गणपतीपुळे मंदिर

गणपतीपुळे, ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील गणपती मंदिर हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अष्टविनायकांप्रमाणे हे देवस्थान स्वयंभू जागृत म्हणून प्रसिद्ध आहे. हे क्षेत्र कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरील पश्चिमद्वार देवता म्हणूनही ओळखले जाते. पश्चिमेकडे असणारा अथांग समुद्र पूर्वेकडे हिरव्या गर्द डोंगराच्या पायथ्याशी निसर्गसमृद्ध परिसरात हे देवस्थान स्थित आहे. मंदिराला ४०० वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. या स्थानाचा मुद्‌गलपुराणातही उल्लेख आहे. मंदिर समितीने दिलेल्या माहितीनुसार गणपतीच्या दर्शनासाठी दरवर्षी १८ ते २० लाख भाविक येतात.

मंदिराची अख्यायिका अशी की आज जिथे स्वयंभू गणेश मंदिर आहे, त्या गावात ४०० वर्षांपूर्वी मुघल सत्तेच्या काळात त्र्यंबकभट भिडे हे ब्राह्मण राहत होते. गावचे ते खोत होते. एकदा त्यांच्यावर संकट आले. ‘हे संकट हरले, तरच अन्नग्रहण करीन’, अशी प्रतिज्ञा घेऊन त्यांनी गणपतीची उपासना करण्यासाठी येथील केवड्याच्या बनात मुक्काम केला. एके दिवशी बाळंभटांना गणपतीने दृष्टांत दिला की मी या ठिकाणी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणेशगुळे येथून दोन गंडस्थळे दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरूप येथील टेकडी आहे. माझी पूजा कर, तुझे संकट दूर होईल.

दृष्टांतानुसार त्र्यंबकभट यांनी तत्काळ सर्व परिसराची स्वच्छता केली. त्यावेळी स्वप्नात दिसलेली गणपतीची मूर्ती त्यांना येथे आढळली. या मूर्तीच्या भोवताली त्यांनी गवताचे छप्पर घालून लहानसे मंदिर उभारले. तेव्हापासून येथे गणपतीची पूजा सुरू झाली. आजही गणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या त्र्यंबकभट भिडे यांच्या समाधीचे भाविकांकडून प्रथम दर्शन घेतले जाते. किनाऱ्यावरील परिसर असल्यामुळे येथील बराचसा भाग पुळणवट म्हणजे समुद्राच्या वाळूचा आहे. या पुळणावर गणपती प्रकट झाला म्हणून या गावास गणपतीपुळे असे म्हटले जाऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव अण्णाजी दत्तो यांनी या मंदिराची डागडुजी करून गवताच्या छपराच्या जागी घुमट बांधला. पुढे पेशव्यांचे सरदार गोविंदपंत बुंदेले यांनी मंदिरासमोर सभामंडप बांधला. नानासाहेब पेशव्यांनी नंदादीपाची व्यवस्था केली, तर माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाई यांनी धर्मशाळा बांधली. १९९८ ते २००३ या दरम्यान केलेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.

प्रथमदर्शनी हे मंदिर एकाच दगडातून कोरल्याचा भास होतो. ‘रेड आग्राया विशेष पाषाणातून मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. मंदिराच्या दक्षिण उत्तरेकडे प्रत्येकी पाच दीपमाळा आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेला त्यावर दिवे प्रज्वलित केले जातात, तेव्हा मंदिराचे सौंदर्य आणखी खुलते. मंदिराच्या प्रांगणात दर्शन रांगेची व्यवस्था आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ हातात मोदक घेतलेल्या मूषकराजाची मोठी पितळी मूर्ती आहे. मंदिराची रचना ही सभामंडप गर्भगृह अशी आहे. गर्भगृहात काहीशा खोलगट भागात तीन फूट उंच अडीच फूट रुंदीची शेंदूरचर्चित शिळा आहे, त्या शिळेची गणपती म्हणून पूजा करण्यात येते. या मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे दरवर्षी ते फेब्रुवारी आणि ते नोव्हेंबर या काळात सूर्यास्ताच्या वेळी मावळत्या सूर्याची किरणे थेट गर्भगृहातील गणपतीच्या मूर्तीवर पडतात. सभागृहाच्या दक्षिणेकडे गणपतीचे शयनकक्ष आहे. या ठिकाणी असलेल्या पलंगावर गाद्या अंथरूणे आहेत. सभामंडपाच्या बाह्य भिंतीवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असून अनेक गजराजांनी आपल्या शिरावर सभामंडपावरील शिखराचा भार तोलून धरल्याचे दिसते. सभामंडप गर्भगृहावर शिखरे असून गर्भगृहाच्या वैशिष्ट्यपूर्ण शिखरावर सोन्याचा कळस आहे.

मंदिरामागे असलेली टेकडी ही गणपतीस्वरूप मानली जात असल्याने भाविक तिला प्रदक्षिणा घालतात. टेकडीभोवतालचा प्रदक्षिणा मार्ग गोविंदपंत बुंदेले यांनी जांभ्या दगडांनी बांधलेला आहे, तो साधारण एक किमी अंतराचा आहे, अशी नोंद आहेप्रदक्षिणा मार्गावरील ध्यानगुंफेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये भाविकांना ध्यानासाठी बसण्याची व्यवस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गणपतीचे दर्शन घेतले होते, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांत आढळतो. शिवाजी महाराजांपासून ते पेशवाईपर्यंतचा इतिहास कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या मंदिराशी निगडित आहे.

मंदिरात दरवर्षी दोन मोठे उत्सव साजरे होतात. पहिला भाद्रपद शद्ध प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत दुसरा माघ शुद्ध चतुर्थीला. यावेळी येथे मोठी यात्रा भरते. याशिवाय वर्षातील सर्व संकष्टी चतुर्थी, दिवाळी, दसरा, पाडवा, भाद्रपद माघ शुद्ध चतुर्थी या दिवशी पेशव्यांनी दिलेल्या चांदीच्या गणेशमूर्तीची येथे पालखीतून मिरवणूक काढली जाते.

दररोज पहाटे ते रात्री पर्यंत भाविकांना मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेता येते. सकाळी , दुपारी १२ आणि सायंकाळी वाजता येथे आरती होते. दुपारी १२.३० ते सायंकाळी .१५ ते .१५ या वेळेत आलेल्या भाविकांना खिचडीचा प्रसाद देण्यात येतो. या गणेशाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येथे येत असतात. त्यांच्या सुविधेसाठी मंदिर ट्रस्टतर्फे अत्याधुनिक सेवा सुविधा असलेले प्रशस्त भक्त निवास (संपर्क : ८६६९९३११४५, ८६६९९३११४६) बांधण्यात आले आहे. यामध्ये उद्‌वाहक यंत्रणा (लिफ्ट) वातानुकूलित खोल्यांचीही सुविधा आहे. याशिवाय परिसरात अनेक हॉटेल्स होम स्टेची सुविधाही आहे.

गणपतीपुळे येथील गणपती मंदिरापासून साधारणतः एक किमी अंतरावर कोकण म्युझियम (प्राचीन खेडे) उभारलेले आहे. त्यामध्ये ५०० वर्षांपूर्वीचे कोकणातील राहणीमान, समाजरचना, व्यवसाय, केशभूषा, इतिहास परंपरा यांचे दर्शन होते. कोकण पर्यटन विकास आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे. या ठिकाणी विविध वृक्षांचीही लागवड करण्यात आलेली आहे. त्या झाडांच्या नावांसह त्यांचे औषधी गुणधर्मही येथील फलकांवर लिहिलेले आहेत. ग्रामदैवत गावगाड्यातील विविध व्यवसायांच्या प्रतिकृती येथे पाहायला मिळतात. येथील अधिक माहितीसाठी ०२३५७२२३०६८ या क्रमांकावर संपर्क साधता येतो.

उपयुक्त माहिती:

  • रत्नागिरीपासून ३५ कि. मी. अंतरावर
  • रत्नागिरी राज्यातील अनेक भागांतून गणपतीपुळेसाठी थेट एसटी सेवा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • मंदिराची वेबसाईट : www.ganpatipule.co.in
  • संपर्क : देवस्थान कार्यालय : ०२३५७२३५२२३/२४
Back To Home