जरंडेश्वर मारुती मंदिर

जरंडेश्वर, ता. कोरेगाव, जि. सातारा

सातारा शहराच्या पूर्वेकडे असलेल्या डोंगरावरील जरंडेश्वर मारुतीचे मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराला धार्मिक ऐतिहासिक महत्त्व आहे. संत तुकाराम महाराज रामदास स्वामी यांचे येथे काही काळ वास्तव्य होते. असे सांगितले जाते की हे मंदिर समर्थ रामदासांनी बांधले असून १६५५ च्या सुमारास याच स्थानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना दानरूपाने स्वराज्य दिले होते. राज्य सरकारकडून या मंदिराला तीर्थक्षेत्राचादर्जा देण्यात आलेला आहे.

जरंडेश्वर मारुतीचे मंदिर समुद्र सपाटीपासून ३७६० फूट उंचावर आहे. या मंदिराकडे येण्यासाठी चार मार्ग आहेत. एक जांब गावातून, दुसरा पाडळी गावातून, तिसरा शिवथरकडून भीमनगरमार्गे, तर चौथा मार्ग कोरेगावकडून जळगावमार्गे आहे. यापैकी कोणत्याही पायवाटेने येथे येण्यासाठी सुमारे दीड तासांचा वेळ लागतो. या सर्व मार्गांमध्ये जांब गावातून येणारी वाट तुलनेने सोपी आहे. सुरुवातीला साडेतीनशे ते चारशे पायऱ्या असून त्यानंतर पुढे डोंगरवाटेने मंदिरापर्यंत जावे लागते. डोंगराच्या पठारावर मुख्य मंदिरासमोर एक मोठे पिंपळाचे झाड आहे आणि त्याच्याशेजारी एक चौथरा आहे. या चौथऱ्याच्या बाजूला बाकोबा नावाच्या बोक्याचे एक छोटेसे स्मारक आहे. त्यासमोर गडावरील मुख्य देवता मारुती आणि जरंडेश्वराचे मंदिर आहे.

या मंदिराची आख्यायिका अशी की लक्ष्मणासाठी संजीवनी आणताना मारुतीकडून द्रोणागिरी पर्वताचा पडलेला एक भाग म्हणजे हा जरंडेश्वर होय, असे मानण्यात येते. मंदिर एक मीटर उंच चौथऱ्यावर बांधलेले असून गाभाऱ्यातील मारुतीची मूर्ती स्वयंभू आहे. मंदिराचा सभामंडप १९३० च्या सुमारास दासगिरी महाराजांनी बांधल्याची नोंद आहे. मंडपातील एका दगडी चौथऱ्यावर जरंडेश्वर महादेवाची स्थापना केलेली आहे. याशिवाय सभामंडपामध्ये संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती आहेत. त्याचबरोबर पुराणातील आणि शिवचरित्रातील काही प्रसंगही या ठिकाणी रेखाटले आहेत.

जरंडेश्वर मंदिराच्या मागे दासमारुतीचे लहानसे मंदिर आहे. त्यासमोर श्रीराम मंदिर आहे. श्रीराम मंदिराची उभारणी १८६२ साली काळोजी बुवा यांनी केल्याची नोंद आहे. या मंदिर बांधणीबद्दल आख्यायिका अशी की काळोजी बुवांना श्रीरामाचे मंदिर हे जरंडेश्वराच्या पुढे बांधावे की मागे असा प्रश्न पडला होता. त्यावेळी हनुमानाने त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितले की मी उड्डाण करीत आहे श्रीराम माझ्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे मंदिर मागील बाजूस बांधण्यात यावे. त्यामुळे जरंडेश्वर मंदिराच्या मागील बाजूस श्रीराम मंदिर आहे. जरंडेश्वराप्रमाणेच राममंदिरही एका चौथऱ्यावर बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहात श्रीराम, लक्ष्मण सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. मंदिराच्या सभामंडपात द्वारपालांच्या साडेपाच फुटी उंच मूर्ती आहेत. श्रीराम मंदिर आणि जरंडेश्वर मंदिर ही दोन्ही मंदिरे हेमाडपंती रचनेची आहेत. श्रीराम मंदिराच्या मागील बाजूस समर्थांची उपासना घळ असून त्यात समर्थांच्या पादुका आहेत. समर्थ रामदास स्वामी येथील वास्तव्यात घळीमध्ये बसत असत.

भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेले जरंडेश्वर मारुतीचे स्थान हे जागृत असून हा मारुती नवसाला पावतो, अशी परिसरात ख्याती आहे. त्यामुळे प्रत्येक श्रावणी शनिवारी या ठिकाणी हजारो भाविक दर्शनाला येतात. पहाटेची काकड आरती पार पडल्यानंतर दिल्या जाणाऱ्या खिचडीच्या प्रसादासाठी भाविकांच्या येथे रांगा लागतात. श्रीराम मारुतीच्या नामाचा येथे जयघोष सुरू असतो. जरंडेश्वरवरून अजिंक्यतारा, यवतेश्वर, मेरुलिंग, वैराटगड, चंदन, वंदन, नांदगिरी, वर्धनगड, पाटेश्वर, जनाईमळाई हे किल्ले टेकड्या दिसतात.

जरंडेश्वराच्या पायथ्याशी त्रिपुटी हे गाव आहे. येथील गोपालनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामुळे ते परिचित आहे.

गोपालनाथ महाराज हे एकनाथांच्या परंपरेतील ब्रह्मचारी नाथयोगी होते. येथील लोक त्यांना ब्रह्माचा अवतार मानत असत. त्यांचा जन्म १६९० मध्ये झाला आणि १७६६ मध्ये त्यांनी श्रावण अमावस्येला त्रिपुटी येथे संजीवन समाधी घेतली.

त्यांचाशिरोमणीहा ग्रंथ परब्रह्म संकल्पनेवर टीका विवरण करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिराच्या मागे एक बांधीव तलाव आहे. हा तलाव १७५८ ते १७६३ या कालावधीत ब्रह्मेंद्र स्वामींनी बांधला होता, अशी नोंद आहे.

गोपालनाथ समाधी मंदिराचे स्वरूप सभामंडप गर्भगृह असे आहे. सभामंडपामध्ये ब्रह्मेंद्रस्वामी, ज्ञानेश्वर महाराज इतर संतांची चित्रे रेखाटलेली आहेत.

      गर्भगृहात समाधीच्या दुसऱ्या पायरीवरून सतत पाणी वाहत असते. गोकुळाष्टमी ते श्रावण वद्य अमावस्या या काळात गोपालनाथ महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव येथे साजरा करण्यात येतो.

उपयुक्त माहिती:

  • सातारा शहरापासून १२ किमी अंतरावर
  • जांब पाडळी येथे एसटीची सुविधा
  • खासगी वाहने जांब पाडळी येथील वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही

जरंडेश्वर हनुमान मंदिर
जरंडेश्वर, तह. कोरेगाव, जि. सातारा

सातारा शहर के पूर्व की पहाड़ियों पर स्थित जरंडेश्वर हनुमान मंदिर एक जागृत देवस्थान के रूप में प्रसिद्ध है। इस मंदिर का धार्मिक और ऐतिहासिक महत्त्व है। संत तुकाराम महाराज और समर्थ रामदास स्वामी ने यहाँ कुछ समय तक निवास किया था। यह कहा जाता है कि इस मंदिर का निर्माण समर्थ रामदास स्वामी द्वारा करवाया गया था। लगभग १६५५ के समय छत्रपति शिवाजी महाराज ने समर्थ रामदास स्वामी को इसी स्थान पर स्वराज्य दान दिया था। राज्य सरकार ने इस मंदिर को ‘ब’ श्रेणी में सम्मिलित किया है।
जरंडेश्वर हनुमान मंदिर समुद्र तल से ३७६० पद की ऊँचाई पर स्थित है। मंदिर तक पहुँचने के चार मार्ग हैं। इनमें जांब गाँव, पादली गाँव, शिवथर से भीमनगर मार्ग और कोरेगाव से जलगाँव मार्ग शामिल हैं। जांब गाँव का मार्ग अपेक्षाकृत सरल है। इस मार्ग पर प्रारंभ में ३५०-४०० सीढ़ियाँ हैं। इसके पश्चात पहाड़ी रास्ते से मंदिर तक पहुँचना होता है। पहाड़ी पर मुख्य मंदिर के सम्मुख एक विशाल पीपल का वृक्ष और उसके निकट चबूतरा है। चबूतरे के पास बाकोबा नामक व्यक्ति का छोटा स्मारक है। इसके सम्मुख पहाड़ी के मुख्य देवता हनुमान और जरंडेश्वर मंदिर स्थित हैं।
पौराणिक कथा के अनुसार, लक्ष्मण के लिए संजीवनी लाते समय हनुमानजी द्वारा गिराया गया द्रोणागिरी पर्वत का एक अंश ही जरंडेश्वर माना जाता है। यह मंदिर एक मीटर ऊँचे चबूतरे पर निर्मित है। इसके गर्भगृह में हनुमान की स्वयंभू पाषाण मूर्ति है। मंदिर का सभामंडप वर्ष १९३० के आसपास दासगिरी महाराज द्वारा बनवाया गया था। सभामंडप के एक पत्थर के चबूतरे पर जरंडेश्वर महादेव की स्थापना की गई है। इसके अतिरिक्त सभामंडप में संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी और छत्रपति शिवाजी महाराज की पाषाण मूर्तियाँ हैं। यहाँ पुराणों और शिवचरित्र की कुछ घटनाएँ भी उत्कीर्ण की गई हैं।
जरंडेश्वर मंदिर के पीछे दास हनुमान का छोटा मंदिर है। इसके सम्मुख श्रीराम मंदिर स्थित है। इसका निर्माण १८६२ में कालोजी बुवा द्वारा किया गया था। मंदिर निर्माण के विषय में कहा जाता है कि उस समय यह प्रश्न था कि श्रीराम मंदिर को जरंडेश्वर मंदिर के सम्मुख बनाया जाए या पीछे। तब हनुमानजी ने उन्हें दृष्टांत दिया और मंदिर पीछे बनाने का निर्देश दिया। इसी कारण श्रीराम मंदिर जरंडेश्वर मंदिर के पीछे स्थित है। राम मंदिर भी चबूतरे पर बना है। इसके गर्भगृह में श्रीराम, लक्ष्मण और सीता की संगमरमर की पाषाण मूर्तियाँ हैं। सभामंडप में द्वारपालों की ५.५ पद ऊँची पाषाण मूर्तियाँ हैं। दोनों मंदिर हेमाडपंती शैली में निर्मित हैं। राम मंदिर के पीछे समर्थ रामदास स्वामी की उपासना हेतु गहवर है। इसमें उनकी चरण-पादुकाएँ रखी गई हैं।
अत्यधिक भक्तिमय और शक्तिशाली माना जाने वाला जरंडेश्वर हनुमान मंदिर जागृत है और भक्तों की मनोकामना पूर्ण करता है। श्रावण मास के शनिवार को यहाँ हजारों श्रद्धालु दर्शन के लिए आते हैं। प्रातःकाल की काकड़ आरती के पश्चात खिचड़ी का प्रसाद ग्रहण करने के लिए श्रद्धालुओं की लंबी कतारें लगती हैं। यहाँ श्रीराम और हनुमान का जयघोष होता है। मंदिर से अजिंक्यतारा, यवतेश्वर, मेरुलिंग, वैराटगड, चंदन, वंदन, नांदगिरी, वर्धनगड, पाटेश्वर और जनाई-मलाई जैसे किले और टीले दिखाई देते हैं।
जरंडेश्वर की तलहटी में त्रिपुटी गाँव है। यह स्थान गोपालनाथ महाराज के समाधि मंदिर के लिए प्रसिद्ध है। गोपालनाथ महाराज एकनाथ परंपरा के ब्रह्मचारी नाथयोगी थे। उनका जन्म १६९० में हुआ था। उन्होंने १७६६ में श्रावण अमावस्या को त्रिपुटी में संजीवन समाधि ली थी। उनका ‘शिरोमणि’ ग्रंथ परब्रह्म की संकल्पना के लिए प्रसिद्ध है। मंदिर के पीछे एक पक्का तालाब है। इसका निर्माण १७५८–१७६३ के मध्य ब्रह्मेंद्र स्वामी ने करवाया था।
गोपालनाथ समाधि मंदिर की संरचना में सभामंडप और गर्भगृह हैं। सभामंडप में ब्रह्मेंद्र स्वामी, ज्ञानेश्वर महाराज और अन्य संतों के चित्र हैं। गर्भगृह में समाधि की दूसरी सीढ़ी से निरंतर जल आता है। गोकुलाष्टमी से श्रावण कृष्ण अमावस्या तक यहाँ गोपालनाथ महाराज की पुण्यतिथि मनाई जाती है।

मुख्य विशेषताएँ

  • सातारा शहर से १२ किमी दूर।
  • जांब और पादली से राज्य परिवहन (एसटी) की सुविधा उपलब्ध है।
  • निजी वाहन जांब और पादली के वाहनतल तक जा सकते हैं।
  • परिसर में निवास और जलपान की सुविधा उपलब्ध नहीं है
Back To Home