गीता मंदिर

सुभाष मार्ग, नागपूर, ता. जि. नागपूर

नागपूर शहरातील कॉटन मार्केट परिसरात असलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जवळच सुभाष मार्गावर गीता मंदिर आहे. नागपूरमधील मोठ्या मंदिरांपैकी गीता मंदिर हे एक प्रसिद्ध मंदिर समजले जाते. संगमरवरावर कोरलेले गीतेचे श्लोक, अनेक शिल्पे मूर्ती याशिवाय नवरात्रोत्सवात अखंड ज्योतींसाठी हे मंदिर सर्वश्रुत आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात येथे तीन हजारांहून अधिक अखंड ज्योती प्रज्वलित केल्या जातात.

सुभाष मार्गावर दोन्ही बाजूला असलेल्या कृषी केंद्र औषधांच्या दुकानांच्या रांगेत गीता मंदिराचे प्रवेशद्वार आहे. वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसरीच्या कमानीयुक्त प्रवेशद्वाराकडे पाहिल्यावर आतील मंदिराची कल्पना येते. लालसर भगव्या रंगात असलेल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला सिंहांची शिल्पे आहेत. मूळचे अहमदाबाद येथील स्वामी विद्यानंद महाराज यांनी भक्तांच्या साह्याने मे १९५४ रोजी या मंदिराची स्थापना केली होती. नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागातील हे मंदिर सुमारे सव्वा एकर क्षेत्रात आहे. ही जमीन नागपूर महापालिकेकडून या मंदिरासाठी दान स्वरूपात मिळाली होती.

गीता मंदिर आधुनिक शिल्प स्थापत्यशास्त्राचा सुंदर नमुना आहे. काहीशा उंचावर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी १० पायऱ्या आहेत. मंदिराच्या सभामंडपात १६० फूट लांब संगमरवरी भिंतींवर गीतेचे श्लोक अंकित केलेले आहेत. मंदिराच्या गर्भगृहात गीता माता, राधाकृष्ण, शिवपार्वती, मंदिराचे संस्थापक स्वामी विद्यानंद महाराज यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. या मूर्तींचे अनावरण संत भारती महाराज यांच्या हस्ते झाले होते. मुख्य मूर्तींसह मंदिर परिसरात अनेक सुंदर मूर्ती शिल्पे असून त्यामध्ये अष्टविनायकांच्या प्रतिकृती असलेल्या प्रत्येकी दोन ते तीन फूट उंचीच्या आठ गणेशमूर्ती, १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती असणाऱ्या १२ शिवपिंडी, नऊ दुर्गा, पंचमुखी गणेश, विठ्ठलरुख्मिणी, नरसिंह, लक्ष्मीनारायण, श्रीरामसीता, वामन, श्रीदत्त, परशुराम, कलकी, वराह, हनुमान, भगवान बुद्ध भगवान मत्स्य यांच्या मूर्ती आहेत.

असे सांगितले जाते की या गीता मंदिराला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इतर संतांनी अनेकदा भेटी दिल्या होत्या. दरवर्षी नवरात्रोत्सवात नऊ दिवस या मंदिरात तीन हजारांहून अखंड ज्योती प्रज्वलित केल्या जातात. नवसपूर्तीसाठी भाविकांकडून हे दिवे येथे लावले जातात. त्यासाठी भाविकांकडून अल्पसे शुल्क घेऊन दिवा, तेल, कलश आणि पंडित यांची मंदिराकडून व्यवस्था करण्यात येते. हा दिवा नऊ दिवस प्रज्वलित राहील याची जबाबदारी मंदिराकडून नेमल्या जाणाऱ्या पंडितांवर असते. मंदिर समितीकडून यासाठी २१ वैदिक पंडितांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा प्रकारे अखंड ज्योती प्रज्वलित करणारे नागपूरमधील हे पहिले मंदिर असल्याचे सांगितले जाते.

याशिवाय दरवर्षी गीतेचे तत्त्वज्ञान व्याख्याने, गीता जयंती, रामनवमी, कृष्णजन्माष्टमी, गुरुपौर्णिमा, महाशिवरात्री हे उत्सव येथे साजरे केले जातात. मंदिर परिसरात ग्रंथालय, धर्मार्थ आयुर्वेदिक औषधालय, संस्कृत शाळा (प्रशिक्षण केंद्र) संत निवास आहेत. देशभरात बद्रीनाथ, अहमदाबाद, गोंदियासह विविध ठिकाणी १३ गीता मंदिरे आहेत, त्यापैकी हे एक मानले जाते. सकाळी ते रात्री १० पर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

गीता मंदिरापासून एक किमी अंतरावर भारताचे हृदयस्थान समजले जाणारे नागपूरमधील सुप्रसिद्धझीरोमाईलआहे. जुन्या मॉरिस कॉलेजसमोरून रिझर्व बँकेकडे जाणाऱ्या मार्गावर एक स्तंभ आणि त्याच्यासमोर चार घोड्यांची शिल्पे आहेत, हेच ते झीरोमाईल. भारतातील चारही दिशांचे अंतर मोजण्याची सुरुवात या ठिकाणाहून झाली होती.

ब्रिटिश राजवटीत नागपूरहून चारी दिशांना असणारी देशातील शहरे महामार्गांनी जोडण्याचे महत्त्वाचे कार्य झाले होते. त्यांनी स्थापन केलेल्या ग्रेट ट्रिग्नोमेट्रिक सर्व्हे ऑफ इंडियाकडून १९०७ साली नागपूर हे स्थान देशाचा केंद्रबिंदू म्हणून निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार नागपूरहून १५० घोडेस्वारांना चारही दिशांना पाठविण्यात आले. घोड्यांच्या एकूण टापा आणि वेळ यांचा मेळ घालून या कंपनीतर्फे नागपूरपासून विविध शहरांचे अंतर मैलात मांडले गेले होते. त्यामुळे नागपूर हे शहर भारतीय उपखंडाच्या मध्यभागी असल्याचा पुरावा झीरोमाईल देतो. याच ठिकाणी मुंबईकोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आणि अलाहाबादत्रिवेंद्रम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात हे परस्परांना छेदतात.

उपयुक्त माहिती:

  • नागपूर एसटी स्थानकापासून . किमी, तर रेल्वे स्थानकापासून किमी अंतरावर
  • नागपूरसाठी राज्यातील विविध ठिकाणांहून एसटी, रेल्वे विमान सेवा उपलब्ध
  • खासगी वाहने मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊ शकतात
  • निवास न्याहरीसाठी विविध पर्याय उपलब्ध
Back To Home