
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात असलेली दोन महादेवांची स्थाने प्रसिद्ध आहेत. त्यातील एक स्थान हे जागृत महादेव मंदिर, तर याच मंदिरापासून जवळ असलेल्या दुसऱ्या स्थानाची ‘अपूर्ण शिवालय’ अशी ओळख आहे. त्यातील जागृत महादेव मंदिर हे भोसलेकालीन आहे. या मंदिरात शिवपिंडीशिवाय असलेली अष्टभुजा गणेश मूर्ती आणि तीन पायांची वामन मूर्ती हे येथील आकर्षण आहे. अपूर्ण शिवालयामध्ये सतराव्या शतकातील विविध देवतांच्या १५ अतिभव्य अशा दगडी मूर्ती आहेत.
भोसलेकालीन महाराणी हिराई यांचे दिवाण बापूजी वैद्य यांनी चंद्रपूरमधील बाबुपेठ परिसरात १७०४ ते १७१९ या कालावधीत संपूर्ण दगडात हेमाडपंथी रचनेचे महादेवाचे मंदिर बांधले. तेव्हापासून हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरातील हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचा आकार हा शंखाप्रमाणे आहे. मंदिरासमोर एका मोठ्या चौथऱ्यावर सुमारे १५ फूट उंचीचा गरुड खांब असून त्यावर दशावताराच्या प्रतिमा आहेत.
मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मुखमंडपात विशेष नक्षीकाम नसले तरी मंदिराच्या भिंतींमधील कोष्टकांमध्ये अग्निदेव, यम, नैऋत्य देवता, वरुण, नाग, अन्नपूर्णा माता, श्रीगणेश, वायू देवता, कुबेर, ईशान्य व इंद्र यांच्या प्राचीन मूर्ती आहेत.
सभामंडपाच्या मध्यभागी नंदीची मूर्ती तर गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या कोष्टकांपैकी एकामध्ये अष्टभुजा गणेश, तर दुसऱ्या कोष्टकात ३ पायांची वामन मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेशमूर्तीऐवजी कीर्तिमुख कोरलेले आहे, हेही येथील वेगळेपण आहे. सभामंडपाला वरून अष्टकोनी आकार दिला आहे. गर्भगृहात अखंड काळ्या पाषाणातील शिवपिंडी असून गाभाऱ्यातील भिंतींमधील कोष्टकांमध्येही काही मूर्ती आहेत. या मंदिराच्या गर्भगृहातील विशिष्ट रचनेमुळे येथे केलेला शंखध्वनी व ओंकार जपाचा प्रतिध्वनी ऐकू येतो. महादेव मंदिराच्या शेजारीच श्रीगणेशाचे मंदिर आहे.
दरवर्षी महाशिवरात्री व श्रावणी सोमवारी होणाऱ्या उत्सवांबरोबरच येथे बैलपोळा उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या मंदिराची विशिष्ट रचना व तेथील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती यांमुळे सरकारकडून ते संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. या मंदिरावर असलेली भाविकांची श्रद्धा व दर्शनासाठी दिवसेंदिवस वाढणाऱ्या भाविकांच्या संख्येचा विचार करून महाराष्ट्र सरकारतर्फे येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांसाठी व परिसराच्या विकासासाठी या मंदिराला मार्च २०२४ मध्ये १,५८,००,०००/- (एक कोटी अठ्ठावन्न लाख) रुपयांचा निधी दिला आहे.
बाबू पेठेतील या महादेव मंदिरापासून पायी १० मिनिटांच्या अंतरावर राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागे एक अपूर्ण शिवालय आहे. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे येथील अतिभव्य दशमुखी दुर्गेची मूर्ती. तब्बल २६ फूट लांब, १८ फूट रुंद व ३ फूट जाडीची ही मूर्ती आहे. तिला १० तोंडे, १० हात आणि १० पाय आहेत. येथील मूर्तींमधील ही सर्वांत मोठी मूर्ती असून ती जमिनीवरच ठेवलेली आहे. याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग व त्यासमोरील भव्य नंदी, श्रीविष्णूंचा मत्स्यावतार, महिषासुरमर्दिनी, कूर्मावतार, हत्ती, श्रीगणेश, मारुती, कालभैरव, महादेव, दिगंबर शिव, गरुड, द्वारपाल अशा एकूण १५ मूर्ती आहेत. या सर्व मूर्ती ४०० वर्षांपूर्वीच्या आहेत. येथील दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिकृती नागपूर येथील संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आहे.
ऐतिहासिक नोंदींनुसार, १७ व्या शतकात राजा धुंड्या रामशाहच्या काळात शिवभक्त असलेले धनिक रायप्पा कोमटी यांना येथे श्रीशंकराचे भव्य मंदिर उभारायचे होते. त्यासाठी त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण अशी भव्य दगडी शिवपिंडी तयार केली. या शिवपिंडीसमोर नंदीची भव्य मूर्तीही आहे. याशिवाय मंदिरात ठेवण्यासाठी वर उल्लेख केल्याप्रमाणे इतर मूर्ती देशातील विविध कारागिरांना येथे आणून त्यांच्याकडून करवून घेतल्या. या सर्व मूर्ती तयार झाल्यानंतर मंदिर बांधण्याचा त्यांचा मानस होता; परंतु त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे येथे होणारे भव्य शिवालय हे अपूर्णच राहिले. तेव्हापासून या क्षेत्राला ‘अपूर्ण शिवालय’ असे म्हटले जाते. रायप्पा यांच्यानंतर पुढे मंदिराची जबाबदारी कोणीही न स्वीकारल्याने या मूर्ती शेकडो वर्षे दुर्लक्षित राहिल्या. सध्या या सर्व मूर्ती व येथील परिसर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे; परंतु भाविक व पर्यटकांना येथे जाऊन या प्राचीन मूर्ती पाहता येतात.

चंद्रपुर शहर के बाबूपेठ क्षेत्र में महादेव के दो स्थान प्रसिद्ध हैं। इनमें से एक स्थान जागृत महादेव मंदिर है। इसके पास स्थित दूसरे स्थान को ‘अपूर्ण शिवालय’ के नाम से जाना जाता है। इनमें जागृत महादेव मंदिर भोसलेकालीन है। इस मंदिर में शिवलिंग के साथ अष्टभुजा गणेश की पाषाण मूर्ति और त्रिपाद वामन पाषाण मूर्ति विशेष आकर्षण हैं। अपूर्ण शिवालय में सत्रहवीं शताब्दी की विभिन्न देवताओं की १५ भव्य पाषाण मूर्तियाँ हैं।
भोसलेकालीन महारानी हिराई के दीवान बापूजी वैद्य ने चंद्रपुर के बाबूपेठ क्षेत्र में सन् १७०४ से १७१९ के बीच संपूर्ण पाषाण से हेमाडपंती शैली का महादेव मंदिर निर्मित कराया। तभी से यह स्थान जागृत देवस्थान के रूप में प्रसिद्ध है। यह मंदिर क्षेत्र के हजारों श्रद्धालुओं का आस्था-केंद्र है। इस मंदिर की संरचना शंख के आकार की है। मंदिर के सम्मुख एक विशाल चबूतरे पर लगभग १५ पद ऊँचा गरुड़ स्तंभ है। इस स्तंभ पर दशावतार की पाषाण मूर्तियाँ उत्कीर्ण हैं। मंदिर की संरचना में मुखमंडप, सभामंडप और गर्भगृह हैं। मुखमंडप में विशेष नक्काशी नहीं है। मंदिर की दीवारों में निर्मित देवकोष्टकों में अग्निदेव, यम, नैऋत्य देवता, वरुण, नाग,
अन्नपूर्णा माता, श्रीगणेश, वायुदेवता, कुबेर, ईशान्य व इंद्र की प्राचीन पाषाण मूर्तियाँ हैं।
सभामंडप के मध्य में नंदी की पाषाण मूर्ति है। गर्भगृह के द्वार की दोनों ओर बने देवकोष्टकों में एक ओर अष्टभुजा गणेश की पाषाण मूर्ति है। दूसरी ओर त्रिपाद वामन पाषाण मूर्ति है। गर्भगृह के प्रवेशद्वार के ललाटबिंब पर गणेश की पाषाण मूर्ति के स्थान पर कीर्तिमुख उत्कीर्ण है। यह यहाँ की विशेषता है। सभामंडप ऊपर से अष्टकोणीय आकार का है। गर्भगृह में अखंड काले पाषाण का शिवलिंग स्थापित है। गर्भगृह की दीवारों के देवकोष्टकों में भी कुछ पाषाण मूर्तियाँ हैं। गर्भगृह की विशेष संरचना के कारण यहाँ किया गया शंखनाद और ओमकार जाप का स्वर गूँजता है। महादेव मंदिर के पास ही श्रीगणेश का मंदिर भी है।
हर साल महाशिवरात्रि और श्रावण सोमवार के पर्वों के साथ-साथ यहाँ बैलपोला उत्सव भी बड़े पैमाने पर मनाया जाता है। इस मंदिर की विशिष्ट संरचना और अनोखी पाषाण मूर्तियों के कारण इसे सरकार ने संरक्षित स्मारक घोषित किया है। श्रद्धालुओं की बढ़ती संख्या और दर्शन हेतु आने वाले श्रद्धालुओं की सुविधा को
ध्यान में रखते हुए महाराष्ट्र सरकार ने मार्च २०२४ में इस मंदिर के परिसर विकास हेतु कार्य आरंभ किया है। सरकार ने श्रद्धालुओं की सुविधाओं के लिए १,५८,००,००० रुपये (एक करोड़ अठ्ठावन लाख रुपये) की निधि प्रदान की है।
बाबूपेठ के इस महादेव मंदिर से पैदल १० मिनट की दूरी पर, राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज के पीछे अपूर्ण शिवालय स्थित है। यहाँ की विशेषता विशाल दशमुखी दुर्गा की पाषाण मूर्ति है। यह पाषाण मूर्ति २६ पद लंबी, १८ पद चौड़ी और ३ पद मोटी है। इसमें १० चेहरे, १० हाथ और १० पैर हैं। यह यहाँ की सबसे बड़ी पाषाण मूर्ति है। इसे भूमि पर ही स्थापित किया गया है। इसके अलावा यहाँ विशिष्ट शिवलिंग व उसके सम्मुख भव्य पाषाण नंदी, श्रीविष्णु का मत्स्यावतार, महिषासुरमर्दिनी, कूर्मावतार, हाथी, श्रीगणेश, हनुमान, कालभैरव, महादेव, दिगंबर शिव, गरुड़ और द्वारपाल सहित कुल १५ पाषाण मूर्तियाँ हैं। ये सभी पाषाण मूर्तियाँ लगभग ४०० साल पुरानी हैं। यहाँ की दुर्गादेवी की पाषाण मूर्ति की प्रतिकृति नागपुर संग्रहालय में सुरक्षित रखी गई है।
ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार, १७वीं शताब्दी में राजा धुंड्या रामशाह के काल में शिवभक्त धनाढ्य रायप्पा कोमटी ने यहाँ श्रीशंकर का भव्य मंदिर बनाने की योजना बनाई थी। इसके लिए उन्होंने विशाल शिवलिंग और उसके सम्मुख नंदी की भव्य पाषाण मूर्ति बनवाई। साथ ही मंदिर में स्थापित करने हेतु अन्य पाषाण मूर्तियाँ देश के विभिन्न भागों से शिल्पकारों को बुलाकर उनसे बनवाई गईं। इन सभी पाषाण मूर्तियों के तैयार होने के बाद भव्य मंदिर बनाने का उनका विचार था। परंतु उनके असामयिक निधन से यह शिवालय अधूरा ही रह गया। तभी से इस स्थान को ‘अपूर्ण शिवालय’ कहा जाने लगा। रायप्पा के निधन के बाद किसी ने मंदिर की जिम्मेदारी नहीं ली। इससे ये पाषाण मूर्तियाँ सदियों तक उपेक्षित रहीं। वर्तमान में यह संपूर्ण स्थल और पाषाण मूर्तियाँ पुरातत्त्व विभाग के अधीन हैं। श्रद्धालु और पर्यटक यहाँ आकर इन प्राचीन पाषाण मूर्तियों का दर्शन कर सकते हैं।