सागरेश्वर मंदिर

वाघेश्वरवाडी-उभादांडा, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

पद्मभूषण महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविलेले कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे जन्मगाव देशातील पहिलेकवितांचे गावम्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभादांडा या गावाची ओळख आहे. याशिवाय येथील समुद्र किनाऱ्यावर असलेले प्राचीन सागरेश्वर मंदिर भाविकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की येथील शिवलिंगाचे स्थान हे स्वयंभू आहे. स्वयंभूलिंग किंवा स्वयंभुवलिंग हे सर्वांत पवित्र मानले जाते. कारण ते निसर्गतः उत्पन्न झालेले असते अनादी काळापासून ते अस्तित्वात असते. येथील स्वयंभू शिवलिंग रुजीव पाषाणाचे म्हणजे भूमीत एकजीव व्हावे, अशा पद्धतीने रुजलेल्या, एकजीव झालेल्या पाषाणाचे आहे

मंदिराची आख्यायिका अशी की या मंदिरात सध्या पुजारी असलेल्या सांड्ये घराण्यातील एका सत्पुरुषाला समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत हे शिवलिंग दिसले. या शिवलिंगाचा केवळ मधलाच भाग दिसत होता. त्यासाठी येथे ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी खोदकाम सुरू केले; परंतु कितीही खोदले तरी या शिवलिंगाचा शेवट सापडत नव्हता. शिवलिंगाच्या बाजूला असलेली शाळुंकाही येथे नव्हती. ही माहिती जेव्हा सावंतवाडी संस्थानिकांपर्यंत गेली तेव्हा त्यांनी या मंदिरासाठी येथे जागा उपलब्ध करून दिली मंदिराचे बांधकाम केले. या मंदिराच्या देखभालीची पूजाविधीची जबाबदारी त्यांनी सांड्ये कुटुंबीयांकडे दिली. हे मंदिर बांधताना मूळ शिवलिंगाच्या भोवताली शाळुंका बांधण्यात आली. समुद्रकिनाऱ्याजवळ असल्याने सागरेश्वर असे या मंदिराचे नामकरण झाले. या मंदिराच्या नावावरून येथील किनाराही सागरेश्वर नावाने प्रसिद्ध आहे

वेंगुर्लाशिरोडा मार्गावर उभादांडा येथील वाघेश्वरवाडीनजीक समुद्रकिनाऱ्यावर सागरेश्वर मंदिर स्थित आहे. दगडी बांधकामात असलेले कौलारू रचनेचे हे मंदिर किनाऱ्यावरील सुरूच्या बनात आहे. रस्त्यापासून पाच ते सहा फूट खाली असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात उतरण्यासाठी प्रवेशद्वारापासून दहा पायऱ्या आहेत. मंदिराच्या चारही बाजूने तटबंदी आहे. असे सांगितले जाते की मंदिर बांधताना ते जमिनीला समांतर होते; परंतु किनाऱ्यावरून उडणाऱ्या वाळूमुळे या परिसरात वाळूची टेकडी तयार झाली मंदिर जमिनीच्या पातळीपासून खाली गेले. प्रवेशद्वारातून पायऱ्या उतरून प्रांगणात गेल्यावर मंदिरासमोर औदुंबराचे झाड दिसते. या झाडाभोवती मोठा पार बांधण्यात आलेला आहे. या पाराच्या एका बाजूला चौथऱ्यावर दीपस्तंभ दुसरीकडे तुळशी वृंदावन आहे

सभामंडप गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिराच्या आयताकृती सभामंडपात दगडी स्तंभांच्या दोन रांगा आहेत. कवेत बसतील अशा रुंदीचे हे नक्षीकाम केलेले गोलाकार स्तंभ आहेत. कोकणी स्थापत्य शैलीप्रमाणे सभामंडपाच्या जमिनीचा या दोन स्तंभांच्या रांगेमधील भाग खोलगट आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत त्यावरील भागात दगडी कोरीव गवाक्ष आहेत. सभामंडपाच्या पुढील भागात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या समोर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे.

येथील गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या उजवीकडील देवकोष्ठकात गणपतीची डावीकडे भगवती देवी यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील ललाटबिंबस्थानी गणेशाची प्रतिमा दोन्ही बाजूला स्वस्तिक ओम अशी मंगल प्रतिके आहेत. त्यावर तुलनेने मोठ्या आकाराचे कीर्तिमुख आहे. या गर्भगृहाच्या वर घुमटाकृती कळस आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी काळ्या पाषाणातील स्वयंभू शिवलिंग त्याबाजूला असलेल्या एका पाषाणावर पादुका कोरलेल्या आहेत. या गर्भगृहात सोवळ्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. गर्भगृहाच्या भिंतीत एका बाजूला या मंदिराचा इतिहास सांगणारा, देवनागरी लिपीत कोरलेला एक शिलालेख आहे. त्यावरील मजकुरात शके १७७७ म्हणजेच .. १८८५ साली सांड्ये नावाच्या एका ब्राह्मणास या किनाऱ्यावरील वाळूत रुतलेले शिवलिंग सापडले, असा उल्लेख आहे

या मंदिरात सगळ्या प्रकारची श्राद्ध केली जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी आणि श्रावणी सोमवारी भाविकांची येथे मोठी गर्दी असते. दर तीन वर्षांनी महोदयपर्व असते. त्या पर्वात पौष अमावस्येला परिसरातील अनेक गावांतून देवदेवता तरंगदेवता या सागरेश्वर किनारी आणल्या जातात. या उत्सवासाठी अनेक गावांतून हजारो भाविक येथे उपस्थित असतात. दररोज सकाळी ते दुपारी दुपारी .३० ते रात्री वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरातील सागरेश्वराचे दर्शन घेता येते. मंदिराजवळ सागरेश्वर समुद्रकिनारा आहे. कोकणातील स्वच्छ आणि सुंदर किनाऱ्यांपैकी तो एक आहे.

सागरेश्वर मंदिर सागरेश्वर किनारा याशिवाय उभादांडा हे देशातील पहिलेकवितांचे गावम्हणून प्रसिद्ध आहे. उभादांडा येथील सागरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर सुरूच्या वनात कवितांसाठी मोठे दालन उभारण्यात आलेले आहे. या दालनाच्या भिंतीवर मंगेश पाडगावकर यांच्या गाजलेल्या कविता लिहिण्यात आलेल्या आहेत. याशिवाय येथे ७०० कवितांची पुस्तकेही ठेवण्यात आली आहेत. पर्यटकांना येथील समुद्रकिनाऱ्यासोबतच या कवितांच्या दालनालाही भेट देता येते

उपयुक्त माहिती

  • कुडाळपासून २५ किमी, तर सावंतवाडीपासून २१ किमी अंतरावर
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शहरांतून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : पुजारी, दू. ०२३६६ २६२७३५
Back To Home