चंडिका माता मंदिर

भद्रावती, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर

विदर्भातील प्राचीन नगरांपैकी भद्रावती हे एक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर मानले जाते. येथे असणारी शेकडो मंदिरे, विहार, महाल, तलाव, विहिरी, टेकड्या, गुहा, लेण्या, शिलालेख आणि असंख्य मूर्ती येथील प्राचीन श्रीमंतीची साक्ष देतात. प्रागैतिहासिक म्हणजेच इतिहासपूर्व काळापासून मध्यकाळापर्यंत त्यानंतरच्या काळातील अवशेषांचे भांडार उदरात सामावून आज हे शहर उभे आहे. त्यापैकी एक महत्त्वाचे धार्मिक प्राचीन स्थान म्हणजे येथील चंडिका मातेचे मंदिर होय. सुमारे १००० वर्षांपासून ऊन, वारा पावसाची तमा बाळगता आजही हे मंदिर येथे भक्कमपणे उभे आहे.

एका आख्यायिकेनुसार, भद्रावतीमध्ये ३६० मंदिरे, ३६० तलाव ३६० विहिरी होत्या. चंडिका मातेचे मंदिर भद्रावती शहराच्या दक्षिण पूर्वेकडे असल्याचा उल्लेख अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी आपल्या लिखाणात केला होता. त्यांनी या मंदिराच्या पुरातत्त्वीय वैभवाचेही वर्णन केले होते. अलेक्झांडर कनिंगहॅम हे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे जनक मानले जातात. १८६१ मध्ये लॉर्ड कॅनिग यांनीऑर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाची स्थापना करून कनिंगहॅम यांची त्याचे पहिले सर्वेक्षक म्हणून नेमणूक केली होती. या काळात कनिंगहॅम यांनी प्राचीन भारताच्या इतिहासाचे अनेक पैलू जगासमोर उघड केले होते.

भद्रावती शहराच्या मध्यवर्ती भागात पंचशीलनगर आखाडा या भागात चंडिका मातेचे हे प्राचीन मंदिर स्थित आहे. या मंदिराच्या शेजारी श्वेतांबर जैन मंदिर आहे. पूर्वी शहराबाहेर असलेले हे मंदिर येथील वस्ती वाढल्यामुळे आता शहराच्या मध्यवर्ती भागात आले आहे. चारही बाजूने तटबंदी असलेल्या या मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. तटबंदीच्या प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर सुंदर उद्यानातून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्याच्या मंदिराच्या आजूबाजूला भाविकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था आहे.

चंडिका मातेचे मंदिर एका उंच चौथऱ्यावर स्थित आहे. अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी केलेल्या वर्णनानुसार या चौथऱ्यावर जाण्यासाठी पायऱ्या होत्या, त्या आजही दिसतात. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एक मुखमंडप असून त्यात अलंकृत दगडी स्तंभ आहेतया स्तंभावर छत नसून त्यावर केवळ एकमेकांना जोडणाऱ्या दगडी तुळया ( खांबांवर अथवा भिंतींच्या वरील बाजूस आडवे ठेवलेले चौरस लाकूड वा दगडी स्तंभ) आहेत. या चारही स्तंभांचा आकार त्यावरील कलाकुसर सारखीच आहे. स्तंभांचा खालचा भाग चौकोनी तर मध्यभाग अष्टकोनी आहे. अष्टकोनी भागाच्या वरील बाजूस गोलाकार तोरणसदृश्य कलाकुसर असून त्यांमधून लोंबकळणाऱ्या साखळ्यांना अडकविलेल्या घंटा, असे अलंकरण आहे. स्तंभांच्या वरील बाजूस आमलकाप्रमाणे आकार त्याच्याही वर भारवाहक यक्षप्रतिमा आहेत. स्तंभांच्या मध्यभागी मोठी शिवपिंडी काही प्राचीन मूर्ती आहेत.

पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात १६ दगडी स्तंभ आहेत. या स्तंभांवर विशेष अशी कलाकुसर नसली तरी त्यापैकी एका स्तंभावर मंदिराची माहिती देणारा शिलालेख कोरण्यात आलेला आहे. गर्भगृहाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या या स्तंभावर देवनागरी लिपीत . . १०७६ मध्ये हा शिलालेख कोरल्याचा, तसेच हे मंदिर चंडिका देवीचे असल्याचा उल्लेख आहे. सध्या हा शिलालेख काहीसा पुसट झालेला असला तरी त्यामुळे मंदिर निर्माणाचा काळ ठरविण्यास मदत होते. सभामंडपात अनेक देवदेवतांच्या प्राचीन मूर्ती आहेत.

मंदिराचे निरीक्षण करताना असे लक्षात येते की पूर्वी अंतराळाचा असणारा भाग हा जीर्णोद्धार करताना गर्भगृहातच विलीन करण्यात आला आहे. या लांबट गर्भगृहातून आत गेल्यावर समोर चंडिका मातेची अखंड दगडातील मूर्ती असून या मूर्तीच्या एका बाजूला विष्णू, तर दुसऱ्या बाजूला भैरव यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराचे वेगळेपण म्हणजे यावर शिखर नाही. सभामंडपातील खांबांवरील तुळया या छताजवळील भागातून बाहेर निघालेल्या दिसत असून त्यावर अलंकरण केलेले आहे. मंदिराला लागूनच एक पाण्याचे कुंड आहे. सध्या हे मंदिर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित आहे. पुरातत्त्व खात्याकडून मंदिराचे नूतनीकरण परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.

उपयुक्त माहिती:

  • भद्रावती बस स्थानकापासून किमी, तर चंद्रपूरपासून २७ किमी अंतरावर
  • चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून
  • भद्रावतीसाठी एसटीची सेवा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home