
सातारा जिल्ह्यातील वाई ही मंदिरांची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. या तालुक्याच्या शहरात १०० हून अधिक मंदिरे आहेत. त्यामध्ये एक मंदिर असे आहे की ज्याला प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी दिवाबत्तीच्या खर्चासाठी ५७ रुपये वर्षासन (वार्षिक रक्कम) लावून दिले होते, ते आजपर्यंत सुरू आहे. हे मंदिर आहे १२ व्या शतकातील धुंडी विनायकाचे! या मंदिरात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या गणपतीचे दर्शन घेतले होते, असे सांगितले जाते.
वाई शहरातील ब्राह्मणशाही परिसरात असलेले धुंडी विनायक मंदिर हे सातारा जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांपैकी एक विशेष ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले मंदिर आहे. यादवांच्या काळात या मंदिराचे बांधकाम झाल्याचे सांगितले जाते. येथील गणेशमूर्ती स्वयंभू असून हा गणपती नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. वाई गावात होणाऱ्या कोणत्याही विवाहाची पहिली पत्रिका व पहिल्या अक्षता ढुंडिविनायकापुढे ठेवल्या जातात व त्यानंतर आपल्या कुलदैवतापुढे ठेवल्या जातात. शेकडो वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. त्यामुळे हा गणपती पूर्वीपासून ‘अक्षता गणपती’ म्हणूनही प्रसिद्ध आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा शिवाजी महाराज आणि अफझल खान यांची भेट होणार होती त्याआधी शिवाजी महाराजांनी मनोमन या ढुंडिविनायकाकडे स्वराज्याच्या कार्यात यश आल्यास मंदिराच्या दिवाबत्तीची सोय करेन, असा नवस केला होता. त्यानुसार या भेटीत शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करून यश मिळविले. बोललेल्या नवसाची परतफेड म्हणून महाराजांनी तेव्हा येथील किल्लेदाराकरवी या मंदिरासाठी एक लिफाफा पाठविला व त्यामध्ये मंदिराच्या दिवाबत्तीसाठी दरवर्षी ५७ रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे कळविले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती शाहू महाराज व इंग्रजांच्या काळातही हे वर्षासन सुरूच राहिले. आजही महाराष्ट्र सरकारकडून या मंदिराला दिवाबत्तीसाठी वर्षाला ५७ रुपये दिले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्षासन छत्रपती शाहू महाराजांनी सुरू ठेवल्याची सनद व इंग्रजांनी ती कायम ठेवल्याचे दस्तऐवज आजही या मंदिरात उपलब्ध आहेत.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार, अफझल खान जेव्हा वाई प्रांतात होता, तेव्हा त्याच्या सैनिकांनी या परिसरातील अनेक मंदिरे उध्वस्त केली होती. आपला आलिशान वाडा बांधण्यासाठीही अफझल खानाने येथील अनेक प्राचीन मंदिरे पाडून त्याचे दगड बांधकामासाठी वापरले होते; परंतु अनेक प्रयत्न करूनही ढुंडिविनायकाच्या प्रचितीमुळे त्याला हे मंदिर पाडता आले नाही.
तेव्हापासून वाई येथील वास्तव्याच्या काळात दररोज अफझल खानाच्या वाड्यातून या गणपतीसाठी नैवेद्य पाठविला जात असे.
ढुंडिविनायक मंदिर हेमाडपंती रचनेचे आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीच्या लहानशा दारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करावा लागतो. हे मंदिर जमिनीपासून दोन ते तीन फूट उंचीच्या जोत्यावर बांधले आहे. मंदिराचा खालचा भाग हा दगडी असून शिखरासाठी विटा व चुन्याचा वापर झालेला आहे. सभामंडप आणि गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडात दगडी खांब असून गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अष्टविनायकांच्या मूर्ती आहेत. याशिवाय ललाटबिंबावरही गणेशमूर्ती आहे.
गर्भगृहात असलेल्या मखरामध्ये शेंदूरचर्चित गणेशमूर्ती प्रतिष्ठापित आहे. मूर्तीच्या दोन डोळ्यांमध्ये व कपाळाच्या खालच्या बाजूला असलेल्या चक्रात लाल रंगाचा हिरा आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर मारुतीची मूर्ती, योगी, साधक, पायांमध्ये हत्ती पकडलेले वाघ अशी शिल्पे आहेत. आवारात चार संजीवन समाध्या आहेत.
त्या येथील गणपतीची सेवा करणाऱ्या योगीपुरुषांच्या आहेत, असे सांगितले जाते. या समाध्यांचा आकार तुळशी वृंदावनासारखा आहे. दररोज या गणपतीसाठी जो नैवेद्य दाखवला जातो तोच नैवेद्य या समाध्यांजवळही ठेवला जातो. मंदिराचे शिखर त्रिस्तरीय असून त्यातील देवड्यांमध्ये अनेक देवी–देवतांच्या मूर्ती आहेत.
माघी गणेश जयंतीला या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. या वेळी मंदिर परिसराची सुंदर सजावट केली जाते. सुमारे ५० ते ५५ हजार भाविकांना या दिवशी महाप्रसादाचे वाटप केले जाते. या शिवाय, मंदिरात गणेशयाग विधी केला जातो. त्यामध्ये विवाहोत्सुक तरुण–तरुणींसाठी काही यज्ञ व विधी केले जातात. दररोज सकाळी ६ ते ११ व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत मंदिरातील गर्भगृहात जाऊन ढुंडिविनायकाचे भाविकांना दर्शन घेता येते. या वेळेव्यतिरिक्त गर्भगृह बंद ठेवले जाते. त्यावेळी सभामंडपातून भाविकांना दर्शन घेता येते.

सातारा जिले का वाई शहर अपनी प्राचीन विरासत और ‘मंदिरों की नगरी’ (दक्षिण काशी) के रूप में विख्यात है। इस तहसील मुख्यालय में १०० से अधिक ऐतिहासिक मंदिर स्थित हैं। इन्हीं में से एक १२वीं शताब्दी का प्राचीन ‘ढुंडी विनायक मंदिर’ है, जिसके प्रति छत्रपति शिवाजी महाराज की अगाध श्रद्धा थी। ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार, महाराज ने मंदिर के प्रबंधन और नित्य सेवा-अर्चन हेतु ५७ रुपये सालाना शासकीय अनुदान (सनद) स्वीकृत किया था। राज्याभिषेक के काल से आरंभ हुई यह परंपरा आज भी अनवरत रूप से जारी है। जनश्रुति है कि छत्रपति शिवाजी महाराज ने स्वयं यहाँ आकर भगवान गणपति का आशीर्वाद प्राप्त किया था।
वाई शहर के ब्राह्मणशाही क्षेत्र में स्थित ढुंडी विनायक मंदिर सातारा जिले के प्राचीन मंदिरों में से एक है। इसका ऐतिहासिक और धार्मिक दोनों ही दृष्टि से विशेष महत्व है। कहा जाता है कि इस मंदिर का निर्माण यादव काल में हुआ था। यहाँ स्थापित गणेश मूर्ति स्वयंभू मानी जाती है। यह गणपति मनोकामना पूर्ण करने वाले देवता के रूप में प्रसिद्ध हैं। वाई में होने वाले किसी भी विवाह की पहली निमंत्रण पत्रिका और पहली अक्षत सबसे पहले ढुंडी विनायक के सम्मुख रखी जाती है। इसके पश्चात ही उसे कुलदेवता के सामने रखा जाता है।
सदियों से चली आ रही इस परंपरा के कारण यह गणपति “अक्षता गणपति” के नाम से भी प्रसिद्ध है।
इस मंदिर की एक प्रचलित कथा है। जब प्रतापगढ़ की तलहटी में छत्रपति शिवाजी महाराज और अफज़ल खान की भेंट होने वाली थी, तब महाराज ने मन ही मन ढुंडी विनायक से प्रार्थना की थी। उन्होंने मन्नत माँगी कि यदि स्वराज्य के कार्य में सफलता मिलेगी, तो वह इस मंदिर के प्रबंधन और नित्य सेवा-अर्चन का प्रबंध करेंगे। इस भेंट में छत्रपति शिवाजी महाराज ने अफज़ल खान का वध कर सफलता प्राप्त की। उन्होंने तत्कालीन किलेदार के माध्यम से मंदिर के लिए एक पत्र भेजा। इसमें मंदिर के दीप प्रज्वलन के लिए हर साल 57 रुपये देने की व्यवस्था की गई। यह वार्षिक अनुदान छत्रपति शाहू महाराज और अंग्रेजों के शासनकाल में भी निरंतर जारी रहा। आज भी महाराष्ट्र सरकार की ओर से इस मंदिर के प्रबंधन और नित्य सेवा-अर्चन हेतु हर साल 57 रुपये प्रदान किए जाते हैं। इसके दस्तावेज़ आज भी मंदिर में सुरक्षित हैं।
एक अन्य कथा के अनुसार अफज़ल खान जब वाई प्रांत में ठहरा हुआ था, तब उसके सैनिकों ने इस क्षेत्र के अनेक मंदिरों को नष्ट कर दिया था। उसने अपने भव्य महल के निर्माण हेतु कई प्राचीन मंदिरों को ढहा दिया। उसने उन मंदिरों के पत्थरों का उपयोग भवन निर्माण में किया था। किंतु अनेक प्रयासों के बावजूद ढुंडी विनायक की प्रतापशक्ति के कारण वह इस मंदिर को नष्ट नहीं कर सका। तभी से वाई में अपने प्रवास के दौरान अफज़ल खान के महल से प्रतिदिन इस गणपति को नैवेद्य भेजा जाने लगा।
ढुंडी विनायक मंदिर हेमाडपंती शैली में निर्मित है। मंदिर के चारों ओर प्राचीर है। एक छोटे द्वार से होकर मंदिर के प्रांगण में प्रवेश किया जाता है। मंदिर ज़मीन से लगभग दो से तीन पद ऊँचे चबूतरे पर बना है। इसका निचला भाग पत्थर का है, जबकि शिखर ईंटों और चूने से निर्मित है। मंदिर में सभामंडप और गर्भगृह, ये दो मुख्य भाग हैं। सभामंडप में पत्थर के खंभे हैं। गर्भगृह के द्वार के दोनों ओर अष्टविनायक की मूर्तियाँ हैं। इसके अतिरिक्त ललाटबिंब पर भी गणेश मूर्ति अंकित है।
गर्भगृह में स्थित देवकोष्टक में सिंदूर से लिपटी गणेश मूर्ति प्रतिष्ठित है।
मूर्ति की दोनों आँखों में और ललाट के नीचे चक्र में लाल रंग का हीरा जड़ा है। मंदिर के परिक्रमा-मार्ग पर हनुमान की मूर्ति, योगी, साधक और पैरों में हाथी पकड़े हुए बाघ जैसी उत्कृष्ट शिल्पाकृतियाँ हैं। मंदिर परिसर में चार संजीवन समाधियाँ हैं। कहा जाता है कि ये मंदिर की सेवा करने वाले योगी पुरुषों की हैं। इन समाधियों का आकार तुलसी वृंदावन के समान है। प्रतिदिन गणपति को जो नैवेद्य अर्पित किया जाता है, वही नैवेद्य इन समाधियों के समीप भी रखा जाता है। मंदिर का शिखर त्रिस्तरीय है। प्रत्येक स्तर के देवकोष्टक में अनेक देवी–देवताओं की मूर्तियाँ हैं।
माघी गणेश जयंती के अवसर पर इस मंदिर में भव्य उत्सव मनाया जाता है। इस समय मंदिर परिसर को मनोहर रूप से सजाया जाता है। लगभग 50 से 55 हजार श्रद्धालुओं को इस दिन महाप्रसाद वितरित किया जाता है। इसके अतिरिक्त मंदिर में गणेश यज्ञ विधि संपन्न की जाती है। इसमें विवाह के इच्छुक युवक–युवतियों के लिए विशेष यज्ञ और संस्कार किए जाते हैं।
श्रद्धालु प्रतिदिन सुबह 6 से 11 बजे तक और सायंकाल 5 से 8 बजे तक मंदिर के गर्भगृह में जाकर ढुंडी विनायक के दर्शन कर सकते हैं। इन समयों के अतिरिक्त गर्भगृह बंद रहता है। तब श्रद्धालुगण सभामंडप से दर्शन करते हैं।