महादेव मंदिर / पार्वती माता मंदिर

नेरी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर

विदर्भातील प्राचीन देवालयांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील मार्कण्डेय मंदिरालाचक्रवर्ती’, तर चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील बालाजी मंदिरालासम्राटअशी उपमा दिली जाते. गांधीजींचीचलेजावची चळवळ याच चिमूरमधून सुरू झाली होती. त्यामुळे विदर्भातील चिमूर हे ऐतिहासिक धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. चिमूरमध्ये १२ व्या १३ व्या शतकातील अनेक मंदिरे आहेत. यामध्ये चिमूर तालक्यातील नेरी येथील प्राचीन महादेव मंदिर त्याच्यापासून काही अंतरावर असलेले पार्वती माता मंदिर हे या तालुक्याचे वैभव मानले जाते.

नेरी हे गाव चिमूर तालुक्यातील चिमूरनवरगाव मार्गावर आहे. येथील जुनी नेरी भागात असलेल्या १२व्या शतकातील महादेव मंदिराचे वर्णन हेन्री कझिन्स (Henry Cousens) यांनी आपल्या लिखाणात केलेले आहे. हेन्री हे २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतीय पुरातत्त्व विभागात कार्य करणारे एक ब्रिटिश शास्त्रज्ञ होते. त्यात त्यांनी या मंदिराच्या स्थापत्यशैलीचे विवेचन केले आहे. या मंदिराची शैली हेमाडपंती असली तरी त्यावर चालुक्यकालीन स्थापत्यशैलीचा प्रभाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पूर्वाभिमूख असणाऱ्या या मंदिराची रचना मूखमंडप, अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. चिमूर तालुक्यातील महादवाडी येथील प्राचीन शिवमंदिर आणि हे मंदिर यामधील स्थापत्यरचनेत साम्य आहे.

मंदिराच्या मुखमंडपात दगडी स्तंभ आहेत. सभामंडपामध्ये १६ स्तंभ असून त्यापैक स्तंभ हे मध्यभागी तर उर्वरित १२ स्तंभ बाजुच्या भागात आहेत. या स्तंभांवर चारही बाजुने वरपर्यंत अनेक शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. सभामंडपाच्या उजवीकडे आणि डावीकडे आणखी उपमंडप आहेत. या दोन्ही उपमंडपांतून बाहेर जाण्यासाठी मार्ग आहेत. येथील सभामंडप उपमंडपांमध्ये अर्धभिंती असून त्यावर ओटे आहेत. सभामंडपातून अंतराळाकडे जाताना अंतराळाच्या प्रवेशद्वारावर नंदी असून अंतराळाच्या दोन्ही बाजुच्या भिंतींमध्ये देवकोष्टके आहेत.

येथील गर्भगृह अंतराळापासून काहीसे खोलवर आहे त्यात जाण्यासाठी पायऱ्या उतराव्या लागतात. गर्भगृहात शिवपिंडी आहे. शिवपिंडीमागील देवकोष्टकात अन्नपूर्णा माता त्याच्या बाजुला श्रीगणेश नागशिल्प यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या शिखराचा नंतरच्या काळात जिर्णोद्धार करण्यात आला आहे. असे सांगितले जाते की पूर्वी या शिखरामध्ये एक खोली होती तेथे बसून साधू वा ऋषी तपसाधना करीत असत.

मंदिराचा मुखमंडप आणि अर्धमंडपांच्या बाह्य भिंतींवर ब्रह्मदेव, विष्णू अवतार, वामन, शीवप्रतिमा, अर्जूनाचे लक्षवेध, नटराज, नृत्यगणेश, सरस्वती, पार्वती, गरुड, हनुमान, मुरलीधर, भैरव, महिषासूर मर्दिनी, चामुंडा, अनेक देवीदेवता, विविध अप्सरा, विणावादक, बासरीवादक, मृदुंगवादक, सूरसुंदरी, मल्लयुद्धाचा प्रसंग, आई मूल आणि काही मैथून शिल्पे अशी शेकडो शिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पांमुळे या मंदिराचा बाह्यांग वैशिष्ट्यपूर्ण भासतो. सध्या हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून पुरातत्व विभागाकडून मंदिराभोवती तारेचे कुंपण केलेले आहे. सकाळी ते सायंकाळी पर्यंत या मंदिरात जाऊन भाविकांना दर्शन घेता येते.

या मंदिरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर पार्वती मातेचे मंदिर आहे. आज जेथे मंदिर आहे त्याच ठिकाणी खोदकाम करताना पार्वती मातेची मूर्ती जमिनीत सापडली होती. त्या जागेवर १९६५ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते पार्वती मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्याच्या बाजुने मंदिर बांधण्यात आले. मंदिराच्या गर्भगृहात असलेली पार्वती मातेची मूर्ती काळ्या पाषाणाची असून तिची उंची फूट इंच रुंदी फूट इंच इतकी आहे. चतुर्भुज असलेल्या या मूर्तीच्या वरील दोन हातांपैकी एकात कमळामधे शिवलिंग दुसऱ्या हातात गणपतीची प्रतिमा आहे. खालील दोन हातांमध्ये अक्षमाळा कमंडलू आहेत.

डोक्यावर मुकुट, कानात कुंडले मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे. या मूर्तीच्या पायापाशी सेविका डावीकडील पायाजवळ बसलेला सिंह आहे. सिंहाच्या वरील भागात मोरावर आरूढ कार्तिक स्वामी कोरलेले आहेत. ही मूर्तीही १२व्या शतकातील असावी, असे सांगितले जाते. या पार्वती मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

उपयुक्त माहिती:

  • चिमूरपासून किमी, तर चंद्रपूरपासून ११२ किमी अंतरावर
  • चिमूरपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home