संत भोजाजी मंदिर

आजनसरा, ता. हिंगणघाट, जि. वर्धा 

वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे संत भोजाजी महाराज यांचे समाधी मंदिर हे विदर्भातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक महत्त्वाचे स्थान मानले हाते. महाराजांच्या या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी खासकरून प्रत्येक बुधवारी रविवारी विदर्भासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून ५०,००० हून जास्त भाविक येतात. याशिवाय नवसपूर्तीसाठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या बुधवारी रविवारी किमान ५०० ते १००० कुटुंबांकडून मंदिर परिसरात चुलीवर पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो देवाला नैवेद्य दाखविले जाते. पुरणपोळीच्या नैवेद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानाचा समावेशकेंद्रीय प्रसाद योजने झाला असून त्यामुळे पुढील काळात शेगाव, शिर्डी पंढरपूरप्रमाणे या तीर्थक्षेत्राचा विकास होणार आहे.

आजनसरा हे गाव नागपूरहैदराबाद महामार्गावरील वडनेरनजीक आहे. विठ्ठलाचे परमभक्त असलेले संत भोजाजी महाराज यांचे हे गाव. याच गावात भोजाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे. येथे राहणाऱ्या देवाजी महाराजांनी १९५५ पासून चैत्र द्वादशीला भोजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. आज ७० वर्षांनंतरही उत्सवाची ही परंपरा कायम आहे. या उत्सवाच्यावेळी सुमारे लाख भाविकांची येथे उपस्थिती असते. या समाधीस्थळी आजही भोजाजी महाराजांचे वास्तव्य आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. भोजाजी महाराजांची महती दिवसेंदिवस वाढत असल्याने येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येतही दररोज हजारोंनी वाढ होत आहे.

भोजाजी महाराज मंदिरात पुरणपोळीच्या नैवेद्याची परंपरा नेमकी कधी आणि कुणी सुरू केली, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी एका भक्ताच्या स्वप्नात भोजाजी महाराज आले आणि त्यांनी पुरणाच्या नैवेद्याचा दृष्टांत दिला, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासूनच याठिकाणी पुरणपोळीच्या नैवेद्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. त्यानुसार नवसपूर्तीनंतर येथे पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. प्रत्येक बुधवारी येथे साधारणतः ,००० किलो रविवारी ,००० किलो डाळीचे पुरण शिजविले जाते. येथील नोंदींनुसार प्रत्येक महिन्याला भाविकांकडून सुमारे ४५,००० ते ५०,००० किलो डाळीचे पुरण शिजविण्यात येते.

१० ते १२ वर्षांपूर्वी या मंदिर परिसरात फारशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे पुरणाची डाळ परंपरागत पद्धतीने म्हणजे पाटावरवंट्यावर वाटली जात असे; परंतु भक्तांची वाढती संख्या आणि पुरणाचे वाढलेले प्रमाण यामुळे देवस्थान समितीतर्फे येथे पुरण वाटण्याची आधुनिक यंत्रे लावली आहेतअत्यल्प शुल्क घेऊन भाविकांना यांतून पुरण वाटून घेता येते. हे पुरण शिजविण्यासाठी रविवारी आणि बुधवारी संपूर्ण विदर्भातून हजारो भाविक येथे येतात. या मंदिर परिसरात सध्या स्वयंपाकासाठी १० शेड बनविण्यात आल्या आहेत. त्यातील प्रत्येक शेडमध्ये १०० चुली पेटतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. एका दिवशी ,००० हून जास्त चुली पेटविण्याची येथे सोय असूनही भाविकांना यासाठी आधीच नोंदणी करून घ्यावी लागते. त्यासाठी प्रतीक्षा यादीही असते. याशिवाय दर बुधवारी रविवारी भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी पुरणाचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी हजारो भाविकांची मांदियाळी येथे उपस्थित असते.

आजनसरा येथील संत भोजाजी महाराजांचे समाधी स्थळ हे सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशा रचनेचे आहे. सभामंडपासमोर कमानीयुक्त प्रवेशद्वार आहे. त्यातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपातून भोजाजी महाराजांचे केवळ मुखदर्शन घेता येते. सभामंडपात राधाकृष्ण गणेश यांच्या मूर्ती आहेत. मंदिराला लागून मागच्या बाजूला बांधलेल्या मोठ्या दर्शन रांग मंडपातून भाविकांना मंदिराच्या गर्भगृहात जाण्याची सुविधा आहे. दर बुधवारी रविवारी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्यामुळे रांगेतून दर्शन घेण्यासाठी साधारणतः एक ते दीड तासांचा कालावधी लागतो. गर्भगृहात भोजाजी महाराज यांची मूर्ती त्यामागे घोड्याचे शिल्प आहे. या मंदिर परिसरात मजली भव्य प्रसादालयाची इमारत असून एकावेळी ,००० ते ,५०० भाविकांची पंगत येथे बसू शकते. बुधवारी रविवारी दिवसभर अशा पंगती सुरू असतात त्यात ५०,००० ते ६०,००० भाविक पुरणपोळीसह महाप्रसादाचे ग्रहण करतात.

महाराष्ट्र सरकारतर्फे या मंदिराला तीर्थक्षेत्राचादर्जा देण्यात आला होता; परंतु मंदिरावर असलेली लाखो भाविकांची श्रद्धा वाढत्या लोकप्रियतेमुळे २०२३ मध्ये या मंदिराचा समावेश केंद्रीय प्रसाद योजनेत झाला आहे. शेगाव, शिर्डी, पंढरपूरप्रमाणे विदर्भातील कोराडी येथील जगदंबा मंदिराचा या योजनेत याआधी समावेश झालेला आहे. प्रसाद योजना म्हणजे तीर्थक्षेत्र कायाकल्प आणि आध्यात्मिक संवर्धन ड्राईव्ह ही योजना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाद्वारे राबविण्यात येते. त्यातून देवस्थानाला थेट १०० कोटींचा निधी उपलब्ध होतो. त्यामुळे पुढील काळात या देवस्थानाच्या परिसरात उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मदत होणार आहे.

मंदिर परिसरात पूजासाहित्य विक्रीची स्थायी स्वरूपातील ५० हून अधिक दुकाने आहेत, तर प्रत्येक बुधवारी रविवारी येथे जत्रेचे स्वरूप आलेले असते. त्यावेळी या दुकानांची संख्या २५० ते ३०० इतकी असते. याशिवाय भोजाजी महाराज पुण्यतिथीलाही येथे यात्रोत्सव असतो. भोजाजी महाराज देवस्थानाच्या वतीने येथे आरोग्य केंद्र चालविले जाते. यामध्ये भाविकांना अल्प दरात आरोग्याची तपासणी उपचार करता येतात.

उपयुक्त माहिती:

  • हिंगणघाटपासून ३० किमी, तर वर्ध्यापासून ५० किमी अंतरावर
  • हिंगणघाटासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे

संत भोजाजी मंदिर

आजनसरा, तह. हिंगणघाट, जि. वर्धा

वर्धा जिले की हिंगणघाट तहसील के आजनसरा में स्थित संत भोजाजी महाराज का समाधि मंदिर विदर्भ के प्रमुख धार्मिक स्थलों में से एक है। इस समाधि स्थल पर विशेष रूप से प्रत्येक बुधवार और रविवार को विदर्भ सहित संपूर्ण राज्य से 50,000 से अधिक श्रद्धालु दर्शन हेतु आते हैं। मनोकामना पूर्ति के लिए निरंतर बुधवार और रविवार को कम से कम 500–1000 परिवार मंदिर परिसर में चूल्हे पर पूरनपोली बनाकर देवता को भोग अर्पित करते हैं। पूरनपोली के लिए प्रसिद्ध इस तीर्थस्थल को ‘केंद्रीय प्रसाद योजना’ में शामिल किया गया है। इससे भविष्य में यह तीर्थक्षेत्र शेगाँव, शिर्डी और पंढरपुर की भाँति विकसित होने की संभावना है।

आजनसरा गाँव नागपुर-हैदराबाद राजमार्ग पर वडनेर के पास स्थित है। यह विठ्ठल के परमभक्त संत भोजाजी महाराज का निवास स्थान है। भोजाजी महाराज समाधि स्थल पर उत्सव का आयोजन वर्ष 1955 से चैत्र द्वादशी को किया जा रहा है। 70 वर्षों के पश्चात भी यह परंपरा निरंतर जारी है। इस अवसर पर लगभग 2 लाख श्रद्धालुगण उपस्थित होते हैं। श्रद्धालुओं की श्रद्धा के अनुसार, महाराज आज भी इस समाधि स्थल पर विराजमान हैं।

भोजाजी महाराज मंदिर में पूरनपोली की परंपरा के संबंध में कहा जाता है कि एक भक्त के स्वप्न में महाराज आए। उन्होंने पूरन का भोग बनाने का निर्देश दिया। तभी से यह परंपरा शुरू हुई। मनोकामना पूर्ण होने पर यहाँ पूरनपोली का भोग लगाया जाता है। प्रत्येक बुधवार को लगभग 5,000 किलो और रविवार को 7,000 किलो दाल का पूरन पकाया जाता है। मासिक आंकड़ों के अनुसार प्रत्येक माह श्रद्धालुओं द्वारा लगभग 45,000–50,000 किलो दाल का पूरन बनाया जाता है।

लगभग 10–12 वर्ष पूर्व मंदिर परिसर में सुविधाएँ कम थीं। तब पूरन दाल पारंपरिक पद्धति से अर्थात सिलबट्टे पर पीसी जाती थी। श्रद्धालुओं की बढ़ती संख्या और दाल की मात्रा को देखते हुए तीर्थस्थल समिति ने आधुनिक यंत्र स्थापित किए हैं। न्यूनतम शुल्क लेकर श्रद्धालु पूरन प्राप्त कर सकते हैं। इस कार्य हेतु बुधवार और रविवार को पूरे विदर्भ से हजारों श्रद्धालु आते हैं। वर्तमान में परिसर में 10 शेड हैं। प्रत्येक शेड में 100 चूल्हे जलाए जा सकते हैं। एक दिन में 1,000 से अधिक चूल्हे जलते हैं। इसके लिए श्रद्धालुओं को पूर्व पंजीकरण कराना पड़ता है। यहाँ प्रतीक्षा सूची भी बनाई जाती है।

आजनसरा स्थित संत भोजाजी महाराज समाधि स्थल का निर्माण सभामंडप, अंतराल और गर्भगृह की संरचना में किया गया है। सभामंडप के सम्मुख मेहराबदार प्रवेशद्वार है। इसी से श्रद्धालु सभामंडप में प्रवेश करते हैं। सभामंडप से केवल महाराज का मुखदर्शन संभव है। इसमें राधा-कृष्ण और गणेश की पाषाण मूर्तियाँ हैं। मंदिर के पीछे बने विशाल दर्शनमंडप से गर्भगृह तक जाने की सुविधा है।

बुधवार और रविवार को भारी भीड़ के कारण दर्शन में लगभग 1–1.5 घंटे का समय लगता है। गर्भगृह में भोजाजी महाराज की पाषाण प्रतिमा और पीछे घोड़े का शिल्प है।

मंदिर परिसर में 4 मंजिला भव्य प्रसादालय है। इसमें एक बार में 1,000–1,500 श्रद्धालु बैठ सकते हैं। बुधवार और रविवार को यहाँ 50,000–60,000 श्रद्धालु पूरनपोली सहित महाप्रसाद ग्रहण करते हैं।

महाराष्ट्र सरकार ने इस मंदिर को तीर्थक्षेत्र की ‘क’ श्रेणी में सम्मिलित किया है। वर्ष 2023 में बढ़ती श्रद्धा और लोकप्रियता के कारण इसे केंद्रीय प्रसाद योजना में शामिल किया गया। इससे तीर्थस्थल को सीधे 100 करोड़ रुपए की निधि मिलेगी। परिसर में उच्च स्तरीय आधारभूत सुविधाएँ विकसित की जाएँगी।

मंदिर परिसर में पूजा-सामग्री की स्थायी रूप से 50 से अधिक दुकानें हैं। बुधवार और रविवार को यहाँ मेले का स्वरूप होता है।

तब दुकानों की संख्या 250–300 तक पहुँच जाती है। भोजाजी महाराज की पुण्यतिथि पर भी मेला आयोजित होता है। मंदिर समिति द्वारा स्वास्थ्य केंद्र संचालित किया जाता है। यहाँ श्रद्धालु कम शुल्क पर स्वास्थ्य जाँच और उपचार करवा सकते हैं।

प्रमुख विशेषताएँ

  • हिंगणघाट से 30 किमी और वर्धा से 50 किमी की दूरी पर।
  • हिंगणघाट से राज्य परिवहन बस (एस.टी.) की सुविधा।
  • निजी वाहन मंदिर के वाहनतल तक जा सकते हैं।
  • परिसर में निवास और जलपान की सुविधा उपलब्ध है।
Back To Home