शिवचंद्र मोळीश्वर संस्थान
मोळी, ता. मेहकर, जि. बुलडाणा
वनवासादरम्यान दंडकारण्यातून भ्रमण करताना श्रीरामांनी अनेक ठिकाणी शिवलिंगांची प्रतिष्ठापना केली होती. त्यांपैकी एक शिवलिंग मेहकर तालुक्यातील मोळी या गावात आहे. शिवचंद्र मोळीश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या प्राचीन शिवालयातील शिवलिंग जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. यामुळेच, पंचक्रोशीतील असंख्य भाविक या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्यासाठी व अभिषेक करण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येतात. महाशिवरात्रीच्या दिवशी या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. या दिवशी मंदिरात संपन्न होणारा शिव-पार्वती विवाहसोहळा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतो.
पुराणांतील कथेनुसार, वनवासाच्या काळात श्रीरामांनी सुमारे दहा वर्षे दंडकारण्यात व्यतीत केली. मेहकर तालुका हा पूर्वी दंडकारण्याचाच एक भाग होता. सध्याच्या अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांच्या सीमेनजीक विश्वी (ता. मेहकर) हे गाव वसलेले आहे. त्रेतायुगात विश्वामित्र ऋषींनी या गावात शिवलिंगाची स्थापना करून अनेक वर्षे तपश्चर्या केली. एकदा त्यांनी तेथे यज्ञ आयोजित केला असता परिसरातील दैत्यांनी या यज्ञात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला.
विश्वामित्र ऋषींच्या विनंतीवरून, त्या वेळी दंडकारण्यात वास्तव्यास असलेल्या श्रीराम आणि लक्ष्मण यांनी विश्वी येथे येऊन त्या दैत्यांचा संहार केला. त्यानंतर ते सध्याच्या मोळी या गावात आले. ही भूमी ऋषी-मुनींची तपोभूमी होती; येथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले. श्रीराम हे शिवशंकरांचे परमभक्त होते. शिवशंकरांची पूजा केल्याशिवाय ते दिनचर्येला सुरुवात करत नसत. त्यामुळेच त्यांनी येथे शिवलिंगाची स्थापना केली. येथील वास्तव्यानंतर ते लोणारकडे मार्गस्थ झाल्याची आख्यायिका आहे.
कालौघात येथे छोटे शिवमंदिर उभारण्यात आले आणि या मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धारही झाला. काही वर्षांपूर्वी मोळी येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा कायापालट केला. २०१८ मध्ये ग्रामस्थांनी मंदिराच्या विश्वस्त मंडळाची स्थापना केली. नवे भव्य मंदिर उभारण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर श्रमदानही केले. राज्य सरकारने या मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेहकरपासून मोळी हे गाव सुमारे १३ किमी अंतरावर आहे. मंदिराला विस्तीर्ण परिसर लाभला आहे. ग्रामस्थांनी मंदिरासमोरच काही वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे सुबक दगडी दीपमाळ आहे. तटबंदीतील प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात तसेच मंदिराच्या मागील बाजूला विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. भाविकांना बसण्यासाठी येथे बाकांची सुविधा आहे. मंदिरासमोरील नंदीमंडपात उंच वज्रपीठावर शिवाचे वाहन असलेल्या नंदीची मोठी पाषाणी मूर्ती विराजमान आहे. नजीकच असलेल्या वटवृक्षाखाली काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. भाविकांकडून त्यांचीही श्रद्धेने पूजा केली जाते. जवळच धुनी प्रज्वलित असते.
अर्धखुला सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. उत्सवकाळात भाविकांच्या रांगेचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी सभामंडपात स्टेनलेस स्टीलचे रेलिंग बसवण्यात आले आहे. सभामंडपातील देवकोष्ठकांत विठ्ठल-रखुमाई व संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. सभामंडपात गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी दोन दरवाजे आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. या पिंडीच्या शाळुंकेवर पितळी पत्र्याचे आवरण व लिंगावर मुखवटा आहे.
या मुखवट्याच्या मस्तकावर चंद्रकोर आणि गंगा आहे. पिंडीवर नागाने आपल्या फण्याने छत्र धरलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहावर वरच्या दिशेने निमुळते होत जाणारे उंच शिखर आहे. शिखरावरील देवकोष्ठकांमध्ये ऋषी-मुनींच्या मूर्ती आहेत. वरच्या बाजूस द्विस्तरीय आमलक व कळस आहेत.
मंदिर परिसरात असलेल्या सुसज्ज मंडपात उत्सवप्रसंगी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पडतात. या मंदिरात दररोज सकाळी सहा वाजता व सायंकाळी सात वाजता आरती केली जाते. सायंकाळच्या आरतीपूर्वी हरिपाठाचे पठण होते. येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाशिवरात्र हा येथील मुख्य उत्सव आहे. या उत्सवानिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहात नामांकित कीर्तनकारांची कीर्तने होतात. सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. महाशिवरात्रीला गावातून शिवशंकरांची पालखीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. सायंकाळी मंदिरात शास्त्रोक्त पद्धतीने शिव-पार्वती विवाहसोहळा पार पडतो. या दिवशी संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. मंदिर परिसरात पूजा-प्रसाद तसेच विविध वस्तूंची विक्री करणारी दुकाने सजतात. नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेली मंडळी या उत्सवासाठी आवर्जून गावात येतात. रामनवमीनिमित्त मंदिरातून शेगाव येथे पायी दिंडीचे प्रस्थान होते. श्रावण महिन्यात येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सुमारे अडीच हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. श्रावणातील शेवटच्या सोमवारी गावातील तरुण मंडळी कावडीने जल आणून शिवलिंगावर जलाभिषेक करतात.
उपयुक्त माहिती:
- मेहकर येथून १२ किमी अंतरावर
- बुलडाणा येथून ८२ किमी अंतरावर
- मेहकर येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवासाची सुविधा नाही
Shivchandra Molishwar Sansthan
Moli, Taluka Mehkar, District Buldana
During his exile, while traveling through Dandakaranya, Shri Rama consecrated Shiva Lingas at many places. One such Shiva Linga is in the village of Moli in Mehkar Taluka. Devotees believe that the Shiva Linga in this ancient temple, famous as the Shivchandra Molishwar Temple, is spiritually awakened. Because of this, countless devotees from the surrounding five-village radius come here in large numbers to offer Bel leaves and perform Abhisheka on the Shiva Linga. On the day of Mahashivratri, the area takes on the form of a pilgrimage site. The Shiva-Parvati wedding ceremony held in the temple on this day is highly unique.
According to Puranic legends, Shri Rama spent about ten years in Dandakaranya during his exile. Mehkar Taluka was once a part of Dandakaranya. The village of Vishwi (Taluka Mehkar) is situated near the border of the present-day Akola and Buldana districts. In the Treta Yuga, Sage Vishwamitra established a Shiva Linga in this village and performed penance for many years. Once, when he organized a Yajna there, demons from the area tried to disrupt it.
At the request of Sage Vishwamitra, Shri Rama and Lakshmana, who were residing in Dandakaranya at that time, came to Vishwi and destroyed those demons. Thereafter, they came to the present village of Moli. This land was a place of penance for sages and seers; they stayed here for some time. Shri Rama was a supreme devotee of Lord Shiva. He would not begin his daily routine without worshipping Lord Shiva. That is why he established a Shiva Linga here. Legend has it that after his stay here, he proceeded towards Lonar.
Over time, a small Shiva temple was built here, and this temple was renovated many times. A few years ago, the villagers of Moli transformed the temple through public contributions. In the year 2018, the villagers established a Board of Trustees for the temple. The villagers also contributed significantly through voluntary labor to build the new grand temple. The State Government has granted this temple the status of a ‘C’ class pilgrimage site. The village of Moli is about 13 km away from Mehkar, the taluka headquarters. The temple has a spacious campus. A few years ago, the villagers installed an equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj in front of the temple through public contributions.
To the right of the temple entrance stands an elegant stone lamp pillar (Deepmal). After entering through the gateway in the perimeter wall, one enters the temple courtyard. Various trees have been planted in the courtyard and behind the temple. There is a facility of benches for devotees to sit. In the Nandi Mandapa in front of the temple, a large stone idol of Nandi, the vehicle of Shiva, is seated on a high pedestal. Some idols are kept under a nearby Banyan tree. Devotees worship them with devotion as well. A sacred fire (Dhuni) is kept burning nearby.
The temple structure consists of a semi-open assembly hall (Sabhamandapa) and a sanctum sanctorum (Garbhagriha). To ensure proper management of the devotees’ queue during festivals, a stainless steel railing has been installed in the assembly hall. Idols of Vitthal-Rukmini and Saint Dnyaneshwar are installed in the niches of the assembly hall. There are two doors in the assembly hall to perform circumambulation (Pradakshina) around the sanctum. In the sanctum, the Shiva Linga is in the center on the floor. The base of the Linga (Shalunka) is covered with a brass sheet, and there is a mask on the Linga.
On the head of this mask, there is a crescent moon and the Ganges. A serpent holds its hood over the Linga like an umbrella. Above the sanctum of the temple, there is a tall spire that tapers upwards. There are idols of sages and seers in the niches on the spire. At the top, there is a two-tiered Amalaka and a Kalasha.
Various cultural and religious programs are held in the well-equipped hall located on the temple premises during festivals. Aarti is performed in this temple every day at 6:00 AM and 7:00 PM. Haripath is recited before the evening Aarti. Various religious programs are organized here throughout the year. Mahashivratri is the main festival here. On the occasion of this festival, an unbroken Harinam Saptah is organized. Renowned Kirtankars perform Kirtans during this week. On the concluding day of the Saptah, Mahaprasad is distributed to the devotees. On Mahashivratri, a procession of Lord Shiva is taken out from the village in a palanquin with music and fanfare. In the evening, the Shiva-Parvati wedding ceremony is performed in the temple according to scriptural rites. On this day, the entire area takes on the form of a pilgrimage site. Shops selling worship materials, Prasad, and various items are set up on the temple premises. People who have settled elsewhere for jobs and business make it a point to come to the village for this festival. On the occasion of Ram Navami, a foot pilgrimage (Dindi) departs from the temple to Shegaon. Various religious programs are organized here in the month of Shravan. Mahaprasad is organized for devotees every Monday of this month. About 2,500 devotees benefit from this Mahaprasad. On the last Monday of Shravan, the youth of the village bring water in Kawads and perform Jalabhisheka on the Shiva Linga.
Useful Information:
- 12 km from Mehkar
- 82 km from Buldana
- ST bus service available from Mehkar
- Private vehicles can reach the temple
- No accommodation facility available in the area
शिवचंद्र मोळीश्वर संस्थान
मोळी, तहसील मेहकर, जिला बुलढाणा
वनवास के दौरान दंडकारण्य में भ्रमण करते समय श्री राम ने अनेक स्थानों पर शिवलिंगों की प्रतिष्ठापना की थी। उनमें से एक शिवलिंग मेहकर तहसील के मोळी गाँव में स्थित है। शिवचंद्र मोळीश्वर मंदिर के नाम से प्रसिद्ध इस प्राचीन शिवालय का शिवलिंग जागृत है, ऐसी भक्तों की श्रद्धा है। इसी कारण, आसपास के पाँच कोस के असंख्य भक्त इस शिवलिंग पर बेलपत्र अर्पित करने और अभिषेक करने के लिए बड़ी संख्या में यहाँ आते हैं। महाशिवरात्रि के दिन इस परिसर में मेले जैसा वातावरण होता है। इस दिन मंदिर में संपन्न होने वाला शिव-पार्वती विवाह समारोह अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होता है।
पुराणों की कथा के अनुसार, वनवास काल में श्री राम ने लगभग दस वर्ष दंडकारण्य में व्यतीत किए। मेहकर तहसील पूर्व में दंडकारण्य का ही एक भाग थी। वर्तमान अकोला और बुलढाणा जिलों की सीमा के निकट विश्वी (तहसील मेहकर) गाँव बसा हुआ है। त्रेतायुग में विश्वामित्र ऋषि ने इस गाँव में शिवलिंग की स्थापना कर अनेक वर्षों तक तपस्या की थी। एक बार जब उन्होंने वहाँ यज्ञ आयोजित किया, तो क्षेत्र के दैत्यों ने उस यज्ञ में विघ्न डालने का प्रयास किया।
विश्वामित्र ऋषि के अनुरोध पर, उस समय दंडकारण्य में निवास कर रहे श्री राम और लक्ष्मण ने विश्वी आकर उन दैत्यों का संहार किया। उसके बाद वे वर्तमान मोळी गाँव में आए। यह भूमि ऋषि-मुनियों की तपोभूमि थी; यहाँ उन्होंने कुछ समय निवास किया। श्री राम शिवशंकर के परम भक्त थे। शिवशंकर की पूजा किए बिना वे अपनी दिनचर्या प्रारंभ नहीं करते थे। इसीलिए उन्होंने यहाँ शिवलिंग की स्थापना की। यहाँ के प्रवास के बाद उनके लोणार की ओर प्रस्थान करने की किंवदंती है।
कालान्तर में यहाँ छोटा शिव मंदिर बनाया गया और इस मंदिर का अनेक बार जीर्णोद्धार भी हुआ। कुछ वर्षों पूर्व मोळी के ग्रामीणों ने जनसहयोग से मंदिर का कायाकल्प किया। २०१८ में ग्रामीणों ने मंदिर के न्यासी मंडल की स्थापना की। नया भव्य मंदिर बनाने के लिए ग्रामीणों ने बड़े पैमाने पर श्रमदान भी किया। राज्य सरकार ने इस मंदिर को ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र का दर्जा दिया है। तहसील मुख्यालय मेहकर से मोळी गाँव लगभग १३ किमी की दूरी पर है। मंदिर को विस्तृत परिसर प्राप्त है। ग्रामीणों ने मंदिर के सामने ही कुछ वर्षों पूर्व जनसहयोग से छत्रपति शिवाजी महाराज की अश्वारूढ़ प्रतिमा स्थापित की है।
मंदिर के प्रवेश द्वार के दाईं ओर सुंदर पत्थर की दीपमाल है। तटबंदी के प्रवेश द्वार से अंदर आने पर मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। प्रांगण में तथा मंदिर के पिछले भाग में विविध वृक्ष लगाए गए हैं। भक्तों के बैठने के लिए यहाँ बेंच की सुविधा है। मंदिर के सामने नंदी मंडप में ऊँचे वज्रपीठ पर शिव के वाहन नंदी की बड़ी पाषाण मूर्ति विराजमान है। निकट ही स्थित वटवृक्ष के नीचे कुछ मूर्तियाँ रखी गई हैं। भक्त उनकी भी श्रद्धापूर्वक पूजा करते हैं। पास ही धूनी प्रज्वलित रहती है।
अर्धखुला सभामंडप और गर्भगृह ऐसी इस मंदिर की संरचना है। उत्सव के समय भक्तों की कतार का उचित प्रबंधन हो, इसके लिए सभामंडप में स्टेनलेस स्टील की रेलिंग लगाई गई है। सभामंडप के देवकोष्ठकों में विट्ठल-रखुमाई और संत ज्ञानेश्वर की मूर्तियाँ प्रतिष्ठित हैं। सभामंडप में गर्भगृह के चारों ओर प्रदक्षिणा करने के लिए दो दरवाजे हैं। गर्भगृह में जमीन पर मध्य में शिवपिंडी है। इस पिंडी की शालुंका पर पीतल के पत्र का आवरण और लिंग पर मुखौटा है।
इस मुखौटे के मस्तक पर चंद्रकोर और गंगा है। पिंडी पर नाग ने अपने फन से छत्र धारण किया हुआ है। मंदिर के गर्भगृह के ऊपर की ओर संकरा होता हुआ ऊँचा शिखर है। शिखर के देवकोष्ठकों में ऋषि-मुनियों की मूर्तियाँ हैं। ऊपरी भाग में द्विस्तरीय आमलक और कलश हैं।
मंदिर परिसर में स्थित सुसज्जित मंडप में उत्सव के अवसर पर विविध सांस्कृतिक और धार्मिक कार्यक्रम संपन्न होते हैं। इस मंदिर में प्रतिदिन सुबह छह बजे और शाम सात बजे आरती की जाती है। संध्या आरती से पूर्व हरिपाठ का पठन होता है। यहाँ वर्ष भर विविध धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। महाशिवरात्रि यहाँ का मुख्य उत्सव है। इस उत्सव के उपलक्ष्य में यहाँ अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन किया जाता है। इस सप्ताह में ख्यातिप्राप्त कीर्तनकारों के कीर्तन होते हैं। सप्ताह के समापन के दिन भक्तों को महाप्रसाद का वितरण किया जाता है। महाशिवरात्रि को गाँव से शिवशंकर की पालकी में गाजे-बाजे के साथ शोभायात्रा निकाली जाती है। शाम को मंदिर में शास्त्रोक्त विधि से शिव-पार्वती विवाह समारोह संपन्न होता है। इस दिन संपूर्ण परिसर मेले का स्वरूप धारण कर लेता है। मंदिर परिसर में पूजा-प्रसाद तथा विविध वस्तुओं की बिक्री करने वाली दुकानें सजती हैं। नौकरी और व्यवसाय के कारण बाहर बसे हुए लोग इस उत्सव के लिए विशेष रूप से गाँव आते हैं। रामनवमी के उपलक्ष्य में मंदिर से शेगाँव के लिए पैदल दिंडी का प्रस्थान होता है। श्रावण मास में यहाँ विविध धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। इस महीने के प्रत्येक सोमवार को भक्तों के लिए महाप्रसाद का आयोजन किया जाता है। लगभग ढाई हजार भक्त इस महाप्रसाद का लाभ उठाते हैं। श्रावण के अंतिम सोमवार को गाँव के युवा कांवड़ में जल लाकर शिवलिंग पर जलाभिषेक करते हैं।
उपयोगी जानकारी:
- मेहकर से १२ किमी की दूरी पर
- बुलढाणा से ८२ किमी की दूरी पर
- मेहकर से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में आवास की सुविधा नहीं है
શિવચંદ્ર મોળેશ્વર સંસ્થાન
મોળી, તા. મેહકર, જિ. બુલઢાણા
વનવાસ દરમિયાન દંડકારણ્યમાં ભ્રમણ કરતી વખતે શ્રીરામે અનેક સ્થળોએ શિવલિંગની પ્રતિષ્ઠા કરી હતી. તે પૈકીનું એક શિવલિંગ મેહકર તાલુકાના મોળી ગામમાં છે. શિવચંદ્ર મોળેશ્વર મંદિર તરીકે પ્રસિદ્ધ આ પ્રાચીન શિવાલયમાં રહેલું શિવલિંગ જાગૃત હોવાની ભક્તોની શ્રદ્ધા છે. આ કારણે જ, આસપાસના પાંચ ગામોના અસંખ્ય ભક્તો આ શિવલિંગ પર બેલપત્ર અર્પણ કરવા અને અભિષેક કરવા માટે મોટી સંખ્યામાં અહીં આવે છે. મહાશિવરાત્રીના દિવસે આ પરિસર મેળાનું સ્વરૂપ ધારણ કરે છે. આ દિવસે મંદિરમાં સંપન્ન થતો શિવ-પાર્વતી વિવાહ ઉત્સવ અત્યંત વિશેષ હોય છે.
પુરાણોની કથા અનુસાર, વનવાસના સમયગાળામાં શ્રીરામે લગભગ દસ વર્ષ દંડકારણ્યમાં વિતાવ્યા હતા. મેહકર તાલુકો એ અગાઉ દંડકારણ્યનો જ એક ભાગ હતો. હાલના અકોલા અને બુલઢાણા જિલ્લાની સરહદ નજીક વિશવી (તા. મેહકર) ગામ વસેલું છે. ત્રેતાયુગમાં વિશ્વામિત્ર ઋષિએ આ ગામમાં શિવલિંગની સ્થાપના કરીને અનેક વર્ષો સુધી તપસ્યા કરી હતી. એકવાર તેમણે ત્યાં યજ્ઞનું આયોજન કર્યું ત્યારે આસપાસના દૈત્યોએ આ યજ્ઞમાં વિઘ્ન લાવવાનો પ્રયાસ કર્યો હતો.
વિશ્વામિત્ર ઋષિની વિનંતી પર, તે સમયે દંડકારણ્યમાં નિવાસ કરતા શ્રીરામ અને લક્ષ્મણે વિશવી આવીને તે દૈત્યોનો સંહાર કર્યો હતો. ત્યારબાદ તેઓ હાલના મોળી ગામમાં આવ્યા. આ ભૂમિ ઋષિ-મુનિઓની તપોભૂમિ હતી; અહીં તેમણે થોડો સમય નિવાસ કર્યો. શ્રીરામ શિવશંકરના પરમ ભક્ત હતા. શિવશંકરની પૂજા કર્યા વિના તેઓ દિનચર્યા શરૂ કરતા નહોતા. તેથી જ તેમણે અહીં શિવલિંગની સ્થાપના કરી હતી. અહીંના નિવાસ બાદ તેઓ લોનાર તરફ પ્રયાણ કરી ગયા હોવાની લોકવાયકા છે.
કાળક્રમે અહીં નાનું શિવમંદિર બાંધવામાં આવ્યું અને આ મંદિરનો અનેકવાર જીર્ણોદ્ધાર પણ થયો. થોડા વર્ષો પહેલા મોળીના ગ્રામજનોએ લોકફાળા દ્વારા મંદિરનો કાયાપલટ કર્યો. ૨૦૧૮માં ગ્રામજનોએ મંદિરના ટ્રસ્ટની સ્થાપના કરી. નવું ભવ્ય મંદિર બનાવવા માટે ગ્રામજનોએ મોટા પાયે શ્રમદાન પણ કર્યું. રાજ્ય સરકારે આ મંદિરને ‘ક’ વર્ગના તીર્થક્ષેત્રનો દરજ્જો આપ્યો છે. તાલુકાનું મથક મેહકરથી મોળી ગામ લગભગ ૧૩ કિમી અંતરે છે. મંદિરને વિશાળ પરિસર મળ્યું છે. ગ્રામજનોએ મંદિરની સામે જ થોડા વર્ષો પહેલા લોકફાળા દ્વારા છત્રપતિ શિવાજી મહારાજની અશ્વરૂઢ પ્રતિમા સ્થાપિત કરી છે.
મંદિરના પ્રવેશદ્વારની જમણી બાજુએ સુંદર પથ્થરની દીપમાળ છે. તટબંધીના પ્રવેશદ્વારમાંથી અંદર આવતા મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. પ્રાંગણમાં તેમજ મંદિરની પાછળની બાજુએ વિવિધ વૃક્ષો વાવવામાં આવ્યા છે. ભક્તોને બેસવા માટે અહીં બાંકડાની સુવિધા છે. મંદિરની સામેના નંદીમંડપમાં ઊંચા વજ્રપીઠ પર શિવના વાહન નંદીની મોટી પાષાણની મૂર્તિ બિરાજમાન છે. નજીકમાં આવેલા વડના વૃક્ષ નીચે કેટલીક મૂર્તિઓ રાખવામાં આવી છે. ભક્તો દ્વારા તેની પણ શ્રદ્ધાપૂર્વક પૂજા કરવામાં આવે છે. નજીકમાં જ ધૂણી પ્રજ્વલિત હોય છે.
અર્ધખુલ્લો સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની સંરચના છે. ઉત્સવના સમયમાં ભક્તોની લાઈનનું યોગ્ય વ્યવસ્થાપન થાય તે માટે સભામંડપમાં સ્ટેનલેસ સ્ટીલની રેલિંગ બેસાડવામાં આવી છે. સભામંડપના દેવકોષ્ઠમાં વિઠ્ઠલ-રખુમાઈ અને સંત જ્ઞાનેશ્વરની મૂર્તિઓ પ્રતિષ્ઠિત છે. સભામંડપમાં ગર્ભગૃહની આસપાસ પ્રદક્ષિણા કરવા માટે બે દરવાજા છે. ગર્ભગૃહમાં જમીન પર મધ્યમાં શિવપિંડી છે. આ પિંડીની શાળુંકા પર પિત્તળના પતરાનું આવરણ અને લિંગ પર મુખવટો છે.
આ મુખવટાના મસ્તક પર ચંદ્રકોર અને ગંગા છે. પિંડી પર નાગે પોતાની ફેણથી છત્ર ધારણ કર્યું છે. મંદિરના ગર્ભગૃહ પર ઉપરની દિશામાં સાંકડું થતું જતું ઊંચું શિખર છે. શિખરના દેવકોષ્ઠમાં ઋષિ-મુનિઓની મૂર્તિઓ છે. ઉપરની બાજુએ દ્વિસ્તરીય આમલક અને કળશ છે.
મંદિર પરિસરમાં આવેલા સુસજ્જ મંડપમાં ઉત્સવ પ્રસંગે વિવિધ સાંસ્કૃતિક અને ધાર્મિક કાર્યક્રમો યોજાય છે. આ મંદિરમાં દરરોજ સવારે ૬ વાગ્યે અને સાંજે ૭ વાગ્યે આરતી કરવામાં આવે છે. સાંજની આરતી પહેલા હરિપાઠનું પઠન થાય છે. અહીં વર્ષભર વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. મહાશિવરાત્રી એ અહીંનો મુખ્ય ઉત્સવ છે. આ ઉત્સવ નિમિત્તે અહીં અખંડ હરિનામ સપ્તાહનું આયોજન કરવામાં આવે છે. આ સપ્તાહમાં નામી કીર્તનકારોના કીર્તન થાય છે. સપ્તાહના સમાપનના દિવસે ભક્તોને મહાપ્રસાદનું વિતરણ કરવામાં આવે છે. મહાશિવરાત્રીએ ગામમાંથી શિવશંકરની પાલખીમાં વાજતે-ગાજતે શોભાયાત્રા કાઢવામાં આવે છે. સાંજે મંદિરમાં શાસ્ત્રોક્ત પદ્ધતિથી શિવ-પાર્વતી વિવાહ ઉત્સવ સંપન્ન થાય છે. આ દિવસે સમગ્ર પરિસર મેળાનું સ્વરૂપ ધારણ કરે છે. મંદિર પરિસરમાં પૂજા-પ્રસાદ તેમજ વિવિધ વસ્તુઓનું વેચાણ કરતી દુકાનો સજાય છે. નોકરી અને વ્યવસાય નિમિત્તે બહારગામ સ્થાયી થયેલા લોકો આ ઉત્સવ માટે ખાસ ગામમાં આવે છે. રામનવમી નિમિત્તે મંદિરમાંથી શેગાંવ જવા માટે પગપાળા દિન્ડીનું પ્રસ્થાન થાય છે. શ્રાવણ મહિનામાં અહીં વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. આ મહિનાના દરેક સોમવારે ભક્તો માટે મહાપ્રસાદનું આયોજન કરવામાં આવે છે. લગભગ અઢી હજાર ભક્તો આ મહાપ્રસાદનો લાભ લે છે. શ્રાવણના છેલ્લા સોમવારે ગામના યુવાનો કાવડ દ્વારા જળ લાવીને શિવલિંગ પર જલાભિષેક કરે છે.
ઉપયોગી માહિતી:
- મેહકરથી ૧૨ કિમી અંતરે
- બુલઢાણાથી ૮૨ કિમી અંતરે
- મેહકરથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવાની સુવિધા નથી
சிவச்சந்திர மௌலீஸ்வரர் சமஸ்தானம்
மௌலி, தாலுகா மெஹகர், மாவட்டம் புல்தானா
வனவாசத்தின் போது தண்டகாரண்யத்தில் பயணம் செய்தபோது, ஸ்ரீராமர் பல இடங்களில் சிவலிங்கங்களை பிரதிஷ்டை செய்தார். அவற்றில் ஒன்று மெஹகர் தாலுகாவில் உள்ள மௌலி என்ற கிராமத்தில் உள்ளது. சிவச்சந்திர மௌலீஸ்வரர் கோவில் என்று புகழ்பெற்ற இந்த பழமையான சிவாலயத்தில் உள்ள சிவலிங்கம் மிகவும் சக்தி வாய்ந்தது என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கை. இதனாலேயே, சுற்றியுள்ள ஐந்து கிராமங்களைச் சேர்ந்த எண்ணற்ற பக்தர்கள் இந்த சிவலிங்கத்திற்கு வில்வ இலைகளை அர்ப்பணிக்கவும், அபிஷேகம் செய்யவும் பெருமளவில் இங்கு வருகின்றனர். மகா சிவராத்திரி அன்று இந்த பகுதி திருவிழாக் கோலம் பூணுகிறது. அன்று கோவிலில் நடைபெறும் சிவ-பார்வதி திருக்கல்யாண வைபவம் மிகவும் சிறப்பம்சமாகும்.
புராணக் கதைகளின்படி, வனவாச காலத்தில் ஸ்ரீராமர் சுமார் ௧௦ ஆண்டுகள் தண்டகாரண்யத்தில் கழித்தார். மெஹகர் தாலுகா என்பது முன்னொரு காலத்தில் தண்டகாரண்யத்தின் ஒரு பகுதியாக இருந்தது. தற்போதைய அகோலா மற்றும் புல்தானா மாவட்டங்களின் எல்லைக்கு அருகில் விஸ்வி (தாலுகா மெஹகர்) என்ற கிராமம் அமைந்துள்ளது. திரேதா யுகத்தில் விஸ்வாமித்திர முனிவர் இந்த கிராமத்தில் சிவலிங்கத்தை நிறுவி பல ஆண்டுகள் தவம் செய்தார். ஒருமுறை அவர் அங்கு யாகம் நடத்தியபோது, அப்பகுதியைச் சேர்ந்த அரக்கர்கள் அந்த யாகத்திற்கு இடையூறு விளைவிக்க முயன்றனர்.
விஸ்வாமித்திர முனிவரின் வேண்டுகோளின்படி, அக்காலத்தில் தண்டகாரண்யத்தில் வசித்து வந்த ஸ்ரீராமரும் லட்சுமணரும் விஸ்விக்கு வந்து அந்த அரக்கர்களை அழித்தனர். அதன்பிறகு அவர்கள் தற்போதைய மௌலி கிராமத்திற்கு வந்தனர். இந்த பூமி முனிவர்களின் தவ பூமியாக இருந்தது; இங்கு அவர்கள் சிறிது காலம் தங்கினர். ஸ்ரீராமர் சிவபெருமானின் தீவிர பக்தர். சிவபெருமானை வழிபடாமல் அவர் தனது அன்றாடப் பணிகளைத் தொடங்குவதில்லை. அதனாலேயே அவர் இங்கு சிவலிங்கத்தை பிரதிஷ்டை செய்தார். இங்கு தங்கிய பிறகு அவர் லோனார் நோக்கிப் புறப்பட்டதாக ஐதீகம் உள்ளது.
காலப்போக்கில் இங்கு சிறிய சிவன் கோவில் கட்டப்பட்டது மற்றும் இந்த கோவில் பலமுறை புனரமைக்கப்பட்டது. சில ஆண்டுகளுக்கு முன்பு மௌலி கிராம மக்கள் பொதுமக்களின் பங்களிப்புடன் கோவிலை புதுப்பித்தனர். ௨௦௧௮-ஆம் ஆண்டில் கிராம மக்கள் கோவில் அறக்கட்டளையை நிறுவினர். புதிய பிரம்மாண்டமான கோவிலைக் கட்டுவதற்கு கிராம மக்கள் பெருமளவில் உழைப்பை வழங்கினர். மாநில அரசு இந்த கோவிலுக்கு ‘க’ வகுப்பு புனிதத் தல அந்தஸ்தை வழங்கியுள்ளது. தாலுகா இடமான மெஹகரிலிருந்து மௌலி கிராமம் சுமார் ௧௩ கி.மீ தொலைவில் உள்ளது. கோவில் விசாலமான வளாகத்தைக் கொண்டுள்ளது. கிராம மக்கள் கோவிலுக்கு முன்னால் சில ஆண்டுகளுக்கு முன்பு பொதுமக்களின் பங்களிப்புடன் சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் குதிரை மீதமர்ந்த சிலையை நிறுவியுள்ளனர்.
கோவிலின் நுழைவாயிலின் வலதுபுறம் அழகான கல் தீபஸ்தம்பம் உள்ளது. மதிலுக்குள் இருக்கும் நுழைவாயில் வழியாக உள்ளே சென்றால் கோவில் பிரகாரம் வருகிறது. பிரகாரத்திலும் கோவிலின் பின்புறத்திலும் பல்வேறு மரங்கள் நடப்பட்டுள்ளன. பக்தர்கள் அமர்வதற்கு இங்கு இருக்கை வசதி உள்ளது. கோவிலுக்கு முன்னால் உள்ள நந்தி மண்டபத்தில் உயர்ந்த வஜ்ர பீடத்தில் சிவபெருமானின் வாகனமான நந்தியின் பெரிய கல் சிலை வீற்றிருக்கிறது. அருகில் உள்ள ஆலமரத்தின் அடியில் சில சிலைகள் வைக்கப்பட்டுள்ளன. பக்தர்களால் அவையும் பக்தியுடன் வழிபடப்படுகின்றன. அருகிலேயே புனித அக்னி (துனி) எரிந்து கொண்டிருக்கிறது.
அரை திறந்த சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இந்த கோவிலின் அமைப்பு உள்ளது. திருவிழாக் காலங்களில் பக்தர்களின் வரிசையைச் சரியாக நிர்வகிக்க, சபா மண்டபத்தில் துருப்பிடிக்காத எஃகு தடுப்புகள் (ரெயிலிங்) பொருத்தப்பட்டுள்ளன. சபா மண்டபத்தில் உள்ள தேவகோஷ்டங்களில் விட்டல்-ருக்மணி மற்றும் சந்த் ஞானேஸ்வரர் சிலைகள் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளன. சபா மண்டபத்தில் கருவறையைச் சுற்றி வலம் வருவதற்கு இரண்டு வாசல்கள் உள்ளன. கருவறையில் தரையில் நடுவில் சிவலிங்கம் உள்ளது. இந்த லிங்கத்தின் பீடத்தில் பித்தளை கவசமும், லிங்கத்தின் மீது முகமூடியும் உள்ளது.
இந்த முகமூடியின் தலையில் பிறைச்சந்திரனும் கங்கையும் உள்ளன. லிங்கத்தின் மீது நாகம் தனது படத்தால் குடை பிடித்துள்ளது. கோவிலின் கருவறையின் மேல் பகுதியில் குறுகிச் செல்லும் உயர்ந்த கோபுரம் உள்ளது. கோபுரத்தின் தேவகோஷ்டங்களில் முனிவர்களின் சிலைகள் உள்ளன. மேல் பகுதியில் இரு அடுக்கு ஆமலக்கமும் கலசமும் உள்ளன.
கோவில் வளாகத்தில் உள்ள வசதியான மண்டபத்தில் திருவிழாக் காலங்களில் பல்வேறு கலாச்சார மற்றும் மத நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன. இந்த கோவிலில் தினமும் காலை ௬ மணிக்கும் மாலை ௭ மணிக்கும் ஆரத்தி நடைபெறுகிறது. மாலை ஆரத்திக்கு முன்னதாக ஹரிபாடம் பாராயணம் செய்யப்படுகிறது. இங்கு ஆண்டு முழுவதும் பல்வேறு மத நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. மகா சிவராத்திரி இங்குள்ள முக்கிய திருவிழாவாகும். இந்த திருவிழாவை முன்னிட்டு இங்கு அகண்ட ஹரிநாம சப்தாஹம் ஏற்பாடு செய்யப்படுகிறது. இந்த சப்தாஹத்தில் புகழ்பெற்ற கீர்த்தனையாளர்களின் கீர்த்தனைகள் நடைபெறுகின்றன. சப்தாஹத்தின் நிறைவு நாளில் பக்தர்களுக்கு மகாபிரசாதம் வழங்கப்படுகிறது. மகா சிவராத்திரியன்று கிராமத்திலிருந்து சிவபெருமானின் பல்லக்கு ஊர்வலம் மேளதாளங்களுடன் நடைபெறுகிறது. மாலை கோவிலில் சாஸ்திரப்படி சிவ-பார்வதி திருக்கல்யாண வைபவம் நடைபெறுகிறது. இந்த நாளில் முழு பகுதியும் திருவிழாக் கோலம் பூணுகிறது. கோவில் வளாகத்தில் பூஜை-பிரசாதம் மற்றும் பல்வேறு பொருட்களை விற்கும் கடைகள் அலங்கரிக்கப்படுகின்றன. வேலை மற்றும் தொழில் நிமித்தமாக வெளியூர்களில் குடியேறியவர்கள் இந்த திருவிழாவிற்காகத் தவறாமல் கிராமத்திற்கு வருகிறார்கள். ராமநவமியை முன்னிட்டு கோவிலிலிருந்து ஷேகாவுக்கு பாதயாத்திரை (திண்டி) புறப்படுகிறது. சிராவண மாதத்தில் இங்கு பல்வேறு மத நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. இந்த மாதத்தில் ஒவ்வொரு திங்கட்கிழமையும் பக்தர்களுக்கு மகாபிரசாதம் வழங்கப்படுகிறது. சுமார் இரண்டாயிரத்து ஐந்நூறு பக்தர்கள் இந்த மகாபிரசாதத்தைப் பெறுகின்றனர். சிராவண மாதத்தின் கடைசி திங்கட்கிழமையன்று கிராமத்து இளைஞர்கள் காவடி மூலம் புனித நீர் கொண்டு வந்து சிவலிங்கத்திற்கு ஜலாபிஷேகம் செய்கின்றனர்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- மெஹகரிலிருந்து ௧௨ கி.மீ தொலைவில்
- புல்தானாவிலிருந்து ௮௨ கி.மீ தொலைவில்
- மெஹகரிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- வளாகத்தில் தங்கும் வசதி இல்லை
శివచంద్ర మోళీశ్వర సంస్థాన్
మోళి, తా. మెహకర్, జి. బుల్ఢానా
వనవాస సమయంలో దండకారణ్యంలో సంచరిస్తున్నప్పుడు శ్రీరాముడు అనేక చోట్ల శివలింగాలను ప్రతిష్టించాడు. వాటిలో ఒకటి మెహకర్ తాలూకాలోని మోళి గ్రామంలో ఉంది. శివచంద్ర మోళీశ్వర ఆలయంగా ప్రసిద్ధి చెందిన ఈ ప్రాచీన శివాలయంలోని శివలింగం అత్యంత శక్తివంతమైనదని భక్తుల విశ్వాసం. అందుకే, చుట్టుపక్కల ప్రాంతాల నుండి అసంఖ్యాక భక్తులు ఈ శివలింగానికి బిల్వపత్రాలు సమర్పించడానికి మరియు అభిషేకం చేయడానికి పెద్ద సంఖ్యలో ఇక్కడికి వస్తారు. మహాశివరాత్రి రోజున ఈ ప్రాంతం జాతరను తలపిస్తుంది. ఈ రోజున ఆలయంలో జరిగే శివ-పార్వతుల వివాహ వేడుక ఎంతో విశిష్టమైనది.
పురాణాల కథనం ప్రకారం, వనవాస కాలంలో శ్రీరాముడు సుమారు ౧౦ ఏళ్లు దండకారణ్యంలో గడిపాడు. మెహకర్ తాలూకా పూర్వం దండకారణ్యంలోనే ఒక భాగం. ప్రస్తుతం అకోలా మరియు బుల్ఢానా జిల్లాల సరిహద్దు సమీపంలో విశ్వీ (తా. మెహకర్) గ్రామం ఉంది. త్రేతాయుగంలో విశ్వామిత్ర మహర్షి ఈ గ్రామంలో శివలింగాన్ని ప్రతిష్టించి అనేక సంవత్సరాలు తపస్సు చేశారు. ఒకసారి ఆయన అక్కడ యజ్ఞం నిర్వహిస్తుండగా, ఆ ప్రాంతంలోని రాక్షసులు యజ్ఞానికి విఘ్నం కలిగించడానికి ప్రయత్నించారు.
విశ్వామిత్ర మహర్షి అభ్యర్థన మేరకు, అప్పట్లో దండకారణ్యంలో ఉన్న శ్రీరాముడు మరియు లక్ష్మణుడు విశ్వీకి వచ్చి ఆ రాక్షసులను సంహరించారు. ఆ తర్వాత వారు ప్రస్తుత మోళి గ్రామానికి చేరుకున్నారు. ఈ భూమి ఋషిమునుల తపోభూమి; ఇక్కడ వారు కొంతకాలం నివసించారు. శ్రీరాముడు శివశంకరుని పరమ భక్తుడు. శివశంకరుని పూజించకుండా ఆయన దినచర్యను ప్రారంభించేవారు కాదు. అందుకే ఆయన ఇక్కడ శివలింగాన్ని ప్రతిష్టించారు. ఇక్కడ నివసించిన తర్వాత వారు లోనార్ వైపు ప్రయాణించారని ఐతిహ్యం.
కాలక్రమేణా ఇక్కడ చిన్న శివాలయం నిర్మించబడింది మరియు ఈ ఆలయం అనేకసార్లు జీర్ణోద్ధరణకు నోచుకుంది. కొన్ని సంవత్సరాల క్రితం మోళి గ్రామస్తులు ప్రజా విరాళాలతో ఆలయ రూపురేఖలను మార్చారు. ౨౦౧౮లో గ్రామస్తులు ఆలయ ట్రస్ట్ బోర్డును ఏర్పాటు చేశారు. కొత్త భవ్యమైన ఆలయ నిర్మాణానికి గ్రామస్తులు పెద్ద ఎత్తున శ్రమదానం చేశారు. రాష్ట్ర ప్రభుత్వం ఈ ఆలయానికి ‘క’ తరగతి తీర్థక్షేత్ర హోదాను కల్పించింది. తాలూకా కేంద్రమైన మెహకర్ నుండి మోళి గ్రామం సుమారు ౧౩ కి.మీ దూరంలో ఉంది. ఆలయానికి విశాలమైన ప్రాంగణం ఉంది. గ్రామస్తులు కొన్ని సంవత్సరాల క్రితం ఆలయం ముందు ప్రజా విరాళాలతో ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ అశ్వారూఢ విగ్రహాన్ని ప్రతిష్టించారు.
ఆలయ ప్రవేశ ద్వారానికి కుడివైపున అందమైన రాతి దీపస్తంభం ఉంది. ప్రాకారంలోని ద్వారం గుండా లోపలికి రాగానే ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తాము. ప్రాంగణంలో మరియు ఆలయం వెనుక భాగంలో వివిధ రకాల మొక్కలను నాటారు. భక్తులు కూర్చోవడానికి ఇక్కడ బెంచీల సౌకర్యం ఉంది. ఆలయం ముందున్న నంది మండపంలో ఎత్తైన వజ్రపీఠంపై శివుని వాహనమైన నంది యొక్క పెద్ద రాతి విగ్రహం కొలువై ఉంది. సమీపంలోని వటవృక్షం కింద కొన్ని విగ్రహాలను ఉంచారు. భక్తులు వాటిని కూడా భక్తితో పూజిస్తారు. సమీపంలోనే ధుని నిరంతరం వెలుగుతూ ఉంటుంది.
అర్ధ-తెరిచిన సభామండపం మరియు గర్భాలయం ఈ ఆలయ నిర్మాణం. ఉత్సవాల సమయంలో భక్తుల వరుస క్రమాన్ని సరిగ్గా నిర్వహించడానికి, సభామండపంలో స్టెయిన్లెస్ స్టీల్ రైలింగ్ను ఏర్పాటు చేశారు. సభామండపంలోని దేవకోష్ఠాలలో విఠ్ఠల్-రుక్మిణి మరియు సంత జ్ఞానేశ్వర్ విగ్రహాలు ప్రతిష్టించబడ్డాయి. సభామండపంలో గర్భాలయం చుట్టూ ప్రదక్షిణ చేయడానికి రెండు ద్వారాలు ఉన్నాయి. గర్భాలయంలో నేలపై మధ్యలో శివలింగం ఉంది. ఈ లింగం యొక్క పానవట్టంపై ఇత్తడి కవచం మరియు లింగంపై ముఖం ఉంది.
ఈ ముఖం యొక్క శిరస్సుపై చంద్రవంక మరియు గంగ ఉన్నాయి. లింగంపై నాగరాజు తన పడగతో ఛత్రం పట్టినట్లు ఉంటుంది. ఆలయ గర్భాలయంపై పైకి వెళ్లే కొద్దీ ఇరుకైన ఎత్తైన శిఖరం ఉంది. శిఖరంలోని దేవకోష్ఠాలలో ఋషిమునుల విగ్రహాలు ఉన్నాయి. పైభాగంలో ద్విస్తరీయ ఆమలకం మరియు కలశం ఉన్నాయి.
ఆలయ ప్రాంగణంలో ఉన్న సుసజ్జిత మండపంలో ఉత్సవాల సమయంలో వివిధ సాంస్కృతిక మరియు ధార్మిక కార్యక్రమాలు జరుగుతాయి. ఈ ఆలయంలో ప్రతిరోజూ ఉదయం ౬ గంటలకు మరియు సాయంత్రం ౭ గంటలకు హారతి నిర్వహిస్తారు. సాయంత్రం హారతికి ముందు హరిపాఠ పఠనం జరుగుతుంది. ఇక్కడ ఏడాది పొడవునా వివిధ ధార్మిక కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. మహాశివరాత్రి ఇక్కడి ప్రధాన ఉత్సవం. ఈ ఉత్సవం సందర్భంగా ఇక్కడ అఖండ హరినామ సప్తాహం నిర్వహిస్తారు. ఈ సప్తాహంలో ప్రముఖ కీర్తనకారుల కీర్తనలు జరుగుతాయి. సప్తాహం ముగింపు రోజున భక్తులకు మహాప్రసాద పంపిణీ జరుగుతుంది. మహాశివరాత్రి రోజున గ్రామం గుండా శివశంకరుని పల్లకీ ఊరేగింపు వాయిద్యాలతో ఘనంగా జరుగుతుంది. సాయంత్రం ఆలయంలో శాస్త్రోక్తంగా శివ-పార్వతుల వివాహ వేడుక జరుగుతుంది. ఈ రోజున మొత్తం ప్రాంతం జాతరలా మారుతుంది. ఆలయ ప్రాంగణంలో పూజా-ప్రసాదాలు మరియు వివిధ వస్తువులను విక్రయించే దుకాణాలు వెలుస్తాయి. ఉద్యోగ మరియు వ్యాపారాల నిమిత్తం బయట స్థిరపడిన వారు ఈ ఉత్సవం కోసం తప్పనిసరిగా గ్రామానికి వస్తారు. రామనవమి సందర్భంగా ఆలయం నుండి షెగావ్ వరకు పాదయాత్ర ప్రారంభమవుతుంది. శ్రావణ మాసంలో ఇక్కడ వివిధ ధార్మిక కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. ఈ మాసంలోని ప్రతి సోమవారం భక్తుల కోసం మహాప్రసాద పంపిణీ జరుగుతుంది. సుమారు ౨,౫౦౦ మంది భక్తులు ఈ మహాప్రసాదాన్ని స్వీకరిస్తారు. శ్రావణ మాసంలోని చివరి సోమవారం గ్రామ యువకులు కావడితో నీటిని తెచ్చి శివలింగానికి జలాభిషేకం చేస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- మెహకర్ నుండి ౧౨ కి.మీ దూరంలో
- బుల్ఢానా నుండి ౮౨ కి.మీ దూరంలో
- మెహకర్ నుండి ఎస్టి బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో బస చేసే సౌకర్యం లేదు
ശിവചന്ദ്ര മോളീശ്വര സംസ്ഥാൻ
മോളി, താലൂക്ക് മെഹകർ, ജില്ല ബുൽധാന
വനവാസകാലത്ത് ദണ്ഡകാരണ്യത്തിലൂടെ സഞ്ചരിക്കുമ്പോൾ ശ്രീരാമൻ പലയിടത്തും ശിവലിംഗങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചിരുന്നു. അത്തരത്തിൽ ഒരു ശിവലിംഗം മെഹകർ താലൂക്കിലെ മോളി എന്ന ഗ്രാമത്തിലുണ്ട്. ശിവചന്ദ്ര മോളീശ്വര ക്ഷേത്രം എന്നറിയപ്പെടുന്ന ഈ പുരാതന ശിവാലയത്തിലെ ശിവലിംഗം ചൈതന്യവത്താണെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം. ഇതുകാരണം, ചുറ്റുമുള്ള അനേകം ഭക്തർ ഈ ശിവലിംഗത്തിൽ ബിൽവപത്രം അർപ്പിക്കാനും അഭിഷേകം ചെയ്യാനും വൻതോതിൽ ഇവിടെ എത്തിച്ചേരുന്നു. മഹാശിവരാത്രി ദിനത്തിൽ ഈ പ്രദേശം ഒരു തീർത്ഥാടന കേന്ദ്രമായി മാറുന്നു. ഈ ദിവസം ക്ഷേത്രത്തിൽ നടക്കുന്ന ശിവ-പാർവ്വതി വിവാഹച്ചടങ്ങ് വളരെ സവിശേഷമാണ്.
പുരാണങ്ങളിലെ കഥയനുസരിച്ച്, വനവാസകാലത്ത് ശ്രീരാമൻ ഏകദേശം ൰ വർഷം ദണ്ഡകാരണ്യത്തിൽ ചിലവഴിച്ചു. മെഹകർ താലൂക്ക് പണ്ട് ദണ്ഡകാരണ്യത്തിന്റെ ഭാഗമായിരുന്നു. നിലവിലെ അകോല, ബുൽധാന ജില്ലകളുടെ അതിർത്തിക്ക് സമീപമാണ് വിശ്വി (താലൂക്ക് മെഹകർ) എന്ന ഗ്രാമം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ത്രേതായുഗത്തിൽ വിശ്വാമിത്ര മഹർഷി ഈ ഗ്രാമത്തിൽ ശിവലിംഗം സ്ഥാപിച്ച് വർഷങ്ങളോളം തപസ്സുചെയ്തു. ഒരിക്കൽ അദ്ദേഹം അവിടെ യാഗം നടത്തിയപ്പോൾ പ്രദേശത്തെ അസുരന്മാർ ആ യാഗത്തിന് തടസ്സം വരുത്താൻ ശ്രമിച്ചു.
വിശ്വാമിത്ര മഹർഷിയുടെ അഭ്യർത്ഥനപ്രകാരം, അന്ന് ദണ്ഡകാരണ്യത്തിൽ താമസിച്ചിരുന്ന ശ്രീരാമനും ലക്ഷ്മണനും വിശ്വിയിൽ എത്തി ആ അസുരന്മാരെ വധിച്ചു. അതിനുശേഷം അവർ നിലവിലെ മോളി എന്ന ഗ്രാമത്തിലെത്തി. ഈ ഭൂമി ഋഷിമുനിമാരുടെ തപോഭൂമിയായിരുന്നു; ഇവിടെ അവർ കുറച്ചുനാൾ താമസിച്ചു. ശ്രീരാമൻ ശിവശങ്കരന്റെ പരമഭക്തനായിരുന്നു. ശിവശങ്കരനെ പൂജിക്കാതെ അദ്ദേഹം ദിനചര്യകൾ ആരംഭിക്കാറില്ലായിരുന്നു. അതുകൊണ്ടാണ് അദ്ദേഹം ഇവിടെ ശിവലിംഗം പ്രതിഷ്ഠിച്ചത്. ഇവിടുത്തെ താമസത്തിന് ശേഷം അദ്ദേഹം ലോണാർ ഭാഗത്തേക്ക് യാത്രയായി എന്നാണ് ഐതിഹ്യം.
കാലക്രമേണ ഇവിടെ ചെറിയൊരു ശിവക്ഷേത്രം നിർമ്മിക്കപ്പെടുകയും ഈ ക്ഷേത്രം പലതവണ പുനരുദ്ധരിക്കപ്പെടുകയും ചെയ്തു. കുറച്ചു വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് മോളിയിലെ ഗ്രാമവാസികൾ ജനകീയ പിരിവിലൂടെ ക്ഷേത്രത്തിന്റെ മുഖച്ഛായ മാറ്റി. ൰൲൱൰-ൽ ഗ്രാമവാസികൾ ക്ഷേത്ര ട്രസ്റ്റ് രൂപീകരിച്ചു. പുതിയ മനോഹരമായ ക്ഷേത്രം നിർമ്മിക്കാൻ ഗ്രാമവാസികൾ വലിയ തോതിൽ ശാരീരിക അധ്വാനവും നൽകി. സംസ്ഥാന സർക്കാർ ഈ ക്ഷേത്രത്തിന് ‘ക’ വർഗ്ഗ തീർത്ഥാടന കേന്ദ്രത്തിന്റെ പദവി നൽകിയിട്ടുണ്ട്. താലൂക്ക് കേന്ദ്രമായ മെഹകറിൽ നിന്ന് ഏകദേശം ൰൱ കിലോമീറ്റർ അകലെയാണ് മോളി ഗ്രാമം. ക്ഷേത്രത്തിന് വിശാലമായ പരിസരമുണ്ട്. ഗ്രാമവാസികൾ കുറച്ചു വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ജനകീയ പിരിവിലൂടെ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജിന്റെ അശ്വാരൂഢ പ്രതിമ സ്ഥാപിച്ചു.
ക്ഷേത്ര പ്രവേശന കവാടത്തിന് വലതുവശത്തായി മനോഹരമായ കൽദീപസ്തംഭമുണ്ട്. മതിലിലെ കവാടത്തിലൂടെ അകത്ത് കടന്നാൽ ക്ഷേത്രമുറ്റത്ത് പ്രവേശിക്കാം. മുറ്റത്തും ക്ഷേത്രത്തിന് പിന്നിലുമായി വിവിധ വൃക്ഷങ്ങൾ നട്ടുപിടിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. ഭക്തർക്ക് ഇരിക്കാൻ ഇവിടെ ബെഞ്ചുകളുടെ സൗകര്യമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലുള്ള നന്ദി മണ്ഡപത്തിൽ ഉയർന്ന വജ്രപീഠത്തിൽ ശിവന്റെ വാഹനമായ നന്ദിയുടെ വലിയ ശിലാവിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. സമീപത്തുള്ള വടവൃക്ഷത്തിന് താഴെ ചില വിഗ്രഹങ്ങൾ വെച്ചിട്ടുണ്ട്. ഭക്തർ അവയെയും ഭക്തിപൂർവ്വം പൂജിക്കുന്നു. സമീപത്ത് തന്നെ ധൂനി എരിയുന്നുണ്ട്.
അർദ്ധതുറന്ന സഭാ മണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവുമാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ഉത്സവകാലത്ത് ഭക്തരുടെ നിര കൃത്യമായി നിയന്ത്രിക്കാൻ സഭാ മണ്ഡപത്തിൽ സ്റ്റെയിൻലെസ് സ്റ്റീൽ റെയിലിംഗ് സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. സഭാ മണ്ഡപത്തിലെ ദേവകോഷ്ഠങ്ങളിൽ വിഠൽ-രഖുമായി, സന്ത് ജ്ഞാനേശ്വർ എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. സഭാ മണ്ഡപത്തിൽ ഗർഭഗൃഹത്തിന് ചുറ്റും പ്രദക്ഷിണം വെക്കാൻ രണ്ട് വാതിലുകളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ തറയിൽ മധ്യഭാഗത്തായി ശിവലിംഗമുണ്ട്. ഈ ലിംഗത്തിന്റെ ശാലുങ്കയിൽ പിച്ചള തകിടിന്റെ ആവരണവും ലിംഗത്തിന് മുഖംമൂടിയുമുണ്ട്.
ഈ മുഖംമൂടിയുടെ ശിരസ്സിൽ ചന്ദ്രക്കലയും ഗംഗയുമുണ്ട്. ലിംഗത്തിന് മുകളിൽ നാഗം തന്റെ പത്തികൊണ്ട് കുട പിടിച്ചിരിക്കുന്നു. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിൽ മുകളിലേക്ക് കൂർത്തുവരുന്ന ഉയർന്ന ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിലെ ദേവകോഷ്ഠങ്ങളിൽ ഋഷിമുനിമാരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. മുകൾഭാഗത്ത് ദ്വിസ്തര അമൽക്കയും കലശവുമുണ്ട്.
ക്ഷേത്ര പരിസരത്തുള്ള സുസജ്ജമായ മണ്ഡപത്തിൽ ഉത്സവവേളകളിൽ വിവിധ സാംസ്കാരിക, മതപരമായ പരിപാടികൾ നടക്കുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ദിവസവും രാവിലെ ൰ മണിക്കും വൈകുന്നേരം ൱ മണിക്കും ആരതി നടക്കുന്നു. വൈകുന്നേരത്തെ ആരതിക്ക് മുമ്പ് ഹരിപാഠം പാരായണം ചെയ്യുന്നു. ഇവിടെ വർഷം മുഴുവനും വിവിധ മതപരമായ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. മഹാശിവരാത്രിയാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന ഉത്സവം. ഈ ഉത്സവത്തോടനുബന്ധിച്ച് ഇവിടെ അഖണ്ഡ ഹരിനാമ സപ്താഹം സംഘടിപ്പിക്കുന്നു. ഈ സപ്താഹത്തിൽ പ്രശസ്തരായ കീർത്തനക്കാർ കീർത്തനങ്ങൾ ആലപിക്കുന്നു. സപ്താഹത്തിന്റെ സമാപന ദിവസം ഭക്തർക്ക് മഹാപ്രസാദം വിതരണം ചെയ്യുന്നു. മഹാശിവരാത്രിക്ക് ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് ശിവശങ്കരന്റെ പല്ലക്കിൽ വാദ്യമേളങ്ങളോടെ ഘോഷയാത്ര നടത്തുന്നു. വൈകുന്നേരം ക്ഷേത്രത്തിൽ ശാസ്ത്രീയമായി ശിവ-പാർവ്വതി വിവാഹച്ചടങ്ങ് നടക്കുന്നു. ഈ ദിവസം മുഴുവൻ പ്രദേശവും ഒരു തീർത്ഥാടന കേന്ദ്രമായി മാറുന്നു. ക്ഷേത്ര പരിസരത്ത് പൂജ-പ്രസാദം കൂടാതെ വിവിധ വസ്തുക്കൾ വിൽക്കുന്ന കടകൾ അലങ്കരിക്കപ്പെടുന്നു. ജോലി സംബന്ധമായും ബിസിനസ്സ് സംബന്ധമായും പുറത്ത് താമസിക്കുന്നവർ ഈ ഉത്സവത്തിനായി ഗ്രാമത്തിൽ വരുന്നു. രാമനവമി പ്രമാണിച്ച് ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് ഷേഗാവിലേക്ക് കാൽനടയായി ദിണ്ടി പുറപ്പെടുന്നു. ശ്രാവണ മാസത്തിൽ ഇവിടെ വിവിധ മതപരമായ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. ഈ മാസത്തിലെ എല്ലാ തിങ്കളാഴ്ചയും ഭക്തർക്കായി മഹാപ്രസാദം സംഘടിപ്പിക്കുന്നു. ഏകദേശം രണ്ടായിരത്തി അഞ്ഞൂറ് ഭക്തർ ഈ മഹാപ്രസാദത്തിന്റെ പ്രയോജനം നേടുന്നു. ശ്രാവണത്തിലെ അവസാന തിങ്കളാഴ്ച ഗ്രാമത്തിലെ യുവാക്കൾ കാവടിയിൽ ജലം കൊണ്ടുവന്ന് ശിവലിംഗത്തിൽ ജലാഭിഷേകം നടത്തുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- മെഹകറിൽ നിന്ന് ൰൱ കിലോമീറ്റർ അകലെ
- ബുൽധാനയിൽ നിന്ന് ൰൱ കിലോമീറ്റർ അകലെ
- മെഹകറിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമില്ല
ಶಿವಚಂದ್ರ ಮೌಳೀಶ್ವರ ಸಂಸ್ಥಾನ
ಮೌಳಿ, ತಾ. ಮೆಹಕರ್, ಜಿ. ಬುಲ್ಢಾಣಾ
ವನವಾಸದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ದಂಡಕಾರಣ್ಯದಲ್ಲಿ ಸಂಚರಿಸುತ್ತಿದ್ದಾಗ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರರು ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗಗಳನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದ್ದರು. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಶಿವಲಿಂಗ ಮೆಹಕರ್ ತಾಲೂಕಿನ ಮೌಳಿ ಎಂಬ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿದೆ. ಶಿವಚಂದ್ರ ಮೌಳೀಶ್ವರ ದೇವಾಲಯ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿರುವ ಈ ಪ್ರಾಚೀನ ಶಿವಾಲಯದಲ್ಲಿರುವ ಶಿವಲಿಂಗವು ಜಾಗೃತವಾಗಿದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಇದೇ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ, ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಕ್ತರು ಈ ಶಿವಲಿಂಗಕ್ಕೆ ಬಿಲ್ವಪತ್ರೆ ಅರ್ಪಿಸಲು ಮತ್ತು ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಲು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ದಿನದಂದು ಈ ಪರಿಸರವು ಜಾತ್ರೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ದಿನ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ನೆರವೇರುವ ಶಿವ-ಪಾರ್ವತಿ ವಿವಾಹ ಮಹೋತ್ಸವವು ಅತ್ಯಂತ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣವಾಗಿರುತ್ತದೆ.
ಪುರಾಣಗಳ ಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ವನವಾಸದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಶ್ರೀರಾಮರು ಸುಮಾರು ೧೦ ವರ್ಷಗಳನ್ನು ದಂಡಕಾರಣ್ಯದಲ್ಲಿ ಕಳೆದರು. ಮೆಹಕರ್ ತಾಲೂಕು ಹಿಂದೆ ದಂಡಕಾರಣ್ಯದ ಒಂದು ಭಾಗವಾಗಿತ್ತು. ಪ್ರಸ್ತುತ ಅಕೋಲಾ ಮತ್ತು ಬುಲ್ಢಾಣಾ ಜಿಲ್ಲೆಗಳ ಗಡಿಯ ಸಮೀಪ ವಿಶ್ವೀ (ತಾ. ಮೆಹಕರ್) ಎಂಬ ಗ್ರಾಮವಿದೆ. ತ್ರೇತಾಯುಗದಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಮಹರ್ಷಿಗಳು ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ತಪಸ್ಸು ಮಾಡಿದರು. ಒಮ್ಮೆ ಅವರು ಅಲ್ಲಿ ಯಜ್ಞವನ್ನು ಆಯೋಜಿಸಿದಾಗ, ಆ ಪರಿಸರದ ದೈತ್ಯರು ಯಜ್ಞಕ್ಕೆ ವಿಘ್ನ ತರಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದರು.
ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಮಹರ್ಷಿಗಳ ಕೋರಿಕೆಯ ಮೇರೆಗೆ, ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ದಂಡಕಾರಣ್ಯದಲ್ಲಿ ವಾಸವಿದ್ದ ಶ್ರೀರಾಮ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಣರು ವಿಶ್ವೀಗೆ ಬಂದು ಆ ದೈತ್ಯರನ್ನು ಸಂಹರಿಸಿದರು. ತದನಂತರ ಅವರು ಪ್ರಸ್ತುತ ಮೌಳಿ ಎಂಬ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದರು. ಈ ಭೂಮಿಯು ಋಷಿ-ಮುನಿಗಳ ತಪೋಭೂಮಿಯಾಗಿತ್ತು; ಇಲ್ಲಿ ಅವರು ಕೆಲಕಾಲ ವಾಸ್ತವ್ಯ ಹೂಡಿದ್ದರು. ಶ್ರೀರಾಮರು ಶಿವಶಂಕರರ ಪರಮ ಭಕ್ತರಾಗಿದ್ದರು. ಶಿವಶಂಕರರ ಪೂಜೆ ಮಾಡದೆ ಅವರು ತಮ್ಮ ದಿನಚರಿಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದರು. ಇಲ್ಲಿನ ವಾಸ್ತವ್ಯದ ನಂತರ ಅವರು ಲೋನಾರ್ಗೆ ಪ್ರಯಾಣ ಬೆಳೆಸಿದರು ಎಂಬುದು ಐತಿಹ್ಯ.
ಕಾಲಾಂತರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಶಿವ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು ಮತ್ತು ಈ ದೇವಾಲಯದ ಅನೇಕ ಬಾರಿ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವೂ ನಡೆಯಿತು. ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಮೌಳಿಯ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಸಾರ್ವಜನಿಕ ದೇಣಿಗೆಯಿಂದ ದೇವಾಲಯದ ಕಾಯಕಲ್ಪ ಮಾಡಿದರು. ೨೦೧೮ರಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ದೇವಾಲಯದ ಟ್ರಸ್ಟ್ ಮಂಡಳಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. ಹೊಸ ಭವ್ಯ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಶ್ರಮದಾನವನ್ನೂ ಮಾಡಿದರು. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವು ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ‘ಕ’ ವರ್ಗದ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರದ ಸ್ಥಾನಮಾನವನ್ನು ನೀಡಿದೆ. ತಾಲೂಕು ಕೇಂದ್ರವಾದ ಮೆಹಕರ್ನಿಂದ ಮೌಳಿ ಗ್ರಾಮವು ಸುಮಾರು ೧೩ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿದೆ. ದೇವಾಲಯವು ವಿಶಾಲವಾದ ಆವರಣವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಗ್ರಾಮಸ್ಥರು ದೇವಾಲಯದ ಎದುರೇ ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಸಾರ್ವಜನಿಕ ದೇಣಿಗೆಯಿಂದ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಅಶ್ವಾರೂಢ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದ್ದಾರೆ.
ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಲಕ್ಕೆ ಸುಂದರವಾದ ಕಲ್ಲಿನ ದೀಪಸ್ತಂಭವಿದೆ. ಕೋಟೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಒಳಗೆ ಬಂದ ನಂತರ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ದೇವಾಲಯದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಮರಗಳನ್ನು ನೆಡಲಾಗಿದೆ. ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಇಲ್ಲಿ ಆಸನಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಎದುರಿನ ನಂದಿ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಶಿವನ ವಾಹನವಾದ ನಂದಿಯ ದೊಡ್ಡ ಪಾಷಾಣ ಮೂರ್ತಿಯು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಸಮೀಪದಲ್ಲಿರುವ ಆಲದ ಮರದ ಕೆಳಗೆ ಕೆಲವು ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಇಡಲಾಗಿದೆ. ಭಕ್ತರು ಅವುಗಳನ್ನೂ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಪೂಜಿಸುತ್ತಾರೆ. ಹತ್ತಿರದಲ್ಲೇ ಧೂಪವು ಪ್ರಜ್ವಲಿಸುತ್ತಿರುತ್ತದೆ.
ಅರ್ಧ ತೆರೆದ ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವು ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ಸಾಲುಗಳನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ನಿರ್ವಹಿಸಲು, ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಸ್ಟೇನ್ಲೆಸ್ ಸ್ಟೀಲ್ನ ರೇಲಿಂಗ್ ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿ ಮತ್ತು ಸಂತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರರ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗೃಹದ ಸುತ್ತಲೂ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಹಾಕಲು ಎರಡು ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಈ ಲಿಂಗದ ಪೀಠದ ಮೇಲೆ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಹೊದಿಕೆ ಮತ್ತು ಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಮುಖವಾಡವಿದೆ.
ಈ ಮುಖವಾಡದ ಮಸ್ತಕದ ಮೇಲೆ ಚಂದ್ರಕಲೆ ಮತ್ತು ಗಂಗೆಯಿದ್ದಾರೆ. ಲಿಂಗದ ಮೇಲೆ ನಾಗನು ತನ್ನ ಹೆಡೆಯಿಂದ ಛತ್ರವನ್ನು ಹಿಡಿದಿದ್ದಾನೆ. ದೇವಾಲಯದ ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ಮೇಲ್ಭಾಗಕ್ಕೆ ಕಿರಿದಾಗುತ್ತಾ ಹೋಗುವ ಎತ್ತರದ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಋಷಿ-ಮುನಿಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ದ್ವಿಸ್ತರದ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಲಶಗಳಿವೆ.
ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿರುವ ಸುಸಜ್ಜಿತ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಉತ್ಸವದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೬ ಗಂಟೆಗೆ ಮತ್ತು ಸಂಜೆ ೭ ಗಂಟೆಗೆ ಆರತಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಸಂಜೆಯ ಆರತಿಯ ಮೊದಲು ಹರಿಪಾಠದ ಪಠಣ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ವರ್ಷವಿಡೀ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯು ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ. ಈ ಉತ್ಸವದ ನಿಮಿತ್ತ ಇಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಪ್ತಾಹದಲ್ಲಿ ಹೆಸರಾಂತ ಕೀರ್ತನಕಾರರ ಕೀರ್ತನೆಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಸಪ್ತಾಹದ ಸಮಾರೋಪದ ದಿನದಂದು ಭಕ್ತರಿಗೆ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ವಿತರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ಗ್ರಾಮದಿಂದ ಶಿವಶಂಕರರ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯನ್ನು ವಾದ್ಯ-ಘೋಷಗಳೊಂದಿಗೆ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಕೊಂಡೊಯ್ಯಲಾಗುತ್ತದೆ. ಸಂಜೆ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತವಾಗಿ ಶಿವ-ಪಾರ್ವತಿ ವಿವಾಹ ಮಹೋತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ದಿನ ಇಡೀ ಪರಿಸರವು ಜಾತ್ರೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಪೂಜಾ-ಪ್ರಸಾದ ಹಾಗೂ ವಿವಿಧ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡುವ ಅಂಗಡಿಗಳು ಅಲಂಕೃತಗೊಳ್ಳುತ್ತವೆ. ಉದ್ಯೋಗ ಮತ್ತು ವ್ಯವಹಾರದ ನಿಮಿತ್ತ ಹೊರಗಡೆ ನೆಲೆಸಿರುವ ಜನರು ಈ ಉತ್ಸವಕ್ಕಾಗಿ ತಪ್ಪದೇ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾರೆ. ರಾಮನವಮಿಯ ನಿಮಿತ್ತ ದೇವಾಲಯದಿಂದ ಶೇಗಾಂವ್ಗೆ ಪಾದಯಾತ್ರೆಯ ದಿಂಡಿ ಹೊರಡುತ್ತದೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ತಿಂಗಳ ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸುಮಾರು ೨,೫೦೦ ಭಕ್ತರು ಈ ಮಹಾಪ್ರಸಾದದ ಲಾಭವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾರೆ. ಶ್ರಾವಣದ ಕೊನೆಯ ಸೋಮವಾರ ಗ್ರಾಮದ ಯುವಕರು ಕಾವಡಿಯ ಮೂಲಕ ನೀರನ್ನು ತಂದು ಶಿವಲಿಂಗಕ್ಕೆ ಜಲಾಭಿಷೇಕ ಮಾಡುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಮೆಹಕರ್ನಿಂದ ೧೨ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ಬುಲ್ಢಾಣಾದಿಂದ ೮೨ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ಮೆಹಕರ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
শিবচন্দ্র মোळीশ্বর প্রতিষ্ঠান
মোळी, তা. মেহকর, জি. বুলডানা
বনবাসের সময় দণ্ডকারণ্যে ভ্রমণের কালে শ্রীরামচন্দ্র বহু স্থানে শিবলিঙ্গ প্রতিষ্ঠা করেছিলেন। তার মধ্যে একটি শিবলিঙ্গ মেহকর তালুকভুক্ত মোळी গ্রামে অবস্থিত। শিবচন্দ্র মোळीশ্বর মন্দির নামে পরিচিত এই প্রাচীন শিবালয়ের শিবলিঙ্গ জাগ্রত বলে ভক্তদের বিশ্বাস। এই কারণেই, পঞ্চক্রোশীর অসংখ্য ভক্ত এই শিবলিঙ্গে বেলপাতা অর্পণ করতে ও অভিষেক করতে বিপুল সংখ্যায় এখানে আসেন। মহাশিবরাত্রির দিনে এই প্রাঙ্গণ এক বিশাল মেলায় পরিণত হয়। এই দিনে মন্দিরে সম্পন্ন হওয়া শিব-পার্বতী বিবাহ উৎসব অত্যন্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ।
পুরাণের কাহিনী অনুসারে, বনবাসের সময় শ্রীরামচন্দ্র প্রায় দশ বছর দণ্ডকারণ্যে অতিবাহিত করেছিলেন। মেহকর তালুক পূর্বে দণ্ডকারণ্যেরই একটি অংশ ছিল। বর্তমানের অকোলা ও বুলডানা জেলার সীমানার কাছে বিশ্বী (তা. মেহকর) গ্রামটি অবস্থিত। ত্রেতাযুগে বিশ্বামিত্র ঋষি এই গ্রামে শিবলিঙ্গ প্রতিষ্ঠা করে বহু বছর তপস্যা করেছিলেন। একবার তিনি সেখানে যজ্ঞের আয়োজন করলে পার্শ্ববর্তী দৈত্যরা সেই যজ্ঞে বিঘ্ন ঘটানোর চেষ্টা করে।
বিশ্বামিত্র ঋষির অনুরোধে, সেই সময় দণ্ডকারণ্যে বসবাসরত শ্রীরাম ও লক্ষ্মণ বিশ্বীতে এসে সেই দৈত্যদের সংহার করেন। এরপর তাঁরা বর্তমানের মোळी গ্রামে আসেন। এই ভূমি ছিল ঋষি-মুনিদের তপোভূমি; এখানে তাঁরা কিছুকাল অবস্থান করেছিলেন। শ্রীরামচন্দ্র ছিলেন শিবশঙ্করের পরম ভক্ত। শিবশঙ্করের পূজা না করে তিনি দিনচর্যা শুরু করতেন না। সেই কারণেই তিনি এখানে শিবলিঙ্গ প্রতিষ্ঠা করেছিলেন। এখানকার অবস্থানের পর তিনি লোনারের দিকে যাত্রা করেছিলেন বলে লোকশ্রুতি আছে।
কালের প্রবাহে এখানে ছোট শিবমন্দির গড়ে ওঠে এবং এই মন্দিরের বহুবার জীর্ণোদ্ধারও হয়েছে। কয়েক বছর আগে মোळी গ্রামের গ্রামবাসীরা লোকচাঁদার মাধ্যমে মন্দিরের রূপান্তর ঘটান। ২০১৮ সালে গ্রামবাসীরা মন্দিরের অছি পরিষদ গঠন করেন। নতুন भव्य মন্দির গড়ার জন্য গ্রামবাসীরা প্রচুর শ্রমদানও করেছেন। রাজ্য সরকার এই মন্দিরকে ‘ক’ শ্রেণিভুক্ত তীর্থক্ষেত্রের মর্যাদা দিয়েছে। তালুকের সদর দপ্তর মেহকর থেকে মোळी গ্রামটি প্রায় ১৩ কিমি দূরে অবস্থিত। মন্দিরের বিশাল প্রাঙ্গণ রয়েছে। গ্রামবাসীরা মন্দিরের সামনেই কয়েক বছর আগে লোকচাঁদায় ছত্রপতি শিবাজী মহারাজের অশ্বারূঢ় মূর্তি স্থাপন করেছেন।
মন্দিরের প্রবেশদ্বারের ডানদিকে সুন্দর পাথরের দীপস্তম্ভ রয়েছে। প্রাচীরবেষ্টিত প্রবেশদ্বার দিয়ে ভেতরে এলে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। প্রাঙ্গণে এবং মন্দিরের পেছনের দিকে বিভিন্ন বৃক্ষ রোপণ করা হয়েছে। ভক্তদের বসার জন্য এখানে বেঞ্চের সুবিধা আছে। মন্দিরের সামনের নন্দীমণ্ডপে উঁচু বজ্রপীঠে শিবের বাহন নন্দীর বড় পাথরের মূর্তি বিরাজমান। কাছেই অবস্থিত বটগাছের নিচে কিছু মূর্তি রাখা আছে। ভক্তরা ভক্তিভরে সেগুলোরও পূজা করেন। কাছেই ধুনী প্রজ্বলিত থাকে।
অর্ধখোলা সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন। উৎসবের সময় ভক্তদের সারিবদ্ধভাবে চলাচলের সুব্যবস্থার জন্য সভামণ্ডপে স্টেইনলেস স্টিলের রেলিং বসানো হয়েছে। সভামণ্ডপের কুলুঙ্গিতে বিঠ্ঠল-রখুমাই ও সন্ত জ্ঞানেশ্বরের মূর্তি প্রতিষ্ঠিত আছে। সভামণ্ডপে গর্ভগৃহের চারপাশে প্রদক্ষিণ করার জন্য দুটি দরজা আছে। গর্ভগৃহের মেঝেতে মাঝখানে শিবপিণ্ডি রয়েছে। এই পিণ্ডির শালুংকার ওপর পিতলের পাতের আবরণ ও লিঙ্গের ওপর মুখাবরণ আছে।
এই মুখাবরণের মস্তকে চন্দ্রকলা ও গঙ্গা রয়েছে। পিণ্ডির ওপর নাগ তার ফণা দিয়ে ছত্র ধরে আছে। মন্দিরের গর্ভগৃহের ওপর ওপরের দিকে সরু হয়ে যাওয়া উঁচু শিখর রয়েছে। শিখরের কুলুঙ্গিতে ঋষি-মুনিদের মূর্তি আছে। ওপরের দিকে দ্বিস্তরীয় আমলক ও কলস রয়েছে।
মন্দির প্রাঙ্গণে থাকা সুসজ্জিত মণ্ডপে উৎসবের সময় বিভিন্ন সাংস্কৃতিক ও ধর্মীয় অনুষ্ঠান সম্পন্ন হয়। এই মন্দিরে প্রতিদিন সকাল ছয়টায় ও সন্ধ্যা সাতটায় আরতি করা হয়। সন্ধ্যার আরতির আগে হরিপাঠ পাঠ করা হয়। এখানে সারা বছর বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। মহাশিবরাত্রি এখানকার প্রধান উৎসব। এই উৎসব উপলক্ষে এখানে অখণ্ড হরিনাম সপ্তাহের আয়োজন করা হয়। এই সপ্তাহে নামী কীর্তনশিল্পীদের কীর্তন হয়। সপ্তাহের সমাপ্তির দিনে ভক্তদের মধ্যে মহাপ্রসাদ বিতরণ করা হয়। মহাশিবরাত্রিতে গ্রাম থেকে শিবশঙ্করের পালকি শোভাযাত্রা বাদ্যি-বাজনা সহকারে বের করা হয়। সন্ধ্যায় মন্দিরে শাস্ত্রীয় পদ্ধতিতে শিব-পার্বতী বিবাহ উৎসব সম্পন্ন হয়। এই দিনে পুরো এলাকা এক বিশাল মেলায় পরিণত হয়। মন্দির প্রাঙ্গণে পূজা-প্রসাদ এবং বিভিন্ন সামগ্রী বিক্রির দোকান সাজানো হয়। চাকরি ও ব্যবসার প্রয়োজনে বাইরে বসবাসকারী মানুষেরা এই উৎসবের জন্য অবশ্যই গ্রামে আসেন। রামনবমী উপলক্ষে মন্দির থেকে শেগাঁও পর্যন্ত পদযাত্রা (দিণ্ডি) রওনা হয়। শ্রাবণ মাসে এখানে বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। এই মাসের প্রতি সোমবার ভক্তদের জন্য মহাপ্রসাদের আয়োজন করা হয়। প্রায় আড়াই হাজার ভক্ত এই মহাপ্রসাদ গ্রহণ করেন। শ্রাবণের শেষ সোমবার গ্রামের যুবকরা কাঁধে কাওড় নিয়ে জল এনে শিবলিঙ্গে জলাভিষেক করেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- মেহকর থেকে ১২ কিমি দূরত্বে
- বুলডানা থেকে ৮২ কিমি দূরত্বে
- মেহকর থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- প্রাঙ্গণে থাকার সুবিধা নেই
ਸ਼ਿਵਚੰਦਰ ਮੋਲੀਸ਼ਵਰ ਸੰਸਥਾਨ
ਮੋਲੀ, ਤਹਿਸੀਲ ਮੇਹਕਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਬੁਲਢਾਣਾ
ਵਣਵਾਸ ਦੌਰਾਨ ਦੰਡਕਾਰਣਯ ਵਿੱਚ ਭ੍ਰਮਣ ਕਰਦੇ ਹੋਏ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਨੇ ਕਈ ਸਥਾਨਾਂ ‘ਤੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗਾਂ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਮੇਹਕਰ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਮੋਲੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਹੈ। ਸ਼ਿਵਚੰਦਰ ਮੋਲੀਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਇਸ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਵਾਲੇ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਜਾਗ੍ਰਿਤ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਮਾਨਤਾ ਹੈ। ਇਸੇ ਕਾਰਨ, ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਅਣਗਿਣਤ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ‘ਤੇ ਬੇਲਪੱਤਰ ਅਰਪਣ ਕਰਨ ਅਤੇ ਅਭਿਸ਼ੇਕ ਕਰਨ ਲਈ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦੇ ਦਿਨ ਇਸ ਪਰਿਸਰ ਨੂੰ ਮੇਲੇ ਦਾ ਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸੰਪੰਨ ਹੋਣ ਵਾਲਾ ਸ਼ਿਵ-ਪਾਰਵਤੀ ਵਿਆਹ ਸਮਾਰੋਹ ਬਹੁਤ ਹੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਪੁਰਾਣਾਂ ਦੀ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਵਣਵਾਸ ਦੇ ਸਮੇਂ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਨੇ ਲਗਭਗ ਦਸ ਸਾਲ ਦੰਡਕਾਰਣਯ ਵਿੱਚ ਬਿਤਾਏ। ਮੇਹਕਰ ਤਹਿਸੀਲ ਪਹਿਲਾਂ ਦੰਡਕਾਰਣਯ ਦਾ ਹੀ ਇੱਕ ਹਿੱਸਾ ਸੀ। ਵਰਤਮਾਨ ਅਕੋਲਾ ਅਤੇ ਬੁਲਢਾਣਾ ਜ਼ਿਲ੍ਹਿਆਂ ਦੀ ਸਰਹੱਦ ਦੇ ਨੇੜੇ ਵਿਸ਼ਵੀ (ਤਹਿਸੀਲ ਮੇਹਕਰ) ਪਿੰਡ ਵਸਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਤ੍ਰੇਤਾ ਯੁੱਗ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ਵਾਮਿੱਤਰ ਰਿਸ਼ੀ ਨੇ ਇਸ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕਰਕੇ ਕਈ ਸਾਲ ਤਪੱਸਿਆ ਕੀਤੀ। ਇੱਕ ਵਾਰ ਜਦੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਉੱਥੇ ਯੱਗ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤਾ ਤਾਂ ਖੇਤਰ ਦੇ ਦੈਂਤਾਂ ਨੇ ਇਸ ਯੱਗ ਵਿੱਚ ਵਿਘਨ ਪਾਉਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ।
ਵਿਸ਼ਵਾਮਿੱਤਰ ਰਿਸ਼ੀ ਦੀ ਬੇਨਤੀ ‘ਤੇ, ਉਸ ਸਮੇਂ ਦੰਡਕਾਰਣਯ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਕਰ ਰਹੇ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਅਤੇ ਲਕਸ਼ਮਣ ਨੇ ਵਿਸ਼ਵੀ ਆ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੈਂਤਾਂ ਦਾ ਸੰਹਾਰ ਕੀਤਾ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਹ ਵਰਤਮਾਨ ਮੋਲੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਆਏ। ਇਹ ਭੂਮੀ ਰਿਸ਼ੀ-ਮੁਨੀਆਂ ਦੀ ਤਪੋਭੂਮੀ ਸੀ; ਇੱਥੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਕੁਝ ਸਮਾਂ ਨਿਵਾਸ ਕੀਤਾ। ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਸ਼ਿਵਸ਼ੰਕਰ ਦੇ ਪਰਮ ਭਗਤ ਸਨ। ਸ਼ਿਵਸ਼ੰਕਰ ਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੇ ਬਿਨਾਂ ਉਹ ਆਪਣੀ ਦਿਨਚਰਿਆ ਸ਼ੁਰੂ ਨਹੀਂ ਕਰਦੇ ਸਨ। ਇਸੇ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇੱਥੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ। ਇੱਥੇ ਨਿਵਾਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਹ ਲੋਨਾਰ ਵੱਲ ਰਵਾਨਾ ਹੋਏ, ਅਜਿਹੀ ਲੋਕ-ਕਥਾ ਹੈ।
ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਇੱਥੇ ਛੋਟਾ ਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਅਤੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਕਈ ਵਾਰ ਜੀਰੋਧਾਰ ਵੀ ਹੋਇਆ। ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਮੋਲੀ ਦੇ ਗ੍ਰਾਮਵਾਸੀਆਂ ਨੇ ਲੋਕ-ਚੰਦੇ ਨਾਲ ਮੰਦਰ ਦਾ ਕਾਇਆ-ਕਲਪ ਕੀਤਾ। ੨੦੧੮ ਵਿੱਚ ਗ੍ਰਾਮਵਾਸੀਆਂ ਨੇ ਮੰਦਰ ਦੇ ਟਰੱਸਟ ਬੋਰਡ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ। ਨਵਾਂ ਭਵਨ ਮੰਦਰ ਬਣਾਉਣ ਲਈ ਗ੍ਰਾਮਵਾਸੀਆਂ ਨੇ ਵੱਡੀ ਮਾਤਰਾ ਵਿੱਚ ਸ਼ਰਮਦਾਨ ਵੀ ਕੀਤਾ। ਰਾਜ ਸਰਕਾਰ ਨੇ ਇਸ ਮੰਦਰ ਨੂੰ ‘ਕ’ ਵਰਗ ਦੇ ਤੀਰਥ ਸਥਾਨ ਦਾ ਦਰਜਾ ਦਿੱਤਾ ਹੈ। ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਸਥਾਨ ਮੇਹਕਰ ਤੋਂ ਮੋਲੀ ਪਿੰਡ ਲਗਭਗ ੧੩ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਹੈ। ਮੰਦਰ ਨੂੰ ਵਿਸ਼ਾਲ ਪਰਿਸਰ ਪ੍ਰਾਪਤ ਹੈ। ਗ੍ਰਾਮਵਾਸੀਆਂ ਨੇ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਹੀ ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਲੋਕ-ਚੰਦੇ ਨਾਲ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਅਸ਼ਵਾਰੂਢ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸੁੰਦਰ ਪੱਥਰ ਦੀ ਦੀਪਮਾਲਾ ਹੈ। ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਅੰਦਰ ਆਉਣ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਅਤੇ ਮੰਦਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਰੁੱਖ ਲਗਾਏ ਗਏ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਇੱਥੇ ਬੈਂਚਾਂ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਉੱਚੇ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਸ਼ਿਵ ਜੀ ਦੀ ਸਵਾਰੀ ਨੰਦੀ ਦੀ ਵੱਡੀ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਨੇੜੇ ਹੀ ਸਥਿਤ ਵਟ-ਵ੍ਰਿਛ (ਬਰਗਦ) ਦੇ ਹੇਠਾਂ ਕੁਝ ਮੂਰਤੀਆਂ ਰੱਖੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੁਆਰਾ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਵੀ ਸ਼ਰਧਾ ਨਾਲ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਨੇੜੇ ਹੀ ਧੂਣੀ ਪ੍ਰਜਵਲਿਤ ਰਹਿੰਦੀ ਹੈ।
ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹਾ ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਉਤਸਵ ਦੇ ਸਮੇਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਕਤਾਰ ਦਾ ਸਹੀ ਪ੍ਰਬੰਧਨ ਹੋ ਸਕੇ, ਇਸ ਲਈ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸਟੇਨਲੈੱਸ ਸਟੀਲ ਦੀ ਰੇਲਿੰਗ ਲਗਾਈ ਗਈ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਠਕਾਂ ਵਿੱਚ ਵਿੱਠਲ-ਰਖੁਮਾਈ ਅਤੇ ਸੰਤ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਸਥਾਪਿਤ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਪ੍ਰਦੱਖਣਾ ਕਰਨ ਲਈ ਦੋ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਵਿਚਕਾਰ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ। ਇਸ ਪਿੰਡੀ ਦੀ ਸ਼ਾਲੁੰਕੇ ‘ਤੇ ਪਿੱਤਲ ਦੇ ਪੱਤਰੇ ਦਾ ਕਵਚ ਅਤੇ ਲਿੰਗ ‘ਤੇ ਮੁਖੌਟਾ ਹੈ।
ਇਸ ਮੁਖੌਟੇ ਦੇ ਮਸਤਕ ‘ਤੇ ਚੰਦਰਮਾ ਅਤੇ ਗੰਗਾ ਹੈ। ਪਿੰਡੀ ‘ਤੇ ਨਾਗ ਨੇ ਆਪਣੇ ਫਣ ਨਾਲ ਛੱਤਰ ਧਾਰਨ ਕੀਤਾ ਹੋਇਆ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ‘ਤੇ ਉੱਪਰ ਵੱਲ ਨੀਵਾਂ ਹੁੰਦਾ ਜਾਣ ਵਾਲਾ ਉੱਚਾ ਸਿਖਰ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੇ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਠਕਾਂ ਵਿੱਚ ਰਿਸ਼ੀ-ਮੁਨੀਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਦੋ-ਪੱਧਰੀ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ।
ਮੰਦਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਸੁਸੱਜਿਤ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਉਤਸਵ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਅਤੇ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹਰ ਰੋਜ਼ ਸਵੇਰੇ ਛੇ ਵਜੇ ਅਤੇ ਸ਼ਾਮ ਸੱਤ ਵਜੇ ਆਰਤੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਸ਼ਾਮ ਦੀ ਆਰਤੀ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਹਰਿਪਾਠ ਦਾ ਪਾਠ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਸਾਲ ਭਰ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਉਤਸਵ ਹੈ। ਇਸ ਉਤਸਵ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਇੱਥੇ ਅਖੰਡ ਹਰਿਨਾਮ ਸਪਤਾਹ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਪਤਾਹ ਵਿੱਚ ਨਾਮਵਰ ਕੀਰਤਨਕਾਰਾਂ ਦੇ ਕੀਰਤਨ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਸਪਤਾਹ ਦੀ ਸਮਾਪਤੀ ਦੇ ਦਿਨ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਵੰਡਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਨੂੰ ਪਿੰਡ ਵਿੱਚੋਂ ਸ਼ਿਵਸ਼ੰਕਰ ਦੀ ਪਾਲਕੀ ਵਿੱਚ ਵਾਜੇ-ਗੱਜੇ ਨਾਲ ਜਲੂਸ ਕੱਢਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ਾਸਤਰੋਕਤ ਵਿਧੀ ਨਾਲ ਸ਼ਿਵ-ਪਾਰਵਤੀ ਵਿਆਹ ਸਮਾਰੋਹ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਪੂਰੇ ਪਰਿਸਰ ਨੂੰ ਮੇਲੇ ਦਾ ਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਪੂਜਾ-ਪ੍ਰਸਾਦ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਵੱਖ-ਵੱਖ ਵਸਤੂਆਂ ਵੇਚਣ ਵਾਲੀਆਂ ਦੁਕਾਨਾਂ ਸਜਦੀਆਂ ਹਨ। ਨੌਕਰੀ ਅਤੇ ਕਾਰੋਬਾਰ ਦੇ ਕਾਰਨ ਬਾਹਰਲੇ ਸ਼ਹਿਰਾਂ ਵਿੱਚ ਵਸੇ ਲੋਕ ਇਸ ਉਤਸਵ ਲਈ ਜ਼ਰੂਰ ਪਿੰਡ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਰਾਮਨੌਮੀ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਤੋਂ ਸ਼ੇਗਾਓਂ ਲਈ ਪੈਦਲ ਡਿੰਡੀ (ਯਾਤਰਾ) ਰਵਾਨਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਸਾਵਣ ਦੇ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮਹੀਨੇ ਦੇ ਹਰ ਸੋਮਵਾਰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਲਗਭਗ ਢਾਈ ਹਜ਼ਾਰ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਲਾਭ ਲੈਂਦੇ ਹਨ। ਸਾਵਣ ਦੇ ਆਖਰੀ ਸੋਮਵਾਰ ਪਿੰਡ ਦੇ ਨੌਜਵਾਨ ਕਾਵੜ ਨਾਲ ਜਲ ਲਿਆ ਕੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ‘ਤੇ ਜਲਾਭਿਸ਼ੇਕ ਕਰਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਮੇਹਕਰ ਤੋਂ ੧੨ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਬੁਲਢਾਣਾ ਤੋਂ ੮੨ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮੇਹਕਰ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. (ST) ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
-
विष्णू मंदिर सातगाव-भुसारी, तालुका चिखली, जि. बुलडाणा
अधिक माहितीVishnu Temple Satgaon-Bhusari, Taluka Chikhali, Dist. Buldana
View Detailsविष्णु मंदिर सतगांव-भुसारी, तालुका चिखली, जिला. बुलढाणा
विवरण देखें -
जगदंबा देवी मंदिर सव, ता. बुलडाणा, जि. बुलडाणा
अधिक माहितीJagadamba Devi Temple Sav, Tal. Buldana, Dist. Buldana
View Detailsजगदम्बा देवी मंदिर साव, ताल. बुलडाणा, जिला. बुलढाणा
विवरण देखें -
रेणुका देवी मंदिर चिखली, ता. चिखली. जि. बुलडाणा
अधिक माहितीRenuka Devi Temple Chikhli, the mud Dist. Buldana
View Detailsरेणुका देवी मंदिर चिखली, कीचड़ जिला. बुलढाणा
विवरण देखें
