वरद विनायक मंदिर

गवराळा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर

भद्रावती तालुक्यातील गवराळा येथील प्राचीन वरद विनायक मंदिराला विदर्भातील अष्टविनायकांमध्ये विशेष स्थान आहे. असे सांगितले जाते की गृत्समद ऋषींच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन श्रीगणेश गवराळा येथे प्रकट झाले होते. सध्या असलेले मंदिर स्वतः गृत्समद ऋषींनी स्थापन केलेले आहे. गवराळा गावात असल्यामुळे या गणेशालागवराळा गणेशअसेही म्हटले जाते. या स्थानाचा उल्लेख गणेश पुराणाच्या उपासना खंडातील ३७ व्या अध्यायात आहे.

.. १०७६ ते ११२६ या काळात हा प्रदेश चालुक्य सम्राट सहावा विक्रमादित्य त्रिभुवनमल्ल यांच्या अमलाखाली होता. त्यांचा सामंत धाडीभंडक राणक हा त्यांच्यावतीने या प्रदेशाचा कारभार पाहत असे. त्यावेळी राणक यांचा अधिकारी वासुदेव दंडनायक याने जुलै १०८७ मध्ये काही सोन्याची नाणी देऊन येथील काही जमीन खरेदी केली होती. त्यापैकी काही जमीन गायींना चरण्यासाठी जमिनीचा काही भाग हा गुराख्यांच्या निर्वाहाकरीता राखून ठेवण्यात आला, असा उल्लेख असलेला शिलालेख गवराळा येथील एका शेतात काही वर्षांपूर्वी सापडला होता. संस्कृतमिश्रित मराठीत असलेला हा शिलालेख नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात आहे. त्यावर ११ ओळी असून शेवटच्या ओळीत या जागेचा कोणी गैरवापर करील त्यावर देवतांचा कोप होईल गाईंना त्रास देईल तो नरकात जाईल, असा उल्लेख आहे. त्यावरून हा भाग पूर्वी गौराळा म्हणजेच गाई चारण्याचे माळरान होते. पुढे जेव्हा येथे गाव वसले, तेव्हा त्यावरूनच त्याचे नाव गवराळा असे पडल्याचे सांगितले जाते.

पौराणिक ग्रंथांमधील नोंदींनुसार, गृत्समद ऋषी भ्रमण करीत असताना येथील निसर्गसमृद्ध परिसर त्यांना भावला या ठिकाणी वास्तव्य करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. येथे त्यांनी १५ वर्षे श्रीगणेशाची कठोर तपश्चर्या केली. ऋषींच्या या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन वरद विनायक प्रकट झाले ऋषींना वर मागण्यास सांगितला. तेव्हा गृत्समद ऋषींनी आपल्याला ब्रम्हज्ञान मिळावे, असा वर मागितला. वरद विनायकाने त्यांना तथास्तु म्हणत हे स्थान त्रेतायुगातमणीपूर’, द्वापारयुगातभानक कलियुगातभद्रकया नावाने प्रख्यात होईल येथे स्नान पूजापाठ केल्याने भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतील, असा वर दिला. येथेच आज हे मंदिर आहे. भद्रक हेच पुढे भद्रावती म्हणून प्रसिद्ध झाले.

भद्रापूर तालुक्यातील भांदक रेल्वेस्थानकाजवळील गवराळा येथील गणेश टेकडीवर वरद विनायकाचे हे प्राचीन मंदिर आहे. लहानशा टेकडीवर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी पायथ्यापासून ३० पायऱ्या आहेत. अंदाजे २० ते २२ पायऱ्या चढून गेल्यावर पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या मूर्ती दिसतात. काही अभ्यासकांच्या मते त्या यक्षमूर्ती असाव्यात. पायऱ्यांच्या डाव्या बाजूस लहानशी गुंफा आहे. गुंफेच्या सुरुवातीच्या भागात केवल नृसिंह कुबेर यांच्या मूर्ती आहेत.

वरद विनायकाचे मंदिर उत्तराभिमुख आहे. सभागृहातून पायऱ्या खाली उतरल्यानंतर गर्भगृहात जाता येते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची उंची फार कमी आहे. गर्भगृहात सुमारे फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण उत्तराभिमुख गणेशमूर्ती आहे. मूर्तीच्या डोक्यावर मुकुट गळ्यात अलंकार आहेत. सोंड डावीकडे वळलेली असून मागे वैशिष्ट्यपूर्ण प्रभावळ आहे. मूर्तीचा डावा पाय दुमडलेला आहे. ही मूर्ती वाकाटककालीन असावी, असा अंदाज वर्तविण्यात येतो. सभागृहाच्या डावीकडे असलेल्या दुसऱ्या गर्भगृहात महादेवांचे स्थान आहे. त्यात नंदी, शिवपिंडी, शिवपार्वती बाजूला जयविजय यांच्या मूर्ती आहेत. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर एक शिलालेख होता. नंतरच्या काळात जीर्णोद्धार करताना भिंतीवर दिलेल्या लेपामुळे तो अस्पष्ट अवाचनीय झालेला दिसतो.

ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेले हे देवस्थान चंद्रपूरमधील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक आहे. प्रत्येक संकष्टी चतुर्थी, विनायक चतुर्थी, गणेश जयंती अंगारकी चतुर्थीला येथे यात्रा भरते. विविध ठिकाणांहून हजारो भाविक यावेळी येथे दर्शनाला येतात अभिषेक आणि पूजा करतात. विशेषतः भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत येथे भाविकांची जास्त गर्दी असते.

या टेकडीच्या मागे मोठा तलाव असून त्याच्या काठावर अनेक गुंफा आहेत. त्यातही अनेक प्राचीन कोरीव मूर्ती आढळतात. वरद विनायक मंदिराच्या उत्तरेकडील बाजूस काही अंतरावर असलेल्या मंदिराला येथील ग्रामस्थ यवनाश्वाचे मंदिर किंवा महाल म्हणतात. या मंदिरात असलेल्या शिलालेखावरून . . ११०४ मध्ये चालुक्य राजा सहावा विक्रमादित्य याच्या काळात ते बांधण्यात आल्याचे स्पष्ट होते. वरद विनायक मंदिराच्या समोरील बाजूस सूर्यमुखी हनुमान मंदिर आहे. हे हनुमान मंदिरही येथे प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या शेजारी २५ ते ३० खोल्यांचे भक्त निवास बांधण्यात आलेले आहे.

उपयुक्त माहिती:

  • भद्रावती बस स्थानकापासून किमी, तर चंद्रपूरपासून २८ किमी अंतरावर
  • भद्रावतीसाठी चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home