
सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणाऱ्या यवतेश्वर डोंगराच्या कुशीत यवतेश्वर हे गाव आहे. समुद्रसपाटीपासून १२३० मीटर उंचीवर असलेले येथील यादवकालीन यवतेश्वर मंदिर हे शंकराचे जागृत स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. येथे भरणारी यात्रा ही या भागातील सर्वांत पहिली यात्रा असते. या यात्रोत्सवात मंदिरातून निघणारी पालखी ही मंदिरापासून काही अंतरावर असणाऱ्या एका आंब्याच्या झाडाजवळ जाते व तेथील मोहोर पालखीत घेऊन परत मंदिरात येते. हे येथील झाड देवआंबा म्हणून प्रसिद्ध आहे.
यवतेश्वर मंदिराची आख्यायिका अशी की ७५० ते ८०० वर्षांपूर्वी या परिसरात किडवान नावाचा राजा राज्य करीत होता. त्या राजाला कोडाचा त्रास होता. अनेक उपाय करूनही त्यावर तो लागू पडत नव्हता. एके दिवशी तो भरपूर कळकाची (यवत, बांबू) झाडे असणाऱ्या या डोंगरावर शिकारीसाठी आला. शिकारीनंतर त्याला तहान लागली म्हणून पाण्याचा शोध घेत असताना त्याला येथे पाणी दिसले. तहान भागवून त्या पाण्याने त्याने हात व तोंड धुतले.
येथील पाण्याचा त्याच्या शरीरावर स्पर्श होताच हात व तोंडावरील कोड नाहीसे झाले होते. त्या रात्री महादेवाने दृष्टांत दिला की येथून काही अंतरावर मी आहे. तेथून मला बाहेर काढ व माझे मंदिर बांध. त्यानुसार जागेचा शोध घेऊन त्याने तेथे महादेवांचे मंदिर बांधले. तेच हे यवतेश्वर मंदिर!
यवतेश्वर डोंगराच्या वायव्य टोकावर हे मंदिर आहे. यवतेश्वर मंदिर यादवकालीन असून त्याची रचना हेमाडपंती आहे. पूर्वी या भागात यवताची म्हणजेच कळकाची खूप बेटे होती; यावरून किंवा येथील मंदिरामुळे या डोंगरास व गावास यवतेश्वर नाव पडले असावे. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून मंदिराच्या व्यवस्थेकरिता या गावाचा महसूल नेमून देण्यात आला होता, असा उल्लेख आढळतो. मंदिरापर्यंत जाण्यासाठी थेट रस्ता आहे. मंदिराच्या कमानीवजा प्रवेशद्वारातून काही दगडी पायऱ्या उतरल्यावर मंदिर परिसरात प्रवेश होतो.
जेथे पायऱ्या संपतात तेथेच उंच व प्राचीन दीपमाळ आहे. त्यापुढे संपूर्ण दगडी बांधणीतील मुख्य मंदिराला लागूनच नंदीमंडप आहे. या नंदीमंडपात नंदीच्या दोन मूर्ती आहेत. नंदीमंडपासह सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप व अंतराळात असणाऱ्या दगडी स्तंभांवर विशेष कोरीवकाम दिसत नाही. गर्भगृहाच्या द्वारपट्टीकेवर विविध पुष्पे कोरलेली आहेत. या द्वाराच्या उजवीकडे गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात असलेले शिवलिंग हे प्राचीन व स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. अखंड काळ्या पाषाणातील या शिवलिंगाच्या समोरील बाजूस माता पार्वतीची मूर्ती आहे.
मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला काळभैरवाचे मंदिर आहे. अखंड काळ्या पाषाणात कोरलेली येथील काळभैरवनाथांची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. असे सांगितले जाते की यवतेश्वर मंदिर बांधून झाल्यावर ही काळभैरवाची मूर्ती काशीवरून आणून येथे प्रतिष्ठापित केली होती. मंदिराच्या पश्चिमेस पाण्याचे तळे असून त्यास ‘देवाचे तळे’ असे म्हटले जाते. याच पाण्याने किडवान राजाचा त्वचारोग बरा झाला, असे सांगितले जाते. दक्षिणेस रामेश्वर व मारुती, उत्तरेस घाटाई देवी आणि समोरच्या बाजूला गणपती अशी परिसरात मंदिरे आहेत. उत्तर भारतातील काशी विश्वेश्वराच्या मंदिराप्रमाणे याही मंदिराचे दर्शनसूत्र आहे, त्यामुळे या मंदिराच्या दर्शनाने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतल्याचे पुण्य लाभते, अशी येथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे.
अश्विन अमावस्येला येथे मोठी यात्रा भरते. यावेळी ढोल–ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक निघून ती मंदिरापासून काही अंतरावर असणाऱ्या डेरेदार आंब्याच्या झाडाजवळ जाऊन त्या झाडाचे पूजन केले जाते. पूजनानंतर झाडावर चढून आंब्याच्या मोहोराची फांदी तोडून पालखीत ठेवली जाते. तेथून पालखीची मिरवणूक पुन्हा मंदिराकडे येते. या झाडावरील मोहराला जोपर्यंत आंबे लागत नाहीत तोपर्यंत ही यात्रा सुरू असते. यावेळी संन्याशाना देवाचे दर्शन प्रथम देण्याची पद्धत आहे. त्यानंतर इतर भाविकांना दर्शन घेता येते. याशिवाय कार्तिक शुद्ध प्रतिपदेलाही येथे यात्रा भरते. महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. येथून कन्हेर धरण, सज्जनगड, जरंडेश्वर व मेरुलिंग या ठिकाणांचे दर्शन होते.

सतारा शहर की पश्चिम दिशा में स्थित यवतेश्वर पर्वत की गोद में यवतेश्वर गाँव बसा हुआ है। समुद्र तल से 1230 मीटर की ऊँचाई पर स्थित यहाँ का यादवकालीन यवतेश्वर मंदिर भगवान शंकर का जागृत स्थान माना जाता है। यहाँ आयोजित होने वाला मेला इस क्षेत्र का साल का सबसे पहला मेला माना जाता है। इस मेले के उत्सव में मंदिर से निकलने वाली पालकी समीप ही स्थित एक आम के वृक्ष के नीचे पहुँचती है। वहाँ से आम की मंजरी (बौर) लेकर पालकी पुनः मंदिर लौट आती है। यह वृक्ष ‘देव-आम’ के नाम से प्रसिद्ध है।
यवतेश्वर मंदिर से संबंधित किवंदती इस प्रकार है। लगभग 750 से 800 साल पहले इस क्षेत्र में किडवान नामक राजा का शासन था। उसे कुष्ठ रोग था। उसके अनेक उपचार व्यर्थ हो चुके थे। एक दिन वह इस पर्वतीय क्षेत्र में शिकार खेलने आया। यहाँ बाँस के सघन वन थे। शिकार के बाद उसे प्यास लगी। वह जल की खोज में भटकते हुए यहाँ पहुँचा। उसने पानी पीकर हाथ-मुँह धोया। इससे उसके शरीर के कुष्ठ रोग प्रभावित अंग बिल्कुल ठीक हो गए। उसी रात भगवान महादेव ने स्वप्न में उसे दर्शन दिए। उन्होंने कहा, “मैं यहीं समीप स्थित हूँ।
मुझे बाहर निकालो और मेरा मंदिर बनाओ।” राजा ने बताई गई जगह खोजकर यहाँ यह मंदिर स्थापित कराया। यही वर्तमान यवतेश्वर मंदिर है।
यह मंदिर यवतेश्वर पर्वत के वायव्य (उत्तर-पश्चिम) छोर पर स्थित है। यह मंदिर यादवकालीन तथा हेमाडपंती शैली में निर्मित है। प्राचीन समय में इस क्षेत्र में यवत (बाँस) की बहुतायत थी। संभवतः इसी से पर्वत और गाँव का नाम यवतेश्वर पड़ा होगा। छत्रपति शाहू महाराज के काल में इसका जीर्णोद्धार हुआ। मंदिर के प्रबंधन हेतु गाँव का राजस्व निर्धारित किया गया था। ऐतिहासिक दस्तावेजों में ऐसा उल्लेख मिलता है।
मंदिर तक सीधा मार्ग उपलब्ध है। मेहराबदार प्रवेश द्वार से कुछ पत्थर की सीढ़ियाँ उतरते ही मंदिर परिसर में प्रवेश होता है। वहीं एक भव्य और प्राचीन दीपमाला स्थित है। इसके आगे पूर्णतः पाषाण की संरचना वाला मुख्य मंदिर है। मुख्य मंदिर से सटा हुआ नंदीमंडप है। नंदीमंडप में नंदी की दो मूर्तियाँ हैं। मंदिर की रचना नंदीमंडप, सभामंडप, अंतराल और गर्भगृह के रूप में है।
सभामंडप और अंतराल में स्तंभ हैं। उन स्तंभों पर कोई विशेष नक्काशी नहीं है। गर्भगृह के द्वारपट्ट पर पुष्प अलंकरण है। द्वार की दाईं ओर श्रीराम की मूर्ति है। गर्भगृह में स्थापित शिवलिंग प्राचीन और स्वयंभू माना जाता है। शिवलिंग के सम्मुख ही माता पार्वती की मूर्ति है।
मुख्य मंदिर की दाईं ओर कालभैरव का मंदिर है। अखंड काले पाषाण से निर्मित भैरवनाथ की मूर्ति अत्यंत विशिष्ट है। कहा जाता है कि मुख्य मंदिर के निर्माण के बाद यह मूर्ति काशी से लाकर यहाँ प्रतिष्ठित की गई थी। मंदिर की पश्चिम दिशा में स्थित जलकुंड को ‘देव-तालाब’ कहा जाता है। ऐसी मान्यता है कि इसी जल के स्पर्श से राजा किडवान का रोग ठीक हुआ था।
मंदिर परिसर में दक्षिण दिशा में रामेश्वर और हनुमान के मंदिर हैं। उत्तर दिशा में घाटाई देवी का मंदिर है। मंदिर के सम्मुख गणपति का मंदिर है। यहाँ ऐसी मान्यता है कि जो पुण्य काशी विश्वेश्वर के दर्शन से मिलता है, वैसा ही फल यवतेश्वर के दर्शन से भी प्राप्त होता है।
अश्विन अमावस्या को यहाँ विशाल मेला आयोजित होता है। इस अवसर पर ढोल-ताशों की गूँज के साथ पालकी की शोभायात्रा निकलती है। यह मेला ‘देव-आम’ वृक्ष तक पहुँचता है। वहाँ से आम की मंजरी वाली डाल तोड़कर पालकी में रखी जाती है। इसके पश्चात पालकी पुनः मंदिर लौट आती है। जब तक उस वृक्ष पर आम नहीं लगते, तब तक मेले का समापन नहीं होता। यहाँ पहले संन्यासियों को दर्शन करने दिया जाता है। उसके पश्चात अन्य श्रद्धालुगण दर्शन करते हैं। कार्तिक शुक्ल प्रतिपदा को भी यहाँ मेला लगता है। महाशिवरात्रि को यहाँ भव्य उत्सव मनाया जाता है। यहाँ से कन्हेर बाँध, सज्जनगढ़, जरंडेश्वर और मेरुलिंग के मनोहर दृश्य दिखाई देते हैं।