रेवणसिध्द मंदिर

मूळस्थान, ता. खानापूर, जि. सांगली

नाथ संप्रदायाच्या नवनाथांनी ८४ सिद्धांनी भारतभ्रमण करीत आपल्या पंथविचारांचा प्रचार प्रसार केला. हे करीत असताना ते ज्याज्या ठिकाणी थांबले त्यात्या ठिकाणी त्यांनी मंदिरे मठ उभारून त्या ठिकाणाला संप्रदायाच्या प्रसाराचे केंद्र बनवले. यामुळेच नाथ संप्रदायाची काही मंदिरे एकमेकांपासून जवळ उभी असलेली दिसतात. रेवणसिद्धांचे मूळस्थान येथील मंदिर असेच, रेणावी येथील रेवणसिद्ध मंदिरापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिरातील रेवणसिद्धनाथांची शक्ती आजही भाविकांच्या रक्षणासाठी हाकेला धावून येते, अशी मान्यता आहे.

वामाचारी तंत्रसाधनांविरुद्ध आंदोलन उभे करून भारतीय साधनेचे शुद्धीकरण करणाऱ्या गोरक्षनाथांचाकिमयागारहा ग्रंथ आहे. या ग्रंथावरून धुंडीसूत मालू या कवीने रचलेल्यानवनाथ भक्तिसारग्रंथानुसार नवनाथ हे नवनारायणांचे अवतार आहेत. यातील आठवे नाथ म्हणजे रेवणसिद्धनाथ. ते चमसनारायणांचे अवतार असल्याचे या ग्रंथात म्हटले आहे. लिंगायत शैवांच्या काडसिद्धेश्वर परंपरेनुसार, रेवणसिद्धनाथ हे काडसिद्धेश्वर परंपरेचे संस्थापक आणि पहिले काडसिद्धेश्वर मानले जातात. कोल्हापूरमधील कणेरी येथील मठाची स्थापना त्यांनीच केल्याचे सांगितले जाते. गोरक्षनाथांचा काळ .. १०५० ते ११५० हा आहे. रेवणसिद्धनाथ हे गोरक्षनाथांचे समकालिन असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. ते सहनसारूक नावाच्या शेतकऱ्यास रेवानदीच्या तीरावर सापडले म्हणून त्यांचे नाव रेवण असे ठेवले असेनवनाथ भक्तिसारा म्हटले आहे.

या ग्रंथाच्या ३६व्या अध्यायात येथील स्थानाशी संबंधित कथा देण्यात आली आहे. ती अशी की रेवणनाथ भारतभ्रमण करीत असता, ‘विठग्राम माणदेशीआले. तेथील एका ब्राह्मणाच्या घरी मुलाच्या बारश्याचा कार्यक्रम होता. त्याच वेळी रेवणनाथ तेथेअलख निरंजनम्हणत भिक्षा मागण्यास गेले. त्या ब्राह्मणाने त्यांची उत्तम सेवा केली त्यांना आपल्या घरी मुक्कामी ठेवून घेतले. त्याच रात्री त्या ब्राह्मणाच्या नवजात बालकाचा मृत्यू झाला. आपल्या उपस्थितीत बाळाचा मृत्यू झाल्याचे पाहून रेवणनाथ प्रक्षुब्ध झाले. तेव्हा, ‘माझ्या हीन प्रारब्धात सात मुलांचा मृत्यू पाहणे लिहिले असल्याने असे झाले. त्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेऊ नका,’ असे तो ब्राह्मण म्हणाला. परंतु, त्याचा शोक पाहून रेवणनाथ हे आपल्या जवळील दिव्य शक्तीने यमलोकी पोहोचले ब्राह्मणाच्या सात मुलांचे प्राण परत करावे, असे त्यांनी यमाला सांगितले. त्या ब्राह्मण पुत्रांचे प्राण कैलासावर आहेत, असे यमाने सांगितले. तेव्हा रेवणनाथांनी कैलासावर जाऊन महादेवाकडून त्या मुलांचे प्राण परत मिळवले. नंतर ते या ठिकाणी परतले. यातील सातवा मुलगा हा पुढे गहिनीनाथ म्हणून प्रसिद्धीस पावला. या घटनेनंतर रेवणनाथ हेविटे प्रांतीं। अद्यापपर्यंत नांदतसे’, असेनवनाथ भक्तिसारा म्हटले आहे. हा चमत्कारिक प्रसंग याच भागात घडल्याने मूळस्थान येथील मंदिरास विशेष महत्त्व आहे. रेवणसिध्दनाथ या भागात आले तेव्हा प्रथम ते या ठिकाणी राहिले म्हणून या स्थानास मूळस्थान म्हटले जाते

हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर सुमारे सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिराला दहा ते बारा फूट उंच भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीत पूर्व, पश्चिम उत्तर दिशेला प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस स्तंभ त्यात दीपकोष्टके आहेत. पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या आतील दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष येथूनच वरील नगारखान्याकडे जाण्यासाठी जीना आहे. नगारखान्यात दोन्ही बाजूस प्रत्येकी चार स्तंभ कमानी आणि त्यावर गजपृष्ठ आकारातील छत आहे. पश्चिम दिशेच्या प्रवेशद्वारावर कमानीच्या वर कमळफुलांची नक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष येथून तटबंदीवर जाण्यासाठी जीना आहे

उत्तराभिमुख मंदिरासमोरील प्रवेशद्वारासमोर दीपमाळ काही समाध्या आहेत. प्रवेशद्वाच्या दोन्ही बाजूस स्तंभांवर दंडधारी द्वारपाल शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या छतावर बाशिंगी कठडा आहे. पुढे तिनही बाजूने प्रवेशद्वार असलेला सभामंडप आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी पाच नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. चौकोनी स्तंभपादावर उभे असलेले सर्व स्तंभ एकमेकांना चंद्रकोर कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडप फरशी अच्छादित आहे आणि येथील जमिनीवर कूर्मशिल्प त्यापुढे चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या नंदीपुढे आणखी एक नंदीची प्राचीन मूर्ती आहे. सभामंडपात अंतराळाच्या दर्शनी भिंतीतील डाव्या बाजूच्या देवकोष्टकात ढालतलवार धारण केलेली स्थानिक रक्षक देवतेची मूर्ती उजव्या देवकोष्टकात मारुतीची मूर्ती आहे

पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. त्याच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहेत. ललाटबिंबस्थानी गणपती मंडारकावर कीर्तिमुख शिल्प आहे. अंतराळात चार नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभ तळाशी चौकोनी वरील बाजूस गोलाकार, अष्टकोनी, षटकोनी अशा विविध भौमितिक आकारात आहेत. अंतराळातील जमीन फरशी आच्छादित आहे. तेथे मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदी आहे. डाव्या बाजूला भिंतीवर गणपतीची उठावशैलीतील मूर्ती आहे. उजव्या बाजूला पार्वतीचा एक रेवणसिद्धांचे सहा चांदीचे मुखवटे आहेत. यातील दोन मुखवटे पालखी उत्सवाच्या वेळी वापरले जातात. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर मेजावर रेवणसिद्धांच्या चांदीच्या पादुका आहेत

पुढे गर्भगृहाचे पाच द्वारशाखा असलेले प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर पर्ण पुष्पलता, कमळ पुष्पलता उभ्या धारेची नक्षी आहे. ललाटबिंबावर गणपती मंडारकास चंद्रशिला आहे. गर्भगृहात मध्यभागी स्वयंभू पाषाण आहे. रेवणसिद्धांची मूर्ती म्हणून या पाषाणाची पूजा केली जाते. पाषाणाजवळ रेवणसिद्धांचे चांदीचे मुखवटे, दत्तात्रेयांचा मुखवटा, धातूचे पाय, अश्व मूर्ती, कौल लावण्याचे गोल पाषाण, नंदीची मूर्ती त्रिशूल आहे. बंदिस्त स्वरूपाच्या अंतराळात गर्भगृहात हवा येण्यासाठी गवाक्षे आहेत. मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी बाशिंगी कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे अष्टकोनी शिखर आहे. त्यातील प्रत्येक थरात आठ देवकोष्टके त्यात देवप्रतिमा आहेत. शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक, त्यावर कळस ध्वजपताका आहे. मंदिराच्या बाह्य बाजूला गर्भगृहाच्या भिंतीस लागून चार स्तंभ त्यावर छत असलेली मेघडंबरी आहे. या मेघडंबरीत शिवपिंडी समोर नंदी आहे

प्रांगणात तटबंदीला लागून स्तंभ त्यावर कमानी अशा स्वरूपाच्या ओवऱ्या आहेत. त्यांचा वापर धर्मशाळा म्हणून केला जातो. मंदिराच्या मागे चार स्तंभ, त्यावरील छतावर शिखर कळस असलेल्या मेघडंबरीत नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. प्रांगणात एका चौथऱ्यावर नवग्रहांच्या मूर्ती दुसऱ्यावर शिवपिंडी आणि नंदी आहे. याशिवाय प्रांगणात आणखी एक नंदी शिवपिंडी आणि त्याशेजारी कौल लावण्याचे तीन गोलाकार दगड आहेत. मंदिरातील तटबंदीला लागून असलेल्या ओवऱ्यांमध्ये साठवणकक्ष, पालखीकक्ष आदी कक्ष आहेत. मंदिराजवळ भक्तनिवासाची सर्व सोयींनी युक्त आधुनिक इमारत आहे

महाशिवरात्र श्रावणातील पहिला सोमवार हे या मंदिरातील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात. यावेळी होणारीभाकणूकम्हणजेच वर्षभराच्या हवामानाचा पिकपाण्याचा अंदाज ऐकण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांची मोठी गर्दी होते. मंदिरात विजयादशमीस देवाचा पालखी सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. या दिवशी देव पालखीत बसून विटा येथील रेवणसिद्ध मंदिरात जातात. त्यावेळी ही पालखी तेथील मंदिरातील पालखी अशा दोन पालख्या एकत्र नाचवल्या जातात. मंदिरात सोमवारी, गुरूवारी दर अमावस्येला रेवणसिद्धांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते

उपयुक्त माहिती

  • खानापूरपासून १६ किमी, तर सांगलीपासून ६० किमी अंतरावर
  • खानापूर सांगली येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा
Back To Home