देवी मंदिर

ऋषी तलाव लेणी

भटाळा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर

महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात वसलेले चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा हे गाव ऐतिहासिक धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. हे गाव . . ४५ व्या सालापासून अस्तित्वात होते, हे येथील शिल्पावरून कळते. ‘शिल्पग्रामअशी या गावाची ख्याती आहे. असे सांगितले जाते की प्राचीन काळी या गावात कोरलेली दगडी शिल्पे परदेशातही पाठविली जात असत. येथे असलेले प्राचीन भवानी मंदिर प्रसिद्ध असून या मंदिराच्या बाह्यभागावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. या मंदिराचा वैशिष्ट्यपूर्ण सभामंडप शिखर येथील आकर्षण आहेत

भटाळा गावापासून किमी अंरावर असलेले भवानी माता मंदिर तलावाच्या बाजूला असून सर्व बाजूने त्याला तटबंदी आहे. काहीसे उंचावर असलेल्या या मंदिराच्या तटबंदीला प्रवेशद्वारे आहेत. त्यातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर लालसर पिवळ्या वालुकामय दगडात बांधलेले भवानी मातेचे छोटेखानी; परंतु वैशिष्ट्यपूर्ण मंदिर दिसते. मंदिर परिसरात सर्वत्र फरसबंदी असून आजूबाजूच्या निसर्गसंपन्न वातावरणामुळे हे मंदिर खुलून दिसते.

मंदिराच्या प्रवेशद्वारावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम असून द्वारपट्टीवर वरच्या भागात देवकोष्टके आहेत. या प्रत्येक देवकोष्टकांमध्ये विविध देवतांच्या मूर्ती आहेत. द्वारपट्टीच्या दोन्ही बाजूला वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असून खालच्या भागात दोन्ही बाजूला द्वारपाल म्हणून सेवकसेविका आहेत. सभामंडप गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. या सभामंडपात १० दगडी खांब आहेत. या खांबांवर विशेष अशी कलाकुसर नसली तरी खालच्या बाजूने चौकोनी, मधील बाजूस अष्टकोनी वरील बाजूस गोलाकार अशी त्यांची रचना आहे. येथील सभामंडपाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून येथील प्रत्येक खांबांमध्ये खालच्या बाजूने साधारणतः ते . फूट उंचीचा ओटा असून पूर्ण सभामंडपातील खांब हे खालच्या ओट्यांनी एकमेकांशी जोडलेले (कक्षासनयुक्त) आहेत. त्यामुळे ज्या प्रमाणे दरबार भरतो अथवा सभा भरते त्याप्रमाणे या मंदिराच्या सभामंडपाची रचना आहे. अशा प्रकारच्या सभामंडपालाशुदमंडपम्हटले जाते. सभामंडपाची अशी रचना इतरत्र सहसा कुठे आढळत नाही.

सभामंडपाच्या सुरुवातीच्या भागात दोन्ही बाजूला मोठ्या मूर्ती आहेत. त्यापैकी एक महिषासुरमर्दिनीची, तर दुसरी गणेशाची आहे. गणेश मूर्तीच्या बाजूला भवानी देवीची जुनी मूर्ती आहे. असे म्हटले जाते की ही मूर्तीच पूर्वी येथील गर्भगृहात होती; परंतु ती खंडित झाल्याने गर्भगृहात नवीन मूर्ती बसविण्यात आली तेथील मूळ मूर्ती सभामंडपातील गणेशमूर्तीजवळ ठेवण्यात आली आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर काही प्रमाणात कलाकुसर असून ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती या मूर्तीच्या दोन्ही बाजूला चक्रे कोरलेली आहेत. सध्या गाभाऱ्यात असलेली मूर्ती ही भटाळा गावातीलच एका कारागिराने काही वर्षांपूर्वी बनविलेली आहे.

या मंदिराच्या बाह्यभिंतींवरील बहुतांश शिल्पे ही सुस्थितीत असून त्यामध्ये विविध रूपांतील शिवप्रतिमा, देवींच्या प्रतिमा, वराह, विष्णू, गजशार्दूल, विविध व्याल (या प्रकारच्या शिल्पांमध्ये हत्ती, घोडा, मेंढा यांसारख्या प्राण्यांचे केवळ मुख असून त्याखाली काल्पनिक प्राणी वा पक्ष्याचा आकार असतो. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची गजव्याल, अश्वव्याल, शरभव्याल अशी ओळख पटविली जाते) धनुर्धारी, भालाधारी मुष्टियोद्धे, विविध मुद्रेतील अप्सरा बासरीमृदुंगवादक सूरसुंदरींचा या शिल्पांमध्ये समावेश आहे. इंद्र, अग्नी, यम, निऋती, वरुण, वायू, कुबेर आणि ईशान या अष्टदिक्पालांची ( दिशांचे पालन करणारे देव) शिल्पेही येथे कोरलेली आहेत. याशिवाय येथील बाह्यभिंतीवर अनेक मैथुनशिल्पेही आहेत.

या मंदिराच्या शिखराची रचना ही काहीशी दक्षिणेकडील मंदिरांप्रमाणे असल्याचे जाणवते. या शिखरामध्ये एक कक्ष असून त्याचा वापर साधना तपश्चर्या करण्यासाठी होत असावा. शिखरावरील या कक्षाच्या द्वारशाखेवरही नक्षीकाम असून खालील बाजूला सेविकांची शिल्पे कोरलेली आहेत. या मंदिराची निर्मिती अकराव्या ते बाराव्या शतकातील असली तरी त्याचा जीर्णोद्धार नागपूरकर भोसले यांच्या काळात झाल्याची नोंद आहे. सध्या हे मंदिर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे. नवरात्रीचे दिवस चैत्र महिन्याच्या दर मंगळवारी येथे यात्रा भरते. यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात

या भवानी मंदिरापासून . ते किमी अंतरावर ऋषी तलाव (ऋषी टाके) हे स्थान आहे. या तलावाच्या किनाऱ्यावर अनेक लेण्या असून त्यांत शिवपिंडी, सूर्यमूर्ती, महिषासुरमर्दिनी, विष्णू, गणपती, वेटोळे घातलेला नाग आणि शिवप्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. यातील काही लेण्या या मूर्तीविरहित, तर काही गाळाने भरलेल्या आहेत. या लेण्यांच्या वैशिष्ट्यांवरून त्या चौथ्या ते सातव्या शतकातील असाव्यात, असा अभ्यासकांचा दावा आहे. त्यातील शिव, विष्णू सूर्यप्रतिमा या वाकाटक कालीन, तर इतर काही प्रतिमा राष्ट्रकुट कालीन असाव्यात, असे सांगितले जाते.

उपयुक्त माहिती:

  • वरोरापासून १३ किमी, तर चंद्रपूरपासून ९५ किमी अंतरावर
  • वरोरापासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची व्यवस्था नाही
Back To Home