
साताऱ्याजवळ लिंब हे गाव येथील बारा मोटा असलेल्या विहिरीमुळे प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या गावातील कृष्णा नदीच्या पात्रातील खडकावर असलेले कोटेश्वर महादेवाचे मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नदी पात्रात मध्यभागी असलेले हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटकही येथे मोठ्या प्रमाणावर येतात. या गावचे वैशिष्ट्य असे की शाहू महाराजांनी देशभरातील विविध जातींच्या आंब्यांची या गावात आमराई तयार केली होती. आजही या परिसरात सर्वत्र विविध जातींच्या आंब्यांची झाडे पाहायला मिळतात.
या मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वरपासून होतो आणि तेथून लिंब गावापर्यंत कृष्णाकाठावर असलेल्या सर्व शिवलिंगांची संख्या एक कोटी आहे. सर्वात शेवटचे मंदिर लिंब या गावातील असल्यामुळे या मंदिराला कोटेश्वर हे नाव पडले. त्यामुळे महाबळेश्वर येथील श्री क्षेत्र महाबळेश्वर व पंचगंगा नदी मंदिराइतके महत्त्व या मंदिराचे असल्याचे मानले जाते.
कृष्णा नदीचा खळाळता प्रवाह, सभोवताली असलेला निसर्गसमृद्ध परिसर, आजूबाजूची वनराई व पक्ष्यांचा किलबिलाट अशा रम्य वातावरणात असलेले हे प्राचीन मंदिर जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
पेशव्यांचे सरदार नारो आप्पाजी खिरे (तुळशीबागवाले) हे लिंब या गावचे. त्यांनी पुण्यातील तुळशीबाग आणि त्यातील राम मंदिर उभारले. येथेही त्यांनी कोटेश्वर शिवमंदिराची बांधणी केली. कृष्णा नदीवर असलेल्या पुलाजवळून नदी पात्रातील कोटेश्वर मंदिराजवळ जाता येते. पावसाळ्याच्या वेळेत जेव्हा नदी दुथडी भरून वाहते, तेव्हा मात्र या मंदिरात जाता येत नाही. मंदिर परिसरात फरसबंदी करण्यात आल्यामुळे हा परिसर सुंदर व स्वच्छ भासतो. मुख्य मंदिराच्या आधी डाव्या हाताला एका देवळीत श्रीगणेशाची मूर्ती आहे. थोडे पुढे गेल्यावर पत्रे घातलेल्या उघड्या सभागृहात एका वडाच्या झाडाला गोलाकार पार बांधलेला आहे. या पाराच्या खालच्या खोबणीत वेगवेगळ्या मूर्ती आहेत. पाराच्या पूर्वेकडे नदीपात्रातून मंदिर परिसरात येण्यासाठी तटबंदीत मुख्य प्रवेशद्वाराची कमान आहे. या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूस दोन कुंड असून त्यापैकी एकामध्ये नंदी व शिवपिंडी आहे. तेथून काही पायऱ्या चढून मंदिर परिसरात प्रवेश होतो.
पाराच्या पश्चिमेकडे कोटेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या दर्शन मंडपात नंदीची मूर्ती आहे. अखंड पाषाणातील या नंदीवर दागिन्यांची वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. गर्भगृहात काळ्या पाषाणातील आकाराने मोठी अशी शिवपिंडी आहे. मंदिरासमोरील कुंडात स्नान करून कोटेश्वराचे दर्शन घेतले तर त्वचा रोगांपासून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. संपत्ती आणि वाहन खरेदीसाठीही या देवाला भाविकांकडून साकडे घातले जाते. महाशिवरात्री व त्रिपुरारी पौर्णिमा हे उत्सव या मंदिरात मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. दर श्रावणी सोमवारी येथे यात्रा भरते. माघ शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत साधारणतः दीड महिना वाई येथे कृष्णामाई महोत्सव चालतो. असे सांगितले जाते की स्वतः शिवाजी महाराजांनी हा उत्सव तेथे सुरू केला होता. याच कालावधीत लिंब गावातही मोठ्या प्रमाणात कृष्णामाईचा उत्सव साजरा केला जातो.
कोटेश्वर मंदिराशिवाय या गावातील बारा मोटा असलेली विहीर ही ऐतिहासिक आणि पाणी नियोजनाचा एक उत्तम नमुना यासाठी प्रसिद्ध आहे. सातारा–पुणे मार्गावर लिंब गावापासून तीन किमी अंतरावर ही विहीर आहे.
छत्रपती शाहू महाराज यांच्या पत्नी राणी वीरूबाईसाहेब यांनी ही सुंदर विहीर बांधली होती. या विहिरीत उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरून खाली जाताच एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासणारी कमान दिसते. विहिरीत एक पूल असून त्यातून विहिरीच्या दुसऱ्या बाजूला जाता येते. येथील दगडी खांबावर गणेश, हनुमान, हत्ती, तसेच राणी वीरूबाईसाहेब यांची शिल्पे कोरलेली आहेत. त्याचबरोबर फुले व पक्षी यांचे कोरीव काम आहे. बारा मोटेची विहीर या नावाने जरी ही विहीर प्रसिद्ध असली तरी प्रत्यक्षात येथे १५ मोटा होत्या, हे येथील रचनेवरून जाणवते.
येथील पाणी वाहून नेण्याची व्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण आहे. आजूबाजूच्या शेतीला पाणी पुरवण्यासाठी असलेल्या १५ मोटांच्या खुणा अजूनही येथे दिसतात. या विहिरीवरील शिलालेखात ‘श्रीमंत सौभाग्यवती वीरूबाईसाहेब’ असे कोरलेले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी देशभरातील विविध जातींच्या आंब्यांची रोपे मागवून लिंब गावात खास आंब्यांच्या बागा तयार केल्या होत्या. त्या झाडांनाही या विहिरीचे पाणी मिळत असे. शाहू महाराज लिंब गावात अनेकदा वास्तव्यास येत असत, असे सांगितले जाते.

सतारा के निकट स्थित लिंब गाँव अपनी ‘बारा मोटा’ बावड़ी के लिए प्रसिद्ध है। कुएँ से बारह स्थानों से जल खींचने की सुविधा के कारण इसे यह नाम प्राप्त हुआ है। साथ ही, इस गाँव में कृष्णा नदी की धारा में पत्थर पर निर्मित कोटेश्वर महादेव का मंदिर श्रद्धालुओं का प्रमुख श्रद्धास्थान है। नदी के मध्य में स्थित होने के कारण यह मंदिर पर्यटकों को भी आकर्षित करता है। इस गाँव की एक विशेषता यह है कि छत्रपति शाहू महाराज ने संपूर्ण देश से विभिन्न प्रजातियों के आम मँगवाए थे। उन्होंने यहाँ एक आम के बगीचे का निर्माण कराया था। आज भी इस क्षेत्र में विभिन्न प्रजातियों के आम के वृक्ष दिखाई देते हैं।
इस मंदिर के विषय में एक पौराणिक कथा प्रचलित है। कृष्णा नदी का उद्गम महाबलेश्वर से होता है। वहाँ से लिंब गाँव तक कृष्णा तट पर एक करोड़ शिवलिंग स्थित हैं। अंतिम शिवलिंग लिंब गाँव में होने के कारण इस मंदिर को ‘कोटेश्वर’ नाम मिला। अतः इस मंदिर का महत्त्व श्री क्षेत्र महाबलेश्वर एवं पंचगंगा मंदिर के समान ही है। कृष्णा नदी का मधुर प्रवाह और चारों ओर का प्राकृतिक सौंदर्य अत्यंत मनोहर है।
यहाँ की हरियाली और पक्षियों का मधुर कलरव मन को शांति प्रदान करता है। श्रद्धालुओं की दृढ़ मान्यता है कि ऐसे रमणीय वातावरण में स्थित यह प्राचीन मंदिर एक जागृत देवस्थान है।
पेशवा काल के सरदार नारो आप्पाजी खिरे (तुलसीबागवाले) लिंब गाँव के निवासी थे। उन्होंने पुणे का प्रसिद्ध तुलसीबाग और उसका श्रीराम मंदिर बनवाया था। इसी प्रकार उन्होंने लिंब में कोटेश्वर शिव मंदिर का निर्माण कराया। कृष्णा नदी पर बने पुल के समीप से नदी मार्ग होते हुए इस मंदिर तक पहुँचा जाता है। वर्षा ऋतु में जब नदी उफान पर होती है, तब मंदिर तक पहुँचना संभव नहीं होता। मंदिर परिसर में पत्थर बिछाए जाने से प्रांगण स्वच्छ और मनोहर दिखाई देता है।
मुख्य मंदिर से पहले बाईं ओर एक छोटे देवालय में श्री गणेश की मूर्ति है। आगे पत्रों से ढके हुए खुले सभामंडप में एक वट वृक्ष है। इसके चारों ओर वृत्ताकार चबूतरा निर्मित है। इस चबूतरे के नीचे विभिन्न देव-मूर्तियाँ स्थापित हैं। चबूतरे के पूर्व में नदी की ओर से मंदिर परिसर में आने हेतु प्राचीर का मुख्य प्रवेश द्वार है। इसके ऊपर नौबतखाना बना है। प्रवेश द्वार के सम्मुख दो कुंड हैं। इनमें से एक में नंदी और शिवलिंग स्थापित हैं। वहाँ से कुछ सीढ़ियाँ चढ़कर मंदिर परिसर में प्रवेश होता है।
चबूतरे के पश्चिम में कोटेश्वर महादेव का मुख्य मंदिर है। दर्शनमंडप में अखंड पाषाण से निर्मित नंदी की मूर्ति है। इस पर अलंकारों की सुंदर नक्काशी की गई है। गर्भगृह में काले पाषाण से निर्मित विशाल शिवलिंग है। मान्यता है कि मंदिर के सम्मुख स्थित कुंड में स्नान करके कोटेश्वर महादेव के दर्शन करने से त्वचा रोगों से मुक्ति मिलती है। भक्तगण यहाँ संपत्ति लाभ और नए वाहन के क्रय जैसी अपनी विशेष मन्नतें पूरी होने की प्रार्थना करते हैं।
महाशिवरात्रि और त्रिपुरारी पूर्णिमा के पर्व इस मंदिर में भव्य रूप से मनाए जाते हैं। प्रत्येक श्रावण सोमवार को यहाँ मेला लगता है। माघ शुक्ल प्रतिपदा से फाल्गुन पूर्णिमा तक वाई में ‘कृष्णामाई महोत्सव’ का आयोजन होता है। कहा जाता है कि स्वयं छत्रपति शिवाजी महाराज ने यह उत्सव प्रारंभ किया था। इसी अवधि में लिंब में भी कृष्णामाई उत्सव बड़ी भक्ति और भाव के साथ मनाया जाता है।
कोटेश्वर मंदिर के अतिरिक्त इस गाँव की ‘बारा मोटा’ बावड़ी ऐतिहासिक दृष्टि से प्रसिद्ध है।
यह जल-प्रबंधन का एक उत्कृष्ट उदाहरण है। सतारा-पुणे मार्ग पर लिंब से तीन किमी की दूरी पर यह बावड़ी स्थित है। इसका निर्माण छत्रपति शाहू महाराज की पत्नी रानी वीरूबाईसाहेब ने कराया था। इस बावड़ी में उतरने के लिए पत्थर की सीढ़ियाँ हैं। नीचे उतरते ही दुर्ग के समान प्रतीत होने वाली मेहराब दिखाई देती है।
बावड़ी के एक छोर से दूसरे छोर तक जाने के लिए भीतर पत्थर का एक पुल बना है। यहाँ के स्तंभों पर गणेश, हनुमान, हाथी, रानी वीरूबाईसाहेब, पुष्प और पक्षियों की मनोहर नक्काशी है।
भले ही यह बावड़ी ‘बारा मोटा’ नाम से प्रसिद्ध है, किंतु वास्तव में यहाँ पंद्रह ‘मोटा’ होने के संकेत मिलते हैं। इसकी संरचना से यह स्पष्ट होता है। यहाँ की जल वितरण प्रणाली विशिष्ट है। आसपास के खेतों को पानी पहुँचाने हेतु बनी 15 मोटों के अवशेष आज भी देखे जा सकते हैं।
बावड़ी के शिलालेख पर ‘श्रीमंत सौभाग्यवती वीरूबाईसाहेब’ अंकित है। शाहू महाराज द्वारा लिंब में लगाए गए आम के बगीचों को भी इसी बावड़ी का जल दिया जाता था। कहा जाता है कि शाहू महाराज यहाँ नियमित रूप से निवास करते थे।