लक्ष्मीनारायण मंदिर

श्रीवर्धन, ता. श्रीवर्धन, जि. रायगड

पश्चिमेकडे विशाल समुद्र, उत्तरेकडे तांबडीचा डोंगर दक्षिणेकडे असलेली खाडी यामध्ये नारळीपोफळीच्या गर्दीत हरवून गेलेले सुंदर शहर म्हणजे श्रीवर्धन. बाळाजी विश्वनाथ भट यांचे जन्मगाव देशमुखी असलेल्या श्रीवर्धन भागात सापडणाऱ्या केशवस्वरूप विष्णू मूर्ती या भागावरील शिलाहार राजवटीचे संकेत देतात. या शहरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यातील एक प्रसिद्ध आणि शहराचे भूषण आहे ते येथील लक्ष्मीनारायण मंदिर. भटपेशवे घराण्याचे हे एक प्रमुख उपास्य दैवत होय. येथील देव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिरातील काळ्या पाषाणातील द्रविड शैलीतील विष्णू मूर्ती पाहता हे मंदिर बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात, . . १७७५ साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. त्याबाबतचा देवनागरी लिपीतील काष्ठलेख सभामंडपातील एका तुळईवर आहे. त्यावरून हे मंदिर प्राचीन असल्याची खात्री पटते. १९६० साली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी येथील मूर्तींचे निरीक्षण करुन ती बाराव्या शतकातील असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला होता. कुलाबा गॅझेटियरनुसार, निरनिराळ्या युरोपियन प्रवाशांच्या वर्णनातझिफरदनअसा श्रीवर्धनचा उल्लेख आहे. काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, मंदिरातील श्रीधरस्वरूप विष्णूच्या नावावरून शहरास श्रीवर्धन नाव पडले असावे

शहरातील एसटी स्थानकापासून नारायण पाखाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हे मंदिर आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. लक्ष्मीनारायणाच्या मंदिरासमोर दोन मेघडंबरी आहेत. त्यापैकी एकात गरुड दुसऱ्यात मेघडंबरीत हनुमानाची मूर्ती आहे. हनुमानाची मूर्ती असलेली मेघडंबरी पायऱ्या असलेल्या चौथऱ्यावर आहे. त्यावर घुमटाकार शिखर मोदकाच्या आकाराचा कळस आहे. प्रांगणात असलेल्या या गरुड हनुमंत मूर्तींवरून हे मंदिर विष्णूचे असल्याचे निश्चित होते.

सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी रचना असलेले हे दुमजली कौलारू मंदिर तीन फूट उंच अधिष्ठानावर आहे. प्रांगणातून सभामंडपात जाण्यासाठीच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस कठडे आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर वेलबुट्टीदार नक्षी प्रवेशद्वारास लाकडी नक्षीदार झडपा आहेत. बंदिस्त स्वरुपाच्या सभामंडपात हवा सूर्यप्रकाश येण्यासाठी खिडक्या आहेत. सभामंडपात चौकोनी दगडी स्तंभपादावर लाकडी स्तंभ आहेत. त्यावर कणी, हस्त तुळया आहेत. तुळयांवर लाकडी तख्तपोशी आहे. लाकडी स्तंभ दगडी स्तंभपादांवर उभे असल्यामुळे वाळवी ओलाव्यापासून संरक्षण होते ते अधिक काळ टिकून राहतात. सभामंडपात उजव्या डाव्या बाजूला आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत.

सभामंडपापेक्षा येथील अंतराळ एक पायरी उंचावर आहे. लाकडी कठडा असलेल्या या अंतराळात लाकडी स्तंभ आहेत. अंतराळात मधोमध दगडी बांधकाम असलेले गर्भगृह आहे. अंतराळापेक्षा उंचावर असल्यामुळे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास दोन पायऱ्या आहेत. स्टेनलेस स्टीलच्या नळ्या लावलेल्या प्रवेशद्वाराच्या झडपा पारदर्शक आहेत. त्यामुळे गर्भगृहातील मूर्तींचे दर्शन बंद दारातूनही सहज घेता येते

गर्भगृहात उंच अधिष्ठानावर विष्णूची दोन फूट उंचीची काळ्या पाषाणातील चतुर्भूज मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात पद्म, शंख, चक्र गदा आहे. रेखीव प्रमाणबद्ध असलेल्या मूर्तीच्या पायाजवळ एका बाजूला गरुड दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आहे. येथे श्रीधरस्वरूप विष्णूसोबत लक्ष्मी असल्यामुळे देवास लक्ष्मीनारायण या नावाने संबोधले गेले आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला जयविजय या वैष्णव द्वारपालांचे शिल्प आहे. मूर्तीच्या पाठशिळेवर वरील बाजूस मध्यभागी कीर्तिमुख दोन्ही बाजूस दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीच्या अंगावर उंची वस्त्रे अलंकार तसेच डोक्यावर मुकूट आहे. मूर्तीवर अप्रतिम असे कोरीवकाम केलेले आहे. गर्भगृहाच्या सभोवतीने प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिरांचे गर्भगृह दुमजली आहे त्यावर कौलारू छत आहे

या मंदिरास पेशव्यांचे कुटुंबीय भेट देत असल्याची नोंद कुलाबा गॅझेटियरमध्ये आहे. पेशव्यांच्या नित्य पठणातील एक श्लोक मंदिराच्या मागे बाह्यभिंतीवर कोरलेला आहे. तो असा

श्री लक्ष्मीनारायणम् स्थान पुरुषम् कालभैरवम् कुसुंबाम। 

श्री महालक्ष्मी उत्तरेश्वर भैरवोकालेश्रियम् गणपतिम्। 

किलकाळकायै श्रीजीवनेश्वरसह सोमजाई। 

योगेश्वरी हरिहरेश्वर बाबदेवाम् देवाम् नमामि। 

निजपूर्वज पूजिमाधिं।।ॐ।।

या मंदिराच्या बाजूला मारुतीचे कौलारू छताचे मंदिर आहे. मस्तकी मुकूट, अंगावर सुवर्ण अलंकार धारण केलेल्या या मारुतीच्या पायाखाली दैत्य आहे. मारुतीचा एक हात मांडीवर दुसरा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. या मारुतीच्या हातात गदा नसल्याने ही गदारहीत मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण ठरते

लक्ष्मीनारायण मंदिरात रामनवमी कृष्ण जन्माष्टमी हे मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. रामजन्माचा सोहळा दुपारी बारा वाजता होतो. तर कृष्णजन्म रात्री बारा वाजता साजरा केला जातो. दोन्ही उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राम कृष्ण जन्माचे पाळणे गायले जातात. सुंठसाखरेचा प्रसाद वाटला जातो. दरवर्षी वैशाख शुद्ध त्रयोदशीला थोरल्या बाजीराव पेशव्यांचा पुण्यतिथी दिवस या मंदिराच्या प्रांगणात साजरा केला जातो. मंदिरात नित्य अभिषेक आरती होते. दररोज सकाळी ते रात्री पर्यंत भाविकांना या मंदिरातील लक्ष्मीनारायणाचे दर्शन घेता येते

उपयुक्त माहिती

  • श्रीवर्धन बस स्थानकापासून पायी दहा मिनिटांवर
  • मुंबई, ठाणे कोकणातून श्रीवर्धनसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : नारायण टेमकर, ट्रस्टी, मो. 8888941598
Back To Home