टेकडी गणेश,

सीताबर्डी टेकडी, नागपूर, ता. जि. नागपूर

नागपूर शहरातील सीताबर्डी परिसरातील टेकडी गणेश हे देवस्थान विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक आहे. मुद्‌गल पुराणात या स्थानाचा उल्लेख आलेला आहे. मंदिराच्या मध्यभागी पिंपळाच्या झाडाखाली असलेली या मंदिरातील मूर्ती शेकडो वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जाते. हे देवस्थान नागपूरमधील सर्वात श्रीमंत म्हणून गणले जाते. नागपूर शहरातील टेकडीवर स्थित असल्यामुळे या गणेशाचे नावटेकडी गणेशअसे रूढ झाले.

मंदिराबाबत असे सांगितले जाते की १८६६ मध्ये येथील टेकडी फोडून रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी खोदकाम करताना कामगारांना गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती सापडली. ज्यावेळी ही मूर्ती कामगारांना दिसली त्यावेळी अचानक आकाश भरून आले विजांचा कडकडाट सुरू झाला. कामगारांनी तेथून मूर्ती काढून एका पिंपळाच्या झाडाखाली तिची प्राणप्रतिष्ठापना केली. तेव्हापासून या मूर्तीची पूजाअर्चा सुरू आहे. १८६५ मधील नागपूरच्या नकाशात या मंदिराचा उल्लेख नाही; म्हणजे त्या आधीच्या काळात केव्हातरी तिथे असलेले प्राचीन गणेश स्थान जमीनदोस्त वा उद्ध्वस्त झाले असावे. कारण त्यापूर्वी येथे मंदिर असल्याची नोंद सापडते. यादवांच्या कार्यकाळात रामटेकला राम मंदिर उभारण्याबरोबरच हेमाद्री पंडितांनी टेकडीचे गणेश मंदिर बांधले. यादव घराण्याकडून या गणेशाची पूजा होत असे, अशी नोंद आहे; परंतु ही मूर्ती यादवकाळातील असण्याबाबत अभ्यासकांमध्ये साशंकता आहे.

मराठा साम्राज्याचे सरदार रघुजी भोसले यांच्या मृत्यूनंतर १८९६ मध्ये इंग्रज नागपुरात आले. सध्या जेथे मंदिर आहे त्या सीताबर्डी टेकडीच्या खालीच इंग्रज रेसिडन्सी होती. तेव्हापासून हा परिसर इंग्रजांकडे होता स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्यदलाच्या अधिपत्याखाली आहे. इंग्रजांच्या काळात सीताबर्डी किल्ल्यात कोणाही स्थानिकांना प्रवेश दिला जात नव्हता. लष्करी छावणी बाजूला असल्यामुळे इंग्रजांनी या मूर्तीवर केवळ एक पत्र्याची झोपडी उभारण्याची परवानगी दिली. त्यानुसार १९३६ मध्ये या गणेशमूर्तीभोवती झोपडी उभारण्यात आली. १९६५ पर्यंत मंदिर त्याच अवस्थेत होते. त्यानंतर उत्तरोत्तर जीर्णोद्धार नूतनीकरण होत गेले. २०२० मध्ये केलेल्या नूतनीकरणानंतर या मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. फिकट लालसर दगडामध्ये राजस्थानी कारागिरांनी हे भव्य मंदिर बांधले आहे. त्यावरील नक्षीकाम मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण भासते. २०,००० चौरस फूट जागेवर हे मंदिर उभे आहे.

रेल्वेमार्गाच्या बाजूस पूर्वेकडे मंदिराचे प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या सभामंडपाच्या मध्यभागी असलेल्या पिंपळवृक्षाखाली उजव्या सोंडेची गणेशमूर्ती आहे. गणेशमूर्तीचे मुकुट डोळे हे चांदीचे आहेत. दर मंगळवारी या मूर्तीवर शेंदूरलेपन केले जाते. मूर्तीच्या मागे डाव्या बाजूला फूट उंचीची काळभैरवाची मूर्ती, तर उजव्या बाजूला नंदीवर आरूढ शिवलिंग आहे. येथील पिंपळ वृक्षाशेजारी राधाकृष्ण मंदिर आहे. याशिवाय येथे रामसीतालक्ष्मण, दक्षिणमुखी हनुमान तसेच महालक्ष्मी यांच्याही मूर्ती आहेत.

प्रत्येक मंगळवारी संकष्टी चतुर्थीला हजारोंच्या संख्येने भाविक येथे दर्शनाला येतात. अंगारकी चतुर्थीला, गणेश जयंती, गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दिवसांमध्ये येथे जत्रेचे स्वरूप आलेले असते. याशिवाय कालभैरव जयंती, हनुमान जयंती, कोजागरी पौर्णिमा या दिवशीही उत्सव साजरे केले जातात. हे भव्य जागृत देवस्थान असून येथील गणपती नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच हजारो भाविक दररोज दर्शनाला येतात. माघ शुद्ध चतुर्थीला (तिळी चतुर्थी) येथे मोठी यात्रा भरते.

असे सांगितले जाते की या मंदिरात देशाचे माजी प्रधानमंत्री पी. व्ही. नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, श्रीमती आशा भोसले, अनुप जलोटा, जितेंद्र अभिषेकी, सुनील दत्त यांनी दर्शन घेतले आहे. नागपूरमध्ये जेव्हा क्रिकेट सामने असत त्यावेळी सचिन तेंडूलकरही आवर्जून या गणेशाच्या दर्शनाला येत असे. दररोज वेळा गणेशाची आरती होते. संकष्टी चतुर्थी एकादशीच्या दिवशी या गणेश मूर्तीला साजशृंगारांनी सजविले जाते. दररोज सकाळी ते रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांना मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • नागपूर रेल्वेस्थानकापासून पायी १० मिनिटांवर
  • नागपूरसाठी राज्यातील विविध ठिकाणांहून एसटी, रेल्वे विमान सेवा उपलब्ध
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • निवास न्याहरीसाठी परिसरात अनेक पर्याय
Back To Home