पोद्दारेश्वर राम मंदिर

शनिचरा, नागपूर शहर, ता. जि. नागपूर

नागपूर शहरातील शनिचरा परिसरात पोद्दारेश्वर राम मंदिराची भव्य वास्तू आहे. या मंदिरात श्रीराम, सीता लक्ष्मण यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना १०० वर्षांपूर्वी म्हणजे १९२३ साली फाल्गुन शुद्ध द्वादशीला झाली. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी या कालावधीतश्रीरामांचा नवरात्र उत्सवसाजरा केला जातो. श्रीराम जन्मोत्सवानिमित्ताने होणारा हा उत्सव आणि या मंदिरातून निघणारी शोभायात्रा नागपूरसह संपूर्ण विदर्भाचे आकर्षण असून लाखो भाविक यामध्ये सहभागी होतात.

रेल्वेस्थानकाला लागून रामझुल्याजवळ असलेले पोद्दारेश्वर राम मंदिर शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. रामभक्त आणि समाजसेवक जमनाधर पोद्दार यांनी १०० वर्षांपूर्वी स्वखर्चाने या मंदिराचे बांधकाम केले होते. मंदिराच्या निर्मितीसाठी लालकाळ्या रंगाच्या दगडांचा वापर करण्यात आला असून हे दगड नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथून आणले होते, अशी नोंद आहे. असे सांगितले जाते की येथील मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी त्यावेळी काशीवरून पंडित प्रभूदत्त पौरोहित्य करण्यासाठी आले होते. हे रामाचे मंदिर पोद्दार परिवाराने बांधले म्हणून त्यास पोद्दारेश्वर राम मंदिर, असे ओळखले जाऊ लागले. विदर्भातील महत्त्वाच्या प्राचीन देवस्थानांमध्ये या मंदिराचा समावेश होतो.

जमिनीपासून काहीसे उंचावर असलेल्या या मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप गाभारा अशी आहे. ते पायऱ्या चढून मुखमंडपात प्रवेश होतो. तेथे पायऱ्यांवर दोन्ही बाजूला सिंहांचे शिल्प आहेत. कमानीवजा मुखमंडपातून सभामंडपात प्रवेश केल्यानंतर समोरच गाभाऱ्यातील चांदीच्या मखरात प्रतिष्ठापित असलेल्या उत्तराभिमुख श्रीराम, लक्ष्मण सीता यांच्या शुभ्र संगमरवरी मूर्ती दिसतात. त्यांना विविध अलंकार वस्त्रे परिधान केल्यामुळे त्या खुलून दिसतात. सभामंडपाच्या उजवीकडे असलेल्या पूर्वाभिमुख शिवमंदिरात नर्मदेश्वर शिवलिंगासह कार्तिक, गणेश, शेषनाग पार्वती यांच्या मूर्ती आहेत. दक्षिण पूर्व यामधील कोपऱ्यात मारुतीची मूर्ती आहे. सहा खिडक्यांमध्ये विष्णूलक्ष्मी, महालक्ष्मी, हनुमान, गरुड, सुग्रीव गंगा माता यांच्या मूर्ती आहेत.

रामनवमीला या मंदिरातून निघणारी शोभायात्रा हा येथील मोठा उत्सव असतो. सुमारे ५० वर्षांपूर्वी या शोभायात्रेस प्रारंभ झाला. महाराष्ट्रातील मोठ्या शोभायात्रांमध्ये ही मिरवणूक प्रसिद्ध आहे. त्यासाठी रामजन्मोत्सवाच्या महिने आधीपासून तयारी सुरू होते. शोभायात्रेत श्रीराम, सीता लक्ष्मण यांच्या मूर्ती आणि विविध धार्मिक पौराणिक कथांवर आधारित असे ५० हून अधिक चित्ररथ सहभागी होतात. त्यामध्ये राम शक्ती दर्शन, विठ्ठलरुक्मिणी दर्शन, महादेवांचे हलाहल प्राशन, तिरुपती बालाजी दर्शन, पंचमुखी गायत्री वेदमाला, नृसिंह अवतार, संकटमोचन हनुमान आदींचा सहभाग असतो. यापैकी अनेक चित्ररथ हे खाजगी प्रतिष्ठाने, व्यापारी तसेच संस्था पुरस्कृत असतात.

रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता रामजन्माची पूजा, आरती, प्रसाद झाल्यावर वाजण्याच्या सुमारास शोभायात्रेला सुरुवात होते. त्यासाठी शहरातील रस्ते पताका, स्वागताचे फलक आणि रोषणाईने सजलेले असतात. जागोजागी ध्वनिक्षेपकावर मंद स्वरात रामधून सुरू असते. यावेळी सर्व वातावरण हे राममय झालेले असते. शोभायात्रेतील भाविकांसाठी मार्गावर ठिकठिकाणी थंड पेये, पाणी प्रसादाची सुविधा दानशूर भक्तांकडून करण्यात येते. मिरवणुकीसाठी विशिष्ट पोशाखाचे बंधन नसले तरी अनेक भाविक लालसर भगव्या रंगाच्या टोप्या घालून त्यात सहभागी होतात

मंदिरापासून काही अंतरावर मोमीनपुरा ही मुस्लिम वस्ती आहे. रामनवमीच्या या शोभायात्रेत तेथील अनेक तरुणही सहभागी होतात. शोभायात्रेच्यावेळी मोमीनपुरा भागातील मुस्लिमांकडून रामरथावर पुष्पवृष्टी करून श्रीरामांचा जयजयकार केला जातो. अनेक चित्ररथ असल्यामुळे मिरवणूक मंदिरात परत जाण्यास रात्रीचे किंवा वाजतात. हा उत्सव पार पडल्यानंतर एखाद्या दिवशी मंदिरात महाप्रसाद दिला जातो. त्यावेळी नवरात्रीच्या काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि चित्ररथांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. याव्यतिरिक्त महाशिवरात्र, श्रीकृष्ण जन्माष्टमी, हनुमान जयंती, जानकी जयंती, तुलसीदास जयंती आणि अक्षय्य तृतीया या दिवशीही येथे उत्सव साजरे होतात.

धार्मिक कार्यक्रमांबरोबरच मंदिरात शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक उपक्रमही राबवले जातात. दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला दम्याच्या रुग्णांसाठी या ठिकाणी औषध दिले जाते. हजारो नागरिक त्याचा लाभ घेतात. याशिवाय आरोग्य शिबिरांसह गरिबांसाठी शैक्षणिक उपक्रमही राबवले जातात. दररोज सकाळी .३० ते ११.३० दुपारी ते रात्री .३० पर्यंत भाविकांना या मंदिरात जाऊन दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • नागपूर रेल्वेस्थानकापासून पायी १० मिनिटांच्या अंतरावर
  • नागपूरसाठी राज्यातील विविध ठिकाणांहून एसटी, रेल्वे विमान सेवा उपलब्ध
  • मंदिर परिसरात वाहने पार्क करता येत नाहीत.
  • निवास न्याहरीसाठी परिसरात अनेक पर्याय
Back To Home