सिंदेवाही व सावली तालुक्याच्या सीमेवर असलेले गुंजेवाही येथील अंबिका माता मंदिर प्रसिद्ध असून हे जागृत स्थान येथील एका टेकडीवर स्थित आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे हे मंदिर २०० वर्षांहून अधिक प्राचीन आहे. येथे साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवात लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येतात. याशिवाय मंगळवारी व शुक्रवारीही देवीच्या दर्शनाला हजारो भाविकांची गर्दी असते. भाविकांच्या संख्येमुळे व या मंदिरावरील श्रद्धेमुळे महाराष्ट्र सरकारने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देऊन त्याचा गौरव केला आहे.
सिंदेवाही तालुक्याच्या शेवटच्या टोकावर हे मंदिर आहे. येथे शेजारी–शेजारी २ मंदिरे असून मोठ्या मंदिरातील मुख्य देवता ही अंबिका देवी, तर लहान मंदिरात असलेली देवी यल्लमा देवी म्हणून प्रसिद्ध आहे. या दोघी बहिणी असल्याची मान्यता आहे. त्यामुळे या मंदिराला अंबिका–यल्लमा मंदिर असे म्हटले जाते. १९९३ मध्ये जीर्णोद्धार व नूतनीकरण केल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. असे सांगितले जाते की १९६४ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी या मंदिरात काही दिवस वास्तव्य केले होते. तसेच अंबिका माता व यल्लमा माता यांची प्रतिष्ठापना परशुरामाच्या काळात झाल्याची आख्यायिकाही स्थानिकांकडून सांगितली जाते.
सिंदेवाही शहरातून सावलीकडे जाणाऱ्या मार्गावर हे मंदिर आहे. या मार्गाला लागून असलेल्या मोठ्या पटांगणात देवीचे सर्व उत्सव साजरे होत असतात. येथे पूजासाहित्याची अनेक दुकाने आहेत. मंदिरात जाण्यासाठी ४० ते ४५ पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरून गेल्यावर मंदिराच्या कमानीतून प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगण प्रशस्त असून सर्वत्र फरसबंदी करण्यात आलेली आहे. याशिवाय उंचावर असल्यामुळे त्याच्या बाजूने रेलिंग लावण्यात आले आहेत. मुख्य मंदिर हे मध्यम आकाराचे आहे. सभामंडप व तीन लहान गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील गर्भगृह हेच मूळ मंदिर असून त्यापुढील सभामंडप हा नव्याने बांधल्याचा जाणवतो.
देवीच्या गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर काहीसे नक्षीकाम असून आतमध्ये देवीची दोन फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. ही मूर्ती गंडकी पाषाणाची असून ती सिंहासनाधिष्ठित आहे. (महाराष्ट्रात आढळणारा काळा पाषाण आणि गंडकी पाषाण यात फरक आहे. साधारणतः गंडकी पाषाण हा भारत व नेपाळमधून वाहणाऱ्या गंडकी नदीत सापडतो. गंडकी पाषाण अतिशय टणक व गुळगुळीत असतो. या पाषाणाला हवा तसा आकार देणे मूर्तिकाराला तुलनेने सोपे जाते.
तसेच शेकडो वर्षे या पाषाणावर किंवा मूर्तीवर बाह्य वातावरणाचा परिणाम होत नाही. महाराष्ट्रातील पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती ही काळ्या पाषाणाची, तर तुळजापूर मंदिरातील तुळजाभवानीची मूर्ती ही गंडकी पाषाणातील आहे.) मूर्तीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र, तर डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेले आहेत. या देवीला आठ हात असून त्यामध्ये विविध आयुधे आहेत. मूर्तीच्या पाठीवर भाता व मुकुटाच्या मध्यभागी शिवलिंग आहे. मूर्तीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट, त्यावर छत्र, गळ्यात व अंगावर विविध अलंकार व वैशिष्ट्यूर्ण नेसविलेली साडी यामुळे देवीचे रूप खुलून दिसते. करवीरवासिनी महालक्ष्मीचे हे रूप आहे, असे मानले जाते. येथील अन्य २ गर्भगृहांमध्ये शिवपिंडी व विठ्ठल–रुख्मिणी यांच्या मूर्ती आहेत.
या मंदिराच्या शेजारीच असलेल्या दुसऱ्या मंदिराचे बांधकामही जुने असून त्यामध्ये यल्लमा देवीची मूर्ती आहे. नवरात्रोत्सवात येथे देवस्थान कमिटीतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यामध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना व इतर दिवशी योगिनी मिलन, देवीचा शृंगार, ललित पंचमीला उपवास, गोंधळ, घागर फुंकणे आदी विधी होतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांत येथे सुमारे दोन ते अडीच लाख भाविक दर्शासाठी येतात, अशी नोंद आहे. त्यामध्ये दर्शन घेण्यासाठी, नवस बोलण्यासाठी व नवसपूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांचा समावेश आहे.
हा परिसर जंगलव्याप्त असल्यामुळे अनेकदा नवरात्रीच्या काळात भाविकांना मंदिर परिसरात व्याघ्रदर्शन होते, असे येथील स्थानिकांकडून सांगण्यात येते. परंतु देवीच्या आशीर्वादाने येथे कधीही त्यांच्याकडून देवीभक्तांना इजा झालेली नाही. नवसाला पावणारी व मनोकामना पूर्ण करणारी ही देवी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. ही देवी या परिसरातील अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. दररोज सकाळी ८.१० व सायंकाळी ६.३० वाजता देवीची आरती होते. सकाळी ६ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते ७ पर्यंत गर्भगृहात जाऊन अंबिका मातेचे दर्शन घेता येते. महाराष्ट्र सरकारने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा दिल्याने सरकारकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निधीतून भाविकांसाठी विविध सोयी–सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत.
गुंजेवाही गाव हे पूर्वीपासून विदर्भात हातमागांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात पूर्वी १००० हून जास्त हातमाग चालत असत. या गावात व परिसरात अनेक मंदिरेही आहेत. गुंजेवाही गावात अंबिका देवी मंदिरापासून जवळच सुमारे २०० वर्षांपूर्वीचे एक शेषनारायण मंदिर आहे. येथे असलेली प्राचीन शेषशाही श्रीविष्णू मूर्ती ही शेंदूरचर्चित असून येथे लक्ष्मीचे स्थान हे विष्णूच्या पायापाशी नसून ते हातांपाशी आहे. याशिवाय या गावात असणारे श्रीविष्णू व महादेवांचे जोड मंदिरही प्रसिद्ध आहे.
सिंदेवाही और सावली तहसील की सीमा पर स्थित गुंजेवाही का अंबिका माता मंदिर एक प्रसिद्ध एवं जाग्रत देवस्थान है, जो यहाँ की एक पहाड़ी पर स्थित है। यह मंदिर २०० वर्षों से भी अधिक प्राचीन है और लाखों श्रद्धालुओं की आस्था का केंद्र है। नवरात्रोत्सव के अवसर पर यहाँ लाखों भक्त देवी के दर्शन हेतु आते हैं। इसके अतिरिक्त, प्रत्येक मंगलवार और शुक्रवार को भी देवी के दर्शन के लिए हजारों श्रद्धालु उपस्थित रहते हैं। महाराष्ट्र सरकार ने इस मंदिर को तीर्थक्षेत्र की ‘ब’ श्रेणी में सम्मिलित कर इसे गौरवान्वित किया है।
यह मंदिर सिंदेवाही तहसील के सीमा पर स्थित है। यहाँ समीप ही दो मंदिर हैं। बड़े मंदिर की मुख्य देवी अंबिका माता हैं, जबकि छोटे मंदिर की देवी यल्लमा देवी के रूप में प्रसिद्ध हैं। ऐसी मान्यता है कि ये दोनों बहनें हैं, इसी कारण यह स्थान अंबिका-यल्लमा मंदिर कहलाता है। वर्ष १९९३ में जीर्णोद्धार और नवीनीकरण के पश्चात् मंदिर को वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ। ऐसा कहा जाता है कि वर्ष १९६४ में राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ने यहाँ कुछ समय तक निवास किया था। साथ ही, स्थानीय जनश्रुति के अनुसार अंबिका माता और यल्लमा माता की प्रतिष्ठापना भगवान परशुराम के काल में हुई थी।
यह मंदिर सिंदेवाही से सावली जाने वाले मार्ग पर स्थित है। इस मार्ग से सटे विशाल मैदान में देवी के सभी उत्सव मनाए जाते हैं। यहाँ पूजन सामग्री की अनेक दुकानें हैं। मंदिर तक पहुँचने के लिए ४०-४५ सीढ़ियाँ चढ़नी पड़ती हैं। इन सीढ़ियों के पश्चात् मंदिर के मुख्य प्रवेशद्वार से प्रांगण में प्रवेश होता है। प्रांगण विशाल है तथा चारों ओर फर्श लगाया गया है। ऊँचाई पर होने के कारण किनारों पर रेलिंग भी लगाई गई है। मुख्य मंदिर मध्यम आकार का है, जिसकी संरचना में एक सभामंडप और तीन छोटे गर्भगृह सम्मिलित हैं। इनमें से देवी का गर्भगृह ही मूल मंदिर है, जबकि सभामंडप बाद का निर्माण प्रतीत होता है।
देवी के गर्भगृह की द्वारपट्टिकाओं पर कुछ नक्काशी की गई है। भीतर देवी की दो फ़ुट ऊँची एक विशिष्ट मूर्ति विराजमान है। यह मूर्ति गंडकी पत्थर से निर्मित है और सिंहासन पर आसीन है। (महाराष्ट्र में पाए जाने वाले काले पत्थर और गंडकी पत्थर में अंतर है। गंडकी पत्थर नेपाल और भारत से बहने वाली गंडकी नदी में मिलता है। यह पत्थर अत्यंत कठोर और चिकना होता है। जिससे मूर्तिकारों को इसे आकार देना सरल होता है। इस पर बाहरी वातावरण का प्रभाव भी शताब्दियों तक नहीं पड़ता।
उदाहरण स्वरूप, पंढरपुर की विठ्ठल मूर्ति काले पत्थर की बनी है, जबकि तुलजापुर की तुलजाभवानी मूर्ति गंडकी पत्थर की है।) मूर्ति के दाहिने कंधे के समीप चंद्रमा और बाएँ कंधे के समीप सूर्य की आकृति उकेरी गई है। देवी के आठ हाथों में विभिन्न आयुध हैं। मूर्ति की पीठ पर धनुष तथा मुकुट के मध्य भाग में शिवलिंग अंकित है। देवी के मस्तक पर चाँदी का मुकुट, उसके ऊपर छत्र, गले और शरीर पर विविध आभूषण तथा अलंकृत साड़ी देवी की शोभा को और बढ़ाते हैं। इसे करवीरवासिनी महालक्ष्मी का स्वरूप माना जाता है। शेष दो गर्भगृहों में से एक में शिवलिंग तथा दूसरे में विठ्ठल-रुक्मिणी की मूर्तियाँ हैं।
मंदिर के समीप स्थित दूसरे प्राचीन मंदिर में यल्लमा देवी की मूर्ति विराजमान है। नवरात्रोत्सव के अवसर पर देवस्थान समिति द्वारा यहाँ अनेक कार्यक्रम आयोजित किए जाते हैं, जिनमें घटस्थापना, योगिनी मिलन, देवी श्रृंगार, ललिता पंचमी पर उपवास, जागरण, घडा फूंकना आदि विधियाँ शामिल हैं। (नवरात्रि की अष्टमी के दिन मध्यरात्रि में देवी के समक्ष एक घड़े में अगरबत्ती या धूप का धुआँ भरकर उसे पाँच बार फूँका जाता है; यह विधि महाराष्ट्र में प्रचलित है।) नवरात्रि के नौ दिनों में लगभग दो से ढाई लाख श्रद्धालु यहाँ दर्शन करने तथा अपनी मनोकामनाओं की पूर्ति हेतु आते हैं।
चूँकि यह क्षेत्र वन्य प्रदेश से घिरा है, इसलिए कई बार नवरात्रि के दौरान श्रद्धालुओं को मंदिर परिसर में बाघ के दर्शन होते हैं।
किंतु स्थानीय निवासियों का कहना है कि देवी के आशीर्वाद से श्रद्धालुओं को कभी कोई हानि नहीं हुई। भक्तों का अटूट विश्वास है कि यह देवी उनकी सभी मनोकामनाएँ पूर्ण करती हैं। यह देवी यहाँ के अनेक परिवारों की कुलदेवी भी हैं। प्रतिदिन प्रातः ८:१० बजे और सायं ६:३० बजे देवी की आरती होती है। प्रातः ६ बजे से दोपहर १२ बजे तक और सायं ४ बजे से ७ बजे तक गर्भगृह में जाकर अंबिका माता के दर्शन किए जा सकते हैं। महाराष्ट्र सरकार द्वारा इस मंदिर को ‘ब’ श्रेणी का तीर्थक्षेत्र घोषित किए जाने के उपरांत, सरकार से समय-समय पर प्राप्त होने वाली निधि से श्रद्धालुओं के लिए अनेक सुविधाओं का विकास किया जा रहा है।
गुंजेवाही गाँव प्राचीन काल से ही विदर्भ में हथकरघा उद्योग के लिए प्रसिद्ध रहा है। किसी समय यहाँ १००० से अधिक हथकरघे चलते थे। इस गाँव और आसपास के क्षेत्र में अनेक प्राचीन मंदिर भी हैं।
अंबिका देवी मंदिर के समीप ही लगभग २०० वर्ष प्राचीन शेषनारायण मंदिर है। यहाँ की शेषशायी विष्णु मूर्ति सिंदूर लेपित है और लक्ष्मी का स्थान विष्णु के चरणों में न होकर उनके हाथों के समीप है। इसके अतिरिक्त, यहाँ श्रीविष्णु और महादेव का एक संयुक्त मंदिर भी प्रसिद्ध है।