पायथ्याशी जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home