
नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील राखीव वन क्षेत्रात असलेले मुचेपार येथील प्राचीन हनुमान मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात येथे दर शनिवारी व सोमवारी भरणाऱ्या यात्रेला १५० वर्षांची परंपरा असून या यात्रा कालावधीत येथे लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. हा हनुमान नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिरात जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून ३ किमी अंतर हे जंगलातील मार्गाने पार करावे लागते. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाशेजारी असलेल्या या परिसरात सर्वत्र घनदाट जंगल आहे. या मार्गाला लागून बोटेझरी तलाव असून तेथून पुढे हनुमान मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे. हे मंदिर ५०० वर्षांपूर्वीचे असून समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रात ११ मारुतींच्या देवस्थानची स्थापना केली होती, त्यावेळचे हे देवस्थान असल्याचा दाखला येथील वरिष्ठ नागरिकांकडून देण्यात येतो. हनुमान मंदिराचे बांधकाम साधेसे असले तरी सभामंडप प्रशस्त आहे. भाविकांच्या सोयीसाठी सभामंडपात दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. सभामंडपाच्या मध्यभागी गर्भगृह असून तेथे हनुमानाची स्वयंभू मूर्ती आहे. सुमारे ५ फूट उंचीच्या अखंड दगडात असलेल्या या मूर्तीला मुकुट, चांदीचे डोळे व चांदीचा टिळा लावून सजविण्यात येते. चौकोनी आकाराच्या या मंदिराच्या गर्भगृहावर कळस आहे. मंदिराच्या आवारात ऋण मुक्तेश्वर महादेवाचे मंदिर, जिंदामाता मंदिर तसेच गणेशाचे स्थान आहे. मंदिरापासून जवळच वनविभागाकडून सुमारे ५० फूट उंचीचा टेहळणी मनोरा उभारण्यात आला आहे. वन्यप्राण्यांपासून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी येथे वनरक्षकांकडून कायम पहारा देण्यात येतो. याशिवाय मंदिर परिसरात भाविकांना बसण्यासाठी आसने, जेवण बनविण्यासाठी सुविधा करण्यात आल्या आहेत.
दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येथे मोठा उत्सव होतो. तो साधारणतः सव्वा महिना चालतो.
या कालावधीत दर शनिवारी व सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. त्यावेळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाविकांची हनुमंताच्या दर्शनासाठी रीघ लागलेली असते. यावेळी हजारो भाविक येथे नवस फेडण्यासाठी येतात. त्यामध्ये विदर्भासह परराज्यांतील भाविकांचाही मोठा सहभाग असतो. येथे नवस फेडण्याची एक पद्धत आहे. ज्याच्या नावाने नवस फेडला जातो, त्याच्या वजनाएवढे गूळ, साखर किंवा पेढे यांची तुला केली जाते. फार पूर्वीपासून या यात्रेसाठी परिसरातील नागरिक आपल्या कुटुंबासह व जेवण बनविण्याच्या साहित्यासह बैलगाड्यांनी येथे येतात. येथे दिवसभर थांबून येथेच जेवण बनवून हनुमानाला नैवेद्य दाखवून ते ग्रहण करण्याची प्रथा आहे. आजही ती परंपरा कायम असून यात्रा कालावधीत शेकडो बैलगाड्यांमधून अनेक कुटुंबे येथे येतात. बैलगाड्यांसोबतच आता खासगी वाहनेही मोठ्या प्रमाणात येथे येतात. वनखात्याच्या नियमानुसार येथे सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंतच थांबण्याची मुभा आहे.
यात्रा कालावधीत दररोज काकड आरती, भजन, रामधून, गीता व भागवत पुराण आदी पारायणे होतात. गोपालकाला व महाप्रसादाने यात्रेचा समारोप होतो. उमरेड ते बोटेझरी येथे येण्यासाठी एसटी बसची सुविधा असली तरी बोटेझरीपासून मंदिरापर्यंत येण्यासाठी बैलगाडी वा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. जंगलव्याप्त परिसरातील या देवस्थानावर असलेली भाविकांची श्रद्धा, तसेच भाविक व पर्यटकांची वाढती संख्या यामुळे या स्थानाला राज्य शासनाकडून तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देण्यात आला आहे.

नागपुर जिले के भिवापुर तहसील के संरक्षित वन क्षेत्र में स्थित मुचेपार का प्राचीन हनुमान मंदिर जागृत देवस्थान के रूप में प्रसिद्ध है। पूरे मार्गशीर्ष महीने में यहाँ प्रत्येक शनिवार और सोमवार को लगने वाले मेले की परंपरा 150 वर्ष पुरानी है। इस अवधि में लाखों श्रद्धालु दर्शन के लिए उपस्थित होते हैं। श्रद्धालुओं का विश्वास है कि यहाँ के हनुमान मनोकामनाएँ पूर्ण करते हैं।
मंदिर तक पहुँचने के लिए मुख्य सड़क से 3 किमी का जंगल मार्ग पार करना पड़ता है। यह क्षेत्र ताडोबा राष्ट्रीय उद्यान के समीप घने जंगलों से घिरा है। रास्ते में बोटेझरी तालाब पड़ता है। उसके आगे मंदिर का मार्ग है। यह मंदिर लगभग 500 वर्ष पुराना माना जाता है। प्रचलित मान्यता है कि समर्थ रामदास स्वामी द्वारा महाराष्ट्र में स्थापित 11 मारुति देवस्थानों में यह एक है। मंदिर का निर्माण साधारण है, परंतु सभामंडप विशाल और सुव्यवस्थित है। श्रद्धालुओं की सुविधा हेतु यहाँ दर्शनमंडप और दर्शन पंक्ति की व्यवस्था है।
सभामंडप के मध्य में गर्भगृह है। इसमें स्वयंभू हनुमान की पाषाण मूर्ति स्थापित है। लगभग 5 पद ऊँची अखंड शिला से निर्मित इस मूर्ति को मुकुट, चाँदी की आँखें और चाँदी का तिलक लगाकर अलंकृत किया जाता है। चौकोर आकार के इस गर्भगृह पर कलश है। मंदिर प्रांगण में ऋणमुक्तेश्वर महादेव, जिंदामाता और गणेश के भी मंदिर हैं। यहाँ महादेव मंदिर में शिवलिंग स्थापित है। समीप ही वन विभाग द्वारा देखरेख के लिए 50 पद ऊँचा प्रहरी टॉवर बनाया गया है। श्रद्धालुओं की सुरक्षा हेतु वनरक्षक यहाँ निरंतर गश्त करते हैं। मंदिर परिसर में बैठने के लिए आसन और भोजन बनाने की सुविधाएँ भी उपलब्ध हैं।
हर साल मार्गशीर्ष माह में यहाँ भव्य उत्सव मनाया जाता है।
यह उत्सव लगभग सवा महीने चलता है। इस दौरान प्रत्येक शनिवार और सोमवार को विशाल मेले का आयोजन होता है। इस समय सुबह से सायंकाल तक दर्शन के लिए लंबी कतारें लगी रहती हैं। हजारों श्रद्धालु मन्नत पूर्ण करने हेतु आते हैं। इनमें विदर्भ के साथ अन्य राज्यों से भी लोग सम्मिलित होते हैं।
मन्नत पूर्ण करने की एक विशेष परंपरा है। जिसके नाम से मन्नत मानी जाती है, उसके भार के बराबर गुड़, शक्कर या पेड़े की तुला (तौल) की जाती है। प्राचीनकाल से श्रद्धालु बैलगाड़ियों में परिवार और भोजन सामग्री के साथ यहाँ पहुँचते थे। पूरे दिन रुककर स्वयं भोजन बनाना और हनुमान को नैवेद्य अर्पित करना पुरानी प्रथा रही है। फिर उसका प्रसाद ग्रहण किया जाता है। यह परंपरा आज भी जीवित है। मेले के समय सैकड़ों बैलगाड़ियाँ और अब निजी वाहन भी बड़ी संख्या में पहुँचते हैं। वन विभाग के नियमों के अनुसार मंदिर परिसर में केवल सुबह 6 बजे से सायंकाल 6 बजे तक ही ठहरने की अनुमति है।
मेले के समय प्रतिदिन काकड आरती, भजन, रामधुन और गीता एवं भागवत पुराण का पाठ होता है। समापन पर गोपालकाला और महाप्रसाद का आयोजन किया जाता है। उमरेड से बोटेझरी तक एस.टी. बस सुविधा उपलब्ध है। परंतु बोटेझरी से मंदिर तक पहुँचने हेतु बैलगाड़ी या निजी वाहन का सहारा लेना पड़ता है।
वनाच्छादित क्षेत्र में स्थित इस देवस्थान पर श्रद्धालुओं की आस्था निरंतर बढ़ रही है। श्रद्धालु और पर्यटकों की संख्या को देखते हुए राज्य शासन ने इसे तीर्थक्षेत्र की ‘ब’ श्रेणी प्रदान की है।