महादेव मंदिर / विठ्ठल मंदिर

भिसी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर

चिमूर तालुक्यातील भिसी हे गाव येथील भोसलेकालीन प्राचीन महादेव मंदिर विठ्ठलरुख्मिणी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. एकाच आवारात ही दोन्ही मंदिरे असून येथील महादेव मंदिरात रंगपंचमीपासून भरणारी दिवसांची यात्रा ही चिमूरमधील मोठ्या यात्रांपैकी एक आहे. या यात्रेचे वैशिष्ट्य असे की अनेक दानशूर भाविक या यात्रेच्या वेळी देणगी अन्नधान्य इतके देतात की या उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना जेवण देऊनही त्यातील अर्ध्याहून अधिक धान्य शिल्लक राहते. या मंदिराचे येथील महत्त्व भाविकांची असलेली श्रद्धा लक्षात घेऊन राज्य सरकारतर्फे २०२३ मध्ये मंदिर परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला होता.

भिसी येथील विठ्ठलरखुमाई देवस्थानाच्या अंतर्गत ही मंदिरे येतात. या परिसरात हे मंदिरउघडाउघडीचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या मोठ्या मंदिरांशिवाय येथे श्रीविष्णू, श्रीहनुमान, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत तुकडोजी गरुड यांची मंदिरे आहेत. येथील महादेव मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून जमिनीपासून सुमारे फूट उंचीवर असलेल्या जोत्यावर हे मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या सुरुवातीच्या भागात दगडी स्तंभ असून तेथून सभामंडपात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ नृसिंह, सूर्य, विष्णू इतर प्रतिमा कोरलेल्या आहेत. या सभामंडपात स्तंभ असून त्याच्या वरील भागात भारवाहक यक्षमूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडप मोकळा असून याला बाहेरील बाजूने भिंती नाहीत.

अंतराळाचे प्रवेशद्वार हे कमानीयुक्त असून द्वारपट्टीवरील दोन्ही बाजूस द्वारपालांची शिल्पे, तर वरील बाजूस कोरीव काम आहे. अंतराळात नंदी गर्भगृहात प्राचीन शिवपिंडी आहे. या शिवपिंडीसमोरील बाजूस श्रीगणेशाची मूर्ती इतर परिवार देवतेच्या मूर्ती आहेत. असे सांगितले जाते की येथील शिवपिंडीवर कुणीतरी कुऱ्हाडीने घाव घातला होता. त्याचे व्रण या शिवपिंडीवर दिसतात.

मंदिराच्या बाह्य भिंतींवर अनेक शिल्पांचे अंकन केलेले आहे. यापैकी १० तोंडे २० हात असलेल्या रावणाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तसेच रामरावण युद्ध करीत आहेत, असे शिल्प असून त्यातही रावण १० तोंडांचा, २० हातांचा दाखविला आहे. याशिवाय घोड्यांच्या रथात माणसे सारथी असे शिल्पांकन आहे. मंदिराच्या गर्भगृहावर उंच शिखर असून त्याची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

महादेव मंदिरात रंगपंचमीपासून दिवसांचा मोठा उत्सव असतो. यावेळी येथे यात्रा भरते. या उत्सवाच्या वेळी भंडारा (महाप्रसाद, जेवण) असतो. नवसपूर्तीनिमित्त अनेक भाविक या भंडाऱ्यासाठी अन्नदान करतात. याशिवाय अनेक दानशूर भाविक देणगी धान्य देतात. येथे जमा होणाऱ्या धान्याचे प्रमाण इतके असते की भंडारा होऊनही अर्ध्याहून अधिक धान्य उरते. मंदिर समितीतर्फे त्या धान्याची नंतर विक्री करण्यात येते. भोसले काळात मालगुजारी असलेल्या या गावातील गांधी घराण्याकडून दररोज या मंदिरात नैवेद्य येते, असे सांगितले जाते.

महादेव मंदिराला लागून विठ्ठलरुख्मिणीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर असलेल्या देवळीमध्ये (छोटे मंदिर) मांडी घालून बसलेली वैशिष्ट्यपूर्ण गरुड देवतेची मूर्ती आहे. विठ्ठलरुख्मिणी मंदिराचा सभामंडपही मोकळा असून गर्भगृहात एका चौथऱ्यावरील मखरात विठ्ठल रुख्मिणी यांच्या काळ्या पाषाणातील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्तींना पाठशिळा असून त्यावर कोरीव काम आहे. डोक्यावर चांदीचे मुकुट, चांदीचे डोळे, गळ्यात विविध अलंकार सुंदर वस्त्रे यामुळे या मूर्ती खुलून दिसतात. असे सांगितले जाते की हे विठ्ठल मंदिर ३०० वर्षांपूर्वी एका कासाराने बांधले आहे. मंदिराच्या बाजूला गजानन महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या मोठ्या मूर्ती असलेले गर्भगृह आहेत. दरवर्षी या मंदिरात एकनाथी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहाच्या उद्यापनाला सुमारे ५० हजार भाविक उपस्थित असतात. या सर्वांना मंदिर समितीतर्फे महाप्रसाद दिला जातो.

आवारात एका लहानशा मंदिरात संतोषी मातेची मूर्ती आहे. बाजूला भवानी मातेची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की पूर्वी येथे भवानी मातेचे मंदिर होते, पण तेथील मूर्ती भिवापूरच्या भीमादेवी मंदिरात नेण्यात आली. त्यामुळे भवानी मातेची नवीन मूर्ती तयार करून ती संतोषी माता मंदिरात स्थापित करण्यात आली आहे.

उपयुक्त माहिती:

  • चिमूरपासून १७ किमी, तर चंद्रपूरपासून १२९ किमी अंतरावर
  • चिमूरपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात न्याहरीची सुविधा आहे; परंतु निवासाची नाही
Back To Home