‘काळ्या सोन्याचे शहर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरमधील अंचलेश्वर महादेव मंदिर हे विदर्भातील प्राचीन मंदिरांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. झरपट नदीच्या तीरावर वसलेल्या या मंदिराचे चंद्रपूरच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, चंद्रपूर हे शहर याच मंदिराच्या महात्म्यामुळे वसले आणि ते पुढे विस्तारून आज एक मोठे शहर झाले आहे. येथील वैशिष्ट्य असे की मंदिराच्या सभोवती जे कोरीव काम आहे, त्यात कीर्तिमुखाच्या (एक शीवभक्त राक्षस) तब्बल १८० भावमुद्रा कोरलेल्या असून प्रत्येक मुद्रा ही वेगळी आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की चंद्रपूर शहर आज जेथे वसले आहे तेथे ५०० वर्षांपूर्वी सर्वत्र घनदाट जंगल होते. या भागात तेव्हा गोंड राजाची सत्ता होती. वर्धा नदीवरील बल्लारशाह म्हणजेच आजचे बल्लारपूर ही या राज्याची राजधानी होती. त्यावेळी राजा बल्लारशाह गादीवर होते. या राजाला त्वचारोग असल्याने त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत होत्या, ज्याला स्थानिक भाषेत खांडूक म्हणायचे.
म्हणून या राजाला ‘खांडक्या बल्लारशाह’ असे नाव पडले. विविध उपचार करूनही अंगावरील जखमा कमी होत नव्हत्या. एके दिवशी राजा शिकारीसाठी येथील झरपट नदीच्या परिसरात आला असता त्याला या परिसरात एक पाण्याने भरलेले कुंड दिसले. राजाने या कुंडातील पाणी पिऊन ते चेहऱ्यालाही लावले. संध्याकाळी महालात गेल्यावर त्याची राणी हिरातानी हिच्या लक्षात आले की राजाच्या चेहऱ्यावरील जखमा बऱ्या झाल्य होत्या व अंगावरील जखमांचे प्रमाणही कमी झाले होते.
झरपट नदी किनाऱ्यावरील कुंडातील पाणी प्यायल्याने व ते अंगाला लावल्याने आपल्या जखमा बऱ्या झाल्या होत्या, हे राजाला समजले. दुसऱ्या दिवशी राणीसह तेथे जाऊन राजाने त्या कुंडात स्नान केले व तो पूर्णपणे बरा झाला. या पाण्यात काहीतरी चमत्कारिक गुण आहेत हे राजा–राणीने हेरले व येथील जंगल साफ करून घेतले. हिरातानी शिवभक्त असल्याने तिने राजाला सांगून या ठिकाणी लहानसे शिव मंदिर बांधले. या मंदिराचे बांधकाम सुरू असताना येथून काही अंतरावर महाकालीची मूर्ती सापडल्याने तेथे महाकाली मंदिरही बांधण्यात आले.
त्यानंतर या परिसरात किल्ला बांधून बल्लारशाह राजाने येथे नगरी वसविण्याचे ठरविले व त्यानुसार या नगरीला ‘चांदा’ हे नाव देण्यात आले. हेच आजचे चंद्रपूर शहर होय व ही दोन्ही मंदिरे चंद्रपूरमधील महत्त्वाची तिर्थस्थाने आहेत.
काही वर्षांनंतर गादीवर आलेल्या राजा वीरशाह यांची पत्नी राणी हिराई यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार व नूतनीकरण केले. आजचे अंचलेश्वर मंदिराचे बांधकाम हे राणी हिराई यांच्या काळातील आहे. मंदिराच्या बाह्य भागावर विविध प्रकारची आकर्षक शिल्पे आहेत. या मंदिराच्या शेजारीच राणी हिराई यांनी राजा वीरशाह यांची भव्य समाधी बांधली. १८ व्या शतकाच्या शेवटी गोंड साम्राज्य भोसले यांच्या ताब्यात गेले. भोसले यांच्या काळातही या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मूळ मंदिराच्या समोरील भागात भोसले काळात सभामंडप बांधले गेले. आजही हे मंदिर उत्तम स्थितीत उभे आहे. चंद्रपूरमधील हजारो भाविकांची या मंदिरावर श्रद्धा आहे.
हे मंदिर शिल्पमंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे. मंदिराच्या सभोवती जी कोरीव शिल्पे आहेत, त्यामध्ये विविध शिल्पांसोबतच कीर्तिमुखाच्या शेकडो भावमुद्रा कोरण्यात आल्या आहेत. १५–१६ व्या शतकातील सुरेख आणि वैविध्यपूर्ण कलाकुसर येथे पाहायला मिळते. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप नंतरच्या काळातील असला, तरी अंतराळ व गर्भगृहात प्राचीनत्वाच्या खुणा जागोजागी दिसतात. अंतराळात नंदीची मूर्ती असून अंतराळापासून ५ ते ६ फूट खोल असलेल्या गाभाऱ्यात वैशिष्ट्यपूर्ण शिवपिंडी आहे. ही शिवपिंडी म्हणजे या गर्भगृहातील नैसर्गिक जलकुंड आहे. या पिंडीच्या आत जिवंत झरा असून त्यातून पाणी वाहत असते. या मंदिर परिसरात हनुमान मंदिर, संतोषी माता अशी मंदिरे आहेत. महाशिवरात्रीला व श्रावणी सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते.
‘काले सोने के नगर’ के रूप में प्रसिद्ध चंद्रपुर का अंचलेश्वर महादेव मंदिर विदर्भ के प्राचीन मंदिरों में एक प्रमुख तीर्थस्थान माना जाता है। झरपट नदी के तट पर स्थित इस मंदिर का चंद्रपुर के इतिहास में विशेष महत्व है। ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार चंद्रपुर नगर इसी मंदिर की महिमा के कारण बसाया गया। आगे चलकर यह एक बड़ा नगर बना। इसकी विशेषता यह है कि मंदिर के चारों ओर की गई नक्काशी में कीर्तिमुख की लगभग 180 भावमुद्राएँ अंकित हैं। कीर्तिमुख एक शिव भक्त राक्षस है। यहाँ प्रत्येक मुद्रा भिन्न है।
रानी हिरातानी शिव भक्त थीं। इसलिए उन्होंने राजा से कहकर वहाँ एक छोटा शिव मंदिर बनवाया। मंदिर का निर्माण कार्य चल रहा था। तभी निकट ही महाकाली की पाषाण मूर्ति मिली। इस कारण वहाँ महाकाली मंदिर भी बनाया गया। इसके बाद राजा बल्लारशाह ने किला बनवाकर वहाँ नगर बसाने का निश्चय किया। उन्होंने इस नगर का नाम ‘चांदा’ रखा। यही वर्तमान चंद्रपुर शहर है। ये दोनों मंदिर चंद्रपुर के प्रमुख तीर्थस्थान हैं।
कुछ वर्षों बाद सिंहासन पर आए राजा वीरशाह की पत्नी रानी हिराई ने इस मंदिर का जीर्णोद्धार एवं नूतनीकरण किया। वर्तमान अंचलेश्वर मंदिर का निर्माण रानी हिराई के समय का है। मंदिर के बाहरी भाग पर अनेक आकर्षक शिल्प हैं।
मंदिर के सम्मुख ही रानी हिराई ने राजा वीरशाह की भव्य समाधि बनवाई। 18वीं शताब्दी के अंत में गोंड साम्राज्य भोसले शासकों के अधीन आ गया। भोसले शासनकाल में भी इस मंदिर का जीर्णोद्धार किया गया। मूल मंदिर के सम्मुख भोसले काल में सभामंडप बनाया गया। आज भी यह मंदिर उत्तम स्थिति में है। हजारों श्रद्धालुगण इस मंदिर के प्रति श्रद्धा रखते हैं।
यह मंदिर शिल्पमंदिर के रूप में भी प्रसिद्ध है। मंदिर के चारों ओर की गई नक्काशी में विभिन्न शिल्पों के साथ कीर्तिमुख की सैकड़ों भावमुद्राएँ भी हैं। 15-16वीं शताब्दी की मनोहर और विविधतापूर्ण कलाकृतियाँ यहाँ देखी जा सकती हैं। मंदिर की संरचना में सभामंडप, अंतराल और गर्भगृह सम्मिलित हैं। सभामंडप भले ही बाद का हो। अंतराल और गर्भगृह में प्राचीनता के चिह्न स्पष्ट दिखाई देते हैं।
अंतराल में नंदी की पाषाण मूर्ति है। वहाँ से 5 से 6 पद नीचे गर्भगृह में विशेष शिवलिंग है। यह शिवलिंग वास्तव में गर्भगृह का प्राकृतिक जलकुंड है। इस शिवलिंग के भीतर झरना है। इससे जल प्रवाहित होता रहता है। मंदिर परिसर में हनुमान मंदिर और संतोषी माता मंदिर आदि भी हैं। महाशिवरात्रि और श्रावण सोमवार को यहाँ भारी संख्या में श्रद्धालुगण आते हैं।