स्वयंभू हनुमान मंदिर
हनिमनाळ, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
हनुमान हे शक्तीचे दैवत म्हणून पुजले जाते. ‘माझ्या भक्तांना छळू नये’ असा वर हनुमानाने शनीदेवाकडून मिळवला होता. त्यामुळे अशुभ निवारणार्थ हनुमानाची उपासना केली जाते. हनुमान उपासनेचा प्रचार आणि प्रसार खऱ्या अर्थाने समर्थ रामदास स्वामींच्या काळात झाला. रामदास स्वामींनी गावोगावी हनुमान मंदिरांची स्थापना केली. गडहिंग्लज तालुक्यातील हनिमनाळ गावात असलेले हनुमान मंदिर त्यापैकीच एक असल्याचे सांगितले जाते. नवसाला पावणारा हा स्वयंभू हनुमान पिडा व व्याधी दूर करणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. फाल्गुन शुद्ध पंचमीस भरणारी देवाची यात्रा नारळाच्या उधळणीची यात्रा म्हणून प्रसिध्द आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की सुमारे ३५० वर्षांपूर्वी हनिमनाळ गावातील एका शेतकऱ्याच्या दुभत्या गायीने दूध देणे अचानक बंद केले. तेव्हा शेतकऱ्याने कारणाचा शोध घेतला असता त्याला असे कळले की गाय रानात चरायला जाते तेव्हा एका विशिष्ट जागी पान्हा सोडते. तेव्हा रामदास स्वामींनी गावकऱ्यांना या जागी खोदून पाहण्यास सांगीतले. समर्थांच्या सल्ल्यानुसार या जागी खोदले असता जमिनीतून हनुमानाचे स्वयंभू पाषाण प्रकटले. जमीन खोदत असताना पहारीचा एक घाव चुकून पाषाणास लागल्याने पाषाणातून रक्त प्रवाहित झाले. तेव्हा गावातील गुरवाने क्षमा याचना करून प्रायश्चित म्हणून निर्जली उपवास धरला. उपवासाच्या तिसऱ्या दिवशी पाषाणातून रक्त वाहणे बंद होऊन जखम भरून निघाली. भाविकांची अशी श्रद्धा आहे की या हनुमानाचा उपवास धरला असता मानसिक व शारीरिक पीडा, व्याधी नाहीशा होतात. ग्वाल्हेरच्या राजघराण्याची या मारुतीचरणी अपार श्रद्धा होती. त्यांनी मंदिरास धर्मशाळा बांधून दिली होती.
मंदिर व नगारखान्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम शैलीमुळे हनुमान जयंती दिनी पहाटेची किरणे नगारखान्यातून थेट गर्भगृहात असलेल्या हनुमानाच्या मूर्तीवर पडतात.
निसर्गाचा हा अनोखा चमत्कार पाहण्यासाठी या दिवशी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी होते.
मंदिराचे दुमजली दगडी प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराप्रमाणे भासतो. काळ्या पाषाणातील बांधकाम असलेल्या प्रवेशद्वाराच्या नक्षीदार द्वारशाखा या लाल गाळखडक प्रकारच्या दगडाच्या आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणेशमूर्ती व दोन्ही बाजूस वर चक्र आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस स्तंभांमध्ये दीपकोष्ठके आहेत. स्तंभांवर असलेल्या अर्धवर्तुळाकार दगडी कमानीत मध्यभागी पाषाणात सिंहमुख कोरलेले आहे. कमानीखाली मध्यभागी मांगल्याचे प्रतीक असलेल्या केळफुलाचे उठाव शिल्प आहे. कमानीच्या दोन्ही बाजूंस देवकोष्ठकांत शस्त्रधारी द्वारपाल आहेत. या प्रवेशद्वाराच्या वर नगारखाना आहे. नगारखान्याच्या दोन्ही बाजूस त्रिकोणी भिंतींवर सिंहशिल्प आहेत. सिंहशिल्पांच्या बाजूस स्तंभांवर दोन व नगारखान्याच्या छतावर एक अशा तीन मेघडंबरी आहेत. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो.
मुख्य मंदिरासमोर एका मोठ्या दगडी चौथऱ्यावर पाच थरांची अष्टकोनी प्राचीन दीपमाळ आहे. दीपमाळेचा खालचा थर अधिक रुंद आहे व ती वर निमुळती होत गेलेली आहे. सर्वांत वरचा थर गोलाकार आहे. या दीपमाळेच्या बाजुने प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या नागरखान्यात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. नगारखान्यास सुरक्षा कठडे आहेत. नगारखान्यात उभे राहून या मंदिर परिसराचे व गावाचे विहंगम दृश्य पाहता येते. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मुख्य मंदिराची संरचना आहे. खुल्या स्वरुपाच्या सभामंडपातील दहा चौकोनी स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपातून पुढे बंदिस्त असलेल्या अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात मध्यभागी कासवमूर्ती आहे.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार सोनेरी धातूपटलाने आच्छादित आहे. येथील द्वारशाखांवर द्वारपाल व पानाफुलांची नक्षी आहे. ललाटबिंबस्थानी गणेशमूर्ती व मूर्तीच्या दोन्ही बाजूंना गजराज आहेत. त्यावरील भागात चंद्र व सूर्य प्रतिमा कोरलेल्या आहेत. गर्भगृहात स्वयंभू हनुमानाची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती आहे. मंदिराच्या छतास कठडा असून त्यात बाह्य बाजूस कोष्ठकसदृश रचना आहे. कठड्यावर सिंहांची चार शिल्पे आहेत. मंदिराचे शिखर द्वादशकोनी घुमटाकार व दहा थरांचे आहे. ते वर निमुळते होत गेलेले आहे. त्यावरील आमलक वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यावर उभ्या धारेची नक्षी आणि वर कळस व ध्वजपताका आहे.
मंदिराच्या प्रांगणात डाव्या हाताला घडीव काळ्या दगडात बांधलेली गोड्या पाण्याची विहीर आहे. प्रांगणात दत्त मंदिर व दुसऱ्या बाजूला महादेव मंदिर आहे. मंदिरात फाल्गुन शुद्ध पंचमी हा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी देवाचा पालखीसोहळा पार पडतो. परिसरातील अनेक ग्रामदैवतांच्या पालख्या यावेळी स्वयंभू हनुमानाच्या भेटीला येथे येतात. यात्रेसाठी जमलेले लाखो भक्तगण बोललेल्या नवसाचे नारळ उधळतात. या अनोख्या परंपरेमुळे ही यात्रा नारळाच्या उधळणीची यात्रा म्हणून ओळखली जाते.
उपयुक्त माहिती
- गडहिंग्लजपासून ७ किमी, तर कोल्हापूरपासून ५९ किमी अंतरावर
- गडहिंग्लज येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सु्विधा नाही
Swayambhu Hanuman Temple
Hanimnal, Taluka Gadhinglaj, District Kolhapur
Hanuman is worshipped as the deity of strength. Hanuman had obtained a boon from Shani Deva that “my devotees shall not be tormented.” Therefore, Hanuman is worshipped to ward off misfortune. The propagation and spread of Hanuman worship truly took place during the era of Samarth Ramdas Swami. Samarth Ramdas Swami established Hanuman temples in villages far and wide. It is said that the Hanuman temple located in the village of Hanimnal in Gadhinglaj taluka is one of them. Devotees believe that this Swayambhu Hanuman, who grants wishes, removes suffering and ailments. The temple fair held on Phalguna Shuddha Panchami is famous as the ‘Coconut Shower Fair’.
The legend of this temple is that about 350 years ago, a milch cow belonging to a farmer in Hanimnal village suddenly stopped giving milk. When the farmer investigated the cause, he learned that the cow would release its milk at a specific spot while grazing in the forest. Samarth Ramdas Swami then asked the villagers to dig at that spot. Following the advice of Samarth, when they dug there, a Swayambhu stone idol of Hanuman manifested from the earth. While digging, a pickaxe accidentally struck the stone, causing blood to flow from it. The village priest then begged for forgiveness and observed a waterless fast as penance. On the third day of the fast, the bleeding stopped and the wound healed. Devotees believe that observing a fast for this Hanuman removes mental and physical pain and ailments. The royal family of Gwalior had immense faith in the feet of this Maruti. They had built a dharmashala (pilgrims’ rest house) for the temple.
Due to the unique architectural style of the temple and the Nagarkhana (drum house), on the day of Hanuman Jayanti, the morning sun rays fall directly from the Nagarkhana onto the idol of Hanuman in the sanctum sanctorum.
Thousands of devotees gather at the temple on this day to witness this unique miracle of nature.
The two-storied stone entrance of the temple resembles the gateway of a fort. The ornate door frames of the entrance, built of black stone, are made of red laterite stone. There is an idol of Ganesha on the lintel of the entrance and chakras on both sides. There are lamp niches in the pillars on both sides of the entrance. In the semi-circular stone arch on the pillars, a lion’s face is carved in the center. Below the arch, in the center, is a relief sculpture of a banana flower, a symbol of auspiciousness. On both sides of the arch, there are armed gatekeepers in the niches. Above this entrance is the Nagarkhana. There are lion sculptures on the triangular walls on both sides of the Nagarkhana. There are three pavilions, two on the pillars beside the lion sculptures and one on the roof of the Nagarkhana. Through this entrance, one enters the spacious courtyard of the temple.
In front of the main temple, on a large stone platform, stands an ancient octagonal lamp tower with five tiers. The lower tier of the lamp tower is wider and it tapers towards the top. The topmost tier is circular. Beside this lamp tower, there are stone stairs to go to the Nagarkhana on the second floor of the entrance. The Nagarkhana has safety railings. Standing in the Nagarkhana, one can get a panoramic view of the temple premises and the village. The main temple structure consists of a Sabhamandapa (assembly hall), Antarala (vestibule), and Garbhagriha (sanctum sanctorum). The ten square pillars in the open Sabhamandapa are connected by arched gateways. From the Sabhamandapa, one enters the enclosed Antarala. In the center of the Antarala is a tortoise idol.
The entrance to the Garbhagriha is covered with golden metal plating. The door frames here feature gatekeepers and floral carvings. There is an idol of Ganesha on the lintel and elephants on both sides of the idol. In the area above, images of the moon and sun are carved. In the Garbhagriha, there is a vermilion-smeared stone idol of Swayambhu Hanuman. The roof of the temple has a parapet with niche-like structures on the outside. There are four lion sculptures on the parapet. The temple spire is a twelve-sided dome with ten tiers. It tapers towards the top. The Amalaka on top is unique. It has vertical ribbed carvings, and above it is the pinnacle and a flag.
In the temple courtyard, on the left side, there is a fresh water well built of dressed black stone. In the courtyard, there is a Dattatreya temple and on the other side, a Mahadeva temple. The annual fair of Phalguna Shuddha Panchami is celebrated with great enthusiasm in the temple. On this day, the deity’s palanquin procession takes place. Palanquins of many local village deities come here to visit Swayambhu Hanuman. Millions of devotees gathered for the fair shower coconuts as part of their vows. Because of this unique tradition, this fair is known as the ‘Coconut Shower Fair’.
Useful Information
- 7 km from Gadhinglaj and 59 km from Kolhapur
- ST bus service available from Gadhinglaj
- Private vehicles can reach the temple parking lot
- No accommodation or dining facilities available in the area
स्वयंभू हनुमान मंदिर
हनिमनाळ, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
हनुमानजी को शक्ति के देवता के रूप में पूजा जाता है। हनुमानजी ने शनिदेव से यह वरदान प्राप्त किया था कि ‘मेरे भक्तों को कभी कष्ट न हो’। इसी कारण अशुभ निवारण के लिए हनुमानजी की उपासना की जाती है। हनुमान उपासना का प्रचार और प्रसार वास्तव में समर्थ रामदास स्वामी के काल में हुआ। रामदास स्वामी ने गांव-गांव में हनुमान मंदिरों की स्थापना की। गडहिंग्लज तहसील के हनिमनाळ गांव में स्थित हनुमान मंदिर को उन्हीं में से एक माना जाता है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि मनोकामना पूरी करने वाले यह स्वयंभू हनुमान पीड़ा और व्याधियों को दूर करने वाले हैं। फाल्गुन शुक्ल पंचमी को भरने वाला देव का मेला ‘नारियल उधळणी’ (नारियल बरसाने का) मेला के रूप में प्रसिद्ध है।
इस मंदिर की किंवदंती है कि लगभग ३५० वर्ष पूर्व हनिमनाळ गांव के एक किसान की दुधारू गाय ने अचानक दूध देना बंद कर दिया। जब किसान ने कारण का पता लगाया, तो उसे ज्ञात हुआ कि गाय जंगल में चरने जाती है और एक विशिष्ट स्थान पर अपना दूध गिरा देती है। तब रामदास स्वामी ने ग्रामीणों को उस स्थान पर खुदाई करने के लिए कहा। समर्थ के परामर्शानुसार खुदाई करने पर जमीन से हनुमानजी की स्वयंभू पाषाण प्रतिमा प्रकट हुई। जमीन खोदते समय कुदाल का एक प्रहार गलती से पाषाण पर लग गया, जिससे पाषाण से रक्त प्रवाहित होने लगा। तब गांव के पुजारी ने क्षमा याचना की और प्रायश्चित के रूप में निर्जला उपवास रखा। उपवास के तीसरे दिन पाषाण से रक्त बहना बंद हो गया और घाव भर गया। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि इस हनुमानजी का उपवास रखने से मानसिक और शारीरिक पीड़ा व व्याधियां समाप्त हो जाती हैं। ग्वालियर के राजघराने की इस मारुति चरणों में अपार श्रद्धा थी। उन्होंने मंदिर के लिए धर्मशाला का निर्माण करवाया था।
मंदिर और नगारखाने की विशिष्ट निर्माण शैली के कारण हनुमान जयंती के दिन सूर्य की पहली किरणें नगारखाने से सीधे गर्भगृह में स्थित हनुमानजी की मूर्ति पर पड़ती हैं।
प्रकृति के इस अनोखे चमत्कार को देखने के लिए इस दिन मंदिर में हजारों भक्तों की भीड़ उमड़ती है।
मंदिर का दोमंजिला पत्थर का प्रवेश द्वार किसी किले के प्रवेश द्वार जैसा प्रतीत होता है। काले पत्थर से निर्मित प्रवेश द्वार की नक्काशीदार चौखटें लाल बलुआ पत्थर की हैं। प्रवेश द्वार के ललाटबिंब पर गणेशजी की मूर्ति और दोनों ओर ऊपर चक्र हैं। प्रवेश द्वार के दोनों ओर स्तंभों में दीप रखने के स्थान हैं। स्तंभों पर स्थित अर्धवृत्ताकार पत्थर की मेहराबों के बीच में पाषाण में सिंहमुख उकेरा गया है। मेहराब के नीचे मध्य में मंगल के प्रतीक के रूप में केले के फूल की उभरी हुई नक्काशी है। मेहराब के दोनों ओर देवकोष्ठों में शस्त्रधारी द्वारपाल हैं। इस प्रवेश द्वार के ऊपर नगारखाना है। नगारखाने के दोनों ओर त्रिकोणीय दीवारों पर सिंह के शिल्प हैं। सिंह शिल्प के बगल में स्तंभों पर दो और नगारखाने की छत पर एक, ऐसी तीन मेघडंबरियां हैं। इस प्रवेश द्वार से मंदिर के विशाल प्रांगण में प्रवेश होता है।
मुख्य मंदिर के सामने एक बड़े पत्थर के चबूतरे पर पांच स्तरों वाली अष्टकोणीय प्राचीन दीपमाल है। दीपमाल का निचला स्तर अधिक चौड़ा है और यह ऊपर की ओर संकरा होता गया है। सबसे ऊपरी स्तर गोलाकार है। इस दीपमाल के बगल से प्रवेश द्वार की दूसरी मंजिल पर स्थित नगारखाने में जाने के लिए पत्थर की सीढ़ियां हैं। नगारखाने में सुरक्षा रेलिंग है। नगारखाने में खड़े होकर इस मंदिर परिसर और गांव का विहंगम दृश्य देखा जा सकता है। सभामंडप, अंतराळ और गर्भगृह ऐसी मुख्य मंदिर की संरचना है। खुले सभामंडप के दस चौकोर स्तंभ एक-दूसरे से मेहराबों द्वारा जुड़े हुए हैं। सभामंडप से आगे बंद अंतराळ में प्रवेश होता है। अंतराळ के मध्य में कछुए की मूर्ति है।
गर्भगृह का प्रवेश द्वार सोने की परत से ढका हुआ है। यहां की चौखटों पर द्वारपाल और फूल-पत्तियों की नक्काशी है। ललाटबिंब पर गणेशजी की मूर्ति और मूर्ति के दोनों ओर गजराज हैं। उसके ऊपरी भाग में चंद्र और सूर्य की प्रतिमाएं उकेरी गई हैं। गर्भगृह में स्वयंभू हनुमानजी की सिंदूर लेपित पाषाण मूर्ति है। मंदिर की छत पर रेलिंग है और उसमें बाहरी तरफ कोष्ठक जैसी संरचना है। रेलिंग पर सिंहों के चार शिल्प हैं। मंदिर का शिखर द्वादशकोणीय गुंबदाकार और दस स्तरों वाला है। यह ऊपर की ओर संकरा होता गया है। उस पर स्थित आमलक विशिष्ट है। उस पर खड़ी धार की नक्काशी और ऊपर कलश व ध्वजपताका है।
मंदिर के प्रांगण में बाईं ओर तराशे हुए काले पत्थर से बनी मीठे पानी की कुआं है। प्रांगण में दत्त मंदिर और दूसरी ओर महादेव मंदिर है। मंदिर में फाल्गुन शुक्ल पंचमी का वार्षिक जत्रोत्सव बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। इस दिन देव का पालखी समारोह संपन्न होता है। क्षेत्र के कई ग्राम देवताओं की पालखियां इस समय स्वयंभू हनुमानजी से मिलने यहां आती हैं। मेले के लिए एकत्रित लाखों भक्तगण अपनी मन्नत के नारियल अर्पित करते हैं। इस अनोखी परंपरा के कारण यह मेला ‘नारियल उधळणी’ मेला के रूप में जाना जाता है।
उपयोगी जानकारी
- गडहिंग्लज से ७ किमी, तो कोल्हापूर से ५९ किमी की दूरी पर
- गडहिंग्लज से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा नहीं है
સ્વયંભૂ હનુમાન મંદિર
હનિમનાળ, તા. ગડહિંગ્લજ, જિ. કોલ્હાપુર
હનુમાનજીને શક્તિના દેવતા તરીકે પૂજવામાં આવે છે. ‘મારા ભક્તોને હેરાન ન કરવા’ એવું વરદાન હનુમાનજીએ શનિદેવ પાસેથી મેળવ્યું હતું. તેથી અશુભ નિવારણ માટે હનુમાનજીની ઉપાસના કરવામાં આવે છે. હનુમાન ઉપાસનાનો પ્રચાર અને પ્રસાર ખરા અર્થમાં સમર્થ રામદાસ સ્વામીના સમયમાં થયો હતો. રામદાસ સ્વામીએ ગામેગામ હનુમાન મંદિરોની સ્થાપના કરી હતી. ગડહિંગ્લજ તાલુકાના હનિમનાળ ગામમાં આવેલું હનુમાન મંદિર તે પૈકીનું જ એક હોવાનું કહેવાય છે. નવસ (બાધા) પૂરી કરનાર આ સ્વયંભૂ હનુમાન પીડા અને વ્યાધિ દૂર કરનાર છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. ફાલ્ગુન સુદ પાંચમના રોજ ભરાતો દેવનો મેળો નાળિયેરની ઉધળણીના મેળા તરીકે પ્રસિદ્ધ છે.
આ મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે આશરે ૩૫૦ વર્ષ પહેલાં હનિમનાળ ગામના એક ખેડૂતની દૂધાળી ગાયે દૂધ આપવાનું અચાનક બંધ કરી દીધું હતું. ત્યારે ખેડૂતે કારણ શોધતા તેને જાણવા મળ્યું કે ગાય જ્યારે સીમમાં ચરવા જાય છે ત્યારે એક ચોક્કસ જગ્યાએ દૂધ મૂકી દે છે. ત્યારે રામદાસ સ્વામીએ ગ્રામજનોને આ જગ્યાએ ખોદકામ કરવાનું કહ્યું. સમર્થના સલાહ મુજબ આ જગ્યાએ ખોદતા જમીનમાંથી હનુમાનજીની સ્વયંભૂ પાષાણ મૂર્તિ પ્રગટ થઈ. જમીન ખોદતી વખતે પાવડાનો એક ઘા ભૂલથી પાષાણને વાગતા તેમાંથી રક્ત વહેવા લાગ્યું. ત્યારે ગામના ગુરવે ક્ષમા યાચના કરી અને પ્રાયશ્ચિત તરીકે નિર્જળા ઉપવાસ કર્યા. ઉપવાસના ત્રીજા દિવસે પાષાણમાંથી રક્ત વહેતું બંધ થઈ ગયું અને ઘા રૂઝાઈ ગયો. ભક્તોની એવી શ્રદ્ધા છે કે આ હનુમાનજીના ઉપવાસ કરવાથી માનસિક અને શારીરિક પીડા, વ્યાધિ નાશ પામે છે. ગ્વાલિયરના રાજઘરાનાની આ મારુતિ ચરણોમાં અપાર શ્રદ્ધા હતી. તેમણે મંદિર માટે ધર્મશાળા બંધાવી આપી હતી.
મંદિર અને નગારખાનાની વિશિષ્ટ બાંધકામ શૈલીને કારણે હનુમાન જયંતિના દિવસે સવારના કિરણો નગારખાનામાંથી સીધા ગર્ભગૃહમાં રહેલી હનુમાનજીની મૂર્તિ પર પડે છે.
કુદરતનો આ અનોખો ચમત્કાર જોવા માટે આ દિવસે મંદિરમાં હજારો ભક્તોની ભીડ ઉમટે છે.
મંદિરનું બે માળનું પથ્થરનું પ્રવેશદ્વાર કોઈ કિલ્લાના પ્રવેશદ્વાર જેવું લાગે છે. કાળા પાષાણના બાંધકામવાળા પ્રવેશદ્વારની નકશીદાર દ્વારશાખાઓ લાલ ગાળખડક પ્રકારના પથ્થરની છે. પ્રવેશદ્વારના લલાટબિંબ પર ગણેશજીની મૂર્તિ અને બંને બાજુએ ઉપર ચક્ર છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ સ્તંભોમાં દીપકોષ્ઠક છે. સ્તંભો પર રહેલી અર્ધવર્તુળાકાર પથ્થરની કમાનમાં મધ્યમાં પાષાણમાં સિંહમુખ કોતરેલું છે. કમાનની નીચે મધ્યમાં માંગલ્યના પ્રતીક સમાન કેળના ફૂલનું ઉપસેલું શિલ્પ છે. કમાનની બંને બાજુએ દેવકોષ્ઠકમાં શસ્ત્રધારી દ્વારપાળ છે. આ પ્રવેશદ્વારની ઉપર નગારખાનું છે. નગારખાનાની બંને બાજુએ ત્રિકોણીય દીવાલો પર સિંહશિલ્પ છે. સિંહશિલ્પની બાજુમાં સ્તંભો પર બે અને નગારખાનાની છત પર એક એમ ત્રણ મેઘડંબરી છે. આ પ્રવેશદ્વારથી મંદિરના વિશાળ પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે.
મુખ્ય મંદિરની સામે એક મોટા પથ્થરના ચબૂતરા પર પાંચ સ્તરની અષ્ટકોણીય પ્રાચીન દીપમાળ છે. દીપમાળનું નીચેનું સ્તર વધુ પહોળું છે અને તે ઉપર જતાં સાંકડી થતી ગઈ છે. સૌથી ઉપરનું સ્તર ગોળાકાર છે. આ દીપમાળની બાજુમાંથી પ્રવેશદ્વારના બીજા માળે આવેલા નગારખાનામાં જવા માટે પથ્થરની સીડીઓ છે. નગારખાનાને સુરક્ષા માટે કઠેડા છે. નગારખાનામાં ઊભા રહીને આ મંદિર પરિસરનું અને ગામનું વિહંગમ દૃશ્ય જોઈ શકાય છે. સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી મુખ્ય મંદિરની સંરચના છે. ખુલ્લા પ્રકારના સભામંડપના દસ ચોરસ સ્તંભો એકબીજા સાથે મહેરાબદાર કમાનથી જોડાયેલા છે. સભામંડપમાંથી આગળ બંધાયેલા અંતરાળમાં પ્રવેશ થાય છે. અંતરાળમાં મધ્યમાં કાચબાની મૂર્તિ છે.
ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર સોનેરી ધાતુના પતરાથી આચ્છાદિત છે. અહીંની દ્વારશાખાઓ પર દ્વારપાળ અને પાન-ફૂલની નકશી છે. લલાટબિંબ પર ગણેશજીની મૂર્તિ અને મૂર્તિની બંને બાજુએ ગજરાજ છે. તેની ઉપરના ભાગમાં ચંદ્ર અને સૂર્યની પ્રતિમાઓ કોતરેલી છે. ગર્ભગૃહમાં સ્વયંભૂ હનુમાનજીની સિંદૂર ચર્ચિત પાષાણ મૂર્તિ છે. મંદિરની છત પર કઠેડો છે અને તેમાં બહારની બાજુએ કોષ્ઠક જેવી રચના છે. કઠેડા પર સિંહોના ચાર શિલ્પ છે. મંદિરનું શિખર બાર ખૂણાવાળા ગુંબજ આકારનું અને દસ સ્તરનું છે. તે ઉપર જતાં સાંકડું થતું ગયું છે. તેના પરનું આમલક વિશિષ્ટ છે. તેના પર ઊભી ધારની નકશી અને ઉપર કળશ તથા ધ્વજપતાકા છે.
મંદિરના પ્રાંગણમાં ડાબી બાજુએ ઘડેલા કાળા પથ્થરમાં બાંધેલી મીઠા પાણીની વાવ છે. પ્રાંગણમાં દત્ત મંદિર અને બીજી બાજુ મહાદેવ મંદિર છે. મંદિરમાં ફાલ્ગુન સુદ પાંચમનો વાર્ષિક જન્મોત્સવ મોટા ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. આ દિવસે દેવનો પાલખી ઉત્સવ સંપન્ન થાય છે. આસપાસના અનેક ગ્રામદેવતાઓની પાલખીઓ આ સમયે સ્વયંભૂ હનુમાનજીની મુલાકાતે અહીં આવે છે. મેળા માટે એકઠા થયેલા લાખો ભક્તો બાધાના નાળિયેર ઉછાળે છે. આ અનોખી પરંપરાને કારણે આ મેળો નાળિયેરની ઉધળણીના મેળા તરીકે ઓળખાય છે.
ઉપયોગી માહિતી
- ગડહિંગ્લજથી ૭ કિમી, તો કોલ્હાપુરથી ૫૯ કિમી અંતરે
- ગડહિંગ્લજથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
சுயம்பு அனுமான் கோவில்
ஹனிமனாள், தாலுகா கடஹிங்லஜ், மாவட்டம் கோலாப்பூர்
அனுமான் சக்தியின் தெய்வமாக வழிபடப்படுகிறார். ‘எனது பக்தர்களை துன்புறுத்தக்கூடாது’ என்ற வரத்தை அனுமான் சனிதேவரிடம் பெற்றிருந்தார். எனவே, தீமைகளை நீக்குவதற்காக அனுமான் வழிபாடு செய்யப்படுகிறது. அனுமான் வழிபாட்டின் பிரச்சாரமும் பரவலும் உண்மையான அர்த்தத்தில் சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகளின் காலத்தில்தான் நிகழ்ந்தது. ராமதாஸ் சுவாமிகள் ஊர்தோறும் அனுமான் கோவில்களை நிறுவினார். கடஹிங்லஜ் தாலுகாவில் உள்ள ஹனிமனாள் கிராமத்தில் இருக்கும் அனுமான் கோவிலும் அவற்றில் ஒன்று என்று கூறப்படுகிறது. வேண்டுதலை நிறைவேற்றும் இந்த சுயம்பு அனுமான், துன்பங்களையும் நோய்களையும் நீக்குபவர் என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை. பால்குண சுத்த பஞ்சமியன்று நடைபெறும் தேவாலயத் திருவிழா, தேங்காய் வீசும் திருவிழாவாகப் புகழ்பெற்றது.
இந்தக் கோவிலின் ஐதீகம் என்னவென்றால், சுமார் ௩௫௦ ஆண்டுகளுக்கு முன்பு ஹனிமனாள் கிராமத்தில் இருந்த ஒரு விவசாயியின் பால் கறக்கும் பசு திடீரென பால் கொடுப்பதை நிறுத்தியது. அப்போது விவசாயி காரணத்தைத் தேடியபோது, பசு காட்டில் மேயச் செல்லும் போது ஒரு குறிப்பிட்ட இடத்தில் பால் சொரிவதைக் கண்டறிந்தார். அப்போது ராமதாஸ் சுவாமிகள் கிராம மக்களை அந்த இடத்தில் தோண்டிப் பார்க்கச் சொன்னார். சமர்த்தரின் அறிவுரைப்படி அந்த இடத்தில் தோண்டியபோது, பூமியிலிருந்து அனுமனின் சுயம்பு பாஷாணத் திருமேனி வெளிப்பட்டது. நிலத்தைத் தோண்டும்போது, கடப்பாரையின் ஒரு முனை தவறுதலாக பாஷாணத்தின் மீது பட்டதால், அதிலிருந்து இரத்தம் வழிந்தது. அப்போது கிராமத்து பூசாரி மன்னிப்பு கேட்டு, பிராயச்சித்தமாக நீர் கூட அருந்தாமல் விரதம் இருந்தார். விரதத்தின் மூன்றாவது நாளில் பாஷாணத்திலிருந்து இரத்தம் வழிவது நின்று காயம் ஆறியது. இந்த அனுமனுக்கு விரதம் இருந்தால் மன மற்றும் உடல் ரீதியான துன்பங்கள், நோய்கள் நீங்கிவிடும் என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை. குவாலியர் அரச குடும்பத்தினருக்கு இந்த மாருதியின் மீது அளவற்ற பக்தி இருந்தது. அவர்கள் கோவிலுக்கு தர்மசாலையைக் கட்டிக் கொடுத்திருந்தனர்.
கோவில் மற்றும் நகர்கானாவின் தனித்துவமான கட்டிடக்கலை பாணியால், அனுமான் ஜெயந்தி அன்று அதிகாலை கதிர்கள் நகர்கானா வழியாக நேரடியாக கருவறையில் உள்ள அனுமான் சிலையின் மீது விழுகின்றன.
இயற்கையின் இந்த அதிசயத்தைக் காண இந்த நாளில் கோவிலில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் திரள்கிறார்கள்.
கோவிலின் இருமாடி கல் நுழைவாயில் ஒரு கோட்டையின் நுழைவாயில் போலத் தோன்றுகிறது. கருங்கல்லால் ஆன நுழைவாயிலின் வேலைப்பாடுகள் நிறைந்த கதவு நிலைகள், சிவப்பு நிற மணற்கல் வகையைச் சேர்ந்தவை. நுழைவாயிலின் மேல் பகுதியில் கணபதி சிலையும், இருபுறமும் சக்கரங்களும் உள்ளன. நுழைவாயிலின் இருபுறமும் உள்ள தூண்களில் தீபங்களை வைக்கும் இடங்கள் உள்ளன. தூண்களின் மேல் உள்ள அரைவட்ட கல் வளைவின் நடுவில் சிங்க முகம் செதுக்கப்பட்டுள்ளது. வளைவின் கீழ் நடுவில் மங்கலத்தின் அடையாளமான வாழைப்பூவின் சிற்பம் உள்ளது. வளைவின் இருபுறமும் உள்ள தேவகோஷ்டங்களில் ஆயுதம் ஏந்திய துவாரபாலகர்கள் உள்ளனர். இந்த நுழைவாயிலுக்கு மேலே நகர்கானா உள்ளது. நகர்கானாவின் இருபுறமும் உள்ள முக்கோணச் சுவர்களில் சிங்கச் சிற்பங்கள் உள்ளன. சிங்கச் சிற்பங்களின் பக்கவாட்டில் உள்ள தூண்களில் இரண்டு மற்றும் நகர்கானாவின் கூரையில் ஒன்று என மொத்தம் மூன்று மேகத்தூபிகள் உள்ளன. இந்த நுழைவாயில் வழியாக கோவிலின் விசாலமான பிரகாரத்திற்குள் நுழையலாம்.
முக்கிய கோவிலுக்கு முன்னால் ஒரு பெரிய கல் மேடையில் ஐந்து அடுக்குகளைக் கொண்ட எண்கோண வடிவிலான பழமையான தீபஸ்தம்பம் உள்ளது. தீபஸ்தம்பத்தின் கீழ் அடுக்கு அகலமாகவும், மேலே செல்லச் செல்ல குறுகலாகவும் உள்ளது. மிக உயர்ந்த அடுக்கு வட்டமானது. இந்த தீபஸ்தம்பத்தின் பக்கவாட்டில் நுழைவாயிலின் இரண்டாவது மாடியில் உள்ள நகர்கானாவுக்குச் செல்ல கல் படிகள் உள்ளன. நகர்கானாவுக்கு பாதுகாப்பு வேலிகள் உள்ளன. நகர்கானாவில் நின்று இந்த கோவில் வளாகத்தையும் கிராமத்தையும் முழுமையாகக் காணலாம். சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என முக்கிய கோவிலின் அமைப்பு உள்ளது. திறந்த நிலையில் உள்ள சபா மண்டபத்தில் பத்து சதுரத் தூண்கள் வளைவுகளால் ஒன்றோடொன்று இணைக்கப்பட்டுள்ளன. சபா மண்டபத்திலிருந்து அடுத்துள்ள மூடிய அந்தராளத்திற்குள் நுழையலாம். அந்தராளத்தின் நடுவில் ஆமைச் சிலை உள்ளது.
கருவறையின் நுழைவாயில் தங்கத் தகடுகளால் மூடப்பட்டுள்ளது. இங்குள்ள கதவு நிலைகளில் துவாரபாலகர்கள் மற்றும் இலை, பூ வேலைப்பாடுகள் உள்ளன. மேல் பகுதியில் கணபதி சிலையும், சிலையின் இருபுறமும் யானைகளும் உள்ளன. அதற்கு மேல் பகுதியில் சந்திரன் மற்றும் சூரியன் உருவங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. கருவறையில் சுயம்பு அனுமனின் சந்தனம் பூசப்பட்ட பாஷாணச் சிலை உள்ளது. கோவிலின் கூரையில் தடுப்புச் சுவர் உள்ளது, அதில் வெளிப்புறத்தில் கோஷ்டம் போன்ற அமைப்பு உள்ளது. தடுப்புச் சுவரில் நான்கு சிங்கச் சிற்பங்கள் உள்ளன. கோவிலின் கோபுரம் பன்னிரு கோண குவிமாடம் மற்றும் பத்து அடுக்குகளைக் கொண்டது. அது மேலே செல்லச் செல்ல குறுகலாகிறது. அதன் மேல் உள்ள ஆமலகம் தனித்துவமானது. அதன் மீது செங்குத்தான கோடுகள் மற்றும் மேலே கலசம் மற்றும் கொடி உள்ளது.
கோவில் பிரகாரத்தில் இடதுபுறம் செதுக்கப்பட்ட கருங்கல்லால் கட்டப்பட்ட நன்னீர் கிணறு உள்ளது. பிரகாரத்தில் தத்தாத்ரேயர் கோவிலும், மறுபுறம் மகாதேவர் கோவிலும் உள்ளன. கோவிலில் பால்குண சுத்த பஞ்சமி அன்று வருடாந்திர திருவிழா மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. இந்நாளில் தேவனின் பல்லக்கு ஊர்வலம் நடைபெறுகிறது. அப்பகுதியைச் சுற்றியுள்ள பல கிராம தெய்வங்களின் பல்லக்குகள் இந்த நேரத்தில் சுயம்பு அனுமனை தரிசிக்க இங்கு வருகின்றன. திருவிழாவிற்காகக் கூடிய லட்சக்கணக்கான பக்தர்கள் தாங்கள் வேண்டிக்கொண்ட தேங்காய்களை வீசுகிறார்கள். இந்த தனித்துவமான வழக்கத்தினால், இந்தத் திருவிழா தேங்காய் வீசும் திருவிழா என்று அழைக்கப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- கடஹிங்லஜிலிருந்து ௭ கி.மீ, கோலாப்பூரிலிருந்து ௫௯ கி.மீ தொலைவில்
- கடஹிங்லஜிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- அப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவு உண்பதற்கும் வசதிகள் இல்லை
స్వయంభూ హనుమాన్ మందిరం
హనిమనాళ్, తా. గడహింగ్లజ్, జి. కోల్హాపూర్
హనుమంతుడు శక్తికి అధిదేవతగా పూజించబడతాడు. ‘నా భక్తులను బాధించవద్దు’ అని శనిదేవుని నుండి హనుమంతుడు వరం పొందాడు. అందుకే అశుభాలను తొలగించుకోవడానికి హనుమంతుని ఉపాసన చేస్తారు. హనుమత్ ఉపాసన ప్రచారం మరియు వ్యాప్తి నిజానికి సమర్థ రామదాస స్వామి కాలంలో జరిగింది. రామదాస స్వామి ఊరూరా హనుమాన్ మందిరాలను స్థాపించారు. గడహింగ్లజ్ తాలూకాలోని హనిమనాళ్ గ్రామంలో ఉన్న హనుమాన్ మందిరం అటువంటి వాటిలో ఒకటి అని చెబుతారు. కోరిన కోర్కెలు తీర్చే ఈ స్వయంభూ హనుమంతుడు పీడలను, వ్యాధులను దూరం చేస్తాడని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. ఫాల్గుణ శుద్ధ పంచమి నాడు జరిగే దేవుని జాతర కొబ్బరికాయలు చల్లే జాతరగా ప్రసిద్ధి చెందింది.
ఈ మందిరం వెనుక ఉన్న కథనం ఏమిటంటే, సుమారు ౩౫౦ ఏళ్ల క్రితం హనిమనాళ్ గ్రామంలోని ఒక రైతు పాలిచ్చే ఆవు అకస్మాత్తుగా పాలు ఇవ్వడం మానేసింది. అప్పుడు రైతు కారణం అన్వేషించగా, ఆవు అడవిలో మేతకు వెళ్ళినప్పుడు ఒక నిర్దిష్ట ప్రదేశంలో పాలు కారుస్తోందని తెలిసింది. అప్పుడు రామదాస స్వామి గ్రామస్థులను ఆ ప్రదేశంలో తవ్వి చూడమని చెప్పారు. సమర్థుల సలహా మేరకు తవ్వగా, భూమిలో నుండి హనుమంతుని స్వయంభూ పాషాణ విగ్రహం బయటపడింది. భూమిని తవ్వుతుండగా పార దెబ్బ పొరపాటున విగ్రహానికి తగలడంతో విగ్రహం నుండి రక్తం ప్రవహించింది. అప్పుడు గ్రామ పూజారి క్షమాపణ కోరుకుని, ప్రాయశ్చిత్తంగా నిర్జల ఉపవాసం ఉన్నాడు. ఉపవాసం ఉన్న మూడవ రోజున విగ్రహం నుండి రక్తం కారడం ఆగిపోయి, గాయం మానిపోయింది. ఈ హనుమంతుని పేరుతో ఉపవాసం ఉంటే మానసిక మరియు శారీరక పీడలు, వ్యాధులు తొలగిపోతాయని భక్తుల నమ్మకం. గ్వాలియర్ రాజవంశానికి ఈ మారుతి చరణాలపై అపారమైన భక్తి ఉండేది. వారు మందిరానికి ధర్మశాలను నిర్మించి ఇచ్చారు.
మందిరం మరియు నగార్ ఖానా యొక్క విశిష్ట నిర్మాణ శైలి కారణంగా, హనుమజ్జయంతి రోజున ఉదయాన్నే సూర్యకిరణాలు నగార్ ఖానా గుండా నేరుగా గర్భాలయంలోని హనుమంతుని విగ్రహంపై పడతాయి.
ప్రకృతి యొక్క ఈ అద్భుతాన్ని చూడటానికి ఈ రోజున మందిరంలో వేలాది మంది భక్తులు గుమిగూడతారు.
మందిరం యొక్క రెండంతస్తుల రాతి ప్రవేశద్వారం ఒక కోట ద్వారంలా కనిపిస్తుంది. నల్ల రాతితో నిర్మించిన ఈ ప్రవేశద్వారం యొక్క అలంకరించబడిన ద్వారశాఖలు ఎర్రటి ఇసుక రాతితో చేయబడ్డాయి. ప్రవేశద్వారం యొక్క లలాటబింబంపై గణేశ విగ్రహం మరియు రెండు వైపులా చక్రాలు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం యొక్క రెండు వైపులా స్తంభాలలో దీపపు గూళ్లు ఉన్నాయి. స్తంభాలపై ఉన్న అర్ధవృత్తాకార రాతి తోరణాల మధ్యలో సింహముఖం చెక్కబడి ఉంది. తోరణం కింద మధ్యలో మంగళప్రదమైన అరటిపువ్వు ఆకారం ఉంది. తోరణం యొక్క రెండు వైపులా ఉన్న దేవకోష్ఠాలలో ఆయుధధారులైన ద్వారపాలకులు ఉన్నారు. ఈ ప్రవేశద్వారం పైన నగార్ ఖానా ఉంది. నగార్ ఖానాకు రెండు వైపులా త్రిభుజాకార గోడలపై సింహ శిల్పాలు ఉన్నాయి. సింహ శిల్పాల పక్కన స్తంభాలపై రెండు మరియు నగార్ ఖానా పైకప్పుపై ఒకటి చొప్పున మూడు మేఘడంబరాలు ఉన్నాయి. ఈ ప్రవేశద్వారం గుండా మందిరంలోని విశాలమైన ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు.
ప్రధాన మందిరం ముందు ఒక పెద్ద రాతి వేదికపై ఐదు అంతస్తుల అష్టకోణ ప్రాచీన దీపస్తంభం ఉంది. దీపస్తంభం కింది అంతస్తు వెడల్పుగా ఉండి, పైకి వెళ్లేకొద్దీ సన్నబడుతుంది. అత్యంత పై అంతస్తు గుండ్రంగా ఉంటుంది. ఈ దీపస్తంభం పక్క నుండి ప్రవేశద్వారం యొక్క రెండవ అంతస్తులో ఉన్న నగార్ ఖానాకు వెళ్లడానికి రాతి మెట్లు ఉన్నాయి. నగార్ ఖానాకు రక్షణ కంచెలు ఉన్నాయి. నగార్ ఖానాలో నిలబడి మందిర ప్రాంగణాన్ని మరియు గ్రామాన్ని పక్షుల దృష్టికోణంలో చూడవచ్చు. సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భాలయం అనేవి ప్రధాన మందిర నిర్మాణం. బహిరంగ సభామండపంలోని పది చతురస్రాకార స్తంభాలు ఒకదానికొకటి తోరణాలతో అనుసంధానించబడి ఉన్నాయి. సభామండపం నుండి ముందుకు వెళ్తే మూసి ఉన్న అంతరాళంలోకి ప్రవేశిస్తారు. అంతరాళంలో మధ్యలో కూర్మ విగ్రహం ఉంది.
గర్భాలయ ప్రవేశద్వారం బంగారు పూతతో కప్పబడి ఉంది. ఇక్కడి ద్వారశాఖలపై ద్వారపాలకులు మరియు పూల నమూనాలు ఉన్నాయి. లలాటబింబంపై గణేశ విగ్రహం మరియు విగ్రహానికి రెండు వైపులా గజరాజులు ఉన్నాయి. దాని పైభాగంలో చంద్ర మరియు సూర్య ప్రతిమలు చెక్కబడి ఉన్నాయి. గర్భాలయంలో స్వయంభూ హనుమంతుని సింధూర లేపిత పాషాణ విగ్రహం ఉంది. మందిర పైకప్పుకు కంచె ఉండి, బయటి వైపు గూడు వంటి నిర్మాణం ఉంది. కంచెపై నాలుగు సింహాల శిల్పాలు ఉన్నాయి. మందిర శిఖరం పన్నెండు కోణాల గుమ్మటం ఆకారంలో మరియు పది అంతస్తులతో ఉంది. అది పైకి వెళ్లేకొద్దీ సన్నబడుతుంది. దానిపై ఉన్న ఆమలకం విశిష్టమైనది. దానిపై నిలువు రేఖల నమూనా మరియు పైన కలశం మరియు ధ్వజపతాకం ఉన్నాయి.
మందిర ప్రాంగణంలో ఎడమ వైపున చెక్కిన నల్ల రాతితో నిర్మించిన మంచి నీటి బావి ఉంది. ప్రాంగణంలో దత్త మందిరం మరియు మరోవైపు మహాదేవ మందిరం ఉన్నాయి. మందిరంలో ఫాల్గుణ శుద్ధ పంచమి నాడు వార్షిక జాతరోత్సవం ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. ఈ రోజున దేవుని పల్లకీ ఉత్సవం జరుగుతుంది. పరిసర ప్రాంతాలలోని అనేక గ్రామ దేవతల పల్లకీలు ఈ సమయంలో స్వయంభూ హనుమంతుని దర్శనానికి ఇక్కడికి వస్తాయి. జాతరకు వచ్చిన లక్షలాది మంది భక్తులు తమ మొక్కుబడుల కొబ్బరికాయలను చల్లుతారు. ఈ విశిష్ట సంప్రదాయం వల్ల ఈ జాతర కొబ్బరికాయలు చల్లే జాతరగా పిలువబడుతుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- గడహింగ్లజ్ నుండి ౭ కిమీ, కోల్హాపూర్ నుండి ౫౯ కిమీ దూరంలో
- గడహింగ్లజ్ నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిర పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో వసతి మరియు భోజన సౌకర్యాలు లేవు
സ്വയംഭൂ ഹനുമാൻ ക്ഷേത്രം
ഹനിമനാൾ, താലൂക്ക് ഗഡ്ഹിങ്ലജ്, ജില്ല കോലാപ്പൂർ
ശക്തിയുടെ ദേവനായി ഹനുമാനെ ആരാധിക്കുന്നു. ‘എന്റെ ഭക്തരെ ഉപദ്രവിക്കരുത്’ എന്ന് ശനിദേവനിൽ നിന്ന് ഹനുമാൻ വരം വാങ്ങിയിരുന്നു. അതിനാൽ അശുഭങ്ങൾ നീങ്ങുന്നതിനായി ഹനുമാനെ ആരാധിക്കുന്നു. സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികളുടെ കാലത്താണ് ഹനുമാൻ ആരാധനയുടെ പ്രചാരവും പ്രസാരവും യഥാർത്ഥത്തിൽ നടന്നത്. രാമദാസ് സ്വാമികൾ ഗ്രാമതോറും ഹനുമാൻ ക്ഷേത്രങ്ങൾ സ്ഥാപിച്ചു. ഗഡ്ഹിങ്ലജ് താലൂക്കിലെ ഹനിമനാൾ ഗ്രാമത്തിലുള്ള ഹനുമാൻ ക്ഷേത്രം അവയിലൊന്നാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. പ്രാർത്ഥനകൾക്ക് ഫലം നൽകുന്ന ഈ സ്വയംഭൂ ഹനുമാൻ ദുരിതങ്ങളും രോഗങ്ങളും അകറ്റുന്നവനാണെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ഫാൽഗുന ശുദ്ധ പഞ്ചമി നാളിൽ നടക്കുന്ന ക്ഷേത്രോത്സവം തേങ്ങ എറിയുന്ന ഉത്സവം എന്ന നിലയിൽ പ്രശസ്തമാണ്.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: ഏകദേശം ൩൫൦ വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ഹനിമനാൾ ഗ്രാമത്തിലെ ഒരു കർഷകന്റെ പാൽ തരുന്ന പശു പെട്ടെന്ന് പാൽ നൽകുന്നത് നിർത്തി. കർഷകൻ ഇതിന്റെ കാരണം അന്വേഷിച്ചപ്പോൾ, പശു കാട്ടിൽ മേയാൻ പോകുമ്പോൾ ഒരു പ്രത്യേക സ്ഥലത്ത് പാൽ ചുരത്തുന്നത് ശ്രദ്ധയിൽപ്പെട്ടു. അപ്പോൾ രാമദാസ് സ്വാമികൾ ഗ്രാമവാസികളോട് ഈ സ്ഥലം കുഴിച്ചു നോക്കാൻ ആവശ്യപ്പെട്ടു. സ്വാമികളുടെ നിർദ്ദേശപ്രകാരം കുഴിച്ചപ്പോൾ ഭൂമിയിൽ നിന്ന് ഹനുമാന്റെ സ്വയംഭൂ ശില പ്രത്യക്ഷപ്പെട്ടു. ഭൂമി കുഴിക്കുന്നതിനിടയിൽ പാരയുടെ ഒരു അടിയേറ്റ് ശിലയിൽ നിന്ന് രക്തം പ്രവഹിച്ചു. അപ്പോൾ ഗ്രാമത്തിലെ പൂജാരി മാപ്പ് അപേക്ഷിക്കുകയും പ്രായശ്ചിത്തമായി നിർജ്ജല ഉപവാസം അനുഷ്ഠിക്കുകയും ചെയ്തു. ഉപവാസത്തിന്റെ മൂന്നാം ദിവസം ശിലയിൽ നിന്ന് രക്തം ഒഴുകുന്നത് നിലയ്ക്കുകയും മുറിവ് ഉണങ്ങുകയും ചെയ്തു. ഈ ഹനുമാനെ വ്രതമെടുത്ത് ആരാധിച്ചാൽ മാനസികവും ശാരീരികവുമായ പീഡകളും രോഗങ്ങളും ഇല്ലാതാകുമെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ഗ്വാളിയോർ രാജകുടുംബത്തിന് ഈ മാരുതിയുടെ പാദങ്ങളിൽ അപാരമായ ഭക്തിയുണ്ടായിരുന്നു. അവർ ക്ഷേത്രത്തിന് ധർമ്മശാല നിർമ്മിച്ചു നൽകി.
ക്ഷേത്രത്തിന്റെയും നഗർഖാനയുടെയും സവിശേഷമായ നിർമ്മാണ ശൈലി കാരണം, ഹനുമാൻ ജയന്തി നാളിൽ പുലർച്ചെയുള്ള കിരണങ്ങൾ നഗർഖാനയിലൂടെ നേരിട്ട് ഗർഭഗൃഹത്തിലെ ഹനുമാൻ വിഗ്രഹത്തിൽ പതിക്കുന്നു.
പ്രകൃതിയുടെ ഈ അത്ഭുതം കാണാൻ ഈ ദിവസം ക്ഷേത്രത്തിൽ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ തടിച്ചുകൂടുന്നു.
ക്ഷേത്രത്തിന്റെ ഇരുനില കരിങ്കൽ പ്രവേശന കവാടം ഒരു കോട്ടയുടെ കവാടം പോലെ തോന്നിക്കുന്നു. കറുത്ത ശിലയിൽ നിർമ്മിച്ച പ്രവേശന കവാടത്തിന്റെ കൊത്തുപണികളുള്ള കവാടത്തൂണുകൾ ചുവന്ന കല്ലുകൾ കൊണ്ടുള്ളതാണ്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ മുകൾഭാഗത്ത് ഗണപതി വിഗ്രഹവും ഇരുവശത്തും ചക്രങ്ങളുമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തുമുള്ള തൂണുകളിൽ ദീപങ്ങൾ വെക്കാനുള്ള ഇടങ്ങളുണ്ട്. തൂണുകളിലെ അർദ്ധവൃത്താകൃതിയിലുള്ള കൽ കമാനങ്ങളുടെ മധ്യഭാഗത്ത് സിംഹമുഖം കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. കമാനത്തിന് താഴെ മധ്യഭാഗത്ത് മംഗളത്തിന്റെ പ്രതീകമായ വാഴപ്പൂവിന്റെ ശില്പമുണ്ട്. കമാനത്തിന്റെ ഇരുവശത്തുമുള്ള ദേവകോഷ്ഠങ്ങളിൽ ആയുധധാരികളായ ദ്വാരപാലകരുണ്ട്. ഈ പ്രവേശന കവാടത്തിന് മുകളിൽ നഗർഖാനയുണ്ട്. നഗർഖാനയുടെ ഇരുവശത്തുമുള്ള ത്രികോണാകൃതിയിലുള്ള ഭിത്തികളിൽ സിംഹശില്പങ്ങളുണ്ട്. സിംഹശില്പങ്ങളുടെ വശത്തുള്ള തൂണുകളിൽ രണ്ടെണ്ണവും നഗർഖാനയുടെ മേൽക്കൂരയിൽ ഒരെണ്ണവും ഉൾപ്പെടെ മൂന്ന് മേഘഡംബരികളുണ്ട്. ഈ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രത്തിന്റെ വിശാലമായ മുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കാം.
പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഒരു വലിയ കൽത്തറയിൽ അഞ്ച് തട്ടുകളുള്ള അഷ്ടഭുജാകൃതിയിലുള്ള പുരാതന ദീപസ്തംഭമുണ്ട്. ദീപസ്തംഭത്തിന്റെ താഴത്തെ തട്ട് കൂടുതൽ വീതിയുള്ളതും മുകളിലേക്ക് പോകുന്തോറും വണ്ണം കുറയുന്നതുമാണ്. ഏറ്റവും മുകളിലെ തട്ട് വട്ടത്തിലാണ്. ഈ ദീപസ്തംഭത്തിന്റെ വശത്തുകൂടി പ്രവേശന കവാടത്തിന്റെ രണ്ടാം നിലയിലുള്ള നഗർഖാനയിലേക്ക് പോകാൻ കൽപടവുകളുണ്ട്. നഗർഖാനയ്ക്ക് സുരക്ഷാ വേലികളുണ്ട്. നഗർഖാനയിൽ നിന്ന് ക്ഷേത്രപരിസരത്തിന്റെയും ഗ്രാമത്തിന്റെയും മനോഹരമായ കാഴ്ച കാണാൻ സാധിക്കും. സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. തുറന്ന സഭാമണ്ഡപത്തിലെ പത്ത് ചതുര തൂണുകൾ പരസ്പരം കമാനങ്ങളാൽ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിൽ നിന്ന് അടച്ചിട്ട അന്തരാളത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. അന്തരാളത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് കൂർമ്മ വിഗ്രഹമുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം സ്വർണ്ണ ലോഹത്തകിടാൽ പൊതിഞ്ഞതാണ്. ഇവിടുത്തെ കവാടത്തൂണുകളിൽ ദ്വാരപാലകരുടെയും ഇലകളുടെയും പൂക്കളുടെയും കൊത്തുപണികളുണ്ട്. മുകൾഭാഗത്ത് ഗണപതി വിഗ്രഹവും വിഗ്രഹത്തിന്റെ ഇരുവശത്തും ഗജരാജന്മാരുമുണ്ട്. അതിനു മുകളിലായി സൂര്യചന്ദ്രന്മാരുടെ പ്രതിമകൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ സ്വയംഭൂ ഹനുമാന്റെ സിന്ദൂരമണിഞ്ഞ ശിലാവിഗ്രഹമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ വേലിയുണ്ട്, അതിൽ പുറംഭാഗത്ത് കോഷ്ഠം പോലുള്ള ഘടനയുണ്ട്. വേലിയിൽ നാല് സിംഹശില്പങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ശിഖരം പന്ത്രണ്ട് കോണുകളുള്ള താഴികക്കുട ആകൃതിയിലുള്ളതും പത്ത് തട്ടുകളുള്ളതുമാണ്. അത് മുകളിലേക്ക് പോകുന്തോറും വണ്ണം കുറയുന്നു. അതിന് മുകളിലുള്ള ആമലകം സവിശേഷമാണ്. അതിൽ ലംബമായ വരകളുള്ള കൊത്തുപണികളും മുകളിൽ കലശവും കൊടിയുമുണ്ട്.
ക്ഷേത്രമുറ്റത്ത് ഇടതുവശത്തായി കറുത്ത കല്ലിൽ നിർമ്മിച്ച ശുദ്ധജല കിണറുണ്ട്. മുറ്റത്ത് ദത്ത ക്ഷേത്രവും മറുവശത്ത് മഹാദേവ ക്ഷേത്രവുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിൽ ഫാൽഗുന ശുദ്ധ പഞ്ചമി വാർഷികോത്സവമായി വലിയ ആഘോഷത്തോടെ കൊണ്ടാടുന്നു. ഈ ദിവസം ദേവന്റെ പല്ലക്ക് ഘോഷയാത്ര നടക്കുന്നു. പരിസരത്തുള്ള പല ഗ്രാമദേവതകളുടെയും പല്ലക്കുകൾ ഈ സമയത്ത് സ്വയംഭൂ ഹനുമാനെ സന്ദർശിക്കാൻ ഇവിടെ വരുന്നു. ഉത്സവത്തിനായി എത്തുന്ന ലക്ഷക്കണക്കിന് ഭക്തർ നേർച്ചയായി തേങ്ങ എറിയുന്നു. ഈ സവിശേഷമായ പാരമ്പര്യം കാരണം ഈ ഉത്സവം തേങ്ങ എറിയുന്ന ഉത്സവം എന്ന് അറിയപ്പെടുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ഗഡ്ഹിങ്ലജിൽ നിന്ന് ൭ കി.മീ, കോലാപ്പൂരിൽ നിന്ന് ൫൯ കി.മീ അകലെ
- ഗഡ്ഹിങ്ലജിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമോ ഭക്ഷണ സൗകര്യമോ ഇല്ല
ಸ್ವಯಂಭೂ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ
ಹನಿಮನಾಳ, ತಾ. ಗಡಹಿಂಗ್ಲಜ, ಜಿ. ಕೊಲ್ಲಾಪುರ
ಹನುಮಂತನನ್ನು ಶಕ್ತಿಯ ದೇವತೆಯಾಗಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ‘ನನ್ನ ಭಕ್ತರನ್ನು ಹಿಂಸಿಸಬಾರದು’ ಎಂಬ ವರವನ್ನು ಹನುಮಂತನು ಶನಿದೇವನಿಂದ ಪಡೆದಿದ್ದನು. ಆದ್ದರಿಂದ ಅಶುಭ ನಿವಾರಣೆಗಾಗಿ ಹನುಮಂತನ ಉಪಾಸನೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಹನುಮಂತನ ಉಪಾಸನೆಯ ಪ್ರಚಾರ ಮತ್ತು ಪ್ರಸಾರವು ನಿಜವಾದ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಡೆಯಿತು. ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಊರೂರುಗಳಲ್ಲಿ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. ಗಡಹಿಂಗ್ಲಜ ತಾಲೂಕಿನ ಹನಿಮನಾಳ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರವು ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಬೇಡಿದ ವರವನ್ನು ಕರುಣಿಸುವ ಈ ಸ್ವಯಂಭೂ ಹನುಮಂತನು ಪೀಡೆ ಮತ್ತು ವ್ಯಾಧಿಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡುವವನಾಗಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಫಾಲ್ಗುಣ ಶುದ್ಧ ಪಂಚಮಿಯಂದು ನಡೆಯುವ ದೇವರ ಜಾತ್ರೆಯು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಎಸೆಯುವ ಜಾತ್ರೆ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ.
ಈ ಮಂದಿರದ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಸುಮಾರು ೩೫೦ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಹನಿಮನಾಳ ಗ್ರಾಮದ ಒಬ್ಬ ರೈತನ ಹಾಲಿನ ಹಸು ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಂತೆ ಹಾಲು ಕೊಡುವುದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿತು. ಆಗ ರೈತನು ಕಾರಣವನ್ನು ಹುಡುಕಿದಾಗ, ಹಸು ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಮೇಯಲು ಹೋದಾಗ ಒಂದು ನಿರ್ದಿಷ್ಟ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಹಾಲು ಸುರಿಸುತ್ತದೆ ಎಂದು ತಿಳಿಯಿತು. ಆಗ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಈ ಸ್ಥಳವನ್ನು ಅಗೆದು ನೋಡಲು ಹೇಳಿದರು. ಸಮರ್ಥರ ಸಲಹೆಯಂತೆ ಈ ಸ್ಥಳವನ್ನು ಅಗೆದಾಗ ಭೂಮಿಯಿಂದ ಹನುಮಂತನ ಸ್ವಯಂಭೂ ಪಾಷಾಣ (ಶಿಲೆ) ಪ್ರಕಟವಾಯಿತು. ಭೂಮಿಯನ್ನು ಅಗೆಯುವಾಗ ಸಲಕೆಯ ಒಂದು ಪೆಟ್ಟು ಆಕಸ್ಮಿಕವಾಗಿ ಶಿಲೆಗೆ ಬಿದ್ದಿದ್ದರಿಂದ ಶಿಲೆಯಿಂದ ರಕ್ತ ಪ್ರವಹಿಸಿತು. ಆಗ ಗ್ರಾಮದ ಗುರುಗಳು ಕ್ಷಮೆಯಾಚಿಸಿ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತವಾಗಿ ನಿರ್ಜಲ ಉಪವಾಸವನ್ನು ಕೈಗೊಂಡರು. ಉಪವಾಸದ ಮೂರನೇ ದಿನದಂದು ಶಿಲೆಯಿಂದ ರಕ್ತ ಹರಿಯುವುದು ನಿಂತು ಗಾಯವು ವಾಸಿಯಾಯಿತು. ಈ ಹನುಮಂತನ ಉಪವಾಸವನ್ನು ಕೈಗೊಂಡರೆ ಮಾನಸಿಕ ಮತ್ತು ದೈಹಿಕ ಪೀಡೆಗಳು, ವ್ಯಾಧಿಗಳು ಮಾಯವಾಗುತ್ತವೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಗ್ವಾಲಿಯರ್ ರಾಜಮನೆತನಕ್ಕೆ ಈ ಮಾರುತಿ ಚರಣಗಳಲ್ಲಿ ಅಪಾರ ಭಕ್ತಿಯಿತ್ತು. ಅವರು ಮಂದಿರಕ್ಕೆ ಧರ್ಮಶಾಲೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದರು.
ಮಂದಿರ ಮತ್ತು ನಗಾರಖಾನೆಯ ವಿಶಿಷ್ಟ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಶೈಲಿಯಿಂದಾಗಿ ಹನುಮ ಜಯಂತಿಯ ದಿನದಂದು ಮುಂಜಾನೆಯ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಗಳು ನಗಾರಖಾನೆಯ ಮೂಲಕ ನೇರವಾಗಿ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿರುವ ಹನುಮಂತನ ಮೂರ್ತಿಯ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತವೆ.
ಪ್ರಕೃತಿಯ ಈ ಅದ್ಭುತ ಪವಾಡವನ್ನು ನೋಡಲು ಈ ದಿನ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಸೇರುತ್ತಾರೆ.
ಮಂದಿರದ ದ್ವಿತಲ ಕಲ್ಲಿನ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಕೋಟೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಂತೆ ಭಾಸವಾಗುತ್ತದೆ. ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣವಿರುವ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಕೆತ್ತನೆಯ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳು ಕೆಂಪು ಬಣ್ಣದ ಕಲ್ಲಿನಿಂದ ಕೂಡಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಲಲಾಟಬಿಂಬದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಚಕ್ರಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳಲ್ಲಿ ದೀಪಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ಕಂಬಗಳ ಮೇಲಿರುವ ಅರ್ಧವೃತ್ತಾಕಾರದ ಕಲ್ಲಿನ ಕಮಾನುಗಳಲ್ಲಿ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಸಿಂಹಮುಖವನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಕಮಾನುಗಳ ಕೆಳಗೆ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಮಂಗಳದ ಸಂಕೇತವಾದ ಬಾಳೆಹೂವಿನ ಉಬ್ಬು ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಕಮಾನುಗಳ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಶಸ್ತ್ರಧಾರಿ ದ್ವಾರಪಾಲಕರಿದ್ದಾರೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲೆ ನಗಾರಖಾನೆ ಇದೆ. ನಗಾರಖಾನೆಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ತ್ರಿಕೋನಾಕಾರದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಸಿಂಹ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಸಿಂಹ ಶಿಲ್ಪಗಳ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಎರಡು ಮತ್ತು ನಗಾರಖಾನೆಯ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಒಂದು ಹೀಗೆ ಮೂರು ಮೇಘಡಂಬರಿಗಳಿವೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಮಂದಿರದ ವಿಶಾಲವಾದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಸಿಗುತ್ತದೆ.
ಮುಖ್ಯ ಮಂದಿರದ ಎದುರು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲಿನ ಚೌಕಟ್ಟಿನ ಮೇಲೆ ಐದು ಹಂತಗಳ ಅಷ್ಟಕೋನಾಕೃತಿಯ ಪ್ರಾಚೀನ ದೀಪಮಾಲೆ ಇದೆ. ದೀಪಮಾಲೆಯ ಕೆಳಗಿನ ಹಂತವು ಹೆಚ್ಚು ಅಗಲವಾಗಿದ್ದು, ಮೇಲಕ್ಕೆ ಹೋದಂತೆ ಕಿರಿದಾಗುತ್ತಾ ಹೋಗಿದೆ. ಅತ್ಯಂತ ಮೇಲಿನ ಹಂತವು ಗೋಲಾಕಾರವಾಗಿದೆ. ಈ ದೀಪಮಾಲೆಯ ಬದಿಯಿಂದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡನೇ ಮಹಡಿಯಲ್ಲಿರುವ ನಗಾರಖಾನೆಗೆ ಹೋಗಲು ಕಲ್ಲಿನ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ನಗಾರಖಾನೆಗೆ ಭದ್ರತಾ ಕಂಬಿಗಳಿವೆ. ನಗಾರಖಾನೆಯಲ್ಲಿ ನಿಂತು ಈ ಮಂದಿರದ ಆವರಣ ಮತ್ತು ಗ್ರಾಮದ ವಿಹಂಗಮ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡಬಹುದು. ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿ ಹೀಗೆ ಮುಖ್ಯ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಿದೆ. ತೆರೆದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಹತ್ತು ಚೌಕಾಕಾರದ ಕಂಬಗಳು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಕಮಾನುಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಿಂದ ಮುಂದೆ ಮುಚ್ಚಿದ ಅಂತರಾಳಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಸಿಗುತ್ತದೆ. ಅಂತರಾಳದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಆಮೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಚಿನ್ನದ ಲೋಹದ ತಗಡಿನಿಂದ ಆವೃತವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ದ್ವಾರಪಾಲಕರು ಮತ್ತು ಎಲೆ-ಹೂವುಗಳ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಮೂರ್ತಿಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಗಜರಾಜರಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಮೇಲಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಚಂದ್ರ ಮತ್ತು ಸೂರ್ಯನ ಪ್ರತಿಮೆಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಹನುಮಂತನ ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿತ ಪಾಷಾಣ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮಂದಿರದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಗೆ ಕಂಬಿಗಳಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಕೋಷ್ಟಕದಂತಹ ರಚನೆಯಿದೆ. ಕಂಬಿಗಳ ಮೇಲೆ ಸಿಂಹಗಳ ನಾಲ್ಕು ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಶಿಖರವು ಹನ್ನೆರಡು ಕೋನಗಳ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದಲ್ಲಿದ್ದು ಹತ್ತು ಹಂತಗಳದ್ದಾಗಿದೆ. ಅದು ಮೇಲಕ್ಕೆ ಹೋದಂತೆ ಕಿರಿದಾಗುತ್ತಾ ಹೋಗಿದೆ. ಅದರ ಮೇಲಿನ ಆಮಲಕವು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ಲಂಬವಾದ ರೇಖೆಗಳ ಕೆತ್ತನೆ ಮತ್ತು ಮೇಲೆ ಕಲಶ ಹಾಗೂ ಧ್ವಜಪತಾಕೆ ಇವೆ.
ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನಿಂದ ಕಟ್ಟಿದ ಸಿಹಿನೀರಿನ ಬಾವಿಯಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ದತ್ತ ಮಂದಿರ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಫಾಲ್ಗುಣ ಶುದ್ಧ ಪಂಚಮಿಯಂದು ವಾರ್ಷಿಕ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದಿನ ದೇವರ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅನೇಕ ಗ್ರಾಮ ದೇವತೆಗಳ ಪಲ್ಲಕ್ಕಿಗಳು ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಹನುಮಂತನ ಭೇಟಿಗಾಗಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತವೆ. ಜಾತ್ರೆಗಾಗಿ ಸೇರಿದ ಲಕ್ಷಾಂತರ ಭಕ್ತರು ತಾವು ಬೇಡಿಕೊಂಡಿದ್ದ ತೆಂಗಿನಕಾಯಿಗಳನ್ನು ಎಸೆಯುತ್ತಾರೆ. ಈ ವಿಶಿಷ್ಟ ಸಂಪ್ರದಾಯದಿಂದಾಗಿ ಈ ಜಾತ್ರೆಯು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಎಸೆಯುವ ಜಾತ್ರೆ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಗಡಹಿಂಗ್ಲಜದಿಂದ ೭ ಕಿಮೀ, ಮತ್ತು ಕೊಲ್ಲಾಪುರದಿಂದ ೫೯ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಗಡಹಿಂಗ್ಲಜದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
স্বয়ম্ভূ হনুমান মন্দির
হনিমনাড়, তালুক: গড়হিংলজ, জেলা: কোলাপুর
হনুমানকে শক্তির দেবতা হিসেবে পূজা করা হয়। ‘আমার ভক্তদের যেন কষ্ট না দেওয়া হয়’ এমন বর হনুমান শনিদেবের কাছ থেকে লাভ করেছিলেন। সেই কারণে অশুভ নিবারণের জন্য হনুমানের উপাসনা করা হয়। হনুমান উপাসনার প্রচার ও প্রসার প্রকৃত অর্থে সমর্থ রামদাস স্বামীর সময়ে হয়েছিল। রামদাস স্বামী গ্রামে গ্রামে হনুমান মন্দির প্রতিষ্ঠা করেছিলেন। গড়হিংলজ তালুকস্থিত হনিমনাড় গ্রামে অবস্থিত হনুমান মন্দিরটি তার মধ্যে অন্যতম বলে কথিত আছে। ভক্তদের বিশ্বাস, মনোবাঞ্ছা পূরণকারী এই স্বয়ম্ভূ হনুমান পীড়া ও ব্যাধি দূর করেন। ফাল্গুন শুদ্ধ পঞ্চমীতে আয়োজিত দেবের যাত্রা ‘নারকেল ছড়ানোর যাত্রা’ হিসেবে পরিচিত।
এই মন্দিরের কিংবদন্তি হলো, প্রায় ৩৫০ বছর আগে হনিমনাড় গ্রামের এক কৃষকের দুগ্ধবতী গাভী হঠাৎ দুধ দেওয়া বন্ধ করে দেয়। তখন কৃষক কারণ অনুসন্ধান করতে গিয়ে জানতে পারেন যে, গাভীটি বনে চারণ করতে গিয়ে একটি নির্দিষ্ট স্থানে দুধ ফেলে দেয়। তখন রামদাস স্বামী গ্রামবাসীদের এই স্থানটি খনন করে দেখতে বলেন। সমর্থের পরামর্শ অনুযায়ী এই স্থানে খনন করলে মাটি থেকে হনুমানের স্বয়ম্ভূ পাষাণ মূর্তির আবির্ভাব ঘটে। মাটি খনন করার সময় শাবলের একটি আঘাত ভুলবশত পাষাণে লাগলে তা থেকে রক্ত প্রবাহিত হয়। তখন গ্রামের গুরু ক্ষমা প্রার্থনা করে প্রায়শ্চিত্ত হিসেবে নির্জলা উপবাস পালন করেন। উপবাসের তৃতীয় দিনে পাষাণ থেকে রক্তক্ষরণ বন্ধ হয়ে ক্ষত শুকিয়ে যায়। ভক্তদের এমন বিশ্বাস যে, এই হনুমানের উপবাস পালন করলে মানসিক ও শারীরিক পীড়া, ব্যাধি দূর হয়। গোয়ালিয়রের রাজপরিবারের এই মারুতি চরণে অগাধ ভক্তি ছিল। তারা মন্দিরের জন্য ধর্মশালা নির্মাণ করিয়ে দিয়েছিলেন।
মন্দির ও নগারখানার বৈশিষ্ট্যপূর্ণ নির্মাণশৈলীর কারণে হনুমান জয়ন্তীর দিন ভোরের সূর্যরশ্মি নগারখানা হয়ে সরাসরি গর্ভগৃহে অবস্থিত হনুমানের মূর্তির ওপর পড়ে।
প্রকৃতির এই অনন্য অলৌকিক দৃশ্য দেখার জন্য এই দিন মন্দিরে হাজার হাজার ভক্তের ভিড় হয়।
মন্দিরের দোতলা পাথরের প্রবেশদ্বারটি কোনো দুর্গের প্রবেশদ্বারের মতো মনে হয়। কালো পাথরের নির্মাণশৈলীর এই প্রবেশদ্বারের কারুকার্যময় দ্বারশাখাগুলো লাল বেলেপাথরের। প্রবেশদ্বারের ললাটবিম্বে গণেশমূর্তি এবং উভয় পাশে চক্র রয়েছে। প্রবেশদ্বারের উভয় পাশে স্তম্ভের মধ্যে দীপকক্ষ আছে। স্তম্ভের ওপর অর্ধবৃত্তাকার পাথরের খিলানে মাঝখানে পাথরে সিংহমুখ খোদাই করা আছে। খিলানের নিচে মাঝখানে মঙ্গলের প্রতীক হিসেবে কলাপুষ্পের ভাস্কর্য রয়েছে। খিলানের উভয় পাশে দেবকক্ষে অস্ত্রধারী দ্বারপাল রয়েছে। এই প্রবেশদ্বারের ওপরে নগারখানা আছে। নগারখানার উভয় পাশে ত্রিভুজাকৃতি দেওয়ালে সিংহমূর্তি রয়েছে। সিংহমূর্তির পাশে স্তম্ভের ওপর দুটি এবং নগারখানার ছাদের ওপর একটি, এভাবে তিনটি মেঘডম্বরি রয়েছে। এই প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রশস্ত প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়।
প্রধান মন্দিরের সামনে একটি বড় পাথরের বেদিতে পাঁচ স্তরের অষ্টকোণাকৃতি প্রাচীন দীপস্তম্ভ রয়েছে। দীপস্তম্ভের নিচের স্তরটি অধিক প্রশস্ত এবং তা ওপরের দিকে সরু হয়ে গেছে। সবচেয়ে ওপরের স্তরটি গোলাকার। এই দীপস্তম্ভের পাশ দিয়ে প্রবেশদ্বারের দ্বিতীয় তলায় অবস্থিত নগারখানায় যাওয়ার জন্য পাথরের সিঁড়ি রয়েছে। নগারখানায় সুরক্ষার জন্য রেলিং আছে। নগারখানায় দাঁড়িয়ে এই মন্দির চত্বর ও গ্রামের মনোরম দৃশ্য দেখা যায়। সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ—এই নিয়ে প্রধান মন্দিরের গঠন। খোলা প্রকৃতির সভামণ্ডপের দশটি চৌকো স্তম্ভ একে অপরের সাথে খিলান দ্বারা যুক্ত। সভামণ্ডপ থেকে এগিয়ে বন্ধ থাকা অন্তরালে প্রবেশ করা যায়। অন্তরালের মাঝখানে কূর্মমূর্তি রয়েছে।
গর্ভগৃহের প্রবেশদ্বার সোনালী ধাতব পাতে আচ্ছাদিত। এখানকার দ্বারশাখার ওপর দ্বারপাল ও লতাপাতার নকশা আছে। ললাটবিম্বে গণেশমূর্তি এবং মূর্তির উভয় পাশে গজরাজ রয়েছে। তার ওপরের অংশে চন্দ্র ও সূর্য প্রতিমা খোদাই করা আছে। গর্ভগৃহে স্বয়ম্ভূ হনুমানের সিন্দুরচর্চিত পাষাণমূর্তি রয়েছে। মন্দিরের ছাদে রেলিং আছে এবং তাতে বাইরের দিকে কক্ষের মতো গঠন রয়েছে। রেলিংয়ের ওপর সিংহের চারটি ভাস্কর্য আছে। মন্দিরের শিখর দ্বাদশকোণাকৃতি গম্বুজাকার এবং দশ স্তরের। তা ওপরের দিকে সরু হয়ে গেছে। তার ওপরের আমলকটি বৈশিষ্ট্যপূর্ণ। তার ওপর লম্বালম্বি নকশা এবং ওপরে কলস ও ধ্বজাপতাকা রয়েছে।
মন্দিরের প্রাঙ্গণে বাঁ দিকে সুবিন্যস্ত কালো পাথরে নির্মিত মিষ্টি জলের কূপ রয়েছে। প্রাঙ্গণে দত্ত মন্দির এবং অন্য দিকে মহাদেব মন্দির রয়েছে। মন্দিরে ফাল্গুন শুদ্ধ পঞ্চমী বার্ষিক যাত্রোৎসব হিসেবে বড় উৎসাহে পালন করা হয়। এই দিন দেবের পালকি শোভাযাত্রা সম্পন্ন হয়। এলাকার অনেক গ্রামদেবতার পালকি এসময় স্বয়ম্ভূ হনুমানের সাথে দেখা করতে এখানে আসে। যাত্রার জন্য সমবেত লক্ষ লক্ষ ভক্ত মানত করা নারকেল ছড়ান। এই অনন্য ঐতিহ্যের কারণে এই যাত্রা ‘নারকেল ছড়ানোর যাত্রা’ হিসেবে পরিচিত।
প্রয়োজনীয় তথ্য
- গড়হিংলজ থেকে ৭ কিমি, এবং কোলাপুর থেকে ৫৯ কিমি দূরত্বে
- গড়হিংলজ থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার সুবিধা নেই
ਸਵਯੰਭੂ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ
ਹਨਿਮਨਾਲ, ਤਹਿਸੀਲ ਗਡਹਿੰਗਲਜ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਕੋਲਹਾਪੁਰ
ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਨੂੰ ਸ਼ਕਤੀ ਦੇ ਦੇਵਤੇ ਵਜੋਂ ਪੂਜਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਨੇ ਸ਼ਨੀ ਦੇਵ ਤੋਂ ਇਹ ਵਰ ਪ੍ਰਾਪਤ ਕੀਤਾ ਸੀ ਕਿ ‘ਮੇਰੇ ਭਗਤਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਵੀ ਤੰਗ ਨਾ ਕੀਤਾ ਜਾਵੇ’। ਇਸੇ ਲਈ ਅਸ਼ੁਭ ਦੇ ਨਿਵਾਰਨ ਲਈ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਉਪਾਸਨਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਹਨੂੰਮਾਨ ਉਪਾਸਨਾ ਦਾ ਪ੍ਰਚਾਰ ਅਤੇ ਪ੍ਰਸਾਰ ਅਸਲ ਅਰਥਾਂ ਵਿੱਚ ਸਮਰੱਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੇ ਸਮੇਂ ਹੋਇਆ। ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਜੀ ਨੇ ਪਿੰਡ-ਪਿੰਡ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰਾਂ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ। ਗਡਹਿੰਗਲਜ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਹਨਿਮਨਾਲ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ ਨੂੰ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਹੀ ਇੱਕ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਸਵਯੰਭੂ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੇ ਅਤੇ ਦੁੱਖ-ਤਕਲੀਫਾਂ ਨੂੰ ਦੂਰ ਕਰਨ ਵਾਲੇ ਹਨ। ਫੱਗਣ ਸ਼ੁਕਲ ਪੰਚਮੀ ਨੂੰ ਭਰਨ ਵਾਲਾ ਦੇਵਤੇ ਦਾ ਮੇਲਾ ਨਾਰੀਅਲ ਦੀ ਵਰਖਾ ਵਾਲੇ ਮੇਲੇ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਲਗਭਗ ੩੫੦ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਹਨਿਮਨਾਲ ਪਿੰਡ ਦੇ ਇੱਕ ਕਿਸਾਨ ਦੀ ਦੁਧਾਰੂ ਗਾਂ ਨੇ ਅਚਾਨਕ ਦੁੱਧ ਦੇਣਾ ਬੰਦ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਜਦੋਂ ਕਿਸਾਨ ਨੇ ਕਾਰਨ ਲੱਭਿਆ ਤਾਂ ਉਸਨੂੰ ਪਤਾ ਲੱਗਿਆ ਕਿ ਗਾਂ ਜਦੋਂ ਜੰਗਲ ਵਿੱਚ ਚਰਨ ਜਾਂਦੀ ਹੈ ਤਾਂ ਇੱਕ ਖਾਸ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਦੁੱਧ ਡੋਲ੍ਹ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਤਦ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਜੀ ਨੇ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੂੰ ਇਸ ਜਗ੍ਹਾ ਦੀ ਖੁਦਾਈ ਕਰਨ ਲਈ ਕਿਹਾ। ਸਮਰੱਥ ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੀ ਸਲਾਹ ਅਨੁਸਾਰ ਜਦੋਂ ਇਸ ਜਗ੍ਹਾ ਦੀ ਖੁਦਾਈ ਕੀਤੀ ਗਈ ਤਾਂ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚੋਂ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਸਵਯੰਭੂ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਪ੍ਰਗਟ ਹੋਈ। ਜ਼ਮੀਨ ਖੋਦਦੇ ਸਮੇਂ ਗੈਤੀ ਦਾ ਇੱਕ ਵਾਰ ਗਲਤੀ ਨਾਲ ਪੱਥਰ ਨੂੰ ਲੱਗ ਗਿਆ, ਜਿਸ ਕਾਰਨ ਪੱਥਰ ਵਿੱਚੋਂ ਖੂਨ ਵਗਣ ਲੱਗ ਪਿਆ। ਤਦ ਪਿੰਡ ਦੇ ਪੁਜਾਰੀ ਨੇ ਮਾਫੀ ਮੰਗੀ ਅਤੇ ਪ੍ਰਾਸ਼ਚਿਤ ਵਜੋਂ ਨਿਰਜਲਾ ਵਰਤ ਰੱਖਿਆ। ਵਰਤ ਦੇ ਤੀਜੇ ਦਿਨ ਪੱਥਰ ਵਿੱਚੋਂ ਖੂਨ ਵਗਣਾ ਬੰਦ ਹੋ ਗਿਆ ਅਤੇ ਜ਼ਖ਼ਮ ਭਰ ਗਿਆ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦਾ ਵਰਤ ਰੱਖਣ ਨਾਲ ਮਾਨਸਿਕ ਅਤੇ ਸਰੀਰਕ ਪੀੜਾਵਾਂ ਅਤੇ ਬਿਮਾਰੀਆਂ ਖਤਮ ਹੋ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਗਵਾਲੀਅਰ ਦੇ ਰਾਜਘਰਾਣੇ ਦੀ ਇਸ ਮਾਰੂਤੀ ਚਰਨਾਂ ਵਿੱਚ ਅਥਾਹ ਸ਼ਰਧਾ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਮੰਦਰ ਲਈ ਧਰਮਸ਼ਾਲਾ ਬਣਵਾਈ ਸੀ।
ਮੰਦਰ ਅਤੇ ਨਗਾਰਖਾਨੇ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਉਸਾਰੀ ਸ਼ੈਲੀ ਕਾਰਨ ਹਨੂੰਮਾਨ ਜਯੰਤੀ ਦੇ ਦਿਨ ਸਵੇਰ ਦੀਆਂ ਕਿਰਨਾਂ ਨਗਾਰਖਾਨੇ ਰਾਹੀਂ ਸਿੱਧੀਆਂ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਪੈਂਦੀਆਂ ਹਨ।
ਕੁਦਰਤ ਦਾ ਇਹ ਅਨੋਖਾ ਚਮਤਕਾਰ ਦੇਖਣ ਲਈ ਇਸ ਦਿਨ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦਾ ਦੋ-ਮੰਜ਼ਲਾ ਪੱਥਰੀਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਕਿਸੇ ਕਿਲ੍ਹੇ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਵਰਗਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਵਾਲੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀਆਂ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਚੌਖਟਾਂ ਲਾਲ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਚੱਕਰ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਦੀਪਕ ਰੱਖਣ ਲਈ ਖਾਨੇ ਹਨ। ਥੰਮ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਅਰਧ-ਗੋਲਾਕਾਰ ਪੱਥਰੀਲੀ ਕਮਾਨ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਸ਼ੇਰ ਦਾ ਮੂੰਹ ਉੱਕਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਕਮਾਨ ਦੇ ਹੇਠਾਂ ਵਿਚਕਾਰ ਮੰਗਲ ਦਾ ਪ੍ਰਤੀਕ ਕੇਲੇ ਦੇ ਫੁੱਲ ਦੀ ਉਭਰੀ ਹੋਈ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਕਮਾਨ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦੇਵ-ਖਾਨਿਆਂ ਵਿੱਚ ਸ਼ਸਤਰਧਾਰੀ ਦਰਬਾਨ ਹਨ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰ ਨਗਾਰਖਾਨਾ ਹੈ। ਨਗਾਰਖਾਨੇ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਤਿਕੋਣੀ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਸ਼ੇਰ ਦੇ ਚਿੱਤਰ ਹਨ। ਸ਼ੇਰ ਦੇ ਚਿੱਤਰਾਂ ਦੇ ਪਾਸੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਦੋ ਅਤੇ ਨਗਾਰਖਾਨੇ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਇੱਕ, ਅਜਿਹੀਆਂ ਤਿੰਨ ਛਤਰੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਸ਼ਾਲ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਵੱਡੇ ਪੱਥਰੀਲੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਪੰਜ ਮੰਜ਼ਿਲੀ ਅੱਠਕੋਣੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਦੀਪਮਾਲਾ ਹੈ। ਦੀਪਮਾਲਾ ਦੀ ਹੇਠਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ਜ਼ਿਆਦਾ ਚੌੜੀ ਹੈ ਅਤੇ ਇਹ ਉੱਪਰ ਵੱਲ ਨੂੰ ਤੰਗ ਹੁੰਦੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਸਭ ਤੋਂ ਉੱਪਰਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ਗੋਲਾਕਾਰ ਹੈ। ਇਸ ਦੀਪਮਾਲਾ ਦੇ ਨਾਲ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਦੂਜੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਨਗਾਰਖਾਨੇ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਪੱਥਰੀਲੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਨਗਾਰਖਾਨੇ ਨੂੰ ਸੁਰੱਖਿਆ ਰੇਲਿੰਗ ਹੈ। ਨਗਾਰਖਾਨੇ ਵਿੱਚ ਖੜ੍ਹੇ ਹੋ ਕੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਅਤੇ ਪਿੰਡ ਦਾ ਨਜ਼ਾਰਾ ਦੇਖਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਦਸ ਚੌਰਸ ਥੰਮ੍ਹ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਕਮਾਨਾਂ ਰਾਹੀਂ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਤੋਂ ਅੱਗੇ ਬੰਦ ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਕੱਛੂ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਸੁਨਹਿਰੀ ਧਾਤੂ ਦੀ ਪਰਤ ਨਾਲ ਢੱਕਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਚੌਖਟਾਂ ‘ਤੇ ਦਰਬਾਨ ਅਤੇ ਫੁੱਲ-ਪੱਤੀਆਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਮੂਰਤੀ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਹਾਥੀ ਹਨ। ਉਸ ਤੋਂ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਚੰਦਰਮਾ ਅਤੇ ਸੂਰਜ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸਵਯੰਭੂ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਰੇਲਿੰਗ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਵਿੱਚ ਬਾਹਰੀ ਪਾਸੇ ਖਾਨੇ ਵਰਗੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਰੇਲਿੰਗ ‘ਤੇ ਸ਼ੇਰਾਂ ਦੀਆਂ ਚਾਰ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦਾ ਸਿਖਰ ਬਾਰਾਂ-ਕੋਣੀ ਗੁੰਬਦਦਾਰ ਅਤੇ ਦਸ ਮੰਜ਼ਿਲਾ ਹੈ। ਇਹ ਉੱਪਰ ਵੱਲ ਨੂੰ ਤੰਗ ਹੁੰਦਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਉੱਤੇ ਆਮਲਕ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਹੈ। ਉਸ ਉੱਤੇ ਖੜ੍ਹਵੀਆਂ ਧਾਰੀਆਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਉੱਪਰ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਝੰਡਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਘੜੇ ਹੋਏ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਬਣਿਆ ਤਾਜ਼ੇ ਪਾਣੀ ਦਾ ਖੂਹ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਮੰਦਰ ਅਤੇ ਦੂਜੇ ਪਾਸੇ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਫੱਗਣ ਸ਼ੁਕਲ ਪੰਚਮੀ ਦਾ ਸਾਲਾਨਾ ਮੇਲਾ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਦੇਵਤੇ ਦੀ ਪਾਲਕੀ ਯਾਤਰਾ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਲਾਕੇ ਦੇ ਕਈ ਗ੍ਰਾਮ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਪਾਲਕੀਆਂ ਇਸ ਸਮੇਂ ਸਵਯੰਭੂ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਇੱਥੇ ਆਉਂਦੀਆਂ ਹਨ। ਮੇਲੇ ਲਈ ਇਕੱਠੇ ਹੋਏ ਲੱਖਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਪਣੀਆਂ ਮੰਨੀਆਂ ਹੋਈਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਅਨੁਸਾਰ ਨਾਰੀਅਲ ਭੇਟ ਕਰਦੇ ਹਨ। ਇਸ ਅਨੋਖੀ ਪਰੰਪਰਾ ਕਾਰਨ ਇਹ ਮੇਲਾ ਨਾਰੀਅਲ ਦੀ ਵਰਖਾ ਵਾਲੇ ਮੇਲੇ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਗਡਹਿੰਗਲਜ ਤੋਂ ੭ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਕੋਲਹਾਪੁਰ ਤੋਂ ੫੯ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਗਡਹਿੰਗਲਜ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
-
आलमप्रभू मंदिर आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
अधिक माहितीAlam Prabhu Temple Alte, Tal. Hatkanangle, Dist. Kolhapur
View Detailsआलमप्रभु मंदिर, आळते, तहसील हातकणंगले, जिला कोल्हापुर
विवरण देखें -
नागनाथ मंदिर नरंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
अधिक माहितीNagnath Temple Narande, Hatkanangle, Dist. Kolhapur
View Detailsनागनाथ मंदिर नरंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
विवरण देखें -
बिनखांबी गणेश मंदिर कोल्हापूर शहर, ता. जि. कोल्हापूर
अधिक माहितीBinkhambi Ganesha Temple Kolhapur city, Dist. Kolhapur
View Detailsबिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापूर शहर, ता. जि. कोल्हापूर
विवरण देखें
