कोकण भूमीत राखणदारास विशेष महत्त्व आहे. ही भैरव कुळातील स्थान देवता असून क्षेत्राचे रक्षण करणे हे या देवतेचे मुख्य कार्य होय. गावचा राखणदार, पंचक्रोशीचा राखणदार, चाळीस गावांचा राखणदार, शंभर गावांचा राखणदार अशी राखणदाराचे महत्व विषद करणारी क्रमवारी कोकणात परिचीत आहे. हा राखणदार गावाचे, घरांचे, शेताचे, रानाचे, पशू-पक्षांचे, गवत-काडीचे व पीक-पाण्याचे संरक्षण करतो. वाट चुकलेल्या वाटसरूला वाट दाखवतो. कठीण परिस्थितीत अडकलेल्या भक्तांचे रक्षण करतो. तो गावोगावी विविध रूपात पुजला जातो. गोव्यातील केरी गावात तो आजोबा नावाने प्रसिद्ध आहे. जागृत आजोबा देव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर अलीकडील काळात बांधले गेले असले तरी देवस्थान हजारो वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते. समुद्र किनाऱ्यावरील खडकाच्या रुपात असलेल्या या देवाची पूजा करून कोळी बांधव मासेमारी करण्यासाठी समुद्रात उतरत असत. या देवस्थानाच्या अनेक अख्यायिका प्रचलीत आहेत. रात्री अपरात्री समुद्रावरून परतणारे मच्छीमार बांधव अनेकदा वाट चुकतात. त्यावेळी आजोबांचा धावा केल्यावर देव हातात मशाल व घुंगराची काठी घेऊन चुकलेल्यांना रस्ता दाखवतात. त्यांना घरापर्यंत सुखरूप सोडून येतो, अशी श्रद्धा आहे. पूर्वी लाकडी मंडप स्वरूपात असलेले हे मंदिर अलीकडील काळात पक्के बांधण्यात आले आहे.
गावाच्या वेशीवर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. केरी गावापासून जवळच समुद्र किनाऱ्यावर असलेले हे मंदिर अष्टकोनी आहे. मंदिराच्या वाहनतळापर्यंत येण्यासाठी गावातून पक्का रस्ता आहे. वाहनतळावर पूजा साहित्याची दुकाने आहेत. मंदिरासमोर बांबूच्या तोरणाला नवसाच्या पितळी घंटा टांगलेल्या आहेत. मंदिर जमिनीपासून सुमारे चार फूट उंच चौथऱ्यावर आहे व सभोवतीने पाच पायऱ्या आहेत. अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप व त्याच पद्धतीचे गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात प्रत्येकी आठ नक्षीदार स्तंभांची दोन रिंगणे आहेत. सर्व स्तंभ स्तंभपादावर उभे आहेत. बाह्य बाजूच्या स्तंभांमध्ये खाली व शीर्षभागी पद्मफुलांच्या प्रतिकृती आहेत. बाह्यबाजूच्या स्तंभांच्या शीर्षभागी कणी व कणीवर हस्त आहेत. हस्तांवर तुळई आणि त्यावर प्रत्येकी तीन पाषाणी झुंबर आहेत. आतील रिंगणातील स्तंभ एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले आहेत. सभामंडपात दोन्ही रिंगणातील स्तंभ स्टेनलेस स्टीलच्या कठड्याने जोडलेले आहेत. बाह्यबाजूच्या प्रत्येक स्तंभाच्या दोन्ही बाजूला चौथरे आहेत. चौथऱ्यांवर गजराज, व्याघ्र, सिंह, मृग, मयूर, मकर, अश्व अशी विविध पशुपक्ष्यांची शिल्पे आहेत. आतील स्तंभांच्या रिंगणाच्या महिरपी तोरणांच्या वर असलेल्या दर्शनी भिंतीवर गणपती, महादेव, श्रीकृष्ण, परशुराम, हनुमान, विष्णू अशा विविध देवतांच्या मूर्ती आहेत.
सभामंडपाच्या मधोमध आतील स्तंभांच्या रिंगणाच्या आत अष्टकोनी गर्भगृह आहे. हे गर्भगृह चार फूट खोल आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या या गर्भगृहात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारात मेजावर पद्मपादुका आहेत. भाविकांना येथूनच देवाचे दर्शन घ्यावे लागते. गर्भगृहात जमिनीवर स्वयंभू पाषाण रुपात आजोबा देवाचे स्थान आहे. आठ स्तंभांवर तोललेले गर्भगृहाचे छत घुमटाकार आहे. छत मध्यभागी काहीसे खुले असल्याने त्यातून वर्षातील काही दिवस मध्यान्हीची सूर्यकिरणे व रात्री चंद्राची किरणे देवास अभिषेक घालतात. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने सभामंडपात प्रदक्षिणा मार्ग आहे.
मंदिराचे आठ पाखी छत कौलारू आहे. छतावर अष्टदिशांना असलेल्या मेघडंबरीत विविध ऋषीमुनींच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे घुमटाकार शिखर आहे. शिखराचा खालील पहिला थर अष्टकोनी आहे. वरील चार गोलाकार थरात पद्मदलमंडल आहेत. शिखराच्या शीर्षभागी कळस नसून तो भाग उघडा आहे. शिखराची ही रचना वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
मंदिरापासून जवळच समुद्र किनाऱ्यावर उभा खडक आहे. हा खडक म्हणजे आजोबा देवाचे मूळ स्थान असल्याचे सांगितले जाते. या खडकाजवळ ध्वज पताका आहे व रोज सायंकाळी येथे दिवाबत्ती करण्यात येते. या मंदिरापासून जवळ समुद्राकडील डोंगर कड्यात पांडवकालीन लेणी गुंफा आहेत. भरतीच्या वेळी गुफांकडे जाणारा रस्ता बंद होऊन त्यांत पाणी भरते. फक्त ओहोटीच्या वेळी गुफांमध्ये प्रवेश करणे शक्य होते.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आजोबा देवाचा पाच दिवसांचा जत्रोत्सव साजरा केला जातो. जत्रोत्सवाच्या तारखा देवस्थान कमिटी मार्फत ठरवून दोन महिने आधी जाहीर करण्यात येतात. या पाच दिवसात मंदिरात भजन, कीर्तन, महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मंदिरात वर्षभरातील इतर सर्व सण व उत्सव साजरे केले जातात. रविवार, गुरुवार, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. केरीच्या समुद्रकिनारी येणारे पर्यटक देवाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात.
उपयुक्त माहिती:
पेडणे येथून १८ किमी आणि पणजी येथून ४८ किमी अंतरावर
पेडणे येथून केरी गावापर्यंत राज्य परिवहन बसची सुविधा
खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
परिसरात निवास व न्याहरीचे अनेक पर्याय
Ajoba Temple
Keri, Taluka Pernem, District North Goa
In the Konkan region, the ‘Rakhandar’ (guardian deity) holds special significance. This is a local deity from the Bhairav lineage, and its primary function is to protect the region. In Konkan, a hierarchy illustrating the importance of the Rakhandar is well-known: the guardian of a village, the guardian of a cluster of five villages, the guardian of forty villages, and the guardian of a hundred villages. This Rakhandar protects villages, homes, fields, forests, animals and birds, grass and twigs, and crops and water. It shows the way to lost travelers and protects devotees caught in difficult situations. It is worshipped in various forms in different villages. In Keri village of Goa, it is famous by the name Ajoba. Devotees believe that the awakened Lord Ajoba fulfills their vows.
Although this temple has been built in recent times, the deity’s abode is said to be thousands of years old. Fisherfolk used to worship this deity, present in the form of a rock on the seashore, before venturing into the sea for fishing. Many legends associated with this divine abode are prevalent. Fishermen returning from the sea late at night often lose their way. It is believed that when Ajoba is invoked at such times, the deity appears with a torch and a staff with bells, guiding the lost ones. There is a belief that the deity safely escorts them back to their homes. This temple, which was formerly a wooden pavilion, has been solidly constructed in recent times.
The first welcoming arch of the temple is located at the village entrance. This octagonal temple is situated near Keri village, on the seashore. A paved road leads from the village to the temple’s parking area. Shops selling puja materials are available at the parking lot. In front of the temple, brass bells offered as vows are hung on a bamboo archway. The temple stands on a plinth about four feet high from the ground, with five steps surrounding it. The temple’s structure comprises a semi-open assembly hall (Sabhamandap) and a sanctum sanctorum (Garbhagriha) of the same style. In the Sabhamandap, there are two rings, each with eight intricately carved pillars. All pillars stand on their bases. The outer pillars feature lotus flower motifs at their base and capital. At the top of the outer pillars are ‘Kani’ (brackets) and ‘Hasta’ (hands/supports) on the Kani. Beams rest on the Hastas, and on each beam, there are three stone chandeliers. The pillars in the inner ring are connected to each other by arched toranas (decorative archways). In the Sabhamandap, the pillars of both rings are connected by stainless steel railings. On both sides of each outer pillar, there are platforms. These platforms feature sculptures of various animals and birds such as elephants (Gajraj), tigers (Vyaghra), lions (Simha), deer (Mruga), peacocks (Mayur), crocodiles (Makar), and horses (Ashva). On the visible wall above the arched toranas of the inner ring of pillars, there are idols of various deities like Ganapati, Mahadev, Shri Krishna, Parashuram, Hanuman, and Vishnu.
In the center of the Sabhamandap, within the inner ring of pillars, lies an octagonal Garbhagriha (sanctum sanctorum). This Garbhagriha is four feet deep. There are steps to descend into this semi-open Garbhagriha. At the entrance of the Garbhagriha, on a table, are the Padmapadukas (lotus footprints). Devotees must have darshan (sacred viewing) of the deity from this point. Within the Garbhagriha, Lord Ajoba resides in the form of a self-manifested (Swayambhu) stone on the ground. The dome-shaped roof of the Garbhagriha is supported by eight pillars. As the roof is partially open in the center, on certain days of the year, the midday sun rays and nighttime moonbeams perform an ‘abhisheka’ (ritual bathing) for the deity. An circumambulation path (Pradakshina Marg) runs around the exterior of the Garbhagriha within the Sabhamandap.
The temple’s eight-sided roof is tiled. On the roof, in the ‘Meghadambari’ (small pavilions) located in the eight directions, there are idols of various Rishis and Munis (sages). Above the Garbhagriha’s roof, there is a five-tiered dome-shaped ‘Shikhara’ (spire). The first, lowest tier of the Shikhara is octagonal. The upper four circular tiers feature ‘Padmadalamandal’ (lotus petal designs). There is no ‘Kalasha’ (finial) at the apex of the Shikhara; that part is open. This unique design of the Shikhara is distinctive.
Near the temple, on the seashore, stands a vertical rock. This rock is said to be the original abode of Lord Ajoba. Near this rock, there is a flag and a lamp is lit every evening. Near this temple, in the cliffs facing the sea, there are caves believed to be from the Pandava era. During high tide, the path leading to the caves becomes inaccessible and they fill with water. Entry into the caves is only possible during low tide.
Every year in February, a five-day ‘Jatrotsav’ (temple festival) of Lord Ajoba is celebrated. The dates for the Jatrotsav are decided by the Temple Committee and announced two months in advance. During these five days, various religious programs such as Bhajans (devotional songs), Kirtans (narrative singing), and Mahaprasad (sacred food offering) are organized at the temple. At this time, thousands of devotees from the surrounding area come for darshan of the deity and to fulfill their vows. All other festivals and celebrations throughout the year are also observed at the temple. On Sundays, Thursdays, Purnima (full moon), Amavasya (new moon), and other auspicious days, a large number of devotees visit the temple for darshan. Tourists visiting Keri beach also make it a point to come for darshan of the deity.
Useful Information:
18 km from Pernem and 48 km from Panaji
State transport bus facility available from Pernem to Keri village
Private vehicles can reach the temple’s parking area
Many accommodation and breakfast options in the vicinity
आजोबा मंदिर
केरी, तालुका पेडणे, जिला उत्तर गोवा
कोंकण भूमि में राखणदार को विशेष महत्व प्राप्त है। यह भैरव कुल की स्थान देवता हैं और क्षेत्र की रक्षा करना इस देवता का मुख्य कार्य है। गाँव का राखणदार, पंचक्रोशी का राखणदार, चालीस गाँवों का राखणदार, सौ गाँवों का राखणदार – इस प्रकार राखणदार के महत्व को दर्शाने वाली क्रमवारी कोंकण में सुप्रसिद्ध है। यह राखणदार गाँव, घरों, खेतों, वनों, पशु-पक्षियों, घास-फूस और फसल-पानी की रक्षा करते हैं। रास्ता भटके हुए यात्रियों को मार्ग दिखाते हैं। कठिन परिस्थितियों में फंसे भक्तों की रक्षा करते हैं। वे गाँव-गाँव में विभिन्न रूपों में पूजे जाते हैं। गोवा के केरी गाँव में वे आजोबा नाम से प्रसिद्ध हैं। जागृत आजोबा देव मन्नत पूरी करते हैं, ऐसी भक्तों की श्रद्धा है।
यद्यपि यह मंदिर हाल के समय में बनाया गया है, तथापि यह देवस्थान हजारों वर्ष प्राचीन बताया जाता है। समुद्र तट पर चट्टान के रूप में विराजमान इस देवता की पूजा करके कोली बंधु मछली पकड़ने के लिए समुद्र में उतरते थे। इस देवस्थान की अनेक किंवदंतियाँ प्रचलित हैं। रात-बिरात समुद्र से लौटने वाले मछुआरे बंधु अक्सर रास्ता भटक जाते हैं। उस समय आजोबा का आह्वान करने पर देव हाथ में मशाल और घुँघरू वाली लाठी लेकर भटके हुए लोगों को रास्ता दिखाते हैं। उन्हें घर तक सुरक्षित पहुँचाते हैं, ऐसी श्रद्धा है। पहले लकड़ी के मंडप के रूप में स्थित यह मंदिर हाल के समय में पक्का बनवाया गया है।
गाँव के प्रवेश द्वार पर मंदिर का पहला स्वागत तोरण है। केरी गाँव के समीप समुद्र तट पर स्थित यह मंदिर अष्टकोणीय है। मंदिर के पार्किंग स्थल तक पहुँचने के लिए गाँव से पक्की सड़क है। पार्किंग स्थल पर पूजा सामग्री की दुकानें हैं। मंदिर के सामने बाँस के तोरण पर मन्नत की पीतल की घंटियाँ लटकी हुई हैं। मंदिर भूमि से लगभग चार फुट ऊँचे चबूतरे पर स्थित है और इसके चारों ओर पाँच सीढ़ियाँ हैं। अर्ध-खुले स्वरूप का सभामंडप और उसी प्रकार का गर्भगृह, ऐसी मंदिर की संरचना है। सभामंडप में प्रत्येक आठ नक्काशीदार स्तंभों के दो वलय (रिंग) हैं। सभी स्तंभ स्तंभपाद पर खड़े हैं। बाहरी ओर के स्तंभों में नीचे और शीर्ष भाग पर पद्म-पुष्पों की प्रतिकृतियाँ हैं। बाहरी ओर के स्तंभों के शीर्ष भाग पर ‘कणी’ और ‘कणी’ पर ‘हस्त’ हैं। हस्तों पर तुळई (बीम) और उस पर प्रत्येक तीन पाषाणी (पत्थर के) झूमर हैं। भीतरी वलय के स्तंभ एक-दूसरे से मेहराबी तोरण से जुड़े हुए हैं। सभामंडप में दोनों वलय के स्तंभ स्टेनलेस स्टील की रेलिंग से जुड़े हुए हैं। बाहरी ओर के प्रत्येक स्तंभ के दोनों ओर चबूतरे हैं। चबूतरों पर गजराज, व्याघ्र, सिंह, मृग, मयूर, मकर, अश्व जैसे विभिन्न पशु-पक्षियों की मूर्तियाँ (शिल्प) हैं। भीतरी स्तंभों के वलय के मेहराबी तोरणों के ऊपर स्थित दर्शनी दीवार पर गणपति, महादेव, श्रीकृष्ण, परशुराम, हनुमान, विष्णु जैसे विभिन्न देवताओं की मूर्तियाँ हैं।
सभामंडप के मध्य में भीतरी स्तंभों के वलय के भीतर अष्टकोणीय गर्भगृह है। यह गर्भगृह चार फुट गहरा है। अर्ध-खुले स्वरूप के इस गर्भगृह में उतरने के लिए सीढ़ियाँ हैं। गर्भगृह के प्रवेश द्वार पर मेज पर पद्मपादुकाएँ हैं। भक्तों को यहीं से देव के दर्शन करने होते हैं। गर्भगृह में भूमि पर स्वयंभू पाषाण के रूप में आजोबा देव का स्थान है। आठ स्तंभों पर टिका गर्भगृह का छत गुंबदाकार है। छत मध्य भाग में कुछ खुला होने के कारण, उसमें से वर्ष के कुछ दिनों में मध्याह्न की सूर्य किरणें और रात में चंद्रमा की किरणें देव का अभिषेक करती हैं। गर्भगृह के बाहरी ओर सभामंडप में प्रदक्षिणा मार्ग है।
मंदिर का आठ-पंखी छत खपरैल का है। छत पर अष्टदिशाओं में स्थित मेघडंबरी में विभिन्न ऋषि-मुनियों की मूर्तियाँ हैं। गर्भगृह के छत पर पाँच परतों का गुंबदाकार शिखर है। शिखर की निचली पहली परत अष्टकोणीय है। ऊपरी चार गोलाकार परतों में पद्मदलमंडल हैं। शिखर के शीर्ष भाग पर कलश नहीं है, बल्कि वह भाग खुला है। शिखर की यह संरचना विशिष्ट मानी जाती है।
मंदिर के समीप ही समुद्र तट पर एक खड़ी चट्टान है। यह चट्टान आजोबा देव का मूल स्थान बताई जाती है। इस चट्टान के समीप ध्वज पताका है और प्रतिदिन संध्याकाल में यहाँ दीप प्रज्वलित किए जाते हैं। इस मंदिर के समीप समुद्र की ओर पहाड़ी ढलान में पांडवकालीन गुफाएँ हैं। ज्वार के समय गुफाओं की ओर जाने वाला रास्ता बंद हो जाता है और उनमें पानी भर जाता है। केवल भाटा (ओहोटी) के समय ही गुफाओं में प्रवेश करना संभव होता है।
प्रतिवर्ष फरवरी माह में आजोबा देव का पाँच दिवसीय जत्रोत्सव (मेला) मनाया जाता है। जत्रोत्सव की तिथियाँ देवस्थान समिति द्वारा निर्धारित कर दो महीने पहले घोषित की जाती हैं। इन पाँच दिनों में मंदिर में भजन, कीर्तन, महाप्रसाद आदि विभिन्न धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। इस अवसर पर क्षेत्र के हजारों भक्त देव के दर्शन और मन्नतें पूरी करने के लिए आते हैं। मंदिर में वर्षभर के अन्य सभी पर्व और उत्सव मनाए जाते हैं। रविवार, गुरुवार, पूर्णिमा, अमावस्या आदि दिनों में मंदिर में दर्शन के लिए आने वाले भक्तों की संख्या अधिक होती है। केरी के समुद्र तट पर आने वाले पर्यटक देव के दर्शन के लिए विशेष रूप से आते हैं।