नाटेश्वर मंदिर

नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी

कोकण हा जसा निसर्गसमृद्ध आहे, तसाच तो असंख्य चालीरीती, रूढीपरंपरा आणि विविध मंदिरांचाही प्रदेश आहे. येथील अनेक मंदिरे ही अगदी साधीसुधी कौलारू असली तरी त्यांचा इतिहास त्याच्याशी निगडित असलेल्या कथा या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. विविध राजवटींनी कोकणावर वेळोवेळी राज्य केले. त्या काळातील मंदिर स्थापत्य मूर्ती कोकणात आजही अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. याच मालिकेतील प्राचीन सुंदर असे खास कोकणी मंदिर म्हणजे राजापूर तालुक्यातील नाटे येथील नाटेश्वर मंदिर होय.

नाटेश्वर मंदिर हे . . १४२१ च्या आधीपासून अस्तित्वात होते, असे काही नोंदींवरून स्पष्ट होते. या मंदिराला सनद नसली तरी १४ रुपयांचे दस्त माफ असल्याची प्राचीन नोंद आहे. स्वयंभू जागृत असलेले नाटेश्वर देवस्थान हे नाटे गावचे ग्रामदैवत असून त्याची नवसाला पावणारा देव म्हणून सर्वत्र ख्याती आहे. त्यामुळे कोकणासह गोव्यातीलही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात. २००१ साली करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी या मंदिराला भेट दिली होती. कोकणातील प्राचीन प्रसिद्ध मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील लाकडी खांब त्यावर केलेले सुंदर कोरीवकाम आज ६०० वर्षांनंतरही सुस्थितीत असल्याचे पाहायला मिळते.

गावाच्या मध्यवर्ती परिसरात असलेले हे मंदिर रस्त्याला लागून आहे. मंदिराचे प्रांगण रस्त्यापासून पाच ते सहा फूट उंचीवर आहे. प्रवेशद्वाराजवळ मारुतीचे मंदिर त्याशेजारी सारख्याच उंचीच्या असलेल्या जांभ्या दगडाच्या सात दीपमाळा आहेत. येथून सुमारे दहा पायऱ्या चढून मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते. येथील प्रवेशद्वार हे दुमजली असून वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी प्रवेशद्वारातूनच पायऱ्या आहेत. कमानीसदृश्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या चोहोबाजूला जांभ्या दगडांची तटबंदी प्रांगणात सर्वत्र फरसबंदी आहे. संपूर्ण मंदिराच्या बांधकामात लाकडांचा जास्त वापर केल्याचे जाणवते.

मंदिराची रचना दोन सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर डावीकडील सभामंडपात श्रीराम, लक्ष्मण सीता यांच्या संगमरवरी मूर्ती शेजारी हनुमानाची मूर्ती आहे. या मूर्ती काही वर्षांपूर्वी नव्याने येथे बसविलेल्या आहेत. हा सभामंडप अर्धमंडप प्रकारातील असून बाजूने भाविकांना बसण्यासाठी दोन फूट उंचीची कक्षासने आहेत. सभामंडपात १२ लाकडी खांब त्यावर कौले आहेत. दुसरा सभामंडप उजवीकडे काहीसा उंचावर आहे. या सभामंडपात सहा मोठे लाकडी खांब आहेत, ते खालील बाजूस चौकोनी, मध्यभागी गोलाकार वरील बाजूस चौकोनी आहेत. या खांबांवरील तुळयांवर केलेले कोरीव काम अजूनही स्पष्टपणे पाहता येते. त्याच्या वरच्या बाजूला लाकडी छत आहे. हा सभामंडपही अर्धमंडप प्रकारचा असून त्याच्या बाजूनेही दोन फूट उंचीची कक्षासने आहेत.

अंतराळात चार मोठे लाकडी खांब गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर अखंड दगडातील नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाबाहेरील देवडीमध्ये गणेशाची काळ्या पाषाणातील प्राचीन मूर्ती आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती खालील बाजूस कीर्तिमुख आहे. कोकणात सर्वत्र जांभा दगड असूनही येथील गणेशमूर्ती गर्भगृहातील प्राचीन शिवपिंडी मात्र काळ्या पाषाणातील आहेत. गर्भगृह लहान असून त्याला घुमटाकार छत आहे. त्यावर चौकोनी, शंकूच्या आकाराचे शिखर आहे. येथील शिवपिंडीबाबत अशी आख्यायिका आहे की येथील कलव आडनावाच्या माणसाची गाय घरी दूध देत नसे. त्यामुळे ही गाय का दूध देत नाही हे पाहण्यासाठी गुराख्याने त्या गायीवर पाळत ठेवली. तेव्हा रानातील एका जागेवर ही गाय पान्हा सोडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. ही गोष्ट जेव्हा त्याने मालकाला सांगितली, तेव्हा त्यांनी येऊन पाहिले असता ही शिवपिंडी आढळली. तेव्हापासून नाटे गावातील देव म्हणून या देवाचे नाटेश्वर हे नाव प्रचलित झाले.

या मंदिरात महाशिवरात्रीच्या उत्सवापेक्षा त्रिपुरारी पौर्णिमेला मोठा उत्सव साजरा केला जातो. दशमी ते पौर्णिमा असा सहा दिवसांचा हा उत्सव साजरा केला जातो. प्रतिपदेला या उत्सवाची समाप्ती होते. महाशिवरात्रीचा उत्सव येथे पूर्वी एक दिवसाचा होता, तोठाकुरांचा उत्सवम्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून हाच उत्सव आता तीन दिवस साजरा केला जातो. नाटेश्वराच्या मंदिराशिवाय नाटे येथे श्रीनवलाईदेवी, गणपती, जुगाई भराडीन देवी अशी मंदिरे आहेत.

उपयुक्त माहिती:

  • राजापूरपासून २६ किमी, तर रत्नागिरीपासून ५३ किमी अंतरावर
  • राजापूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : हरी ठाकूर, अध्यक्ष, मो. ९४२१६०७१५४
Back To Home