संगमेश्वर महादेव मंदिर

कार्तिक स्वामी मंदिर

प्रकाशा, ता. शहादा, जि. नंदुरबार

विविध नद्यांच्या संगमावर वसलेली शिवमंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. संगमाच्या ठिकाणी दोन किंवा अधिक नद्यांचे पाणी एकत्र येत असल्याने त्यातील औषधी तत्वे वाढतात, तसेच पाण्याची पुनरुज्जीत शक्ती वाढते, अशी मान्यता आहे. याच पंक्तीतील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी, गोमती गुप्त पुलंदा या नद्यांच्या संगमावरील संगमेश्वर शिवमंदिर वर्षातून फक्त एकदाच उघडले जाणारे कार्तिक स्वामी मंदिर प्रसिद्ध आहेत. ‘दक्षिण काशीम्हणून परिचित असलेल्या या गावी विविध मंदिरांत १०७ शिवलिंगे स्थापन आहेत

प्रकाशा या गावी झालेल्या पुरातत्वीय उत्खननात येथे सुमारे ४५०० वर्षापूर्वीच्या ताम्रपाषाणयुगीन वस्तू सापडल्या आहेत. मानवी इतिहासातील सुरुवातीचे कृषीकर्म प्रयोग या ठिकाणी झाल्याचे सांगितले जाते. तथापी येथील हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मंदिरे सुमारे तेराव्या ते चौदाव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. यापैकी बऱ्याच मंदिरांचा जीर्णोद्धार काही मंदिरांची स्थापना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केली आहे.

नदीच्या विस्तीर्ण घाटावर संगमेश्वर मंदिर आहे. या घाटावर भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था आहे. या मंदिराभोवती आवारभिंत आहे. भिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. आवारभिंतीवर आतील बाजूला विविध देवदेवता ऋषीमुनींची चित्रे रंगवलेली आहेत. प्रांगणात पायऱ्या असलेल्या उंच चौथऱ्यावर मेघडंबरी आहे. त्यात मारुतीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. त्यासमोर शिवपिंडी नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. याशिवाय प्रांगणात सद्‌गुरू बापूजी भंडारी त्यांचे गुरु सिद्धयोगी यांच्या तसबिरी पादुका असलेले लहान मंदिर आहे. मंदिराच्या छतावर उभे नक्षीदार शिखर त्यावर कळस आहे. असे सांगितले जाते की आपल्या शिष्याला दर्शन दिल्यानंतर सद्‌गुरू सिद्धयोगी येथे अंतर्धान पावले होते.

सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर सुमारे चार फूट उंच पितळी त्रिशूल डमरू आहे. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभपाद कणी चौकोनी आणि त्यावर पानफुलांच्या नक्षी आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना कमानीने जोडलेले आहेत. सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. सभामंडपात डाव्या बाजूला गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीतील देवकोष्टकात गणपतीची संगमरवरी मूर्ती त्याखाली भिंतीस लागून असलेल्या चौथऱ्यावर गणपतीची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती आहे. गर्भगृहाच्या चारही द्वारशाखांवर वेलबुट्टी पुष्पलता नक्षी आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती, द्वारावरील तोरणपट्टीवर मध्यभागी महादेव, दोन्ही बाजूस दोन गजराज त्यावर दोन शुक अशी उठावशैलीतील शिल्पे आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. मंदिराच्या छतावर चहुबाजूंनी सुरक्षा कठडा गर्भगृहावर घुमटाकार शिखर आहे.

मंदिरासमोरील घाटावर दर रविवारी तापी मातेची आरती करण्यात येते. त्यासाठी घाटावर विद्युत रोषणाईची व्यवस्था, आरतीचे मंच मंडप आहेत. येथून नावेतून त्रिवेणी संगमावर जाण्याची सशुल्क सुविधा उपलब्ध आहे. येथे बारा वर्षातून एकदा सिंहस्थात भरणारी यात्रा विशेष प्रसिद्ध आहे. त्यावेळी संपूर्ण देशभरातून लाखो भाविक, साधू संन्यासी येथे दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीला श्रावणातील सर्व सोमवारी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात

संगमेश्वर मंदिरापासून जवळच कार्तिक स्वामी मंदिर आहे. या मंदिरासमोर पत्र्याचे छत असलेला मोठा मंडप आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या तिन्ही द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी मागील भिंतीलगत वज्रपिठावर गणेश कार्तिकस्वामी यांच्या एकाच पाषाणात घडवलेल्या मूर्ती आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या गर्भगृहात हवा येण्यासाठी गवाक्ष आहेत. मंदिराच्या छतावर घुमटाकार शिखर, त्यावर आमलक, कळस ध्वजपताका आहे. घुमटाकार शिखराच्या चारही बाजूला चार लघुशिखरे त्यावर कळस आहेत

कार्तिक स्वामी मंदिर वर्षातून केवळ एकदाच कार्तिक मासातील पौर्णिमेस उघडले जाते. त्यामुळे या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याकरिता भाविकांची येथे मोठी गर्दी होते. यावेळी भाविक आपल्यासोबत दोन मोरपीसे घेऊन येतात. त्यातील एक देवाला वाहून दुसरे देवाला स्पर्श केलेले मोरपिस घरातील देव्हाऱ्यात ठेवतात. त्यामुळे कार्तिक स्वामींचा आपल्या घरात वास राहतो, अशी श्रद्धा आहे. कार्तिक स्वामी मंदिराच्या शेजारी प्राचीन गणेश मंदिरही आहे

उपयुक्त माहिती

  • शहादा येथून १५ किमी, तर नंदूरबारपासून २१ किमी अंतरावर
  • शहादा, नंदूरबार येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८२२२९९७७४
Back To Home