पांडवकालीन शिवमंदिर
बारवे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्याला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. येथील तालमी, देव-देवतांच्या जत्रा, भजन, कीर्तन, संगीत यांची जोपासना अनादी काळापासून आजतागायत सुरू आहे. जत्रांच्या निमित्ताने भरणारे कुस्त्यांचे, तमाशाचे फड आणि ते पाहताना टाळ्या शिट्यांच्या गजरात आकाशात झेपावणारे फेटे चैतन्य निर्माण करतात. त्याच प्रमाणे येथील भूमीत हजारो वर्षांपासून उभी असलेली प्राचीन देवालये मनाला ऊर्जा देत आहेत. असेच एक प्राचीन शिवमंदिर तालुक्यातील बारवे गावात आहे. या मंदिराच्या बांधणीचा निश्चित कालावधी ज्ञात नसल्यामुळे ते पांडवकालीन शिवमंदिर म्हणून ओळखले आहे. येथील देव हा जागृत व नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या मंदिराचे पुरातनत्व अधोरेखित करण्यासाठी येथेही पांडवांच्या मंदिर उभारणीची आख्यायिका सांगण्यात येते. ती अशी की अज्ञातवासात असताना पांडव गावाशेजारील जंगलात वास्तव्यास होते. संध्याकाळ होताच पांडवांनी हे शिवमंदिर बांधावयास प्रारंभ केला. कोरीव नक्षीदार दगडातील हे मंदिर पूर्णत्वास येता येता पहाट होत आली.
पहाटे कोंबड्याने बांग दिल्यावर पुढच्या प्रवासाला निघायचे असल्याने त्यांनी मंदिराचे काम थांबवले. त्यामुळे हे मंदिर अपूर्णावस्थेत असल्याचे सांगितले जाते. १६व्या शतकातील स्थापत्यशैलीतील या मंदिराच्या पायथ्याशी कुंडे आहेत. १९६५ मध्ये या कुंडांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना त्यात बांधकामाची प्राचीन अवजारे व एक पितळी चाळ सापडला होता, असे येथील ग्रामस्थ सांगतात.
गारगोटीपासून १० किमी अंतरावर असलेल्या बारवे गावाच्या उत्तरेडील बाजूस मंदिराकडे जाताना घडीव दगडी बांधकाम असलेले पाण्याचे बारा कुंड नजरेस पडतात. सध्या हे कुंड अर्धवट मातीत गाडले गेले असल्याने हा तलाव असल्यासारखे दिसते. या कुंडांच्या बाजूने मंदिराकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीच्या प्रवेशद्वारातून आटोपशीर प्रांगणात प्रवेश होतो. येथील वैशिष्ट्य म्हणजे मंदिराभोवती असलेली आवारभिंत ही मोठमोठ्या आयताकार दगडी शिळांची आहे व त्यात काही ओवऱ्या आहेत. मंदिराभोवतीच्या प्रांगणात घालण्यात आलेल्या भरावामुळे या ओवऱ्या निम्म्याहून अधिक गाडलेल्या अवस्थेत आहेत. एखाद्या गुहेप्रमाणे भासणाऱ्या या ओवऱ्यांत प्रत्येकी एक अशा १२ शिवपिंडी आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही १२ ज्योतिर्लिंगाची स्थाने आहेत. यातील काही ओवऱ्यांत वीरगळांचे, तसेच सतीशिळांचे भग्नावशेष आहेत. एका ओवरीत एका देवतेचे शिल्प आहे. झिजून गेल्यामुळे ते ओळखण्यापलीकडे आहे. मात्र ही देवता चतुर्भुज आहे व तिच्या एका हातात शस्त्र असल्याचे दिसते. तिच्या पायानजीक सेवक वा सेविकाही दिसतात. वीरगळांचे व सतीशिळांचे काही तुकडे आवारभिंतीच्या बांधकामासाठीही वापरले असल्याचे दिसते. या ओवऱ्यांजवळून उंच असलेल्या आवारभिंतीवर चढण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.
नंदीमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे.
संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंडपात नंदीची अखंड काळ्या पाषाणातील भलीमोठी मूर्ती आहे. ही मूर्ती तुलनेने आधुनिक कालखंडातील असल्याचे दिसते. येथे प्राचीन मंदिराच्या कलशाचे काही अवशेष मांडलेले आहेत. नंदीमंडपासमोर असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाचे प्रवेशद्वार दगडी व त्याच्या द्वारशाखांवर व मंडारकावर नक्षीकाम आहे. सभामंडपाचे बांधकाम आधुनिक पद्धतीचे व विटांनी केलेले आहे. हा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. आत पुरेसा प्रकाश व हवा येण्यासाठी खिडक्या बसवलेल्या आहेत. सभामंडपावर दोन्ही बाजूंस पत्र्याचे उतरते छप्पर आहे. विशेष म्हणजे या सभामंडपास बाहेरच्या बाजूने मोठ्या कोरीव दगडी खांबांचा आधार देण्यात आलेला आहे. हे दगडी खांब प्राचीन असावेत असे दिसते. सभामंडपाच्या पुढील बाजूस उजवीकडे व डावीकडे दरवाजे आहेत.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार सभागृहाच्या प्रवेशद्वारासारखेच आहे. त्याच्या द्वारशाखांवरही पाना-फुलांची नक्षी कोरलेली आहे. उंच मंडारकावर कीर्तिमुखे आहेत व अर्धचंद्रशिला आहे. ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात मध्यभागी भूतलावर स्वयंभू शिवलिंग आहे. गर्भगृहाचे बांधकाम काळ्या पाषाणशिळांनी केलेले आहे. त्यावर अलीकडच्या काळात सिमेंटचा वापर करून बसक्या पिरॅमिडच्या आकाराचे शिखर बांधलेले आहे. शिखरावर वरच्या बाजूस किंचित आत वळलेला चौकोनाकार आहे आणि त्यावर आमलक व कलश आहे. एकंदर या मंदिराच्या उभारणीत प्राचीन व आधुनिक शैलीचे मिश्रण केल्याचे स्पष्ट दिसते.
महाशिवरात्री हा या मंदिरातील मुख्य वार्षिक उत्सव असून तो मोठ्या उत्साहात आठ दिवस साजरा केला जातो. माघ कृष्ण पंचमीपासून मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू होतो. त्याची सांगता महाशिवरात्रीस होते. यावेळी आठवडाभर महाअभिषेक, लघुरुद्र, भजन-कीर्तन, जागरण, नामस्मरण, यज्ञ तसेच विविध ग्रंथांची पारायणे सुरू असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या दिवशी पंचक्रोशीतील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. संपूर्ण परिसराला यावेळी यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
उपयुक्त माहिती
- भुदरगडपासून २४ किमी, तर कोल्हापूरपासून ६३ किमी अंतरावर
- भुदरगड येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापासून काही अंतरापर्यंत येऊ शकतात
- मंदिर परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Pandav-era Shiva Temple
Barve, Taluka Bhudargad, District Kolhapur
The Bhudargad taluka in Kolhapur district is blessed with a rich cultural tradition. The cultivation of traditional wrestling arenas (talims), fairs of deities, devotional singing (bhajan), discourses (kirtan), and music has continued here from time immemorial to this day. The wrestling matches and folk theatre performances (tamasha) held during fairs, and the turbans tossed into the sky amidst the roar of applause and whistles, create an atmosphere of vibrant energy. Similarly, the ancient temples standing on this land for thousands of years provide spiritual energy to the mind. One such ancient Shiva temple is located in the village of Barve in this taluka. As the precise period of its construction is unknown, it is known as the Pandav-era Shiva Temple. Devotees hold a deep faith that the deity here is awakened (jagrut) and grants the wishes of those who pray with devotion.
To underline the antiquity of this temple, a legend regarding its construction by the Pandavas is told here. It is said that during their exile, the Pandavas resided in the forest near the village. As evening fell, the Pandavas began building this Shiva temple. By the time this temple, made of carved stone, was nearing completion, dawn was approaching.
Since they had to depart for their onward journey after the rooster crowed at dawn, they stopped the work on the temple. Therefore, it is said that this temple remains in an incomplete state. There are water tanks (kunds) at the base of this temple, which dates back to the 16th-century architectural style. Villagers say that when repair work on these tanks began in 1965, ancient construction tools and a brass sieve were found inside.
Located 10 km from Gargoti, on the northern side of Barve village, one can see twelve stone-built water tanks while heading towards the temple. Currently, these tanks appear like a pond as they are partially buried in the soil. There are stone steps along these tanks to reach the temple. Climbing these steps, one enters the compact courtyard through the entrance of the surrounding wall. A unique feature here is that the surrounding wall is made of large rectangular stone slabs and contains several alcoves (ovaris). Due to the filling of earth in the courtyard around the temple, more than half of these alcoves are buried. In these alcoves, which resemble caves, there is one Shiva Linga in each, totaling twelve. According to the villagers, these are the sites of the twelve Jyotirlingas. Some of these alcoves contain fragments of hero stones (virgals) and sati stones. One alcove houses a sculpture of a deity. Due to erosion, it is beyond recognition, but the deity is four-armed, and a weapon is visible in one of its hands. An attendant or handmaiden is also visible near its feet. It appears that some pieces of hero stones and sati stones have also been used in the construction of the surrounding wall. There are stone steps near these alcoves to climb onto the high surrounding wall.
The structure of this temple consists of a Nandi pavilion (Nandi mandap), a main hall (sabha mandap), and a sanctum sanctorum (garbhagriha).
In this pavilion, which is entirely made of stone, there is a large, monolithic black stone statue of Nandi. This statue appears to be from a relatively modern period. Some remnants of the ancient temple’s finial (kalash) are displayed here. One enters the main hall of the temple through the main entrance in front of the Nandi pavilion. The entrance to the main hall is made of stone, and its door frames and lintel are carved. The construction of the main hall is of a modern style and made of bricks. This hall is enclosed. Windows have been installed to allow sufficient light and air inside. The main hall has a sloping tin roof on both sides. Notably, this main hall is supported from the outside by large carved stone pillars. These stone pillars appear to be ancient. There are doors on the right and left sides at the front of the main hall.
The entrance to the sanctum sanctorum is similar to the entrance of the hall. Its door frames are also carved with leaf and flower motifs. There are Kirtimukhas and a crescent moon stone on the high lintel. There is a Ganesha idol on the central panel. In the center of the sanctum sanctorum, there is a self-manifested (swayambhu) Shiva Linga on the floor. The sanctum sanctorum is constructed with black stone slabs. In recent times, a low pyramid-shaped spire (shikhara) has been built over it using cement. The top of the spire has a square shape that turns slightly inward, topped with an amalaka and a kalash. Overall, it is clear that the construction of this temple is a blend of ancient and modern styles.
Mahashivratri is the main annual festival at this temple, celebrated with great enthusiasm for eight days. An unbroken week of chanting the Lord’s name (Akhand Harinam Saptah) begins in the temple from Magh Krishna Panchami and concludes on Mahashivratri. During this time, for the entire week, there are grand ablutions (maha-abhishek), Laghurudra, devotional singing, night vigils, chanting, sacrificial rituals (yajna), and recitations of various scriptures. A grand feast (mahaprasad) is organized for devotees on the day of Mahashivratri. Thousands of devotees from the surrounding five villages come here for darshan on this day. The entire area takes on the appearance of a pilgrimage site at this time.
Useful Information
- 24 km from Bhudargad and 63 km from Kolhapur
- GSRTC bus service available from Bhudargad
- Private vehicles can reach up to a certain distance from the temple
- No accommodation or dining facilities available in the temple premises
पांडवकालीन शिवमंदिर
बारवे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
कोल्हापुर जिले के भुदरगड तालुका को एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा प्राप्त है। यहाँ की तालिम, देवी-देवताओं की यात्राएँ, भजन, कीर्तन और संगीत का संवर्धन अनादि काल से आज तक निरंतर जारी है। यात्राओं के अवसर पर आयोजित होने वाली कुश्तियाँ, तमाशे के फड और उन्हें देखते समय तालियों व सीटियों की गूँज में आकाश की ओर उछलते साफे एक अद्भुत चैतन्य का निर्माण करते हैं। इसी प्रकार, यहाँ की भूमि पर हज़ारों वर्षों से खड़े प्राचीन देवालय मन को ऊर्जा प्रदान करते हैं। ऐसा ही एक प्राचीन शिवमंदिर तालुका के बारवे गाँव में स्थित है। इस मंदिर के निर्माण का निश्चित कालखंड ज्ञात न होने के कारण इसे पांडवकालीन शिवमंदिर के रूप में जाना जाता है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यहाँ के देव जागृत हैं और मनोकामना पूर्ण करने वाले हैं।
इस मंदिर के पुरातत्व को रेखांकित करने के लिए यहाँ पांडवों द्वारा मंदिर निर्माण की किंवदंती सुनाई जाती है। वह यह है कि अज्ञातवास के दौरान पांडव गाँव के समीप के जंगल में निवास कर रहे थे। संध्या होते ही पांडवों ने इस शिवमंदिर का निर्माण कार्य प्रारंभ किया। नक्काशीदार पत्थरों से बना यह मंदिर पूर्णता की ओर बढ़ ही रहा था कि भोर होने को आई।
भोर में मुर्गे के बांग देने पर उन्हें अगली यात्रा के लिए निकलना था, इसलिए उन्होंने मंदिर का काम रोक दिया। इसी कारण यह मंदिर अपूर्ण अवस्था में है, ऐसा कहा जाता है। १६वीं शताब्दी की स्थापत्य शैली वाले इस मंदिर के आधार पर कुंड हैं। ग्रामवासियों का कहना है कि १९६५ में जब इन कुंडों की मरम्मत का काम चल रहा था, तब उसमें निर्माण के प्राचीन औजार और एक पीतल का थाल मिला था।
गारगोटी से १० किमी की दूरी पर स्थित बारवे गाँव के उत्तर दिशा की ओर मंदिर जाते समय गढ़े हुए पत्थरों से निर्मित पानी के बारह कुंड दिखाई देते हैं। वर्तमान में ये कुंड आधे मिट्टी में दबे होने के कारण तालाब जैसे प्रतीत होते हैं। इन कुंडों के किनारे से मंदिर तक जाने के लिए पत्थर की सीढ़ियाँ हैं। इन सीढ़ियों को चढ़कर मंदिर के चारों ओर बनी प्राचीर के प्रवेश द्वार से छोटे से प्रांगण में प्रवेश होता है। यहाँ की विशेषता यह है कि मंदिर के चारों ओर की प्राचीर विशाल आयताकार पत्थर की शिलाओं से बनी है और उसमें कुछ कोठरियाँ (ओवरी) हैं। मंदिर के प्रांगण में की गई भराई के कारण ये कोठरियाँ आधे से अधिक दबी हुई अवस्था में हैं। किसी गुफा के समान प्रतीत होने वाली इन कोठरियों में प्रत्येक में एक, इस प्रकार १२ शिवपिंडियाँ हैं। ग्रामवासियों के अनुसार ये १२ ज्योतिर्लिंगों के स्थान हैं। इनमें से कुछ कोठरियों में वीरगलों (वीर-स्तंभों) और सती-शिलाओं के भग्नावशेष हैं। एक कोठरी में एक देवता की मूर्ति है। घिस जाने के कारण वह पहचान से परे है, किंतु यह देवता चतुर्भुज है और उनके एक हाथ में शस्त्र दिखाई देता है। उनके चरणों के समीप सेवक या सेविका भी दिखाई देते हैं। वीरगलों और सती-शिलाओं के कुछ टुकड़े प्राचीर के निर्माण में भी उपयोग किए गए प्रतीत होते हैं। इन कोठरियों के पास से ऊँची प्राचीर पर चढ़ने के लिए पत्थर की सीढ़ियाँ हैं।
नंदीमंडप, सभामंडप और गर्भगृह ऐसी इस मंदिर की संरचना है।
पूर्णतः पत्थर से निर्मित इस मंडप में नंदी की अखंड काले पाषाण की विशाल मूर्ति है। यह मूर्ति अपेक्षाकृत आधुनिक कालखंड की प्रतीत होती है। यहाँ प्राचीन मंदिर के कलश के कुछ अवशेष रखे गए हैं। नंदीमंडप के सामने स्थित मुख्य प्रवेश द्वार से मंदिर के सभामंडप में प्रवेश होता है। सभामंडप का प्रवेश द्वार पत्थर का है और उसकी द्वार-शाखाओं व मंडारक पर नक्काशी है। सभामंडप का निर्माण आधुनिक पद्धति से और ईंटों से किया गया है। यह सभामंडप बंद स्वरूप का है। भीतर पर्याप्त प्रकाश और हवा आने के लिए खिड़कियाँ लगाई गई हैं। सभामंडप पर दोनों ओर टीन की ढलवां छत है। विशेष बात यह है कि इस सभामंडप को बाहर की ओर से बड़े नक्काशीदार पत्थर के खंभों का सहारा दिया गया है। ये पत्थर के खंभे प्राचीन प्रतीत होते हैं। सभामंडप के सामने की ओर दाईं और बाईं ओर दरवाजे हैं।
गर्भगृह का प्रवेश द्वार सभागृह के प्रवेश द्वार के समान ही है। उसकी द्वार-शाखाओं पर भी फूल-पत्तियों की नक्काशी है। ऊँचे मंडारक पर कीर्तिमुख हैं और अर्धचंद्रशिला है। ललाट-बिंब पर गणेश मूर्ति है। गर्भगृह में मध्य में भूतल पर स्वयंभू शिवलिंग है। गर्भगृह का निर्माण काले पाषाण शिलाओं से किया गया है। उस पर हाल के वर्षों में सीमेंट का उपयोग करके चपटे पिरामिड के आकार का शिखर बनाया गया है। शिखर पर ऊपरी भाग में अंदर की ओर मुड़ा हुआ चौकोर आकार है और उस पर आमलक व कलश है। कुल मिलाकर इस मंदिर के निर्माण में प्राचीन और आधुनिक शैली का मिश्रण स्पष्ट दिखाई देता है।
महाशिवरात्रि इस मंदिर का मुख्य वार्षिक उत्सव है और इसे बड़े उत्साह के साथ आठ दिनों तक मनाया जाता है। माघ कृष्ण पंचमी से मंदिर में अखंड हरिनाम सप्ताह शुरू होता है। इसका समापन महाशिवरात्रि पर होता है। इस दौरान सप्ताह भर महाअभिषेक, लघुरुद्र, भजन-कीर्तन, जागरण, नामस्मरण, यज्ञ तथा विभिन्न ग्रंथों के पारायण चलते रहते हैं। महाशिवरात्रि के दिन यहाँ भक्तों के लिए महाप्रसाद का आयोजन किया जाता है। इस दिन पंचक्रोशी के हज़ारों भक्त यहाँ दर्शन के लिए आते हैं। संपूर्ण परिसर इस समय यात्रा (मेले) का स्वरूप प्राप्त कर लेता है।
उपयोगी जानकारी
- भुदरगड से २४ किमी, तो कोल्हापुर से ६३ किमी की दूरी पर
- भुदरगड से एसटी (GSRTC) बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर से कुछ दूरी तक आ सकते हैं
- मंदिर परिसर में निवास और नाश्ते की सुविधा नहीं है
પાંડવકાલીન શિવમંદિર
બારવે, તા. ભુદરગડ, જિ. કોલ્હાપુર
કોલ્હાપુર જિલ્લાના ભુદરગડ તાલુકાને મોટી સાંસ્કૃતિક પરંપરા પ્રાપ્ત થયેલી છે. અહીંની તાલીમો, દેવ-દેવતાઓના મેળા, ભજન, કીર્તન, સંગીતનું જતન અનાદિ કાળથી આજદિન સુધી ચાલુ છે. મેળાના નિમિત્તે ભરાતા કુસ્તીના દાવ, તમાશાના ફડ અને તે જોતી વખતે તાળીઓ-સીટીઓના ગુંજારવમાં આકાશમાં ઉછળતા ફેટા એક ચેતનનું નિર્માણ કરે છે. તે જ પ્રમાણે અહીંની ભૂમિ પર હજારો વર્ષોથી ઊભેલા પ્રાચીન દેવાલયો મનને ઊર્જા આપી રહ્યા છે. આવું જ એક પ્રાચીન શિવમંદિર તાલુકાના બારવે ગામમાં છે. આ મંદિરના બાંધકામનો ચોક્કસ સમયગાળો જ્ઞાત ન હોવાથી તે પાંડવકાલીન શિવમંદિર તરીકે ઓળખાય છે. અહીંના દેવ જાગૃત અને નવસ (બાધા) પૂરી કરનારા છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
આ મંદિરની પ્રાચીનતાને રેખાંકિત કરવા માટે અહીં પણ પાંડવો દ્વારા મંદિર નિર્માણની આખ્યાયિકા કહેવામાં આવે છે. તે એવી છે કે અજ્ઞાતવાસમાં હતા ત્યારે પાંડવો ગામની નજીકના જંગલમાં નિવાસ કરતા હતા. સાંજ પડતા જ પાંડવોએ આ શિવમંદિર બાંધવાનું શરૂ કર્યું. કોતરણીવાળા પથ્થરોનું આ મંદિર પૂર્ણ થવા આવતા તો પરોઢ થઈ ગઈ હતી.
પરોઢે કૂકડાએ બાંગ પોકારતા આગળની મુસાફરીએ નીકળવાનું હોવાથી તેમણે મંદિરનું કામ અટકાવી દીધું. તેથી આ મંદિર અધૂરી અવસ્થામાં હોવાનું કહેવાય છે. ૧૬મી સદીની સ્થાપત્યશૈલીના આ મંદિરના પાયામાં કુંડ છે. ૧૯૬૫માં આ કુંડના સમારકામનું કામ શરૂ હતું ત્યારે તેમાં બાંધકામના પ્રાચીન ઓજારો અને એક પિત્તળની થાળી મળી આવી હતી, એમ અહીંના ગ્રામજનો જણાવે છે.
ગારગોટીથી ૧૦ કિમી અંતરે આવેલા બારવે ગામની ઉત્તર દિશા તરફ મંદિરે જતા ઘડેલા પથ્થરનું બાંધકામ ધરાવતા પાણીના બાર કુંડ નજરે પડે છે. હાલમાં આ કુંડ અડધા માટીમાં દટાયેલા હોવાથી આ તળાવ જેવું દેખાય છે. આ કુંડની બાજુએથી મંદિર તરફ જવા માટે પથ્થરની સીડીઓ છે. આ સીડીઓ ચઢીને મંદિરની આસપાસની દીવાલના પ્રવેશદ્વારમાંથી આકર્ષક પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. અહીંની વિશેષતા એ છે કે મંદિરની આસપાસની દીવાલ મોટા લંબચોરસ પથ્થરની શિલાઓની છે અને તેમાં કેટલીક ઓસરીઓ છે. મંદિરની આસપાસના પ્રાંગણમાં કરવામાં આવેલા ભરાવાને કારણે આ ઓસરીઓ અડધાથી વધુ દટાયેલી અવસ્થામાં છે. કોઈ ગુફા જેવી ભાસતી આ ઓસરીઓમાં પ્રત્યેકમાં એક એમ ૧૨ શિવપિંડી છે. ગ્રામજનોના કહેવા મુજબ આ ૧૨ જ્યોતિર્લિંગના સ્થાનો છે. આમાંથી કેટલીક ઓસરીઓમાં વીરગળના, તેમજ સતીશિલાઓના ભગ્નાવશેષો છે. એક ઓસરીમાં એક દેવતાની મૂર્તિ છે. ઘસાઈ જવાને કારણે તે ઓળખવાને લાયક નથી. પરંતુ આ દેવતા ચતુર્ભુજ છે અને તેમના એક હાથમાં શસ્ત્ર દેખાય છે. તેમના પગ પાસે સેવક કે સેવિકા પણ દેખાય છે. વીરગળ અને સતીશિલાઓના કેટલાક ટુકડા આવારદીવાલના બાંધકામ માટે પણ વાપરવામાં આવ્યા હોય તેમ જણાય છે. આ ઓસરીઓ પાસેથી ઊંચી આવારદીવાલ પર ચઢવા માટે પથ્થરની સીડીઓ છે.
નંદીમંડપ, સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની સંરચના છે.
સંપૂર્ણ પથ્થરનું બાંધકામ ધરાવતા આ મંડપમાં નંદીની અખંડ કાળા પાષાણની વિશાળ મૂર્તિ છે. આ મૂર્તિ પ્રમાણમાં આધુનિક કાળખંડની હોવાનું જણાય છે. અહીં પ્રાચીન મંદિરના કળશના કેટલાક અવશેષો મૂકવામાં આવ્યા છે. નંદીમંડપની સામે રહેલા મુખ્ય પ્રવેશદ્વારમાંથી મંદિરના સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે. સભામંડપનું પ્રવેશદ્વાર પથ્થરનું છે અને તેની દ્વારશાખાઓ પર તથા મંડારક પર નકશીકામ છે. સભામંડપનું બાંધકામ આધુનિક પદ્ધતિનું અને ઈંટોથી કરેલું છે. આ સભામંડપ બંધ પ્રકારનો છે. અંદર પૂરતો પ્રકાશ અને હવા આવવા માટે બારીઓ બેસાડવામાં આવી છે. સભામંડપ પર બંને બાજુએ પતરાનું ઢળતું છાપરું છે. વિશેષ એટલે કે આ સભામંડપને બહારની બાજુએ મોટા કોતરણીવાળા પથ્થરના સ્તંભોનો આધાર આપવામાં આવ્યો છે. આ પથ્થરના સ્તંભો પ્રાચીન હોવા જોઈએ તેમ લાગે છે. સભામંડપની આગળની બાજુએ જમણી અને ડાબી બાજુએ દરવાજા છે.
ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર સભાગૃહના પ્રવેશદ્વાર જેવું જ છે. તેની દ્વારશાખાઓ પર પણ પાન-ફૂલની નકશી કોતરેલી છે. ઊંચા મંડારક પર કીર્તિમુખ છે અને અર્ધચંદ્રશિલા છે. લલાટબિંબ પર ગણેશમૂર્તિ છે. ગર્ભગૃહમાં મધ્યમાં ભૂતલ પર સ્વયંભૂ શિવલિંગ છે. ગર્ભગૃહનું બાંધકામ કાળા પાષાણની શિલાઓથી કરેલું છે. તેના પર હાલના સમયમાં સિમેન્ટનો ઉપયોગ કરીને બેઠક પિરામિડના આકારનું શિખર બાંધેલું છે. શિખર પર ઉપરની બાજુએ સહેજ અંદર વળેલું ચોરસ છે અને તેના પર આમલક અને કળશ છે. એકંદરે આ મંદિરના નિર્માણમાં પ્રાચીન અને આધુનિક શૈલીનું મિશ્રણ કર્યાનું સ્પષ્ટ દેખાય છે.
મહાશિવરાત્રી એ આ મંદિરનો મુખ્ય વાર્ષિક ઉત્સવ છે અને તે ખૂબ જ ઉત્સાહથી આઠ દિવસ સુધી ઉજવવામાં આવે છે. માઘ કૃષ્ણ પંચમીથી મંદિરમાં અખંડ હરિનામ સપ્તાહ શરૂ થાય છે. તેની પૂર્ણાહુતિ મહાશિવરાત્રીએ થાય છે. આ સમયે આખું અઠવાડિયું મહાઅભિષેક, લઘુરુદ્ર, ભજન-કીર્તન, જાગરણ, નામસ્મરણ, યજ્ઞ તેમજ વિવિધ ગ્રંથોના પારાયણો ચાલુ હોય છે. મહાશિવરાત્રીના દિવસે અહીં ભક્તો માટે મહાપ્રસાદનું આયોજન કરવામાં આવે છે. આ દિવસે આસપાસના પાંચ ગામોના હજારો ભક્તો અહીં દર્શન માટે આવે છે. સમગ્ર પરિસરને આ સમયે મેળાનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થાય છે.
ઉપયોગી માહિતી
- ભુદરગડથી ૨૪ કિમી, તો કોલ્હાપુરથી ૬૩ કિમી અંતરે
- ભુદરગડથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરથી થોડા અંતર સુધી આવી શકે છે
- મંદિર પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
பாண்டவர் காலத்துச் சிவ ஆலயம்
பார்வே, தாலுகா புதர்கட், மாவட்டம் கோலாப்பூர்
கோலாப்பூர் மாவட்டத்தில் உள்ள புதர்கட் தாலுகா பெரும் கலாச்சாரப் பாரம்பரியத்தைக் கொண்டுள்ளது. இங்குள்ள தாலிம்கள் (உடற்பயிற்சிக் கூடங்கள்), தெய்வங்களின் திருவிழாக்கள், பஜனை, கீர்த்தனை, இசை ஆகியவை ஆதிகாலத்திலிருந்தே இன்றுவரை போற்றிப் பாதுகாக்கப்பட்டு வருகின்றன. திருவிழாக்களின் போது நடைபெறும் மல்யுத்தம், தமாஷா நிகழ்ச்சிகள் மற்றும் அவற்றைக் காணும்போது கைதட்டல், விசில் சத்தங்களுக்கு இடையே வானத்தை நோக்கி எறியப்படும் தலைப்பாகைகள் ஒருவித உற்சாகத்தை உருவாக்குகின்றன. அதேபோல், இங்குள்ள மண்ணில் ஆயிரக்கணக்கான ஆண்டுகளாக நிலைபெற்றுள்ள பழங்காலக் கோவில்கள் மனதிற்கு ஆற்றலை வழங்குகின்றன. அத்தகைய ஒரு பழமையான சிவ ஆலயம் தாலுகாவில் உள்ள பார்வே கிராமத்தில் உள்ளது. இந்த ஆலயத்தின் கட்டுமான காலம் துல்லியமாகத் தெரியாததால், இது பாண்டவர் காலத்துச் சிவ ஆலயம் என்று அழைக்கப்படுகிறது. இங்குள்ள தெய்வம் மிகவும் சக்தி வாய்ந்தது என்றும், வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவர் என்றும் பக்தர்களின் நம்பிக்கை.
இந்த ஆலயத்தின் பழமையைப் பறைசாற்ற, பாண்டவர்கள் இந்த ஆலயத்தை எழுப்பியதாக ஒரு ஐதீகம் கூறப்படுகிறது. அது என்னவென்றால், வனவாசத்தின் போது பாண்டவர்கள் கிராமத்திற்கு அருகில் உள்ள காட்டில் தங்கியிருந்தனர். மாலை நேரமானதும் பாண்டவர்கள் இந்தச் சிவ ஆலயத்தைக் கட்டத் தொடங்கினர். செதுக்கப்பட்ட வேலைப்பாடுகள் கொண்ட கற்களால் ஆன இந்த ஆலயம் முழுமையடைவதற்குள் விடியற்காலை நெருங்கியது.
அதிகாலையில் சேவல் கூவியதும் அடுத்த பயணத்தைத் தொடங்க வேண்டியிருந்ததால், அவர்கள் ஆலயப் பணியை நிறுத்தினர். அதனால், இந்த ஆலயம் முழுமையடையாத நிலையில் இருப்பதாகக் கூறப்படுகிறது. ௧௬-ஆம் நூற்றாண்டின் கட்டடக்கலை பாணியில் அமைந்துள்ள இந்த ஆலயத்தின் அடிவாரத்தில் குளங்கள் உள்ளன. ௧௯௬௫-ஆம் ஆண்டில் இந்தக் குளங்களைப் பழுதுபார்க்கும் பணி நடந்தபோது, அதில் கட்டுமானப் பழங்காலக் கருவிகளும், ஒரு பித்தளைத் தட்டும் கண்டெடுக்கப்பட்டதாக இங்குள்ள கிராம மக்கள் கூறுகின்றனர்.
கார்கோட்டியிலிருந்து ௧௦ கி.மீ தொலைவில் உள்ள பார்வே கிராமத்தின் வடக்கு திசையில் ஆலயத்திற்குச் செல்லும்போது, செதுக்கப்பட்ட கற்களால் ஆன பன்னிரண்டு நீர்க்குளங்களைக் காணலாம். தற்போது இந்தக் குளங்கள் பாதியளவு மண்ணில் புதைந்துள்ளதால், இது ஒரு குளம் போலத் தோற்றமளிக்கிறது. இந்தக் குளங்களின் வழியாக ஆலயத்திற்குச் செல்லக் கல் படிகள் உள்ளன. இந்தப் படிகளில் ஏறி, ஆலயத்தைச் சுற்றியுள்ள மதில் சுவரின் நுழைவாயில் வழியாகச் சிறிய பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். இங்குள்ள சிறப்பம்சம் என்னவென்றால், ஆலயத்தைச் சுற்றியுள்ள மதில் சுவர் பெரிய செவ்வக வடிவக் கற்களால் ஆனது மற்றும் அதில் சில அறைகள் உள்ளன. ஆலயத்தைச் சுற்றியுள்ள பிரகாரத்தில் மண் நிரப்பப்பட்டதால், இந்த அறைகள் பாதிக்கும் மேல் புதைந்துள்ளன. ஒரு குகை போன்ற தோற்றமளிக்கும் இந்த அறைகள் ஒவ்வொன்றிலும் தலா ஒரு சிவலிங்கம் என ௧௨ சிவலிங்கங்கள் உள்ளன. கிராம மக்களின் கூற்றுப்படி, இவை ௧௨ ஜோதிர்லிங்கத் தலங்களாகும். இதில் சில அறைகளில் வீரக்கற்கள் மற்றும் சதிக்கற்களின் சிதைந்த பாகங்கள் உள்ளன. ஒரு அறையில் ஒரு தெய்வத்தின் சிற்பம் உள்ளது. தேய்மானம் அடைந்ததால் அதை அடையாளம் காண முடியவில்லை. இருப்பினும், இந்தத் தெய்வம் நான்கு கைகளைக் கொண்டுள்ளது மற்றும் அதன் ஒரு கையில் ஆயுதம் இருப்பது தெரிகிறது. அதன் காலடியில் சேவகர் அல்லது சேவகி இருப்பதையும் காணலாம். வீரக்கற்கள் மற்றும் சதிக்கற்களின் சில துண்டுகள் மதில் சுவர் கட்டுமானத்திற்கும் பயன்படுத்தப்பட்டிருப்பது தெரிகிறது. இந்த அறைகளுக்கு அருகிலிருந்து உயரமான மதில் சுவரில் ஏறக் கல் படிகள் உள்ளன.
நந்தி மண்டபம், சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இந்த ஆலயத்தின் அமைப்பு உள்ளது.
முழுமையான கல் கட்டுமானத்தைக் கொண்ட இந்த மண்டபத்தில் நந்தியின் ஒரே கல்லால் ஆன பிரம்மாண்டமான கருங்கற் சிலை உள்ளது. இந்தச் சிலை ஒப்பீட்டளவில் நவீன காலத்தைச் சேர்ந்ததாகத் தெரிகிறது. இங்கு பழங்கால ஆலயத்தின் கலசத்தின் சில சிதைந்த பாகங்கள் வைக்கப்பட்டுள்ளன. நந்தி மண்டபத்திற்கு முன்னால் உள்ள முக்கிய நுழைவாயில் வழியாக ஆலயத்தின் சபா மண்டபத்திற்குள் நுழையலாம். சபா மண்டபத்தின் நுழைவாயில் கல்லால் ஆனது மற்றும் அதன் கதவு நிலைகளிலும், மேல் பகுதியிலும் வேலைப்பாடுகள் உள்ளன. சபா மண்டபத்தின் கட்டுமானம் நவீன முறையில் செங்கற்களால் செய்யப்பட்டுள்ளது. இந்தச் சபா மண்டபம் மூடப்பட்ட நிலையில் உள்ளது. உள்ளே போதுமான வெளிச்சம் மற்றும் காற்று வர ஜன்னல்கள் பொருத்தப்பட்டுள்ளன. சபா மண்டபத்தின் மீது இருபுறமும் தகரத்தாலான சரிவு கூரை உள்ளது. குறிப்பாக, இந்தச் சபா மண்டபத்திற்கு வெளிப்புறத்திலிருந்து பெரிய செதுக்கப்பட்ட கல் தூண்களின் ஆதரவு அளிக்கப்பட்டுள்ளது. இந்தத் தூண்கள் பழமையானவை என்று தோன்றுகிறது. சபா மண்டபத்தின் முன்புறம் வலது மற்றும் இடது பக்கங்களில் கதவுகள் உள்ளன.
கருவறையின் நுழைவாயில் சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலைப் போலவே உள்ளது. அதன் கதவு நிலைகளிலும் இலை, பூ வேலைப்பாடுகள் செதுக்கப்பட்டுள்ளன. உயரமான மேல் பகுதியில் கீர்த்திமுகங்கள் மற்றும் அர்த்தசந்திர சிலை உள்ளது. லலாட பிம்பத்தில் கணேசர் சிலை உள்ளது. கருவறையில் நடுவில் தரையில் சுயம்பு சிவலிங்கம் உள்ளது. கருவறையின் கட்டுமானம் கருங்கற்களால் செய்யப்பட்டுள்ளது. அதன் மீது சமீபத்திய காலத்தில் சிமெண்ட் பயன்படுத்திச் சிறிய பிரமிடு வடிவக் கோபுரம் கட்டப்பட்டுள்ளது. கோபுரத்தின் மேற்புறத்தில் உட்புறமாகச் சாய்ந்த சதுர வடிவம் உள்ளது, அதன் மீது ஆமலக்கம் மற்றும் கலசம் உள்ளது. ஒட்டுமொத்தமாக, இந்த ஆலயத்தின் கட்டுமானத்தில் பழங்கால மற்றும் நவீன பாணிகளின் கலவை தெளிவாகத் தெரிகிறது.
மகா சிவராத்திரி இந்த ஆலயத்தின் முக்கிய வருடாந்திர விழாவாகும், இது மிகுந்த உற்சாகத்துடன் எட்டு நாட்கள் கொண்டாடப்படுகிறது. மாக் கிருஷ்ண பஞ்சமியிலிருந்து ஆலயத்தில் அகண்ட ஹரிநாம சப்தம் தொடங்குகிறது. அதன் நிறைவு மகா சிவராத்திரி அன்று நடைபெறுகிறது. இந்த நேரத்தில் வாரம் முழுவதும் மகா அபிஷேகம், லகுருத்ரம், பஜனை-கீர்த்தனை, விழிப்பு, நாமஸ்மரணம், யாகம் மற்றும் பல்வேறு நூல்களின் பாராயணங்கள் நடைபெறுகின்றன. மகா சிவராத்திரி அன்று இங்கு பக்தர்களுக்கு மகா பிரசாதம் வழங்கப்படுகிறது. இந்நாளில் சுற்றுவட்டாரத்திலுள்ள ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இங்கு தரிசனத்திற்காக வருகிறார்கள். முழுப் பகுதியும் இந்த நேரத்தில் திருவிழாக் கோலம் பூணுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- புதர்கட்டிலிருந்து ௨௪ கி.மீ, கோலாப்பூரிலிருந்து ௬௩ கி.மீ தொலைவில்
- புதர்கட்டிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் ஆலயத்திற்கு அருகில் வரை வரலாம்
- ஆலயப் பகுதியில் தங்குவதற்கும் உணவு உண்பதற்கும் வசதி இல்லை
పాండవకాలీన శివాలయం
బార్వే, తా. భుదర్గఢ్, జి. కోల్హాపూర్
కోల్హాపూర్ జిల్లాలోని భుదర్గఢ్ తాలూకా గొప్ప సాంస్కృతిక వారసత్వాన్ని కలిగి ఉంది. ఇక్కడి తాలీములు, దేవతా ఉత్సవాలు, భజనలు, కీర్తనలు, సంగీతం వంటి సంప్రదాయాలు అనాది కాలం నుండి నేటి వరకు కొనసాగుతున్నాయి. జాతరల సందర్భంగా జరిగే కుస్తీ పోటీలు, తమాషా ప్రదర్శనలు, వాటిని చూస్తూ ప్రజలు చేసే కేరింతలు, ఈలల మధ్య ఆకాశంలోకి ఎగిరే తలపాగాలు ఒక అద్భుతమైన చైతన్యాన్ని కలిగిస్తాయి. అదేవిధంగా, ఈ నేలపై వేల సంవత్సరాలుగా నిలిచి ఉన్న ప్రాచీన దేవాలయాలు మనసుకు ఎంతో శక్తినిస్తాయి. అటువంటి ఒక ప్రాచీన శివాలయం తాలూకాలోని బార్వే గ్రామంలో ఉంది. ఈ ఆలయ నిర్మాణ కాలం ఖచ్చితంగా తెలియదు కాబట్టి, దీనిని పాండవకాలీన శివాలయంగా పిలుస్తారు. ఇక్కడి దైవం అత్యంత శక్తివంతమైనదని, భక్తుల కోరికలను తీర్చేవాడని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
ఈ ఆలయం యొక్క ప్రాచీనతను నొక్కి చెప్పడానికి, పాండవులు ఈ ఆలయాన్ని నిర్మించారని ఒక పురాణగాథ ప్రాచుర్యంలో ఉంది. అజ్ఞాతవాసంలో ఉన్నప్పుడు పాండవులు గ్రామానికి సమీపంలోని అడవిలో నివసించేవారని, సాయంత్రం కాగానే పాండవులు ఈ శివాలయాన్ని నిర్మించడం ప్రారంభించారని చెబుతారు. చెక్కిన రాతితో నిర్మితమవుతున్న ఈ ఆలయం పూర్తయ్యే సమయానికి తెల్లవారుజాము అవుతోంది.
తెల్లవారుజామున కోడి కూయడంతో, తదుపరి ప్రయాణానికి సిద్ధమవ్వాల్సి రావడంతో వారు ఆలయ నిర్మాణాన్ని ఆపివేశారు. అందుకే ఈ ఆలయం అసంపూర్తిగా ఉందని చెబుతారు. ౧౬వ శతాబ్దపు నిర్మాణ శైలిలో ఉన్న ఈ ఆలయం పాదాల వద్ద నీటి కుండలు ఉన్నాయి. ౧౯౬౫లో ఈ కుండల మరమ్మతు పనులు జరుగుతున్నప్పుడు, పురాతన నిర్మాణ పనిముట్లు మరియు ఒక ఇత్తడి జల్లెడ లభించాయని గ్రామస్థులు చెబుతారు.
గార్గోటి నుండి ౧౦ కి.మీ దూరంలో ఉన్న బార్వే గ్రామానికి ఉత్తర దిశలో ఆలయానికి వెళ్లే దారిలో, రాతితో నిర్మించిన ౧౨ నీటి కుండలు కనిపిస్తాయి. ప్రస్తుతం ఈ కుండలు సగం మట్టిలో పూడిపోవడంతో ఇది ఒక చెరువులా కనిపిస్తుంది. ఈ కుండల పక్క నుండి ఆలయానికి వెళ్లడానికి రాతి మెట్లు ఉన్నాయి. ఈ మెట్లు ఎక్కి ఆలయం చుట్టూ ఉన్న ప్రాకార గోడ ద్వారం గుండా లోపలికి ప్రవేశించవచ్చు. ఇక్కడి ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఆలయం చుట్టూ ఉన్న ప్రాకార గోడ పెద్ద దీర్ఘచతురస్రాకార రాతి పలకలతో నిర్మించబడింది మరియు అందులో కొన్ని గదులు (ఓవరీలు) ఉన్నాయి. ఆలయ ప్రాంగణంలో చేసిన పూడిక కారణంగా ఈ గదులు సగానికి పైగా భూమిలో కూరుకుపోయాయి. ఒక గుహలా అనిపించే ఈ గదులలో ఒక్కొక్కటి చొప్పున ౧౨ శివలింగాలు ఉన్నాయి. గ్రామస్థుల అభిప్రాయం ప్రకారం, ఇవి ౧౨ జ్యోతిర్లింగ స్థానాలు. వీటిలో కొన్ని గదులలో వీరగళ్లు మరియు సతీశిలల శిథిలాలు ఉన్నాయి. ఒక గదిలో ఒక దేవతా విగ్రహం ఉంది. అది అరిగిపోవడం వల్ల గుర్తుపట్టలేనంతగా ఉంది, కానీ ఆ దేవత చతుర్భుజ (నాలుగు చేతులు) కలిగి ఉంది మరియు ఒక చేతిలో ఆయుధం ఉన్నట్లు కనిపిస్తుంది. ఆ దేవత పాదాల వద్ద సేవకుడు లేదా సేవకురాలు కూడా కనిపిస్తారు. వీరగళ్లు మరియు సతీశిలల కొన్ని ముక్కలను ప్రాకార గోడ నిర్మాణంలో కూడా ఉపయోగించినట్లు కనిపిస్తుంది. ఈ గదుల పక్క నుండి ఎత్తైన ప్రాకార గోడపైకి ఎక్కడానికి రాతి మెట్లు ఉన్నాయి.
నందీ మండపం, సభా మండపం మరియు గర్భాలయం అనేవి ఈ ఆలయ నిర్మాణం.
పూర్తిగా రాతితో నిర్మించిన ఈ మండపంలో నంది యొక్క అఖండ నల్లరాతి భారీ విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహం ఆధునిక కాలానికి చెందినదిగా కనిపిస్తుంది. ఇక్కడ ప్రాచీన ఆలయ కలశానికి సంబంధించిన కొన్ని అవశేషాలు ఉన్నాయి. నందీ మండపం ముందున్న ప్రధాన ద్వారం ద్వారా సభా మండపంలోకి ప్రవేశించవచ్చు. సభా మండపం ద్వారం రాతితో నిర్మితమై, దానిపై మరియు పైభాగంలో అద్భుతమైన చెక్కడాలు ఉన్నాయి. సభా మండపం ఆధునిక పద్ధతిలో ఇటుకలతో నిర్మించబడింది. ఇది మూసివున్న నిర్మాణం. లోపల తగినంత వెలుతురు మరియు గాలి కోసం కిటికీలు అమర్చారు. సభా మండపంపై రెండు వైపులా రేకుల పైకప్పు ఉంది. ముఖ్యంగా, ఈ సభా మండపానికి బయటి వైపు నుండి పెద్ద చెక్కిన రాతి స్తంభాల మద్దతు ఉంది. ఈ రాతి స్తంభాలు ప్రాచీనమైనవిగా కనిపిస్తున్నాయి. సభా మండపం ముందు భాగంలో కుడి మరియు ఎడమ వైపున తలుపులు ఉన్నాయి.
గర్భాలయ ద్వారం సభా మండపం ద్వారం వలెనే ఉంటుంది. దానిపై కూడా ఆకులు, పూల చెక్కడాలు ఉన్నాయి. ఎత్తైన పైభాగంలో కీర్తిముఖాలు మరియు అర్ధచంద్రాకార శిల ఉంది. లలాటబింబంపై గణేశ విగ్రహం ఉంది. గర్భాలయంలో మధ్యలో భూమిపై స్వయంభూ శివలింగం ఉంది. గర్భాలయం నల్లరాతి పలకలతో నిర్మించబడింది. దానిపై ఇటీవలి కాలంలో సిమెంట్ ఉపయోగించి పిరమిడ్ ఆకారంలో శిఖరాన్ని నిర్మించారు. శిఖరం పైభాగంలో కొంచెం లోపలికి వంగిన చతురస్రాకార నిర్మాణం ఉంది, దానిపై ఆమలక మరియు కలశం ఉన్నాయి. మొత్తంమీద, ఈ ఆలయ నిర్మాణంలో ప్రాచీన మరియు ఆధునిక శైలుల సమ్మేళనం స్పష్టంగా కనిపిస్తుంది.
మహాశివరాత్రి ఈ ఆలయంలో జరిగే ప్రధాన వార్షిక ఉత్సవం, ఇది ఎనిమిది రోజుల పాటు ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. మాఘ కృష్ణ పంచమి నుండి ఆలయంలో అఖండ హరినామ సప్తాహం ప్రారంభమవుతుంది. ఇది మహాశివరాత్రి రోజున ముగుస్తుంది. ఈ సమయంలో వారం రోజుల పాటు మహాభిషేకం, లఘురుద్ర, భజన-కీర్తనలు, జాగరణ, నామస్మరణ, యజ్ఞం మరియు వివిధ గ్రంథ పారాయణాలు జరుగుతాయి. మహాశివరాత్రి రోజున భక్తుల కోసం మహాప్రసాద వితరణ జరుగుతుంది. ఈ రోజున చుట్టుపక్కల ప్రాంతాల నుండి వేలాది మంది భక్తులు దర్శనానికి వస్తారు. ఈ సమయంలో మొత్తం ప్రాంతం జాతర వాతావరణంతో కళకళలాడుతుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- భుదర్గఢ్ నుండి ౨౪ కి.మీ, కోల్హాపూర్ నుండి ౬౩ కి.మీ దూరంలో
- భుదర్గఢ్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం ఉంది
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయానికి కొంత దూరం వరకు రాగలవు
- ఆలయ పరిసరాల్లో వసతి మరియు భోజన సౌకర్యాలు లేవు
പാണ്ടവകാലീന ശിവക്ഷേത്രം
ബാര്വെ, താലൂക്ക് ഭുദര്ഗഡ്, ജില്ല കോലാപ്പൂര്
കോലാപ്പൂര് ജില്ലയിലെ ഭുദര്ഗഡ് താലൂക്കിന് വലിയൊരു സാംസ്കാരിക പാരമ്പര്യമുണ്ട്. ഇവിടുത്തെ താലീമുകള്, ദേവീദേവന്മാരുടെ ഉത്സവങ്ങള്, ഭജന്, കീര്ത്തനം, സംഗീതം എന്നിവയുടെ സംരക്ഷണം അനാദികാലം മുതല് ഇന്നുവരെ തുടരുന്നു. ഉത്സവങ്ങളോടനുബന്ധിച്ച് നടക്കുന്ന ഗുസ്തി മത്സരങ്ങളും, തമാശകളും, അത് കാണുമ്പോള് കൈയടികളാലും ഈളകളാലും ആകാശത്തേക്ക് ഉയരുന്ന തലപ്പാവുകളും വലിയൊരു ചൈതന്യം സൃഷ്ടിക്കുന്നു. അതുപോലെ തന്നെ, ഇവിടുത്തെ മണ്ണില് ആയിരക്കണക്കിന് വര്ഷങ്ങളായി നിലകൊള്ളുന്ന പുരാതന ക്ഷേത്രങ്ങള് മനസ്സിന് ഊര്ജ്ജം പകരുന്നു. അത്തരത്തിലൊരു പുരാതന ശിവക്ഷേത്രം താലൂക്കിലെ ബാര്വെ ഗ്രാമത്തിലുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ നിര്മ്മാണകാലം കൃത്യമായി അറിയാത്തതിനാല് ഇത് പാണ്ടവകാലീന ശിവക്ഷേത്രം എന്ന് അറിയപ്പെടുന്നു. ഇവിടുത്തെ ദൈവം ചൈതന്യവാനും പ്രാര്ത്ഥനകള് കേള്ക്കുന്നവനുമാണെന്ന് ഭക്തര് വിശ്വസിക്കുന്നു.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പഴക്കം എടുത്തുപറയാന് പാണ്ടവന്മാര് ഈ ക്ഷേത്രം നിര്മ്മിച്ചുവെന്ന ഐതിഹ്യം ഇവിടെ പ്രചാരത്തിലുണ്ട്. അതായത്, അജ്ഞാതവാസകാലത്ത് പാണ്ടവന്മാര് ഗ്രാമത്തിന് സമീപമുള്ള വനത്തില് താമസിച്ചിരുന്നു. സന്ധ്യയായതോടെ പാണ്ടവന്മാര് ഈ ശിവക്ഷേത്രം പണിയാന് തുടങ്ങി. കൊത്തുപണികളുള്ള കല്ലുകളാല് നിര്മ്മിച്ച ഈ ക്ഷേത്രം പൂര്ത്തിയാകുന്നതിന് മുമ്പേ പുലര്ച്ചയാകാറായിരുന്നു.
പുലര്ച്ചെ കോഴി കൂവിയതോടെ അടുത്ത യാത്രയ്ക്കായി പുറപ്പെടേണ്ടിയിരുന്നതിനാല് അവര് ക്ഷേത്രത്തിന്റെ പണി നിര്ത്തിവെച്ചു. അതിനാല് ഈ ക്ഷേത്രം അപൂര്ണ്ണാവസ്ഥയിലാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ൧൬-ാം നൂറ്റാണ്ടിലെ വാസ്തുവിദ്യാ ശൈലിയിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ അടിവാരത്ത് കുളങ്ങളുണ്ട്. ൧൯൬൫-ല് ഈ കുളങ്ങളുടെ അറ്റകുറ്റപ്പണികള് നടക്കുമ്പോള് അതില് നിന്ന് പുരാതന നിര്മ്മാണ ഉപകരണങ്ങളും ഒരു പിച്ചള പാത്രവും ലഭിച്ചതായി ഗ്രാമവാസികള് പറയുന്നു.
ഗാര്ഗോട്ടിയില് നിന്ന് ൧൦ കി.മീ അകലെയുള്ള ബാര്വെ ഗ്രാമത്തിന്റെ വടക്ക് ഭാഗത്ത് ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകുമ്പോള് കരിങ്കല്ലില് തീര്ത്ത പന്ത്രണ്ട് കുളങ്ങള് കാണാം. നിലവില് ഈ കുളങ്ങള് പകുതി മണ്ണില് മൂടിയ അവസ്ഥയിലായതിനാല് ഇതൊരു തടാകം പോലെ തോന്നിക്കുന്നു. ഈ കുളങ്ങളുടെ വശങ്ങളിലൂടെ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകാന് കരിങ്കല് പടികളുണ്ട്. ഈ പടികള് കയറി ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റുമുള്ള മമതിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ചെറിയൊരു അങ്കണത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഇവിടുത്തെ പ്രത്യേകത എന്തെന്നാല് ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റുമുള്ള മമതില് വലിയ ദീര്ഘചതുരാകൃതിയിലുള്ള കരിങ്കല് പാളികള് കൊണ്ടുള്ളതാണ്, അതില് ചില അറകളുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റുമുള്ള അങ്കണത്തില് മണ്ണ് നികത്തിയതിനാല് ഈ അറകള് പകുതിയിലധികം മൂടിയ അവസ്ഥയിലാണ്. ഒരു ഗുഹ പോലെ തോന്നിക്കുന്ന ഈ അറകളില് ഓരോന്നിലും ഓരോ ശിവലിംഗമുണ്ട്. ഗ്രാമവാസികളുടെ അഭിപ്രായത്തില് ഇവ പന്ത്രണ്ട് ജ്യോതിര്ലിംഗ സ്ഥാനങ്ങളാണ്. ഇതിലെ ചില അറകളില് വീരഗല്ലുകളുടെയും സതീശിലകളുടെയും അവശിഷ്ടങ്ങളുണ്ട്. ഒരു അറയില് ഒരു ദേവതയുടെ ശില്പമുണ്ട്. തേയ്മാനം സംഭവിച്ചതിനാല് അത് തിരിച്ചറിയാന് കഴിയുന്നില്ല. എങ്കിലും ഈ ദേവത ചതുര്ഭുജയാണ്, ഒരു കൈയില് ആയുധം കാണാം. കാല്ക്കല് സേവകനെയോ സേവികയെയോ കാണാം. വീരഗല്ലുകളുടെയും സതീശിലകളുടെയും ചില കഷണങ്ങള് മമതിലിന്റെ നിര്മ്മാണത്തിനും ഉപയോഗിച്ചതായി കാണാം. ഈ അറകള്ക്ക് സമീപമുള്ള ഉയരമുള്ള മമതിലിലേക്ക് കയറാന് കരിങ്കല് പടികളുണ്ട്.
നന്ദിമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, ഗര്ഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന.
മുഴുവന് കരിങ്കല്ലില് തീര്ത്ത ഈ മണ്ഡപത്തില് കറുത്ത ശിലയില് തീര്ത്ത വലിയ നന്ദിവിഗ്രഹമുണ്ട്. ഈ വിഗ്രഹം താരതമ്യേന ആധുനിക കാലഘട്ടത്തിലേതാണെന്ന് തോന്നുന്നു. ഇവിടെ പുരാതന ക്ഷേത്രത്തിന്റെ കലശത്തിന്റെ ചില അവശിഷ്ടങ്ങള് വെച്ചിട്ടുണ്ട്. നന്ദിമണ്ഡപത്തിന് മുന്നിലുള്ള പ്രധാന കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ കവാടം കരിങ്കല്ലിലാണ്, അതിന്റെ തൂണുകളിലും മുകളിലും കൊത്തുപണികളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ നിര്മ്മാണം ആധുനിക രീതിയില് ഇഷ്ടിക കൊണ്ടാണ് ചെയ്തിരിക്കുന്നത്. ഈ സഭാമണ്ഡപം അടഞ്ഞ രീതിയിലുള്ളതാണ്. ഉള്ളില് ആവശ്യത്തിന് വെളിച്ചവും വായുവും ലഭിക്കാന് ജനലുകള് സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന് ഇരുവശത്തും ഷീറ്റിട്ട മേല്ക്കൂരയുണ്ട്. പ്രത്യേകിച്ചും, ഈ സഭാമണ്ഡപത്തിന് പുറത്ത് വലിയ കൊത്തുപണികളുള്ള കരിങ്കല് തൂണുകളുടെ പിന്തുണ നല്കിയിട്ടുണ്ട്. ഈ കരിങ്കല് തൂണുകള് പുരാതനമാണെന്ന് തോന്നുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുന്ഭാഗത്ത് വലതുവശത്തും ഇടതുവശത്തും വാതിലുകളുണ്ട്.
ഗര്ഭഗൃഹത്തിന്റെ കവാടം സഭാമണ്ഡപത്തിന്റെ കവാടം പോലെ തന്നെയാണ്. അതിന്റെ തൂണുകളിലും ഇലകളുടെയും പൂക്കളുടെയും കൊത്തുപണികളുണ്ട്. ഉയരമുള്ള ഭാഗത്ത് കീര്ത്തിമുഖങ്ങളും അര്ദ്ധചന്ദ്രശിലയുമുണ്ട്. ലലാടബിംബത്തില് ഗണേശവിഗ്രഹമുണ്ട്. ഗര്ഭഗൃഹത്തില് മധ്യഭാഗത്ത് തറയില് സ്വയംഭൂ ശിവലിംഗമുണ്ട്. ഗര്ഭഗൃഹത്തിന്റെ നിര്മ്മാണം കറുത്ത കരിങ്കല് പാളികള് കൊണ്ടാണ് ചെയ്തിരിക്കുന്നത്. അതിനു മുകളില് അടുത്ത കാലത്തായി സിമന്റ് ഉപയോഗിച്ച് ചെറിയ പിരമിഡ് ആകൃതിയിലുള്ള ഗോപുരം നിര്മ്മിച്ചിട്ടുണ്ട്. ഗോപുരത്തിന്റെ മുകളില് അല്പ്പം ഉള്വലിഞ്ഞ ചതുരാകൃതിയുണ്ട്, അതിനു മുകളില് ആമലകവും കലശവുമുണ്ട്. മൊത്തത്തില് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ നിര്മ്മാണത്തില് പുരാതനവും ആധുനികവുമായ ശൈലികളുടെ മിശ്രണം വ്യക്തമാണ്.
മഹാശിവരാത്രിയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിലെ പ്രധാന വാര്ഷിക ഉത്സവം, ഇത് വലിയ ആവേശത്തോടെ എട്ടുദിവസം ആഘോഷിക്കുന്നു. മാഘ കൃഷ്ണ പഞ്ചമി മുതല് ക്ഷേത്രത്തില് അഖണ്ഡ ഹരിനാമ സപ്താഹം ആരംഭിക്കുന്നു. അത് മഹാശിവരാത്രിയില് സമാപിക്കുന്നു. ഈ സമയത്ത് ഒരാഴ്ച നീണ്ടുനില്ക്കുന്ന മഹാഅഭിഷേകം, ലഘുരുദ്രം, ഭജന്-കീര്ത്തനം, ജാഗരണം, നാമസ്മരണം, യജ്ഞം എന്നിവയും വിവിധ ഗ്രന്ഥങ്ങളുടെ പാരായണവും നടക്കുന്നു. മഹാശിവരാത്രി ദിനത്തില് ഇവിടെ ഭക്തര്ക്കായി മഹാപ്രസാദം വിതരണം ചെയ്യുന്നു. ഈ ദിവസം പരിസരപ്രദേശങ്ങളിലെ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തര് ദര്ശനത്തിനായി ഇവിടെ എത്തുന്നു. ഈ സമയത്ത് മുഴുവന് പ്രദേശവും ഒരു ഉത്സവ പ്രതീതി കൈവരിക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങള്
- ഭുദര്ഗഡില് നിന്ന് ൨൪ കി.മീ, കോലാപ്പൂരില് നിന്ന് ൬൩ കി.മീ അകലെ
- ഭുദര്ഗഡില് നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങള്ക്ക് ക്ഷേത്രത്തിന് കുറച്ചു ദൂരം വരെ വരാം
- ക്ഷേത്ര പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
ಪಾಂಡವಕಾಲೀನ ಶಿವಮಂದಿರ
ಬಾರ್ವೆ, ತಾ. ಭುದರಗಡ, ಜಿ. ಕೊಲ್ಲಾಪುರ
ಕೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಭುದರಗಡ ತಾಲೂಕಿಗೆ ಭವ್ಯವಾದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಪರಂಪರೆ ಲಭಿಸಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ತಾಲೀಮುಗಳು, ದೇವ-ದೇವತೆಗಳ ಜಾತ್ರೆಗಳು, ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಸಂಗೀತದ ಪೋಷಣೆ ಅನಾದಿ ಕಾಲದಿಂದಲೂ ಇಂದಿನವರೆಗೂ ಮುಂದುವರಿದಿದೆ. ಜಾತ್ರೆಗಳ ನಿಮಿತ್ತ ನಡೆಯುವ ಕುಸ್ತಿಗಳು, ತಮಾಷೆಯ ಫಡಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳನ್ನು ನೋಡುವಾಗ ಚಪ್ಪಾಳೆ, ಶಿಳ್ಳೆಗಳ ಸದ್ದಿನೊಂದಿಗೆ ಆಕಾಶಕ್ಕೆ ಹಾರುವ ಪೇಟಗಳು ಚೈತನ್ಯವನ್ನು ಉಂಟುಮಾಡುತ್ತವೆ. ಅದೇ ರೀತಿ, ಇಲ್ಲಿನ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ನಿಂತಿರುವ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯಗಳು ಮನಸ್ಸಿಗೆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನೀಡುತ್ತಿವೆ. ಅಂತಹ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ಶಿವಮಂದಿರವು ತಾಲೂಕಿನ ಬಾರ್ವೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣದ ನಿಖರವಾದ ಕಾಲಾವಧಿ ತಿಳಿದಿಲ್ಲದಿರುವುದರಿಂದ, ಇದನ್ನು ಪಾಂಡವಕಾಲೀನ ಶಿವಮಂದಿರ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ದೇವರು ಜಾಗೃತ ಮತ್ತು ಬೇಡಿದ ವರವನ್ನು ನೀಡುವವನು ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ಈ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಚೀನತೆಯನ್ನು ಎತ್ತಿ ತೋರಿಸಲು, ಇಲ್ಲಿಯೂ ಪಾಂಡವರು ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರೆಂಬ ಐತಿಹ್ಯವನ್ನು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅದೇನೆಂದರೆ, ಅಜ್ಞಾತವಾಸದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಪಾಂಡವರು ಗ್ರಾಮದ ಸಮೀಪವಿರುವ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಸಂಜೆಯಾಗುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ಪಾಂಡವರು ಈ ಶಿವಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ಕೆತ್ತನೆಯ ಕೆಲಸವುಳ್ಳ ಕಲ್ಲಿನ ಈ ಮಂದಿರವು ಪೂರ್ಣಗೊಳ್ಳುವಷ್ಟರಲ್ಲಿ ಮುಂಜಾನೆಯಾಗುತ್ತಾ ಬಂದಿತ್ತು.
ಮುಂಜಾನೆ ಕೋಳಿ ಕೂಗಿದಾಗ ಮುಂದಿನ ಪ್ರಯಾಣಕ್ಕೆ ಹೊರಡಬೇಕಾಗಿದ್ದರಿಂದ ಅವರು ಮಂದಿರದ ಕೆಲಸವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿದರು. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಮಂದಿರವು ಅಪೂರ್ಣ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ೧೬ನೇ ಶತಮಾನದ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಶೈಲಿಯ ಈ ಮಂದಿರದ ಬುಡದಲ್ಲಿ ಕುಂಡಗಳಿವೆ. ೧೯೬೫ರಲ್ಲಿ ಈ ಕುಂಡಗಳ ದುರಸ್ತಿ ಕೆಲಸ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದಾಗ, ಅದರಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣದ ಪ್ರಾಚೀನ ಉಪಕರಣಗಳು ಮತ್ತು ಒಂದು ಹಿತ್ತಾಳೆಯ ತಟ್ಟೆ ಸಿಕ್ಕಿತ್ತು ಎಂದು ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೇಳುತ್ತಾರೆ.
ಗಾರ್ಗೋಟಿ ಯಿಂದ ೧೦ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಬಾರ್ವೆ ಗ್ರಾಮದ ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನ ಕಡೆಗೆ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗುವಾಗ, ಕಲ್ಲಿನಿಂದ ನಿರ್ಮಿತವಾದ ಹನ್ನೆರಡು ನೀರಿನ ಕುಂಡಗಳು ಕಣ್ಣಿಗೆ ಬೀಳುತ್ತವೆ. ಪ್ರಸ್ತುತ ಈ ಕುಂಡಗಳು ಅರ್ಧದಷ್ಟು ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಹೂತುಹೋಗಿರುವುದರಿಂದ, ಇದು ಕೆರೆಯಂತೆ ಕಾಣುತ್ತದೆ. ಈ ಕುಂಡಗಳ ಪಕ್ಕದಿಂದ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಕಲ್ಲಿನ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಈ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ, ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲಿರುವ ಆವರಣ ಗೋಡೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಸುಂದರವಾದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಇಲ್ಲಿನ ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ, ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲಿರುವ ಆವರಣ ಗೋಡೆಯು ದೊಡ್ಡದಾದ ಆಯತಾಕಾರದ ಕಲ್ಲಿನ ಶಿಲೆಗಳಿಂದ ಕೂಡಿದೆ ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಕೆಲವು ಓವರಿಗಳಿವೆ (ಗವಿಗಳು). ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲಿರುವ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಹಾಕಲಾದ ಮಣ್ಣಿನಿಂದಾಗಿ ಈ ಓವರಿಗಳು ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಹೂತುಹೋಗಿವೆ. ಗುಹೆಯಂತೆ ಭಾಸವಾಗುವ ಈ ಓವರಿಗಳಲ್ಲಿ ತಲಾ ಒಂದರಂತೆ ೧೨ ಶಿವಲಿಂಗಗಳಿವೆ. ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪ್ರಕಾರ, ಇವು ೧೨ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಗಳ ಸ್ಥಾನಗಳಾಗಿವೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಕೆಲವು ಓವರಿಗಳಲ್ಲಿ ವೀರಗಲ್ಲುಗಳು ಮತ್ತು ಸತೀಶಿಲೆಗಳ ಭಗ್ನಾವಶೇಷಗಳಿವೆ. ಒಂದು ಓವರಿಯಲ್ಲಿ ದೇವತೆಯ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಸವೆದು ಹೋಗಿರುವುದರಿಂದ ಅದನ್ನು ಗುರುತಿಸಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈ ದೇವತೆಯು ಚತುರ್ಭುಜಳಾಗಿದ್ದು, ಆಕೆಯ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಶಸ್ತ್ರವಿರುವುದು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಆಕೆಯ ಪಾದದ ಬಳಿ ಸೇವಕ ಅಥವಾ ಸೇವಕಿ ಕೂಡ ಕಾಣುತ್ತಾರೆ. ವೀರಗಲ್ಲುಗಳು ಮತ್ತು ಸತೀಶಿಲೆಗಳ ಕೆಲವು ತುಣುಕುಗಳನ್ನು ಆವರಣ ಗೋಡೆಯ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೂ ಬಳಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಈ ಓವರಿಗಳ ಹತ್ತಿರದಿಂದ ಎತ್ತರವಾಗಿರುವ ಆವರಣ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಹತ್ತಲು ಕಲ್ಲಿನ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ.
ನಂದಿ ಮಂಟಪ, ಸಭಾ ಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ.
ಸಂಪೂರ್ಣ ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣವಿರುವ ಈ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ನಂದಿಯ ಅಖಂಡ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಬೃಹತ್ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯು ತುಲನಾತ್ಮಕವಾಗಿ ಆಧುನಿಕ ಕಾಲಘಟ್ಟದ್ದಾಗಿದೆ ಎಂದು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರದ ಕಲಶದ ಕೆಲವು ಅವಶೇಷಗಳನ್ನು ಇಡಲಾಗಿದೆ. ನಂದಿ ಮಂಟಪದ ಎದುರಿರುವ ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಮಂದಿರದ ಸಭಾ ಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಸಭಾ ಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಕಲ್ಲಿನದ್ದಾಗಿದ್ದು, ಅದರ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಮತ್ತು ಮಂಡಾರಕದ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆಯ ಕೆಲಸವಿದೆ. ಸಭಾ ಮಂಟಪದ ನಿರ್ಮಾಣವು ಆಧುನಿಕ ಪದ್ಧತಿಯದ್ದಾಗಿದ್ದು, ಇಟ್ಟಿಗೆಗಳಿಂದ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ ಸಭಾ ಮಂಟಪವು ಮುಚ್ಚಿದ ಸ್ವರೂಪದ್ದಾಗಿದೆ. ಒಳಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಬೆಳಕು ಮತ್ತು ಗಾಳಿ ಬರಲು ಕಿಟಕಿಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಸಭಾ ಮಂಟಪದ ಮೇಲೆ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ತಗಡಿನ ಇಳಿಜಾರು ಛಾವಣಿಯಿದೆ. ವಿಶೇಷವೆಂದರೆ, ಈ ಸಭಾ ಮಂಟಪಕ್ಕೆ ಹೊರಗಿನಿಂದ ದೊಡ್ಡದಾದ ಕೆತ್ತನೆಯುಳ್ಳ ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳ ಆಧಾರವನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ. ಈ ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳು ಪ್ರಾಚೀನವಾಗಿರಬಹುದು ಎಂದು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಸಭಾ ಮಂಟಪದ ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಬಲಕ್ಕೆ ಮತ್ತು ಎಡಕ್ಕೆ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ.
ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಸಭಾ ಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಂತೆಯೇ ಇದೆ. ಅದರ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೂ ಎಲೆ-ಹೂವುಗಳ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಎತ್ತರದ ಮಂಡಾರಕದ ಮೇಲೆ ಕೀರ್ತಿಮುಖಗಳಿವೆ ಮತ್ತು ಅರ್ಧಚಂದ್ರ ಶಿಲೆಯಿದೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಕಪ್ಪು ಶಿಲೆಗಳಿಂದ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸಿಮೆಂಟ್ ಬಳಸಿ, ಕುಬ್ಜ ಪಿರಮಿಡ್ ಆಕಾರದ ಶಿಖರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಶಿಖರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಒಳಗೆ ತಿರುಗಿದ ಚೌಕಾಕಾರವಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಲಶವಿದೆ. ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಈ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣದಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಆಧುನಿಕ ಶೈಲಿಯ ಮಿಶ್ರಣವಿರುವುದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ.
ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯು ಈ ಮಂದಿರದ ಮುಖ್ಯ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವವಾಗಿದ್ದು, ಇದನ್ನು ಎಂಟು ದಿನಗಳ ಕಾಲ ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಾಘ ಕೃಷ್ಣ ಪಂಚಮಿಯಿಂದ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ಇದರ ಸಮಾರೋಪವು ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ವಾರವಿಡೀ ಮಹಾಅಭಿಷೇಕ, ಲಘುರುದ್ರ, ಭಜನೆ-ಕೀರ್ತನೆ, ಜಾಗರಣೆ, ನಾಮಸ್ಮರಣೆ, ಯಜ್ಞ ಹಾಗೂ ವಿವಿಧ ಗ್ರಂಥಗಳ ಪಾರಾಯಣಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ದಿನದಂದು ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದಿನದಂದು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಇಡೀ ಪರಿಸರವು ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಭುದರಗಡದಿಂದ ೨೪ ಕಿ.ಮೀ, ಮತ್ತು ಕೊಲ್ಲಾಪುರದಿಂದ ೬೩ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಭುದರಗಡದಿಂದ ಜಿಎಸ್ಆರ್ಟಿಸಿ (GSRTC) ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
পাণ্ডবকালীন শিবমন্দির
বারভে, তা. ভুধরগড়, জি. কোলাপুর
কোলাপুর জেলার ভুধরগড় তালুক এক মহান সাংস্কৃতিক ঐতিহ্যের অধিকারী। এখানকার তালিম, দেব-দেবীর যাত্রা, ভজন, কীর্তন ও সঙ্গীতের চর্চা অনাদিকাল থেকে আজও অব্যাহত রয়েছে। যাত্রার উপলক্ষ্যে আয়োজিত কুস্তি, তামাশার আসর এবং তা দেখার সময় হাততালি ও শিসধ্বনির মধ্যে আকাশে উড়তে থাকা পাগড়ি এক অদ্ভুত প্রাণশক্তির সৃষ্টি করে। একইভাবে, এখানকার ভূমিতে হাজার বছর ধরে দাঁড়িয়ে থাকা প্রাচীন মন্দিরগুলো মনে শক্তির সঞ্চার করে। এমনই একটি প্রাচীন শিবমন্দির রয়েছে তালুকের বারভে গ্রামে। এই মন্দিরের নির্মাণের সঠিক সময়কাল জানা না থাকায় এটি পাণ্ডবকালীন শিবমন্দির হিসেবে পরিচিত। এখানকার দেবতা জাগ্রত এবং ভক্তের মনোবাঞ্ছা পূর্ণ করেন, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস।
এই মন্দিরের প্রাচীনত্ব বোঝাতে এখানেও পাণ্ডবদের মন্দির নির্মাণের কিংবদন্তি প্রচলিত আছে। তা হলো, অজ্ঞাতবাসের সময় পাণ্ডবরা গ্রামের পাশের জঙ্গলে বসবাস করতেন। সন্ধ্যা হতেই পাণ্ডবরা এই শিবমন্দির নির্মাণ শুরু করেন। খোদাই করা পাথরের এই মন্দিরটি পূর্ণতা পাওয়ার আগেই ভোর হয়ে আসে।
ভোরবেলা মোরগের ডাক শুনে পরবর্তী যাত্রার জন্য বেরিয়ে পড়তে হবে বলে তারা মন্দিরের কাজ থামিয়ে দেন। তাই এই মন্দিরটি অসম্পূর্ণ অবস্থায় রয়েছে বলে কথিত আছে। ১৬শ শতাব্দীর স্থাপত্যশৈলীর এই মন্দিরের পাদদেশে কুণ্ড রয়েছে। ১৯৬৫ সালে এই কুণ্ডগুলো মেরামতের কাজ চলার সময় সেখানে নির্মাণের প্রাচীন সরঞ্জাম ও একটি পিতলের চাল পাওয়া গিয়েছিল বলে গ্রামবাসীরা জানান।
গারগোটি থেকে ১০ কিমি দূরে অবস্থিত বারভে গ্রামের উত্তর দিকে মন্দিরের দিকে যাওয়ার পথে খোদাই করা পাথরের বারোটি জলের কুণ্ড চোখে পড়ে। বর্তমানে এই কুণ্ডগুলো অর্ধেক মাটিতে পুঁতে যাওয়ায় এটি একটি জলাশয়ের মতো দেখায়। এই কুণ্ডগুলোর পাশ দিয়ে মন্দিরে যাওয়ার জন্য পাথরের সিঁড়ি রয়েছে। এই সিঁড়ি বেয়ে মন্দিরের চারপাশের প্রাচীরের প্রবেশদ্বার দিয়ে ছোট অথচ সুন্দর প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। এখানকার বিশেষত্ব হলো, মন্দিরের চারপাশের প্রাচীরটি বড় বড় আয়তাকার পাথরের শিলা দিয়ে তৈরি এবং তাতে কিছু কক্ষ (ওভরি) রয়েছে। মন্দিরের চারপাশের প্রাঙ্গণে মাটি ভরাট করার ফলে এই কক্ষগুলোর অর্ধেকের বেশি মাটির নিচে চাপা পড়ে আছে। কোনো গুহার মতো দেখতে এই কক্ষগুলোর প্রতিটিতে একটি করে মোট ১২টি শিবলিঙ্গ রয়েছে। গ্রামবাসীদের মতে, এগুলো ১২টি জ্যোতির্লিঙ্গের স্থান। এর মধ্যে কিছু কক্ষে বীরগল (স্মৃতিস্তম্ভ) এবং সতীশিলাগুলোর ভগ্নাবশেষ রয়েছে। একটি কক্ষে একটি দেবমূর্তিও আছে। ক্ষয়ে যাওয়ার কারণে তা চেনার উপায় নেই। তবে এই দেবতা চতুর্ভুজ এবং তার এক হাতে অস্ত্র দেখা যায়। তার পায়ের কাছে সেবক বা সেবিকাও দেখা যায়। বীরগল ও সতীশিলার কিছু টুকরো প্রাচীরের নির্মাণের জন্যও ব্যবহার করা হয়েছে বলে মনে হয়। এই কক্ষগুলোর পাশ দিয়ে উঁচু প্রাচীরের ওপর ওঠার জন্য পাথরের সিঁড়ি রয়েছে।
নন্দীমণ্ডপ, সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন।
সম্পূর্ণ পাথরের তৈরি এই মণ্ডপে নন্দীর অখণ্ড কালো পাথরের বিশাল মূর্তি রয়েছে। এই মূর্তিটি তুলনামূলকভাবে আধুনিক যুগের বলে মনে হয়। এখানে প্রাচীন মন্দিরের কলসের কিছু অবশিষ্টাংশ রাখা আছে। নন্দীমণ্ডপের সামনের প্রধান প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের সভামণ্ডপে প্রবেশ করা যায়। সভামণ্ডপের প্রবেশদ্বার পাথরের এবং তার দ্বারশাখা ও মণ্ডরকে খোদাইয়ের কাজ রয়েছে। সভামণ্ডপটি আধুনিক পদ্ধতিতে ইটের তৈরি। এই সভামণ্ডপটি বদ্ধ প্রকৃতির। ভেতরে পর্যাপ্ত আলো ও বাতাসের জন্য জানালা বসানো হয়েছে। সভামণ্ডপের ওপর দুই দিকেই টিনের ঢালু ছাদ রয়েছে। বিশেষ বিষয় হলো, এই সভামণ্ডপটিকে বাইরের দিক থেকে বড় খোদাই করা পাথরের স্তম্ভের সহায়তা দেওয়া হয়েছে। এই পাথরের স্তম্ভগুলো প্রাচীন বলে মনে হয়। সভামণ্ডপের সামনের দিকে ডান ও বাম পাশে দরজা রয়েছে।
গর্ভগৃহের প্রবেশদ্বার সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের মতোই। তার দ্বারশাখাগুলোতেও লতাপাতার নকশা খোদাই করা আছে। উঁচু মণ্ডরকে কীর্তিমুখ ও অর্ধচন্দ্রশিলা রয়েছে। ললাটবিম্বে গণেশমূর্তি আছে। গর্ভগৃহের মাঝখানে ভূমিতে স্বয়ম্ভূ শিবলিঙ্গ রয়েছে। গর্ভগৃহের নির্মাণ কালো পাথরের শিলা দিয়ে করা হয়েছে। তার ওপর পরবর্তীকালে সিমেন্ট ব্যবহার করে নিচু পিরামিড আকৃতির শিখর তৈরি করা হয়েছে। শিখরের ওপরের দিকে সামান্য ভেতরের দিকে বাঁকানো চতুষ্কোণ অংশ রয়েছে এবং তার ওপর আমলক ও কলস আছে। সামগ্রিকভাবে এই মন্দিরের নির্মাণে প্রাচীন ও আধুনিক শৈলীর সংমিশ্রণ স্পষ্ট।
মহাশিবরাত্রি এই মন্দিরের প্রধান বার্ষিক উৎসব এবং তা অত্যন্ত উৎসাহের সাথে আট দিন ধরে পালন করা হয়। মাঘ কৃষ্ণ পঞ্চমী থেকে মন্দিরে অখণ্ড হরিনাম সপ্তাহ শুরু হয়। তার সমাপ্তি ঘটে মহাশিবরাত্রিতে। এসময় সপ্তাহব্যাপী মহাভিষেক, লঘুরুদ্র, ভজন-কীর্তন, জাগরণ, নামস্মরণ, যজ্ঞ এবং বিভিন্ন গ্রন্থের পাঠ চলতে থাকে। মহাশিবরাত্রির দিন এখানে ভক্তদের জন্য মহাপ্রসাদের আয়োজন করা হয়। এই দিনে পঞ্চক্রোশী থেকে হাজার হাজার ভক্ত এখানে দর্শনের জন্য আসেন। পুরো এলাকা এসময় যাত্রার রূপ ধারণ করে।
প্রয়োজনীয় তথ্য
- ভুধরগড় থেকে ২৪ কিমি, আর কোলাপুর থেকে ৬৩ কিমি দূরে
- ভুধরগড় থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের কিছু দূরত্ব পর্যন্ত আসতে পারে
- মন্দির চত্বরে থাকা ও খাওয়ার সুবিধা নেই
ਪਾਂਡਵਕਾਲੀਨ ਸ਼ਿਵ ਮੰਦਰ
ਬਾਰਵੇ, ਤਹਿਸੀਲ ਭੁਦਰਗੜ੍ਹ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਕੋਲਹਾਪੁਰ
ਕੋਲਹਾਪੁਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੀ ਭੁਦਰਗੜ੍ਹ ਤਹਿਸੀਲ ਨੂੰ ਇੱਕ ਮਹਾਨ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਵਿਰਾਸਤ ਪ੍ਰਾਪਤ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਅਖਾੜੇ, ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਮੇਲੇ, ਭਜਨ, ਕੀਰਤਨ ਅਤੇ ਸੰਗੀਤ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਅਨਾਦਿ ਕਾਲ ਤੋਂ ਅੱਜ ਤੱਕ ਨਿਰੰਤਰ ਜਾਰੀ ਹੈ। ਮੇਲਿਆਂ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਲੱਗਣ ਵਾਲੇ ਕੁਸ਼ਤੀ ਦੇ ਅਖਾੜੇ, ਤਮਾਸ਼ੇ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਦੇਖਦੇ ਹੋਏ ਤਾੜੀਆਂ ਤੇ ਸੀਟੀਆਂ ਦੀ ਗੂੰਜ ਵਿੱਚ ਅਸਮਾਨ ਵੱਲ ਉਛਲਦੇ ਪੱਗਾਂ ਦੇ ਰੰਗ ਇੱਕ ਅਲੌਕਿਕ ਚੇਤਨਾ ਪੈਦਾ ਕਰਦੇ ਹਨ। ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ, ਇਸ ਧਰਤੀ ‘ਤੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਖੜ੍ਹੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਮਨ ਨੂੰ ਊਰਜਾ ਪ੍ਰਦਾਨ ਕਰਦੇ ਹਨ। ਅਜਿਹਾ ਹੀ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਬਾਰਵੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਦਾ ਨਿਸ਼ਚਿਤ ਸਮਾਂ ਪਤਾ ਨਾ ਹੋਣ ਕਾਰਨ, ਇਸ ਨੂੰ ਪਾਂਡਵਕਾਲੀਨ ਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਅਟੁੱਟ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਬਿਰਾਜਮਾਨ ਦੇਵਤਾ ਜਾਗ੍ਰਿਤ ਹਨ ਅਤੇ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਦੇ ਹਨ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨਤਾ ਨੂੰ ਉਜਾਗਰ ਕਰਨ ਲਈ ਇੱਥੇ ਪਾਂਡਵਾਂ ਦੁਆਰਾ ਮੰਦਰ ਬਣਾਉਣ ਦੀ ਕਥਾ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਅਗਿਆਤਵਾਸ ਦੌਰਾਨ ਪਾਂਡਵ ਪਿੰਡ ਦੇ ਨੇੜਲੇ ਜੰਗਲ ਵਿੱਚ ਰਹਿੰਦੇ ਸਨ। ਸ਼ਾਮ ਹੁੰਦਿਆਂ ਹੀ ਪਾਂਡਵਾਂ ਨੇ ਇਸ ਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਸ਼ੁਰੂ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਪੱਥਰਾਂ ਨਾਲ ਬਣਿਆ ਇਹ ਮੰਦਰ ਜਦੋਂ ਮੁਕੰਮਲ ਹੋਣ ਵਾਲਾ ਸੀ, ਤਾਂ ਸਵੇਰ ਹੋ ਗਈ।
ਸਵੇਰੇ ਮੁਰਗੇ ਦੇ ਬਾਂਗ ਦਿੰਦਿਆਂ ਹੀ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਆਪਣੀ ਅਗਲੀ ਯਾਤਰਾ ‘ਤੇ ਨਿਕਲਣਾ ਸੀ, ਇਸ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਮੰਦਰ ਦਾ ਕੰਮ ਵਿਚਾਲੇ ਹੀ ਛੱਡ ਦਿੱਤਾ। ਇਸੇ ਲਈ ਇਹ ਮੰਦਰ ਅਧੂਰੀ ਅਵਸਥਾ ਵਿੱਚ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ੧੬ਵੀਂ ਸਦੀ ਦੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਵਾਲੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਪੈਰਾਂ ਵਿੱਚ ਕੁੰਡ (ਜਲ-ਕੁੰਡ) ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਵਸਨੀਕਾਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ ਕਿ ੧੯੬੫ ਵਿੱਚ ਜਦੋਂ ਇਨ੍ਹਾਂ ਕੁੰਡਾਂ ਦੀ ਮੁਰੰਮਤ ਦਾ ਕੰਮ ਚੱਲ ਰਿਹਾ ਸੀ, ਤਾਂ ਉਸ ਸਮੇਂ ਨਿਰਮਾਣ ਦੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸੰਦ ਅਤੇ ਇੱਕ ਪਿੱਤਲ ਦਾ ਚਾਲ (ਬਰਤਨ) ਮਿਲਿਆ ਸੀ।
ਗਾਰਗੋਟੀ ਤੋਂ ੧੦ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਬਾਰਵੇ ਪਿੰਡ ਦੇ ਉੱਤਰ ਵੱਲ ਮੰਦਰ ਵੱਲ ਜਾਂਦੇ ਸਮੇਂ ਪੱਥਰਾਂ ਨਾਲ ਬਣੇ ਬਾਰਾਂ ਜਲ-ਕੁੰਡ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਵਰਤਮਾਨ ਵਿੱਚ ਇਹ ਕੁੰਡ ਅੱਧੇ ਮਿੱਟੀ ਵਿੱਚ ਦੱਬੇ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇੱਕ ਤਲਾਬ ਵਰਗੇ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਕੁੰਡਾਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਮੰਦਰ ਵੱਲ ਜਾਣ ਲਈ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਪੌੜੀਆਂ ਨੂੰ ਚੜ੍ਹ ਕੇ ਮੰਦਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਬਣੀ ਕੰਧ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਇੱਕ ਸੁੰਦਰ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੀ ਕੰਧ ਵੱਡੇ ਆਇਤਾਕਾਰ ਪੱਥਰਾਂ ਦੀ ਬਣੀ ਹੋਈ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਵਿੱਚ ਕੁਝ ਓਵਰੀਆਂ (ਛੋਟੇ ਕਮਰੇ) ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਭਰਾਈ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਹ ਓਵਰੀਆਂ ਅੱਧੇ ਤੋਂ ਵੱਧ ਦੱਬ ਚੁੱਕੀਆਂ ਹਨ। ਕਿਸੇ ਗੁਫਾ ਵਾਂਗ ਪ੍ਰਤੀਤ ਹੁੰਦੀਆਂ ਇਨ੍ਹਾਂ ਓਵਰੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਹਰ ਇੱਕ ਵਿੱਚ ਇੱਕ-ਇੱਕ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਅਨੁਸਾਰ ਇਹ ੧੨ ਜੋਤਿਰਲਿੰਗਾਂ ਦੇ ਸਥਾਨ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਕੁਝ ਓਵਰੀਆਂ ਵਿੱਚ ਵੀਰਗਲ (ਵੀਰ-ਪੱਥਰ) ਅਤੇ ਸਤੀ-ਸ਼ਿਲਾਵਾਂ ਦੇ ਅਵਸ਼ੇਸ਼ ਹਨ। ਇੱਕ ਓਵਰੀ ਵਿੱਚ ਇੱਕ ਦੇਵਤੇ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਘਸ ਜਾਣ ਕਾਰਨ ਇਸ ਨੂੰ ਪਛਾਣਨਾ ਮੁਸ਼ਕਲ ਹੈ, ਪਰ ਇਹ ਦੇਵਤਾ ਚਤੁਰਭੁਜ ਹੈ ਅਤੇ ਉਸਦੇ ਇੱਕ ਹੱਥ ਵਿੱਚ ਸ਼ਸਤਰ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਉਸਦੇ ਪੈਰਾਂ ਕੋਲ ਸੇਵਕ ਜਾਂ ਸੇਵਿਕਾ ਵੀ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਵੀਰਗਲ ਅਤੇ ਸਤੀ-ਸ਼ਿਲਾਵਾਂ ਦੇ ਕੁਝ ਟੁਕੜੇ ਕੰਧ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਵਿੱਚ ਵੀ ਵਰਤੇ ਗਏ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਓਵਰੀਆਂ ਦੇ ਕੋਲੋਂ ਉੱਚੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਚੜ੍ਹਨ ਲਈ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਹਨ।
ਨੰਦੀ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ।
ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਪੱਥਰ ਨਾਲ ਬਣੇ ਇਸ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਨੰਦੀ ਦੀ ਅਖੰਡ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਤੁਲਨਾਤਮਕ ਤੌਰ ‘ਤੇ ਆਧੁਨਿਕ ਕਾਲ ਦੀ ਜਾਪਦੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਦੇ ਕਲਸ਼ ਦੇ ਕੁਝ ਅਵਸ਼ੇਸ਼ ਰੱਖੇ ਗਏ ਹਨ। ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਰ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਪੱਥਰ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਇਸਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਚੌਖਟਾਂ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਆਧੁਨਿਕ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਇੱਟਾਂ ਨਾਲ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਇਹ ਸਭਾ ਮੰਡਪ ਬੰਦ ਕਿਸਮ ਦਾ ਹੈ। ਅੰਦਰ ਲੋੜੀਂਦੀ ਰੌਸ਼ਨੀ ਅਤੇ ਹਵਾ ਲਈ ਖਿੜਕੀਆਂ ਲਗਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ‘ਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਟੀਨ ਦੀ ਢਲਵੀਂ ਛੱਤ ਹੈ। ਖਾਸ ਗੱਲ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਸ ਸਭਾ ਮੰਡਪ ਨੂੰ ਬਾਹਰੋਂ ਵੱਡੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦਾ ਸਹਾਰਾ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਇਹ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਪ੍ਰਾਚੀਨ ਜਾਪਦੇ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸੱਜੇ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਵਰਗਾ ਹੀ ਹੈ। ਇਸਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਚੌਖਟਾਂ ‘ਤੇ ਵੀ ਫੁੱਲ-ਪੱਤੀਆਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਉੱਚੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਕੀਰਤੀਮੁਖ ਅਤੇ ਅਰਧਚੰਦਰ ਸ਼ਿਲਾ ਹੈ। ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਸਵੈਯੰਭੂ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਸਿਲਾਂ ਨਾਲ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਉਸ ਉੱਤੇ ਹਾਲ ਹੀ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਸੀਮਿੰਟ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕਰਕੇ ਇੱਕ ਪਿਰਾਮਿਡ ਦੇ ਆਕਾਰ ਦਾ ਸ਼ਿਖਰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਅੰਦਰ ਵੱਲ ਮੁੜਿਆ ਹੋਇਆ ਚੌਰਸ ਹਿੱਸਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ। ਕੁੱਲ ਮਿਲਾ ਕੇ, ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਵਿੱਚ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਆਧੁਨਿਕ ਸ਼ੈਲੀ ਦਾ ਮਿਸ਼ਰਣ ਸਪੱਸ਼ਟ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ।
ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵ ਹੈ ਜੋ ਅੱਠ ਦਿਨਾਂ ਤੱਕ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮਾਘ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਪੰਚਮੀ ਤੋਂ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਅਖੰਡ ਹਰਿਨਾਮ ਸਪਤਾਹ ਸ਼ੁਰੂ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸਦੀ ਸਮਾਪਤੀ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਵਾਲੇ ਦਿਨ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਦੌਰਾਨ ਹਫ਼ਤਾ ਭਰ ਮਹਾਅਭਿਸ਼ੇਕ, ਲਘੁਰੁਦ੍ਰ, ਭਜਨ-ਕੀਰਤਨ, ਜਾਗਰਣ, ਨਾਮਸਮਰਣ, ਯੱਗ ਅਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਗ੍ਰੰਥਾਂ ਦੇ ਪਾਠ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦੇ ਦਿਨ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਪਿੰਡਾਂ ਤੋਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਪੂਰਾ ਇਲਾਕਾ ਇਸ ਸਮੇਂ ਇੱਕ ਮੇਲੇ ਦਾ ਰੂਪ ਧਾਰ ਲੈਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਭੁਦਰਗੜ੍ਹ ਤੋਂ ੨੪ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਕੋਲਹਾਪੁਰ ਤੋਂ ੬੩ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਭੁਦਰਗੜ੍ਹ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਮੰਦਰ ਦੇ ਨੇੜੇ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਕੋਈ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
-
आलमप्रभू मंदिर आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
अधिक माहितीAlam Prabhu Temple Alte, Tal. Hatkanangle, Dist. Kolhapur
View Detailsआलमप्रभु मंदिर, आळते, तहसील हातकणंगले, जिला कोल्हापुर
विवरण देखें -
नागनाथ मंदिर नरंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
अधिक माहितीNagnath Temple Narande, Hatkanangle, Dist. Kolhapur
View Detailsनागनाथ मंदिर नरंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
विवरण देखें -
बिनखांबी गणेश मंदिर कोल्हापूर शहर, ता. जि. कोल्हापूर
अधिक माहितीBinkhambi Ganesha Temple Kolhapur city, Dist. Kolhapur
View Detailsबिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापूर शहर, ता. जि. कोल्हापूर
विवरण देखें
