रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात, मुंबई-गोवा महामार्गालगत, गडब गावाच्या हद्दीमध्ये एका टेकडीवर आई काळंबादेवीचे मंदिर वसलेले आहे. या मंदिराचा इतिहास स्थानिक परंपरेत अनेक पिढ्यांपासून चालत आलेला असून ही देवी गडब गावाची ग्रामदेवता आहे. ऐतिहासिक संदर्भांनुसार, कल्याणचा खजिना घेऊन जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे या मंदिरात काही काळ थांबले होते. चैत्री पौर्णिमेला भरणारी मोठी जत्रा आणि त्यातील उंच देवकाठी स्पर्धा हे या मंदिराचे मुख्य सांस्कृतिक वैशिष्ट्य मानले जाते.
या मंदिराविषयीची पौराणिक आख्यायिका काळ (काळंब) नावाच्या राक्षसाशी निगडित आहे. प्राचीन काळी या राक्षसाने परिसरात मोठा धुमाकूळ घातला होता. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ऋषीमुनींनी आदिशक्तीची कठोर आराधना केली. त्यांच्या तपश्चर्येनंतर आदिशक्ती प्रकट झाली आणि तिने काळ राक्षसाचा वध करून ग्रामस्थांना संकटातून मुक्त केले. राक्षसाचा वध केल्यानंतर देवी ज्या टेकडीवर विसावा घेण्यासाठी थांबली, त्या जागेला ‘देवीचा माळ’ म्हणून ओळखले जाते. या विजयामुळेच देवीला काळंबादेवी असे नाव पडले. कालांतराने गावातील पाटील कुटुंबातील एकाला देवीची एक स्वयंभू शिळा सापडली आणि त्यांनी त्याच ठिकाणी देवीची प्राणप्रतिष्ठा केली. आजही येथील पाटील कुटुंबियांमध्ये देवीवर असलेल्या श्रद्धेपोटी हिरवे किंवा काळे कपडे वापरले जात नाहीत. देवीच्या पूजनाचा आणि देवकाठी उभारण्याच्या पूजेचा मानही याच कुटुंबाकडे असतो.
काळंबादेवीचे हे मंदिर ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कल्याणचा खजिना लुटून आणताना छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काही काळ या मंदिरात विसाव्यासाठी थांबल्याचे ऐतिहासिक संदर्भ दिले जातात. तसेच सन १९४४ मध्ये देशात पसरलेली प्लेगची साथ असो वा अलीकडील काळातील कोरोनाची महासाथ, देवीच्या भक्तीमुळे गडब पंचक्रोशीवर कोणतेही संकट आले नाही, अशी ग्रामस्थांची गाढ श्रद्धा आहे. गावकरी श्रद्धेने सांगतात की देवी आजही गावातून फेरफटका मारताना अनेकांना दिसते. हिरवे पातळ, चोळी, कपाळभर कुंकू, डोक्यावर कांबळी आणि हातात घुंगराची काठी असा देवीचा वेष असतो.
मुंबई-गोवा महामार्गालगत गडब गावाजवळ एका मध्यम उंचीच्या टेकडीवर हे मंदिर स्थित आहे. महामार्गापासून काहीशी चढण पार करून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणातून १८ ते २० पायऱ्या चढून मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. पायरी मार्गाच्या दोन्ही बाजूला सुंदर उद्याने विकसित करण्यात आली असून त्यात अनेक शोभेची व फुलझाडे आहेत. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मुखमंडपातील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीजवळ देवकाठी स्पर्धांमध्ये जिंकलेले अनेक चषक मांडलेले आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखेवर नक्षीकाम व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात मध्यभागी काळंबादेवीची तांदळा रूपातील शेंदूरचर्चित मूर्ती विराजमान आहे. त्यावर चांदीचा मुखवटा चढविलेला असतो.
मंदिरात नवरात्रोत्सव आणि चैत्र महिन्यातील यात्रा हे दोन प्रमुख उत्सव अत्यंत उत्साहात साजरे होतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेला गावातून देवीची पालखी वाजतगाजत मंदिरात आणली जाते आणि घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो. या नऊ दिवसांत मंदिरात आरत्या, भजने आणि पाचव्या व सातव्या माळेला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काळंबादेवीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे चैत्र शुद्ध चतुर्दशीला भरणारी मोठी यात्रा. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर देवीचा अभिषेक करून तिला नवीन साडी आणि अलंकारांनी सुशोभित केले जाते. दुपारी गावातील मरूदेवी मंदिरापासून देवीची पालखी आणली जाते आणि यात्रेचा मुख्य सोहळा सुरू होतो. या यात्रेदरम्यान भाविक स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या वजनाची ‘तुला’ करून आपला नवस फेडतात.
येथील देवकाठी स्पर्धा हे या यात्रेचे विशेष आकर्षण आहे. अनेक बांबू एकमेकांना कापड आणि दोरखंडाच्या साहाय्याने बांधून ५० ते १०० फूट उंच देवकाठ्या तयार केल्या जातात. ही देवकाठी खालच्या बाजूला जाड आणि वरच्या टोकाला निमुळती असते. त्यावर विविध रंगांची कापडे आणि ध्वज लावले जातात. सुमारे ५० ते १०० तरुण ही जड देवकाठी खांद्यावर उचलून ढोल-ताशांच्या गजरात मंदिरात आणतात. मंदिराबाहेर बांबूची एक भक्कम परात उभारलेली असते. त्यावर चढून तरुण मंडळी दोरखंडाच्या साहाय्याने ही देवकाठी उभी करतात. ज्या गावाची देवकाठी सर्वाधिक उंच असते आणि ती परातीवर योग्यरीत्या उभी राहते. त्यांना मानाचे पारितोषिक व सन्मान दिला जातो. या स्पर्धेत जिंकल्यानंतर विजेते ग्रामस्थ चषकासह गावातून मिरवणूक काढतात. या जागृत देवस्थानच्या दर्शनासाठी दर मंगळवारी भाविकांची मोठी गर्दी असते. इतर दिवशी केवळ सकाळी सात आणि सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरतीच्या वेळी मंदिर दर्शनासाठी खुले असते.
उपयुक्त माहिती
पेण येथून १० किमी अंतरावर
अलिबाग येथून २७ किमी अंतरावर
पेण व नागोठणे येथून एसटीची सुविधा
खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
Aai Kalambadevi Temple
Gadab, Taluka Pen, District Raigad
The temple of Aai Kalambadevi is nestled on a hillock within the boundaries of Gadab village, alongside the Mumbai-Goa Highway, in Pen Taluka of Raigad District. The history of this temple has been passed down through generations in local tradition, and this Goddess is revered as the village deity (Gramdevata) of Gadab. According to historical references, the valiant Maratha soldiers (Mavale) of Chhatrapati Shivaji Maharaj had halted at this temple for some time while carrying the treasure from Kalyan. The grand fair held on Chaitri Pournima (full moon day of the Chaitra month) and the tall Devkathi (sacred pole) competition within it are considered the main cultural highlights of this temple.
The mythological legend associated with this temple is linked to a demon named Kaal (Kalamb). In ancient times, this demon wreaked havoc in the region. To subdue him, the revered sages (Rishimunis) performed intense penance and worshipped Adi Shakti (the Primordial Power). Following their austerities, Adi Shakti manifested Herself and, by slaying the demon Kaal, liberated the villagers from their distress. The spot where the Goddess rested after vanquishing the demon is known as ‘Devicha Maal’ (the Goddess’s Hillock). It was due to this victory that the Goddess came to be known as Kalambadevi. Over time, a self-manifested (Swayambhu) stone idol of the Goddess was discovered by a member of the Patil family of the village, and they consecrated the deity at that very spot. Even today, out of profound devotion to the Goddess, members of the local Patil family do not wear green or black attire. The honor of performing the Goddess’s worship and the ritual of erecting the Devkathi also traditionally belongs to this family.
This temple of Kalambadevi is considered immensely significant both historically and spiritually. Historical references indicate that the valiant Maratha soldiers (Mavale) of Chhatrapati Shivaji Maharaj rested at this temple for some time while bringing back the treasure from Kalyan. Furthermore, the villagers hold a deep-seated belief that, whether it was the plague epidemic that spread across the country in 1944 or the recent global pandemic of Corona, no calamity has ever befallen the Gadab region (Panchkroshi) due to the Goddess’s divine grace and their devotion. With unwavering faith, the villagers narrate that the Goddess is still seen by many, wandering through the village. The Goddess is described as adorned in a green saree (Paatal), a blouse (Choli), with a forehead full of vermillion (Kumkum), a blanket (Kaambali) on Her head, and a stick with ankle bells (Ghungarachi Kathi) in Her hand.
The temple is situated on a medium-sized hillock near Gadab village, alongside the Mumbai-Goa Highway. After ascending a short climb from the highway, one enters the temple courtyard (Prangan). From this courtyard, ascending 18 to 20 steps leads to the Mukhmandap (front hall) of the temple. Beautiful gardens have been developed on both sides of the staircase path, adorned with numerous ornamental and flowering plants. The temple’s architecture comprises a Mukhmandap, a Sabhamandap (assembly hall), and a Garbhagriha (sanctum sanctorum). Through the entrance of the Mukhmandap, one enters the spacious Sabhamandap of the temple. In the Sabhamandap, near the front wall of the Garbhagriha, numerous trophies won in the Devkathi competitions are displayed. The doorframe (Dwarashakha) of the Garbhagriha entrance features intricate carvings, and a murti (idol) of Ganapati is enshrined on the lintel (Lalatbimba). In the center of the Garbhagriha, the vermillion-smeared murti of Kalambadevi, in the form of a rice grain (Tandala Rupa), is majestically seated. A silver mask is adorned upon it.
In the temple, the Navratri festival and the fair held in the month of Chaitra are celebrated with immense fervor. On Ashwin Shuddha Pratipada (the first day of the bright fortnight of Ashwin), the Goddess’s palanquin (Palkhi) is brought to the temple from the village with musical fanfare, and with the Ghatasthapana (installation of a sacred pot), the Navratri festival commences. During these nine days, Aartis (ritualistic worship with lamps), Bhajans (devotional songs), and various cultural programs are organized on the fifth and seventh days (Maala) of the festival. The greatest attraction of Kalambadevi is the grand fair held on Chaitra Shuddha Chaturdashi (the fourteenth day of the bright fortnight of Chaitra). On this day, at Brahmamuhurta (the auspicious hour before dawn), the Goddess is given a sacred bath (Abhishek) and adorned with a new saree and ornaments. In the afternoon, the Goddess’s palanquin is brought from the Marudevi Temple in the village, and the main festivities of the fair begin. During this fair, devotees fulfill their vows (Navas) by performing ‘Tula’ (a ritual of weighing oneself or a relative against offerings).
The Devkathi competition here is a special attraction of this fair. Many bamboo poles are tied together with cloth and ropes to create Devkathis ranging from 50 to 100 feet in height. These Devkathis are thick at the base and taper towards the top. They are adorned with cloths of various colors and flags. Approximately 50 to 100 young men carry these heavy Devkathis on their shoulders, bringing them to the temple amidst the resounding beats of drums (Dhol) and traditional trumpets (Tasha). Outside the temple, a sturdy bamboo platform (Parat) is erected. Climbing onto it, the young men erect these Devkathis with the help of ropes. The village whose Devkathi is the tallest and stands correctly on the platform, is awarded a prestigious prize and honor. After winning this competition, the victorious villagers carry the trophy in a procession through the village. For the darshan (sacred sight) at this awakened (Jagrut) holy place, a large number of devotees gather every Tuesday. On other days, the temple is open for darshan only during Aarti times, around 7 AM and 7 PM.
Useful Information
10 km from Pen
27 km from Alibaug
ST (State Transport) bus facility available from Pen and Nagothane
Private vehicles can reach up to the temple
Accommodation and breakfast facilities are available in the vicinity.
माँ कालंबादेवी मंदिर
गडब, तह. पेण, जि. रायगढ़
रायगढ़ जिले के पेण तालुका में, मुंबई-गोवा महामार्ग के किनारे, गडब गाँव की सीमा में एक पहाड़ी पर माँ कालंबादेवी का मंदिर स्थित है। इस मंदिर का इतिहास स्थानीय परंपरा में कई पीढ़ियों से चला आ रहा है और यह देवी गडब गाँव की ग्रामदेवता हैं। ऐतिहासिक संदर्भों के अनुसार, कल्याण का खजाना लेकर जाते समय छत्रपति शिवाजी महाराज के मावले इस मंदिर में कुछ समय के लिए रुके थे। चैत्र पूर्णिमा को लगने वाला बड़ा मेला और उसमें होने वाली ऊँची देवकाठी प्रतियोगिता को इस मंदिर की मुख्य सांस्कृतिक विशेषता माना जाता है।
इस मंदिर से जुड़ी पौराणिक कथा काल (कालंब) नामक राक्षस से संबंधित है। प्राचीन काल में इस राक्षस ने क्षेत्र में बड़ा उत्पात मचाया था। उसका अंत करने के लिए ऋषि-मुनियों ने आदिशक्ति की कठोर आराधना की। उनकी तपस्या के बाद आदिशक्ति प्रकट हुईं और उन्होंने काल राक्षस का वध करके ग्रामवासियों को संकट से मुक्त किया। राक्षस का वध करने के बाद देवी जिस पहाड़ी पर विश्राम करने के लिए रुकी थीं, उस स्थान को ‘देवी का माल’ के नाम से जाना जाता है। इसी विजय के कारण देवी का नाम कालंबादेवी पड़ा। कालांतर में गाँव के पाटील परिवार के एक सदस्य को देवी की एक स्वयंभू शिला मिली और उन्होंने उसी स्थान पर देवी की प्राण-प्रतिष्ठा की। आज भी यहाँ के पाटील परिवार में देवी के प्रति श्रद्धा के कारण हरे या काले वस्त्रों का उपयोग नहीं किया जाता है। देवी की पूजा और देवकाठी स्थापित करने की पूजा का सम्मान भी इसी परिवार के पास है।
कालंबादेवी का यह मंदिर ऐतिहासिक और आध्यात्मिक दृष्टि से अत्यंत महत्वपूर्ण माना जाता है। कल्याण का खजाना लूटकर लाते समय छत्रपति शिवाजी महाराज के मावले कुछ समय के लिए इस मंदिर में विश्राम के लिए रुके थे, ऐसे ऐतिहासिक संदर्भ दिए जाते हैं। साथ ही, चाहे सन १९४४ में देश में फैली प्लेग महामारी हो या हाल के समय की कोरोना महामारी, देवी की भक्ति के कारण गडब पंचक्रोशी पर कोई संकट नहीं आया, ऐसी ग्रामवासियों की गहरी श्रद्धा है। गाँव वाले श्रद्धापूर्वक बताते हैं कि देवी आज भी गाँव में घूमते हुए कई लोगों को दिखाई देती हैं। देवी का वेश हरी साड़ी, चोली, माथे पर भरा सिंदूर, सिर पर कंबल और हाथ में घुंघरू वाली छड़ी का होता है।
मुंबई-गोवा महामार्ग के किनारे गडब गाँव के पास एक मध्यम ऊँचाई की पहाड़ी पर यह मंदिर स्थित है। महामार्ग से थोड़ी चढ़ाई पार करके मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। इस प्रांगण से १८ से २० सीढ़ियाँ चढ़कर मंदिर के मुखमंडप में प्रवेश होता है। सीढ़ी मार्ग के दोनों ओर सुंदर उद्यान विकसित किए गए हैं, जिनमें कई सजावटी और फूल वाले पौधे हैं। मुखमंडप, सभामंडप और गर्भगृह, ऐसी इस मंदिर की संरचना है। मुखमंडप के प्रवेश द्वार से मंदिर के विशाल सभामंडप में प्रवेश होता है। सभामंडप में गर्भगृह की सामने की दीवार के पास देवकाठी प्रतियोगिताओं में जीते गए कई ट्रॉफी रखी हुई हैं। गर्भगृह के प्रवेश द्वार की द्वारशाखा पर नक्काशी और ललाटबिंब पर गणपति की मूर्ति है। गर्भगृह में मध्य में कालंबादेवी की तांदल रूप में सिंदूर से सजी मूर्ति विराजमान है। उस पर चांदी का मुखौटा चढ़ाया जाता है।
मंदिर में नवरात्रोत्सव और चैत्र मास का मेला, ये दो प्रमुख उत्सव अत्यंत उत्साह के साथ मनाए जाते हैं। अश्विन शुक्ल प्रतिपदा को गाँव से देवी की पालकी बाजे-गाजे के साथ मंदिर में लाई जाती है और घटस्थापना होकर नवरात्र उत्सव का प्रारंभ होता है। इन नौ दिनों में मंदिर में आरतियाँ, भजन और पांचवें व सातवें दिन विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। कालंबादेवी का सबसे बड़ा आकर्षण चैत्र शुक्ल चतुर्दशी को लगने वाला बड़ा मेला है। इस दिन ब्रह्ममुहूर्त पर देवी का अभिषेक करके उन्हें नई साड़ी और आभूषणों से सुशोभित किया जाता है। दोपहर में गाँव के मरुदेवी मंदिर से देवी की पालकी लाई जाती है और मेले का मुख्य समारोह शुरू होता है। इस मेले के दौरान श्रद्धालु स्वयं के या रिश्तेदारों के वजन का ‘तुला’ करके अपनी मन्नत पूरी करते हैं।
यहाँ की देवकाठी प्रतियोगिता इस मेले का विशेष आकर्षण है। कई बाँसों को कपड़े और रस्सियों की सहायता से एक-दूसरे से बाँधकर ५० से १०० फुट ऊँची देवकाठियाँ तैयार की जाती हैं। यह देवकाठी नीचे की ओर मोटी और ऊपर के सिरे पर पतली होती है। उस पर विभिन्न रंगों के कपड़े और ध्वज लगाए जाते हैं। लगभग ५० से १०० युवक इस भारी देवकाठी को कंधों पर उठाकर ढोल-ताशों की गड़गड़ाहट के साथ मंदिर में लाते हैं। मंदिर के बाहर बाँस की एक मजबूत परात स्थापित की जाती है। उस पर चढ़कर युवा लोग रस्सियों की सहायता से इस देवकाठी को खड़ा करते हैं। जिस गाँव की देवकाठी सबसे ऊँची होती है और वह परात पर सही ढंग से खड़ी रहती है, उन्हें सम्मानित पुरस्कार और सम्मान दिया जाता है। इस प्रतियोगिता में जीतने के बाद विजेता ग्रामवासी ट्रॉफी के साथ गाँव से जुलूस निकालते हैं। इस जागृत देवस्थान के दर्शन के लिए हर मंगलवार को श्रद्धालुओं की भारी भीड़ होती है। अन्य दिनों में केवल सुबह सात और शाम सात बजे के आसपास आरती के समय मंदिर दर्शन के लिए खुला रहता है।