विदर्भाची पावन भूमी अनेक संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आहे. याच परंपरेत बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव हे शहर ‘आगाशे काका माऊली’ यांच्या आध्यात्मिक अधिकारामुळे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आले आहे. श्री अरविंद आगाशे काका, ज्यांना भक्तांनी ‘काका माऊली’ किंवा ‘दत्तदास’ ही नामाभिधाने प्रेमाने बहाल केली, त्यांनी खामगावच्या अमृतनगर भागात स्थापन केलेले ‘बरसाना’ मंदिर आज हजारो भाविकांसाठी चैतन्याचे ऊर्जापीठ ठरले आहे. या परिसरात प्रवेश करताच जाणवणारी शांतता ही काकांच्या प्रदीर्घ तपस्येचे आणि सात्त्विकतेचे जिवंत प्रमाण मानली जाते.
काकांचा कौटुंबिक वारसा पाहिला तर त्यांचे मूळ कोकणात आढळते. तिथून त्यांचे पणजोबा भिकाजीपंत व्यवसायानिमित्त साधारण १८८४ च्या सुमारास विदर्भातील हिंगणघाट येथे स्थायिक झाले. बुद्धिमत्ता आणि समाजसेवेची शिदोरी त्यांना त्यांचे आजोबा मोरेश्वर आगाशे यांच्याकडून मिळाली. मोरेश्वरपंत त्या काळी उच्चशिक्षित होते आणि सार्वजनिक कार्यात नेहमी अग्रभागी असत. रावसाहेब आगाशे आणि आई अक्का यांच्या पोटी १८ ऑगस्ट १९३१ रोजी नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर काकांचा जन्म झाला. नागपंचमी ही तिथी आध्यात्मिक दृष्ट्या गुरुतत्वाशी आणि कुंडलिनी शक्तीशी जोडलेली असल्याने काकांचा जन्म हा एका दैवी कार्याचा संकेतच होता, असे मानले जाते.
काकांचे बालपण वर्ध्यातील एका वाड्यात गेले. तेथील श्रीदत्त, श्रीराम आणि गणपती मंदिरांच्या सान्निध्यात त्यांच्यावर भक्तीचे संस्कार झाले. त्यांच्या मातोश्रींनी त्यांच्यावर जाणीवपूर्वक समतेचे संस्कार केले होते. त्यामुळे त्याकाळी समाजात भेदभाव असतानाही आगाशे यांच्या घरात सर्वांना सारखीच मायेची वागणूक मिळे. याच संस्कारांनी पुढे काकांच्या ‘माऊली’ या रूपाची घडण केली. शालेय शिक्षणानंतर अध्यात्मिक क्षेत्राकडे वळलेल्या काकांनी २००५ मध्ये खामगाव येथे ‘बरसाना’ची निर्मिती केली. उत्तर प्रदेशातील राधाराणीचे जन्मस्थान असलेल्या मूळ ‘बरसाना’प्रमाणेच खामगावचे हे स्थानही भक्ती आणि प्रेमाचा वर्षाव करणारे ठरावे, अशी त्यांची संकल्पना होती. जरी हे स्थान सपाट भूभागावर असले, तरी तेथील आध्यात्मिक स्पंदने एखाद्या पर्वतशिखरावरील पवित्र तीर्थक्षेत्रासारखीच प्रबळ असल्याचे भाविक सांगतात.
आगाशे काकांच्या जीवनाशी अनेक अलौकिक आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत. त्यापैकी प्रत्यक्ष श्रीकृष्णाने त्यांच्या हातून भोजन ग्रहण केल्याची कथा भक्तांमध्ये अत्यंत श्रद्धेने सांगितली जाते. त्यांचे आणि त्यांचे सद्गुरू इंदूरचे प.पू. नाना महाराज तराणेकर यांचे नाते तर पूर्वजन्मीचे संकेत देणारे होते; कारण या गुरु-शिष्यांचा जन्म एकाच तिथीला म्हणजेच नागपंचमीला झाला होता. काकांनी आपली संपूर्ण हयात सद्गुरूंच्या सेवेत अर्पण केली आणि त्यांचा हा अधिकार पाहूनच नाना महाराजांनी त्यांना आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून आशीर्वाद दिला होता. आध्यात्मिक प्रगतीसोबतच काकांनी साहित्याच्या माध्यमातून ‘सोऽहं’ साधना आणि नामस्मरणाचा सोपा मार्ग जनसामान्यांसाठी खुला केला. ‘अमृतवाणी’, ‘दास तरंग’ आणि ‘मार्तंड स्तवन’ यांसारख्या त्यांच्या साहित्यातून आजही ते भक्तांशी संवाद साधत असल्याचे जाणवते.
काकांचे व्यक्तिमत्व केवळ आध्यात्मिक गुरूंपुरते मर्यादित नव्हते, तर ते एक द्रष्टे समाजसुधारकही होते. त्यांनी तरुणांना व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मोठे कार्य केले आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांना आधुनिक संगणक प्रशिक्षणासाठी आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले. प्रसिद्धीची कोणतीही हाव न धरता गरिबांना अन्न-धान्य आणि गरजूंना उद्योगासाठी मदत करणे हा त्यांच्या दैनिंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होता. १५ सप्टेंबर २००८ रोजी त्यांनी महासमाधी घेतली असली, तरी ‘सद्गुरू सेवा मंडळ’ आजही त्यांचा वारसा अखंडपणे चालवत आहे. गेल्या २३ वर्षांपासून खामगाव ते कारंजा लाड अशी निघणारी पायदळ पालखी आणि काकांनी संपन्न केलेले ४१ मोठे यज्ञ हे त्यांच्या कार्याची व्यापकता दर्शवतात. संकटाच्या काळात स्मरण करताच धावून येणारी त्यांची ‘स्मर्तुगामी’ शक्ती आजही जीवनात आधार आणि शांती प्रदान करते, अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे.
खामगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अमृतनगर परिसरात असलेल्या या मंदिराभोवती आवारभिंत आहे. या आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील सभामंडपात भाविकांकडून ‘सोऽहं’ साधना व ग्रंथांचे पारायण केले जाते. गर्भगृहात समोर आगाशे काकांच्या पादुका व त्यापुढे त्यांचे समाधी स्थान आहे. या समाधी स्थानाच्या चौथऱ्याच्या मागील बाजूस असलेल्या संगमरवरी मखरात मध्यभागी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे. श्रीकृष्ण मूर्तीच्या दोन्ही बाजूंना श्री अरविंद आगाशे काका (काका माऊली) आणि त्यांचे सद्गुरू प.पू. नाना महाराज तराणेकर यांच्या मूर्ती आहेत.
श्रीक्षेत्र बरसाना स्थित प.पू. श्री कृष्णदास काका माऊली समाधी सेवा मंडळाच्या माध्यमातून वर्षभर विविध आध्यात्मिक आणि धार्मिक उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरे केले जातात. यामध्ये चैत्र वद्य दशमीला प.पू. नाना महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा, ज्येष्ठ वद्य पंचमीला प.पू. काका माऊली समाधी प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिन, आषाढ शुद्ध प्रतिपदेला प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची पुण्यतिथी आणि आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमेचा उत्सव संपन्न होतो. श्रावण शुद्ध पंचमीला प.पू. नाना महाराज व प.पू. श्री काका माऊली यांची संयुक्त जयंती साजरी केली जाते, तर श्रावण वद्य पंचमीला प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची जयंती साजरी होते. याच महिन्यात श्रावण वद्य अष्टमीला गोकुळाष्टमीचा मोठा उत्सव साजरा करून भाद्रपद वद्य प्रतिपदेला प.पू. श्री काका माऊली यांच्या पुण्यतिथीने वार्षिक महोत्सवांची सांगता होते. दररोज सकाळी ११ ते २ व सायंकाळी ७ ते ९ या काळात भाविकांसाठी महाप्रसाद दिला जातो. दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना या मंदिरात महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती:
खामगाव बस स्थानकापासून १.३ किमी अंतरावर
बुलडाणा येथून ५३ किमी अंतरावर
जिल्ह्यातील अनेक शहरांतून खामगावसाठी एसटीची सुविधा
Amrutnagar, Khamgaon, Taluka Khamgaon, District Buldhana
The sacred land of Vidarbha has been sanctified by the touch of the feet of many saints. In this very tradition, Khamgaon, a city in Buldhana district, has risen to prominence as an important pilgrimage site (Teerthakshetra) due to the spiritual eminence of ‘Agashe Kaka Mauli’. Shri Arvind Agashe Kaka, lovingly bestowed with the titles ‘Kaka Mauli’ or ‘Dattadas’ by his devotees, established the ‘Barsana’ temple in the Amrutnagar area of Khamgaon, which today serves as a vibrant source of spiritual energy for thousands of devotees. The profound peace experienced upon entering this precinct is considered a living testament to Kaka’s prolonged penance (tapasya) and purity (sattvikata).
Tracing Kaka’s family heritage, his roots are found in Konkan. From there, his great-grandfather, Bhikajipant, settled in Hinganghat, Vidarbha, around 1884 for business purposes. He inherited the legacy of intellect and social service from his grandfather, Moreshwar Agashe. Moreshwarpant was highly educated in those days and always at the forefront of public service. Kaka was born to Raosaheb Agashe and Mother Akka on the auspicious occasion of Nagpanchami, August 18, 1931. As Nagpanchami is spiritually connected with the principle of Guru (Gurutatva) and Kundalini Shakti, Kaka’s birth is believed to have been a divine indication of a sacred mission.
Kaka’s childhood was spent in a mansion in Wardha. In the vicinity of the Shri Datta, Shri Ram, and Ganapati temples there, he was imbued with devotional values. His mother consciously instilled in him the values of equality. Consequently, even when discrimination was prevalent in society, everyone received equal affection and treatment in the Agashe household. These very values later shaped Kaka into the ‘Mauli’ (motherly figure) he became. After completing his schooling, Kaka turned towards the spiritual path and established ‘Barsana’ in Khamgaon in 2005. His vision was that this place in Khamgaon, like the original ‘Barsana’ in Uttar Pradesh, the birthplace of Radharani, should also shower devotion and love. Although this place is on flat land, devotees say that its spiritual vibrations are as potent as those of a sacred pilgrimage site (Teerthakshetra) on a mountain peak.
Many extraordinary legends are associated with the life of Agashe Kaka. Among them, the story of Lord Shri Krishna Himself accepting food from his hands is narrated with immense faith by devotees. The relationship between him and his Sadguru, P.P. Nana Maharaj Taranekar of Indore, was indicative of past lives; for both this Guru and disciple were born on the same Tithi, Nagpanchami. Kaka dedicated his entire life to the service of his Sadguru, and witnessing his spiritual authority, Nana Maharaj blessed him as his spiritual successor. Along with spiritual progress, Kaka made the simple path of ‘So’ham’ Sadhana and Namasmaran accessible to the common people through his literature. Through his literary works like ‘Amrutvani’, ‘Das Tarang’, and ‘Martand Stavan’, it is felt that he continues to communicate with devotees even today.
Kaka’s personality was not limited to being a spiritual Guru; he was also a visionary social reformer. He did great work to free youth from the clutches of addiction and provided financial assistance for the education of poor students and their modern computer training. Providing food grains to the poor and assistance for entrepreneurship to the needy, without any desire for fame, was an integral part of his daily life. Although he attained Mahasamadhi on September 15, 2008, the ‘Sadguru Seva Mandal’ continues to uphold his legacy uninterruptedly even today. The pedestrian procession (Palakhi) from Khamgaon to Karanja Lad, which has been taking place for the past 23 years, and the 41 grand Yagnyas performed by Kaka, demonstrate the vastness of his work. Many devotees believe that his ‘Smrutugami’ (one who comes to aid upon remembrance) power, which rushes to help when remembered in times of crisis, still provides support and peace in life.
This temple, located in the Amrutnagar area in the heart of Khamgaon city, is surrounded by a compound wall. Entry to the temple courtyard is through the entrance in this compound wall. The temple’s structure comprises a Sabhamandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). In the Sabhamandap here, devotees perform ‘So’ham’ Sadhana and recite scriptures. In front of the Garbhagriha are Agashe Kaka’s Padukas (footwear) and beyond them, his Samadhi Sthan (resting place). In the marble shrine behind the platform of this Samadhi Sthan, at the center, is an idol of Lord Shri Krishna. On both sides of the Shri Krishna idol are the idols of Shri Arvind Agashe Kaka (Kaka Mauli) and his Sadguru, P.P. Nana Maharaj Taranekar.
Throughout the year, various spiritual and religious festivals are celebrated with great devotion through the P.P. Shri Krishnadas Kaka Mauli Samadhi Seva Mandal, located at Shrikshetra Barsana. These include the Punyatithi (death anniversary) ceremony of P.P. Nana Maharaj on Chaitra Vadya Dashami, the Pranpratishtha Vardhapan Din (consecration anniversary) of P.P. Kaka Mauli Samadhi on Jyeshtha Vadya Panchami, the Punyatithi of P.P. Vasudevanand Saraswati Swami Maharaj on Ashadha Shuddha Pratipada, and the Guru Pournima festival on Ashadha Shuddha Pournima. On Shravan Shuddha Panchami, the joint Jayanti (birth anniversary) of P.P. Nana Maharaj and P.P. Shri Kaka Mauli is celebrated, while on Shravan Vadya Panchami, the Jayanti of P.P. Vasudevanand Saraswati Swami Maharaj is celebrated. In the same month, a grand Gokulashtami festival is celebrated on Shravan Vadya Ashtami, and the annual festivals conclude with the Punyatithi of P.P. Shri Kaka Mauli on Bhadrapada Vadya Pratipada. Mahaprasad is offered to devotees daily from 11 AM to 2 PM and from 7 PM to 9 PM. Devotees can have Darshan of Maharaj’s Samadhi Sthal in this temple daily from 6 AM to 12 PM and from 4 PM to 9 PM.
Useful Information:
1.3 km from Khamgaon Bus Stand
53 km from Buldhana
ST (State Transport) bus facility available to Khamgaon from many cities in the district
Private vehicles can reach the temple parking area
Many options for accommodation and breakfast in the vicinity
विदर्भ की पावन भूमि अनेक संतों के चरण-स्पर्श से पुनीत हुई है। इसी परंपरा में बुलडाणा जिले का खामगाँव शहर ‘आगाशे काका माऊली’ के आध्यात्मिक अधिकार के कारण एक महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र के रूप में प्रसिद्ध हुआ है। श्री अरविंद आगाशे काका, जिन्हें भक्तों ने प्रेम से ‘काका माऊली’ या ‘दत्तदास’ नाम दिए, उन्होंने खामगाँव के अमृतनगर क्षेत्र में स्थापित किया गया ‘बरसाना’ मंदिर आज हजारों श्रद्धालुओं के लिए चैतन्य का ऊर्जापीठ बन गया है। इस परिसर में प्रवेश करते ही अनुभव होने वाली शांति को काका की दीर्घ तपस्या और सात्त्विकता का जीवंत प्रमाण माना जाता है।
काका का पारिवारिक विरासत देखें तो उनका मूल कोकण में मिलता है। वहाँ से उनके परदादा भिकाजीपंत व्यवसाय के निमित्त लगभग १८८४ के आसपास विदर्भ के हिंगणघाट में बस गए। बुद्धिमत्ता और समाजसेवा की पूंजी उन्हें उनके दादा मोरेश्वर आगाशे से मिली। मोरेश्वरपंत उस समय उच्च शिक्षित थे और सार्वजनिक कार्यों में हमेशा अग्रणी रहते थे। रावसाहेब आगाशे और माता अक्का के यहाँ १८ अगस्त १९३१ को नागपंचमी के शुभ मुहूर्त पर काका का जन्म हुआ। नागपंचमी की यह तिथि आध्यात्मिक दृष्टि से गुरुतत्व और कुंडलिनी शक्ति से जुड़ी होने के कारण काका का जन्म एक दैवी कार्य का संकेत ही था, ऐसा माना जाता है।
काका का बचपन वर्धा के एक वाड़े में बीता। वहाँ के श्रीदत्त, श्रीराम और गणपति मंदिरों के सान्निध्य में उन पर भक्ति के संस्कार हुए। उनकी माताजी ने उन पर जानबूझकर समता के संस्कार डाले थे। इसलिए उस समय समाज में भेदभाव होने पर भी आगाशे के घर में सभी को समान प्रेमपूर्ण व्यवहार मिलता था। इन्हीं संस्कारों ने आगे चलकर काका के ‘माऊली’ रूप को गढ़ा। स्कूली शिक्षा के बाद आध्यात्मिक क्षेत्र की ओर मुड़े काका ने २००५ में खामगाँव में ‘बरसाना’ की स्थापना की। उत्तर प्रदेश में राधारानी के जन्मस्थान मूल ‘बरसाना’ की तरह ही खामगाँव का यह स्थान भी भक्ति और प्रेम की वर्षा करने वाला सिद्ध हो, ऐसी उनकी संकल्पना थी। यद्यपि यह स्थान समतल भूमि पर है, फिर भी वहाँ की आध्यात्मिक स्पंदन किसी पर्वत शिखर पर स्थित पवित्र तीर्थक्षेत्र के समान ही प्रबल हैं, ऐसा श्रद्धालु बताते हैं।
आगाशे काका के जीवन से अनेक अलौकिक आख्यायिकाएँ जुड़ी हुई हैं। उनमें से प्रत्यक्ष श्रीकृष्ण ने उनके हाथों से भोजन ग्रहण किया, यह कथा भक्तों में अत्यंत श्रद्धा से सुनाई जाती है। उनका और उनके सद्गुरु इंदौर के प.पू. नाना महाराज तराणेकर का संबंध तो पूर्वजन्म का संकेत देने वाला था; क्योंकि इन गुरु-शिष्यों का जन्म एक ही तिथि को अर्थात् नागपंचमी को हुआ था। काका ने अपना संपूर्ण जीवन सद्गुरु की सेवा में अर्पित कर दिया और उनका यह अधिकार देखकर ही नाना महाराज ने उन्हें आध्यात्मिक उत्तराधिकारी के रूप में आशीर्वाद दिया था। आध्यात्मिक प्रगति के साथ-साथ काका ने साहित्य के माध्यम से ‘सोऽहं’ साधना और नामस्मरण का सरल मार्ग जनसामान्य के लिए खोला। ‘अमृतवाणी’, ‘दास तरंग’ और ‘मार्तंड स्तवन’ जैसे उनके साहित्य से आज भी वे भक्तों से संवाद करते हुए प्रतीत होते हैं।
काका का व्यक्तित्व केवल आध्यात्मिक गुरु तक सीमित नहीं था, बल्कि वे एक दूरदर्शी समाज सुधारक भी थे। उन्होंने युवाओं को व्यसनों के चंगुल से बाहर निकालने के लिए बड़ा कार्य किया और गरीब छात्रों की शिक्षा के लिए तथा उन्हें आधुनिक कंप्यूटर प्रशिक्षण के लिए आर्थिक सहायता उपलब्ध कराई। प्रसिद्धि की कोई लालसा न रखते हुए गरीबों को अन्न-धान्य और जरूरतमंदों को उद्योग के लिए मदद करना उनके दैनिक जीवन का अविभाज्य अंग था। १५ सितंबर २००८ को उन्होंने महासमाधि ली, फिर भी ‘सद्गुरू सेवा मंडल’ आज भी उनकी विरासत को अखंड रूप से चला रहा है। पिछले २३ वर्षों से खामगाँव से कारंजा लाड तक निकलने वाली पैदल पालकी और काका द्वारा संपन्न किए गए ४१ बड़े यज्ञ उनके कार्य की व्यापकता दर्शाते हैं। संकट के समय स्मरण करते ही दौड़कर आने वाली उनकी ‘स्मर्तुगामी’ शक्ति आज भी जीवन में आधार और शांति प्रदान करती है, ऐसी अनेक श्रद्धालुओं की श्रद्धा है।
खामगाँव शहर के मध्यवर्ती स्थान अमृतनगर परिसर में स्थित इस मंदिर के चारों ओर एक चारदीवारी है। इस चारदीवारी के प्रवेश द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। सभामंडप और गर्भगृह ऐसी इस मंदिर की संरचना है। यहाँ के सभामंडप में श्रद्धालुओं द्वारा ‘सोऽहं’ साधना और ग्रंथों का पारायण किया जाता है। गर्भगृह में सामने आगाशे काका की पादुकाएँ और उसके आगे उनका समाधि स्थान है। इस समाधि स्थान के चबूतरे के पीछे की ओर स्थित संगमरमरी मखर में मध्य में भगवान श्रीकृष्ण की मूर्ति है। श्रीकृष्ण मूर्ति के दोनों ओर श्री अरविंद आगाशे काका (काका माऊली) और उनके सद्गुरु प.पू. नाना महाराज तराणेकर की मूर्तियाँ हैं।
श्रीक्षेत्र बरसाना स्थित प.पू. श्री कृष्णदास काका माऊली समाधि सेवा मंडल के माध्यम से वर्ष भर विभिन्न आध्यात्मिक और धार्मिक उत्सव बड़े भक्तिभाव से मनाए जाते हैं। इनमें चैत्र वद्य दशमी को प.पू. नाना महाराज का पुण्यतिथि समारोह, ज्येष्ठ वद्य पंचमी को प.पू. काका माऊली समाधि प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिन, आषाढ़ शुद्ध प्रतिपदा को प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की पुण्यतिथि और आषाढ़ शुद्ध पूर्णिमा को गुरुपूर्णिमा का उत्सव संपन्न होता है। श्रावण शुद्ध पंचमी को प.पू. नाना महाराज व प.पू. श्री काका माऊली की संयुक्त जयंती मनाई जाती है, जबकि श्रावण वद्य पंचमी को प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जयंती मनाई जाती है। इसी महीने में श्रावण वद्य अष्टमी को गोकुलाष्टमी का बड़ा उत्सव मनाकर भाद्रपद वद्य प्रतिपदा को प.पू. श्री काका माऊली की पुण्यतिथि के साथ वार्षिक महोत्सवों का समापन होता है। प्रतिदिन सुबह ११ से २ और शाम ७ से ९ बजे के दौरान श्रद्धालुओं के लिए महाप्रसाद दिया जाता है। प्रतिदिन सुबह ६ से दोपहर १२ और शाम ४ से रात ९ बजे तक श्रद्धालु इस मंदिर में महाराजा के समाधि स्थल के दर्शन कर सकते हैं।
उपयोगी जानकारी:
खामगाँव बस स्टैंड से १.३ किमी की दूरी पर
बुलडाणा से ५३ किमी की दूरी पर
जिले के अनेक शहरों से खामगाँव के लिए एसटी (बस) की सुविधा