संपूर्ण गावात सीसी टीव्ही असणारे चिमूर तालुक्यात महादवाडी हे पहिले गाव ठरले आहे. हुमान नदीवरील हुमान जलसिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात असूनही या गावाने आदर्श गाव योजनेंतर्गत नावीन्यपूर्ण प्रयोग करून जिल्ह्यात स्वच्छतेच्या बाबतीत आपला ठसा उमटवला आहे. या गावापासून काही अंतरावर प्राचीन हेमाडपंती शिव मंदिर असून त्याला या परिसरात राक्षस मंदिर म्हणून ओळखले जाते. १२व्या शतकातील या मंदिराच्या सभामंडपाच्या छतावर असलेले भव्य व वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसरीचे दगडी झुंबर हे येथील आकर्षण आहे.
१९४२ मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा दिल्यानंतर चिमूरमध्ये प्रथम आंदोलन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेल्या आवाहनानंतर येथील जनतेने ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठविला व १४ ते १६ ऑगस्ट १९४२ या ३ दिवसांसाठी चिमूर स्वतंत्र झाले होते. भारतातील हे पहिले स्वातंत्र्य होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून ही माहिती जगाला दिली होती. तेव्हापासून चिमूर हे जगाच्या नकाशावर आले. ऐतिहासिक दृष्टीने अतिशय महत्त्व असलेल्या या चिमूर तालुक्यात महादवाडी हे एक लहानसे गाव आहे. या परिसरात सर्वत्र धानाची (तांदूळ) शेती असून त्यामध्ये असलेल्या एका तलावाकाठी आपल्या प्राचीनतेची साक्ष देत शेकडो वर्षांपासून उभा असणारा अमूल्य ठेवा म्हणजे येथील हेमाडपंती रचनेचे शिव मंदिर ऊर्फ राक्षस मंदिर होय.
महादवाडी येथील शिव मंदिर हे वालुका पाषाणापासून बनलेले आहे. येथील अखंड व भव्य दगडी खांब उचलणे माणसांना शक्य नाही म्हणून ते मंदिर राक्षसांनी बांधले असावे, अशी येथे आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळेच या मंदिराला राक्षस मंदिर, असे म्हटले जाते. तलावाच्या किनाऱ्यावर मुख्य रस्त्याला लागून हे मंदिर आहे. मंदिराभोवती सर्वत्र तारेचे कुंपण असून मंदिराचा परिसर आटोपशीर आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. महादवाडी गावापासून काही अंतरावर असलेले नेरी येथील प्राचीन महादेव मंदिर आणि या मंदिराची रचना काही अंशी सारखीच आहे. या मंदिरावर चालुक्यकालीन स्थापत्याची छाप असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
मंदिराच्या मुखमंडपात चार दगडी स्तंभ आहेत. या स्तंभांची रचना ही खालच्या बाजूने चौकोनी, मध्यभागी अष्टकोनी, नंतर गोलाकार, पुन्हा चौकोनी व वरच्या भागात भारवाहक यक्ष अशा पद्धतीची आहे. मुखमंडपातून पुढे गेल्यावर सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात १४ अर्धस्तंभ व ४ पूर्णस्तंभ आहेत. या अर्धस्तंभांखाली भाविकांना बसण्यासाठी ओटा असून त्यावर हे खांब आहेत. येथील सभामंडप अर्धमंडप स्वरूपाचा असून चारही बाजूने त्याला केवळ अर्धभिंती आहेत. येथील सर्व स्तंभांची रचना सारखीच असून त्यावर एकसारखीच कलाकुसर आहे. या सभामंडपाच्या छतावर असलेली कलाकुसर खूपच वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केलेली आहे. एखादा मोठा झुंबर असावा, असे येथे दगडांत केलेले कोरीव काम आहे. सभामंडपातून पुढे अंतराळाच्या भिंतीवर दोन्ही बाजूला देवकोष्टके आहेत. त्यापुढे अंतराळातही उजव्या आणि डावीकडील भिंतींमध्ये प्रत्येकी एक देवकोष्टक आहे. अंतराळातील छत हेमाडपंती रचनेचे खालून वरच्या बाजूला निमुळते होत गेलेले दिसते.
गर्भगृहाच्या द्वारशाखेवर कलाकुसर असून द्वारशाखेच्या खालच्या बाजूला द्वारपाल, चामरधारिणी स्त्री आणि अक्षमाळा घेतलेली स्त्री या प्रतिमा कोरलेल्या असून द्वारशाखेच्या खालच्या पट्टीवर अनेक अश्व व हत्ती आहेत. द्वारपट्टीच्या वरील भागात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या ३ स्वतंत्र मूर्ती वेगवेगळ्या देवकोष्टकांत कोरलेल्या आहेत. खालच्या बाजूला कीर्तिमुख आहे. गर्भगृहात प्राचीन शिवपिंडी असून त्या समोरील भिंतीवर मुख्य देवकोष्टकामध्ये अन्नपूर्णा माता, तर त्याच्या दोन्ही बाजूला गणपती आणि नागशिल्प आहेत.
मुख्यमंडप आणि सभामंडप यांच्या स्तंभांवर बाह्य भागात नृत्य गणेश, भैरव, पार्वती, नृत्यांगना, मृदुंगवादक स्त्री, नटराज, सरस्वती, वीरपुरुष आदी मूर्ती कोरलेल्या आहेत. खाली असलेल्या अर्धभिंतीच्या बाह्यांगावर विविध व्यालशिल्पे आहेत. (या प्रकारच्या शिल्पांमध्ये हत्ती, घोडा, मेंढा यांसारख्या प्राण्यांचे केवळ मुख असून त्याखाली काल्पनिक प्राणी वा पक्ष्याचा आकार असतो. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची गजव्याल, अश्वव्याल, शरभव्याल अशी ओळख पटविली जाते.) मंदिराच्या गर्भगृहावरील शिखर नागर शैलीतील ३ शाखायुक्त रचनेचे आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर वीरगळ, गणेशमूर्ती व काही प्राचीन शिल्पे आहेत. सध्या हे मंदिर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असून त्यांच्याकडून या मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. या मंदिराच्या रचनेवरून याच्या बांधणीचा काळ हा १२व्या शतकातील असावा, असे सांगितले जाते. येथील गुरुदेव सेवा मंडळातर्फे रोज या मंदिरात भजन होते. तसेच दर गुरुवारी येथून रामधूनची फेरी काढली जाते. या फेरीचा उद्देश गावाची पाहणी करून स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांना सजग करण्याचा असतो.
या मंदिरापासून २ किमी अंतरावर गोंदेडा नावाचे गाव आहे. येथे असलेल्या एका गुंफेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तपश्चर्या केली होती. दरवर्षी पौष पौर्णिमेला या ठिकाणी तीन दिवसांची यात्रा भरते.
महादवाड़ी, चिमूर तहसील का पहला ऐसा गाँव है, जहाँ संपूर्ण ग्राम में सीसीटीवी कैमरे लगे हैं। हुमान नदी पर बने हुमान सिंचाई प्रकल्प के जलग्रहण क्षेत्र में स्थित होने के बावजूद, इस गाँव ने आदर्श ग्राम योजना के अंतर्गत अभिनव प्रयोग कर जिले में स्वच्छता के मामले में अपनी एक विशिष्ट पहचान बनाई है। इस गाँव से कुछ दूरी पर स्थित प्राचीन हेमाडपंती शिव मंदिर इस क्षेत्र में ‘राक्षस मंदिर’ के नाम से प्रसिद्ध है। बारहवीं शताब्दी के इस मंदिर के सभामंडप की छत पर बनी भव्य और अनोखी नक्काशीदार पत्थर की झालर यहाँ का मुख्य आकर्षण है।
सन १९४२ में जब महात्मा गाँधी ने अंग्रेजों को ‘भारत छोड़ो’ का नारा दिया, तब चिमूर में सर्वप्रथम आंदोलन हुआ। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के आवाहन पर यहाँ की जनता ने ब्रिटिश सत्ता के विरुद्ध आवाज़ उठाई और १४ से १६ अगस्त १९४२ तक, तीन दिनों के लिए चिमूर स्वतंत्र हो गया।
यह भारत में घटित पहली स्वतंत्रता की घटना थी। नेताजी सुभाष चंद्र बोस ने बर्लिन रेडियो से इस घटना की जानकारी विश्वभर में प्रसारित की थी। उसी समय से चिमूर विश्व के मानचित्र पर अंकित हो गया। ऐतिहासिक दृष्टि से महत्त्वपूर्ण इसी चिमूर तहसील का एक छोटा-सा गाँव है महादवाड़ी। इस क्षेत्र में चारों ओर धान (चावल) की खेती होती है और एक तालाब के किनारे स्थित है शताब्दियों पुराना यह अमूल्य खजाना। यहाँ का हेमाडपंती शैली का शिव मंदिर, जिसे ‘राक्षस मंदिर’ भी कहा जाता है।
महादवाड़ी का यह शिव मंदिर वालुकाश्म (रेतीले पत्थर) से निर्मित है। ऐसी मान्यता है कि यहाँ के विशाल पत्थर के खंभों को उठाना मनुष्यों के लिए संभव नहीं था, इसीलिए इस मंदिर का निर्माण राक्षसों ने किया था। इसी कारण इसे ‘राक्षस मंदिर’ कहा जाता है। यह मंदिर तालाब के किनारे मुख्य सड़क से लगा हुआ है। मंदिर चारों ओर लोहे की जाली से घिरा है और इसका परिसर छोटा तथा सुसज्जित है। मंदिर की संरचना में मुखमंडप, सभामंडप, अंतराल और गर्भगृह सम्मिलित हैं। महादवाड़ी से कुछ दूरी पर स्थित नेरी का प्राचीन महादेव मंदिर और यह मंदिर, रचना में कुछ हद तक समान हैं। अध्ययनकर्ताओं के अनुसार इस मंदिर पर चालुक्यकालीन स्थापत्य का प्रभाव दिखाई देता है।
मुखमंडप में चार स्तंभ हैं। इन स्तंभों की संरचना नीचे चौकोर, बीच में अष्टकोणीय, फिर गोलाकार, उसके बाद पुनः चौकोर और शीर्ष पर भार उठाते हुए यक्ष की आकृति इस प्रकार है। मुखमंडप से आगे सभामंडप है। सभामंडप में चौदह अर्धस्तंभ और चार पूर्ण स्तंभ हैं। इन अर्धस्तंभों के नीचे भक्तों के बैठने के लिए पत्थर की बैठक बनी है। सभामंडप अर्धमंडप स्वरूप का है, जिसके चारों ओर केवल अर्धभित्तियाँ (कम ऊँचाई की दीवारें) हैं। सभी स्तंभों पर एक समान नक्काशी की गई है। सभामंडप की छत की नक्काशी अत्यंत विशिष्ट शैली में की गई है, जो एक विशाल झूमर का आभास देती है। सभामंडप से आगे अंतराल की दीवारों में दोनों ओर देवकोष्ठक हैं। अंतराल के भीतर भी दाईं और बाईं दीवारों पर एक-एक देवकोष्ठक बना है। अंतराल की छत हेमाडपंती शैली के अनुरूप नीचे से ऊपर की ओर संकरी होती गई है।
गर्भगृह की द्वारशाखा पर सुंदर नक्काशी की गई है। इसके निचले भाग में द्वारपाल, चामरधारिणी स्त्री और अक्षमाला धारण की हुई स्त्री की प्रतिमाएँ हैं। नीचे की पट्टी पर घोड़ों और हाथियों की कई आकृतियाँ हैं। द्वारपट्टी के ऊपरी भाग में ब्रह्मा,
विष्णु और महेश की मूर्तियाँ अलग-अलग देवकोष्ठकों में उत्कीर्ण हैं। नीचे की ओर कीर्तिमुख की आकृति है। गर्भगृह में प्राचीन शिवलिंग है। उसके सामने की दीवार के मुख्य देवकोष्ठक में अन्नपूर्णा माता तथा दोनों ओर गणपति और नागशिल्प हैं।
मुखमंडप और सभामंडप के स्तंभों पर बाहर की ओर नृत्य गणेश, भैरव, पार्वती, नृत्यांगना, मृदंग वादिका, नटराज, सरस्वती, वीरपुरुष आदि की मूर्तियाँ उत्कीर्ण हैं। नीचे की अर्धभित्ति पर विविध व्यालशिल्प हैं।
(इन शिल्पों में हाथी, घोड़े, मेढ़े जैसे प्राणियों का केवल मुख होता है और नीचे का शरीर किसी काल्पनिक पशु या पक्षी का होता है। इन्हीं विशेषताओं के आधार पर गजव्याल, अश्वव्याल, शरभव्याल आदि की पहचान की जाती है।) मंदिर के गर्भगृह का शिखर नागर शैली का है और यह त्रिरथ (तीन शाखाओं वाला) है।
मंदिर के प्रवेशद्वार के सामने वीरगल (वीर-शिला), गणेश मूर्ति और कुछ अन्य प्राचीन शिल्प रखे हैं। वर्तमान में यह मंदिर पुरातत्त्व विभाग के अंतर्गत है। रचना के आधार पर इसका निर्माण काल बारहवीं (१२वीं) शताब्दी का माना जाता है। यहाँ के गुरुदेव सेवा मंडल द्वारा प्रतिदिन भजन होता है और हर गुरुवार को यहाँ से रामधुन की फेरी निकाली जाती है। इस फेरी का उद्देश्य गाँव की परिक्रमा कर नागरिकों को स्वच्छता के प्रति जागरूक करना है।
इस मंदिर से दो किलोमीटर दूर गोंदेडा नामक गाँव है। वहाँ स्थित एक गुफा में राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ने तपश्चर्या की थी। प्रत्येक वर्ष पौष पूर्णिमा को यहाँ तीन दिनों का मेला लगता है।