खामगावमधील सराफा बाजार परिसरातील ‘अय्याची कोठी’ भागात वसलेले मानाचे लाकडी गणपती मंदिर हे शहराचे आराध्यदैवत आहे. आंध्र प्रदेशातून येथे स्थायिक झालेल्या अय्या (आचारी) लोकांनी १३० वर्षांपूर्वी सहा फूट उंचीच्या या लाकडी मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे सांगण्यात येते. हे मंदिर असलेला भागही ‘अय्याची कोठी’ म्हणून प्रसिद्ध आहे. नवसाला पावणाऱ्या या गणेशाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह, गुजरात, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातूनही अनेक भाविक येतात. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवादरम्यान या मूर्तीची पूजा झाल्याशिवाय शहरातील अन्य सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत नाही. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीतही या मूर्तीचा मान पहिला असतो; मात्र या मूर्तीचे कधीही विसर्जन केले जात नाही.
खामगाव शहरात पूर्वी कापसाची मोठी बाजारपेठ होती. दूरदूरचे कापूस व्यापारी येथे कापूस खरेदीसाठी येत. याच काळात आंध्र प्रदेशमधून अनेक अय्या (आचारी) उदरनिर्वाहासाठी या परिसरात स्थायिक झाले. त्यांनी खास लाकडापासून गणेशाची मूर्ती घडवून घेतली आणि त्यानंतर सराफा बाजार परिसरात या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या परिसरात त्या काळात अय्या लोकांची मोठी वस्ती असल्याने या भागाला ‘अय्याची कोठी’ असे नाव पडले. अन्य एका आख्यायिकेनुसार, १३० वर्षांपूर्वी शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या बोर्डी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात लाकडाचा मोठा ओंडका वाहत आला. त्याचा आकार हुबेहूब गणेशाच्या मूर्तीसारखा जाणवल्याने ग्रामस्थांनी तो पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
पूर्वी एका चबुतऱ्यावर ही मूर्ती विराजमान होती. खामगावमधील स्थानिक मंडळी सुरुवातीला या मूर्तीची पूजा-अर्चा करत असत. १९६० च्या दशकात काही समाजकंटकांनी या मूर्तीची विटंबना करण्याचाही प्रयत्न केला होता. १९५७ मध्ये खामगावमधील अडते मेसर्स जयनारायण नंदलाल जोशी यांच्या पुढाकाराने मंदिराच्या विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली. शहरातील बालाभगत अग्रवाल यांनी या मंदिरासाठी जागा दिली. सुरुवातीला या मंदिराचे स्वरूप छोटेखानी होते. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने १९९७ मध्ये या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार केला. सप्टेंबर २०२५ मध्ये या मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
मंदिराच्या कमानीपासून काही अंतरावर हे मंदिर आहे. दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराच्या देखण्या वास्तूची संरचना आहे. मुखमंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना गजराजांची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या स्तंभांवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. गर्भगृहात संगमरवरी मखरात चांदीच्या पाटावर गणेशाची लाकडी मूर्ती विराजमान आहे. मूळच्या लाकडी मूर्तीवर शेंदरी रंग देण्यात आला आहे. मूर्तीच्या उजवीकडील वरच्या हातात परशू आहे आणि खालील हात आशीर्वाद मुद्रेत आहे. डावीकडील वरच्या हातात पाश तर खालील हातात मोदक आहे. हात, कान आणि सोंडेच्या मधल्या भागावर चांदीचे आवरण आहे. मुकुट तसेच मूर्तीमागील प्रभावळही चांदीची आहे. मूर्तीच्या अंगावरही चांदीचे दागिने आहेत. मूर्तीच्या उजवीकडे मूषक आहे. मूर्ती असलेल्या पाटाच्या डाव्या बाजूस चांदीचा मूषक आहे. पीठासनाच्या खालील भागात दोन्ही बाजूंना गजराज आहेत आणि मध्यभागी कमळ आहे.
ही मूर्ती जागृत असल्याने तिच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात, या श्रद्धेमुळे अनेक भाविक दर्शनासाठी येथे येतात. मंगळवार, संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिर गजबजलेले असते. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवादरम्यान या मूर्तीची पूजा झाल्याशिवाय शहरातील अन्य मंडळांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जात नाही. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत येथील गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. या कालावधीत मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव बदलत असल्याचे काही भाविक सांगतात. या उत्सवादरम्यान येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश, मराठवाडा, मुंबई आणि पुण्यातील शेकडो भाविक या उत्सवादरम्यान येथे दर्शनासाठी येतात. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात आदी राज्यांतील भाविकांची संख्याही मोठी असते.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीतही या मूर्तीचा मान पहिला असतो. ही मूर्ती निघाल्याशिवाय शहरातील या मिरवणुकीला सुरुवात होत नाही. मिरवणुकीपूर्वी ‘अय्याची कोठी’ येथे मानाच्या लाकडी गणपतीची आरती करण्यात येते. बैलगाडीतून मूर्तीची मिरवणूक निघते. मात्र या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही; केवळ मूर्ती हलवून प्रतीकात्मक विसर्जन केले जाते. मिरवणुकीनंतर मूर्ती पुन्हा मंदिरात आणली जाते.
उपयुक्त माहिती:
खामगाव बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
बुलडाणा येथून ५१ किमी अंतरावर
जिल्ह्यातील अनेक शहरांतून खामगावसाठी एसटीची सुविधा
खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
संपर्क : सुरज अग्रवाल, अध्यक्ष, मो. ९४२२१८१८७९,
धनंजय भेरडे, उपाध्यक्ष, मो. ९४२२८८३०४९
The revered Wooden Ganapati
Ayya’s Kothi, Khamgaon, Taluka Khamgaon, District Buldhana
The revered Wooden Ganapati Temple, situated in the ‘Ayya’s Kothi’ area near the Sarafa Bazaar in Khamgaon, is the presiding deity of the city. It is said that the Ayya (cook) community, who settled here from Andhra Pradesh, consecrated this six-foot-tall wooden idol 130 years ago. The area where this temple is located is also renowned as ‘Ayya’s Kothi’. Devotees from Maharashtra, as well as Gujarat, Andhra Pradesh, Chhattisgarh, and Madhya Pradesh, come to seek the darshan of this wish-fulfilling Ganesha. During the Ganesh Utsav in the month of Bhadrapada, the consecration (Pranpratishtha) of idols by other public mandals in the city is not performed until this idol is worshipped first. On the day of Anant Chaturdashi, this idol holds the foremost honor in the immersion procession; however, this idol itself is never immersed.
In the past, Khamgaon city was a major cotton market. Cotton traders from far and wide used to come here to purchase cotton. During this period, many Ayya (cook) people from Andhra Pradesh settled in this area for their livelihood. They had an idol of Ganesha carved from special wood and subsequently consecrated it in the Sarafa Bazaar area. As there was a large settlement of Ayya people in this area during that time, this locality came to be known as ‘Ayya’s Kothi’. According to another legend, 130 years ago, a large wooden log floated in the floodwaters of the Bordi River, which flows through the central part of the city. As its shape remarkably resembled an idol of Ganesha, the villagers retrieved it from the water. Subsequently, this idol was consecrated.
Previously, this idol was enshrined on a simple platform (chabutra). Initially, local residents of Khamgaon performed the worship and rituals for this idol. In the 1960s, some miscreants even attempted to desecrate this idol. In 1957, under the initiative of Messrs. Jaynarayan Nandlal Joshi, a commission agent from Khamgaon, the temple’s Trust Board was established. Balabhagat Agrawal of the city donated land for this temple. Initially, the temple was modest in size. The temple’s Trust Board undertook the first renovation of this temple in 1997. In September 2025, this temple has been newly renovated.
The temple is situated a short distance from the temple archway. The beautiful temple architecture comprises a Darshan Mandap (viewing hall), a Sabha Mandap (assembly hall), and a Garbhagriha (sanctum sanctorum). On both sides of the entrance to the Mukhmandap (front hall), there are sculptures of majestic elephants (Gajraj). The pillars at the entrance feature distinctive artistry. Within the Garbhagriha, the wooden idol of Ganesha is enshrined on a silver pedestal (pat) within a marble makhar (altar). The original wooden idol is adorned with vermillion (shendur) color. In the upper right hand of the idol, there is a parashu (axe), and the lower hand is in the posture of blessing (Ashirwad Mudra). In the upper left hand, there is a pasha (noose), and in the lower hand, a modak. The hands, ears, and the middle part of the trunk are covered with silver plating. The crown and the prabhaval (halo) behind the idol are also made of silver. The idol is also adorned with silver ornaments. To the right of the idol is a Mushak (mouse, Ganesha’s vehicle). To the left of the pedestal where the idol is seated, there is a silver Mushak. In the lower part of the peethasana (seat), there are Gajraj (elephants) on both sides, and a lotus in the center.
As this idol is considered ‘awakened’ (Jagrut), many devotees come here for darshan with the faith that all their wishes are fulfilled by its sight. On Tuesdays, Sankashti Chaturthi, and Angarki Chaturthi, the temple is bustling with devotees coming for darshan. During the Ganesh Utsav in the month of Bhadrapada, the Pranpratishtha (consecration) of idols by other mandals in the city is not performed until this idol is worshipped first. From Ganesh Chaturthi to Anant Chaturdashi, long queues of devotees form for the darshan of Ganesha here. Some devotees say that during this period, the expressions on the idol’s face appear to change. During this festival, various religious programs are organized here. Hundreds of devotees from Vidarbha, Khandesh, Marathwada, Mumbai, and Pune in Maharashtra come here for darshan during this festival. The number of devotees from states like Andhra Pradesh, Madhya Pradesh, Chhattisgarh, and Gujarat is also significant.
On the day of Anant Chaturdashi, this idol holds the foremost honor in the immersion procession. The procession in the city does not commence until this idol sets out. Before the procession, the Aarti of the revered Wooden Ganapati is performed at ‘Ayya’s Kothi’. The idol’s procession proceeds on a bullock cart. However, this idol is not immersed; only a symbolic immersion is performed by moving the idol. After the procession, the idol is brought back to the temple.
Useful Information:
1.5 km from Khamgaon Bus Stand
51 km from Buldhana
ST (State Transport) bus facility to Khamgaon from many cities in the district
Private vehicles can reach the temple
Many options for accommodation and breakfast in the vicinity
खामगाँव के सराफा बाजार क्षेत्र में स्थित ‘अय्या की कोठी’ नामक स्थान पर विराजमान यह मान्यवर काष्ठ गणपति मंदिर शहर का आराध्यदेव है। कहा जाता है कि आंध्र प्रदेश से यहाँ आकर बसे अय्या (रसोइया) लोगों ने १३० वर्ष पूर्व छह फुट ऊँची इस काष्ठ प्रतिमा की प्रतिष्ठापना की थी। यह मंदिर जिस क्षेत्र में स्थित है, वह भी ‘अय्या की कोठी’ के नाम से प्रसिद्ध है। मनोकामना पूर्ण करने वाले इस गणेश जी के दर्शनों हेतु महाराष्ट्र के साथ-साथ गुजरात, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ़ और मध्य प्रदेश से भी अनेक श्रद्धालु आते हैं। भाद्रपद मास में गणेशोत्सव के दौरान इस प्रतिमा की पूजा हुए बिना शहर के अन्य सार्वजनिक मंडलों की प्रतिमाओं की प्राणप्रतिष्ठा नहीं की जाती है। अनंत चतुर्दशी के दिन विसर्जन शोभायात्रा में भी इस प्रतिमा को प्रथम मान प्राप्त होता है; किंतु इस प्रतिमा का कभी भी विसर्जन नहीं किया जाता है।
खामगाँव शहर में पूर्व में कपास का एक बड़ा बाजार था। दूर-दूर से कपास व्यापारी यहाँ कपास खरीदने आते थे। इसी काल में आंध्र प्रदेश से अनेक अय्या (रसोइया) अपनी आजीविका हेतु इस क्षेत्र में आकर बस गए। उन्होंने विशेष काष्ठ से गणेश जी की प्रतिमा बनवाई और उसके उपरांत सराफा बाजार क्षेत्र में इस प्रतिमा की प्रतिष्ठापना की। इस क्षेत्र में उस समय अय्या लोगों की बड़ी बस्ती होने के कारण इस स्थान का नाम ‘अय्या की कोठी’ पड़ा। एक अन्य किंवदंती के अनुसार, १३० वर्ष पूर्व शहर के मध्य से बहने वाली बोर्डी नदी में आई बाढ़ के पानी में लकड़ी का एक बड़ा लट्ठा बहकर आया। उसका आकार हूबहू गणेश जी की प्रतिमा जैसा प्रतीत होने पर ग्रामवासियों ने उसे पानी से बाहर निकाला। तत्पश्चात इस प्रतिमा की प्रतिष्ठापना की गई।
पूर्व में यह प्रतिमा एक चबूतरे पर विराजमान थी। खामगाँव के स्थानीय लोग प्रारंभ में इस प्रतिमा की पूजा-अर्चना करते थे। १९६० के दशक में कुछ समाजकंटकों ने इस प्रतिमा का विटंबन करने का भी प्रयास किया था। १९५७ में खामगाँव के आढ़ती मेसर्स जयनारायण नंदलाल जोशी की पहल पर मंदिर के न्यासी मंडल की स्थापना की गई। शहर के बालाभगत अग्रवाल ने इस मंदिर के लिए भूमि दान की। प्रारंभ में इस मंदिर का स्वरूप छोटा था। मंदिर के न्यासी मंडल ने १९९७ में इस मंदिर का प्रथम जीर्णोद्धार किया। सितंबर २०२५ में इस मंदिर का नवीन जीर्णोद्धार किया गया है।
मंदिर की कमान से कुछ दूरी पर यह मंदिर स्थित है। दर्शनमंडप, सभामंडप और गर्भगृह जैसी मंदिर की भव्य वास्तुकला संरचना है। मुखमंडप के प्रवेश द्वार के दोनों ओर गजराजों की प्रतिमाएँ हैं। प्रवेश द्वार के स्तंभों पर विशिष्ट कलाकृति है। गर्भगृह में संगमरमरी मखर में चांदी के आसन पर गणेश जी की काष्ठ प्रतिमा विराजमान है। मूल काष्ठ प्रतिमा पर सिंदूरी रंग चढ़ाया गया है। प्रतिमा के दाहिने ऊपरी हाथ में परशु है और निचला हाथ आशीर्वाद मुद्रा में है। बाएँ ऊपरी हाथ में पाश तथा निचले हाथ में मोदक है। हाथ, कान और सूंड के मध्य भाग पर चांदी का आवरण है। मुकुट तथा प्रतिमा के पीछे की प्रभावलय भी चांदी की है। प्रतिमा के शरीर पर भी चांदी के आभूषण हैं। प्रतिमा के दाहिनी ओर मूषक है। प्रतिमा वाले आसन के बाईं ओर चांदी का मूषक है। पीठासन के निचले भाग में दोनों ओर गजराज हैं और मध्य में कमल है।
यह प्रतिमा जागृत होने के कारण इसके दर्शन से सभी मनोकामनाएँ पूर्ण होती हैं, इस श्रद्धा के साथ अनेक श्रद्धालु दर्शन हेतु यहाँ आते हैं। मंगलवार, संकष्टी चतुर्थी और अंगारकी चतुर्थी को दर्शनों के लिए आने वाले श्रद्धालुओं से मंदिर भरा रहता है। भाद्रपद मास में गणेशोत्सव के दौरान इस प्रतिमा की पूजा हुए बिना शहर के अन्य मंडलों की प्रतिमाओं की प्राणप्रतिष्ठा नहीं की जाती है। गणेश चतुर्थी से अनंत चतुर्दशी तक यहाँ के गणेश जी के दर्शनों हेतु श्रद्धालुओं की कतारें लगती हैं। इस अवधि में प्रतिमा के मुख के भाव बदलते हुए प्रतीत होते हैं, ऐसा कुछ श्रद्धालु बताते हैं। इस उत्सव के दौरान यहाँ विभिन्न धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। महाराष्ट्र के विदर्भ, खानदेश, मराठवाड़ा, मुंबई और पुणे से सैकड़ों श्रद्धालु इस उत्सव के दौरान यहाँ दर्शनों हेतु आते हैं। आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ और गुजरात आदि राज्यों से भी श्रद्धालुओं की संख्या अधिक होती है।
अनंत चतुर्दशी के दिन विसर्जन शोभायात्रा में भी इस प्रतिमा को प्रथम मान प्राप्त होता है। यह प्रतिमा निकले बिना शहर की इस शोभायात्रा का आरंभ नहीं होता है। शोभायात्रा से पूर्व ‘अय्या की कोठी’ में मान्यवर काष्ठ गणपति की आरती की जाती है। बैलगाड़ी से प्रतिमा की शोभायात्रा निकलती है। किंतु इस प्रतिमा का विसर्जन नहीं किया जाता है; केवल प्रतिमा को हिलाकर प्रतीकात्मक विसर्जन किया जाता है। शोभायात्रा के उपरांत प्रतिमा पुनः मंदिर में लाई जाती है।
उपयोगी जानकारी:
खामगाँव बस स्थानक से १.५ किमी की दूरी पर
बुलढाणा से ५१ किमी की दूरी पर
जिले के अनेक शहरों से खामगाँव के लिए एसटी (राज्य परिवहन) की सुविधा उपलब्ध है।
निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं।
क्षेत्र में निवास एवं नाश्ते के लिए अनेक विकल्प उपलब्ध हैं।