
विदर्भातील प्राचीन नगरांपैकी भद्रावती हे एक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर मानले जाते. येथे असणारी शेकडो मंदिरे, विहार, महाल, तलाव, विहिरी, टेकड्या, गुहा, लेण्या, शिलालेख आणि असंख्य मूर्ती येथील प्राचीन श्रीमंतीची साक्ष देतात. प्रागैतिहासिक म्हणजेच इतिहासपूर्व काळापासून मध्यकाळापर्यंत व त्यानंतरच्या काळातील अवशेषांचे भांडार उदरात सामावून आज हे शहर उभे आहे. त्यापैकी एक महत्त्वाचे धार्मिक व प्राचीन स्थान म्हणजे येथील चंडिका मातेचे मंदिर होय. सुमारे १००० वर्षांपासून ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता आजही हे मंदिर येथे भक्कमपणे उभे आहे.
एका आख्यायिकेनुसार, भद्रावतीमध्ये ३६० मंदिरे, ३६० तलाव व ३६० विहिरी होत्या. चंडिका मातेचे मंदिर भद्रावती शहराच्या दक्षिण पूर्वेकडे असल्याचा उल्लेख अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी आपल्या लिखाणात केला होता. त्यांनी या मंदिराच्या पुरातत्त्वीय वैभवाचेही वर्णन केले होते.
अलेक्झांडर कनिंगहॅम हे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे जनक मानले जातात. १८६१ मध्ये लॉर्ड कॅनिग यांनी ‘ऑर्किऑलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडिया’ची स्थापना करून कनिंगहॅम यांची त्याचे पहिले सर्वेक्षक म्हणून नेमणूक केली होती. या काळात कनिंगहॅम यांनी प्राचीन भारताच्या इतिहासाचे अनेक पैलू जगासमोर उघड केले होते.
भद्रावती शहराच्या मध्यवर्ती भागात पंचशीलनगर आखाडा या भागात चंडिका मातेचे हे प्राचीन मंदिर स्थित आहे. या मंदिराच्या शेजारी श्वेतांबर जैन मंदिर आहे. पूर्वी शहराबाहेर असलेले हे मंदिर येथील वस्ती वाढल्यामुळे आता शहराच्या मध्यवर्ती भागात आले आहे. चारही बाजूने तटबंदी असलेल्या या मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. तटबंदीच्या प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर सुंदर उद्यानातून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्याच्या व मंदिराच्या आजूबाजूला भाविकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था आहे.
चंडिका मातेचे मंदिर एका उंच चौथऱ्यावर स्थित आहे. अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी केलेल्या वर्णनानुसार या चौथऱ्यावर जाण्यासाठी ३ पायऱ्या होत्या, त्या आजही दिसतात. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एक मुखमंडप असून त्यात ४ अलंकृत दगडी स्तंभ आहेत. या स्तंभावर छत नसून त्यावर केवळ एकमेकांना जोडणाऱ्या दगडी तुळया (२ खांबांवर अथवा २ भिंतींच्या वरील बाजूस आडवे ठेवलेले चौरस लाकूड वा दगडी स्तंभ) आहेत. या चारही स्तंभांचा आकार व त्यावरील कलाकुसर सारखीच आहे. स्तंभांचा खालचा भाग चौकोनी तर मध्यभाग अष्टकोनी आहे. अष्टकोनी भागाच्या वरील बाजूस गोलाकार तोरणसदृश्य कलाकुसर असून त्यांमधून लोंबकळणाऱ्या साखळ्यांना अडकविलेल्या घंटा, असे अलंकरण आहे. स्तंभांच्या वरील बाजूस आमलकाप्रमाणे आकार व त्याच्याही वर भारवाहक यक्षप्रतिमा आहेत. स्तंभांच्या मध्यभागी मोठी शिवपिंडी व काही प्राचीन मूर्ती आहेत.
पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात १६ दगडी स्तंभ आहेत. या स्तंभांवर विशेष अशी कलाकुसर नसली तरी त्यापैकी एका स्तंभावर मंदिराची माहिती देणारा शिलालेख कोरण्यात आलेला आहे. गर्भगृहाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या या स्तंभावर देवनागरी लिपीत इ. स. १०७६ मध्ये हा शिलालेख कोरल्याचा, तसेच हे मंदिर चंडिका देवीचे असल्याचा उल्लेख आहे. सध्या हा शिलालेख काहीसा पुसट झालेला असला तरी त्यामुळे मंदिर निर्माणाचा काळ ठरविण्यास मदत होते. सभामंडपात अनेक देव–देवतांच्या प्राचीन मूर्ती आहेत.
मंदिराचे निरीक्षण करताना असे लक्षात येते की पूर्वी अंतराळाचा असणारा भाग हा जीर्णोद्धार करताना गर्भगृहातच विलीन करण्यात आला आहे. या लांबट गर्भगृहातून आत गेल्यावर समोर चंडिका मातेची अखंड दगडातील मूर्ती असून या मूर्तीच्या एका बाजूला विष्णू, तर दुसऱ्या बाजूला भैरव यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराचे वेगळेपण म्हणजे यावर शिखर नाही. सभामंडपातील खांबांवरील तुळया या छताजवळील भागातून बाहेर निघालेल्या दिसत असून त्यावर अलंकरण केलेले आहे. मंदिराला लागूनच एक पाण्याचे कुंड आहे. सध्या हे मंदिर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित आहे. पुरातत्त्व खात्याकडून मंदिराचे नूतनीकरण व परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.

विदर्भ के प्राचीन नगरों में भद्रावती एक ऐतिहासिक और धार्मिक दृष्टि से प्रमुख नगर माना जाता है। यहाँ स्थित सैकड़ों मंदिर, विहार, महल, तालाब, कुएँ, पहाड़ियाँ, गुफाएँ, शिलालेख और असंख्य मूर्तियाँ इस नगर की प्राचीन संपन्नता का प्रमाण देती हैं। प्रागैतिहासिक काल से लेकर मध्यकाल और उसके पश्चात के अवशेषों को अपने भीतर समेटे यह नगर आज भी अडिग है। यहाँ का चंडिका माता मंदिर एक प्रमुख धार्मिक एवं प्राचीन स्थल है। लगभग 1000 वर्षों से धूप, वायु और वर्षा की परवाह न करते हुए यह मंदिर आज भी यहाँ मजबूती से खड़ा है।
एक आख्यान के अनुसार, भद्रावती में 360 मंदिर, 360 तालाब और 360 कुएँ थे। चंडिका माता मंदिर भद्रावती नगर के दक्षिण-पूर्वी भाग में स्थित है। इसका उल्लेख अलेक्ज़ांडर कनिंघम ने अपने लेखन में किया है। उन्होंने इस मंदिर की पुरातात्त्विक भव्यता का भी वर्णन किया है। अलेक्ज़ांडर कनिंघम को भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग का जनक माना जाता है। वर्ष 1861 में लॉर्ड कैनिंग ने ‘आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया’ की स्थापना की थी। उन्होंने कनिंघम को उसका प्रथम सर्वेक्षक नियुक्त किया। इसी काल में कनिंघम ने प्राचीन भारत के इतिहास के अनेक पक्षों को उजागर किया।
भद्रावती नगर के मध्य भाग पंचशीलनगर अखाड़ा क्षेत्र में यह प्राचीन चंडिका माता मंदिर स्थित है। मंदिर के निकट श्वेतांबर जैन मंदिर है। पहले यह मंदिर नगर की सीमा से बाहर था। बस्तियाँ बढ़ने के कारण अब यह नगर के मध्य भाग में आ गया है। इस मंदिर का परिसर विशाल है। यह प्राचीर से घिरा हुआ है। प्रवेशद्वार से भीतर आने पर मनोहर उद्यान से होते हुए मंदिर तक जाने का मार्ग है। इस मार्ग और मंदिर के चारों ओर श्रद्धालुओं के बैठने हेतु आसनों की व्यवस्था की गई है।
चंडिका माता मंदिर एक ऊँचे चबूतरे पर स्थित है। अलेक्ज़ांडर कनिंघम के लगभग 150 वर्ष पुराने विवरण के अनुसार, इस चबूतरे पर पहुँचने के लिए तीन सोपान थे। ये सोपान आज भी दिखाई देते हैं। मुख्य मंदिर के प्रवेशद्वार के सम्मुख एक मुखमंडप है। इसमें पत्थर के चार अलंकृत स्तंभ हैं। इन स्तंभों पर छत नहीं है। यहाँ केवल एक-दूसरे से जुड़ने वाली पत्थर की धरनें हैं। चारों स्तंभों का आकार और उन पर की गई नक्काशी समान है। स्तंभों का निचला भाग चौकोर, मध्य भाग अष्टकोणीय और उसके ऊपरी भाग में वृत्ताकार तोरण सदृश नक्काशी है।
इनमें लटकती हुई श्रृंखलाओं से जुड़ी घंटियाँ बनी हैं। स्तंभों के शीर्ष पर आमलकाकार संरचना है। उन पर भार वहन करती यक्ष मूर्तियाँ हैं। स्तंभों के मध्य भाग में एक बड़ा शिवलिंग और कुछ प्राचीन मूर्तियाँ रखी हैं।
यह मंदिर पश्चिममुखी है। इसके सभामंडप में पत्थर के सोलह स्तंभ हैं। इन पर कोई विशेष नक्काशी नहीं है। गर्भगृह के दाईं ओर स्थित एक स्तंभ पर मंदिर की जानकारी देने वाला शिलालेख अंकित है। यह शिलालेख देवनागरी लिपि में ईस्वी सन् 1076 में उत्कीर्ण किया गया था। इसमें उल्लेख है कि यह मंदिर चंडिका देवी का है। वर्तमान में यह शिलालेख कुछ स्पष्ट नहीं है। फिर भी इसके आधार पर मंदिर का निर्माण काल ज्ञात होता है। सभामंडप में अनेक देवी-देवताओं की प्राचीन मूर्तियाँ भी हैं।
मंदिर का निरीक्षण करने पर स्पष्ट होता है कि पूर्व में जो अंतराल भाग था, उसे जीर्णोद्धार के दौरान गर्भगृह में मिला दिया गया है। इस लंबे गर्भगृह में भीतर जाने पर सम्मुख चंडिका माता की अखंड पाषाण से निर्मित मूर्ति है। इस मूर्ति के एक ओर विष्णु और दूसरी ओर भैरव की मूर्तियाँ हैं। मंदिर की विशेषता यह है कि इस पर कोई शिखर नहीं है। सभामंडप के स्तंभों पर लगी धरनें छत के निकट से बाहर निकली हुई हैं। इन पर अलंकरण किया गया है। मंदिर से संलग्न एक जलकुंड भी है। वर्तमान में यह मंदिर पुरातत्व विभाग के संरक्षण में है। विभाग द्वारा इसका नवीनीकरण और परिसर का सौंदर्यीकरण किया गया है।