स्वयंभू गणेश मंदिर

अंत्री खुर्द, ता. शिराळा, जि. सांगली

सांगली जिल्ह्यातील शिराळा या तालुक्यात तब्बल ३२ पर्यटन स्थळे आहेत. डोंगराळ भाग अधिक असल्याने शिराळा हा तालुकाडोंगरीम्हणूनही ओळखला जातो. या तालुक्याची आणखी एक खासियत म्हणजे येथील अंत्री खुर्द हे गाव. ‘एक गाव एक गणपतीया प्रथेसाठी ते अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. येथील स्वयंभू गणेश मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावेळी येथे मोठी यात्रा असते. त्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविकांची येथे उपस्थिती असते.

या मंदिराच्या स्थापनेबाबत असे सांगितले जाते की १९७२ साली या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती हरि पाटील यांनी पुढाकार घेऊन सहकाऱ्यांच्या मदतीने हे मंदिर बांधले. यानंतर या टुमदार मंदिरात अत्यंत उत्साहात धार्मिक वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येऊ लागला. बुद्धीच्या या दैवताचा उत्सव संपूर्ण गावाचा आहे, तो गावाने एकत्र येऊन साजरा करावा आणि त्यामुळे गावात कोणाही स्वतंत्रपणे गणेशोत्सव साजरा करू नये, असे गावातील काही जुन्याजाणत्या माणसांनी ठरवले. गावातील ऐक्यभावना दृढ व्हावी, या हेतूने हे धोरण आखण्यात आले. त्यास सर्व गावकऱ्यांनी मान्यता दिली. तेव्हापासून या गावातील कोणत्याही घरात गणशोत्सव काळात गणपती आणला जात नाही. यातून गावाने दिलेला एकीचा संदेश पुढे राज्यात पसरला

गावाच्या मध्यवर्ती भागात हे टुमदार मंदिर आहे. मंदिराच्या दर्शनी भागात एक लहानशी आवारभिंत आहे. त्यातील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. दर्शनमंडप, सभामंडप गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. या वास्तुवर द्राविड स्थापत्यशैलीची छाप आहे. मंदिराचा दर्शनमंडप हा एखाद्या छोट्या गोपुरासारखा आहे. मंदिराच्या आवारभिंतीतील वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेले उंचच उंच प्रवेशद्वारास द्राविड स्थापत्यशैलीत गोपुरम् असे म्हणतात. या मंदिराच्या दर्शनमंडपाच्या, तसेच सभामंडपाच्या छतावर या गोपुरम्‌चा स्पष्ट ठसा आहे. याच प्रमाणे मंदिराचे शिखरही याच शैलीतील आहे. एकावर एक, लहान होत गेलेल्या आयताकृती आकाराची अत्यंत अलंकृत अशी पंचस्तरीय रचना या शिखरात पाहावयास मिळते. त्यात ठिकठिकाणी सुंदर रंगसंगती कलाकुसर असलेली आडवी कोष्ठके आहेत. यात वरच्या स्तरावर गणेशाची मूर्ती विराजमान आहे. त्यावर आयताकृती लोडासारखे भासणारे शिखर त्यावर कलश आहे

येथील दर्शनमंडपाच्या स्तंभांवर पानाफुलांचे नक्षीकाम आहे. मंदिराच्या दर्शनी भिंतीवर दर्शनमंडपाच्या वरील बाजुस असलेल्या कोष्ठकात शिवपंचायतन आहे. या देवकोष्ठकाच्या बाजूला छोटी शिखरे आहेत. देवकोष्ठकाच्या कमानदार छताच्या वरच्या बाजूस दाक्षिणात्य मंदिरांवर असते त्या प्रकारची आयताकृती रचना त्यावर लहान कळस आहेत. या देवकोष्ठकात शंकर, पार्वती, कार्तिकस्वामी बाल गणेश तर पायाशी एकबाजूला नंदी दुसऱ्या बाजूला सिंह आहे. त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या कोष्ठकात गणपती उजव्या बाजुला कार्तिक स्वामींची मूर्ती आहे

सभामंडपाच्या मुख्य लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखेवर वेलींचे नक्षीकाम आहे. येथील ललाटबिंबावर एकमेकांत माना अडकवलेले हंसयुगुल आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना भिंतींत देवकोष्ठकांचा आकार दिलेली मोठी जालवातायने आहेत. सभामंडपाच्या छतावर विविध फुलांचे नक्षीकाम आहे. या सभामंडपाच्या डाव्या बाजूला लाकडी गर्भगृह आहे. सभामंडपातून काहीसे खाली असलेल्या या गर्भगृहासमोर मूषकाची मूर्ती त्यापुढे गणेशाची चांदीची उत्सवमूर्ती आहे. येथील गर्भगृह लाकडी आहे प्रथमदर्शनी त्याची रचना घरातील देवघराप्रमाणे भासते. याच्या लाकडी द्वारशाखेवर वेलींची नक्षी आहे. गणरायाची मूळ स्वयंभू मूर्ती लहानशी आहे. या शेंदूरचर्चित मूर्तीचे अवयव स्पष्ट दिसावे म्हणून कान, भुवया कपाळावरील टिळा रंगवलेला दिसतो. या मूर्तीवरील डोळे चांदीचे आहेत. या मूर्तीवर छत्र आहे. भाविकांकडून नवसपूर्तिनिमित्त या देवाला घंटांचे नारळांचे तोरण अर्पण केले जातात. नवसाला पावणारा अशी ख्याती असल्यामुळे हे मंदिर नवशा गणपती मंदिर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. येथील गर्भगृहाच्या बाजुनेच एक लहानसा प्रदक्षिणा मार्ग आहे.

गणेशोत्सव हा या गावातील प्रमुख उत्सव मानला जातो. यावेळी या मंदिराच्या सभामंडपात गर्भगृहाच्या शेजारी गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. याकाळात गावाला यात्रेचे स्वरुप आलेले असते. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी दरम्यान मंदिरात भजन, कीर्तन, पोवाडे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला महाप्रसादाचे आयोजन होते. गणेशोत्सवाच्या काळात नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गेलेले ग्रामस्थ तसेच माहेरवाशीणी आवर्जून या स्वयंभू गणेशाच्या दर्शनासाठी येतात

या गणेशावर असलेल्या भाविकांच्या श्रद्धेमुळे येथे येणाऱ्या हजारो भाविकांमुळे या देवस्थानाचा महाराष्ट्र सरकारतर्फे तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. सरकारकडून या मंदिराला तीर्थक्षेत्राचावर्ग दर्जा देण्यात आलेला आहे. स्वयंभू गणेश मंदिराच्या शेजारी प्राचीन ज्योतिबा मंदिर आहे. या मंदिराच्या समोरील बाजुस एका दगडी चौथऱ्यावर दीपमाळ आहे. दुमजली लाकडी बांधकाम असलेल्या या मंदिरातील गर्भगृहात असलेल्या ज्योतिबाच्या मूर्तीसमोर मोठा पितळी घोडा आहे. गणेशाच्या दर्शनासाठी येणारे अनेक भाविक आवर्जून या ज्योतिबाचे दर्शन घेतात

उपयुक्त माहिती

  • शिराळा शहरापासून किमी, तर सांगलीपासून ६३ किमी अंतरावर
  • शिराळा येथून एसटी खासगी वाहने उपलब्ध
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची व्यवस्था नाही
Back To Home